नेहेमी दिसणार्या अनेक अनोळखी पण आवडणार्या पोरी जेव्हा अचानक दिसायच्या बंद होतात तेव्हा त्यांची प्रकर्षाने आठवण येते आणि मग ज्या त्या मुलीत त्या मुलींचे भास होऊ लागतात. प्रेरणा अर्थात 'भासमान'.
अवचित कोठे, कुण्या दिशेने भासमान ती होते
शेप, चाल, जबराच, माझिया मनास तुडवून जाते
दिसे पोरगी अहा देखणी, प्रसाद मिळतो 'बाटा'
कुठे धुंद ती मित्रमंडळी कुठे झिंगल्या वाटा
बर्फ थोडका ग्लेनफिडिच, अन मादक 'पहिली'धारा
रणरणत्या वा उन्हात घेऊन बियर बैसतो बारा
दिसली कोणी तरुण जरा की अडखळते का चाल
मादक नजरे शोध घेतसे, कुठे 'शर्मिला' माल?
नसशी जरी तू 'रूपा' आणिक 'वासू' माझी मूर्ती
वसे चिरंतर कट्ट्यावरती, 'हिरवळ' पसरे भवती
चतुरंग
प्रतिक्रिया
17 Dec 2008 - 10:57 pm | अवलिया
वसे चिरंतर कट्ट्यावरती, 'हिरवळ' पसरे भवती
वा!
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
18 Dec 2008 - 1:05 am | संदीप चित्रे
रंग्या... मस्त जमलय रे विडंबन... :)
>> शेप, चाल, जबराच, माझिया मनास तुडवून जाते
>>बर्फ थोडका ग्लेनफिडिच, अन मादक 'पहिली'धारा
रणरणत्या वा उन्हात घेऊन बियर बैसतो बारा
>> आणिक 'वासू' माझी मूर्ती
हे तीन प्रकार तर भन्नाटच ना एकदम !!
18 Dec 2008 - 4:10 am | बेसनलाडू
मस्त!
(पक्षीनिरीक्षक)बेसनलाडू
18 Dec 2008 - 8:30 am | अनिल हटेला
नसशी जरी तू 'रूपा' आणिक 'वासू' माझी मूर्ती
वसे चिरंतर कट्ट्यावरती, 'हिरवळ' पसरे भवती
मस्तच......
(हिरवळप्रेमी)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
18 Dec 2008 - 8:33 am | विनायक प्रभू
किती सुंदर कविता करता हो चतुरंग शेठ. मला कविता कळतच नाही हा भाग अलाहिदा.
18 Dec 2008 - 2:03 pm | पॅपिलॉन
विडंबन सुंदर झाले आहे.
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
18 Dec 2008 - 4:45 pm | श्रावण मोडक
छान. बारा बीअर वगैरे भारीच.
19 Dec 2008 - 12:59 am | चतुरंग
न देणार्या सर्व रसिकांचे आभार! :)
चतुरंग
19 Dec 2008 - 8:38 am | प्राजु
रेवतीताईनी वाचली का हो कविता?? घरी सगळे ठीकठाक आहे ना??
जरा काळजी वाटली म्हणून विचारलं... ;) ह. घ्या. हे. सां. न . ला.
मस्त विडंबन..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Dec 2008 - 10:44 am | विसोबा खेचर
बर्फ थोडका ग्लेनफिडिच, अन मादक 'पहिली'धारा
रणरणत्या वा उन्हात घेऊन बियर बैसतो बारा
मस्त! :)
19 Dec 2008 - 7:06 pm | लिखाळ
मजेदार :)
-- लिखाळ.
20 Dec 2008 - 5:14 am | मदनबाण
एकदम झ.का.स......
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -