Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 12/03/2015 - 15:28
नमस्कार मंडळी, काल पासून आणि काही दिवसांपासून सतत एक चर्चा चाललेली आहे की पुरुषांनाही चर्चेसाठी मिपावर एक गोपनिय दालन असावं का ? माझं मत सांगुन टाकतो की मी अशा कोणत्याही कोनाड्याच्या विरोधात आहे. आणि माझा मित्र वल्ली उर्फ प्रचेतसच्या मते मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच वेगळं दालन आहे. फक्त आपण इथे स्त्रीयांना प्रवेश दिलाय इतकेच. तर असा एखादा कोनाडा असावा काय ? आणि समजा असा एखादा कोनाडा तयार झाला तर तिथे स्त्रियांना प्रवेश असावा काय ? पुरुषांच्या अशा दालनात काय काय चर्चा होतील आणि अशा दालनाचा पुरुष सदस्यांना काही फायदा होऊ शकेल काय ? प्रश्न असे असतील की दुसरे काही - १) पुरुषांचे काही प्रश्न जे मुख्य बोर्डावर लिहायला संकोच वाटतो, आरोग्यविषयक ? २) पुरुष लिंगभेद, उत्तेजित करणारे आणि अश्लिल चर्चा करतील ? ३) पोषाख, देखणेपण आकर्षक व्यक्तिमत्व यावर चर्चा करतील ? ४) एकीकडे प्रेयसी आणि एकीकडे बायको दोघांशी समन्वय कसं राखु असे प्रश्न असतील ? ५) सासरे आणि सासु छळ करतात काही टीप्स प्लीज, असे म्हणतील ६) पत्नी दम देते, दमात घेत असते, काय करु ? ७) पत्नी पॉकेट मनी देत नाही, काय करु ? ८) पत्नीच्या माहेरचे लोक सारखे सारखे मुक्कामी असतात काय करावे ? ९) अन्य..... मंडळी, धागा मौजमजा आणि तसा थोडा गंभीरही आहे. एकच विनंती की मिपावरच्या 'क ख आणि ग' च्या दालनाची चर्चा इथे करु नका. नसता धागा जाईल आणि मालक माझ्या नावावर मायनस गुण टाकायला सुरुवात करतील. टीप : चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी अपेक्षा आहे. कोणत्याही दालनावर चर्चा न करता.
  • Log in or register to post comments
  • 45188 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 12/03/2015 - 17:26

In reply to अ‍ॅज अ मॅटर ऑफ फॅक्ट, सुलभ by गवि

Permalink

हो ना.

हो ना. मला तर साधा चहादेखील बनवता येत नै. घरी कुणी नसलं तर चिमूटभर साखर आणि चहापत्ती एकत्र करून कोरडीच खातो.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 12/03/2015 - 17:30

In reply to हो ना. by प्रचेतस

Permalink

घरी कुणी नसलं तर चिमूटभर साखर

घरी कुणी नसलं तर चिमूटभर साखर आणि चहापत्ती एकत्र करून कोरडीच खातो.
ष्षी..!!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 12/03/2015 - 17:42

In reply to घरी कुणी नसलं तर चिमूटभर साखर by गवि

Permalink

कसलं भारी!!

कसलं भारी!!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 12/03/2015 - 18:46

In reply to घरी कुणी नसलं तर चिमूटभर साखर by गवि

Permalink

@घरी कुणी नसलं तर चिमूटभर

@घरी कुणी नसलं तर चिमूटभर साखर आणि चहापत्ती एकत्र करून कोरडीच खातो.>> Image removed. ल्लुल्लुल्लुल्लु :-/ खोट्टं! आणि नंतर गरम पाणी व वरती दुध पिऊन ढेरीवर गदागदा लोळतो! Image removed. अता झालं पूर्ण. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on गुरुवार, 12/03/2015 - 17:28

Permalink

पन्नास झाल्याबद्दल सर्वांचा

पन्नास झाल्याबद्दल सर्वांचा सत्कार "जो जे वांछील ,तो ते लाहो" अशी प्रार्थना भावी संपादकपदी करुन करण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on गुरुवार, 12/03/2015 - 17:51

