वाचता वाचता वाढे -भाग २

जेपी's picture
जेपी in जनातलं, मनातलं
25 Mar 2015 - 10:06 am

वाचता वाचता वाढे भाग १

सध्या ऑफलाईन वाचन चालु आहे.बरीचशी पुस्तके वाचली, त्यातील काही निवडक पुस्तकाबद्दल थोडक्यात ओळख.
१) द्रोहपर्व- लेखक- अजेय झणेकर.
एक पेशवाईकालावर आधारीत कादंबरी. कादंबरी सुरु होते नारायणराव पेशवे यांच्या खुना पासुन आणी संपते मराठा-इंग्रज यांच्यातील पहिल्या लढाईतची सांगता झाल्यावर..
कादंबरी पहिल्या पानापासुनच मनाची पकड घेते..नारायरावांचा खुन,रघुनाथ पेशवे यांची महत्वकांक्षा,बारभाईच कारस्थान्,मराठी सरदारांचे हेवेदावे,इंग्रजाचीं सत्ता मिळवण्यासाठी चालणारी धडपड..
या सगळ्यात लक्षात राहते "इष्टुर फाकडा" ऊर्फ कॅप्टन जेम्स स्टुअर्ट ची संमातर कथा,त्या सोबत "तुळजा" नावाचे पात्र.

२) आम्ही भगीरथाचे पुत्र - लेखक - गोनिदा.
भाक्रा नांगल धरणाभोवती फिरणारी कादंबरी. १०० वर्षाचा कालखंड व्यापणारी.
यातल कुठलच पात्र मुख्य नाही तरीही सर्वच पात्र लक्षात राहतात..
क्रांतीकारी विचारांचा जोगेन्,विधायक मार्गाने जाणारा जिवन,आपल्या गुरुंच स्वप्न पुर्ण करण्यासाठी धडपडणारे महंत.
या सगळ्याचे मार्ग वेगवेगळे तरीही ध्येय एकच..
प्रत्येक पात्र स्वतः चा ठसा उमटवत राहते..

३) मनात - लेखक - अच्युत गोडबोले-
मानसशास्त्राची सफर घडवणार पुस्तक.

४) चंद्रमुखी - लेखक- विश्वास पाटिल-
एका वाक्यात ' वेळ वाया गेला'
संकल्पना बहुतेक एका मराठवाड्यातील स्व. नेत्याच्या चोफुला प्रकरणावरुन ढापलीय.
***************************************************************************************

धागा सध्या काय वाचतात या प्रकारे पुढे जाईल अशी अपेक्षा ... कुठल्याही प्रकारच्या पुस्तकाची ओळख चालेल.

साहित्यिकअनुभवशिफारस

प्रतिक्रिया

'आम्ही भगिरथाचे पुत्र' अतिशय सुरेख आहे. गोनीदा म्हणजे प्रश्नच नाही.
चंद्रमुखी इतकी ख़ास नसली तरी वेगळ्या विषयावर असल्याने एकदा वाचावयास ठीकच.

मध्ये ड्यान ब्राउनचे 'द लॉस्ट सिम्बोल' आणि आर्थर हेलीचे ' ओव्हरलोड' ही जाडजूड पुस्तके वाचुन झाली.
द लॉस्ट सिम्बोल बरीच संथ वाटली आणि शेवट इतका जमला नाही. तर ओव्हरलोड टिपिकल हेली स्टाइल. वीजनिर्मिती उद्योगावर बेतलेली.

सध्या वालिमिकीरामायण वाचतोय. आता सुंदरकाण्ड चालू आहे.

बाबा पाटील's picture

25 Mar 2015 - 1:13 pm | बाबा पाटील

वपुंच सखी आणी पार्टनर. इरावती कर्वेंच युगांत्,शिवाजी सावंतांच मृत्युंजय्,छावा आणी युंगधर , विश्वास पाटलांच पानिपत, ना.स.इनामदारांच राउ.विणा गवाणकरांच एक होता कार्व्हर, वाचत रहा वेड लावतात ही पुस्तक

टवाळ कार्टा's picture

25 Mar 2015 - 1:29 pm | टवाळ कार्टा

नावावरुन काही वेगळेच वाटलेले

मिनेश's picture

16 Oct 2015 - 10:26 am | मिनेश

हाहाहा

बॅटमॅन's picture

16 Oct 2015 - 4:15 pm | बॅटमॅन

ट्ठो =)) =)) =))

