भेट...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
29 Sep 2015 - 7:16 pm

छान छान जावे दिवस
छान छान व्हावी भेट
दिवस जसा रात्रीला
येऊन भिडतो थेट थेट

मग होते रोजची सकाळ
सूर्य येताे प्रकाशात
दिवसभर थकून भागून
रात्री मिटतो आकाशात

असाच दिवस अशीच रात्र
मला खूप आवडते
मन माझं भेटीच्या त्या
सोनसंध्येला निवडते

आवडेल तुला जीवनात
अशी भेट झाली तर?
रात्री सोबत दिवसाला
नवी पालवी आली तर!?

मैत्रीच्या या फुलामधला
परागकण मी व्हावे
अश्या भेटिच्या पूर्णत्वाला
वर्षे ने ही यावे
.............................

https://lh3.googleusercontent.com/-EYWztyUpLBI/VgqDDyaMOMI/AAAAAAAAIj0/2_q3RAoLljs/s512-Ic42/sketch-1443527916810.jpg
(चित्र:- मीच काढलेले ...)

प्रेम कविताशांतरसकविता

प्रतिक्रिया

सटक's picture

29 Sep 2015 - 7:19 pm | सटक

प्रसन्न कविता!

चांदणे संदीप's picture

29 Sep 2015 - 7:24 pm | चांदणे संदीप

गुर्जी कविता छान! :)

हलकी-फुलकी!

चित्राबद्द्ल माझी एक शंका : तिथे सूर्य आहे का कुणाचे टक्कल चमकतेय? :-/

अभ्या..'s picture

29 Sep 2015 - 7:50 pm | अभ्या..

स्यांडया हानतो बघ तुला. गुर्जीना काय बी शंका इचारयाच्या नैत. ;-)
गुरजी मला आवडली बरका कविता. मस्तय.

चांदणे संदीप's picture

29 Sep 2015 - 8:04 pm | चांदणे संदीप

आस झाल का? पळतो मग आता कडकडन!

प्रचेतस's picture

29 Sep 2015 - 7:27 pm | प्रचेतस

हम्म...............

आता उत्तराची वाट पाहणं आलं.... ;)

प्रसाद गोडबोले's picture

29 Sep 2015 - 7:38 pm | प्रसाद गोडबोले

पहिल्या कडव्यावर हसु आवरलेच नाही =))

छान छान जावे दिवस
छान छान व्हावी भेट
दिवस जसा रात्रीला
येऊन भिडतो थेट थेट

दिवस जर रात्रीला येवुन छान छान थेट थेट भेटत असेल तर छान छान दिवस जाणारच की =))))

मग होते रोजची सकाळ

ह्या इथे बहुतेक जुन्या चाहत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या की आता पुढे काही सांप्रदायिक वाचायला मिळनार की काय ते .... पण छ्या , परत एकदा निराशा !

मन माझं भेटीच्या त्या
सोनसंध्येला निवडते

आं =))))

आवडेल तुला जीवनात
अशी भेट झाली तर?
रात्री सोबत दिवसाला
नवी पालवी आली तर!?

पहा : मॅटिनी शो http://misalpav.com/node/29459 =))

वर्षे ने ही यावे

ही वर्षा कोण ?

अवांतर : चमकते टक्कल कुठे आहे ?

अत्रुप्त आत्मा's picture

29 Sep 2015 - 7:59 pm | अत्रुप्त आत्मा

@दिवस जर रात्रीला येवुन छान छान थेट थेट भेटत असेल तर छान छान दिवस जाणारच की >>. दुत्त दुत्त पोपशास्त्री! :D
बाकीच्याचा समाचार लवकरच! ल्लुल्लुल्लुल्लु :-/

जव्हेरगंज's picture

29 Sep 2015 - 7:56 pm | जव्हेरगंज

मग होते रोजची सकाळ
सूर्य येताे प्रकाशात
दिवसभर थकून भागून
रात्री मिटतो आकाशात>>>>>
हे विशेष आवडलं. कडक!