Permalink

माझा पूर्ण पाठिंबा अशा गुप्त

माझा पूर्ण पाठिंबा अशा गुप्त पुरूष विभागाला. भरपूर कारणे आहेत . पण इथं चर्चा करणे योग्य नाही. खुपच उत्सुकता असेल तर व्यनि करा . ;-) जेपीभौ , आंदोलनाची सुपारी घेणार का ?
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on गुरुवार, 12/03/2015 - 18:06

In reply to माझा पूर्ण पाठिंबा अशा गुप्त by उगा काहितरीच

Permalink

माझा पण पूर्ण पाठिंबा अशा

माझा पण पूर्ण पाठिंबा अशा गुप्त पुरूष विभागाला सहमत...
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 12/03/2015 - 18:25

In reply to माझा पण पूर्ण पाठिंबा अशा by मांत्रिक

Permalink

अरे अयं

अरे अयं, 'गुप्त' नसणार आहे तो, 'पुरुषेतर प्रतीबंधित' विभाग असणार आहे. फक्त उद्घाटनाला अपवाद म्हणून सनी लिओन आणायची. विभागाचे नाव आपण 'वाडा' ठेवूया. म्हणजे तिला आमंत्रण देताना आपण म्हणू, 'बाई वाड्यावर चला'
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 12/03/2015 - 18:39

In reply to अरे अयं by पगला गजोधर

Permalink

सहमत. उगाच 'गुप्त' शब्द

सहमत. उगाच 'गुप्त' शब्द आल्याने भलत्याच शंका नको बाहेर.
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on गुरुवार, 12/03/2015 - 18:45

In reply to अरे अयं by पगला गजोधर

Permalink

'गुप्त' नसणार आहे तो,

'गुप्त' नसणार आहे तो, 'पुरुषेतर प्रतीबंधित' विभाग असणार आहे.
चालेल भौ! रच्याकने उगाच अभिनव भारत वगैरे संघटनांचे गुप्त खलबते आठवली.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 12/03/2015 - 20:01

In reply to 'गुप्त' नसणार आहे तो, by उगा काहितरीच

Permalink

Pre-emptive initiative

विरोधी लोकांनी 'गे क्लब' म्हणून खुसपट काढायला संधी नको, म्हणून सनी लीओनीची नियमित विसिट पण ठेवूया.....
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 12/03/2015 - 18:34

Permalink

भले रिकामा का राहिना पण असा

भले रिकामा का राहिना पण असा एक पुरुषांसाठीचा स्वतंत्र कोनाडा असावाच , ह्या मागे उद्देश इतकाच की संपुर्ण मिसळपावचेच माजघर करायचा जो प्रयत्न चालु आहे तो कोठे तरी थांबला पाहिजे ! मिसळ्पाव बहुरंगी बहुढंगी बहुआयामी असावी , माजघर असावे ना काही हरकत नाही आमची पण अंडर द ओपन स्काय टेरेस गार्डनही विथ अ पर्सनल बारही असु दे . सगळीकडेच सतत सोवळे घालुन वावरावे ही अपेक्षा फारच कैच्याकै आहे. ज्यांना चेष्टा मस्करी झेपत नाही नाही त्यांनी माजघरात बसुन राहावे , आम्ही फिरकणार सुध्दा नाही तिकडे . पण सर्वत्रच सात्विक सोवळे वातावरण असावे अशी अपेक्षा म्हणजे फारच झाले बुवा ! अवांतर : काही दिवसांपुर्वी "Advice to a Friend on Choosing a Mistress" - a letter by Benjamin Franklin , June 25, 1745 वाचनात आले . आता बोला ह्या विषयावर "माजघरात" कसे बोलणार ? त्या साठी मस्त टेरेस गार्डनच हवे मग मस्त बीन ब्यॅग टाकुन खदाखदा लोळत अन बीयर चे सीप मारत गफ्फा मारता येतील !!
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on गुरुवार, 12/03/2015 - 19:40

Permalink

मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच

मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच वेगळं दालन आहे. फक्त आपण इथे स्त्रीयांना प्रवेश दिलाय इतकेच.
आपण??? प्रवेश दिलाय??? च्यायला मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजे काय शनिशिंगणापूरचा चौथरा आहे की काय, परवानगी द्यायला किंवा न द्यायला? तरी बरं स्कॅनर लावलेला नाहीये. या वाक्याचा निषेध. बाकी पुरुषविभागाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. तसा तो व्हावा म्हणून मी एक दाढी करण्याबद्दलचा लेखही लिहिलेला होता. पुरुषांच्या सुकोमल हृद्गतांना तोंड फुटण्यासाठी एक वेगळा कोपरा व्हायलाच हवा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 12/03/2015 - 20:51

In reply to मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच by राजेश घासकडवी

Permalink

वो मालक.

