स्वराज्य

माहीराज's picture
माहीराज in जनातलं, मनातलं
10 Oct 2015 - 10:23 am

माझे विचार..

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच " असे लोकमान्य टिळकांनी इंग्रज सरकारला ठणकावून सांगितले आणि 1949 साली आपल्याला स्वातंत्र मिळाले, पण आज खरचं आपल्याला स्वातंत्र मिळाले आहे का? खरचं आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ माहीत आहे का? या स्वातंत्र्याने काय दिले हे माहीत आहे का ?
       संविधानाने आपल्याला काही अधिकार दिलेत ते तरी माहीत आहे का?  हां FC च्या टीचर सांगतात म्हणून आपल्याला काहीही बोलण्याचा ,आपले मत मांडण्याचा अधिकार आहे हे माहित आहे. 
    पण बोलणं म्हणजे नक्की काय? मत कधी व कुठे  मांडावे ? आपण आपले मत मांडतो पण कुठे तर चार चौघात गप्पा मारताना किंवा स्वयंपाक घरात भाजी कोणती करावी हा विचार करताना. पण याला मत मांडणे म्हणतात का? जे आपल्या सदसद्विवेक बुद्धीला पटत नाही त्या विरोधात कणखरपणे बोलणे म्हणजे मत मांडणे होय.
   आज आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आहे. भ्रष्टाचार वाढला आहे, लोडशेडिंग वाढले आहे, जिकडे तिकडे आतंकवाद दिसतोय. या विरुद्ध बोलण्याचा अधिकार आपल्याला आहे.पण आपण ही या विषयी बोलत नाही आणि जो बोलतोय त्याला काही काम नाही म्हणून बोलतोय असं समजून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.
मग प्रश्न उरतो की आपण जिवंत तरी आहोत का? आणि असलो तर फक्त जगतोय. .का , कसे , कशासाठी काही माहित नाही.
    आपल्या समोर एखादा अपराध धडला तर पोलीस त्रास देतील, कोर्टात जावे लागेल, आपली बदनामी होईल आणि याहून ही आपला वेळ वाया जाईल म्हणून आपण काही बोलत नाही. एखादी गोष्ट आपल्याला माहीत असते की ती वाईट आहे, चुकीची आहे तरी आपण त्याविषयी काही बोलत नाही तर काय उपयोग त्या अधिकाराचा ?
  तुम्ही म्हणाल इथे आमच्या घरात आमचे कोणीही ऐकत नाही, बाकीचे कसे ऐकतील?  मग म्हणून आपण या चार भिंतीच्या बाहेर पडायचेच नाही का?
  मग आता सांगा मला आपण खरचं स्वातंत्र्याचे जीवन जगतोय का ? सांगा ना हेच का आपले स्वातंत्र ??
                                    माहीराज
 
आपले नक्की कळवा ....

समाजजीवनमानविचार

प्रतिक्रिया

नाव आडनाव's picture

10 Oct 2015 - 2:33 pm | नाव आडनाव

1949 साली आपल्याला स्वातंत्र मिळाले

कोणत्या देशा बद्दल बोलताय?

नाखु's picture

10 Oct 2015 - 2:56 pm | नाखु

बघ रे जरा

आपले नक्की कळवा ....

कोणी आहे "कळव्याला"

परस्पर भागवत

याॅर्कर's picture

10 Oct 2015 - 3:36 pm | याॅर्कर

"जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे टिळकांनी म्हटले आणि स्वातंत्र्य मिळाले"
-----→व्वा रे, बाकीचे देशभक्त कुठे गेले?

1949 ला
-----→ टाईपिंग मिस्टेक असेल तर ठीक आहे.

(असू दे असू दे!एखादा सिनेमा बघितला कि आवेगामुळे वाटतं असं काहीतरी लिहावं म्हणून.)

माहीराज's picture

10 Oct 2015 - 5:20 pm | माहीराज

1948 चे चुकून 1949 झाले .. सांगितल्याबद्दल धन्यवाद

माहीराज's picture

10 Oct 2015 - 5:23 pm | माहीराज

Sorry 1947 साली स्वतंत्र झाला ..

लोकमान्य टिळकांनी बोललं आणि स्वातंत्र्य मिळाले असे नाही. .ते फक्त एक उदाहरण आहे. .ज्यांनी आपले शब्दइंग्रजांना ठणकावून सांगितले. .

लोकमान्य टिळकांनी बोललं आणि स्वातंत्र्य मिळाले असे नाही

मग कसे आहे?

ते फक्त एक उदाहरण आहे

कशाचे?

यांनी आपले शब्दइंग्रजांना ठणकावून सांगितले. .

बाकीचे का कुजबुजत सांगायचे?
जाउदे राव. प्रत्येक वाक्य घ्यावे लागेल लेखातले. :(
माफ तुम्हाला माहीराज.

बाबा योगिराज's picture

10 Oct 2015 - 7:38 pm | बाबा योगिराज

ख्या ख्या ख्या.

याॅर्कर's picture

10 Oct 2015 - 7:22 pm | याॅर्कर

उगाच काहीतरी लिहायच म्हणून लिहू नका .
1949 काय, मग 1948 काय, मग 1947 काय, आता 1946 म्हणू नका म्हणजे पावलं!

दत्ता जोशी's picture

10 Oct 2015 - 7:29 pm | दत्ता जोशी

असले प्रश्न पडू नयेत आणि पडलेच तर मिपा वर लिहू नयेत.

प्यारे१'s picture

10 Oct 2015 - 7:38 pm | प्यारे१

ष राहिला महीराज मध्ये. ;)

चांदणे संदीप's picture

11 Oct 2015 - 11:14 am | चांदणे संदीप

मस्त मस्त प्रतिक्रिया आधीच वाचल्याने लेखात काय होते हेच विसरलो!

पण अशा मस्त मस्त प्रक्रिया लिहिण्याची मिपाकरांना संधी दिल्याबद्दल धन्यवाद, माहीराज!

Sandy