पुरुषांसाठी वेगळा कोनाडा असावा का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
3 Dec 2015 - 3:28 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी, काल पासून आणि काही दिवसांपासून सतत एक चर्चा चाललेली आहे की पुरुषांनाही चर्चेसाठी मिपावर एक गोपनिय दालन असावं का ? माझं मत सांगुन टाकतो की मी अशा कोणत्याही कोनाड्याच्या विरोधात आहे. आणि माझा मित्र वल्ली उर्फ प्रचेतसच्या मते मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच वेगळं दालन आहे. फक्त आपण इथे स्त्रीयांना प्रवेश दिलाय इतकेच. तर असा एखादा कोनाडा असावा काय ? आणि समजा असा एखादा कोनाडा तयार झाला तर तिथे स्त्रियांना प्रवेश असावा काय ? पुरुषांच्या अशा दालनात काय काय चर्चा होतील आणि अशा दालनाचा पुरुष सदस्यांना काही फायदा होऊ शकेल काय ? प्रश्न असे असतील की दुसरे काही -

१) पुरुषांचे काही प्रश्न जे मुख्य बोर्डावर लिहायला संकोच वाटतो, आरोग्यविषयक ?
२) पुरुष लिंगभेद, उत्तेजित करणारे आणि अश्लिल चर्चा करतील ?
३) पोषाख, देखणेपण आकर्षक व्यक्तिमत्व यावर चर्चा करतील ?
४) एकीकडे प्रेयसी आणि एकीकडे बायको दोघांशी समन्वय कसं राखु असे प्रश्न असतील ?
५) सासरे आणि सासु छळ करतात काही टीप्स प्लीज, असे म्हणतील
६) पत्नी दम देते, दमात घेत असते, काय करु ?
७) पत्नी पॉकेट मनी देत नाही, काय करु ?
८) पत्नीच्या माहेरचे लोक सारखे सारखे मुक्कामी असतात काय करावे ?
९) अन्य.....

मंडळी, धागा मौजमजा आणि तसा थोडा गंभीरही आहे. एकच विनंती की मिपावरच्या 'क ख आणि ग' च्या दालनाची चर्चा इथे करु नका. नसता धागा जाईल आणि मालक माझ्या नावावर मायनस गुण टाकायला सुरुवात करतील.

टीप : चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी अपेक्षा आहे. कोणत्याही दालनावर चर्चा न करता.

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

3 Dec 2015 - 3:33 pm | विजुभाऊ

ऑ.........
आजच्या स्त्री प्रधान जगात व्यक्त होण्यासाठी पुरुषाना हक्काचे मिळायला हवे या चळवळीचे जनक म्ह्णून तुमचीच वर्णी नक्की आहे सर.
भाषेचे सुद्धा बघा ना सगळे चांगले शब्द स्त्रीलिंगी आहेत आणि वैट्ट शब्द पुल्लिंगी आहेत.
उदा : ती माया , ती थंडी ,ती झोप , ती हौस, ती मौज
आणि तो राग , तो उक्काडा ,तो आळस , तो कंटाळा
कित्ती कित्ती अन्याय हा पुरुषांवर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2015 - 3:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपलं काय ठरलंय. शुद्धलेखन, भाषा, व्याकरण यावर मिपावर काहीच आणि कधीच चर्चा करायची नाही.
शुद्धलेखनावर तात्याने लै ठोकलंय मला. त्यामुळे तो विषय बंद.

बाकी, दालन असावं की नसावं ?

-दिलीप बिरुटे

शित्रेउमेश's picture

4 Dec 2015 - 12:22 pm | शित्रेउमेश

बापरे...

कधी विचारच केला नव्हता.... किती हा अन्याय??? असली भाषा नक्किच कोणत्या तरी स्त्रीनेच बनवली असेल....

कित्ती कित्ती अन्याय हा पुरुषांवर....

पगला गजोधर's picture

3 Dec 2015 - 3:34 pm | पगला गजोधर

a

संदीप डांगे's picture

3 Dec 2015 - 3:37 pm | संदीप डांगे

मला वाटतं, वेगळा कोनाडा म्हणा, दालन म्हणा पण पुरुषांसाठी वेगळ्या भागाची आवश्यकता आहे. काही आरोग्यविषयक बाबी अ‍ॅनॉनिमसली विचारता येतील व त्याबद्दल इथले जाणकार-डॉक्टर काही सल्ले देतील अशीही व्यवस्था करता येईल. कुठल्या कंपनीचे रबर चांगले याबद्दल चर्चा मेनबोर्डावर करता येतील असे वाटत नाही. ह्या आणि इतर अनेक खर्‍याखुर्‍या समस्या ज्या इतरांना आंबटशौकिन वा चावट वाटू शकतात त्या मेनबोर्डावर शक्य असतील तर मग वेगळ्या दालनाची गरज नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Dec 2015 - 5:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मेन बोर्डावर लिहू देण्याबद्दल मी प्रा. डॉ., त्यांचे समविचारी आणि सर्वश्री पुरुषांचे आभार मानते.

कुठल्या कंपनीचे रबर चांगले...

याबद्दल बेडवर चर्चा केली की बोर्डावर चर्चा करण्याची गरज कमी पडते. अनुभवून बघा.

पुन्हा एकदा प्रतिसाद लिहू देण्याबद्दल मी प्रा. डॉ., त्यांचे समविचारी आणि सर्वश्री पुरुषांचे आभार मानते.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Dec 2015 - 6:55 am | अत्रुप्त आत्मा

@याबद्दल बेडवर चर्चा केली की बोर्डावर चर्चा करण्याची गरज कमी पडते. अनुभवून बघा. >> आणि जर तिथे ही गोष्ट बोलायची तयारी होत नसेल..बाईची किंवा बाप्याची ! तर काय करावे ब्रे!?

प्रचेतस's picture

4 Dec 2015 - 6:57 am | प्रचेतस

हम्म...
=))

मग अनुभवी लोकांचे समुपदेशन घ्यावे.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Dec 2015 - 7:11 am | अत्रुप्त आत्मा

राईट..ते घेता येतच. पण एकाच विषयावर जेंव्हा त्यातुन गेलेले अनेकजण अनुभवसिद्ध मत मांडतात.. तेंव्हा त्यातुन मिळणारी माहिती ही सरळ मदत करणारी ठरते..तेंव्हा अशी चर्चा समागमातल्या अनेक अंगाना स्पर्श करणारी असणार. ज्यात उघडपणे सगळे पुरुषहि सहभागी होऊ शकत नाहीत..म्हणूनच वेगळा विभाग..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Dec 2015 - 8:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> चर्चा समागमातल्या अनेक अंगाना स्पर्श करणारी असणार. ज्यात उघडपणे सगळे पुरुषहि सहभागी होऊ शकत नाहीत.. <<

त्यासाठीच लैंगिक शिक्षण महत्त्वाचं. "आमच्या वेळेला नव्हती असली थेरं तरी आमचं निभलंच ना," छापाच्या मतांना फाट्यावर मारून किन्सी आणि मास्टर्स-जॉन्सन यांच्यासारखी खुल्या चर्चेची, विद्यार्थी भूमिका उपयुक्त असते. कोनाडा काढून तिथे चावट विनोद करता येतीलच; पण शिक्षण स्त्री-पुरुष सगळ्यांचंच होणं महत्त्वाचं आहे.

तत्त्वतः अनाहिता, कोनाडा, LGBTQ किंवा आणखीही कोणत्या गटांसाठी आणखी निराळा विभाग काढायला माझा पाठिंबा अथवा विरोध काहीही नाही.

(माझा आधीचा प्रतिसाद कदाचित होमोफोबिक वाटू शकतो, पण प्रतिसाद आणि मीही होमोफोबिक नाही.)

अभ्या..'s picture

4 Dec 2015 - 8:14 pm | अभ्या..

पट्या

अत्रुप्त आत्मा's picture

4 Dec 2015 - 11:59 pm | अत्रुप्त आत्मा

@त्यासाठीच लैंगिक शिक्षण महत्त्वाचं.>> हा भावी पिढ्यांसाठिचा आदर्शवाद झाला हो बाई. अत्ताच्या पिढीनीपण हे शिक्षण आधी घ्यावं,लगेच पचवावं..आणि अश्या चर्चांची गरज निर्माणच होऊ देऊ नये..असं काही आपलं म्हणणं आहे का?

@"आमच्या वेळेला नव्हती असली थेरं तरी आमचं निभलंच ना," छापाच्या मतांना फाट्यावर मारून किन्सी आणि मास्टर्स-जॉन्सन यांच्यासारखी खुल्या चर्चेची, विद्यार्थी भूमिका उपयुक्त असते.>> सहमत आहे.. पण सध्या इथे किंवा आणखिही कुठे अशी चर्चा होऊ शकत नाही..कारण अत्ताचे सगळे लोक तुमच्या इतके पुढारलेले नाहीत..त्याचं काय करायचं? ते बोला.