मिपावर स्त्री-पुरुष यांना प्रवेश सहज मिळतो. मिपाचा मुख्य बोर्डावर सर्वच विषय असतात तेव्हा गमतीने आपण हे चुकुन टंकल्या गेलं आहे. >>>> पुरुषांच्या सुकोमल हृद्गतांना तोंड फुटण्यासाठी एक वेगळा कोपरा व्हायलाच हवा. भावना पोहचल्या आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 12/03/2015 - 22:51

In reply to वो मालक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

आज सूर्य पश्चिमेला उगवला काय?

आज सूर्य पश्चिमेला उगवला काय? मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला काय? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 12/03/2015 - 22:43

In reply to मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच by राजेश घासकडवी

Permalink

आणि कोनाड्यात एक सुंद्री हवीच

आणि कोनाड्यात एक सुंद्री हवीच.ती भुलेश्वरची आरसावाली नाय हो,ती दुसरी उजेड पाडणारी. ( पुर्वी एक खास दिवा होता कोनाड्यात ठेवण्याचा.त्याला सुंद्री म्हणत.जाणकारानी व्यत्पत्ती द्यावी. )
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 12/03/2015 - 22:44

In reply to मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच by राजेश घासकडवी

Permalink

आणि कोनाड्यात एक सुंद्री हवीच

आणि कोनाड्यात एक सुंद्री हवीच.ती भुलेश्वरची आरसावाली नाय हो,ती दुसरी उजेड पाडणारी. ( पुर्वी एक खास दिवा होता कोनाड्यात ठेवण्याचा.त्याला सुंद्री म्हणत.जाणकारानी व्यत्पत्ती द्यावी. )
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on गुरुवार, 12/03/2015 - 20:03

Permalink

प्राडाॅ

पण हे वेगळं दालन होणार आहे का? म्हणजे इथे लोकांनी ' जास्तीची मेजारटी' म्हून बोंब ठोकायची आणि तिथून मालकांनी ठगा दाखवायचा असं तर नाहीये ना? का आपण सगळे hypothetical चर्चा करताय?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 12/03/2015 - 20:47

In reply to प्राडाॅ by बोका-ए-आझम

Permalink

नाय नाय ...

दालन होणार आहे का ? अजिबात दालन होणार नाही आणि मालकांचा या चर्चेत काहीच रोल नाही. प्रा.डॉ.लाच वेगळ्या कोनाड्याच्या मिपाकर म्हणुन विषयाची खाज आली. असं झालं तर काय काय विषय तिथे आपण चर्चेला घेऊ शकतो असे वाटल्याने ही चर्चा. (किंवा मुख्य बोर्डावर हे विषय घेता येतील का अशा अर्थाने) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on गुरुवार, 12/03/2015 - 20:04

Permalink

* ठेंगा

असे वाचावे.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on गुरुवार, 12/03/2015 - 20:19

Permalink

बात निकली हय तर दुर तक जायेगी

बात निकली हय तर दुर तक जायेगी... वर्षभरा पुर्वी डबल बॅरल वाल्यांनी आमच्या या प्रयत्नाला नख लावला होता.. हेल मी पयला संघटना..
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 12/03/2015 - 20:22

Permalink

कसले डब्बल बॅरल 'गे' शिर्षक

Image removed. Image removed. Image removed. Image removed. कसले डब्बल बॅरल 'गे' शिर्षक आहे हे प्रा. डॉ. बाकी, आमचे मत म्हणाल तर स्त्रीयांच्या कोनाड्याला आम्ही केलेला विरोध आणि त्यावर घडलेले महाभारत तुम्ही जाणताच. कशाला हवी गोपनीयता? काय साध्य होणारे त्यातून? बाकी, जबाबदारीतून मोकळे झाल्यामुळे तुम्ही परत आम्हा कंटकाच्या कंपूत परत आलात ह्याचा 'आणंद' झाला गेल्या आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 12/03/2015 - 20:42

In reply to कसले डब्बल बॅरल 'गे' शिर्षक by परिकथेतील राजकुमार

Permalink

च्यायला....

