नाच्याले नोट : नागपुरी तडका
चमचमी बूट हाय, मलमली कोट हाय
सिगारेट सिलगवाले, हजारची नोट हाय
फ़ाटलेलं दफ़्तर, चड्डीले भोक हाय
बापाच्या नशीबात, जह्यराचा घोट हाय
मरणारे मरतात, चरणारे चरतात
लेका इथं कोणाच्या, हाडावर चोट हाय?
वाणी-दास-पुढाऱ्याच्या, मिशीले तूप हाय
दूध-दूभतं करणार्याचे, पाठीले पोट हाय
जसं तुले हाय तसं, मलेबी वोट हाय, पण;
ढ्यँगपाट्या सरकाराच्या बापामंदी खोट हाय
सात, आठ, नवव्या आयोगाचे योग हाय
कापसाले भाव म्हणान तं फ़ेंडीवर सोट हाय
मुद्रास्फितीच्या व्यवस्थेत सृजनाचे हाल हाय
तोंडपुज्याले 'अभय' अन् नाच्याले नोट हाय
- गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रिया
9 Dec 2015 - 2:52 pm | निनाव
Sir,
Tumchya Kavita nehmich jabbardast Vishay gheun yetaat ANik hey kavya apawad naahi.
Masta lihile aahe.
9 Dec 2015 - 3:39 pm | वेल्लाभट
सहीये !!!
9 Dec 2015 - 7:27 pm | श्रीरंग_जोशी
परिस्थितीवर भाष्य करणारी एकदम मार्मिक कविता.
9 Dec 2015 - 9:10 pm | नाव आडनाव
+१
9 Dec 2015 - 7:33 pm | सत्याचे प्रयोग
आवडली कविता
9 Dec 2015 - 11:32 pm | चांदणे संदीप
आवडली!
10 Dec 2015 - 9:07 am | बाबा योगिराज
आवड्यास.
10 Dec 2015 - 1:14 pm | भानिम
आवडली....
10 Dec 2015 - 9:00 pm | आदूबाळ
"मुद्रास्फिती" हा शब्द कधी कवितेत वापरला जाऊ शकतो असं वाटलंच नव्हतं!
25 Dec 2015 - 8:23 pm | गंगाधर मुटे
प्रतिसादाबद्द्ल सर्वांना धन्यवाद.