माजा आजा दारु कती पेत आसल ते तुमाला येगल सांगाची गरज नाय. यका गुत्तेवाल्याला फुल गब्बर करून मगच दुसर्या गुत्याव जाईल आसा परोपकारी मानूस.
यकदा आसच झिपर्या न आजा पेत बसलवत. (झिपर्या आमचा गडी हाय)
'शेट तुमी रोच्ची कती दारू पीताव ?'
'मना क म्हाईत र ? आनी कनाला मोजाची ? गल्यापातुर आली क बास कराची.' आजा
'तस नाय वो शेट, मना म्हनाच हाय क कती रुपयाची पीताव ?'
'आसा बग सकाली पीवला गांधी खिचान आसल त सांजच दोन हिरव गांधी उरतान' आज्यासचा तोंडी हिशेब.
'आर बाबा तिनशे रूपए !'
'मग ? म्हागाय कती वारलीय र . नव्वद ची यक बाटली येती. सकाल दूपार न राच्च. तीन टाईम' आजा
'आवशिद झेताव जनू'
'तर तर ! आवरा कड्क कनाला हाय मग?'
'पन मी क म्हन्तो आपल गाव पाउनशे ऊंबर्याच, घरटी यक मानुस तरी टुन होत आसल आवरेज पन्नास रुपये रोच्च धरल
तरी साडेतीन हजाराव रोच्चा गल्ला जातुय. मंग आपूनच का न टाकावा गुत्ता? पैशे बी मिलतील न दारू बी'
'धंदा कराचा ? चालल क र?' आजा आगरी आसला तरी मराटी व्हता.' पन ह्यान प्रापीट कती व्हईल र'
'त्याच आस बगा' झिपर्यान जवल येऊन आज्याचे खांद्याव हात टाकला
खाडकन गां*वर लात बसली.
'पायरीवर बस वर येव नको.' आजा फुगारला
'आवो समझुन सांगत व्हतो न्हव ' कलवलत झिपर्या बोल्ला
'त्याच क हाय सोनपाड्यान भीम्या कातकरी भट्टी लावत. त्याजेकडशी दारूच फुग हानाच. पीव्वरच. दिड हजाराला येक फुगा त्याच्यान धा बाटल्या व्हतान.'
आजान पाच मीन्ट ईचार केला
'भडव्या धा बाटलीच नवशे जाले. साशे रुपये लास?'
'ती त गंमत हाय न शेट. आवो धा च्या तीस कराच्या. शंबर टक्के प्रापीट ' झिरप्यान प्रोजेक्ट रीपोर्ट बनवला.
'आस हाय क ? तरीच तो शेट्टी आन्ना हाटीलावर हाटेल काडतं. आपून पक्का गुत्ता टाकाचा बग'
दूसर्या दीशी सकालीच सकाली दोगव नींगाले सोनपाड्याला. येक फुगा झेतला. ' नवा धंदा हाय जरा दमान झेऊ यकदा का चाल्याय लागला मग झेव पायजे तेवरी' झिपर्यान
मान डोलवली
नव वाजता गावान परत.
चींचेच्या झाडाखाली धा च्या तीस केल्या. टेबल मांडुन गूत्ता बनवला
झिपर्याला कई धीर नीगना.
'शेट गिरायकाला आपन बेस्ट माल द्याला हवा आनी बेस्ट माल द्याचा तर आदी टेस्ट कराया हवा'
आजा बी सोकवला व्हता.
पंद्रा मिन्टात दोन बाटल्या रिकाम्या केल्या.
तेवड्यात माजा बा न चुलता धडकले. कूटना खबर लागली कोनास ठाव.
'बा ह्ये बर नाय केलस. यका शब्दान बोल्ला नाईस. आमचा बा हाईस क कोन ?'
'आर सांगनारच होतू . संद्याकाली सगला गल्ला तुजे आयशीकड देनार हाय.'
'ते काय नाय. आता आमाला पीवाला पायजेल.' काशान बा कड हट्ट धरला (?)