सालं मी सरळ लिहिलं तरी तुम्हाला ते पालथंच दिसतं. ;) 'क ख आणि ग' च्या दालनाची चर्चा इथे करु नका असं सांगितलं आहे. आपले पुरुषांचे काही प्रॉब्लेम्स सॉरी काही अडचणी आहेत का आणि तसं झालं तर पुरुषांचा फायदा होईल का अशा शुद्ध हेतुने ही चर्चा. सरळ लिहा. कोयी पडदा नही चाहिये. जे लिहु ते मुख्य बोर्डावर दॅट्स ऑल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 12/03/2015 - 20:50

In reply to च्यायला.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

सालं मी सरळ लिहिलं तरी

सालं मी सरळ लिहिलं तरी तुम्हाला ते पालथंच दिसतं. ;)
आम्ही पालथे धंदे करण्यातच एक्सपर्ट आहोत हे तुम्ही जाणताच.
'क ख आणि ग' च्या दालनाची चर्चा इथे करु नका असं सांगितलं आहे. आपले पुरुषांचे काही प्रॉब्लेम्स सॉरी काही अडचणी आहेत का आणि तसं झालं तर पुरुषांचा फायदा होईल का अशा शुद्ध हेतुने ही चर्चा.
पुरुषांना अडचण येत नाही (ह्या विधानाचा वैज्ञानीक अर्थ काढू नये). मात्र पुरुषांमुळे स्त्रीयांना घरापासून रस्त्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अशी त्यांची तक्रार असते. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुन्हा अजून वेगळा कोनाडा कशाला असा आमचा आक्षेप आहे. ;)
सरळ लिहा. कोयी पडदा नही चाहिये. जे लिहु ते मुख्य बोर्डावर दॅट्स ऑल.
वोच बोलता हय! लिहा ते खुलेआम. कोनाड्यात व्हिंदमाता पण नको आन पुरुष पण.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 12/03/2015 - 21:39

Permalink

पण तसाही मिसळपाव हाच्च

एक कोनाडा नाही का? आताही जे वाटेल ते लिहिले जातेच की. ;) हां, पुरुषांनाही खास त्यांच्याच अशा अडचणी नक्कीच असू शकतात आणि त्याबद्दल फक्त इतर पुरुषांशीच व्यक्त व्हावे असे वाटू शकते त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावरती वेगळा पुरुष विभाग करुन बघायचा असला तर काहीच हरकत नाही. पण मग आयडीमागची व्यक्ती पुरुष आहे हे खातरजमा करुनच प्रवेश द्यायला हवा अन्यथा त्या विभागाला काहीच अर्थ नाही. असा विभाग काढल्यावर त्यात येणारे लिखाण्/प्रतिसाद यांचे मॉडरेशन करायचे का? आणि असल्यास कोण बघणार? तिथल्या सदस्यांमधले दंगे कोण सोडवणार? याचा विचार करुन ठेवायला हवा. केवळ चावट गप्पा, फाजील जोक्स, निव्वळ वैषयिक लिखाण, वैयक्तिक हल्ले अशांकडेच हे जायला लागले तर काय करायचे ह्याचाही विचार करुन ठेवायला हवा. नाहीतर 'पिवळा कोनाडा' व्हायचा! ;) मजा मारायला सगळे पुढे आणि जबाबदारीच्या वेळी हळूच काढता पाय घेणारे बहुतांश हे मुख्य बोर्डावरती संपादक असताना अनेकदा अनुभवले आहे आणि त्यावेळी जे जबाबदारी घेतात त्यांचे हाल कुत्रा खात नाही आणि नावाला सगळेच संपादक असतात ..त्यामुळे सूचना..... बाकी कोनाड्याला शुभेच्छा! :) (खुद के साथ बातां - रंगा, नाव काय ठेवावं रे या कोनाड्याचं? 'अंदरकी बात!' चालेल का? ;) ) (कोनाडाप्रेमी)रंगनाड
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 12/03/2015 - 21:59

