(पूर्वसूत्रः तोच चिरपरिचित आवाज आणि तेच खळखळून हसणं......)
"सो बडी! यू आर हियर ऍट लास्ट!!!!"
"वॉजन्ट इट रादर कंपल्सरी?", मी. अलीशिया पुन्हा खळखळून हसली....
"येस इट वॉज! एन्ड इट विल ऑलवेज बी इन द फ्यूचर!!!"
अलीशियाला माझ्या सोबत बसलेली पाहून वेट्रेस टेबलाशी आली.....
"अ ब्लडी मेरी ऍन्ड..."
"मला काहीही प्यायला नकोय!!", मी.
"ऍन्ड अ स्क्रू-ड्रायव्हर!!" माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत अलीशिया म्हणाली. व्होडका आणि संत्र्याच्या रसाचे मिश्रण असलेलं स्क्रू-ड्रायव्हर हे माझं एकेकाळचं अतिशय आवडतं ड्रिंक!!! इतक्या वर्षांनंतरही ते तिच्या अजून लक्षात होतं....
"आणि तू माझ्या सेक्रेटरीला ते डिकीबद्द्लचं कशाला सांगितलंस? तिच्या डोक्यात काही वेगळ्याच कल्पना सुरू झाल्या, माहितेय?"
"ती जास्त नखरे करायला लागली म्हणून सांगितलं! ओ, नेव्हर माईंड हर!! सेक्रेटर्यांना आपले बॉसेस कधीकाळी चावट असलेले आवडतात!!" आता माझं बोलणंच खुंटलं...
"बरं ते जाऊदे! फर्स्ट, गिव्ह मी अ बिग हग!!" मला मिठी मारत ती म्हणाली, "आय मिस्ड यू सो मच!!"
"सो डिड आय!!", मी.
"खोटं बोलू नकोस! इतक्या वर्षांत कॉन्टॅक्ट पण नाही ठेवलास!! आत्ता मलाच तुला शोधून काढावं लागलं!!! बाकी यू हॅव् गेन्ड वेट! जाडा झालास! केसही पिकले कानशिलाजवळ!! डॉक्टर झालास म्हणे!!! डोक्याने पण मॅच्यूअर झालास इतक्या वर्षांत, की अजूनही आहे तसाच वात्रट आहेस?"
"बाई गं, एका मुलाचा बाप आहे मी आता!"
"डज दॅट मेक पीपल मॅच्यूअर? आय डिडंन्ट नो!!" मला एक टोला हाणत ती म्हणाली, "माझ्या नेफ्यूचा फोटो कुठाय?" मी माझ्या मुलाचा फोटो काढून दाखवला....
"ओह! सो स्वीट!! तुझी अजून तीच बायको आहे का ते विचारणार होते पण याला बघून ते विचारायची गरजच भासत नाही!! बाकी त्याचा चेहरा आईच्या वळणावर गेलाय तेच बरं!!" अजून एक टोला...
"तू मात्र फारशी बदललेली दिसत नाहीस!!"
"त्याचं कारण माझी साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी!!", माझी फिरकी घेत अलीशिया म्हणाली....
"हो ना! तुझ्या रहाणीला साधी म्हणणं म्हणजे आम्ही दारिद्र्यरेषेखालीच जीवन जगतोय!!!" मी टोला परतवला.
"आणि कॉस्मेटिक्सची मेहेरबानी!! ते जाऊदे! मला सांग तुझी स्टोरी!! काय काय केलंस गेल्या पंधरा वर्षांत!!"
मी माझी स्टोरी सांगितली. स्टोरी काय असणार! जॉब आणि करियर!! दर तीन चार वर्षांनी वरची पोझिशन आणि नवीन शहर!!
"माझं जाऊदे! तू काय करतेस ते सांग!!"
"मी ना! आमचं नेहमीचंच!! ज्युवेलरी आणि प्रेशियस स्टोन्स!!!"
"डॅडी कसे आहेत तुझे?"
"अरे डॅडी वारले सहा वर्षांपूर्वी!!"
"ओ! आय एम सॉरी!"
"थँक्स! त्याआधी दोन्-तीन वर्षे ते आजारीच होते! गेली आठ्-नऊ वर्षे मीच संभाळतेय सगळा बिझिनेस!!"
"अजून नफ्यात चालला आहे का बिझिनेस?", मी मघाचा टोला परतवला...
"शट अप!!! मी एक्सपांन्ड केलाय बिझिनेस!! ईस्टर्न युरोप, जपान, मिडल-ईस्ट आणि हो तुमच्या मुंबईतही!! युवर न्यू अप्पर मिडल क्लास!!!"