झ्या रे पोरावु, पन सांबालुन पीवा. बा न समजुत काडली
सा बाटल्या आडव्या करून पोरांनी बा शी बट्टी केली, चार संद्याकालसाटी पार्सल केल्या न शेक्यंड करून गेले.
घा वाजले तरी गिराईक नाय. 'क कराच र झिपर्या ?'
'कशे येतील लोक ? कशे येतील ? सगली सात वाजताच जातान गुत्त्यावर. आपुन नव वाजता धंदा खोलला. मी आता जातय न आक्के गावान सांगुन येतय.' झिपर्या भेल़कांडत
पलाला.
थोड्या येलान रम्या, म्हाद्या, भीक्या न सूक्या येउन पोचले
'शेट ह्ये लई बेस केलास बग. आता आमाला लांब जाला लागनार नाय, कामाचा येक फुकट जात व्हता न.
पन यक हाय. शेट्टीआन्नाकड आमच खात व्हत. कती पीव दे पन पैशे नाय मागाचा. तु खात ठीवशील तर रोच्च तुजेकड यीउ. जमत आसन त बग.' रम्या
आजान झिपर्याकड बगीतल.
'शेट धंदा वाडवाचा आसल त क्रेडीट द्या लागतय. तर गिराईक यील.'
आज्यान मान डोलवली.
चवगांनी उदारीत धा बाटल्या मारून खात खोलल.
दुपार जाली. गिराईक नाय. परत आज्यान आनी झिपर्यान यकक बाटली पील्ली. जरा डोले जड जाले. म्हुन डुलकत व्हते येवड्यान...
थडाक.. ढूम..फटाक.. थडाक.. ढुम.. फटाक
आवाज कुटन येतोय ताच कलना. डोले जरा ऊगडले तर खाकी प्यांट न दांडके. हवालदार आपल्याला तुडीवतान ह्ये समजालाच धा मीन्ट लागली.
दम लागला म्हुन हवालदार थांबले.
'कार भडव्याउ , दारु ईकता? लायसन हाय क र? चला खडी फोराला पाटवतो तूमाला.'
हवालदारांचे पाय पडाला दोगांनाव तरास नाय झाला. खालीच लोळलेवते. नीस्ती कूस बदलली
'सायेब पाया पडतू आमाला सोडा.आमावर दया करा. ' आज्यान कस बस तोंड उगडल
सा बाटल्या पीउन हवालदारांनी आज्यावर दया केली न नीगुन गेले.
दोगव मार खाउन दमलेवते. आज्यान कायव न बोलता स्टाक चेक केला. दोन बाटल्या ऊरल्यावत्या. झिपर्याकड बगीतल. दोगांनी यकक बाटली उचलली. टाप टू बाटम.
टाईट झाले न तीतच झोपुन गेले
तीस बाटल्या संपल्या
गल्ल्यात पैशे शुन्य
टोटल लास
धंदा बंद
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
प्रतिक्रिया
16 Dec 2008 - 8:46 pm | रामदास
हवालदारांचे पाय पडाला दोगांनाव तरास नाय झाला. खालीच लोळलेवते. नीस्ती कूस बदलली
हे खास लिहीलंय.
16 Dec 2008 - 9:08 pm | विनायक प्रभू
आता एक पेग मारणे भाग झाले.
जल्ला भारी लिवतय.