In reply to पण तसाही मिसळपाव हाच्च by चतुरंग

Permalink

भयानक सहमत

हां, पुरुषांनाही खास त्यांच्याच अशा अडचणी नक्कीच असू शकतात आणि त्याबद्दल फक्त इतर पुरुषांशीच व्यक्त व्हावे असे वाटू शकते
दोन वर्षापूर्वी आमच्या विजुभौंनी वाईट स्वप्नांवरती काही 'व्यक्त होणारे' लिखाण केले होते. मी तिथे 'विजुभौंना स्वप्नदोषाचा प्रॉब्लेम कधी झाला?' असे काळजीने विचारले तर कोणितरी प्रतिसादच उडवला. असा कोनाडा निघाल्यास अशा प्रतिसादांना गंभिरतेने घेऊन त्यावर नीट चर्चा व्हायला हवी.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 12/03/2015 - 22:30

In reply to भयानक सहमत by परिकथेतील राजकुमार

Permalink

मग काय तर

असा उडवतात का प्रतिसाद एकदम? चर्चा तरी बघायची नीट...स्वप्नदोष हा दोष असे 'स्वप्ना'चा... (स्वप्नाळू)रंगा
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 12/03/2015 - 23:43

In reply to भयानक सहमत by परिकथेतील राजकुमार

Permalink

+११११११११११११

हाच तो बिनडोक सोवळेपणा नसलेला विभाग असला तर हवा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 12/04/2015 - 10:08

In reply to भयानक सहमत by परिकथेतील राजकुमार

Permalink

मिपा वर आजवर कट्टे व्हायचे.

मिपा वर आजवर कट्टे व्हायचे. पण मला वाटते बहुतेक या नंतर "कोनाडे" होणार. मिपा इतके कानकोंडे कधीपासून झाले? हरीकथेतील राजकुमार हरी हरी म्हणतात तेंव्हा त्याना हरी हवा असतो अशी कोणीतरी शंका घेतली होती म्हणे. असो. काल पाहिले मी स्वप्न नवे दोशासोबत भाजी होती साम्बारासवे.....
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on गुरुवार, 12/03/2015 - 21:56

Permalink

काही शंका मनात आल्या केवळ

काही शंका मनात आल्या केवळ पुरुषांचा कोनाडा किंवा परमिट रूम असेल तर अश्लीलता ;लैंगिकता चावटपणाव चाहतळपण वाह्यातपणाचे नियम थोडे सैल असतील का: पुरुषांच्या काय आप्पा ग्रुप मध्ये ह्याचा अनुभव नेहमी येतो त्याचे वावगे वाटत नाही आपण सुजाण सुसंस्कृत माणसे आहोत क्षणिक भंकस टवालकी करण्यास काहीच हरकत नाही: अजून प्रतिसादांच्या मध्ये एकही स्त्री सदस्येचा प्रतिसाद का नाही आला; निवडणुकीत मतदार त्यांचा कल राज्यकर्त्यांना संदेश मतपेटीतून व्यक्त करतो तसे येथे प्रतिसाद न देऊन ::: असो परमिट रूम का सिगर क्लब जे म्हणाल ते ते झाले तर त्याचा मिपाला फायदा होणार आहे का त्या निमित्ताने काही चांगले भविष्यातील मिपाकर व मूकवाचक मिळणार आहेत का असे प्रश्नही मनात आले वेगळा कोनाडा झाला तर त्यात आपला सक्रीय सकारात्मक सहभाग असेल नाही झाला तर तो झाला पाहिजे असा काही विशेष आग्रह नाही आणि त्यासाठी पडद्यामागून खलबते चर्चा मोहीम चालवणे आपल्या प्रकृतीला झेपत नाही: आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे:
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on गुरुवार, 12/03/2015 - 22:42

Permalink

वेगळे दालन हवे

त्यात इतरांना बंदी असे नको फक्त वॉर्णिंग की हे पुरुषांना त्यांच्या समस्या मांडायचे दालन आहे आणि फक्त सभासदांनाच प्रवेश हवा.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 12/03/2015 - 23:17

Permalink

प्राडॉ, आता इथे विरोध करणार्

प्राडॉ, आता इथे विरोध करणार्‍यांच्या नावांची नोंद करून ठेवा. खरोखरच कोनाडा बनला तर सभासदत्वाचा निर्णय करताना उपयोगी पडेल ;) :)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 12/03/2015 - 23:22

In reply to प्राडॉ, आता इथे विरोध करणार् by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

ते खुद्दच पहिले उभे आहेत

ते खुद्दच पहिले उभे आहेत लिस्टमधे. लेखाची सुरुवातच पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Fri, 12/04/2015 - 00:37

Permalink

अनुमोदन!