"बरं, मला कशाला इथे बोलावलंस?"
"लेट्स गो टू अवर स्वीट!", अलीशिया उभी रहात म्हणाली, "मी जेवणही तिथेच मागवलंय. मला तुझ्याशी काही बोलायचंय! आणि मुख्य म्हणजे तुला काही दाखवायचंय!!!"
मी तिच्या पाठोपाठ निघालो. नेहमीच्या लिफ्टसकडे न जाता ती एका वेगळ्याच लिफ्ट्कडे गेली. डायरेक्ट पेन्टहाऊसला जाणारी लिफ्ट होती ती! तिने तिच्याकडच्या ऍक्सेस कार्डाने ती उघडली! आतमध्ये बाकी मजल्यांची बटनं नव्हतीच!! डायरेक्ट ऐंशी मजल्यांच्या वर असलेलं पेंन्टहाऊस!!!
"वॉव!! एकदम पेन्टहाऊस हं!", मी उदगारलो....
"अरे काही नाही!!", काही विशेष नसल्यासारखा हात झटकत ती म्हणाली, "डॅडींना हे पेंटहाऊस खूप आवडायचं!! ते सान-फ्रान्सिस्कोत आले की नेहमी इथेच उतरायचे!!! ह्या हॉटेलचे प्रिफर्ड गेस्ट होते ते!!! त्यांच्यानंतर मग मी ते तसंच चालू ठेवलं! होटेल मॅनेजमेंटचा पण खूपच आग्रह पडला!!!!"
"अरे वा! बरी चांगली दिसतेय की मॅनेजमेंट!! जुने संबंध सांभाळतेय!!!"
"आणि त्यांचे ढीगभर शेअर्स माझ्याकडे आहेत!! दॅट हेल्प्स टू!!", पुन्हा ते खळखळून हसणं...
आम्ही तिच्या पेंटहाऊसमध्ये शिरलो. सेरानंच आमचं स्वागत केलं. पुन्हा तिचं ते खास अमेरिकन पद्धतीचं स्वागत! पण यावेळी मला त्यात खूप आपुलकी जाणवली!!!
"अरे केव्हढा मोठा झालास तू? बाहेर कुठे भेटला असतास ना तर ओळखलंच नसतं मी तुला!!!", सेरा.
"मोठा कसला, म्हातारा झालाय तो गाढव!!!", इति अलीशिया....
"असू दे! पुरूष मोठे झाले की भारदस्त दिसतात, मला आवडतं!!", सेरा.
"पण सेरा, तू मात्र इतक्या वर्षात अधिकच सुंदर दिसायला लागली आहेस!!", मी खरं ते सांगितलं
"तुमचा दोघांचा काय हातात हात घालून पळून जायचा प्लान आहे का?", अलीशिया वदली, "असेल तर आत्ताच जा! येणारं चवदार जेवण तरी मी एकटीच पोट भरून खाईन!!!"
"ए, तू गप गं!", मी तिला चापलं, "सेरा, काय करतेस तू?"
"तुला आठवतंय, ते टेनेसीमधलं रॅन्च आणि ते हॉर्स-ब्रीडींग? ते सगळं मी संभाळते!!", सेरा.
"रियली? वॉव!!"
"अरे काही नाही!", सेराच्या कुल्यावर एक चापटी मारत अलीशिया म्हणाली, "अरे हिला काही काम-धंदा करायला नको!! तिथे टेनेसीत रहाते मस्त हवेत आणि हाताखालच्या नोकरांवर सत्ता गाजवते!!! आणि सांगते म्हणे मी घोडे पाळते!!!"
सेरा समजूतदारपणे खुद्कन हसली...
अलीशियाने तिला काही खूण केली आणि सेरा आत गेली. तिची पाठ वळल्यावर अलीशिया मला गंभीरपणे म्हणाली,
"अरे नाही रे! खरं म्हणजे तिला घोड्यांची भीती वाटते. पण माझ्यासाठी ती बिचारी सगळं करते. तुला माहिती आहेच, हे रॅन्च आणि घोडे हे माझं स्वप्न होतं, तिचं नव्हे. पण मला तर या ज्युवेलरी बिझिनेसमधून डोकं वर काढायला उसंत मिळत नाही. म्हणून माझं स्वप्न पुरं व्हावं म्हणून ती धडपड करतेय!!"
"ओह! दॅट्स सो नाईस ऑफ हर!!"
"येस! आता आमच्या घरात आय वेअर द पॅन्टस!!! मी बिझिनेस संभाळते आणि सेरा सर्व घरं आणि प्रॉपर्टीजची देखभाल करते!!! धिस हॅज बीन गोईंग ऑन फॉर द लास्ट फिफ्टीन इयर्स!!"