16 Dec 2008 - 9:12 pm | प्रकाश घाटपांडे
पुणे नाशिक रोडवर पेठ घाटातल्या वायरलेस स्टेशन चे इंचार्ज आमी व्हतो तवाची गोष्ट .आमच्या सहकारी पोलिस शिपायाच गावातल्या गुत्तेवाल्याकड खात व्हत.पोलिस अस्ला म्हनुन काय झालं? फुकाट किती दिवस परवडन? यकदा तो दोन पायाव चालत आला. सायकल नवती. म्हन्ल कुड गेली सायकल? लईच उदारी झाल्ती काळे मामान (गुत्तेवाल्यान) ठेउन घेत्ली म्हन्ला. मंग मी त्याच्याक गेलो. म्हन्ल मी तीन म्हैने ड्युटीवर हय तोवर तुपली उदारी वसुल करुन देतो. यक काम करायच कोटा ठरवुन दिला तेवडाच द्यायचा. न्हाईत मी जबाबदार नाई. आत्ता सायकल दे न्हाईत त्यो ड्युटीला उशीर करतोय. सायकल घेतली. पगार घेतला. उधारीचा पहिला हप्ता दिला. उरलेले पैशे त्याच्या बायकोक दिले. तीन म्हैन्यात त्याच्या हातात पैशे ठेवलेच नाई.तीन म्हैन्यात निल केली उदारी. जाधव शिपाइ खुश ,त्याची बायकु खुश,काळे मामा खुश. आमी खुश.
प्रकाश घाटपांडे
16 Dec 2008 - 9:26 pm | कलंत्री
ही गोष्ट १०० % खरी आहे. जेथे जेथे प्रकाशराव असतात तेथे खुशीच असते.
16 Dec 2008 - 11:25 pm | अवलिया
असंच म्हंतो..
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
16 Dec 2008 - 10:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
घाटपांडे काका, तुमचा किस्सा मस्तच!
आणि नेहेमीप्रमाणे ब्रिटीश सायबा, भारी लिवलंस!
16 Dec 2008 - 10:14 pm | रेवती
आवडली.
गड्याचं नाव सगळीकडे एकच दिसत नाहीये,
कि मलाच न घेता चढलीये?;)
रेवती
16 Dec 2008 - 10:23 pm | ब्रिटिश
झिपर्याच
पुन्ना दारु पीउन लिवनार नाय
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
16 Dec 2008 - 10:24 pm | रेवती
गम्मतच आहे म्हणायची.
रेवती
16 Dec 2008 - 10:47 pm | टारझन
वा काय बारीक वाचन आहे ... के व ळ अ प्र ति म
टार्या ह्या रेवतीकाकूंपासून सावध रे बाबा .... कुठू शब्दात पकडतात अन गोची करतात सांगता येत नाय ...
16 Dec 2008 - 10:25 pm | इनोबा म्हणे
मना बी आता दारुचा धंदा खोलाचा .बोल! करतं क पार्टनरशिप?
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
16 Dec 2008 - 10:29 pm | चतुरंग
मना तिकरुन प्रकाशकाका आन तात्या खाकी प्यांट आन दंडुका घिउन येताना दिसलं! ;)
चतुरंग
16 Dec 2008 - 10:37 pm | इनोबा म्हणे
येऊ दे की रं! न मी कय फुकट धंदा करतं क रं!! हप्ता घेवून जातं ना रं त्ये. :)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
16 Dec 2008 - 10:32 pm | चतुरंग
यका गुत्तेवाल्याला फुल गब्बर करून मगच दुसर्या गुत्याव जाईल आसा परोपकारी मानूस.
हवालदारांचे पाय पडाला दोगांनाव तरास नाय झाला. खालीच लोळलेवते. नीस्ती कूस बदलली
=)) =))
कं लिवलंय! कं लिवलंय!
चतुरंग
16 Dec 2008 - 10:38 pm | कोलबेर
असंच म्हंतो..कं लिवलंय! कं लिवलंय!
=))
16 Dec 2008 - 11:24 pm | अवलिया
असंच म्हंतो..कं लिवलंय! कं लिवलंय!
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
17 Dec 2008 - 5:17 pm | आजानुकर्ण
बाल्या,
लै भारी लिवलंय... हहमु वळली.
तुपला
(गावकरी) आजानुकर्ण
16 Dec 2008 - 10:43 pm | टारझन
झकास !! बाल्या बॅक इन ऍक्शन (बैक इन ऐक्शन)
पण मला आधीच कळलेलं दारूचा धंदा नाही चालणार म्हणून !
- टार्या आगरी
16 Dec 2008 - 11:35 pm | यशोधरा
आजा तं आजा, झिपर्याही भारीच हाय!