@कोनाडा काढून तिथे चावट विनोद करता येतीलच; पण शिक्षण स्त्री-पुरुष सगळ्यांचंच होणं महत्त्वाचं आहे. >>> ते इथे उघड साध्य होणे शक्य नाही.. हेच सध्याचे वास्तव आहे.. हे विसरून कसे चालेल??? का ते लक्षातच घ्यायच नाही..आणि आदर्शवादाच्या हिंदोळ्यांनवर झुलत रहायचे? माझ्या म्हणण्याचा हेतू इतकाच की जेंव्हा समान समस्या असलेली लोकं त्याच्या निवारणासाठी स्वमदतगट तयार करतात..तेंव्हा त्याचा उपयोग पुसकी ज्ञानसंपादनापेक्षा,समुपदेशनाच्या डोसांपेक्षा वेगळा आणि सरळ मदत करणारा असतो.. मी अन्य समस्यांबाबत सध्या (भारतात/जगात) चालू असलेल्या अश्या काहि स्वमदतगटसंस्थांचा लाभार्थी सभासद आहे.. त्या प्रत्यक्षफायद्याच्या आधारावरच मी हे मत मांडतो आहे.

@तत्त्वतः अनाहिता, कोनाडा, LGBTQ किंवा आणखीही कोणत्या गटांसाठी आणखी निराळा विभाग काढायला माझा पाठिंबा अथवा विरोध काहीही नाही.>> झालं तर. मग त्याच्या बाजुनी अथवा विरोधात मतप्रदर्शनही करु नका ना!

@(माझा आधीचा प्रतिसाद कदाचित होमोफोबिक वाटू शकतो, पण प्रतिसाद आणि मीही होमोफोबिक नाही.) >> मला तसा तो आधिही वाटलेला नव्हता..अताही वाटत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2015 - 12:03 am | अत्रुप्त आत्मा

@तेंव्हा त्याचा उपयोग पुसकी ज्ञानसंपादनापेक्षा >> तेंव्हा त्याचा उपयोग पुस्तकी ज्ञानसंपादनापेक्षा, ..असे वाचावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Dec 2015 - 8:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ. आणि समविचारी पुरुषांचा कोणत्याही कोनाड्याला सतत विरोधच राहीला आहे.
मुख्य बोर्डावर कोणत्याही विषयावर कोणालाही लिहायला बंदी नाही, इतकं सर्वांना माहितीच आहे.

बाकी, मिपावर लिहायला येत जा अदिती, मला आपले प्रतिसाद खुप खुप आवडतात. :)

अवांतर : अदिती आकाश निरीक्षण, तारे शोधणे, वगैरे काय चालु आहे सध्या ?
एखादा नवीन तारा जर तुम्हाला सापडला तर त्या तार्‍याला प्रा.डॉ अन सोनचाफा असं नाव दे हं प्लीज. :)

-दिलीप बिरुटे
(अदितीच्या लेखनाचा फ्यान) :)

पगला गजोधर's picture

4 Dec 2015 - 9:34 am | पगला गजोधर

याबद्दल बेडवर चर्चा केली की बोर्डावर चर्चा करण्याची गरज कमी पडते.

त्याचबरोबर......

charcha

गामा पैलवान's picture

4 Dec 2015 - 12:34 pm | गामा पैलवान

पग,

ते दोन गुढघ्यात काय दाबून धरलंय? चर्चेच्या नोंदी की काय? बाई जय्यत तयारीने आलेल्या दिसतात चर्चेसाठी! ;-)

आ.न.,
-गा.पै.

याॅर्कर's picture

9 Dec 2015 - 2:12 pm | याॅर्कर

नतमस्तक
_/\__/\_
.
.
.
.
शिव शिव शिव.....

संदीप डांगे's picture

4 Dec 2015 - 10:59 am | संदीप डांगे

याबद्दल बेडवर चर्चा केली की बोर्डावर चर्चा करण्याची गरज कमी पडते. अनुभवून बघा.

पुरुषांच्या वेगळ्या दालनाची गरज नेमकी का आहे हे अधोरेखीत केल्याबद्दल लाखो वेळा धन्यवाद! चर्चा कुठे करायची आणि कृती कुठे हे आम्हांला चांगलं माहिती आहे याबद्दल खात्री बाळगा.

एक फुकटचा सल्ला: विषय कळण्याची शून्य क्षमता असलेल्यांनी नको तिथे नाक खुपसून आपली शोभा(डे) करून घेऊ नये.

गामा पैलवान's picture

4 Dec 2015 - 12:36 pm | गामा पैलवान

संदीप डांगे,

>> पुरुषांच्या वेगळ्या दालनाची गरज नेमकी का आहे हे अधोरेखीत केल्याबद्दल लाखो वेळा धन्यवाद!

स्ट्रेट फ्रॉम हॉर्सेस माऊथ का कायतरी म्हणतात ते हेच का? ;-)

आ.न.,
-गा.पै.

pacificready's picture

4 Dec 2015 - 12:59 pm | pacificready

शोभा डे यांचा अपमान केल्याबद्दल आपणास कारणे दाखवा नोटिस देण्यात येत आहे.
- शोभा डे यांच्या प्रसिद्धीलोलुपतेची चीड़ असूनही 'आत्ता' त्यांच्यासाठी शानिभुति वाटणारा.

pacificready's picture

4 Dec 2015 - 1:05 pm | pacificready

डांगे अण्णा,
नटराज कंपनी ची पेन्सिल असली तर त्याच कंपनीचं 'लब्बर' वापरा की!
पेनासाठी पण काही 'लब्बर' असतात. जास्त घासून चालत नाही पण. कागद फाटतो. नैतर मग व्हाइटनर वापरायचं. दिसतो वापरलेला पण ठीक ना!

आणि लब्बर धुवावा मधे मधे. काळेपणा जातो.
-इयत्ता 8 वी क

-

याॅर्कर's picture

9 Dec 2015 - 2:15 pm | याॅर्कर

||श्री दादा कोंडके प्रसन्न||

वेगळा कोनाडा गरजेचा नाय...
पण चार पोर जरा गप्पा मारत बसली तर लगेच धावुन येऊ नये..

काही अंशी सहमत, पण अलीकडचे वातावरण पाहता कोनाडा गरजेचा आहे खरा.

नाखु's picture

3 Dec 2015 - 3:41 pm | नाखु

हा सर्वस्वी मिपा मालकांचा आणि चालकांचा प्रश्न(पक्षी विषय) आहे.

पण जस्म इतर कोनाड्यात कायं चालतं याची चर्चा करण्यात इथे हशील नाही तशीच या कल्पनेतील (भावी) कोनाड्याबदाल येथे चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही... हे वैयक्तीक मत..

सांघीक मत : कोनाडा असल्याने का नसल्याने कुचंबणा आहे काय याचा कंपूच्या कंपूशी कंपूने चर्चा करून उत्तर देऊ शकेन.

कोपच्यात गेलेला पण कोनाड्यात नसलेला नाखु

कपिलमुनी's picture

3 Dec 2015 - 3:43 pm | कपिलमुनी

भारतात प्रत्येक ९ मिनिटाला एक विवाहीत पुरुष आत्महत्या करत असतो , त्याबद्दल चर्चा करता येइल
भारतीय पुरुष लिंगभेदाला बळी पडतात (त्यांना ऑफिसमध्ये स्त्री सहकार्‍यांचा त्रास असू शकतो )
४९८ अ सारख्या कायद्या विरूद्ध चर्चा करता येतील.
सर्व काका लोकांसाठी मिड लाईफ क्रायसिस चर्चा करता येइल
पुरुष पालकांसाठी वयात येणार्या मुलांसोबत कसे वागावे याबद्दल मुलांकडून सल्ले दिले जातील.

पगला गजोधर's picture

3 Dec 2015 - 3:52 pm | पगला गजोधर

s

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2015 - 4:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुरुषांच्या दालनात स्रीला प्रवेश असेल अगदी अनामिक सदस्यही चालेल तिथे प्रवेशासाठी लिंगभेदाची कोणतीही अट असणार नाही.

-दिलीप बिरुटे

पगला गजोधर's picture

3 Dec 2015 - 4:14 pm | पगला गजोधर

पुरुषांच्या दालनात स्रीला प्रवेश असेल अगदी अनामिक सदस्यही चालेल तिथे प्रवेशासाठी लिंगभेदाची कोणतीही अट असणार नाही.

तर मग, हे तर मिपा वर चालूच आहे, इथेच मग यथेच्च चर्चा व्हाव्यात नं तुम्ही देलेल्या उदा-मधल्या.

१) पुरुषांचे काही प्रश्न जे मुख्य बोर्डावर लिहायला संकोच वाटतो, आरोग्यविषयक ?
२) पुरुष लिंगभेद, उत्तेजित करणारे आणि अश्लिल चर्चा करतील ?
३) पोषाख, देखणेपण आकर्षक व्यक्तिमत्व यावर चर्चा करतील ?
४) एकीकडे प्रेयसी आणि एकीकडे बायको दोघांशी समन्वय कसं राखु असे प्रश्न असतील ?
५) सासरे आणि सासु छळ करतात काही टीप्स प्लीज, असे म्हणतील
६) पत्नी दम देते, दमात घेत असते, काय करु ?
७) पत्नी पॉकेट मनी देत नाही, काय करु ?
८) पत्नीच्या माहेरचे लोक सारखे सारखे मुक्कामी असतात काय करावे ?
९) अन्य.....