"बरं, तू काय दाखवणार होतीस मला?"
"येस दॅट!.... सेराऽऽऽ!!!" अलीशियाने हाक मारली.....
सेरा बाहेर आली. पण ती एकटीच नव्हती. तिच्याबरोबर एका बाबागाडीत झोपलेली एक वर्ष्-दीड वर्षांची मुलगी होती. अतिशय गोड चेहरा, भरपूर केस आणि वर्णाने सावळी एशियन! मधूनच झोपेत खुद्कन हसत होती तेंव्हा अजूनच सुंदर दिसत होती.....
"हे काय? हे प्रेशियस ज्युवेल कुठून आणलंस?"
"कशी आहे?"
"मस्तच!! अगदी स्वीट आणि चार्मिंग प्रिंन्सेस!! पण माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस?"
"अरे तुला माहिती आहेच की बिझिनेसच्या निमित्ताने आमचे मलेशिया-थायलंड-इंडोनेशियाबरोबर पूर्वीपासून कॉन्टॅक्टस आहेत, अगदी डॅडींच्या काळापासून! आमचं खूप जाणं-येणंही आहे तिथे. गेल्या २००४ च्या भूकंपात आणि त्सुनामीत तिथे खूपच वाताहात झाली. तेंव्हा त्या लोकांना मदत म्हणून आम्ही तिथे बिझिनेस कॉन्टॅक्ट असलेल्या लोकांनी निधी उभारून मदतकार्य सुरू केलं होतं. त्या निमित्ताने मी आणि सेराने तिथल्या मदतकेंन्द्रांना बर्याच आणि वारंवार भेटी दिल्या होत्या. निधी व्यवस्थित वापरला जातोय की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी!"
"बरं मग, ही मुलगी?"
"ही तिथल्या एका अनाथकेंद्रात आली होती. हिचे आई-बाप त्सुनामीत वाहून गेले. ही एका प्लास्टिकच्या पाळण्यात होती म्हणून तरंगत गेली आणि अतिशय आश्चर्यकारकरित्या वाचली. तिला तिथे अनाथालयात भरती केलं गेलं होतं. मला आणि सेराला पाहताक्षणीच ही खूप म्हणजे खूपच आवडली."
"म्हणून तू तिथनं हिला उचलून आणलीस?", मनात म्हटलं ह्या बयेचा काही भरवसा नाही.....
"अरे तसं नाहीरे!! आमच्या रिलेशनशिपमध्ये अलिकडे सेरा वॉज अल्सो अनहॅपी दॅट वुई डिडन्ट हॅव अ चाईल्ड!! आता आमच्या रिलेशन्शिपमध्ये आमच्या दोघांचं एक मूल कसं असणार? आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करून घेता येतं आणि आम्ही सेरासाठी तसाच विचार करत होतो. पण तेव्हढ्यांत ही भेटली....."
"मग?"
"मग मी सेराला म्हटलं कि बघ, कुठूनतरी आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करून घेण्यापेक्षा ही आपल्या दोघींनाही आवडलीय! तिलाही कोणी नाहिये! तेंव्हा आपणच तिला दत्तक घेऊ या का? कमीतकमी एका जीवाचे तरी क्लेश कमी होतील!!! थोड्याफार समजवण्याने तिलाही ते पटलं. मग आम्ही तिथे जाऊन तिला रीतसर दत्तक घेतलं."
"दॅट्स सो नाईस!!"
इतक्यात ती मुलगी झोपेतून उठली आणि कुरकुर करू लागली. सेराने तिला उचलून कडेवर घेतलं. आता तिचे डोळे मला दिसले. अगदी काळेभोर होते. खुपच क्यूट होती ही मुलगी!!!
मी तिला घेण्यासाठी तिच्यासमोर हात केले. आणि ती लबाड सरळ आली की माझ्याकडे!! काही ओळख वगैरे गरज लागली नाही तिला! अलीशिया आणि सेरा एकमेकींकडे पाहून हसल्या...
"सो यू आर अ फॅमिली नाऊ! कॉन्ग्रॅच्यूलेशन्स!!!!", मी.
"दॅट्स द थिंग!! दॅट्स व्हेअर वुई नीड युवर हेल्प!!!"
"माझी काय मदत हवी?"