मी_आहे_ना's picture

25 Mar 2015 - 4:13 pm | मी_आहे_ना

'आम्ही भगिरथाचे पुत्र' नाव काढलंत आणि गोनिदांचे सगळे लिखाण डोळ्यासमोर आले... केवळ अप्रतिम. 'पडघावली' कादंबरी वाचून जी सुरुवात झाली, ते 'भगिरथाचे पुत्र', 'कोण्या एकाची भ्रमणगाथा','स्मरणगाथा' (त्यांची केवळ 'शितू' कादंबरी वेगळ्या धाटणीची किंचित संथ / रटाळ वाटली, पण बाकी साहित्य म्हणजे खजिनाच)
ते ते प्रसंग तेव्हाच्या काळाप्रमाणे आपल्या डोळ्यांसमोर उभे करण्याची गोनिदांची हातोटी वादातीत आहे.

प्रचेतस's picture

25 Mar 2015 - 4:41 pm | प्रचेतस

गोनीदांचं मला न आवडलेलं एकमेव पुस्तक म्हणजे 'कुण्या एकाची भ्रमणगाथा'. आवडले का नाही हे निश्चित सांगता येणार नाही पण आवडले नाही हे मात्र खरे.
गोनीदांची तांबडफ़ुटी, लक्ष्मीसेतू- गडदेचा बहिरी ही अतिशय दुर्मिळ पुस्तके देखील मजकडे आहेत.

पडघवल०, कादंबरीमय शिवकाल आणि त्या तिथे रूखातळी ही त्यांची पुस्तके सर्वोत्तम ठरावीत.

सस्नेह's picture

25 Mar 2015 - 10:31 pm | सस्नेह

मला मृण्मयी आणि कृष्णवेध सर्वाधिक आवडतात.

"चंद्रमुखी" बद्दल एकदम सहमत आहे. च्यायचा वैताग. पुस्तकाचं किमान नीट संपादन तरी केलेलं असावं ही अपेक्षा चूक आहे का? आणि कथावस्तू तर सातवीआठवीतल्या पोराने लिहावी इतकी पोरकट आहे. बरं धड सॉफ्ट पॉर्न म्हणावं तर तेपण नाही नीट. विश्वास पाटील कधी भेटले तर "विश्वास आपने विश्वासघात किया" असं सांगणार आहे त्यांना.

----
राज्य मराठी विकास संस्थेकडून प्रकाशित पुस्तकं नुकतीच जालावर उपलब्ध झाली आहेत. त्यातली ही वाचली:
- अस्पृश्यांचा लष्करी पेशा
- मुलखावेगळा राजा (औंधाच्या राजाच्या आठवणी)
- गायनमहर्षी अल्लादियाखां यांचे चरित्र
- साद सागराची (नेव्हीमधल्या आठवणी) डॉ. खरे: हे पुस्तक नक्की वाचा.

अनुप ढेरे's picture

25 Mar 2015 - 5:52 pm | अनुप ढेरे

साद सागराची (नेव्हीमधल्या आठवणी) डॉ. खरे

मिपाकर??

आदूबाळ's picture

25 Mar 2015 - 6:12 pm | आदूबाळ

नाही नाही - माझं लिहायला चुकलं. लेखक आहेत पु. गो. गोखले. मी डॉ. खर्‍यांना सांगत होतो की हे पुस्तक वाचा.

लिंक इथे: https://msblc.maharashtra.gov.in/download1.html

खंडेराव's picture

26 Mar 2015 - 11:25 am | खंडेराव

हजार आभार! धन्यवाद :-) अशी पुस्तके उपलब्ध आहेत हे माहिती नव्हते!

बाकी पुस्तकांची लिंक मिळेल का?

यशोधरा's picture

25 Mar 2015 - 7:44 pm | यशोधरा

प्लीज लिंका द्या ना ह्या पुस्तकांच्या.

आदूबाळ's picture

25 Mar 2015 - 8:23 pm | आदूबाळ

दिली ना वरती.