हा धागा मौजमजा सदरात मोडत नसल्यास वेगळ्या विभागास अनुमोदन! - टिंग्या
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Fri, 12/04/2015 - 01:05

Permalink

चालेल... आमच्या परीने

चालेल... आमच्या परीने यथायोग्य योगदान दीले जाईल....खुप किस्से आठवणी गप्पा आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 12/04/2015 - 10:20

Permalink

हा धागा मौजमजा सदरात मोडत

हा धागा मौजमजा सदरात मोडत नसल्यास... वेगळ्या विभागाची गरज काय? नुसत्या द्व्यर्थी चकाट्या होणार असतील तर काहीच उपयोग होणार नाही. समुपदेशन,सल्ले वगैरे साठी वेगळे दालन असायला हरकत नाही पण तेथे केवळ पुरूषांसाठी वेगळे दालन हे मात्र चुकीचे वाटतय. स्त्रीयांचे काही प्रश्न हे पुरुषांनाही तितकेच त्रासदायक ठरत असतात. उदा: मेनॉपॉज मधे स्त्रीयांचे अचानक बदलते मूड्स, चिचिडेपणा हा संपूर्ण घराचे वातावरण बिघडवत असतो. वास्तावीक त्या चाळीशी उलटलेल्या नवरोबाला सुद्धा इतके दिवस समजूतदार असणारी बायको अचानक असा बोलभांडपणा का करायला लागली हे कळत नसते. त्याला त्याच्या शारीरीक व्यावसायीक समस्या असतात. किमान त्या कोणी सम्मजून घ्याव्या ही त्याची गरज असते. असा परिस्थीत पुरुषांसाठी वेगळे दालन काढून काय होणार? सगळे एकतर्फी बोलणेच होणार. पुरुषांच्या समस्या काय असतात या बाबतीत स्त्रीवर्ग अनभीज्ञच रहाणार. त्याचा त्याना काय त्रास होतो याबाबत पुरुषवर्ग अनभीज्ञ रहाणार.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 12/04/2015 - 10:26

In reply to हा धागा मौजमजा सदरात मोडत by विजुभाऊ

Permalink

पुरुषांच्या समस्या काय असतात

पुरुषांच्या समस्या काय असतात या बाबतीत स्त्रीवर्ग अनभीज्ञच रहाणार. त्याचा त्याना काय त्रास होतो याबाबत पुरुषवर्ग अनभीज्ञ रहाणार.
अगदी सहमत! पण मग अश्या (सगळ्याच)चर्चा खुल्या वातावरणात घडू शकतात का? आपल्या इथे ते शक्य आहे का? जरी झाल्या तरी त्यात सर्व जण मोकळे पणानि सहभागी होऊ शकतात का? याबाबतचा इतिहास काय आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 12/04/2015 - 10:34