17 Dec 2008 - 12:12 am | भडकमकर मास्तर
येक्दम झकास रे मिथुन....
छान गोष्ट....:)
... अन घाटपांडेकाकांची गोष्ट पण भारीच... साहेब म्हन्लं की काय काय करावं लाग्तंय स्टाफसाठी... पन सग्ले खुश झाले ह्ये म्हत्वाचं...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
17 Dec 2008 - 1:47 am | नंदन
मास्तरांशी सहमत आहे. झकास!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Dec 2008 - 3:29 am | मुक्तसुनीत
हेच म्हणतो !
17 Dec 2008 - 3:37 am | घाटावरचे भट
वरील सर्वांशी सहमत!
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
17 Dec 2008 - 4:15 am | धनंजय
म्हणजेच +१
झकास
17 Dec 2008 - 7:29 am | सहज
+१
असेच म्हणतो
17 Dec 2008 - 9:09 am | सखाराम_गटणे™
+१
सहमत
----
सखाराम गटणे
17 Dec 2008 - 10:29 am | विसुनाना
सहमत
17 Dec 2008 - 11:53 am | मैत्र
सहमत
17 Dec 2008 - 12:31 pm | प्रदीप
सहमत. अत्यंत सुंदर लिखाण. असेच अजून येऊद्या.
17 Dec 2008 - 12:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत
17 Dec 2008 - 12:43 pm | शेखर
मी पण सहमत
19 Dec 2008 - 8:57 am | खरा डॉन
मी पण सहमत
(कट्टर मिपाकर) खरा डॉन
20 Dec 2008 - 1:23 am | llपुण्याचे पेशवेll
म्हणजेच +१
१३_१३ पुण्याचे पेशवे
17 Dec 2008 - 4:43 am | मदनबाण
य बाला एकदम झ्याक लिवल आहेस रं....
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
17 Dec 2008 - 7:35 am | llपुण्याचे पेशवेll
मिथन्या त्वाड तू.. दे दणादण. पास ऑन नंतर लई आवडलय बघ हे. :)
जल्ला सगले तुजे नावातच हाय.
पुण्याचे पेशवे
17 Dec 2008 - 7:51 am | झकासराव
=))
आला रे आला बाला आला.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
17 Dec 2008 - 9:43 am | धमाल मुलगा
जल्ला कं लिवतं रं तू :)
ह हा हा...आमचा मल्हारपण असाच आजोबांच्या लाथा खायचा !
प्रोजेक्ट रिपोर्ट???? =)) लय भारी!!!
=)) आरारारारा....माल येकदम करक व्हता दिस्तंय! धा मिंटं मामालोकं तुरवतांव ह्या कल्लाच नाय :)
आगरी आसला म्हनुन काय झालां? म्हराटीच ना? जल्ला शंबरात येकांद्याचाच धंदा चालनार, बाकी आपुन सगले टोटल लासवालेच :(
दादूस तुजा ह्यो श्टोरी आवरला रं :)
17 Dec 2008 - 9:51 am | वेताळ
जल्ला तुझं नाव वाचलन हासया सुरुवात केल्ली...... =)) ...पहिल्यान धारची पाजलिस किर बाल्या...लई झ्याक
वेताळ
17 Dec 2008 - 1:26 pm | विसोबा खेचर
लै भारी ष्टोरी रं बाला.. :)
तात्या अहिरे,
अंजूरफाटा.
17 Dec 2008 - 2:40 pm | अनिल हटेला
आला रे आला ,बाला आला.......
>>>यका गुत्तेवाल्याला फुल गब्बर करून मगच दुसर्या गुत्याव जाईल आसा परोपकारी मानूस.
>>>>गल्यापातुर आली क बास कराची
>>>>सकाली पीवला गांधी खिचान आसल त सांजच दोन हिरव गांधी उरतान
>>>>सा बाटल्या पीउन हवालदारांनी आज्यावर दया केली न नीगुन गेले
:D =D> :-D =D> :-D =D> :-D =D>
अवांतरःआपण कधी बसायचं दादूस ? :?