"अरे दिसत नाही का तुला? ही मुलगी ईंडियन ओरिजिनची आहे. शी इज नॉट ईंडियन बट ऑफ ईंडियन ओरिजिन!! हर पेरेन्टस वेअर फ्रॉम इंडोनेशिया, द बाली आयलंड!! दे वेअर बाली हिंदूज!!! आम्ही काही ख्रिश्चन नाही करणार तिला पण तिला तिची हेरिटेज कशी शिकवणार आम्ही? ती आमच्यापेक्षा दिसायला इतकी वेगळी आहे की तिला समजूत येताक्षणी कळणारच! त्यामुळे ती आमची दत्तक मुलगी आहे हे तिला लवकरच सांगून टाकणं क्रमप्राप्त आहे. ते आम्ही करूच पण तिला तिच्या ईंडियननेसबद्दल, हिंदूईझमबद्दल काय शिकवू शकणार आम्ही?"
"मग तुम्हाला माझ्याकडनं काय मदत हवी? टेनेसीमधल्या इंडियन टेंपलचा पत्ता?", मी.
"हॅ हॅ, काय पण बोललास! तुझं काय डोकं आहे का खोकं? अरे तो पत्ता मी ही शोधून काढू शकते! इन फॅक्ट नॅशव्हिलच्या टेंपलला आम्ही जाऊन सुद्धा आलो आहोत. पण हिच्या जीवनात कोणीतरी तिचं इंडियन आणि हिंदू असं आपलं माणूस नको का?"
"बरं मग तुझं काय म्हणणं?"
"आमची दोघींची अशी इच्छा आहे की तू आणि तुझी पत्नी यांनी तिचं गॉड-पेरेन्टस व्हावं!!!"
"अरे बापरे! गॉड पेरेन्ट्स?", मी एकदम गडबडूनच गेलो. शॅम्पेन, स्क्रू-ड्रायव्हर सगळ्या एकदम झरझरा खाली उतरल्या.....
"का? काय अडचण आहे तुला?"
"एक अडचण? अगं अनेक अडचणी आहेत!!!! एक म्हणजे हिंदू लोकांत बाप्तिस्मा नसतो त्यामुळे गॉड पेरेन्टसही नसतात. दुसरं म्हणजे मी काही प्रॅक्टिसिंग हिंदू नाहीये. तिसरं, मला माझ्या पत्नीला विचारायला नको का? चवथं म्हणजे ही आयुष्यभराची कमिटमेंट आहे!! हा काय भातुकलीचा खेळ आहे का?"
पण ती मार्केटिंग मास्टर अलीशिया होती. तिने माझ्या या सर्व संभाव्य प्रश्नांवर अगोदरच विचार करून ठेवला होता.....
"हे बघ, हिंदू लोकांत तसे गॉड पेरेन्ट्स नसतात हे मलाही माहितीये. मी तिला तिच्या हेरिटेजचं जिवाभावाचं माणूस या अर्थाने म्हणतेय! तू प्रॅक्टिसिंग हिंदू नाहियेस हे मला पूर्वीपासूनच माहिती आहे. पण तुझं त्या विषयावर वाचन आहे हेही मी पूर्वी पाहिलंय!! होय, तुला तुझ्या पत्नीला विचारायला पाहिजेच, मी कुठं नाही म्हणतेय? जातांना हिचे फोटो घेऊन जा आणि तिला दाखवून विचार! आणि हा खेळ नसून आयुष्यभराची कमिटमेंट आहे हे मलाही कळतंय! म्हणून तर नुसतं फोनवरून न बोलता तुला इथे बोलावलं!! आणि तुम्ही आत्ता तुमच्या मुलाला वाढवता आहांतच ना!! मग ही तुमची आणखी एक मुलगी समज!!" तिचा युक्तीवाद बिनतोड होता...
"अगं पण! मी इथे वेस्ट्-कोस्ट्ला आणि तुम्ही टेनेसीत इस्ट्-कोस्ट्ला! हे जमणार कसं? मी पट्कन उठून येणार कसा?"
"आज कसा आलांस? तसाच!!", आता तिच्या आवाजाला धार आली होती...
मी पुन्हा त्या छोट्या मुलीकडे पाहिलं. खरंच मोहात पडण्यासारखीच होती...
"हे बघ, मला विचार करायला जरा वेळ दे! मला माझ्या पत्नीशी चर्चा करु दे...", मी.
"जरूर! आम्ही कुठं नाही म्हणतोय! तू जरूर विचार कर, तिचे फोटो घेऊन जा, तू आणि तुझी पत्नी यावर चर्चा करा, तुमच्यावर हिची काहीही फिनान्शियल जबाबदारी नाहिये याची तिला कल्पना दे, आणि मग आम्हांला कळव!!"
