आज मी खूपच लवकर ऑफिसात आलो होतो. एक महत्वाचा रिपोर्ट कंपनीतर्फे सरकारला पाठवायचा होता. बर्याच वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधल्या लोकांनी त्यातील वेगवेगळे भाग लिहिलेले होते. त्यामुळे तो सर्व रिपोर्ट अथपासून इतिपर्यंत वाचून त्याच्या सुसूत्रतेची खात्री करणं आवश्यक होतं. त्यासाठी माझं पूर्ण लक्ष तिथे असणं जरूरीचं होतं. नेहमीच्या फोन, इ-मेल्स आणि मिटिंगांच्या दंग्यात ते साध्य झालं नसतं. म्हणूनच आज जरा लवकर येऊन हे काम उरकायचं असं मी ठरवलं होतं.
ऑफिसात आलो, इ-मेल बघून कुठल्या तातडीच्या तर नाहियेत ना याची खात्री करून घेतली. मेल मेसेंजर बंद केला, झक्कास एक मग् भरुन चहा करुन घेतला. ऑफिसात इतक्या लवकर अजून कोणीच आलेलं नव्हतं. सेक्रेटरीच्या टेबलावर एक नोट लिहुन ठेवली, "अतिशय महत्वाचं काम असल्याखेरीज मला डिस्टर्ब करू नकोस!" मी काय करतोय ते तिला माहीती असणारच. तिनेच काल तो रिपोर्ट माझ्या टेबलावर आणून ठेवला होता...
केबिनचा दरवाजा बंद करून माझ्या खुर्चीवर येऊन बसलो. गरम चहाचा पहिला घोट घेतला आणि तो रिपोर्ट उघडला....
तीन्-चार तास होऊन गेलेले असतील. अचानक माझ्या टेबलावर वाजणार्या टेलिफोनच्या रिंगने मी भानावर आलो. बघतो तर माझ्याच सेक्रेटरीचा, जेनचा फोन.....
"अगं, मी तुला काही महत्त्वाचं कारण असल्याखेरीज मला फोन करू नको म्हणून मेसेज ठेवला होता ना?" माझ्या स्वरातील त्रासिकपणा तिला जाणवला असावा....
"येस सर, आय नो सर! बट देअर इज अ लेडी ऑन लाईन सेईंग शी हॅज टू टॉक टू यू नाऊ!!"
"समबडी फ्रॉम द गव्हर्नमेंट?"
"नो सर!" आणि मग ती आवाज घरगुती करत म्हणाली, "आय थिंक यू बेटर टेक इट सर!"
तिच्या तारतम्यावर माझा खूप विश्वास असल्याने मी अधिक ताणून धरलं नाही....
"ओके, कनेक्ट द कॉल!" कॉल कनेक्ट झाल्याचा बीप ऐकु आला...
"हॅलो", मी
'हाय बडी! हाउ आर यू डुइंग? आय फाऊंड यू आउट, डिडंन्ट आय?" स्त्रीचा आवाज, उच्चार अगदी अमेरिकन!!
"हॅलो, हू इज धिस?" अगोदरच वैतागलेला असल्याने माझा आवाज किंचित चढला असावा.....
"डॅम्न यू! डोन्च यू रेकगनाईझ॑ युवर फ्रेंन्डस एनीमोअर, फप्पड?" आवाजात रागाचं आणि उर्मटपणाचं मिश्रण! जणू त्या स्त्रीला आपला आवाज जगात कुणी ओळखला नाही तर तो व्यक्तिगत अपमान वाटत असावा!
आणि त्यामुळेच माझ्या डोक्यात लख्ख उजेड पडला......
"अलीशिया!!!!!" पलीकडून खळखळून हसण्याचा आवाज! ते हास्य माझ्या परिचयाचं होतं. "अलीशियाच, ही!" माझं स्वगत...
"विसरला नाहीस ना मला?"
"नाही, तुला विसरणं कसं शक्य आहे? पण तुला माझा नंबर कुठून मिळाला इतक्या वर्षांनंतर?"
"मी फिलला कॉन्टॅक्ट केलं होतं" फिल हा आमचा दोस्त! लोकांचे पत्ते-फोन नंबर जमवायचं जवळ जवळ व्यसन असलेला!! माझं आश्चर्य आता संपलं होतं...
