Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 12/03/2015 - 15:28
नमस्कार मंडळी, काल पासून आणि काही दिवसांपासून सतत एक चर्चा चाललेली आहे की पुरुषांनाही चर्चेसाठी मिपावर एक गोपनिय दालन असावं का ? माझं मत सांगुन टाकतो की मी अशा कोणत्याही कोनाड्याच्या विरोधात आहे. आणि माझा मित्र वल्ली उर्फ प्रचेतसच्या मते मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच वेगळं दालन आहे. फक्त आपण इथे स्त्रीयांना प्रवेश दिलाय इतकेच. तर असा एखादा कोनाडा असावा काय ? आणि समजा असा एखादा कोनाडा तयार झाला तर तिथे स्त्रियांना प्रवेश असावा काय ? पुरुषांच्या अशा दालनात काय काय चर्चा होतील आणि अशा दालनाचा पुरुष सदस्यांना काही फायदा होऊ शकेल काय ? प्रश्न असे असतील की दुसरे काही - १) पुरुषांचे काही प्रश्न जे मुख्य बोर्डावर लिहायला संकोच वाटतो, आरोग्यविषयक ? २) पुरुष लिंगभेद, उत्तेजित करणारे आणि अश्लिल चर्चा करतील ? ३) पोषाख, देखणेपण आकर्षक व्यक्तिमत्व यावर चर्चा करतील ? ४) एकीकडे प्रेयसी आणि एकीकडे बायको दोघांशी समन्वय कसं राखु असे प्रश्न असतील ? ५) सासरे आणि सासु छळ करतात काही टीप्स प्लीज, असे म्हणतील ६) पत्नी दम देते, दमात घेत असते, काय करु ? ७) पत्नी पॉकेट मनी देत नाही, काय करु ? ८) पत्नीच्या माहेरचे लोक सारखे सारखे मुक्कामी असतात काय करावे ? ९) अन्य..... मंडळी, धागा मौजमजा आणि तसा थोडा गंभीरही आहे. एकच विनंती की मिपावरच्या 'क ख आणि ग' च्या दालनाची चर्चा इथे करु नका. नसता धागा जाईल आणि मालक माझ्या नावावर मायनस गुण टाकायला सुरुवात करतील. टीप : चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी अपेक्षा आहे. कोणत्याही दालनावर चर्चा न करता.
  • Log in or register to post comments
  • 45188 views

प्रतिक्रिया

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 12/03/2015 - 15:33

Permalink

ऑ.........

ऑ......... आजच्या स्त्री प्रधान जगात व्यक्त होण्यासाठी पुरुषाना हक्काचे मिळायला हवे या चळवळीचे जनक म्ह्णून तुमचीच वर्णी नक्की आहे सर. भाषेचे सुद्धा बघा ना सगळे चांगले शब्द स्त्रीलिंगी आहेत आणि वैट्ट शब्द पुल्लिंगी आहेत. उदा : ती माया , ती थंडी ,ती झोप , ती हौस, ती मौज आणि तो राग , तो उक्काडा ,तो आळस , तो कंटाळा कित्ती कित्ती अन्याय हा पुरुषांवर.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 12/03/2015 - 15:38

In reply to ऑ......... by विजुभाऊ

Permalink

विजुभौ,

आपलं काय ठरलंय. शुद्धलेखन, भाषा, व्याकरण यावर मिपावर काहीच आणि कधीच चर्चा करायची नाही. शुद्धलेखनावर तात्याने लै ठोकलंय मला. त्यामुळे तो विषय बंद. बाकी, दालन असावं की नसावं ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by शित्रेउमेश on Fri, 12/04/2015 - 12:22

In reply to ऑ......... by विजुभाऊ

Permalink

बापरे...