आवाज थोडा सॉफ्ट करत अलीशिया पुढं म्हणाली, "हे बघ, हे काहीसं ओव्हरवेल्मिंग वाटु शकतं याची मला कल्पना आहे. पण आमच्यासमोर तिच्या हेरिटेजचा, प्रेमळ, आणि ही रिलेशनशिप समर्थपणे आणि निस्वार्थीपणे पार पाडू शकेल असं तुझ्याशिवाय दुसरं कोणीहि नाही. मी तुझे अगदी उपकार मागतेय, आणि मला उपकार मागायला अजिबात आवडत नाही! तेंव्हा प्लीज, प्लीज, नाही म्हणू नकोस!!" तिचा आवाज गहिवरून आला होता....
सेराने तिला जवळ घेतलं. पण आज माझं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. माझी नजर त्या मुलीवर खिळली होती. मी पुढे होऊन पुन्हा तिला कडेवर घेतलं....
"बाय द वे, वुई हॅव नेम्ड हर रूबी!!!"
"रूबी?", मी हसलो...
"व्हाय? व्हॉट्स द मॅटर?"
"काही नाही!! प्रेशस स्टोन्समध्ये दिवसरात्र काम करून तुझी कल्पनाशक्तीही गंजल्येय!!!"
"मग तू इंडियन नांव ठेव तिला!! पण इकडच्या लोकांना उच्चारता येईल असं ठेव!!!"
मी त्या मुलीकडे एकटक बघत होतो. आणि माझ्या तोंडून नकळत शब्द निघून गेले....
"शिल्पा! हिचं नांव शिल्पा!!!"
"शिल्पा? व्हॉट डज दॅट मीन?"
"शिल्पा मीन्स द वन हू इज लाइक अ स्कल्पचर!! मेन्ली रिफर्ड टू सम्थिंग व्हेरी ब्यूटिफूल ऍन्ड आऊट्स्टँडिंग!! लाईक स्टॅच्यू ऑफ अ गॉड ऑर अ गॉडेस!!"
"ओ, आय लव्ह दॅट नेम! ऍन्ड इट्स मीनींग टूऽऽ!!!!!" सेरा चित्कारली....
"डिडंन्ट आय टेल यू?" माझ्याकडे कौतुकाने पहात अलीशिया तिला म्हणाली, "ही इज द राईट वन!!!"
............
............
परतीचा प्रवास करून मी घरी आलो. प्रवासभर डोक्यात अलीशिया, सेरा आणि शिल्पाचेच विचार होते. घरी आल्यावर मध्यरात्रीपर्यंत जागून बायकोला ही सगळी स्टोरी सांगितली. ती अलीशियाला चांगलीच ओळखत असल्याने ती फारशी आश्चर्यचकित झाली नाही. तिला शिल्पाचे फोटो दाखवले. तिलाही शिल्पा खूप आवडली. आपल्याला तिचे धर्मपालक व्हायला मिळण्यात आपलाच सन्मान आहे ते तिनेच (उलट) मला पटवून दिलं. पोरगं तर शिल्पाचे फोटो घेऊन "माय न्यू सिस्टर!!!" ओरडत घरभर धावत सुटलं.....
आमचा निर्णय झाला होता! मध्यरात्रीच मी फोन उचलला, नंबर फिरवला....
त्या दोघी जाग्याच होत्या.....
"द आन्सर इज यस!!"
क्लिक...
यावेळी तिच्या हाय-बायची वाट न पहाता मीच फोन ठेवून दिला.....
उशीवर डोकं टेकून मी डोळे मिटले. माझ्या बदललेल्या आयुष्याला आता सुरवात झाली होती.....
माझ्या पत्नीने मला मुलगा दिला.......
आणि आता या माझ्या जिवलग मैत्रिणीने मला तिची मुलगी दिली......
माझं आयुष्य आता परिपूर्ण आहे! मी पूर्ण कॄतार्थ आहे!!
(संपूर्ण)
(वरील कथेतील व्यक्ती काल्पनिक असून कुणाशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.)
प्रतिक्रिया
11 Jan 2009 - 6:46 am | मयुरा गुप्ते
Simply Beautiful....
11 Jan 2009 - 7:16 am | रेवती
अनपेक्षीत शेवट. अतिषय सुंदर कथा.
रेवती
11 Jan 2009 - 7:44 am | यशोधरा
टीपिकल पिडांकाका! :)
मस्तच!
11 Jan 2009 - 7:50 am | शितल
काका,
एक छान मुव्ही ही बनेल ह्या कथेवर :)
11 Jan 2009 - 7:59 am | सुनील
फारच सुंदर आणि वेगळी कथा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
11 Jan 2009 - 8:04 am | घाटावरचे भट
मस्तच जमल्येय कथा.
