गोल्डफ्लेक्स

घाटावरचे भट's picture
घाटावरचे भट in जे न देखे रवी...
24 Dec 2008 - 1:14 am

प्रेरणा: सुवर्णमयी यांची कॉर्नफ्लेक्स ही कविता.

गोल्डफ्लेक्स

पाकिटातून नुकत्याच बाहेर आलेल्या
गोल्ड्फ्लेक्स कधीही असतात ताज्या
निकोटिनने भरलेल्या उत्साहाच्या

चार झुरक्यांनंतर स्वतःच्याच राखेत बुडून
शेवटी केवळ फिल्टर उरलेले
असतात.... थंडगार

फुक्यांच्या चेहेर्‍यावर हसू उमलतं
त्यांना पाहून.

मिंटने धुराचा वास झटकून
पाकिटात बंद होतात उरलेल्या गोल्डफ्लेक्स
पुन्हा पुढच्या सुट्ट्यासाठी...

- घाटावरचे भट

कविताविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

24 Dec 2008 - 1:21 am | पिवळा डांबिस

मस्त आहे...
आवडलं....
(स्वगतः उगाच मला "रिकामा **, भिंतींना तुमड्या लावी" हे का बरं आठवतंय? ह. घे)

विसोबा खेचर's picture

24 Dec 2008 - 1:25 am | विसोबा खेचर

शेवटी केवळ फिल्टर उरलेले
असतात.... थंडगार

वा! क्या बात है..! :)

आपला,
(विल्सप्रेमी) तात्या.

विकि's picture

25 Dec 2008 - 12:19 am | विकि

सॉलेड कवीता. वाचून मजा आली.
मी आधी मोठा गोल्डफ्लेक प्यायचो.नंतर छोटा गोल्डफ्लेक चालू केली. वैधांनी(डॉक्टर)ने सिगारेट सोडून
धायला सांगितल्यावर सध्या गोल्डफ्लेक लाईट(पर्याय शोधला की हो) चालू आहे.
आपला
गोल्डफ्लेक प्रेमी(अस्सल)
विकि.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2008 - 1:27 am | llपुण्याचे पेशवेll

यकनंबर भटोबा. कविता लई आवडली आहे. :P

(गोल्डफ्लेक लाईट्स प्रेमी)
पुण्याचे पेशवे
Since 1984

लिखाळ's picture

24 Dec 2008 - 1:37 am | लिखाळ

:) छान
--(एक विल्स एक कटिंग) लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

चतुरंग's picture

24 Dec 2008 - 1:39 am | चतुरंग

गोल्डफ्लेक्स आवडले! :)

चतुरंग

आजानुकर्ण's picture

24 Dec 2008 - 1:46 am | आजानुकर्ण

पाकिटातून नुकत्याच बाहेर आलेल्या
गोल्ड्फ्लेक्स कधीही असतात ताज्या

एकदा पाकिटातून बाहेर आलेल्या गोल्डफ्लेक्स परत पाकिटात जात नसाव्यात असे वाटते.

आपला
(फाय फाय फाय) आजानुकर्ण

घाटावरचे भट's picture

24 Dec 2008 - 5:37 am | घाटावरचे भट

एकदा पाकिटातून बाहेर आलेल्या गोल्डफ्लेक्स परत पाकिटात जात नसाव्यात असे वाटते.

सहमत. योग्य तो बदल केलेला आहे.
तपशीलातील चूक दाखवून दिल्याबद्दल आभारी आहे.

प्राजु's picture

24 Dec 2008 - 5:27 am | प्राजु

धन्य आहे तुमची भट साहेब..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सूर्य's picture

24 Dec 2008 - 6:52 am | सूर्य

सहीच रे भटा

(मार्लबोरो फुक्या) सूर्य

अनिल हटेला's picture

24 Dec 2008 - 7:43 am | अनिल हटेला

मिंटने धुराचा वास झटकून
पाकिटात बंद होतात उरलेल्या गोल्डफ्लेक्स
पुन्हा पुढच्या सुट्ट्यासाठी...

आवडेच....

(सुवर्णकांडीप्रेमी)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

यशोधरा's picture

24 Dec 2008 - 9:00 am | यशोधरा

आवडले विडंबन.

पांथस्थ's picture

24 Dec 2008 - 9:04 am | पांथस्थ

एक नंबर झाली आहे. ज्यावेळी सिगरेट प्यायचो तेव्हा आमच्या टोळक्याचा गोल्ड्फ्लेक्स हाच ब्रँड होता.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

अवलिया's picture

24 Dec 2008 - 9:34 am | अवलिया

लय म्हणजे लयच भारी

संभाजी ईडी पासुन मरेलबरे पर्यंत काहि पण

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

आनंदयात्री's picture

24 Dec 2008 - 9:44 am | आनंदयात्री

तोडलस मित्रा ... तोडलस !!

लै लै चाबुक विडंबन :)

(रंगाके साथ बाता: हाच बरका तो आपल्या विडंबनांचा दुश्मन ;) )

अब आया भट विडंबन के पीछे! ;)

चतुरंग

वेताळ's picture

24 Dec 2008 - 10:15 am | वेताळ

ओढत नाही पण वाचुन ओढायची हुक्की आली.लई भारी ईडंबन
वेताळ

अमोल केळकर's picture

24 Dec 2008 - 12:45 pm | अमोल केळकर

वा
मस्त मजा आली
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

इनोबा म्हणे's picture

24 Dec 2008 - 11:56 pm | इनोबा म्हणे

मस्त हो भटोबा, झकास विडंबन.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

संदीप चित्रे's picture

24 Dec 2008 - 11:58 pm | संदीप चित्रे

आवडलं विडंबन एकदम... आमच्या 'चैतन्यकांडी'प्रेमी मित्रांना पाठवतो आता हे विडंबन :)

घाटावरचे भट's picture

25 Dec 2008 - 12:59 am | घाटावरचे भट

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. आणि विडंबनासाठी कच्चा माल उपलब्ध करून दिल्याबद्दल सोनालीतैंनाही धन्यवाद (कृ.ह.घेणे).

ब्रिटिश's picture

25 Dec 2008 - 9:45 pm | ब्रिटिश

संबाजी बीडी पासनं माज्या करीयर ची सूरवात केली
मग ब्रीस्टाल , वील्स फुकत फुकत आता मोठी गोल्ड्फ्लेक परयंत पोचलोय
आता येकच लक्श्य, येकच सप्न

सीगार

काळजावर काजळी चडलेला

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

बट्टू's picture

25 Dec 2008 - 10:06 pm | बट्टू

मस्त पण खाली वैधानिक ईशारा हवा होता.