भल्या पहाटच् मायन् दगड्याला बापाचा जुनाट सदरा घातला. बाह्या दुमटवल्या. गळयापासून पायापर्यंत तो झाकून गेला. चिमि अजुन झोपेतच् होती. मायन् तिला शेजारच्या कोपितल्या म्हातारी जवळ टाकलं. हातात कोयती घेऊन सगळे कोपीवाले निघाले.
"का गं? दगडूला कामुण घेतलं आज संग?" सोबतच्या एकिन् मायला विचारलं.
"अ गं! गेल्या हप्ती हाताला कोयतं लागून घेतलं म्हणून घरी ठीवलं त् त्या आंब्याखली जुगारी लोकाइला सिगरेटी-फुटान आणून द्यायला पळु लागलं. मनुन मनलं घीउ संगच्. तेव्हढच् चार दोन मोळ्या बी बांधू लागल." मायन सांगून टाकलं.
दगडू सगळ्यांच्या पुढे कनाकना पाय उचलत चालत होता. ढेकाळांनाही लाजवेल असा रंग पण रहायला अगदी टापटिप्. बारीक कापलेले केस, स्फटिकासारखे शुभ्र दांत. आणि हसरा चेहरा. कुणी चिडवले तरी दांतविचकुन हसायची सवय त्यामुळे टोळीत तो सर्वांचा आवडता प्राणी.
"त्याला शाळा शिकिव बाईं. लई चुनचुणित पोर हाय तेला उगीच तोडिला नग् दामटूं" सोबताची.
" हाव ना गं! या बारचिनि सगळा हिशिवबच् चुकला, पाटलिनबाईची सोनी अन् हेव एकाच शीन चे हाय. तिला औंदा शाळात घातलं. हे बी लए जीव काढतं शाळासाठी पर तोड़ीमुळं हुकतं सारं." माय.
"तेला कहयाला आणता तोडिला? घरीच ठीवायचं की शेजारच्या कांताक्का जवळ?" सोबताची दूसरी.
"नई बाई आपलं लेकरु आपल्या जवळ बरय. कई दुखलं खुपलं आपण कही बी खालवर करू. शेजारी कुठवर करणार? वरुण हे पोरगं बी लए अचपळ हाय. सारखं खटपटि करत असतं." माय.
फडावर आधिच ट्रक उभा होता. पोहोचल्याबरोबर सगळे उसावर भिडले. दलदलित जमीन खचावी तशी उसं गळु लागली. बाप अडदांड हातांनी सपासप वार करू लागला, माय आणि दगडू उस गोळा करुण जमतील तश्या मोळ्या बांधू लागले.
प्रतिक्रिया
23 Oct 2015 - 11:21 pm | अभ्या..
उसतोडीवाल्यांची अशी भाषा मी आजवर ऐकली नाही. बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, नांदेड ह्या उसतोडणी कामगाराच्या स्पेशल एरियात तर बिल्कुल नाही. जळगाव किंवा अमरावती साईडची हाय का?
बाकी कथेत दम आणा जरा.
23 Oct 2015 - 11:37 pm | आनंद कांबीकर
रोजगार हमी योजना फ़क्त सरपंच अणि ग्रामसेवकांसाठी झाल्यापासून गावाताली सर्वच प्रकारची लोक उस तोड़ कामगार झाली आहेत. पहा ही भाषा तुमच्या कुठे ऐकन्यात आली टार. दम म्हणताय तर एइल की हळू हळू.
23 Oct 2015 - 11:39 pm | अभ्या..
शुभेच्छा मग. लगे रहो.
24 Oct 2015 - 4:18 am | अन्या दातार
सशक्त कथा. भाषेबद्दल फारशी कल्पना नाही. पण जशी आहे ती चांगली वाटतेय.
24 Oct 2015 - 9:34 am | बाबा योगिराज
शुभेच्छा वो तुमाला. लिहित रावा...
24 Oct 2015 - 9:48 am | आनंद कांबीकर
च्यां शुभेच्छा म्हटल्यावर चालूच राहणार