प्यारे१'s picture

29 Sep 2015 - 8:14 pm | प्यारे१

>>>> छान छान जावे दिवस

कसं सुचतं ओ???? ;)
-ल्लुल्लुल्लुल्लु कवितेचा रीपिट ऑडियन्स ;)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Sep 2015 - 8:30 pm | अत्रुप्त आत्मा

असोच्च! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

खटपट्या's picture

29 Sep 2015 - 8:58 pm | खटपट्या

खूप छान कविता.

अरे तो टका कुठे गेला? त्याला म्हणाव.......

अत्रुप्त आत्मा's picture

29 Sep 2015 - 9:25 pm | अत्रुप्त आत्मा

संपादक लोक्स.. जरा हे क्लिअर चित्र लावा हो... प्लीज. :)

https://lh3.googleusercontent.com/-EYWztyUpLBI/VgqDDyaMOMI/AAAAAAAAIj0/2_q3RAoLljs/s512-Ic42/sketch-1443527916810.jpg

ढंप्या's picture

29 Sep 2015 - 9:39 pm | ढंप्या

पहिल्या कडव्याच्या पहील्या दोन ओळी जर पहिल्याच कडव्याच्या शेवटी लिहील्या तर........!!!

(हळू घ्या हो.... नाहीतर चेपायचे... )

पीके's picture

29 Sep 2015 - 9:47 pm | पीके

हे तर टक्कलच दिसतयं चमकनारं,.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Sep 2015 - 10:01 pm | अत्रुप्त आत्मा

माझं चित्र थोडं कमी पडलं हे मान्य करतो..आणि म्हणूनच स्पष्टीकरन देतो. ज्याला तुम्ही टक्कल म्हणता आहात.. तो काव्यगतीनुसार दिवस/रात्रीच्यामधे असलेला सूर्य आहे,असे मी गृहीत धरले आहे.
आणी..

डावीकडे पुरुष चेहेरा उजवीकडे स्त्री आणि त्यांच्या वर पार्श्वभूमी म्हणून सूर्य.. मागे त्याही वर घराकडे परतीला निघालेली पाखरे..

हे चित्राचं विवरण..
तरिही तुम्हाला चित्र पूर्वीसारखच पहायच असेल..तर पहा..मी कमी पडलेली बाजू स्पष्टीकरणातून भरलेली आहे..माझे काम संपले..धन्यवाद. :) __/\__ :)

प्यारे१'s picture

29 Sep 2015 - 10:04 pm | प्यारे१

>>>> डावीकडे पुरुष चेहेरा उजवीकडे स्त्री

इ तो यम यफ हुसैन से भी बढकर निकला ससुरा!
इन्डिया मे काहे खप रहे हो. इन्टरनैसनल जाओ इन्टरनैसनल. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Sep 2015 - 10:21 pm | अत्रुप्त आत्मा

तो पुरुष चेहेरा (चौकिनी कान) आणि स्त्री चेहेरा(गोलसर कान)... बाकि ..असो!

नीलमोहर's picture

29 Sep 2015 - 10:38 pm | नीलमोहर

चित्र पाहिल्यावर त्यातले दोन्ही चेहरे दिसून आले होते, मात्र तुम्ही म्हणताय तसं डावीकडे पुरुष उजवीकडे स्त्री
असं न दिसता बरोबर उलट वाटलं होतं, :)

प्रचेतस's picture

29 Sep 2015 - 10:10 pm | प्रचेतस

=))

कवीवर आपल्या कवितेबद्दल स्पष्टीकरणाची वेळ कधीही येऊ नये इतके बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद जय महाराष्ट्र.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Sep 2015 - 10:19 pm | अत्रुप्त आत्मा

कवीवर आपल्या कवितेबद्दल स्पष्टीकरणाची वेळ कधीही येऊ नये

हाच्च तो आगलाव्या कपटीपणा! मी स्पष्टीकरण दिलं चित्राबाबत...आणि ह्यांनी कवितेवर आळ आणला.. केला की नै जाणिवपूर्वक खोडसाळपणा https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif
------------------------------
खुर्चीमारातृप्त-फटकफटक आगोबा!
http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/chair-to-the-head.gif

प्रचेतस's picture

29 Sep 2015 - 10:45 pm | प्रचेतस

अहो पण ते चित्र पण कवितेचाच एक भाग आहे की नै?