"पण आता तू कुठून बोलतेयस? तू टेनेसीत रहातेस ना?" ती ईस्ट कोस्टवर टेनेसीमध्ये कुठेतरी सेटल झाल्याचं मी कुणाकडूनतरी ऐकलं होतं....
"पीपल लाइक मी नेव्हर सेटल!!" पुन्हा तेच खळखळून हसणं, "आत्ता मी सान फ्रान्सिस्कोमधे आहे. व्हॉट अ डॅम्न सिटी!!! देअर इज आयदर अ रेन ऑर अ फॉग!!! क्लाऊडी ऑल द टाईम!!!"
आता मलाही हसू आलं. सान फ्रान्सिस्को आहेच तसं! त्यातून टेनेसीच्या स्वच्छ सूर्यप्रकाशातून आल्यावर तिला ते जास्तच जाणवत असणार!!
"सो, व्हाय डू आय गेट द ऑनर ऑफ रिसिव्हिंग युवर कॉल?" मी विचारलं
"बिकॉज यू नेव्हर कॉल मी! फोनचं बिल भरण्याइतके पैसे मिळतात ना तुला?" पुन्हा एकदा अधिकारवाणीने फायरिंग....
"हो, बिल भरतो कसबसं!" मी शरणागती पत्करली.
"एनीवे, आय नीड टू टॉक टू यू!"
"राईट नाऊ वूई आऽऽर टॉकिंग, ऑन द फोन, अलीशिया!"
"नो, नॉट लाइक धिस! समथिंग इंपॉर्टंट!! आय नीड टू सी यू इन पर्सन!! कम ओव्हर हियर धिस आफ्टरनून! ऍन्ड येस, हॅव द डिनर वुईथ मी!"
"मी सान फ्रान्सिस्को मध्ये नाहिये मॅडम! मी एलए मध्ये आहे. अगदी इतक्या जवळ नाहिये ते की उठलो आणि आलो लगेच!! किमान सहा तास तरी लागतील ड्राईव्ह करायला..."
"आय नो! मला अमेरिकेचा भूगोल शिकण्याची, तोही तुझ्याकडून, मुळीच गरज नाहीये! आय विल मेक द अरेंजमेंटस!! माय असिस्टंट विल कॉल युवर सेक्रेटरी इन हाफ ऍन अवर!!!"
"पण मी आज खुप बिझी आहे, मला हा महत्वाचा रिपोर्ट रिव्ह्यू करायचाय गव्हर्मेंटला पाठवण्यासाठी..." मी माझी अडचण मांडण्याचा प्रयत्न केला. तिच्या दॄष्टीने ती अडचण नव्हतीच!!
"तो रिपोर्ट तुझ्या बरोबर घे आणि प्रवासात वाच!!!"
क्लिक....
फोन बंद झाला.....
तिची ही नेहमीचीच सवय....
तिच्या दॄष्टीने जर संभाषण संपलं असेल तर "बाय" वगैरेचे उपचार न बाळगता फोन ठेवून देणार. जर समोरासमोरचं संभाषण असेल तर सरळ तुमच्याकडे पाठ करुन चालायला लागणार...
मी एक सुस्कारा सोडला. आता यातून सुटका होणं शक्यच नव्हतं. रिपोर्ट बराचसा वाचून संपला होता. फक्त शेवटची ७-८ पानं आणि ऍपेंडिक्सच वाचायचे होते.....
रिपोर्ट बंद करुन माझ्या बॅगमध्ये टाकला. बॉसला आणि माझ्या असिस्टंटसना मी उरलेला दिवस "ऑफ साईट" असल्याची इ-मेल केली. काही तसेच महत्वाचे काम असल्यास मला सेलफोनवर कॉन्टॅक्ट करायची विनंती केली. बायकोला फोन करून मला महत्त्वाच्या कामानिमित्त सान फ्रान्सिस्कोला अचानक जावं लागतंय, तुझ्या लंच टाईममध्ये कॉल करून सविस्तर बोलेन असा मेसेज ठेवला...
इतकं सगळं होईपर्यंत सेक्रेटरीने दारावर नॉक केलंच.....
"युवर ट्रॅव्हल प्लान सर!" तिने मला एक पानाचा प्रिंट-आऊट दिला...