11 Jan 2009 - 8:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान शेवट ! आवडली कथा !
-दिलीप बिरुटे
11 Jan 2009 - 8:33 am | सहज
कथा आवडली.
11 Jan 2009 - 8:39 am | जृंभणश्वान
फारच छान गोष्ट आहे.
पहिल्यांदा अलीशिया जेव्हा मला तुझ्याशी काही बोलायचेय म्हणाली तेव्हा मला वाटले की, सेराला मुल पाहिजे असेल आणि त्यासाठी ह्याची मदत पाहिजे.
पण वेगळी व छानच मागणी निघाली
11 Jan 2009 - 9:00 am | नीधप
वा छान!!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
11 Jan 2009 - 9:00 am | प्राजु
सुरेखच जमली आहे कथा.
कथेतल्या सगळ्या व्यक्ती आणि नावं जर खरंच काल्पनिक असतील तर .. काका, तुमच्या कल्पनाशक्तीला माझा सलाम. :)
कथेच्या आधीच्या भागांवरून वाटलं होतं की, ही अलिशिया तुम्हाला तिच्या बिझनेस मध्ये काही गुंतवणून करा.. किंवा त्या संदर्भात काही बोलण्या साठी किंवा... तुमच्या कॉलेजमधल्या मित्रमैत्रीणींसाठी गेट टुगेदर... अशासाठी बोलावते आहे असा अंदाज होता, पण माझ्या अंदाजाच्या ठिकर्या ठिकर्या झाल्या..(अफकोर्स ..धिस इज डांबिस शॉट! सो.. धिस शुड बी लाईक धीस ओन्ली).
मस्त कथा.. एकदम मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Jan 2009 - 9:09 am | अनिल हटेला
=D> =D> =D>
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
11 Jan 2009 - 11:21 am | मदनबाण
अन्याशी सहमत... :)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
11 Jan 2009 - 11:23 am | मदनबाण
*
11 Jan 2009 - 10:19 am | वल्लरी
खुपचं छान...
कथा आवडली. ... :)
---वल्लरी
11 Jan 2009 - 11:01 am | एकलव्य
कथेची सगळी वळणे आवडली... ग्रेट!
(वरील कथेतील व्यक्ती काल्पनिक असून कुणाशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.)
सोच ना पडेगा!! :?
11 Jan 2009 - 11:30 am | श्रावण मोडक
खरं तर, द एण्ड इज द बिगिनिंग. होप, यू गेट इट!!!
दोन धक्के या कथानकात पुरेसं भावनिक आंदोलन आणतात. आणि मग शेवट जिथं केला तिथं तो गुंडाळला जातो.
इफ यू स्टार्ट प्लेईंग लाईक द्रविड, यू कान्ट एन्ड इन सेहवागस्टाईल.
लेखनाचं कौशल्य हेच की, त्या दोन धक्क्यातून अपेक्षा वाढत जातात. म्हणून म्हटलं, खरं तर, द एण्ड इज द बिगिनिंग.
11 Jan 2009 - 11:35 am | परिकथेतील राजकुमार
अ प्र ती म !
ह्याला म्हणतात कथा !
खर तर तुमचे लेखन वाचुन प्रचंड राग आला, कारण तुमची कथा वाचुन आम्हाला आमचे लेखन किती सुमार आहे ह्याची जाणीव झाली.
सुमार राजकुमार
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
11 Jan 2009 - 12:05 pm | अवलिया
कोणत्याही भागात पुढे नक्की काय होईल याची अजिबात कल्पना येत नव्हती, हेच लेखकाचे यश.
जबरदस्त!!!!
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
11 Jan 2009 - 12:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सुंदर वर्णन, ओघवती शैली आणि कथा-क्लायमॅक्सतर एकदम ए-वन!
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
11 Jan 2009 - 1:56 pm | मऊमाऊ
फार मस्त ! अन अगदी अनपेक्षित शेवट !
11 Jan 2009 - 6:03 pm | राघव
अनपेक्षित पण तितकाच अर्थपूर्ण शेवट!
कथा मनापासून आवडली ! अन् तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम. :)
जियो पिडांकाका!
(रंगलेला)मुमुक्षु
11 Jan 2009 - 6:05 pm | चतुरंग
एकदम कैच्या कैच उंचावरुन झोकून दिलंत की हो कथेला, डौलदार वळणं घेत घेत जाणारी एखादी सुंदर नदी एकदम एखादा धबधबा बनावी ना तशी! फारच छान!!
चतुरंग
11 Jan 2009 - 6:07 pm | विनायक प्रभू
अतिशय सुंदर कथा. खुप आवडली.