अत्रुप्त आत्मा's picture

29 Sep 2015 - 10:48 pm | अत्रुप्त आत्मा

ते वाट्टेल ते असो... तुम्ही छळू विपर्यास केला ..हे णक्की!

प्रचेतस's picture

29 Sep 2015 - 10:53 pm | प्रचेतस

तो तुमचा समज आहे =))

अत्रुप्त आत्मा's picture

29 Sep 2015 - 11:26 pm | अत्रुप्त आत्मा

चालू द्या मग नेहमी प्रमाणे
.




निरर्थक आत्मकुंथन!

चांदणे संदीप's picture

29 Sep 2015 - 11:17 pm | चांदणे संदीप

गुर्जी, चित्र आणि त्यामागची कल्पना दोन्ही आवडले!
शिवाय, हे चित्र मोबल्यावर काढलेले दिसतेय, म्हणजे अजून भारी, कारण त्यातही सर्व आकार यथाशक्ती काढण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय आणि तो छान साधला आहे! कवितेला समर्पक!

पद्मावति's picture

29 Sep 2015 - 9:57 pm | पद्मावति

मस्तं! खूप छान कविता. आवडली.

पीके's picture

29 Sep 2015 - 10:21 pm | पीके

>>>> डावीकडे पुरुष चेहेरा उजवीकडे स्त्री...
आत्ता कळल पण मी उलट पाय्हल आणि मधोमध सुर्य नारायन मुकुट घतलेले... आणि वर तिन पक्षि पिवळ्या रंगतले? लय भारी..

समीर_happy go lucky's picture

29 Sep 2015 - 10:30 pm | समीर_happy go lucky

मस्त

श्रीरंग_जोशी's picture

29 Sep 2015 - 11:05 pm | श्रीरंग_जोशी

रचना विचार आवडला :-) .

एखादे वेळेस स्पष्टीकरण द्यावे लागलेही तर त्यात कमीपणा कसला. वाचकाचे आकलन कमी पडत असल्यास तो दोष कवीचा नक्कीच नसतो.

श्रीकृष्ण सामंत's picture

30 Sep 2015 - 7:41 am | श्रीकृष्ण सामंत

मला कविता आवडली.
चित्राचं म्हणाल तर मला वाटतं चित्रात वैचित्र अवश्य असावं.
मला तर चित्र पाहून, १०१ फ्रिवेवर ७० मैलाच्या वेगाने जाताना डॅशबोर्डवरचा स्पिडोमिटर भासला.

सौन्दर्य's picture

30 Sep 2015 - 8:03 am | सौन्दर्य

कविता छान आहे, चित्र देखील चांगले आहे. दोन चेहऱ्यांमधला सूर्य देखील लगेच कळला. कळल्या नाहीत त्या शेवटच्या कडव्यामधल्या शेवटच्या दोन ओळी.

बोका-ए-आझम's picture

30 Sep 2015 - 8:44 am | बोका-ए-आझम

परागकण मी व्हावे - वा! वा! (टाळ्या वाजवणारी स्मायली)
अशा भेटीच्या पूर्णत्वाला वर्षेनेही यावे (कन्फूजवा स्मायली)
तुम आ गये हो, नूर आ गया है - तो चलो, तीनो मिलकर चाय पीते है! असं आहे का काही?

अत्रुप्त आत्मा's picture

30 Sep 2015 - 9:03 am | अत्रुप्त आत्मा

प्रीतीचे फूल| >> परागकण| >>> वर्षा (पाऊस) >> वर्षेने प्रेमऱुतू बहरणे फुलणे

प्रचेतस's picture

30 Sep 2015 - 9:07 am | प्रचेतस

:)

चाणक्य's picture

30 Sep 2015 - 10:23 am | चाणक्य

हलकी फुलकी मस्त आहे.

पैसा's picture

30 Sep 2015 - 10:36 am | पैसा

छान कविता. पराग कोण माहीत आहे. ही वर्षा कोणे? प्रीती कोणे?