लिंक इथे: https://msblc.maharashtra.gov.in/download1.html

ओह, लक्षात नव्हतं आलं, सॉरी आणि धन्यवाद! :)

सध्या पुण्याची अपुर्वाई हे अनिल अवचटांचं पुस्तक वाचतेय.मध्यमवर्गीय पुण्याच्या बाहेरचं पुणं,रविवार पेठ,स्टेशनचा परिसर इ.अनिल अवचटांच्या रिपोर्ताज शैलीतलं पुस्तक आहे.आवडतंय वाचायला.
त्याबरोबरच अनाहितावर रेकमेंड झालेलं डॅडी लाॅन्ग लेग्ज डालो करुन वाचायला सुरुवात केलीये.
विंदांच्या स्त्रीविषयक कवितांचा विजया राजाध्यक्षांनी संपादित केलेला संग्रह, 'आदिमाया' मिळालाय.तो पुरवुन पुरवुन वाचतेय.

सव्यसाची's picture

25 Mar 2015 - 9:01 pm | सव्यसाची

लॉर्ड ऑफ द रिंग्स दुसऱ्यांदा वाचतो आहे. पूर्वी वाचली तेव्हा इंग्रजी जास्ती कळत नव्हते. प्रत्येक पानाला शब्दकोश हातात घ्यावा लागायचा. आता तसे करावे लागत नाही.
टॉल्कीन यांच्या लेखनामधील काही जुने शब्द मी पहिल्यांदाच वाचले होते. आता हे शब्द शक्यतो ऐकायला वाचायला मिळत नाहीत.
उदाहरणच द्यायचे झाले तर hither, tither, whither आणि अजून बरेचसे. Because हा शब्द न येता for हा शब्द बऱ्याच ठिकाणी येतो. Except च्या जागी save हेही मी पहिल्यांदा याच पुस्तकात वाचले.
पुस्तकातील वर्णने अतिशय सुंदर आहेत. तपशीलवार आहेत. वाचताना चित्र डोळ्यासमोर उभे राहायला नक्कीच मदत करतात.
या पुस्तकातील कविता तर अतिशय उत्तम. त्या कवितांना स्वतःची एक चाल आहे. वाचताना आपोआप आपणही लय पकडतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Mar 2015 - 9:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जब्राट आहे लॉर्ड ऑफ द रिंग ची कादंबरी. अश्या गोष्टी आवडत असतील तर तुम्हाला अजुन दोन्-तीन कादंबर्‍या सुचवतो.

१. गेम ऑफ थ्रोन्स (आत्ता ५ पुस्तक उपलब्ध आहेत)
२. द हॉबिट्स सिरिज
३. द एल्डर स्क्रॉल्स स्कायरिम (ह्याची गेमही आहे...हे पुस्तक आता बाजारामधे येईल.)

सव्यसाची's picture

25 Mar 2015 - 10:58 pm | सव्यसाची

धन्यवाद!
गेम ऑफ थ्रोन्स नक्कीच वाचायला आवडेल. हॉबिट चित्रपट पाहिले आहेत पण पुस्तक अजून तरी वाचले नाही.
तिसऱ्या पुस्तकाबद्दल पहिल्यांदाच ऐकतो आहे. बाकी गेम बद्दल म्हणाल तर रोडरॅश, solitaire, spider solitaire आणि सुडोकू च्या पुढे माझी मजल कधीही गेली नाही. :)

काॅनोलीची पुस्तकं मस्तच. Police Procedural या प्रकारातली ही पुस्तकं आणि त्याचा हॅरिस बाॅश हा नायक - दोघेही जबरदस्त! विशेष करुन - The Last Coyote, Angel's Flight, The Overlook आणि Nine Dragons.

एक एकटा एकटाच's picture

26 Mar 2015 - 9:17 pm | एक एकटा एकटाच

खेकडा
निजधाम
कबंध
गहिरे पाणी

अफलातून प्लॉट, वाचकाला गुंतवुन ठेवण्याचे कसब आणि धक्कातंत्र ह्यामध्ये रत्नाकर मतकरी ह्यांची मक्तेदारी आहे.

त्यांची सगळी पुस्तक उत्तम
पण मला त्यांच्या विशेष आवडलेल्या कथा म्हणजे

दोन मुलं
वारस
छोटा विल्कु मोठा विल्कु
मला विक्रम दिसतो
एक टोले पडताहेत

प्रचेतस's picture

26 Mar 2015 - 9:40 pm | प्रचेतस

क्या बात है अमोलराव.
मतकरींचा मी पण मोठा फ्यान.
रंगांधळा, हेडस्टडी, जंगल, टोक टोक पक्षी, ड्राक्युला, फाशी बखळ, मंदा पाटणकरची गोष्ट ह्या अजून त्यांच्या काही जबराट कथा.