मग अश्या चर्चांमध्ये कोणी नाकं मुरुडू नये, अश्लील वै. म्हणून…

आणि शेप्रेट कोनाडा कशला हवाय मग ?

संदीप डांगे's picture

3 Dec 2015 - 4:03 pm | संदीप डांगे

fc

गजोधरभैय्या. तुम्हाला आयएसेम किंवा श्रीलिपी वापरता येतीय शुअर.
हो की नाही? ;)

आदिजोशी's picture

3 Dec 2015 - 4:12 pm | आदिजोशी

का असू नये? जर मिपावर स्त्रीयांना मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी वेगळं दालन द्यायचं कौतुकास्पद कार्य होऊ शकतं, तर पुरुषांना मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी वेगळे दालन का नसावे?

कॉमन फोरमवर बोलताना, ते इतर स्त्रीयाही वाचत असल्याने अनेकदा पुरुषही संकोचतात.
काही विषय पर्सनल असतात जे स्त्रीयांसमोर बोलले जाउ शकत नाहीत. उदा. पहिल्या रात्रीचे समूपदेशन, आई आणि बायको मधील भांडण सोडवण्यासाठी सल्ला, नोकरी/आयुष्यात येणारं फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशनमधे जाणे, इत्यादि अनेक.

दालन चालू करून बघायला काहीच हरकत नाही.

बॅटमॅन's picture

3 Dec 2015 - 4:20 pm | बॅटमॅन

अगदी असेच म्हणतो.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2015 - 6:33 pm | अत्रुप्त आत्मा

कॉमन फोरमवर बोलताना, ते इतर स्त्रीयाही वाचत असल्याने अनेकदा पुरुषही संकोचतात.
काही विषय पर्सनल असतात जे स्त्रीयांसमोर बोलले जाउ शकत नाहीत. उदा. पहिल्या रात्रीचे समूपदेशन, आई आणि बायको मधील भांडण सोडवण्यासाठी सल्ला, नोकरी/आयुष्यात येणारं फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशनमधे जाणे, इत्यादि अनेक.

>> ++++++++++१११११११११११११ जोरदार हाणुमोदण्ण! हम इस प्रस्ताव का केवल इसी कारण से जोरदार समर्थन करते है।

प्रचेतस's picture

3 Dec 2015 - 6:39 pm | प्रचेतस

हम्म.

=))

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2015 - 6:50 pm | अत्रुप्त आत्मा

फटकफटकाअगोबा-खुर्चीमारात्रुप्त
....................http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/chair-to-the-head.gif

सूड's picture

3 Dec 2015 - 6:58 pm | सूड

हम्म!!

=)) =))

दालन चालू करून बघायला काहीच हरकत नाही.

असच म्हणतो. जर त्रासच अधिक होऊ लागला, तर दंगेखोर आयडीवर बडतर्फाची कारवाही पण करता येईल आणि 'पावित्र्य' टिकवून ठेवता येईल.

नाव आडनाव's picture

4 Dec 2015 - 9:43 am | नाव आडनाव

+१
काही चांगला उपयोग होत असला तर नक्कीच असावा असं वाटतं.

१) टारगटपणा करण्यासाठी काही मिपाकरांचे गुप्त कट्टे हत असतात.त्याचे सभासद वयानुरूप असतात.त्याचे पांढय्रावर काळे करायचे आहे का?
२) बरेचजण TMC मध्ये असतील ( ताटाखालचे मांजर क्लब )त्यांच्या दु:खाला वाचा फोडायची आहे का?
३) सड्डेनाडवाल्यांची ऐश वेगळी TMC वाल्यांची वेगळी
४) सहन होत नाही आणि सांगताही येत नाही हे मुद्दे वेगवेगळे असतात.
५) बाकी टकलावर केस कसे आणावेत अशाप्रकारचे प्रश्न फक्त पुरुषांचेच असले तरी त्याची चर्चा करण्यासाठी AC कोनाडाच हवा असं काही नाही.
६) कोनाडा ठेवलाच तर जरा उंच ठेवा ,कोणाचे मखर मुकुट वरती थटायला नको.

बोका-ए-आझम's picture

3 Dec 2015 - 5:54 pm | बोका-ए-आझम

_/\_ कंजूसकाका!

(घरात स्वखुशीने माऊआझमीचे ऐकणारा) बोका-ए-आझम!

>>> फक्त आपण इथे स्त्रीयांना प्रवेश दिलाय इतकेच.

लिंगाधारित भेदभाव निर्माण करणारं वाक्य वाटु शकतंय. आपण म्हणजे कोण?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2015 - 4:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> लिंगाधारित भेदभाव निर्माण करणारं वाक्य वाटु शकतंय

स्त्री आणि पुरुष यांना इथे विनाअट आणि लिंगभेदाचा विचार न करता मिपावर प्रवेश दिला जातो, असे माझा अनुभव सांगतो. सर्वांना मिपावर सहज प्रवेश आहे. असा तो अर्थ घ्यावा. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

3 Dec 2015 - 5:23 pm | प्रचेतस

अगदी सहमत.

चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी अपेक्षा आहे.

तुम्ही लिव्हा, वाचताव आम्ही हाव तोपर्यंत.
.
अ‍ॅडव्हान्समदी तिळगूळ घ्या, गोड बोला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2015 - 4:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नो नाय नेव्हर. असं पळायचं नाही. वेगळं दालन असावं की नसावं इतकंच सांगा.
असेल तर काय असेल नसेल तर का नसावं ?

-दिलीप बिरुटे

आता पळायचं नाय म्हणता तर आयका.
न सा वं
कुणालाच (संपादक व्यवस्था सोडून) कसलाच विशेषाधिकार नसावा. ज्यांना करायच्यात प्रायव्हेट चर्चा त्यांनी व्हाटसप, जीटॉक, मेल, फोन, व्यनि अशा ईतर सुविधा वापराव्यात. ज्याना ग्रुप हवाय अन कंपूबाजी करायचीय त्यांनी स्वतःच्या हिमतीवर नवीन साईट काढावी अन चालवावी.
एवढे बस्स का साह्यबा?
मग काढताय काय साईट एखादी सर? मस्त मज्जा करु तिथं ;)

संदीप डांगे's picture

3 Dec 2015 - 4:36 pm | संदीप डांगे

तुम्ही जे बोलताय ते धाग्यातल्या विषयाला धरून नाही. स्त्रियांना अनाहिता आहे म्हणून पुरुषांनाही तसंच काही पाहिजे हे जुळ्याचं दुखणं टैप मुद्दा नसावा. निदान मला तरी असंच वाटतं. कंपूबाजीच करायची तर त्यासाठी तुम्ही प्रतिसादात दिलेल्या गोष्टी वापरून आताही केली जाऊ शकते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2015 - 4:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> स्त्रियांना XXXX आहे म्हणून पुरुषांनाही तसंच काही पाहिजे हे जुळ्याचं दुखणं टैप मुद्दा नसावा.

करेक्ट. धन्स.

-दिलीप बिरुटे

विषयाला कसं धरुन नाही अण्णा?
पुरुषांना का वेगळे दालन तर त्यांना स्त्रियासमोर ऑकवर्ड वाटते म्हणून. हो ना? वाइसवर्सा तेच.
मग इथे सगळेच येतात. म्हातार्‍यांपासून अगदी कॉलेजगोईंग पर्यंत. कीती दालने काढताल?
आमचे विषय आम्हालाच समजतात म्हणून आपण एक फक्त कमर्शिअल आर्ट वाल्यांचे मागू. चालेल का?
.
बाकी संघटीत कंपूबाजी बद्दल पूर्णपणे सहमत.

आमचे विषय आम्हालाच समजतात म्हणून आपण एक फक्त कमर्शिअल आर्ट वाल्यांचे मागू. चालेल का?

काही हरकत नाही. फोटोशॉपची व्हर्जन केवढ्याला मिळते, उत्तम रंग कुठे मिळतात किंवा या प्रकारचे प्रश्न सेप्रेट दालनात विचारले तर नेमके उत्तर येण्याची प्रोब्याबिलिटी अजून वाढेल नै का? मायबोलीवर ही सिस्टिम अगोदरच आहे आणि त्यामुळे तिथे नुकसान झालेय असे कै दिसत नै. जन्रल बोर्डावरचे टॉपिक वेगळे, आपापल्या ग्रूपमधले वेगळे. इथला टॉपिक तिथं किंवा तिथला इथं आला तरी चालेल. पण मुळात वर्गीकरण इटसेल्फ चूक आहे असं तर काय नै वाटत बे अभ्या.

आदिजोशी's picture

3 Dec 2015 - 5:02 pm | आदिजोशी

म्हातार्‍यांपासून अगदी कॉलेजगोईंग पर्यंत. कीती दालने काढताल?

स्त्री आणि पुरुष हा अगदी बेसिक लेवलचा फरक आहे. आज जो तरूण आहे उद्या तो म्हातारा होणारच. पण आज जो पुरुष आहे तो वय वाढल्याने बाई होणार नाही. वाइसवर्सा.