बापरे... कधी विचारच केला नव्हता.... किती हा अन्याय??? असली भाषा नक्किच कोणत्या तरी स्त्रीनेच बनवली असेल.... कित्ती कित्ती अन्याय हा पुरुषांवर....
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 12/03/2015 - 15:34

Permalink

_/\_ डॉ. साब

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 12/03/2015 - 15:37

Permalink

मला वाटतं, वेगळा कोनाडा म्हणा

मला वाटतं, वेगळा कोनाडा म्हणा, दालन म्हणा पण पुरुषांसाठी वेगळ्या भागाची आवश्यकता आहे. काही आरोग्यविषयक बाबी अ‍ॅनॉनिमसली विचारता येतील व त्याबद्दल इथले जाणकार-डॉक्टर काही सल्ले देतील अशीही व्यवस्था करता येईल. कुठल्या कंपनीचे रबर चांगले याबद्दल चर्चा मेनबोर्डावर करता येतील असे वाटत नाही. ह्या आणि इतर अनेक खर्‍याखुर्‍या समस्या ज्या इतरांना आंबटशौकिन वा चावट वाटू शकतात त्या मेनबोर्डावर शक्य असतील तर मग वेगळ्या दालनाची गरज नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 12/04/2015 - 05:59

In reply to मला वाटतं, वेगळा कोनाडा म्हणा by संदीप डांगे

Permalink

आमचे एथे पुरुष कृपेने प्रतिसाद झाला आहे.

मेन बोर्डावर लिहू देण्याबद्दल मी प्रा. डॉ., त्यांचे समविचारी आणि सर्वश्री पुरुषांचे आभार मानते.
कुठल्या कंपनीचे रबर चांगले...
याबद्दल बेडवर चर्चा केली की बोर्डावर चर्चा करण्याची गरज कमी पडते. अनुभवून बघा. पुन्हा एकदा प्रतिसाद लिहू देण्याबद्दल मी प्रा. डॉ., त्यांचे समविचारी आणि सर्वश्री पुरुषांचे आभार मानते.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 12/04/2015 - 06:55

In reply to आमचे एथे पुरुष कृपेने प्रतिसाद झाला आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

@याबद्दल बेडवर चर्चा केली की

@याबद्दल बेडवर चर्चा केली की बोर्डावर चर्चा करण्याची गरज कमी पडते. अनुभवून बघा. >> आणि जर तिथे ही गोष्ट बोलायची तयारी होत नसेल..बाईची किंवा बाप्याची ! तर काय करावे ब्रे!?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 12/04/2015 - 06:57

In reply to @याबद्दल बेडवर चर्चा केली की by अत्रुप्त आत्मा

Permalink

हम्म... =))

हम्म... =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 12/04/2015 - 06:58

In reply to हम्म... =)) by प्रचेतस

Permalink

मग अनुभवी लोकांचे समुपदेशन

मग अनुभवी लोकांचे समुपदेशन घ्यावे.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 12/04/2015 - 07:11

In reply to मग अनुभवी लोकांचे समुपदेशन by प्रचेतस

Permalink

राईट..ते घेता येतच. पण एकाच

राईट..ते घेता येतच. पण एकाच विषयावर जेंव्हा त्यातुन गेलेले अनेकजण अनुभवसिद्ध मत मांडतात.. तेंव्हा त्यातुन मिळणारी माहिती ही सरळ मदत करणारी ठरते..तेंव्हा अशी चर्चा समागमातल्या अनेक अंगाना स्पर्श करणारी असणार. ज्यात उघडपणे सगळे पुरुषहि सहभागी होऊ शकत नाहीत..म्हणूनच वेगळा विभाग..
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 12/04/2015 - 20:08

In reply to राईट..ते घेता येतच. पण एकाच by अत्रुप्त आत्मा

Permalink

हा प्रतिसाद प्राडॉंना समर्पित.

>> चर्चा समागमातल्या अनेक अंगाना स्पर्श करणारी असणार. ज्यात उघडपणे सगळे पुरुषहि सहभागी होऊ शकत नाहीत.. <<
त्यासाठीच लैंगिक शिक्षण महत्त्वाचं. "आमच्या वेळेला नव्हती असली थेरं तरी आमचं निभलंच ना," छापाच्या मतांना फाट्यावर मारून किन्सी आणि मास्टर्स-जॉन्सन यांच्यासारखी खुल्या चर्चेची, विद्यार्थी भूमिका उपयुक्त असते. कोनाडा काढून तिथे चावट विनोद करता येतीलच; पण शिक्षण स्त्री-पुरुष सगळ्यांचंच होणं महत्त्वाचं आहे. तत्त्वतः अनाहिता, कोनाडा, LGBTQ किंवा आणखीही कोणत्या गटांसाठी आणखी निराळा विभाग काढायला माझा पाठिंबा अथवा विरोध काहीही नाही. (माझा आधीचा प्रतिसाद कदाचित होमोफोबिक वाटू शकतो, पण प्रतिसाद आणि मीही होमोफोबिक नाही.)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 12/04/2015 - 20:14