बाकी वर तुम्ही उल्लेख केलेल्या ' छोटा विल्कु मोठा विल्कु' ह्या कथेचं नाव 'लपाछपी' आहे. एमपीडीवरची ती एक अफ़लातून गूढकथा आहे.

आदूबाळ's picture

26 Mar 2015 - 11:00 pm | आदूबाळ

गावात वाटसरू येतो, तिथे मेजवानी असते, वाटसरूला पानावर बसवतात, आणि...

ही कथाही मतकरींची आहे ना? नाव सांगता येईल का वल्लीदा?

एक एकटा एकटाच's picture

26 Mar 2015 - 11:07 pm | एक एकटा एकटाच

हो ती कथा मतकरींचीच आहे.

जेवणावळ

निजधाम ह्या
पुस्तकातली

एक एकटा एकटाच's picture

26 Mar 2015 - 11:08 pm | एक एकटा एकटाच

हो ती कथा मतकरींचीच आहे.

जेवणावळ

निजधाम ह्या
पुस्तकातली

धन्यवाद! एक नंबर गोष्ट आहे.

एक एकटा एकटाच's picture

26 Mar 2015 - 10:50 pm | एक एकटा एकटाच

धन्यवाद
मी नेमक त्या कथेच नाव विसरलेलो.
पण ती कथा सॉल्लिडच होती.
खासकरून त्या कथेचा शेवट.

रुपी's picture

27 Mar 2015 - 1:51 am | रुपी

सध्या Wings of Fire वाचत आहे, पण त्याची ओळख मी काय वेगळी करुन देणार?

या धाग्याच्या निमित्ताने चटकन आठवलं "गारांचा पाउस". शोभा भागवतांचं हे पुस्तक एकदा अचानक हाती लागलं आणि थोडंसं चाळून आवडलं म्हणून वाचायला घरी आणलं. आता वाचून काही वर्षे झाली त्यामुळे खूप आठवत नाही. पण थोडक्यात ओळख करुन द्यायची तर लहान मुलं आणि ती वाढत असताना त्यांचं विकसित होत जाणं याबद्दल आहे. पण यात उपदेश वगैरे काही केलेला नाही तर मुलांचं तर्कशास्त्र कसं चालतं याबद्दल लिहिलं आहे आणि रोजच्या जीवनातल्या उदाहरणांसकट. मुलं अचानकपणे कशी काहीतरी बोलून जातात अशी उदहरणे आहेत. शीर्षक असं का त्याचंही कारण पुस्तकात आहेच.

ज्यांची मुलं सध्या बोलायला शिकत आहेत किंवा त्यातून पुढे गेली आहेत अशांना तर ते आवडेलंच पण बाकीच्यांनाही वाचताना मजा येईल.

इथे याची झलक आहे.

गेलयाच आठवाडयत '' काली '' वाचल.पर्ल बक यांच्या 'द गुड अर्थ ' या कादंबरीचा अनुवाद.हे पुस्तक मी हाइस्कूल मधे अस्ताना गवच्या नगर वाचनालयात वाचलेल एका चीनी शेतकर्यची कहानी आहे.सुन्दर अनुवद.एका दिवसात अधाशासरख वाचून काढ़ल .bookganga वर मिलाल.सुदर वर्णन आहे एका चीनी कुटुंबच्या स्थित्यन्तरचि.
भारती पांडे यानी अनुवाद केला आहें..मी सर्वाना शिफरस करेंन या पुस्त्कचि.जरूर वाचा.

मिराज -ले-बंडुला चंद्ररत्ने. अनु-मकरंद अमरापुरकर.
--
कादंबरी 150 पानाची आहे.आखाती देशातील सर्वसामान्य लोकांच जगण.पेट्रोडॉलरच्या चकचकाटापलीकडील पलिकडची भिषण परिस्थिती.लेखक श्रिलंकन आहे.
आवडल.

आदूबाळ's picture

15 Oct 2015 - 8:39 pm | आदूबाळ

जेपी तुम्ही कुठून कुठून पुस्तकं शोधता राव!