त्यामुळे, आर्टीस्ट असलेल्या/नसलेल्यांसाठी, डायबिटिज असलेल्या/नसलेल्यांसाठी, चष्मा असलेल्या/नसलेल्यांसाठी, बद्धकोष्ठ असलेल्या/नसलेल्यांसाठी, असं म्हणून चर्चा भरकटवू नये.

संदीप डांगे's picture

3 Dec 2015 - 5:11 pm | संदीप डांगे

गल्लत होत नै ना नक्की? कारण तुमचं म्हणण मान्य केलं तर कोणत्याच ऑकवर्ड वाटणार्‍या गोष्टींची मिपावर चर्चा होणार नाही. जसे मी वर म्हटले की कोणत्या कंपनीचे रबर चांगले. दुसर्‍या स्पष्ट शब्दात कुठल्या कंपनीचे कंडोम्स चांगले असा धागा मेनबोर्डावर येणार नाहीच.

एक आठवत असेल सर्व पुरुषांना. शाळेत असतांना, आठवीत वैगेरे मुलींसाठी एक खास वर्ग (लेक्चर-पीरीयड) घेतला जायचा, अजूनही होत असेल. तिथे त्यांना पाळी येणे व इतर संबंधीत समस्यांबद्दल कोणीतरी स्त्री-रोग तज्ञ येऊन माहिती देत असे. आपण पोरं एकटेच वर्गात बसून टिवल्या-बावल्या करत खास मुलींना कुठे घेऊन गेले, काय चालू असेल याचे ठोकताळे लावत असू. मला नाही वाटत आजवर कुणी वयात येणार्‍या मुलांसाठी खास वेगळ्या वर्गाची - पीरीयडची गरज आहे असे समजून तो आयोजित केला असेल. हे तेव्हापासून दुर्लक्षीत आहे. आताही असेच राहावे असे वाटते का?

पुरूष मुळातच आपल्या व्यक्तिगत समस्या मोकळेपणाने चर्चीत नाहीत. मेनबोर्ड तर सोडूनच द्या. बर्‍याच तरुणांना खास पुरुषांचेच असे काही प्रश्न असू शकतात ज्याची उत्तरे इथले जाणकार देऊ शकतात. ते प्रश्न मेनबोर्डावर टाकू शकत नाहीत.

दुसरं असं की आमच्या जे जे होस्टेलात कंप्युटर लावण्याबद्दल बंदी होती. (२००३-०४ चा काळ, स्मार्ट्फोन-लॅप्टोप नव्हते) मुलांच्या तर्फे मी जेव्हा संचालकांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी विरोधासाठी मुले फक्त पोर्नच बघत बसतील असा शेरा मारला. हा शेरा मारणार्‍या त्या संचालकांच्या मनात जी भावना मुलांबद्दल तेव्हा होती तीच अशा दालनाला विरोध करणार्‍यांची असेल असे मला वाटते. तुमचे काय म्हणणे आहे?

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2015 - 6:39 pm | अत्रुप्त आत्मा

आमचे विषय आम्हालाच समजतात म्हणून आपण एक फक्त कमर्शिअल आर्ट वाल्यांचे मागू. चालेल का?

>>> नै चालणार. कारण हा मुद्दा हाऊस ऑफ कॉमन्स ला लागू होत नाही.. (तो तुमचामाझा आर्टिस्ट लोकांचा खाजगी मामला आहे)यापेक्षा वर आदि वगैरेंनी दिलेले वेगळे पणाचे मुद्दे सरसकट सर्व पुरुष जातीला लागू होतात. ते मिपाहाऊस ऑफ कॉमन्स'चे आहेत.आणि म्हणून त्या दृष्टीनं ते बरोबर आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2015 - 4:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> मग काढताय काय साईट एखादी सर? मस्त मज्जा करु तिथं ;)

छ्या. मिपावर जगणे आणि मिपावर मरणे, मिपा माझी प्रेयसी आहे. पहिलं प्रेम. :)
(आता मिपा स्त्रीलिंगी की पुल्लिंगी म्हणु नका)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

3 Dec 2015 - 5:24 pm | प्रचेतस

आमचंही पिरेम मिपाच.

सस्नेह's picture

3 Dec 2015 - 5:28 pm | सस्नेह

मग त्या दर्पणाचं काय ?

प्रचेतस's picture

3 Dec 2015 - 5:29 pm | प्रचेतस

ते दुसरं पिरेम. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Dec 2015 - 6:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

आँ ?! हे ऐकून दर्पणा तिचा दगडी आरसा फोडून टाकेल ना ? ;)

प्रचेतस's picture

3 Dec 2015 - 6:44 pm | प्रचेतस

=))

बोका-ए-आझम's picture

3 Dec 2015 - 8:00 pm | बोका-ए-आझम

ती होयसळांची? टीशर्टवरली?

नै.
आमची यादवांची, मराठमोळी.

हे ऐकून दर्पणा तिचा दगडी आरसा फोडून टाकेल ना ? ;)

..याच्या टाळक्यात..!!

प्रचेतस's picture

3 Dec 2015 - 8:21 pm | प्रचेतस

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Dec 2015 - 10:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

तसे केले तरच ती खरी मराठमोळी दर्पणा शोभून दिसेल ! =)) =))

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2015 - 10:36 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggling.gif

त्या बिचार्‍या सज्जन, सरळमार्गी,पापभीरु, सदाचारी, देवमाणूस वल्लीला मार पडण्याच्या नुसत्या शक्यतेनेही बुवांना नेहमी उकळ्या का फुटतात हास्यानंदाच्या?

अत्रुप्त आत्मा's picture

4 Dec 2015 - 3:54 pm | अत्रुप्त आत्मा

त्या बिचार्‍या सज्जन, सरळमार्गी,पापभीरु, सदाचारी, देवमाणूस वल्लीला

>> बाप रे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif मेलो मेलो! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

अत्मा अमर असतानाही तुम्ही कसे मर'ताल?

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2015 - 12:12 am | अत्रुप्त आत्मा

मी आत्मा कुठ्ठाय हो पण ? http://www.sherv.net/cm/emoticons/blue-face/frowning-smiley-emoticon.png ता! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-raspberry-smiley-emoticon.gif

निळे का हो पडलात बुवा??!! ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2015 - 12:37 am | अत्रुप्त आत्मा

आं........................ ल्लुल्लुल्लु http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/cocking-a-snook-at-someone-smiley-emoticon.gif दू दू गवि!

कपिलमुनी's picture

3 Dec 2015 - 4:45 pm | कपिलमुनी

आज मिपातक ला मुलाखत देताना अभ्या..ने कुणालाच (संपादक व्यवस्था सोडून) कसलाच विशेषाधिकार नसावा. असे खळबळजनक विधान केले आहे.
मिपावरील सध्या असलेल्या काही विशेष व्यवस्थेस त्याचा विरोध आहे हे स्पष्ट झालेय.

कॅमेरामन टकासह नारदमुनी !
मिपातक

अभ्या..'s picture

3 Dec 2015 - 4:48 pm | अभ्या..

गप्पे कप्या.
हे लै आधी बोललेलो हाय. नवीन अन खळबळजनक काही नाही त्यात.
.
.
निघाला बोंडूक घेऊन थाटात. कॅमेरा पाडल ते टक्या. लक्ष ठेव.

ज्याना ग्रुप हवाय अन कंपूबाजी करायचीय त्यांनी स्वतःच्या हिमतीवर नवीन साईट काढावी अन चालवावी.

वेगळा ग्रूप हवा असणे = कंपूबाजी करायची असणे

हे समीकरण खरे आहे का ओ मालक?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2015 - 4:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्याचं मत जरा कधी गड्बडीत येत असतं. त्यातला आशय समजून घ्यायचा.
माझं मत समीकरण खोटं. :)

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

3 Dec 2015 - 5:05 pm | अभ्या..

तुम्हीच गडबडीत थांबवून इचारणार. मग काय करावे बरे.
असो.
प्राडॉ. कधी चुकीचे बोललेत काय?
जातो ओ. भेटू निवांत कधीतरी.

प्रचेतस's picture

3 Dec 2015 - 5:23 pm | प्रचेतस

कधी भेटताय निवांतपणे?

ज्याना ग्रुप हवाय अन कंपूबाजी करायचीय त्यांनी स्वतःच्या हिमतीवर नवीन साईट काढावी अन चालवावी.

जावा की मफतलाल पार्कात राहायला..

खुशाल **स्तानात जावा..

?!?! ;-)

रिम झिम's picture

4 Dec 2015 - 4:31 pm | रिम झिम

गवि माफ करा पण चुकून स्तनात जावा असे वाचले...
असो. :)

सूड's picture

3 Dec 2015 - 4:27 pm | सूड

वाचतोय!!

कपिलमुनी's picture

3 Dec 2015 - 4:28 pm | कपिलमुनी

मिपावर दालन मिळो न मिळो , हे मालक ठरवणार
पण या निमित्ताने पुरुषांना भावना असतात किंवा त्यांच्याही शंका किंवा प्रश्न असू शकतात हे पटलावर आले .