In reply to हा धागा मौजमजा सदरात मोडत by विजुभाऊ

Permalink

विजुभाऊ,

विजुभाऊ, पुरुष आपल्या भावनिक आणि लैंगिक बाबी चार चौघात चर्चा करायला संकोचतात. या उलट एखाद्या स्त्रीचा असा प्रश्न नवर्यापेक्षा तिच्या मैत्रीणीना व्यवस्थित माहिती असतो.( त्यातून भावनिक निचरा सोडून फारसे काही निष्पन्न होत नाही हा भाग विरळा). किती पुरुष आपला लैंगिक किंवा भावनिक प्रश्नाबद्दल आपल्या जवळच्या मित्राबरोबर चर्चा करू शकतात? अगदी चखणा आणि दारू घेऊन बसणारे मित्र सुद्धा दोन पेग घेऊन "हलके" वाटल्यावरहि असे प्रश्न सहज चर्चा करायला संकोचतात. हा पुरुष स्वभाव आहे यासाठी वेगळे दालन असेल तर एका पुरुषाने प्रश्न विचारला तर दुसर्याला तसाच किंवा वेगळा प्रश्न विचारायला धीर येउ शकतो. एकदा धीर चेपला कि त्यावर जास्त मोकळेपणाने ते चर्चा करू शकतात. प्रत्येक वेळेस त्यातून मार्ग निघेलच असे नाही पण निदान आपल्यासारखे प्रश न केवळ आपल्यालाच आहेत असे नाही हा विचार सुद्धा मनाला धीर देऊन जातो. मी एक पैज लावतो-- लैंगिक/ भावनिक प्रश्नानची उत्तरे मासिकात येतात. उदा डॉ. महिन्दर वत्स किंवा राजन भोसले यांचे रकाने. मिपा वरील किमान ८० ते ९० % लोक चवीने किंवा कुतूहलाने वाचतात. खोटे असेल तर सांगा. यास्तव पुरुषांना सुद्धा मोकळे होण्यासाठी एक व्यासपीठ असावे असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 12/04/2015 - 10:42

In reply to विजुभाऊ, by सुबोध खरे

Permalink

हा पुरुष स्वभाव आहे यासाठी

हा पुरुष स्वभाव आहे यासाठी वेगळे दालन असेल तर एका पुरुषाने प्रश्न विचारला तर दुसर्याला तसाच किंवा वेगळा प्रश्न विचारायला धीर येउ शकतो. एकदा धीर चेपला कि त्यावर जास्त मोकळेपणाने ते चर्चा करू शकतात. प्रत्येक वेळेस त्यातून मार्ग निघेलच असे नाही पण निदान आपल्यासारखे प्रश न केवळ आपल्यालाच आहेत असे नाही हा विचार सुद्धा मनाला धीर देऊन जातो.
+++++१११११ अगदी हेच !
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on Fri, 12/04/2015 - 11:55

Permalink

बायकांचा बहिष्कार

ह्या चर्चेवर मिपावरील समस्त स्त्रीयांनी ठरवून बहिष्कार घातलेला दिसतोय. असो. मुळात मिसळपाव हाच एक कट्टा असताना पुरुषांच्या वेगळ्या विभागाची गरज काय ह्या चर्चेतून पुढे, असं असेल तर मग वेगळ्या अनाहिता विभागाची गरज काय? असा प्रश्न उद्भवू शकण्याच्या शक्यतेमुळे कदाचित स्त्रीया इथून लांब राहिल्या असतील. असो. आम्हाला गरज वाटते. विभाग सुरु करायचा की नाही हा सर्वस्वी मालकांचा निर्णय आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 12/04/2015 - 12:00

In reply to बायकांचा बहिष्कार by आदिजोशी

Permalink

ह्या चर्चेवर मिपावरील समस्त

ह्या चर्चेवर मिपावरील समस्त स्त्रीयांनी ठरवून बहिष्कार घातलेला दिसतोय.
असेनाका. बाकी स्त्रियांनी भाग न घेतलेले धागे = वाह्यात, पाचकळ असे समीकरण तयार करण्यात त्याच पुढे असतात हेवेसांनल.
मुळात मिसळपाव हाच एक कट्टा असताना पुरुषांच्या वेगळ्या विभागाची गरज काय ह्या चर्चेतून पुढे, असं असेल तर मग वेगळ्या अनाहिता विभागाची गरज काय? असा प्रश्न उद्भवू शकण्याच्या शक्यतेमुळे कदाचित स्त्रीया इथून लांब राहिल्या असतील.
चुकलात ओ तुम्ही. स्त्रियांना तेवढा संकोच वाटतो म्हणून त्यांना कोनाडा पाहिजे, पुरुष मात्र फक्त आणि फक्त चावटपणा करतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 12/04/2015 - 12:04

In reply to बायकांचा बहिष्कार by आदिजोशी

Permalink

फ़ॉल

आपलं ठरलंय ना अन्य कोणत्याही दालनाची चर्चा इथे नाही करायची.:) मी जरा पुढे जाऊन म्हणतो आपल्याला सर्वच विषय मुख्य बोर्डावर लिहिता आले तर कशाला हवा कोनाडा ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 12/04/2015 - 12:10