In reply to हा प्रतिसाद प्राडॉंना समर्पित. by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

पट्या

पट्या
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 12/04/2015 - 23:59

In reply to हा प्रतिसाद प्राडॉंना समर्पित. by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

@त्यासाठीच लैंगिक शिक्षण

@त्यासाठीच लैंगिक शिक्षण महत्त्वाचं.>> हा भावी पिढ्यांसाठिचा आदर्शवाद झाला हो बाई. अत्ताच्या पिढीनीपण हे शिक्षण आधी घ्यावं,लगेच पचवावं..आणि अश्या चर्चांची गरज निर्माणच होऊ देऊ नये..असं काही आपलं म्हणणं आहे का? @"आमच्या वेळेला नव्हती असली थेरं तरी आमचं निभलंच ना," छापाच्या मतांना फाट्यावर मारून किन्सी आणि मास्टर्स-जॉन्सन यांच्यासारखी खुल्या चर्चेची, विद्यार्थी भूमिका उपयुक्त असते.>> सहमत आहे.. पण सध्या इथे किंवा आणखिही कुठे अशी चर्चा होऊ शकत नाही..कारण अत्ताचे सगळे लोक तुमच्या इतके पुढारलेले नाहीत..त्याचं काय करायचं? ते बोला. @कोनाडा काढून तिथे चावट विनोद करता येतीलच; पण शिक्षण स्त्री-पुरुष सगळ्यांचंच होणं महत्त्वाचं आहे. >>> ते इथे उघड साध्य होणे शक्य नाही.. हेच सध्याचे वास्तव आहे.. हे विसरून कसे चालेल??? का ते लक्षातच घ्यायच नाही..आणि आदर्शवादाच्या हिंदोळ्यांनवर झुलत रहायचे? माझ्या म्हणण्याचा हेतू इतकाच की जेंव्हा समान समस्या असलेली लोकं त्याच्या निवारणासाठी स्वमदतगट तयार करतात..तेंव्हा त्याचा उपयोग पुसकी ज्ञानसंपादनापेक्षा,समुपदेशनाच्या डोसांपेक्षा वेगळा आणि सरळ मदत करणारा असतो.. मी अन्य समस्यांबाबत सध्या (भारतात/जगात) चालू असलेल्या अश्या काहि स्वमदतगटसंस्थांचा लाभार्थी सभासद आहे.. त्या प्रत्यक्षफायद्याच्या आधारावरच मी हे मत मांडतो आहे. @तत्त्वतः अनाहिता, कोनाडा, LGBTQ किंवा आणखीही कोणत्या गटांसाठी आणखी निराळा विभाग काढायला माझा पाठिंबा अथवा विरोध काहीही नाही.>> झालं तर. मग त्याच्या बाजुनी अथवा विरोधात मतप्रदर्शनही करु नका ना! @(माझा आधीचा प्रतिसाद कदाचित होमोफोबिक वाटू शकतो, पण प्रतिसाद आणि मीही होमोफोबिक नाही.) >> मला तसा तो आधिही वाटलेला नव्हता..अताही वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 12/05/2015 - 00:03

In reply to @त्यासाठीच लैंगिक शिक्षण by अत्रुप्त आत्मा

Permalink

@तेंव्हा त्याचा उपयोग पुसकी

@तेंव्हा त्याचा उपयोग पुसकी ज्ञानसंपादनापेक्षा >> तेंव्हा त्याचा उपयोग पुस्तकी ज्ञानसंपादनापेक्षा, ..असे वाचावे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 12/04/2015 - 08:12

In reply to आमचे एथे पुरुष कृपेने प्रतिसाद झाला आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अग्गो बाई... येत जा गं मिपावर. :)

