चुलीमध्ये घाल

Primary tabs

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
22 Sep 2015 - 9:44 am
चुलीमध्ये घाल

मेघ भरजरी आठवणींचे, दाटून आले काल
नयनामधे आली त्सुनामी, वाहून गेले गाल

जाता जाता हळू घातली भुवई उचलून साद
या चिमणीच्या चोचीसाठी दाणा घेऊन याल?

बोल बोबडे मर्दुमकीचे बोलून झाले फार
असेल जर का तुझ्यात हिंमत, हाती घे तू मशाल

कर्ज काढुनी कशास शेती कसतोस मित्रा सांग
येडपटांचा येडा धंदा कुत्रं खाईना हाल

साहित्याचा खेळ गारुडी तेजीत आला फार
पराजितांचे अश्रू विकुनी झालेत मालामाल

या मातीचा लोळ एकदा क्षितिजे भेदुनी मार
चिंब न्हाऊ दे दिगंताला रंग दे लालीलाल

'अभय' देईना पोशिंद्यास; वाचू कशाला सांग?
तुझे प्रबंध तुपात घोळून चुलीमध्ये तू घाल

                                - गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अभय-गझलवाङ्मयकवितागझल

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

22 Sep 2015 - 10:00 am | अनुप ढेरे

आवडली!

नाव आडनाव's picture

22 Sep 2015 - 10:24 am | नाव आडनाव

कविता आवडली.

चांदणे संदीप's picture

22 Sep 2015 - 10:40 am | चांदणे संदीप

आवडली गझल!

वेल्लाभट's picture

22 Sep 2015 - 11:05 am | वेल्लाभट

वा ! छान !

dadadarekar's picture

22 Sep 2015 - 2:30 pm | dadadarekar

छान

दमामि's picture

23 Sep 2015 - 6:02 am | दमामि

आवडली

गंगाधर मुटे's picture

24 Sep 2015 - 6:05 pm | गंगाधर मुटे

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

विवेकपटाईत's picture

24 Sep 2015 - 8:57 pm | विवेकपटाईत

साहित्याचा खेळ गारुडी तेजीत आला फार
पराजितांचे अश्रू विकुनी झालेत मालामाल

नेह्मिच पराजित अश्रूंना बाजारात भाव असतो, आपण राणा प्रताप यांचे गुणगान करतो अपराजित बाजीरावला कोण विचारतो...

गंगाधर मुटे's picture

26 Sep 2015 - 6:04 pm | गंगाधर मुटे

खरे आहे विवेक पटाईत सर.
शेतकरी पराजित आहे म्हणून त्याच्या अश्रूंना चांगला भाव मिळतो. मात्र शेतमालास भाव म्हटले की भुवया उंचावतात.