एस टी तुन उतरलें तेव्हा बरीच रात्र झालेली. पाऊस थांबला असला तरी ढगांचा निचरा झाला नव्हता. पुन्हाकधी बरसायला सुरुवात होईल याचा नेम नव्हता. तिथुन गांव अजुन कोस भर दुर. लवकर गांव गाठायला हवं तसच ओढाही भरला असल याचा अंदाज घेत त्याने मधली वाट धरली. मधेच एखादी विज चमकायची अाणि वाट दिसायची. तो वाट काढत समोर तर दोन वर्षाच्या चिमुरडीला छातीशी कवटाळुन ती त्याच्या मागं. पायाला चिखलाची लगदाळं चिकटलेली. मधेच एखादा काटा पायात घुसुन रक्तासगट बाहेर यायचा, आग मस्तकाला भिडायची.
पोरगी सारखी बिमार पडते. गांवातल्या डॉक्टरला बरेचदा दाखवलं पर पोरीला गुण येईना. सारखी रडत असते. शेवटी डाक्टरच म्हणाला, भाइरलं बघा. शेजाच्या साखरा आजिचं तेच म्हाणनं आलं. बुढगांव च्या पीराखाली एक देवलसी बसतो. त्याच्याकडे घेऊन जाण्यासाठी त्याची महतारी मागं लागली. तिन दिवस झाले पोरिला झोप नव्हती. म्हातारीची कुरकुर वाढली. शेवटी टपरीवाल्यां पप्याकडून पाचशे उधार घेऊन तो मुकाम्या गाडीन् गावातुन निघाला. पोरीचे रडने चालूच होते. पिराला वहायला म्हातारिन् घरातून सात लिम्बं दिली होती ती त्यानं एस टी तुन फेकून दिली आणि सरळ शाहरातला दवाखाना गाठलेला. तिथेच रात झाली, मुकामी गाडी हुकलि म्हणून दुसऱ्या गाडींन याव लागलं.
वाट काढत दोघ टेकडीवर आले. तो खड़काळ भाग, गांव चा मसनवटा. पोरगी शांत झोपलेली. अंतरावर मढं जळत होतं, त्याच्या उजेडांत झपझप पाय उचलत दोघेही गांवच्या वेशीतून आंत शिरले.
प्रतिक्रिया
22 Oct 2015 - 3:29 pm | द-बाहुबली
ओस्करविनींग लिखाण. आता थांबायच नाही बरंका...
22 Oct 2015 - 3:38 pm | जव्हेरगंज
अरेच्या!! क्रमशः आहे का?
कि मला समजलीच नाही.
शेवट काय आहे तेच समजले नाही. बाकी आवडले. :)
23 Oct 2015 - 6:37 am | चांदणे संदीप
सुंदर लिहिलय. यात सातत्य राखता यायला हवे!
23 Oct 2015 - 8:14 am | बिन्नी
पण मढं कोणाचं जळत होतं?
26 Oct 2015 - 2:10 pm | आनंद कांबीकर
...
26 Oct 2015 - 2:25 pm | पिलीयन रायडर
काही कळलं नाही हो..
27 Oct 2015 - 12:21 am | असंका
चांगलंय!!
धन्यवाद!!
27 Oct 2015 - 1:33 am | पद्मावति
सुरेख लिहिलंय. पिर बाबा कडे न जाता मुलीला शहरात दवाखान्यात घेऊन गेले त्यामुळे मुलीचा जीव वाचला. सुखांत असलेली कथा आवडली.