आणि तिथे मोकळेपणाने चेष्टा मस्करी जरी केली तरी कोणाचातरी मानभावी विनयभंग होउन आयडी उडणार नाही.

एस's picture

3 Dec 2015 - 4:29 pm | एस

स्त्रीपुरुष वगैरे वाद सोडून दिल्यास, असे एखादे दालन करता येईल ज्यातले धागे हे फक्त लॉगइन केल्यावरच दिसू शकतील. (खफपेक्षा काहीतरी वेगळे).

कोनाडा काय म्हणता हो सर?

परमिट रुम म्हणा की..!!

किंवा खलबतखोली.

असावा की नसावा हा मुद्दा सोडा... असावाच.

आता नाव काय असावं या नवसाच्या दालनाचं यावर चर्चा सुरु होऊदे.

बाकी सीग्राम इम्पिरियल ब्लूची स्पॉन्सरशिप मिळवता येईल का या विभागाला?

आणखी काही विषयः

१. सिगरेट सोडतानाचे हाल
२. रुपा बरी की व्हायपी. व्ही कट की हापचड्डी शेप.
३. व्हिस्कीवादी विरुद्ध रमवादी
४. बर्फवादी विरुद्ध सोडावादी

उपरोक्त विषय स्टिरिओटाईप आहेत हे मान्यच आहे. स्त्रियांच्या दालनात सासूसुना, टीव्हीसीरियल्स, मा.पा., विणकाम भरतकाम, स्वैपाक अशाच चर्चा होत असणार अशी समजूत जशी स्टिरिओटाईप दाखवते तसंच इथेही. ;-)

बॅटमॅन's picture

3 Dec 2015 - 4:42 pm | बॅटमॅन

कोनाडा, पर्मिट रूम, ढाबा, गुत्ता, खोली, काय पायजे ते ठेवा. शिंपळ असल्याशी कारण.

पगला गजोधर's picture

3 Dec 2015 - 4:46 pm | पगला गजोधर

''सिगार-क्लब'' कसं वाटतय ?

मी-सौरभ's picture

3 Dec 2015 - 5:01 pm | मी-सौरभ

"चीअर्स !!" हे नाव चलेल का?

गवि's picture

3 Dec 2015 - 5:02 pm | गवि

अनुमोदन.

बनियन कंपूही चालेल (जवानमर्द फास्टर फेणे)

नाखु's picture

3 Dec 2015 - 5:07 pm | नाखु

"चाव"डी चा पार...

चार घटका करमणूक, कुणी मागतलाच तर आणि तरच सल्ला, बाकी पीक पाणी आणि इतर गप्पा

गावकरी नाखुस

सूड's picture

3 Dec 2015 - 5:18 pm | सूड

'माज'घर ठेवा.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Dec 2015 - 10:49 pm | बिपिन कार्यकर्ते

माजच पाहिजे तर, ’जाऊ, की येता?’ असं चालंन का? अनाहिताशी र्‍हाईमपण होईल बघ! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2015 - 4:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> कोनाडा काय म्हणता हो सर?
परमिट रुम म्हणा की..!!

चुकलंच गवि. कोनाडा या शब्दात जरा मागासलेपण दिसतंय. परमिट रुमसारखं ते दालन असावं याच्याशी सहमत. सालं दोन दोन पेग आणि दोन दोन सिगारेटचे झुरके घेत (मी यातलं काहीही घेत नाही, सांगुन ठेवतो) सालं आयुष्याविषयी मस्त बोलायचं. प्रामाणिक, व्यवस्थेतील (समाज आणि देश) पटत नाही. मस्त शिव्या द्यायच्या. मस्त रडायचं. कोणी परंपरावादी नाही कोणी पुरोगामी नाही. पटत नै चल छोड दिया.


१. सिगरेट सोडतानाचे हाल
२. रुपा बरी की व्हायपी. व्ही कट की हापचड्डी शेप.
३. व्हिस्कीवादी विरुद्ध रमवादी
४. बर्फवादी विरुद्ध सोडावादी

हे सर्व विषय मुख्य बोर्डावर येऊ शकतात. घेऊ कधी तरी. वाचनखुण साठवतो प्रतिसादाची.

-दिलीप बिरुटे

वेगळा कोनाडा मिळाला तर माझे कीतीतरी धागा विषय ज्यांचा मी मनातल्या मनात गळा घोटला ते
जिवंत होऊन मोकळा श्वास घेतील. हे विषय मी घेऊच शकत नाही कारण कीतीही संयत भाषेत लिहीले तरी ते
शेवटी अश्लील अश्लील बोंब होणारच काय हे कसल हे उदा. हे विषय होते
१- स्त्री देहांतील सौंदर्यस्थळे
२- सालो चित्रपटावर एक लेख लिहायचा होता.
३- सॅन्डविच व गेयशा आणि इतर मसाजाचे विवीध प्रकार
४- अत्याधुनिक ब्युटी पार्लर मध्ये ब्रायडल मेकअप मध्ये केले जात असलेले विधी.
५- सीक्रेट सेक्स सोसायटीज
६- कोलटकरांच्या काही कवितेवरील चर्चा
७- मेल इगो आणि लैंगिकता
इ.इ.इ.
आता हे मेन बोर्डावर कसे मांडणार म्हणुन विचारच सोडुन दिला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2015 - 8:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्ता मला आपलीच आठवण झाली. आपण मागे एका कवितेवर बोललो होतो. खरं तर 'तसं कुठे करतात' मला त्यावर चर्चा करायची होती पण कसं बोलू असं मलाही वाटलं आणि आपण दोघांनीही तो विषय सोडुन दिला.

बाकी, कोलटकर माझे फेव्हरेट. नक्की लिहा त्यांच्या कवितेबद्दल.

-दिलीप बिरुटे

मृत्युन्जय's picture

3 Dec 2015 - 5:07 pm | मृत्युन्जय

नाय गरज वाटत ब्वो.

मिपावर लोकशाही आहे . सर्व सदस्यांना एकाच मापदंड ..... वगैरे असा समज होता माझा .
आता हा रिझरवेशन चा मुद्दा कोठून वर आला बरे ?

१) पुरुषांचे काही प्रश्न जे मुख्य बोर्डावर लिहायला संकोच वाटतो, आरोग्यविषयक ?
२) पुरुष लिंगभेद, उत्तेजित करणारे आणि अश्लिल चर्चा करतील ?
३) पोषाख, देखणेपण आकर्षक व्यक्तिमत्व यावर चर्चा करतील ?
४) एकीकडे प्रेयसी आणि एकीकडे बायको दोघांशी समन्वय कसं राखु असे प्रश्न असतील ?
५) सासरे आणि सासु छळ करतात काही टीप्स प्लीज, असे म्हणतील
६) पत्नी दम देते, दमात घेत असते, काय करु ?
७) पत्नी पॉकेट मनी देत नाही, काय करु ?
८) पत्नीच्या माहेरचे लोक सारखे सारखे मुक्कामी असतात काय करावे ?
९) अन्य...

या विषयां साठी इतर फोरम्स उपलब्ध आहेतच की .चाललंय ते छानच आहे मग कम्प्लीकेट का करावे ?

keep It simple

असे आपल माझं वैयक्तिक मत हो . बाकी चालुद्या तुमचे पुढे .

चूभूद्याघ्या

एका कवितेच्या काही ओळी वाचा तोपर्यंत. कवी अरुण कोलटकर.

एवढी मोठी मिशी
तुझ्या बायकोला चालते तरी कशी
एक माझा पेशंट होता प्रोस्टेटची केस
काय त्याचं नाव हां हृषिकेश हृषिकेश
Such big whiskers
O he was a Laugh
पण एका रात्री
मी ह्ळूच घेतली कात्री
अन कापून टाकल्या साफ
अर्थात त्याची बायको झाली खूष
पण तो एवढा भडकला की
O my gosh

दोन महिन्यानी दिसला तेव्हा मला बघून आठ्या
आणि व्हिस्कर्स बघाव्या तर पहिल्यापेक्षा मोठ्या.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

3 Dec 2015 - 5:22 pm | प्रचेतस

अगगागागागाग्गा_/\_

अ‍ॅज अ मॅटर ऑफ फॅक्ट, सुलभ रेसिपीजची देवाणघेवाण हीदेखील काळानुसार आज पुरुषांच्या दालनातली गरज बनली आहे. सध्याच्या बॅचलरांना पटणार नाही अर्थात. ते भ्रामक सुखस्वप्नात असतील भविष्याच्या.

प्रचेतस's picture

3 Dec 2015 - 5:26 pm | प्रचेतस

हो ना.
मला तर साधा चहादेखील बनवता येत नै. घरी कुणी नसलं तर चिमूटभर साखर आणि चहापत्ती एकत्र करून कोरडीच खातो.

घरी कुणी नसलं तर चिमूटभर साखर आणि चहापत्ती एकत्र करून कोरडीच खातो.

ष्षी..!!

सूड's picture

3 Dec 2015 - 5:42 pm | सूड

कसलं भारी!!

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2015 - 6:46 pm | अत्रुप्त आत्मा

@घरी कुणी नसलं तर चिमूटभर साखर आणि चहापत्ती एकत्र करून कोरडीच खातो.>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif ल्लुल्लुल्लुल्लु :-/ खोट्टं! आणि नंतर गरम पाणी व वरती दुध पिऊन ढेरीवर गदागदा लोळतो! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

ता झालं पूर्ण. http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

पन्नास झाल्याबद्दल सर्वांचा सत्कार "जो जे वांछील ,तो ते लाहो" अशी प्रार्थना भावी संपादकपदी करुन करण्यात येत आहे.

उगा काहितरीच's picture

3 Dec 2015 - 5:51 pm | उगा काहितरीच

माझा पूर्ण पाठिंबा अशा गुप्त पुरूष विभागाला.
भरपूर कारणे आहेत . पण इथं चर्चा करणे योग्य नाही. खुपच उत्सुकता असेल तर व्यनि करा . ;-)
जेपीभौ , आंदोलनाची सुपारी घेणार का ?

मांत्रिक's picture

3 Dec 2015 - 6:06 pm | मांत्रिक

माझा पण पूर्ण पाठिंबा अशा गुप्त पुरूष विभागाला
सहमत...

पगला गजोधर's picture

3 Dec 2015 - 6:25 pm | पगला गजोधर

अरे अयं, 'गुप्त' नसणार आहे तो, 'पुरुषेतर प्रतीबंधित' विभाग असणार आहे.
फक्त उद्घाटनाला अपवाद म्हणून सनी लिओन आणायची.
विभागाचे नाव आपण 'वाडा' ठेवूया. म्हणजे तिला आमंत्रण देताना आपण म्हणू, 'बाई वाड्यावर चला'

संदीप डांगे's picture

3 Dec 2015 - 6:39 pm | संदीप डांगे

सहमत. उगाच 'गुप्त' शब्द आल्याने भलत्याच शंका नको बाहेर.

उगा काहितरीच's picture

3 Dec 2015 - 6:45 pm | उगा काहितरीच

'गुप्त' नसणार आहे तो, 'पुरुषेतर प्रतीबंधित' विभाग असणार आहे.

चालेल भौ! रच्याकने उगाच अभिनव भारत वगैरे संघटनांचे गुप्त खलबते आठवली.

पगला गजोधर's picture

3 Dec 2015 - 8:01 pm | पगला गजोधर

विरोधी लोकांनी 'गे क्लब' म्हणून खुसपट काढायला संधी नको, म्हणून सनी लीओनीची नियमित विसिट पण ठेवूया.....

प्रसाद गोडबोले's picture

3 Dec 2015 - 6:34 pm | प्रसाद गोडबोले

भले रिकामा का राहिना पण असा एक पुरुषांसाठीचा स्वतंत्र कोनाडा असावाच ,

ह्या मागे उद्देश इतकाच की संपुर्ण मिसळपावचेच माजघर करायचा जो प्रयत्न चालु आहे तो कोठे तरी थांबला पाहिजे !
मिसळ्पाव बहुरंगी बहुढंगी बहुआयामी असावी , माजघर असावे ना काही हरकत नाही आमची पण अंडर द ओपन स्काय टेरेस गार्डनही विथ अ पर्सनल बारही असु दे .

सगळीकडेच सतत सोवळे घालुन वावरावे ही अपेक्षा फारच कैच्याकै आहे. ज्यांना चेष्टा मस्करी झेपत नाही नाही त्यांनी माजघरात बसुन राहावे , आम्ही फिरकणार सुध्दा नाही तिकडे . पण सर्वत्रच सात्विक सोवळे वातावरण असावे अशी अपेक्षा म्हणजे फारच झाले बुवा !

अवांतर : काही दिवसांपुर्वी "Advice to a Friend on Choosing a Mistress" - a letter by Benjamin Franklin , June 25, 1745 वाचनात आले . आता बोला ह्या विषयावर "माजघरात" कसे बोलणार ? त्या साठी मस्त टेरेस गार्डनच हवे मग मस्त बीन ब्यॅग टाकुन खदाखदा लोळत अन बीयर चे सीप मारत गफ्फा मारता येतील !!

राजेश घासकडवी's picture

3 Dec 2015 - 7:40 pm | राजेश घासकडवी

मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच वेगळं दालन आहे. फक्त आपण इथे स्त्रीयांना प्रवेश दिलाय इतकेच.

आपण??? प्रवेश दिलाय??? च्यायला मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजे काय शनिशिंगणापूरचा चौथरा आहे की काय, परवानगी द्यायला किंवा न द्यायला? तरी बरं स्कॅनर लावलेला नाहीये. या वाक्याचा निषेध.

बाकी पुरुषविभागाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. तसा तो व्हावा म्हणून मी एक दाढी करण्याबद्दलचा लेखही लिहिलेला होता. पुरुषांच्या सुकोमल हृद्गतांना तोंड फुटण्यासाठी एक वेगळा कोपरा व्हायलाच हवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2015 - 8:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर स्त्री-पुरुष यांना प्रवेश सहज मिळतो. मिपाचा मुख्य बोर्डावर सर्वच विषय असतात तेव्हा गमतीने आपण हे चुकुन टंकल्या गेलं आहे.

>>>> पुरुषांच्या सुकोमल हृद्गतांना तोंड फुटण्यासाठी एक वेगळा कोपरा व्हायलाच हवा.
भावना पोहचल्या आभार.

-दिलीप बिरुटे

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Dec 2015 - 10:51 pm | बिपिन कार्यकर्ते

आज सूर्य पश्चिमेला उगवला काय?
मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला काय?

;)

आणि कोनाड्यात एक सुंद्री हवीच.ती भुलेश्वरची आरसावाली नाय हो,ती दुसरी उजेड पाडणारी.
( पुर्वी एक खास दिवा होता कोनाड्यात ठेवण्याचा.त्याला सुंद्री म्हणत.जाणकारानी व्यत्पत्ती द्यावी. )

आणि कोनाड्यात एक सुंद्री हवीच.ती भुलेश्वरची आरसावाली नाय हो,ती दुसरी उजेड पाडणारी.
( पुर्वी एक खास दिवा होता कोनाड्यात ठेवण्याचा.त्याला सुंद्री म्हणत.जाणकारानी व्यत्पत्ती द्यावी. )

बोका-ए-आझम's picture

3 Dec 2015 - 8:03 pm | बोका-ए-आझम

पण हे वेगळं दालन होणार आहे का? म्हणजे इथे लोकांनी ' जास्तीची मेजारटी' म्हून बोंब ठोकायची आणि तिथून मालकांनी ठगा दाखवायचा असं तर नाहीये ना? का आपण सगळे hypothetical चर्चा करताय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2015 - 8:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दालन होणार आहे का ?

अजिबात दालन होणार नाही आणि मालकांचा या चर्चेत काहीच रोल नाही.
प्रा.डॉ.लाच वेगळ्या कोनाड्याच्या मिपाकर म्हणुन विषयाची खाज आली.
असं झालं तर काय काय विषय तिथे आपण चर्चेला घेऊ शकतो असे वाटल्याने ही चर्चा.
(किंवा मुख्य बोर्डावर हे विषय घेता येतील का अशा अर्थाने)

-दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम's picture

3 Dec 2015 - 8:04 pm | बोका-ए-आझम

असे वाचावे.

बात निकली हय तर दुर तक जायेगी...
वर्षभरा पुर्वी डबल बॅरल वाल्यांनी आमच्या या प्रयत्नाला नख लावला होता..

हेल मी पयला संघटना..

परिकथेतील राजकुमार's picture

3 Dec 2015 - 8:22 pm | परिकथेतील राजकुमार

a b c d
कसले डब्बल बॅरल 'गे' शिर्षक आहे हे प्रा. डॉ.

बाकी, आमचे मत म्हणाल तर स्त्रीयांच्या कोनाड्याला आम्ही केलेला विरोध आणि त्यावर घडलेले महाभारत तुम्ही जाणताच. कशाला हवी गोपनीयता? काय साध्य होणारे त्यातून?

बाकी, जबाबदारीतून मोकळे झाल्यामुळे तुम्ही परत आम्हा कंटकाच्या कंपूत परत आलात ह्याचा 'आणंद' झाला गेल्या आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2015 - 8:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सालं मी सरळ लिहिलं तरी तुम्हाला ते पालथंच दिसतं. ;)

'क ख आणि ग' च्या दालनाची चर्चा इथे करु नका असं सांगितलं आहे. आपले पुरुषांचे काही प्रॉब्लेम्स सॉरी काही अडचणी आहेत का आणि तसं झालं तर पुरुषांचा फायदा होईल का अशा शुद्ध हेतुने ही चर्चा. सरळ लिहा. कोयी पडदा नही चाहिये. जे लिहु ते मुख्य बोर्डावर दॅट्स ऑल.

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

3 Dec 2015 - 8:50 pm | परिकथेतील राजकुमार

सालं मी सरळ लिहिलं तरी तुम्हाला ते पालथंच दिसतं. ;)

आम्ही पालथे धंदे करण्यातच एक्सपर्ट आहोत हे तुम्ही जाणताच.

