नमस्कार मंडळी,
रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजली मधल्या मला आवडणार्या एका कवितेचा स्वैर अनुवाद करत आहे.
कवितेचे नाव मला माहित नाही. बहुधा कवितेला स्वतंत्र नावंच नसावे. मी माझ्या समजूतीने एक नाव दिले आहे.
निर्मनुष्य नदीच्या काठी उंच गवतातून जाणार्या तिला मी विचारले,
' मुली, पदराआड दिवा झाकून तू कुठे बरं चालली आहेस?'
माझं घर अगदीच काळोखे आणि एकाकी आहे, तुझा दिवा मलादेतेस का?
क्षणभर काळेभोर डोळे रोखून तिने त्या धूसर प्रकाशात माझ्याकडे पाहिले
आणि म्हणाली, ' मी नदीवर आले आहे ती दिवस मावळताना हा दिवा नदीत सोडून देण्यासाठी'
उंच गवतात स्तब्ध राहून मी पाहिली ती थरथरणारी लहानशी ज्योत
वाहून गेली प्रवाहासोबत कुणालाच उपयोगी न पडता.
रात्र दाटून येताना निरव शांततेत मी तिला विचारले,
'मुली, तुझे घर तर प्रकाशाने न्हाऊन निघाले आहे, मग हा दिवा घेऊन तू कुठे निघालीस?'
'माझे घर तर अगदीच काळोखात आणि एकाकी आहे, तुझा दिवा मला दे.'
रोखून माझ्याकडे पाहत ती क्षणभर आवंकली, ' मी आले आहे,' ती शेवटी म्हणाली,
'आकाशाला दिवा अर्पण करण्यासाठी.'
मी पाहत राहिलो जळून जाणारी ज्योत त्या शून्य पोकळीत कुणालाच उपयोगी न पडता.
आवसेच्या गूढ रात्री मी तीला विचारले, 'मुली, हृदयापाशी दिवा धरून तू कशाचा शोध घेत आहेस?
माझे घर तर अगदीच काळोखे आणि एकाकी आहे. तुझा दिवा मला देतेस?'
ती जरा थांबली आणि विचार करत माझ्याकडे पाहून म्हणाली,
' मी हा दिवा आणला आहे दीपमाळेत ठेवण्यासाठी'
मी स्तब्ध राहून पाहिले तो दिवा इतर दिव्यांत हरवून गेलेला, कुणालाच उपयोगी न पडता.
मूळ कविता
On the slope of the desolate river among tall grasses I asked her,
'Maiden, where do you go shading your lamp with your mantle?
My house is all dark and lonesome--lend me your light!'
she raised her dark eyes for a moment and looked at my face through the dusk.
'I have come to the river,' she said, 'to float my lamp on the stream
when the daylight wanes in the west.'
I stood alone among tall grasses and watched the timid flame of her lamp
uselessly drifting in the tide.
In the silence of gathering night I asked her, 'Maiden, your
lights are all lit--then where do you go with your lamp? My
house is all dark and lonesome--lend me your light.' She raised
her dark eyes on my face and stood for a moment doubtful. 'I
have come,' she said at last, 'to dedicate my lamp to the sky.'
I stood and watched her light uselessly burning in the void.
In the moonless gloom of midnight I ask her, 'Maiden, what is
your quest, holding the lamp near your heart? My house is all
dark and lonesome--lend me your light.' She stopped for a minute
and thought and gazed at my face in the dark. 'I have brought my
light,' she said, 'to join the carnival of lamps.' I stood and
watched her little lamp uselessly lost among lights.
ही कविता मला अनेक वर्षांपासून आवडणारी आहे. कविता वाचताना मला असे जाणवते की अनेक रुढी-परंपरा या गतानुगतीकासारख्या पाळल्या जातात. दरिद्रीनारायणाची सेवा हीच ईश्वरसेवा आहे हे विसरून, माहित नसलेल्या आणि दिसत नसलेल्या देवाला खूष करण्यासाठी आपण खटपट करतो आणि त्या खटपटीचा बहुधा कुणालाच उपयोग होत नाही.