"ड्राईव्ह टू सांता बार्बारा एअरपोर्ट. गो टू द युनायटेड एअरलाईन्स काउंटर्स! देअर विल बी अ पर्सन वेटींग फॉर यू", इतकीच माहिती....
त्याच्याखाली माझ्या सेक्रेटरीने एअरपोर्टला कसं जायचं त्याच्या मॅपक्वेस्टवरून काढलेल्या ड्रायव्हिंग डायरेक्शन्स!!!
तो एका ओळीचा ट्राव्हलिंग प्लान पाहून मी कपाळाला हात लावला. जेनच्या चेहर्यावर हसू उमटलं....
"अ व्हेरी ओल्ड ऍन्ड व्हेरी क्लोझ फ्रेंन्ड, आय सपोझ...." ती विलक्षण मिश्किलपणे म्हणाली....
"व्हाय? व्हाय डू यू से सो?"
"व्हेन शी कॉल्ड ऍन्ड टोल्ड हर नेम, आय इन्फॉर्म्ड हर दॅट यू आर बिझी टुडे ऍन्ड नॉट टू बी डिस्टर्ब्ड! आय ऑफर्ड टू टेक हर मेसेज बट शी रिफ्यूझ्ड!!! ऍन्ड शी सेड......."
"व्हॉट?"
"शी सेड इन अ व्हेरी कमांडिंग व्हॉईस, "आय आएम द वन हू टॉट युवर बॉस व्हॉट टु कॉल मेल ऍन्ड फिमेल जेनिट्ल्स हियर इन अमेरिका!! ही वॉज जस्ट अ बॉय देन!! सो डोन्ट टेल मी दॅट हि इज बिझी, रिंग हिम अप!!!"
मलाही हसू फुटलं. खरीच गोष्ट होती ती.....
"दॅट इज अलीशिया, ऑल राईट!!" मी मान्य केलं.....
"ऍन्ड अबाऊट द जेनिटल्स, आय विल टेल यू दॅट स्टोरी व्हेन आय ऍम बॅक टुमॉरो. टिल देन, डोन्ट ड्रॉ एनी कन्क्लूजन्स युवरसेल्फ!!!" मी जेनला बजावलं...
"आय ऍम लुकिंग फॉरवर्ड टू इट!!!" ती खट्याळपणे उद्गारली....
तिने दिलेला तो कागद हातात धरून मी सांता बार्बारा एअरपोर्टच्या दिशेने ड्राईव्ह करायला सुरवात केली.....
(क्रमशः)
प्रतिक्रिया
26 Dec 2008 - 2:58 am | रेवती
क्रमश:च असणार.
आता पुढचा भाग कधी?
हा भाग उत्कंठावर्धक झालाय.
रेवती
27 Dec 2008 - 9:10 am | टारझन
वाह ! टिपीकल डांबिस शैली !! लै लै झकास ... दोन दिवसात टाकला तरी चालल फुडला भाग ... :)
- टार्या
26 Dec 2008 - 3:33 am | चतुरंग
पुढच्या भागाची वाट बघतोय.
चतुरंग
26 Dec 2008 - 3:43 am | प्राजु
डांबिसपणा केलाच पाहिजे का हो काका?? आलं पुन्हा हे क्रमश:
सह्ही!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Dec 2008 - 4:15 am | घाटावरचे भट
उपाहारानंतर शतक होईलच. चिंता नसावी. ;)
पिडांकाका बॅक इन ऍक्शन. लैच भारी.
26 Dec 2008 - 7:25 am | सहज
पहिल भाग सहीच. डांबीसकाका झिंदाबाद.
व्हेरी ओल्ड ऍन्ड व्हेरी क्लोझ ..... डोन्ट ड्रॉ एनी कन्क्लूजन्स :-) आय गेस ईटस सेफ टु सपोज जेनी गॉट रेज दिस इयर... अगेन....
पिडांकाका बॅक इन ऍक्शन. लैच भारी.
27 Dec 2008 - 5:18 pm | सरपंच
पहिल भाग सहीच. डांबीसकाका झिंदाबाद.
हेच म्हणतो रे डांबिसा..! :)
28 Dec 2008 - 10:04 am | सखाराम_गटणे™
सरपंचांना प्रतिक्रिया देताना पहील्यांदा पाहतो आहे.