'क ख आणि ग' च्या दालनाची चर्चा इथे करु नका असं सांगितलं आहे. आपले पुरुषांचे काही प्रॉब्लेम्स सॉरी काही अडचणी आहेत का आणि तसं झालं तर पुरुषांचा फायदा होईल का अशा शुद्ध हेतुने ही चर्चा.

पुरुषांना अडचण येत नाही (ह्या विधानाचा वैज्ञानीक अर्थ काढू नये).
मात्र पुरुषांमुळे स्त्रीयांना घरापासून रस्त्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अशी त्यांची तक्रार असते. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुन्हा अजून वेगळा कोनाडा कशाला असा आमचा आक्षेप आहे. ;)

सरळ लिहा. कोयी पडदा नही चाहिये. जे लिहु ते मुख्य बोर्डावर दॅट्स ऑल.

वोच बोलता हय! लिहा ते खुलेआम. कोनाड्यात व्हिंदमाता पण नको आन पुरुष पण.

चतुरंग's picture

3 Dec 2015 - 9:39 pm | चतुरंग

एक कोनाडा नाही का? आताही जे वाटेल ते लिहिले जातेच की. ;)

हां, पुरुषांनाही खास त्यांच्याच अशा अडचणी नक्कीच असू शकतात आणि त्याबद्दल फक्त इतर पुरुषांशीच व्यक्त व्हावे असे वाटू शकते त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावरती वेगळा पुरुष विभाग करुन बघायचा असला तर काहीच हरकत नाही. पण मग आयडीमागची व्यक्ती पुरुष आहे हे खातरजमा करुनच प्रवेश द्यायला हवा अन्यथा त्या विभागाला काहीच अर्थ नाही.
असा विभाग काढल्यावर त्यात येणारे लिखाण्/प्रतिसाद यांचे मॉडरेशन करायचे का? आणि असल्यास कोण बघणार? तिथल्या सदस्यांमधले दंगे कोण सोडवणार? याचा विचार करुन ठेवायला हवा. केवळ चावट गप्पा, फाजील जोक्स, निव्वळ वैषयिक लिखाण, वैयक्तिक हल्ले अशांकडेच हे जायला लागले तर काय करायचे ह्याचाही विचार करुन ठेवायला हवा. नाहीतर 'पिवळा कोनाडा' व्हायचा! ;)
मजा मारायला सगळे पुढे आणि जबाबदारीच्या वेळी हळूच काढता पाय घेणारे बहुतांश हे मुख्य बोर्डावरती संपादक असताना अनेकदा अनुभवले आहे आणि त्यावेळी जे जबाबदारी घेतात त्यांचे हाल कुत्रा खात नाही आणि नावाला सगळेच संपादक असतात ..त्यामुळे सूचना.....

बाकी कोनाड्याला शुभेच्छा! :)

(खुद के साथ बातां - रंगा, नाव काय ठेवावं रे या कोनाड्याचं? 'अंदरकी बात!' चालेल का? ;) )

(कोनाडाप्रेमी)रंगनाड

परिकथेतील राजकुमार's picture

3 Dec 2015 - 9:59 pm | परिकथेतील राजकुमार

हां, पुरुषांनाही खास त्यांच्याच अशा अडचणी नक्कीच असू शकतात आणि त्याबद्दल फक्त इतर पुरुषांशीच व्यक्त व्हावे असे वाटू शकते

दोन वर्षापूर्वी आमच्या विजुभौंनी वाईट स्वप्नांवरती काही 'व्यक्त होणारे' लिखाण केले होते. मी तिथे 'विजुभौंना स्वप्नदोषाचा प्रॉब्लेम कधी झाला?' असे काळजीने विचारले तर कोणितरी प्रतिसादच उडवला. असा कोनाडा निघाल्यास अशा प्रतिसादांना गंभिरतेने घेऊन त्यावर नीट चर्चा व्हायला हवी.

चतुरंग's picture

3 Dec 2015 - 10:30 pm | चतुरंग

असा उडवतात का प्रतिसाद एकदम? चर्चा तरी बघायची नीट...स्वप्नदोष हा दोष असे 'स्वप्ना'चा...

(स्वप्नाळू)रंगा

बॅटमॅन's picture

3 Dec 2015 - 11:43 pm | बॅटमॅन

हाच तो बिनडोक सोवळेपणा नसलेला विभाग असला तर हवा आहे.

विजुभाऊ's picture

4 Dec 2015 - 10:08 am | विजुभाऊ

मिपा वर आजवर कट्टे व्हायचे. पण मला वाटते बहुतेक या नंतर "कोनाडे" होणार.
मिपा इतके कानकोंडे कधीपासून झाले?
हरीकथेतील राजकुमार हरी हरी म्हणतात तेंव्हा त्याना हरी हवा असतो अशी कोणीतरी शंका घेतली होती म्हणे.
असो.
काल पाहिले मी स्वप्न नवे
दोशासोबत भाजी होती साम्बारासवे.....

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Dec 2015 - 9:56 pm | निनाद मुक्काम प...

काही शंका मनात आल्या केवळ पुरुषांचा कोनाडा किंवा परमिट रूम असेल तर अश्लीलता ;लैंगिकता चावटपणाव चाहतळपण वाह्यातपणाचे नियम थोडे सैल असतील का:
पुरुषांच्या काय आप्पा ग्रुप मध्ये ह्याचा अनुभव नेहमी येतो
त्याचे वावगे वाटत नाही आपण सुजाण सुसंस्कृत माणसे आहोत क्षणिक भंकस टवालकी करण्यास काहीच हरकत नाही:
अजून प्रतिसादांच्या मध्ये एकही स्त्री सदस्येचा प्रतिसाद का नाही आला; निवडणुकीत मतदार त्यांचा कल राज्यकर्त्यांना संदेश मतपेटीतून व्यक्त करतो तसे येथे प्रतिसाद न देऊन :::
असो
परमिट रूम का सिगर क्लब जे म्हणाल ते ते झाले तर त्याचा मिपाला फायदा होणार आहे का
त्या निमित्ताने काही चांगले भविष्यातील मिपाकर व मूकवाचक मिळणार आहेत का

असे प्रश्नही मनात आले
वेगळा कोनाडा झाला तर त्यात आपला सक्रीय सकारात्मक सहभाग असेल
नाही झाला तर तो झाला पाहिजे असा काही विशेष आग्रह नाही आणि त्यासाठी पडद्यामागून खलबते चर्चा मोहीम चालवणे आपल्या प्रकृतीला झेपत नाही:
आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे:

मित्रहो's picture

3 Dec 2015 - 10:42 pm | मित्रहो

त्यात इतरांना बंदी असे नको फक्त वॉर्णिंग की हे पुरुषांना त्यांच्या समस्या मांडायचे दालन आहे आणि फक्त सभासदांनाच प्रवेश हवा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Dec 2015 - 11:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्राडॉ, आता इथे विरोध करणार्‍यांच्या नावांची नोंद करून ठेवा. खरोखरच कोनाडा बनला तर सभासदत्वाचा निर्णय करताना उपयोगी पडेल ;) :)

ते खुद्दच पहिले उभे आहेत लिस्टमधे. लेखाची सुरुवातच पहा.

ब्रिटिश टिंग्या's picture

4 Dec 2015 - 12:37 am | ब्रिटिश टिंग्या

हा धागा मौजमजा सदरात मोडत नसल्यास वेगळ्या विभागास अनुमोदन!

- टिंग्या

अविनाशकुलकर्णी's picture

4 Dec 2015 - 1:05 am | अविनाशकुलकर्णी

चालेल... आमच्या परीने यथायोग्य योगदान दीले जाईल....खुप किस्से आठवणी गप्पा आहेत

विजुभाऊ's picture

4 Dec 2015 - 10:20 am | विजुभाऊ

हा धागा मौजमजा सदरात मोडत नसल्यास... वेगळ्या विभागाची गरज काय?
नुसत्या द्व्यर्थी चकाट्या होणार असतील तर काहीच उपयोग होणार नाही.
समुपदेशन,सल्ले वगैरे साठी वेगळे दालन असायला हरकत नाही पण तेथे केवळ पुरूषांसाठी वेगळे दालन हे मात्र चुकीचे वाटतय.
स्त्रीयांचे काही प्रश्न हे पुरुषांनाही तितकेच त्रासदायक ठरत असतात.
उदा: मेनॉपॉज मधे स्त्रीयांचे अचानक बदलते मूड्स, चिचिडेपणा हा संपूर्ण घराचे वातावरण बिघडवत असतो.
वास्तावीक त्या चाळीशी उलटलेल्या नवरोबाला सुद्धा इतके दिवस समजूतदार असणारी बायको अचानक असा बोलभांडपणा का करायला लागली हे कळत नसते. त्याला त्याच्या शारीरीक व्यावसायीक समस्या असतात. किमान त्या कोणी सम्मजून घ्याव्या ही त्याची गरज असते.
असा परिस्थीत पुरुषांसाठी वेगळे दालन काढून काय होणार? सगळे एकतर्फी बोलणेच होणार. पुरुषांच्या समस्या काय असतात या बाबतीत स्त्रीवर्ग अनभीज्ञच रहाणार. त्याचा त्याना काय त्रास होतो याबाबत पुरुषवर्ग अनभीज्ञ रहाणार.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Dec 2015 - 10:26 am | अत्रुप्त आत्मा

पुरुषांच्या समस्या काय असतात या बाबतीत स्त्रीवर्ग अनभीज्ञच रहाणार. त्याचा त्याना काय त्रास होतो याबाबत पुरुषवर्ग अनभीज्ञ रहाणार.

