(विचारणा)

चेतन's picture
चेतन in जे न देखे रवी...
19 Dec 2008 - 11:51 am

स्वाती ताइंची संवेदना!! वाचुन नको त्या संवेदना!! जाग्रुत झाल्या. आणी पडले विडंबन

लाल भडक तर्रीवाली
तिखट मिसळ... खाल्ली आहेस कधी?
ती ज्वालामुखी नंतरच्या लाव्हारसा सारखीच दिसते..
लाल! तिखट रस्स्याचा रसरसता रंग दाखवणारी..
जिभेचे चोचले पुरवणारी..
तिच टोचते.. जखमेच्या ठणक्यापेक्षा जास्त!
त्या भळभळत्या वेदने पुढे.. हे सात्विक बुळबुळीतपणच वाईट..!
सोसत नसुनही खाल्ल्यावर वारंवार लागते ना घाई..
ही तर फक्त संपलेली... आतडी.. !
गळून जाणारी.

गळेलच..!!!

मग पुन्हा होइल.. विचारणा!!

मिरवशिल वीरश्री!!!..

चेतन

मुक्तकविडंबनप्रतिसाद

प्रतिक्रिया

मनीषा's picture

19 Dec 2008 - 12:16 pm | मनीषा

संवेदनेची ---विचारणा

स्वाती फडणीस's picture

19 Dec 2008 - 12:30 pm | स्वाती फडणीस

लाल भडक तवंगवाली;
तिखट मिसळ... खाल्ली आहेस कधी?
ती ज्वालामुखी चुटूक लाव्हारसा सारखीच दिसते..
लाल! झणझणीत रस्स्याचा रसरसता रंग दाखवणारी..
जिभेचे चोचले पुरवणारी..
इच्छाच खवळते मग.. पोटातल्या भुकेपेक्षा जास्त!
त्या घमघमत्या वासापुढे.. ही अळणी उसळच वाईट..!
पोट जडावत आणि मनही भरत नाही..
गर्रेदार पोटांच्या धेंडानाही सुचतेच ना खादाडी..!
ही तर गरीबाची करी..!!!
भुक भागवणारी..!!!

मिळेलच..!

मग पुन्हा होइल.. विचारणा!!
एक प्लेट ओर लाना.

===========================
आता बघा कशी वाटते..
नेहमी हगापादायलाच पाहीजे अस नाही ना..?

चेतन's picture

19 Dec 2008 - 12:34 pm | चेतन

आता बघा कशी वाटते..

बघताना आणि खाताना चांगलीच वाटते नेहमी पण काहींना मूळव्याध होते म्हणे... (क्रिप्टिक)

असो तुम्ही मस्त लिहलयं

(खूळवादी) चेतन

स्वाती फडणीस's picture

19 Dec 2008 - 12:38 pm | स्वाती फडणीस

काहीना वडापाव.. मिसळ असेच काही पर्वडते तेव्हा ते तो विचार करत नाहीत.

असो.
विडंबन करायच म्हणून करू नये.. एवढच सांगायच होत.

चेतन's picture

19 Dec 2008 - 12:44 pm | चेतन

काहीना विडंबन.. मिसळ असेच काही आवडते(कींवा तेव्हढचं येतं म्हणाना) तेव्हा ते तो विचार करत नाहीत.

असो.
विडंबन करावसं वाटलं म्हणून मी केलं.

(परप्रकाशी) चेतन

स्वाती फडणीस's picture

19 Dec 2008 - 12:46 pm | स्वाती फडणीस

च् च्..च..!
करायच तर करा हो..
फक्त जरा नीट करा..!

चेतन's picture

19 Dec 2008 - 12:55 pm | चेतन

नीट करायचाच प्रयत्न होता. मी केलेलं विडंबन कदाचीत थोडेसे निगेटिव्ह असेलही... (पण मला ते तसेच सुचले)
तुम्ही शब्द निवडिबद्दल म्हणत असाल तर मी नवशिका आहे.

असो कुणाला मिसळ सोसली नसेल तर त्याला मी काय करणार.

(नवशिका) चेतन

वेलदोडा's picture

20 Dec 2008 - 7:35 am | वेलदोडा

स्वातीताई, मस्त विडंबन.
चेतनजी , विडंबन करणे हे हा**पा**सारखे सोपे नव्हे हे यावरून लक्षात यावे.

चेतन's picture

19 Dec 2008 - 12:31 pm | चेतन

धन्यवाद.

यशस्वी प्रतिसादकर्ता वाचुनही मिपावर संवेदना जाग्रुत असण्याचे लक्षण... प्रतिसाद देणे

(विचारमग्न)चेतन

यशोधरा's picture

19 Dec 2008 - 12:49 pm | यशोधरा

डान्याने हे प्रतिसाद वाचले नाय्येत वाट्ट!
डान्या, पुढच्या लेखाचा मसाला आहे रे इथे!! :P

हलके घ्याच! :)

प्राजु's picture

20 Dec 2008 - 8:26 am | प्राजु

विडंबन मस्तच झालं आहे...
चेतन राव, विडंबन करताना शब्दनिवड जास्त महत्वाची असते. कविता लिहिताना कवी स्वतःला हवे ते स्वातंत्र्य घेऊ शकतो.. पण त्या कवितेचे विडंबन करताना विडंबनकाराला ते स्वातंत्र्य फार कमी असते..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

20 Dec 2008 - 8:28 am | विसोबा खेचर

मस्त रे! :)

आपला,
(मूळव्याधी) तात्या.

चेतन's picture

20 Dec 2008 - 4:31 pm | चेतन

प्राजु ताई, तात्या धन्यवाद
>> विडंबन करताना शब्दनिवड जास्त महत्वाची असते
हे मान्य ते मी वरति स्वाती ताईंच्या प्रतिसादातही मान्य केले आहे.
"तुम्ही शब्द निवडिबद्दल म्हणत असाल तर मी नवशिका आहे. "

प्रयत्न करतोय कदाचीत वाचन कमी पडतयं :(

चेतन

अवांतरः
वेलदोडे सोलण्यापेक्षा विडंबन नक्कीच जड असते. तिखट मिसळ जास्त खाल्ल्याने नो-वेलदौडावे लागते ;)