'दिव्याभोवती अंधार' हे नाव देण्याचे कारण असे की दिव्याच्या जळण्याने अंधार दूर होतच नाहीये. अंधार दूर करण्यासाठी दिवा जाळतात पण इथे अंधारच त्या दिव्याला वेढून टाकतोय आणि दिव्याच्या जळण्याचा उपयोगच होत नाहीये.
--लिखाळ.
प्रतिक्रिया
29 Dec 2008 - 8:26 pm | सहज
कवितेच नाव, कवीता, अनुवाद, टीपणी सगळेच आवडले.
29 Dec 2008 - 8:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवितेच नाव, कवीता, अनुवाद, टीपणी सगळेच आवडले.
29 Dec 2008 - 11:42 pm | चित्रा
कविता आवडली. मराठी अनुवादही छान. चित्रदर्शी.
29 Dec 2008 - 8:37 pm | संदीप चित्रे
खूपच तरल कविता आहे रवींद्रनाथांची....
-----
तुझ्या अनुवादातला 'आवंकली' हा शब्द तर एकदमच आवडला :)
29 Dec 2008 - 9:00 pm | प्राजु
तरल आहे कविता..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Dec 2008 - 4:15 am | चतुरंग
चपखल शब्दयोजनेमधून भाषांतराचा तोल फार छान साधला आहे. कुठेही कृत्रिमपणा जाणवला नाही. शीर्षक, टिप्पणी एकदम मार्मिक.
अभिनंदन! अजून येऊदेत.
चतुरंग
30 Dec 2008 - 4:28 am | मुक्तसुनीत
भाषांतर उत्तम जमले आहे. मात्र मूळ कवितेतला वर्ण्यविषय काहीसा तोकडा, पुनरावृत्त वाटला. पण गीतांजलीतील आवडत्या कवितांचा हा उपक्रम आनंददायी आहे.
30 Dec 2008 - 5:31 am | धनंजय
इंग्रजी कवितेचा अनुवाद चपखल जमला आहे.
30 Dec 2008 - 6:02 am | मदनबाण
सॉल्लिड आवडल... :)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
30 Dec 2008 - 5:49 am | नंदन
कवितेचा भावानुवाद उत्तम वठला आहे. तुम्ही दिलेल्या अर्थाबरोबरच 'तूच आहेस तुझ्या जीवनाच्या शिल्पकार' किंवा शॉशॅन्क रिडीम्प्शनच्या सूत्रवाक्यासारखे 'रिडिम्प्शन लाईज विदिन' हा अर्थही अभिप्रेत असू शकेल.
'श्यामची आई'मध्ये साने गुरूजींनी कवितांत वापरल्या गेलेल्या प्रतीकांबद्दल (आणि दुर्बोधतेबद्दल) लिहिताना टागोरांच्याच एका कवितेचा उल्लेख केला आहे, जिच्यात दिव्याला जीवनाचे रूपक म्हणून वापरले गेले आहे. ती कविता हीच असू शकेल का?
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
30 Dec 2008 - 5:25 pm | लिखाळ
त्यांच्या कविता वरवर समजल्यासारख्या वाटल्या तरी त्यात अजून काही आशय असेल असे वाटत राहते. एकतर मला इंग्रजी निटसे अवगत नाही त्यामुळे मी लावलेला अर्थ योग्य आहे की नाही अशी शंका माझ्या मनात राहतेच. शिवाय त्या कविता गूढ आहेत असे वाटते. देवाच्या अस्तित्वाबद्दलचे अनुभव ते कवितेत मांडत असतील तर ते मला समजणे अवघडच आहे. जे. कृष्णमूर्तींचे लेखन सुद्धा याच मुळे समजले आहे की नाही ते कळत नाही. पण वाचताना मनाला आनंद मिळतो.