तुम्हाला चित्र कळते असे वाटते. रांगोळ्या त्याची साक्ष आहेत. मोबाईलवर काढायचा प्रयत्न करत असाल तर दुसरे काही सॉफ्टवेअर वापरून किंवा स्टायलस वापरून अधिक चांगल्या प्रकारे येतील. त्याचा सराव व्हावा लागेल. लोक हसले तरी चित्रे काढत रहा. हळूहळू सफाईदार येतील. हसतील त्यांचे दात दिसतील! त्यांना आपल्या दंतोत्पाटिका तै बघून घेतील! =))

प्रचेतस's picture

30 Sep 2015 - 10:49 am | प्रचेतस

कोणाची हिंमत आहे ओ अत्रुप्त सरांनी गुर्जींनी काढलेल्या चित्रांना हसण्याची.

सस्नेह's picture

30 Sep 2015 - 10:45 am | सस्नेह

असा परागकण असेल तर फूल नक्की जंबो साईझ असणार !
(..पळते आता...!)

वेल्लाभट's picture

30 Sep 2015 - 11:31 am | वेल्लाभट

कविता मस्तच....
समथिंग व्हिच यू कॅन स्माईल आफ्टर रीडिंग.

मला हे वाचून काहीतरी सुचलं. अगदी विडंबन नाही म्हणता येणार.... इथे पोस्ट करतोय प्रतिसादात.

मला जिथे वाटेल तिथे
घेऊन जाईल थेट थेट
कुठे मिळेल मला असं
जादूचं एक जंबोजेट

माझा मित्र माझा सखा
आठवेल जेंव्हा जेंव्हा मला
करून देईल का ते मग
तेंव्हा त्याची माझी भेट

स्वप्नात दिसतं गाव मला
सत्यात मात्र नसतं ते
स्वप्न आणि सत्यामधलं
उघडेल का हो कधी गेट

आकांक्षेला धीर नसतो
विचारांना नसते घाई
मधल्यामधे मन मात्र
करत राहतं नेहमी वेट

मला जिथे वाटेल तिथे
घेऊन जाईल थेट थेट
कुठे मिळेल मला असं
जादूचं एक जंबोजेट

मांत्रिक's picture

30 Sep 2015 - 11:35 am | मांत्रिक

वा वेल्लाभट, क्लासच!!!
झक्कासच!

अत्रुप्त आत्मा's picture

30 Sep 2015 - 4:20 pm | अत्रुप्त आत्मा

+१

वाह रे वाह वेल्ला भटा
छान लिहीलस पटा पटा!

मायला जिल्बीच पडली वाक्य ल्ह्यायला गेलो आनी! :D

वेल्लाभट's picture

1 Oct 2015 - 10:38 am | वेल्लाभट

थँक्यूच म्हणजे एकदम :)

शिव कन्या's picture

1 Oct 2015 - 10:34 pm | शिव कन्या

आवडेश!

लीलाधर's picture

1 Oct 2015 - 12:29 am | लीलाधर

++++1111 बुवा छान छान शुंडर कविटा

आदूबाळ's picture

1 Oct 2015 - 12:54 am | आदूबाळ

वा ये बात! अत्रुप्त आणि वेल्ला दोघांनाही.

श्रीकृष्ण सामंत's picture

1 Oct 2015 - 7:35 am | श्रीकृष्ण सामंत

प्रथम अत्रुत्पजी अन नंतर वेल्लाभटजीकडून स्फुरण मिळाल्याने मलापण रहावलं नाही.

छान छान जावे दिवस
छान छान व्हावी भेट
मुलगी जशी आईला
येऊन भेटते थेट थेट

मग होते रोजची सकाळ
बाबा येतात प्रकाशात
आणि
दिवसभर थकून भागून
रात्री भेटतात घरात

अशीच आई असेच बाबा
मला खूप आवडतात
मन माझं भेटीच्या त्या
उत्सुकतेने वाट पहातात

आवडेल तुला नेहमीच
अशी भेट झाली तर?
आई बरोबर बाबांना
जवळ जवळ पाहिले तर?