प्रा.डॉ. आणि समविचारी पुरुषांचा कोणत्याही कोनाड्याला सतत विरोधच राहीला आहे. मुख्य बोर्डावर कोणत्याही विषयावर कोणालाही लिहायला बंदी नाही, इतकं सर्वांना माहितीच आहे. बाकी, मिपावर लिहायला येत जा अदिती, मला आपले प्रतिसाद खुप खुप आवडतात. :) अवांतर : अदिती आकाश निरीक्षण, तारे शोधणे, वगैरे काय चालु आहे सध्या ? एखादा नवीन तारा जर तुम्हाला सापडला तर त्या तार्‍याला प्रा.डॉ अन सोनचाफा असं नाव दे हं प्लीज. :) -दिलीप बिरुटे (अदितीच्या लेखनाचा फ्यान) :)
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Fri, 12/04/2015 - 09:34

In reply to आमचे एथे पुरुष कृपेने प्रतिसाद झाला आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

सिर्फ बेड पे नही ……

याबद्दल बेडवर चर्चा केली की बोर्डावर चर्चा करण्याची गरज कमी पडते.
त्याचबरोबर...... Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Fri, 12/04/2015 - 12:34

In reply to सिर्फ बेड पे नही …… by पगला गजोधर

Permalink

चर्चेची तयारी आवडली

पग, ते दोन गुढघ्यात काय दाबून धरलंय? चर्चेच्या नोंदी की काय? बाई जय्यत तयारीने आलेल्या दिसतात चर्चेसाठी! ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by याॅर्कर on Wed, 12/09/2015 - 14:12

In reply to चर्चेची तयारी आवडली by गामा पैलवान

Permalink

__/\__

नतमस्तक _/\__/\_ . . . . शिव शिव शिव.....
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Fri, 12/04/2015 - 10:59

In reply to आमचे एथे पुरुष कृपेने प्रतिसाद झाला आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

लक्ष लक्ष धन्यवाद!

याबद्दल बेडवर चर्चा केली की बोर्डावर चर्चा करण्याची गरज कमी पडते. अनुभवून बघा.
पुरुषांच्या वेगळ्या दालनाची गरज नेमकी का आहे हे अधोरेखीत केल्याबद्दल लाखो वेळा धन्यवाद! चर्चा कुठे करायची आणि कृती कुठे हे आम्हांला चांगलं माहिती आहे याबद्दल खात्री बाळगा. एक फुकटचा सल्ला: विषय कळण्याची शून्य क्षमता असलेल्यांनी नको तिथे नाक खुपसून आपली शोभा(डे) करून घेऊ नये.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Fri, 12/04/2015 - 12:36

In reply to लक्ष लक्ष धन्यवाद! by संदीप डांगे

Permalink

स्ट्रेफ्रॉहॉमा हेच का?

संदीप डांगे,
>> पुरुषांच्या वेगळ्या दालनाची गरज नेमकी का आहे हे अधोरेखीत केल्याबद्दल लाखो वेळा धन्यवाद!
स्ट्रेट फ्रॉम हॉर्सेस माऊथ का कायतरी म्हणतात ते हेच का? ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by pacificready on Fri, 12/04/2015 - 12:59

In reply to लक्ष लक्ष धन्यवाद! by संदीप डांगे

Permalink

शोभा डे यांचा अपमान

शोभा डे यांचा अपमान केल्याबद्दल आपणास कारणे दाखवा नोटिस देण्यात येत आहे. - शोभा डे यांच्या प्रसिद्धीलोलुपतेची चीड़ असूनही 'आत्ता' त्यांच्यासाठी शानिभुति वाटणारा.
  • Log in or register to post comments

Submitted by pacificready on Fri, 12/04/2015 - 13:05

In reply to मला वाटतं, वेगळा कोनाडा म्हणा by संदीप डांगे

Permalink

डांगे अण्णा,

डांगे अण्णा, नटराज कंपनी ची पेन्सिल असली तर त्याच कंपनीचं 'लब्बर' वापरा की! पेनासाठी पण काही 'लब्बर' असतात. जास्त घासून चालत नाही पण. कागद फाटतो. नैतर मग व्हाइटनर वापरायचं. दिसतो वापरलेला पण ठीक ना! आणि लब्बर धुवावा मधे मधे. काळेपणा जातो. -इयत्ता 8 वी क -
  • Log in or register to post comments

Submitted by याॅर्कर on Wed, 12/09/2015 - 14:15

In reply to डांगे अण्णा, by pacificready

Permalink

कोपरापासून दंडवत

||श्री दादा कोंडके प्रसन्न||
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on गुरुवार, 12/03/2015 - 15:37

Permalink

वेगळा कोनाडा गरजेचा नाय...