धन्यवाद याही सुचवणीबद्दल.

जेपी's picture

16 Oct 2015 - 10:06 am | जेपी

अनु- चे नाव चुकले आहे.
अनुवादिका सुनंदा अमरापुरकर आहेत.

एक सामान्य मानव's picture

15 Oct 2015 - 7:44 pm | एक सामान्य मानव

नारायण धारपांची बहुतेक सगळी जुनी पुस्तके जबराट. समर्थ सेरीज मधील पुस्तके कुठे मिळतील?
समर्थांचा प्रहार, समर्थांचा विजय्,पुन्हा समर्थ इ.

बोका-ए-आझम's picture

15 Oct 2015 - 8:43 pm | बोका-ए-आझम

पत्रकार आणि हेरगिरी विश्लेषक गाॅर्डन थाॅमस यांचं हे पुस्तक म्हणजे मोसाद या संघटनेवरचं अप्रतिम पुस्तक. १९४८ साली इझराईलची निर्मिती झाली. त्याच वेळेला इराक, लिबिया, इजिप्त,जाॅर्डन आणि सीरिया या अरब राष्ट्रांनी इझराईलला नष्ट करण्यासाठी हल्ला चढवला. त्यामुळे एका गुप्तहेर संघटनेची गरज होती. तेव्हा इझराईलचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियान यांच्या कल्पनेतून मोसादची निर्मिती झाली. इथून ही कथा सुरु होते आणि मग आईकमन अपहरण, १९६७चं अरब-इझराईल युद्ध, म्युनिक हत्याकांड, योम किप्पूर युद्ध, एन्टेबी, इराणमधली इस्लामी क्रांती, लेबेनाॅन, ९/११ अशा सगळ्या मुद्द्यांचा उहापोह करत मोसादच्या आजच्या परिस्थितीपर्यंत असा अत्यंत विस्तृत पट या पुस्तकात मांडलेला आहे. मोसादच्या चुका आणि मूर्खपणा, अमेरिकन सी.आय.ए.आणि ब्रिटिश एम.आय.६ यांच्याबरोबर मोसादचे संबंध, इजिप्तबरोबरचा तह झाल्यानंतरची मोसादची भूमिका, मोसादचे आजवरचे प्रमुख, इझराईलचे पंतप्रधान, त्यांच्या राजकीय भूमिका आणि त्यामुळे मोसादवर झालेले परिणाम - अशा अनेक गोष्टी या पुस्तकात येतात. आंतरराष्ट्रीय राजकारण, तेलामुळे अरब राष्ट्रांचं वाढलेलं महत्व, त्यातून अपरिहार्यपणे आलेला बाथ पार्टीचा अरब राष्ट्रवाद, दहशतवाद, ज्यू लाॅबी - अशा अनेक प्रश्नांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन हे पुस्तक देतं. मोसादमध्येच गाॅर्डन थाॅमसबद्दल असं म्हटलं जातं की What Gordon Thomas knows about Mossad, Mossad itself doesn't know. त्यात तथ्य असावं असं वाटायला लावणारं हे पुस्तक आहे.

या पुस्तकाबद्दल बरेच ऐकून आहे. लवकरच विकत घेईन.

विशाखा पाटील's picture

14 Nov 2015 - 11:14 am | विशाखा पाटील

+ १११
सध्या वाचतेय. याला मोसादवरचे बायबलच म्हणायला हवे.

तर्राट जोकर's picture

16 Oct 2015 - 2:34 am | तर्राट जोकर

उत्तम कांबळेंचं श्राद्ध वाचतोय. ओघवती भाषा आहे. प्रसंग, घटना, संदेश काही नवीन नाहीत, पण मांडणी आणि लेखन चांगले असल्याने वाचावेसे वाटते. त्यांचं स्मशानासंबंधीचं 'कावळे आणि माणसे' हे पुस्तक जबराट होतं....

मिनेश's picture

16 Oct 2015 - 10:28 am | मिनेश

सध्या स्टील फ्रेम वाचतोय. चांगले व स्फूर्तीदायक पुस्तक.

आतिवास's picture

16 Oct 2015 - 11:20 am | आतिवास

त्रिंबक नारायण आत्रे लिखित.
प्रकाशन वर्ष आहे १९१५.
१९५९ च्या आवृत्तीस धनंजय गाडगीळ यांची प्रस्तावना आहे.
मराठी खेडे - (त्याकाळचे) - याविषयी अतिशय रोचक माहिती आहे.