तुम्हाला जो अर्थ भावला तसा विचार मी करुन पाहिला नाही. या योगे या चित्रपटाची मला ओळख झाली.
श्यामच्या आईतला हा उल्लेख माझ्या स्मरणार नाही. बहुधा या कविते व्यतिरिक्त दिव्याबद्दलची अजून कविता गीतांजलीमध्ये आहे. मला दिसली तर तुम्हाला कळवीन आणि जमले तर अनुवाद करीन.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
7 Jan 2009 - 4:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कवितेचा भावानुवाद उत्तम वठला आहे.
असेच म्हणेन. काही कारणाने ही कविता वाचायची राहिली होती.
शॉशॅन्क रिडीम्प्शनच्या सूत्रवाक्यासारखे 'रिडिम्प्शन लाईज विदिन' हा अर्थही अभिप्रेत असू शकेल.
ते "साल्व्हेशन लाईज विदीन" आहे.
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
30 Dec 2008 - 5:09 pm | लिखाळ
प्रतिसादासाठी आणि उत्साह वाढवल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
1 Jan 2009 - 1:04 pm | मऊमाऊ
मूळ कविता, अनुवाद, त्याचा अन्वयार्थ सगळेच सुरेख ! पण "आवंकली " हा शब्द मी कधी ऐकला नव्ह्ता, "थबकली "कसे वाटते ?
1 Jan 2009 - 2:23 pm | बिपिन कार्यकर्ते
अतिशय उत्तम जमले आहे भाषांतर. हा प्रकार अजून येऊ दे.
बिपिन कार्यकर्ते
1 Jan 2009 - 7:34 pm | ऋषिकेश
अतिशय नेमके आणि आशय समर्थपणे पोहचवणारे भाषांतर.. खूपच आवडले
-(प्रभावित) ऋषिकेश
1 Jan 2009 - 7:50 pm | अवलिया
उत्तम. आवडले.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
2 Jan 2009 - 7:31 pm | लिखाळ
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मऊमाउ,
सूचनेबद्दल आभार. खरेतर आवंकली हा शब्द माझ्या नेहमीच्या वापरात आहे. तो दूर्मिळ असेल असे मला अनुवाद करताना वाटले नाही.
आवंकणे या शब्दात शंकेने-संशयाने क्षणभर थांबून आवंढा गिळून बोलायला सुरुवात अशी छटा आहे. थबकणे ही चालताना होणारी क्रिया असेल तर आवंकणे ही बोलताना होणारी. आणि मूळ कवितेत ती मुलगी अशीच संशयाने पाहून थोडे थांबून पुन्हा बोलायला सुरुवात करत असल्याने मला आवंकली हा श्ब्द चपखल वाटला.
रस घेऊन कविता काळजीपूर्व वाचून मत प्रदर्शन केल्याबद्दल आभारी आहे.
अनुवादाचा मला काहीच अनुभव नाही. आपल्या प्रतिक्रिया मोलाच्या आहेत.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
3 Jan 2009 - 8:43 am | विसोबा खेचर
भाषांतर छान आहे परंतु कवितेचा अर्थ समजला नाही..
टागोरसाहेबांना या कवितेतून नक्की काय सांगायचे आहे हे मला कुणी सांगू शकेल का?
आपला,
(साध्या सोप्या कविता समजणारा आणि आवडणारा) तात्या.
3 Jan 2009 - 9:01 am | एकलव्य
... कुणालाच उपयोगी न पडता... कुणालाच उपयोगी न पडता.... कुणालाच उपयोगी न पडता.... मनात गुंजत राहते.
- धन्यवाद!
5 Jan 2009 - 4:43 pm | लिखाळ
तात्या,
प्रतिसादासाठी आभार. कविता वाचून माझे बनलेले मत मी दिले आहेच. इतर कुणी काही मत मांडले (जसे नंदनने वर मांडले आहे) तर अजून काही बाजू प्रकाशात येतील.
एकलव्य,
अभिप्रयासाठी आभार.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.