वेगळा कोनाडा गरजेचा नाय... पण चार पोर जरा गप्पा मारत बसली तर लगेच धावुन येऊ नये..
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 12/03/2015 - 15:42

In reply to वेगळा कोनाडा गरजेचा नाय... by जेपी

Permalink

काही अंशी सहमत, पण अलीकडचे

काही अंशी सहमत, पण अलीकडचे वातावरण पाहता कोनाडा गरजेचा आहे खरा.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 12/03/2015 - 15:41

Permalink

असावा का नसावा

हा सर्वस्वी मिपा मालकांचा आणि चालकांचा प्रश्न(पक्षी विषय) आहे. पण जस्म इतर कोनाड्यात कायं चालतं याची चर्चा करण्यात इथे हशील नाही तशीच या कल्पनेतील (भावी) कोनाड्याबदाल येथे चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही... हे वैयक्तीक मत.. सांघीक मत : कोनाडा असल्याने का नसल्याने कुचंबणा आहे काय याचा कंपूच्या कंपूशी कंपूने चर्चा करून उत्तर देऊ शकेन. कोपच्यात गेलेला पण कोनाड्यात नसलेला नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 12/03/2015 - 15:43

Permalink

गंभीर प्रतिसाद

भारतात प्रत्येक ९ मिनिटाला एक विवाहीत पुरुष आत्महत्या करत असतो , त्याबद्दल चर्चा करता येइल भारतीय पुरुष लिंगभेदाला बळी पडतात (त्यांना ऑफिसमध्ये स्त्री सहकार्‍यांचा त्रास असू शकतो ) ४९८ अ सारख्या कायद्या विरूद्ध चर्चा करता येतील. सर्व काका लोकांसाठी मिड लाईफ क्रायसिस चर्चा करता येइल पुरुष पालकांसाठी वयात येणार्या मुलांसोबत कसे वागावे याबद्दल मुलांकडून सल्ले दिले जातील.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 12/03/2015 - 15:52

Permalink

शन्का

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 12/03/2015 - 16:00

In reply to शन्का by पगला गजोधर

Permalink

कोणतीही पूर्वपरिक्षा नसेल ?

पुरुषांच्या दालनात स्रीला प्रवेश असेल अगदी अनामिक सदस्यही चालेल तिथे प्रवेशासाठी लिंगभेदाची कोणतीही अट असणार नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 12/03/2015 - 16:14

In reply to कोणतीही पूर्वपरिक्षा नसेल ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

?

पुरुषांच्या दालनात स्रीला प्रवेश असेल अगदी अनामिक सदस्यही चालेल तिथे प्रवेशासाठी लिंगभेदाची कोणतीही अट असणार नाही.
तर मग, हे तर मिपा वर चालूच आहे, इथेच मग यथेच्च चर्चा व्हाव्यात नं तुम्ही देलेल्या उदा-मधल्या.
१) पुरुषांचे काही प्रश्न जे मुख्य बोर्डावर लिहायला संकोच वाटतो, आरोग्यविषयक ? २) पुरुष लिंगभेद, उत्तेजित करणारे आणि अश्लिल चर्चा करतील ? ३) पोषाख, देखणेपण आकर्षक व्यक्तिमत्व यावर चर्चा करतील ? ४) एकीकडे प्रेयसी आणि एकीकडे बायको दोघांशी समन्वय कसं राखु असे प्रश्न असतील ? ५) सासरे आणि सासु छळ करतात काही टीप्स प्लीज, असे म्हणतील ६) पत्नी दम देते, दमात घेत असते, काय करु ? ७) पत्नी पॉकेट मनी देत नाही, काय करु ? ८) पत्नीच्या माहेरचे लोक सारखे सारखे मुक्कामी असतात काय करावे ? ९) अन्य.....
मग अश्या चर्चांमध्ये कोणी नाकं मुरुडू नये, अश्लील वै. म्हणून… आणि शेप्रेट कोनाडा कशला हवाय मग ?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 12/03/2015 - 16:03

