'RSS फीड' असा वापरावा

बोका's picture
बोका in जनातलं, मनातलं
29 Dec 2008 - 6:35 pm

मागील एक दोन दिवसात मिपा च्या 'RSS फीड' वर चर्चा झाली.
http://www.misalpav.com/node/5287
मिपा चा 'RSS फीड' लवकरच सुरु होईल असे दिसते.
'RSS फीड' वापरण्यासंबंधी माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे .

समजा, मी खालील ब्लॉग /वर्तमानपत्राच्या साईटचा /उपक्रमाचा व त्या समोर दिलेल्या विषयाचा नियमीत वाचक आहे .
http://tatya7.blogspot.com/ - सर्व लेख
http://www.esakal.com/ - मुंबई आव्रुत्तीतील बातम्या
http://mr.upakram.org/ - संगणक विषयक लेख
मला दररोज त्या त्या साईट वर जाउन पहावे लागेल की काही नवीन आले आहे का. जर का त्या साईटनेच मला नवीन माहिती बद्दल कळविले, तर मला त्या साईटवर जाउन 'नवे काय' हे बघायची गरज उरणार नाही.
नेमके हेच काम 'RSS फीड' करतो . संबंधित साईटस् आपल्या साईटवरील बदललेल्या पानांविषयी माहिती एका प्रमाणित साच्यात प्रसारित करतात (फीड).
आता ही प्रसारित केलेली माहिती मिळवण्यासाठी मला एक 'फीड रिडर' लागेल. हे 'फीड रिडर' प्रोग्राम दोन प्रकरात उपलब्ध आहेत.

१. जालाधारित ( वेब बेस्ड ) -- उदा. गूगल रिडर . मी गूगलच्या साईटवर http://reader.google.com/ जाउन तेथे उपलब्ध असलेला रीडर वापरु शकतो .
२. माझ्या संगणकवरील एक प्रोग्राम -- उदा. मायक्रोसॉफ्ट् ऑफिस आउटलूक २००७, आय् ई ७, किंवा फायरफॉक्स -एखाद्या ऍड ऑन सह .

( यादी इथे -- http://en.wikipedia.org/wiki/Comparison_of_feed_aggregators )

'फायरफॉक्स -एखाद्या ऍड ऑन सह' हा पर्याय मला उत्तम वाटतो. कारण एवीतेवी मी फायरफॉक्स वापरत असतोच, त्याला एखादे सुबक जोडकाम केले की झाले.
फायरफॉक्स च्या साईट वर जाउन Sage-Too हा ऍड ऑन जोडून घेतला.

फायरफॉक्स एकदा बंद होउन चालू झाले. आता view->sidebar->Sage-Too चालू केले.

आता डाव्या बाजूला Sage-Too दिसू लागले आहे .
Sage-Too मध्ये options-> show feed item list चालू केले .

आता वरील साईट च्या प्रसारणाचे वर्गणीदार (subscriber) व्हायचे .
या साठी संबंधित साईटवर हे चिन्ह शोधावे लागणार.

इसकाळ च्या http://www.esakal.com/esakal/esakal/rss/rss.html या पानावर वेगेवेगळ्या फीड चे दुवे आहेत. मुंबई चा दुवा चिमटीत पकडून Sage-Too वरच्या चॊकटीत सोडला.

त्याचप्रमाणे http://tatya7.blogspot.com/ आणि http://mr.upakram.org/taxonomy/term/4 (संगणक विषयक लेखांचे पान् ) यांच्या तळाशी असलेले आरएसएस दुवे चिमटीत पकडून Sage-Too वरच्या चॊकटीत सोडले .

आता माझा 'फीड रिडर' वापरण्यासाठी तयार आहे .

Sage-Too वरच्या चॊकटीत ( क्रमांक १ ) साईटचे नाव दिसते . नावावर टिचकी मारली की खालच्या चौकटीत ( क्रमांक २ ) नवे विषय ठळक अक्षरात व जुने विषय साध्या अक्षरात दिसतात . विषयावर टिचकी मारली की बाजुच्या चौकटीत ( क्रमांक ३ ) संबंधित पान उघडते .

थोडेसे शोधल्यास Sage-Too मधील इतर पर्याय व सुविधा सहज सापडतील .

तंत्रविज्ञानशिफारससल्ला

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

29 Dec 2008 - 7:13 pm | लिखाळ

मस्त :)
उपयुक्त माहिती.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

सहज's picture

29 Dec 2008 - 7:16 pm | सहज

छान माहीती दिलीत.

मनस्वी's picture

29 Dec 2008 - 7:23 pm | मनस्वी

असेच म्हणते.

चंबा मुतनाळ's picture

30 Dec 2008 - 4:15 am | चंबा मुतनाळ

आज कळळा ह्या आर एस एस फीडचा अर्थ! सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे

अभिरत भिरभि-या's picture

30 Dec 2008 - 5:54 pm | अभिरत भिरभि-या

धन्यवाद

मोहन's picture

30 Dec 2008 - 12:44 pm | मोहन

उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद.

मोहन

बैलोबा's picture

30 Dec 2008 - 4:54 pm | बैलोबा

ह्याच्या पेक्ष्या सोपामार्ग म्हणजे आपल्या जीमेल / गुगल च्या http://www.google.co.in/ig?hl=en&source=iglk आय-गुगलला जोडा आरएसएस फिल्ड सगळ्यात सोपं !