मित्रहो's picture

16 Oct 2015 - 4:06 pm | मित्रहो

सारे चिमणराव संपवतोय.
गॉड ब्लेस यू मि. रोझवॉटर वाचतोय. कथानक रटाळ आहे पण मधे मधे लेखक तिरसकस शैलीत जे काही सांगतो ते जबरी आहे एकदम.
कॅच ट्वेंटी टू संपविले. आधी पन्नास पाने वाचून सोडून दिले होते. मिपावरच्या अशा चर्चेतच कुणीतरी सांगितले म्हणून पूर्ण वाचले. जबरदस्त पुस्तक आहे. विनोदाने मानवी स्वभावावर, एकंदरीत व्यवस्थेवर आसूड ओढण्याची पद्धत जबरदस्त. शेवटी शेवटी पुस्तक भयंकर गंभीर होत. उद्धवस्त झालेल्या रोमचे वर्णन तर अंगावर काटे उभे करनारे आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर कुणी सटायर लिहू शकतो ही कल्पनाच भयंकर आहे. एकापेक्षा एक वाक्ये आणि प्रसंग. 'They were asked to enjoy the show' 'He was jeopardizing his traditional rights of freedom and independence by daring to exercise them' हे पुस्तक माझे निव्वळ मॅडनेस आहे. मला ज्या प्रकारची पुस्तके आवडतात त्यातले हे सर्वाेत्तम.

DEADPOOL's picture

13 Nov 2015 - 9:43 pm | DEADPOOL

ओढून ताणून बनवलेली वाटते.

भंकस बाबा's picture

14 Nov 2015 - 9:44 am | भंकस बाबा

भन्नाट कांदबरी, प्रत्येकाने वाचावी अशी , मला तर माझेच शालेय जीवन आठवले.
पैपिलोन. सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या एका फ्रेंच गुन्हेगारची गोष्ट . स्टार्ट तो एंड एका दमात वाचाविशी वाटते .
प्रवासवर्णनासाठी मीना प्रभुची पुस्तकमाला , असे वाटते की आपण त्यांच्या बाजूला उभे राहून प्रवास करत आहे.
शिवाय पुलंचा मी डायहार्ड पंखा आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचे मी पारायण केले आहे. त्यांचा विनोद वाचला की बाकीचे विनोदी लेखक पुचाट वाटू लागतात.

एक एकटा एकटाच's picture

10 Dec 2015 - 9:37 pm | एक एकटा एकटाच

पॉपीलॉन जबरदस्त आहे.....

मस्त मजा आलेली वाचताना

जातवेद's picture

10 Dec 2015 - 10:17 pm | जातवेद

+१

धडपड्या's picture

11 Dec 2015 - 9:03 am | धडपड्या

पॅापिलॅान आवडली असेल, तर शांताराम नक्कीच वाचा..

स्रुजा's picture

11 Dec 2015 - 10:50 pm | स्रुजा

+११ शांताराम __/\__

DEADPOOL's picture

14 Nov 2015 - 10:33 am | DEADPOOL

सध्या scion of ishvakus चे वाचन चालू आहे.
पण शिवा ट्रिलोजी ची सर नाही.
बहुतेक पुढ्च्या भागात हनुमानाची एंट्री झाल्यावर मजा येईल

त्रिबंध हे महेश एलकुंचवारांचे ललित लेखांचे पुस्तक नुकतेच वाचून झाले.वाचनिय पुस्तक आहे.
आता आपल्या मिपाकर विशाखा पाटील यांचे कल्चर शाॅक सिरिजमधले आखाती देश वाचतेय.

प्रचेतस's picture

14 Nov 2015 - 8:40 pm | प्रचेतस

मुरलीधर खैरनारांचं 'शोध' वाचतोय.
भन्नाट आहे एकदम. ड्यान ब्राउन स्टाइल. पुस्तकाने सुरुवातीपासूनच पकड घेतलीय.