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
26 Dec 2008 - 7:36 am | शितल
वा वा,
पिडाकाकांनी अखेर वेळ काढलाच, क्रमशः लिहायला किबोर्ड जवळ केलाच,आणी आमचा नाताळाच्या सुट्टीच्या आनंदात अजुन भर टाकली. :)
काका,
अलीशियाची झलक आवडली. :)
काकांच्या लिखाणाची पंखा असलेली
शितल
26 Dec 2008 - 9:29 am | अवलिया
उत्तम
पुढचा भाग कधी?
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
26 Dec 2008 - 12:16 pm | विनायक प्रभू
असेच्य म्हन्तो
26 Dec 2008 - 9:30 am | सुचेल तसं
सुरुवात लै भारी!!
पुढचा भाग येऊ द्या लवकर!!!!
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
26 Dec 2008 - 9:47 am | वेताळ
वरील सर्वांशी सहमत. पुढील भागाची वाट पहत आहे.
वेताळ
26 Dec 2008 - 9:56 am | नंदन
सुरूवात झकास झालीय, काका. वातावरणनिर्मिती, लेखनाचा फ्लो नेहमीप्रमाणेच उत्तम जमला आहे. लुकिंग फॉरवर्ड टू पुढचे भाग :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
26 Dec 2008 - 10:09 am | यशोधरा
मस्त!
26 Dec 2008 - 10:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी पण काही निष्कर्ष काढत नाही, पण काका पुढचा भाग लवकर टाका. नेहमीप्रमाणेच मस्त लिहिलं आहेत.
26 Dec 2008 - 10:38 am | दिपक
पुढचा भाग... पुढचा भाग ?
एव्हढच म्हणेन :)
26 Dec 2008 - 10:44 am | राघव
वाहवा! मस्त जमलाय भाग!!
पुढचा भाग लवकर टाका. निष्कर्षाबद्दल अदितीशी सहमत!! :D
मुमुक्षु
26 Dec 2008 - 12:12 pm | परिकथेतील राजकुमार
आधी मला वाटले की हा ह्या अलिशीया वरचा लेख आहे, त्यामुळे एका वेगळ्या मनस्थीती मध्ये लेख उघडला होता पण तुम्ही काहि वेगळेच विश्व समोर उभे केलेत. वेगवान आणी उत्तम कथा. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
आपला
प्रतिक्षीत !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
26 Dec 2008 - 12:18 pm | अवलिया
होते असे कधी कधी
आपण एकादशी म्हणुन उपास करतो.. रामाचे दर्शन घेवुन आल्याशिवाय पाणी पित नाहि... नंतर कधी तरी कळते राम तर मांसाहार पण करत असे... मग काय ... अग्गो बया.
तसेच आपले पिंडा काका... मागे १२ नंबरी कथा सांगितली होती त्यांनी.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
26 Dec 2008 - 1:16 pm | मन्जिरि
काय मध्येच सोडुन देता? आता पुढ्च्य्या आट दिवसात वेळ मिळ्णार नाहि
26 Dec 2008 - 1:17 pm | मदनबाण
हम वाचरेला हय्..जल्द लिख्खो.. :)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
26 Dec 2008 - 1:21 pm | आकाशी नीळा
पूढचा भाग लवकर येउदेत !!
27 Dec 2008 - 2:59 am | नि३
वाचतोय
अवांतर : लेखन थांबले होते आता सुरु झाले.
---नि३.
27 Dec 2008 - 5:01 pm | मॅन्ड्रेक
अप्रतिम- असेच लिहित रहा .
27 Dec 2008 - 5:42 pm | झकासराव
वा!!!!
काय जमलाय हा भाग. :)
पण क्रमश : :W
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
28 Dec 2008 - 12:57 am | धनंजय
लिहिता झालात ना... हे चांगले. क्रमशः आम्ही काही काळ खपवून घेऊ.
28 Dec 2008 - 12:03 pm | संजय अभ्यंकर
उत्तम!
पुस्तक कधी काढताय?
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
28 Dec 2008 - 2:35 pm | बिपिन कार्यकर्ते
झाले हो दोन दिवस!!!! पुढे काय?
बिपिन कार्यकर्ते
28 Dec 2008 - 3:50 pm | नीधप
अतिशय वाईट...
तो शेवटचा शब्द हो... क्रमशः असा!!
कितीवेळ उत्कंठा ताणणार?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home