In reply to शन्का by पगला गजोधर

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 12/03/2015 - 23:06

In reply to शन्का by पगला गजोधर

Permalink

गजोधरभैय्या. तुम्हाला आयएसेम

गजोधरभैय्या. तुम्हाला आयएसेम किंवा श्रीलिपी वापरता येतीय शुअर. हो की नाही? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on गुरुवार, 12/03/2015 - 16:12

Permalink

नक्कीच असावा

का असू नये? जर मिपावर स्त्रीयांना मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी वेगळं दालन द्यायचं कौतुकास्पद कार्य होऊ शकतं, तर पुरुषांना मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी वेगळे दालन का नसावे? कॉमन फोरमवर बोलताना, ते इतर स्त्रीयाही वाचत असल्याने अनेकदा पुरुषही संकोचतात. काही विषय पर्सनल असतात जे स्त्रीयांसमोर बोलले जाउ शकत नाहीत. उदा. पहिल्या रात्रीचे समूपदेशन, आई आणि बायको मधील भांडण सोडवण्यासाठी सल्ला, नोकरी/आयुष्यात येणारं फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशनमधे जाणे, इत्यादि अनेक. दालन चालू करून बघायला काहीच हरकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 12/03/2015 - 16:20

In reply to नक्कीच असावा by आदिजोशी

Permalink

+२२२२२२२२२२२२

अगदी असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 12/03/2015 - 18:33

In reply to नक्कीच असावा by आदिजोशी

Permalink

कॉमन फोरमवर बोलताना, ते इतर

कॉमन फोरमवर बोलताना, ते इतर स्त्रीयाही वाचत असल्याने अनेकदा पुरुषही संकोचतात. काही विषय पर्सनल असतात जे स्त्रीयांसमोर बोलले जाउ शकत नाहीत. उदा. पहिल्या रात्रीचे समूपदेशन, आई आणि बायको मधील भांडण सोडवण्यासाठी सल्ला, नोकरी/आयुष्यात येणारं फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशनमधे जाणे, इत्यादि अनेक.
>> ++++++++++१११११११११११११ जोरदार हाणुमोदण्ण! हम इस प्रस्ताव का केवल इसी कारण से जोरदार समर्थन करते है।
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 12/03/2015 - 18:39

In reply to कॉमन फोरमवर बोलताना, ते इतर by अत्रुप्त आत्मा

Permalink

हम्म. =))

हम्म. =))
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 12/03/2015 - 18:50

In reply to हम्म. =)) by प्रचेतस

Permalink

फटकफटकाअगोबा

फटकफटकाअगोबा-खुर्चीमारात्रुप्त ....................Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 12/03/2015 - 18:58

In reply to हम्म. =)) by प्रचेतस

Permalink

हम्म!! =)) =))

हम्म!! =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by जातवेद on गुरुवार, 12/03/2015 - 22:20

In reply to नक्कीच असावा by आदिजोशी

Permalink

दालन चालू करून बघायला काहीच

दालन चालू करून बघायला काहीच हरकत नाही.
असच म्हणतो. जर त्रासच अधिक होऊ लागला, तर दंगेखोर आयडीवर बडतर्फाची कारवाही पण करता येईल आणि 'पावित्र्य' टिकवून ठेवता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by नाव आडनाव on Fri, 12/04/2015 - 09:43

In reply to नक्कीच असावा by आदिजोशी

Permalink

+१

+१ काही चांगला उपयोग होत असला तर नक्कीच असावा असं वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 12/03/2015 - 16:13

Permalink

१) टारगटपणा करण्यासाठी काही

१) टारगटपणा करण्यासाठी काही मिपाकरांचे गुप्त कट्टे हत असतात.त्याचे सभासद वयानुरूप असतात.त्याचे पांढय्रावर काळे करायचे आहे का? २) बरेचजण TMC मध्ये असतील ( ताटाखालचे मांजर क्लब )त्यांच्या दु:खाला वाचा फोडायची आहे का? ३) सड्डेनाडवाल्यांची ऐश वेगळी TMC वाल्यांची वेगळी ४) सहन होत नाही आणि सांगताही येत नाही हे मुद्दे वेगवेगळे असतात. ५) बाकी टकलावर केस कसे आणावेत अशाप्रकारचे प्रश्न फक्त पुरुषांचेच असले तरी त्याची चर्चा करण्यासाठी AC कोनाडाच हवा असं काही नाही. ६) कोनाडा ठेवलाच तर जरा उंच ठेवा ,कोणाचे मखर मुकुट वरती थटायला नको.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on गुरुवार, 12/03/2015 - 17:54

In reply to १) टारगटपणा करण्यासाठी काही by कंजूस

Permalink

TMC ! फुटलो!