11 Jan 2009 - 10:31 pm | मृण्मयी
कथा आवडली.
12 Jan 2009 - 12:39 am | बिपिन कार्यकर्ते
सगळ्यांनी सगळे शब्द वापरून झाले आहेत. मी पामर काय बोलू. आधी मोडकांचे राजे आले आणि आता अलिशिया.... उच्च प्रतीचे साहित्य येतंय मिपावर आजकाल. मस्त.
बिपिन कार्यकर्ते
12 Jan 2009 - 1:42 am | सुक्या
काय झ्याक कथा होती हो. एकदम सही.
मला काही लिहीता येत नाही परंतु अशा सुंदर साहित्यक्रुती वाचल्या / अनुभवल्या की मायभुमी पासुन दुर असल्याचे जानवत नाही.
फुडच्या लेकनाला सुबेचा :-)
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
12 Jan 2009 - 6:58 am | गोगोल
गॉड फादर आणि गॉड पेरेंट्स ची कल्पना मला खर म्हणजे हॅरी पॉटर मुळे नीट कळली. कुणाचे तरी गॉड फादर वा मदर बनणे हे किती मानाचे आणि जबबदारीचे काम असते हे मला तेव्हा कळले. (त्या आधी माझी गॉड फादर ची व्याख्या म्हणजे माफिया शी संबधित व्यक्ती जी की केस चापून चोपून व्यवस्थित बसविते, बसक्या आवाजात बोलते आणि पुरुषांना सुद्धा आपले हात चुंबू देते ती अशी होती). जे के रोलिंग चे मी त्यासाठी मनोमन आभार मानले आहेत. आपल्यात अशी सुंदर कल्पना का नाही म्हणून तळमळलो आहे आणि मनातल्या मनात लयुपिन आणि टॉंक्स प्रमाणे मलाही कुणीतरी एक दिवस त्यांच्या बाळाचा गॉडफादर करतील अशी दिवा स्वप्ना रंगवली आहेत. त्या सर्व आठवणी आज उचंबळून आल्या.
अशी ही सुंदर संकल्पना आपल्या कथेत उत्तम रित्या गुंफल्याबद्दल आपले अभिनंदन आणि धन्यवाद.
(मी नाही तर तुम्ही तरी....कुणीतरी गोडपेरेंट्स होतय याचाच आनंद)
12 Jan 2009 - 3:33 pm | अभिरत भिरभि-या
>> आपल्यात अशी सुंदर कल्पना का नाही म्हणून तळमळलो आहे
किसन्याची ''आई' ' यशोदा त्याची "गॉडमदर" नाय व्हय ? :?
अभिरत
12 Jan 2009 - 7:15 am | अघळ पघळ
कथा नेहेमीप्रमाणे मस्तच रंगलीये रे डांबीसा.फक्त ही जीवलग मैत्रिण ’जीवलग’ असुनही १५ वर्षे (एकाच देशात असुनही) काहीच संपर्क नाही हे काही पटले नाही. आणि दुसरे म्हणजे समलिंगी लोकांनी एकत्र राहवे वगैरे त्याला आमचा काहीच विरोध नाही पण मुलांचे संगोपन करण्यासाठी मुलांना आई वडीलच हवे ह्या ऒर्थोडॊक्स मताचे आम्ही आहोत त्यामुळे शेवट फारसा आवडला नाही.
अघळ पघळ
12 Jan 2009 - 7:28 am | सहज
>पण मुलांचे संगोपन करण्यासाठी मुलांना आई वडीलच हवे
जर जगात अनाथ त्यामुळे पुलाखाली, फूटपाथवर, न शिकलेली, शोषण होत वाढणारी मुले आहेत तर समलिंगी लोकांना पालकत्व काही चुकीचे वाटत नाही. जर अनाथ मुलाला आईची [२ आया ] किंवा [२] वडलांची माया, छत्र, चांगले जीवन मिळत असेल तर त्यात काही गैर नाही.
12 Jan 2009 - 7:41 am | अघळ पघळ
अनाथ मुले आहेत तर त्यांना दत्तक घेणारी (समलिंगी नसणारी) दांपत्ये पण आहेत. आणि तरीही अनाथ असणार्यांसाठी सरकारने संगोपनाची जवाबदारी स्विकारली पाहिजे. सेवाभावी संस्था देखिल असतात. समलिंगी लोकांना ही मुल देणे हा पर्याय असु शकत नाही. तसेच अलीशीयाने दत्तक घेण्यापूर्वी क्रुत्रिमपणे मुले जन्माला घालायचा विचार देखिल केला होता ते तर अजीबातच मान्य होणे नाही. तुम्ही आणि तुमचा जोडीदार हवा तो गोंधळ घाला. स्वातंत्र्य उपभोगा. आमचे काहीही म्हणणे नाही त्यात तिसरा जीव मात्र सामील होऊ नये इतकेच.