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
17 Dec 2008 - 2:50 pm | ब्रिटिश
आमच त रोच्चच चाल्लय.
सद्या शेकरआन्नाला वर काडतोय(सपना बार ). कदी बी सांग
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
17 Dec 2008 - 6:55 pm | येडा खवीस
ब्रिटिश,
आता तुमचा एखादा "आगरी कथासंग्रह" प्रकाशित होण्याची वाट बघतोय
-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
19 Dec 2008 - 4:33 am | पक्या
आतापर्यंतच्या सर्व स्टोर्या आवडल्या. नुसते प्रासंगिक नाही तर शाब्दिक विनोद आणि कोट्या करण्याची आपली स्टाईल जबरा आवडते.
खविसाच्या म्हणण्या प्रमाणे आपला 'आगरी (विनोदी)कथासंग्रह' लकवरच प्रकाशित व्हावा.
(हि स्टोरि पण जबरा हे.वे.सां. न.ल.)
17 Dec 2008 - 9:07 pm | सखाराम_गटणे™
वाह वाह, छानच आहे,
आवडले
पुले शु
----
सखाराम गटणे
18 Dec 2008 - 8:47 pm | बिपिन कार्यकर्ते
झकास रे बाल्या!!!!!
हसून हसून पोट दुखलं बघ.... आता 'उतारा' घ्यायला जातो. ;)
बिपिन कार्यकर्ते
19 Dec 2008 - 10:27 am | भास्कर केन्डे
व्वा भोईर साहेब, काय खुसखुशीत कथा! दिल खूष झाला. हस्य फवारे उडवत उडवत आम्ही सहकुटुंब कथेचा आनंद लुटला. आमच्या बायडीला आगरी समजायला जरा जड जातं. पण तिला सुद्धा ही हलकी फुलकी झुलती (तिची प्रतिक्रिया) कथा आवडली.
लिखानात आगरीचा ठेका मस्त जुळवला आहे. आमच्या काही आगरी मित्रांच्या आठवणी जाग्या झाल्या. साधी भोळी अन कष्टाळू माणसं. त्यांचा बडबडा पण मोकळा स्वभाव. मनात एक अन ओठावर दुसरं असं होणार नाही. सच्चे मित्र. माझ्या कित्येक आगरी मित्रांच्या देवघरात शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आहेत (त्या सहसा दिवानखान्यातल्या भिंतीवर असतात म्हणून वैशिष्ट्यपूर्ण वाटले).
रायगड जिल्ह्यात फक्कड मासे खायचे असतील तर आगरी कुटुंबांकडे आमंत्रण हवं. त्यात पेग असेल तर सोन्याहून पिवळे. आम्ही मात्र हातावर झेलून बनवलेल्या तांदळाच्या भाकरी न आमटीवर थांबत असू.
असो... एकंदर मला पनवेल/पेन/वडखळ चे दिवस आठवले.
आपला,
(आगरी) भास्कर
आम्ही येथे वसतो.
19 Dec 2008 - 10:19 am | पिवळा डांबिस
अरे तुझ्या या ष्टोरीला प्रतिसाद द्यायचा दोन वेळेला प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळा लेख वाचायला लागलो आणि लेखातच गुंगून गेलो....
काय मस्त लिहिलंय...
'आसा बग सकाली पीवला गांधी खिचान आसल त सांजच दोन हिरव गांधी उरतान'
व्वा, गांधी सांगून गेलेलेच होते, की ग्रामोद्योगाला प्रोत्साहन द्या.....
'धंदा कराचा ? चालल क र?' आजा आगरी आसला तरी मराटी व्हता.
क्या बात है!!!! आगरी झाला म्हणुन काय झालं? मराठीपणा कुठं लपवणार!!!!:)
हवालदारांचे पाय पडाला दोगांनाव तरास नाय झाला. खालीच लोळलेवते. नीस्ती कूस बदलली
मस्तच!!!!
जियो बेटा, हमारी उमर लेके जियो!!!!