_/\_ कंजूसकाका! (घरात स्वखुशीने माऊआझमीचे ऐकणारा) बोका-ए-आझम!
  • Log in or register to post comments

Submitted by pacificready on गुरुवार, 12/03/2015 - 16:14

Permalink

>>> फक्त आपण इथे स्त्रीयांना

>>> फक्त आपण इथे स्त्रीयांना प्रवेश दिलाय इतकेच. लिंगाधारित भेदभाव निर्माण करणारं वाक्य वाटु शकतंय. आपण म्हणजे कोण?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 12/03/2015 - 16:20

In reply to >>> फक्त आपण इथे स्त्रीयांना by pacificready

Permalink

तसं नाही.

>>>> लिंगाधारित भेदभाव निर्माण करणारं वाक्य वाटु शकतंय स्त्री आणि पुरुष यांना इथे विनाअट आणि लिंगभेदाचा विचार न करता मिपावर प्रवेश दिला जातो, असे माझा अनुभव सांगतो. सर्वांना मिपावर सहज प्रवेश आहे. असा तो अर्थ घ्यावा. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 12/03/2015 - 17:23

In reply to तसं नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

अगदी सहमत.

अगदी सहमत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 12/03/2015 - 16:18

Permalink

चर्चामंथनातून आणि विचारांच्या

चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी अपेक्षा आहे.
तुम्ही लिव्हा, वाचताव आम्ही हाव तोपर्यंत. . अ‍ॅडव्हान्समदी तिळगूळ घ्या, गोड बोला.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 12/03/2015 - 16:22

In reply to चर्चामंथनातून आणि विचारांच्या by अभ्या..

Permalink

असं पळायचं नाही.

नो नाय नेव्हर. असं पळायचं नाही. वेगळं दालन असावं की नसावं इतकंच सांगा. असेल तर काय असेल नसेल तर का नसावं ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 12/03/2015 - 16:29

In reply to असं पळायचं नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

आता पळायचं नाय म्हणता तर आयका

आता पळायचं नाय म्हणता तर आयका. न सा वं कुणालाच (संपादक व्यवस्था सोडून) कसलाच विशेषाधिकार नसावा. ज्यांना करायच्यात प्रायव्हेट चर्चा त्यांनी व्हाटसप, जीटॉक, मेल, फोन, व्यनि अशा ईतर सुविधा वापराव्यात. ज्याना ग्रुप हवाय अन कंपूबाजी करायचीय त्यांनी स्वतःच्या हिमतीवर नवीन साईट काढावी अन चालवावी. एवढे बस्स का साह्यबा? मग काढताय काय साईट एखादी सर? मस्त मज्जा करु तिथं ;)
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 12/03/2015 - 16:36

In reply to आता पळायचं नाय म्हणता तर आयका by अभ्या..

Permalink

तुम्ही जे बोलताय ते

तुम्ही जे बोलताय ते धाग्यातल्या विषयाला धरून नाही. स्त्रियांना अनाहिता आहे म्हणून पुरुषांनाही तसंच काही पाहिजे हे जुळ्याचं दुखणं टैप मुद्दा नसावा. निदान मला तरी असंच वाटतं. कंपूबाजीच करायची तर त्यासाठी तुम्ही प्रतिसादात दिलेल्या गोष्टी वापरून आताही केली जाऊ शकते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 12/03/2015 - 16:39

In reply to तुम्ही जे बोलताय ते by संदीप डांगे

Permalink

करेक्ट.

>>>>> स्त्रियांना XXXX आहे म्हणून पुरुषांनाही तसंच काही पाहिजे हे जुळ्याचं दुखणं टैप मुद्दा नसावा. करेक्ट. धन्स. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com