पहिली दिडशे पान बोर झाल 15 दिवस लागले वाचायल नंतर 50 पानात कलाटणी.आवडली.
सुधाकर यातला शिकलेला,नैतीकतेनै वागणारा पण धाडस नसलेला नायक त्यामुळे अपयशी,
शेवट यशस्वी.
खटकलेल-इंग्रजी वाक्याच मराठी टाईप

आदूबाळ's picture

9 Dec 2015 - 8:47 pm | आदूबाळ

धन्यवाद!

नंदा खर्‍यांचं "नांगरल्याविण भुई" तुमच्याकडे आहे का? अनेक दिवस शोधतो आहे.

जेपी's picture

10 Feb 2016 - 8:23 pm | जेपी

नांगरल्याविण भुई,
माझ्याकडे नाही..
online कुठे भेटल नाही..

जातवेद's picture

10 Dec 2015 - 10:21 pm | जातवेद

'मेळघाटावरील मोहोर' वाचून संपवलेलं आहे. डॉ. कोल्हे दांपत्याची कहाणी आहे. लेखकः मृणालिनी चितळे.

धडपड्या's picture

11 Dec 2015 - 9:10 am | धडपड्या

जर बाईक वेडे असाल, तर नक्की वाचण्याजोगे पुस्तक.. नील ब्रॅडफोर्डने तमाम बाईक विश्वातील लेखकांच्या पुस्तकांमधून निवडक उतारे एकत्र केलेत.. मजा येते सर्व अनुभव वाचायला.. बाकी चे गवेराचे मेटारसायकल डायरीज, आणि त्याचा साथीदार अल्बर्टो ग्रनाडो याचं ट्रॅव्हलिंग विथ चे गव्हेरा, ही दोन्ही फेवरेट आहेत.

धडपड्या's picture

11 Dec 2015 - 9:13 am | धडपड्या

मोटारसायकल डायरीज असे वाचावे..

श्रीनिवास टिळक's picture

11 Dec 2015 - 4:25 pm | श्रीनिवास टिळक

काल गीताधर्म मंडळ (पुणे), येथे भगवद्गीतेचा जगप्रवास (विश्वसंचार) या वा. ल. मंजूळ (निवृत्त ग्रंथपाल, भांडारकर) यांनी लिहिलेल्या छोट्या पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ श्रीपाद भट (टि. म. वि. पुणे ) यांच्या हस्ते झाला. घरी आल्यावर लगेच ती वाचून काढली. जगातील पंच्याहत्तर मुख्य भाषांमध्ये आणि सुमारे दोन हजारांहून अधिक भाषांतरे झालेला गीता हा तत्वज्ञान विषयक ग्रंथ बायबलच्या खालोखाल लोकप्रिय असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धार्मिक ग्रंथ आहे. गीतेची इंग्रजी भाषांतरे (२८८), अन्य विदेशी भाषांतील विविध रुपांतरे (३६ भाषांतून), गीतेचे देशी भाषांतील भाष्यकार (२८५), मराठी भाषांतरे (१४२), इत्यादी सूच्या श्री मंजूळ यांनी दिल्या आहेत. ही लहानशी पुस्तिका वामनाच्या पावलासारखी व्यापक आहे असे ग. वा. करंदीकर यांनी त्यांच्या अभिप्रायात लिहिले आहे, ते सार्थ वाटते.

एकोणिसावी जात-ले.महादेव मोरे..
छोटीखानी कादंबरी,ग्रामीण भाषा,वेगवान कथानक,
पठडीपलीकडे वाचणार्यांना आवडेल.

विजय पुरोहित's picture

10 Feb 2016 - 9:05 pm | विजय पुरोहित

जेप्या...
अलेक्सेई मारेस्येवः एका अस्सल माणसाची कहाणी
आणि शांत इथे पहाटवेळा
या दोन रशियन कादंबर्या वाचल्यास?
अप्रतिम रे अप्रतिम...

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Feb 2016 - 9:11 pm | कैलासवासी सोन्याबापु

अधर्म युद्ध वाचायला घ्यावी म्हणतोय

अधर्म युद्ध वाचणार असाल तर..
बॅक टु बॅक..
एका तेलीयाने,हा तेल नावाचा इतिहास आहे,
युद्ध जिवांचे',,
ही पुस्तके वाचा असे सुचवतो..

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Feb 2016 - 9:33 pm | कैलासवासी सोन्याबापु

सद्धया फ़क्त हेच उपलब्ध आहे! पुढे मागे हा सल्ला पक्का अमलात आणु