तुझा पक्का फॅन,
डांबिसदादूस
(पुढल्या ट्रीपला आलं पाहिजे तुझ्याकडे! सुक्या जवल्याची चटनी आणि पटनीची भाकरी खायाला!!!:))
19 Dec 2008 - 10:37 am | विसोबा खेचर
सुक्या जवल्याची चटनी आणि पटनीची भाकरी खायाला!!!
हेच बोल्तो..! :)
(सुका जवला प्रेमी) तात्या अहिरे,
दिवा गाव.
19 Dec 2008 - 8:21 pm | ब्रिटिश
भास्करराव्,डांबिसदादूस,तात्या आन ईतर मीपाकर
सुक्या जवल्याची चटनी आणि पटनीची भाकरी,
जीताडा फ्राय न ओल्या बोंबलाच कालवन
कंदी बी या सगली सोय करत बगा
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
20 Dec 2008 - 1:06 am | विसोबा खेचर
कंदी बी या सगली सोय करत बगा
नक्कीच! संगती थोडी थोडी मोहाची पण घेऊ. लै दिस झालं मोहाची पिल्याला! :)
आणि सगली सोय म्ह़णजे? अगदी सगली? लागंल ती? ;)
आपला,
(बाईबाटलीतला) तात्या.
20 Dec 2008 - 5:12 pm | ब्रिटिश
>>>संगती थोडी थोडी मोहाची पण घेऊ.
मोहाची पीव्वर देत बग, पन बाकी मोह आवरून ये र दादुस
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
20 Dec 2008 - 7:05 pm | साखरांबा
तुम्ही ब्रिटिश हे नाव का घेतले आहे. कारण डोंबीवली ते कर्जत ह्या आमच्या पट्ट्यात आग्र्यांना ब्रिटिशच म्हणतात. कारण जनसामान्य त्यांचे नावही घ्यायला घाबरतात. आमच्या बेतुरकर पाड्यात या एकदा त्यांचा धाक पाहायला.
पण खरी गोष्ट वेगळीच आहे. आग्री हा शब्द अग्र ह्या शब्दावरून आला. समस्त आग्री लोक निर्भय आणि निधडे. शिवाजीच्या सैन्यात पहिली फळी (अग्र भाग) आग्री लोकांचीच असे. (जी बरेचदा कापली जायची. पण आग्री हे मरणाला पण न घाबरणारे) =D> .
20 Dec 2008 - 8:17 pm | ब्रिटिश
>>>तुम्ही ब्रिटिश हे नाव का घेतले आहे
उत्तर
डोंबीवली ते कर्जत ह्या आमच्या पट्ट्यात आग्र्यांना ब्रिटिशच म्हणतात.
>>>आग्री हा शब्द अग्र ह्या शब्दावरून आला. समस्त आग्री लोक निर्भय आणि निधडे. शिवाजीच्या सैन्यात पहिली फळी (अग्र भाग) आग्री लोकांचीच असे
शंकाच नाय
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
30 Dec 2009 - 9:49 am | विजुभाऊ
र बाल्या अतु हित न्हेमी लिवत नाय यो आमचा टोटल लास हय
लिवत जा ना.
30 Dec 2009 - 4:54 pm | jaypal
नाही तर फकस्त भाषणावर समाधान मानायला लागल असतं.
दादुस भावा लै भारी लिव्तोस. आवरला आप्ल्याला
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
1 Jan 2010 - 3:43 pm | समीरसूर
मिथुनजी,
खूपच जबरदस्त लेखन केले आहे तुम्ही. खूप मजा आली. तुमच्या लिखाणात अगदी बावनकशी कस आहे. धन्यवाद आणि अभिनंदन!!
--समीर
15 Mar 2019 - 5:08 pm | विजुभाऊ
र बाला. कुटे हाय रे तु ? कुटं दिसंना झाल्याव.
16 Mar 2019 - 10:37 am | मुक्त विहारि
+1
15 Mar 2019 - 5:18 pm | चौथा कोनाडा
हा .... हा ...... हा ....... ! भारी हाय दारूचा धन्दा ह्यो !