प्रेमाच्या या कबाबमधे
हड्डी मी न व्हावे
अशा भेटिच्या प्रसंगाना
खंड कधी न यावे

वेल्लाभट's picture

1 Oct 2015 - 10:46 am | वेल्लाभट

धन्स!!!

नाखु's picture

1 Oct 2015 - 9:35 am | नाखु

कवीता आवडली.

आप्ल्या शिषोत्तमाचे इकडे लक्ष्य जावो हि आकाशातल्या बाप्पाकडे प्रार्थना.

समस्त्बुवाप्रेमीमिपावाचक्परिवार्संचालीत जिल्बीकडबोळीचकलीहुकलीतरीखाल्ली महासंघ.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Oct 2015 - 10:19 am | अत्रुप्त आत्मा

जिल्बीकडबोळीचकलीहुकलीतरीखाल्ली महासंघ.

http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggling.gif

अत्रुप्त आत्मा's picture

1 Oct 2015 - 7:13 pm | अत्रुप्त आत्मा

सर्व भेटकय्रांचे आभार. :)

भावंविश्वं जमलंय, पण इथेही दिवस गेलेले बघून ....'अ'य मीन गेलेले दिवस बघून...तोचतोचपणा वाटला. कविता कळली नाही तो भाग वेगळा!!

अत्रुप्त आत्मा's picture

1 Oct 2015 - 8:44 pm | अत्रुप्त आत्मा

@भावंविश्वं जमलंय, पण इथेही दिवस गेलेले बघून ....'अ'य मीन गेलेले दिवस बघून...तोचतोचपणा वाटला. >> असो!

@कविता कळली नाही तो भाग वेगळा!! >> हे आपल्याला कळलं , स्वत:च स्वत: ! .. हे ही नसे थोडके!!!

हे आपल्याला कळलं , स्वत:च स्वत: ! .. हे ही नसे थोडके!!!

आपल्याला कविता कळतात हा तुम्चा कॉन्फिडन्स बघून मला नेहमीच कवतिक वाटतं, असो. शुभेच्छा!

अत्रुप्त आत्मा's picture

1 Oct 2015 - 11:41 pm | अत्रुप्त आत्मा

@मला नेहमीच कवतिक वाटतं,>> आणि सगळं तुलाच कळतं..हा तुझा काँफिडन्स बघून मला!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Oct 2015 - 8:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पहिल्या कडव्यामधे थोडी गडबड आहे.

रातराणी's picture

2 Oct 2015 - 11:52 pm | रातराणी

कविता छान :)
प्रतिक्रिया ह ह पु वा. छान स्ट्रेस बस्टर आहे हा धागा.:)

यशोधरा's picture

3 Oct 2015 - 9:43 pm | यशोधरा

पण ते जुळ्यांचं पुढे काय झालं ओ? आणि भावविश्वाचं काय झालं पुढे?

अत्रुप्त आत्मा's picture

3 Oct 2015 - 10:56 pm | अत्रुप्त आत्मा

आंSSSSS दुत्त दुत्त ! मी ब्रेक घेतलाय ना जरासा! :-/

यशोधरा's picture

4 Oct 2015 - 4:14 pm | यशोधरा

येवढा मोठा ब्रेक???? तिकडे जुळ्यांची लग्ने होऊन एव्हांना त्यांना जुळी झाली असतील!!

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 4:43 pm | टवाळ कार्टा

मनाचा ब्रेक...उत्तम ब्रेक =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Oct 2015 - 10:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आज कट्ट्यामधे समस्त मिपाकरांतर्फे दिवाळी अंकामधे कथानायक, वैजुवहिनी आणि छोटा सुखी परिवार ह्यांचं दिवाळीभावंविश्वं यावं अशी आग्रही मागणी केलेली आहे. यंदाचा दिवाळी अंका गाजणार :)

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 10:41 pm | टवाळ कार्टा

अग्दी बारश्यासकट ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Oct 2015 - 7:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कोणाच्या? नावं तर ठेउन झाली ना?