सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
23 Dec 2008 - 10:25 pm | विसोबा खेचर
एक वेगळीच रुपकात्मक कविता!
सोनाली, जियो..!
आपला,
(सोनालीचा मनोगतापासूनचा मित्र) तात्या.
23 Dec 2008 - 10:30 pm | धनंजय
वेगळेच रूपक आवडले
(नावात "ऑटफ्लेक्स" चुकून राहिले आहेत.)
24 Dec 2008 - 12:35 am | घाटावरचे भट
सहमत.
24 Dec 2008 - 1:00 am | मुक्तसुनीत
कविता आवडली. बर्याचदा आपण आपल्यालाही अशा प्रकारच्या प्रतिकांद्वारे पहात असतो. अगदी आत्ता, या क्षणी माझ्या टेबलसमोर क्वेकर ओटस चा डब्बा आहे ! पण त्याकडे असेही पहाता येते हे एक कविताच सांगू शकते. मी स्वतःबद्दल कल्पना करताना "चाळीस पानांची कोरी वही" अशी केल्याचे स्मरते. छोट्या पन्ह्याचे कोरे आयुष्य , ज्यावर कधी अर्थपूर्ण अक्षरे उमटलेली नाहीत. अर्थात कविता मला कधी येत नव्हती. पण मुद्दा असा की, प्रतिकाची कल्पना आपण आपल्या ठायीही करतो कधी कधी.
24 Dec 2008 - 11:46 am | धम्मकलाडू
धम्मकलाडूंनी वैयक्तिक आकसातून मुक्तसुनीत यांना दिलेला येथील प्रतिसाद पुसून टाकला आहे. धम्मकलाडूंनी प्रतिसाद देताना कुणावरही वैयक्तिक टीका होणार नाही याची यापुढे काळजी घ्यावी. ते जमत नसल्यास त्यांनी मिपावर लिहू नये..
-- तात्या.
24 Dec 2008 - 7:33 pm | मुक्तसुनीत
तुम्ही माझ्या धैर्याची तारीफ केली आहे आणि "व्यासंगाबद्दल प्रश्नच नाही" असे म्हण्टले आहे यावरून आपल्यापैकी काही नवागतांचा असा गैरसमज होईल की तुम्ही माझ्याबद्दल आदरयुक्त कॉम्प्लिमेंट देत आहात. त्यांच्या ज्ञानाकरता इथे नमूद करायला हरकत नाही की तुम्ही या आधी माझ्याबद्दल बोलताना "पोपट बडबडला" "समीक्षकांच्या लिखाणातून कॉपी/पेस्ट करणारा" , स्त्रैण , पुरुषांविषयी लैंगिक प्रेमभाव ठेवणारा वगैरे वगैरे अशी माझी संभावना केली आहे आणि नेहमी करता.
अतासुद्धा तुमच्या छद्माचा मी पुन्हा विषय झालो. आभारी आहे.
वैयक्तिक टीका करू नये हे मिपाचे धोरण आपण वारंवार धुडकावून लावता. जोवर तुम्ही माझ्यावर शस्त्र धरताय तोवर तुमचे प्रतिसाद राहतील. ते तसेच रहावेत असे मला वाटते. इतरांबद्दल असे काही लिहायला लागलात (आणि माझ्या नजरेखाली ते आले ) तर मी ते नक्कीच उडवेन.
28 Dec 2008 - 12:06 am | धम्मकलाडू
माझे प्रतिसाद आणि प्रतिक्रिया कुणाच्याही खासगी जीवनावर आधारित नसतात. मिपावर होणार्या लेखनावर, प्रतिसादांवर त्या आधारित असतात. एकंदरच तुम्ही माझे प्रतिसाद अतिशय वैयक्तिकरीत्या घेत आहात असे दिसते आहे.
मुक्तसुनीत, इतरांचा किती किती विचार करता तुम्ही. माझे प्रतिसाद उडविल्यामुळे किंवा न उडविल्यामुळे काडीचाही फरक पडणार नाही. कशाला उगाच शहीद किंवा 'मुहब्बत के मारों का मसीहा' बनत आहात' ?
(गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
24 Dec 2008 - 1:24 am | कोलबेर
रुपक चांगले आहे पण..
ह्या ओळी कॉर्नफ्लेक्स साठी लागू होत नाहीत. एकदा पाकिटातुन बाहेर आलेले फ्लेक्स पुन्हा पाकिटात जात नाहीत.
24 Dec 2008 - 5:26 am | प्राजु
वेगळ्या धाटणीची आहे..
पण कोलबेर पंत म्हणतात त्याप्रमाणे मलाही वाटतं आहे.. की, एकदा पाकीटातून आलेले फ्लेक्स पुन्हा पाकीटात कसे जातील??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Dec 2008 - 5:58 pm | सुवर्णमयी
प्रतिसादासाठी धन्यवाद.
ही अप्रकाशित कविता का दिसते आहे? असो, त्याचे विडंबनही झाले आहे..
मिपावर अप्रकाशित ठेवा नावाची व्यवस्था कार्य करत नाही का?
सोनाली
28 Dec 2008 - 8:47 am | विसोबा खेचर
मिपावर अप्रकाशित ठेवा नावाची व्यवस्था कार्य करत नाही का?
नाही करत. काम सुरू आहे..