In reply to फ़ॉल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

मी जरा पुढे जाऊन म्हणतो

मी जरा पुढे जाऊन म्हणतो आपल्याला सर्वच विषय मुख्य बोर्डावर लिहिता आले तर कशाला हवा कोनाडा ?
जर मिश्या असत्या तर कशाला म्हणू आत्याबाई? :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 12/04/2015 - 12:23

In reply to फ़ॉल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

म्हणजे सध्या लिहिता येत नाहीत

म्हणजे सध्या लिहिता येत नाहीत. कोण आणि कसे अडवतय ज़रा सांगा की.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 12/04/2015 - 12:45

In reply to म्हणजे सध्या लिहिता येत नाहीत by अभ्या..

Permalink

अडवत कोणी नाही

काही विषय मांडायला पुरुष संकोच करतात कोणी अडवत बीडवत नै. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 12/04/2015 - 13:10

In reply to अडवत कोणी नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

काही विषय मांडायला पुरुष

काही विषय मांडायला पुरुष संकोच करतात कोणी अडवत बीडवत नै
अडवत नाही कोणी, पण अश्या एखाद्या विषयावर धागाच काय तर साधा प्रतिसाद जरी लिहिला तर 'ते' फील्डिंग लावतात हे मात्र निश्चित ! मागे एकदा फक्त "जेव्हा स्त्री आणि पुरुष समानता खर्‍या अर्थाने अस्तित्वात येईल तेव्हा आपण सर्व्वांनाच 'माणुस' ही इतकीच आयडेंटीटी पुरेशी ठरेल " ह्या अर्थाचे विधान केले होते तर केवढा गहजब माजला होता ! एक प्रतिसाद दिल्याचे हे फळ तर धागा काढल्याचे काय फळ ? !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 12/04/2015 - 12:38

In reply to फ़ॉल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

आपला हाच वेगळा कोनाडा आहे असं समजुन चर्चा चालु ठेवा.

मला आज नुसती चर्चा वाचुन मस्त मोकळ मोकळ वाटलं. कुठल्या ब्रेकर शिवाय चर्चा इंजॉय करत आहे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by pacificready on Fri, 12/04/2015 - 13:23

Permalink

एक निरिक्षण-

एक निरिक्षण- ती मिसळ आणि तो पाव. पाव उसळ, वडा, चिकन, खिमा, चहा, लोणी इ बरोबर आपली मैत्री टिकवून आहे. पाव सर्वसमावेशक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Fri, 12/04/2015 - 14:01

Permalink

जिथे कातरी लागणार नाही असे

जिथे कातरी लागणार नाही असे सर्वांसाठी दालन असावे , फक्त पुरुषांसाठी कोनाडा नको. कारण १ कोनाड्यात प्रकाश नसतो, बऱ्याचदा जे आपल्याला स्पष्ट दिसते असे वाटते ते सर्व बाजूने प्रकाश पडल्यावर वेगळे असते. 2 बरेच /काही जण असे असतील की ज्यांना कोनाड्यातील (कदाचित) काही विषय वगळता इतर विषयात भाग घ्यायची इच्छा असेल. दालन सर्वांसाठी खुले असल्याने ही मुभा राहील. (विषय-topic, no pun intended.) 3 माझ्यासारखे काही आयडी असतील ज्याना पुरुष वा स्त्री अशा कुठल्याही वर्तुळात जायचे नसेल, किंवा कट्ट्याला उपस्थित राहून व्यक्तिगत ओळख नको असेल, त्याना कोनाड्यात no entry असेल , मग आली का पंचाइत?;) ( बिचारा टका मला ग/रे अशी दोन्ही संबोधने वापरतो:))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 12/04/2015 - 14:14

In reply to जिथे कातरी लागणार नाही असे by दमामि

Permalink

कोनाडा असला म्हणजे मेन

कोनाडा असला म्हणजे मेन बोर्डावर कुणी येणार नाही असं आहे का? अनाहिता नामक कोनाड्यामुळे मेन बोर्डावर स्त्रियांचे धागे येणं थांबलं आहे का?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com