12 Jan 2009 - 7:53 am | सहज
>अजीबातच मान्य होणे नाही
अहो समलिंगी नसणारी दांपत्ये यांना जरी दत्तक प्रक्रियेत प्राधान्य दिले, तसेच आज जगभर अनेक अनाथ सरकारी, खाजगी संस्था आहेत तरीही जर का रस्त्यावर वाढणारी मुले हे वास्तव आहे त्यामुळेच म्हणतो की समलिंगी दांपत्याने दत्तक घेण्यात काही गैर नाही. अगदी तुम्हाला अयोग्य वाटत असले तरी विचार करा जर का आज अनेक निराधार मुले रस्त्यावर वाढत आहेत ही अयोग्य पण वस्तुस्थिती आहे व ती आपण बदलु शकत नाही तर तोवर तरी समलिंगी दांपत्याने दत्तक घेण्यास विरोध करणे लक्षात येत नाही.
12 Jan 2009 - 8:17 am | अघळ पघळ
अलीशियाने दत्तक घेतलेली मुलगी कोणतेही स्ट्रेट दांपत्य घेणार न्व्हते ती अनाथ म्हणून रस्त्यावरच वाढणार होती ह्याची खात्री कोणी देऊ शकते का? नाही. त्यामुळे मला हे मान्य नाही. तसेच अजिबात मान्य होणे नाही हे मी कृत्रिमरित्या मुल जन्माला घालण्याला म्हणालो होतो जे तर अजिबातच मान्य होणे नाही.
12 Jan 2009 - 8:08 am | विसोबा खेचर
वेगळीच ष्टोरी रे डांबिसा.. लै भारी..
तुझ्या प्रतिभेला सलाम..
बाकी प्रतिसाद सवडीने..
तात्या.
12 Jan 2009 - 9:31 am | दिपक
हिरा आहे हिरा... :) अतिसुदंर ले़खन आणि कल्पनाशक्तीला सलाम.
शब्द कमी पडताहेत..
12 Jan 2009 - 9:46 am | रामदास
सुंदर कथाकथन.काही सामाजीक समस्या अजून तरी इथे फारशा सोडवाव्या लागत नाही आहेत. पण मनानी येणार्या भविष्यकाळाची तयारी केली आहे.
12 Jan 2009 - 12:54 pm | मॅन्ड्रेक
गोष्ट आवडली
12 Jan 2009 - 1:37 pm | चेतन
मागिल भाग वाचल्यावर हा भाग वाचण्यासाठी आतुर होतो.
एकदम अनपेक्षीत पण सुखद कलाटणि दिलीत.
हटस् ऑफ
चेतन
12 Jan 2009 - 1:48 pm | घासू
जबरदस्त आणि वेगळा शेवट, पण असा फटाफट गुडांळायला नको होता शेवट. बाकी सर्व अप्रतिमच.
12 Jan 2009 - 3:04 pm | मनस्वी
कथानक खूपच मस्त! शेवटही छान.
12 Jan 2009 - 5:56 pm | लिखाळ
उत्तम ! सुंदर !
अतिशयच सुंदर !
-- लिखाळ.
12 Jan 2009 - 6:59 pm | प्रभाकर पेठकर
अतिशय सुंदर लेखन. विशेषतः भाग - ४. तीन भागात चाललेल्या परिकथेला ४थ्या भागात एकदम भावभावनांचे वलय प्राप्त झाले. अत्यंत मोजक्या आणि प्रभावी शब्दांत तिघांच्याही आयुष्यातील ह्या नाजूक प्रसंगाला, कोठेही संयम न सुटता, भडकपणा किंवा उथळपणा न येऊ देता, अतिशय मोजक्या शब्दात चितारले आहे. आवडले.
तुमच्या पत्नीचे विशेष अभिनंदन.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
12 Jan 2009 - 8:45 pm | धनंजय
चारही भागात उत्कंठा वाढवत - खेळकर, गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या भावना हाताळलेल्या आहेत.
कथा आणि शैली पिडां-दर्जाची म्हणजे भारीच आहे.
14 Jan 2009 - 1:02 pm | केवळ_विशेष
केवळ अ प्र ती म... :)
20 Feb 2011 - 3:41 am | शिल्पा ब
खुपच मस्त कथा. भन्नाट लेखनशैली...
27 Apr 2024 - 5:16 pm | diggi12
अप्रतिम