अगदी सहमत! पण मग अश्या (सगळ्याच)चर्चा खुल्या वातावरणात घडू शकतात का? आपल्या इथे ते शक्य आहे का? जरी झाल्या तरी त्यात सर्व जण मोकळे पणानि सहभागी होऊ शकतात का?
याबाबतचा इतिहास काय आहे?

सुबोध खरे's picture

4 Dec 2015 - 10:34 am | सुबोध खरे

विजुभाऊ,
पुरुष आपल्या भावनिक आणि लैंगिक बाबी चार चौघात चर्चा करायला संकोचतात. या उलट एखाद्या स्त्रीचा असा प्रश्न नवर्यापेक्षा तिच्या मैत्रीणीना व्यवस्थित माहिती असतो.( त्यातून भावनिक निचरा सोडून फारसे काही निष्पन्न होत नाही हा भाग विरळा).
किती पुरुष आपला लैंगिक किंवा भावनिक प्रश्नाबद्दल आपल्या जवळच्या मित्राबरोबर चर्चा करू शकतात? अगदी चखणा आणि दारू घेऊन बसणारे मित्र सुद्धा दोन पेग घेऊन "हलके" वाटल्यावरहि असे प्रश्न सहज चर्चा करायला संकोचतात.
हा पुरुष स्वभाव आहे यासाठी वेगळे दालन असेल तर एका पुरुषाने प्रश्न विचारला तर दुसर्याला तसाच किंवा वेगळा प्रश्न विचारायला धीर येउ शकतो. एकदा धीर चेपला कि त्यावर जास्त मोकळेपणाने ते चर्चा करू शकतात. प्रत्येक वेळेस त्यातून मार्ग निघेलच असे नाही पण निदान आपल्यासारखे प्रश न केवळ आपल्यालाच आहेत असे नाही हा विचार सुद्धा मनाला धीर देऊन जातो.
मी एक पैज लावतो-- लैंगिक/ भावनिक प्रश्नानची उत्तरे मासिकात येतात. उदा डॉ. महिन्दर वत्स किंवा राजन भोसले यांचे रकाने. मिपा वरील किमान ८० ते ९० % लोक चवीने किंवा कुतूहलाने वाचतात. खोटे असेल तर सांगा.
यास्तव पुरुषांना सुद्धा मोकळे होण्यासाठी एक व्यासपीठ असावे असे वाटते.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Dec 2015 - 10:42 am | अत्रुप्त आत्मा

हा पुरुष स्वभाव आहे यासाठी वेगळे दालन असेल तर एका पुरुषाने प्रश्न विचारला तर दुसर्याला तसाच किंवा वेगळा प्रश्न विचारायला धीर येउ शकतो. एकदा धीर चेपला कि त्यावर जास्त मोकळेपणाने ते चर्चा करू शकतात. प्रत्येक वेळेस त्यातून मार्ग निघेलच असे नाही पण निदान आपल्यासारखे प्रश न केवळ आपल्यालाच आहेत असे नाही हा विचार सुद्धा मनाला धीर देऊन जातो.

+++++१११११ अगदी हेच !

आदिजोशी's picture

4 Dec 2015 - 11:55 am | आदिजोशी

ह्या चर्चेवर मिपावरील समस्त स्त्रीयांनी ठरवून बहिष्कार घातलेला दिसतोय.

असो. मुळात मिसळपाव हाच एक कट्टा असताना पुरुषांच्या वेगळ्या विभागाची गरज काय ह्या चर्चेतून पुढे, असं असेल तर मग वेगळ्या अनाहिता विभागाची गरज काय? असा प्रश्न उद्भवू शकण्याच्या शक्यतेमुळे कदाचित स्त्रीया इथून लांब राहिल्या असतील.

असो.

आम्हाला गरज वाटते. विभाग सुरु करायचा की नाही हा सर्वस्वी मालकांचा निर्णय आहे.

ह्या चर्चेवर मिपावरील समस्त स्त्रीयांनी ठरवून बहिष्कार घातलेला दिसतोय.

असेनाका. बाकी स्त्रियांनी भाग न घेतलेले धागे = वाह्यात, पाचकळ असे समीकरण तयार करण्यात त्याच पुढे असतात हेवेसांनल.

मुळात मिसळपाव हाच एक कट्टा असताना पुरुषांच्या वेगळ्या विभागाची गरज काय ह्या चर्चेतून पुढे, असं असेल तर मग वेगळ्या अनाहिता विभागाची गरज काय? असा प्रश्न उद्भवू शकण्याच्या शक्यतेमुळे कदाचित स्त्रीया इथून लांब राहिल्या असतील.

चुकलात ओ तुम्ही. स्त्रियांना तेवढा संकोच वाटतो म्हणून त्यांना कोनाडा पाहिजे, पुरुष मात्र फक्त आणि फक्त चावटपणा करतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Dec 2015 - 12:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपलं ठरलंय ना अन्य कोणत्याही दालनाची चर्चा इथे नाही करायची.:)

मी जरा पुढे जाऊन म्हणतो आपल्याला सर्वच विषय मुख्य बोर्डावर लिहिता आले तर
कशाला हवा कोनाडा ?

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

4 Dec 2015 - 12:10 pm | बॅटमॅन

मी जरा पुढे जाऊन म्हणतो आपल्याला सर्वच विषय मुख्य बोर्डावर लिहिता आले तर
कशाला हवा कोनाडा ?

जर मिश्या असत्या तर कशाला म्हणू आत्याबाई? :)

म्हणजे सध्या लिहिता येत नाहीत.
कोण आणि कसे अडवतय ज़रा सांगा की.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Dec 2015 - 12:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही विषय मांडायला पुरुष संकोच करतात कोणी अडवत बीडवत नै. ;)

-दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले's picture

4 Dec 2015 - 1:10 pm | प्रसाद गोडबोले

काही विषय मांडायला पुरुष संकोच करतात कोणी अडवत बीडवत नै

अडवत नाही कोणी, पण अश्या एखाद्या विषयावर धागाच काय तर साधा प्रतिसाद जरी लिहिला तर 'ते' फील्डिंग लावतात हे मात्र निश्चित !

मागे एकदा फक्त "जेव्हा स्त्री आणि पुरुष समानता खर्‍या अर्थाने अस्तित्वात येईल तेव्हा आपण सर्व्वांनाच 'माणुस' ही इतकीच आयडेंटीटी पुरेशी ठरेल " ह्या अर्थाचे विधान केले होते तर केवढा गहजब माजला होता !

एक प्रतिसाद दिल्याचे हे फळ तर धागा काढल्याचे काय फळ ? !

मला आज नुसती चर्चा वाचुन मस्त मोकळ मोकळ वाटलं.
कुठल्या ब्रेकर शिवाय चर्चा इंजॉय करत आहे

-दिलीप बिरुटे

pacificready's picture

4 Dec 2015 - 1:23 pm | pacificready

एक निरिक्षण-

ती मिसळ आणि तो पाव.

पाव उसळ, वडा, चिकन, खिमा, चहा, लोणी इ बरोबर आपली मैत्री टिकवून आहे. पाव सर्वसमावेशक आहे.

जिथे कातरी लागणार नाही असे सर्वांसाठी दालन असावे , फक्त पुरुषांसाठी कोनाडा नको. कारण
१ कोनाड्यात प्रकाश नसतो, बऱ्याचदा जे आपल्याला स्पष्ट दिसते असे वाटते ते सर्व बाजूने प्रकाश पडल्यावर वेगळे असते.
2 बरेच /काही जण असे असतील की ज्यांना कोनाड्यातील (कदाचित) काही विषय वगळता इतर विषयात भाग घ्यायची इच्छा असेल. दालन सर्वांसाठी खुले असल्याने ही मुभा राहील. (विषय-topic, no pun intended.)
3 माझ्यासारखे काही आयडी असतील ज्याना पुरुष वा स्त्री अशा कुठल्याही वर्तुळात जायचे नसेल, किंवा कट्ट्याला उपस्थित राहून व्यक्तिगत ओळख नको असेल, त्याना कोनाड्यात no entry असेल , मग आली का पंचाइत?;) ( बिचारा टका मला ग/रे अशी दोन्ही संबोधने वापरतो:))

बॅटमॅन's picture

4 Dec 2015 - 2:14 pm | बॅटमॅन

कोनाडा असला म्हणजे मेन बोर्डावर कुणी येणार नाही असं आहे का?

अनाहिता नामक कोनाड्यामुळे मेन बोर्डावर स्त्रियांचे धागे येणं थांबलं आहे का?