**************************************************************************************
गळ्यातून उसळणार्या रक्ताला कसंबसं थोपवत ती कोसळली. तिच्यावर झुकून अश्रु ढाळणार्या त्याच्याकडे बघत गुरगुरली, "आय लव्ह यु टू, नासीर! पण सर्वस्व नव्हता कधीच तू माझं ! सॉरी हनी..."
त्याच्या विस्फारत्या डोळ्यांत बघतच तीनं तो सुरा हिसकला, आणि पुर्ण ताकदीनीशी त्याच्या छाताडात खुपसला. पार आतवर शिरला त्याच्या हृद्यात तो घाव.... तिच्यासारखाच !
अंगावर कोसळणार्या नासीरला बाजुला ढकलत ती खुरडायला लागली. किचनेमध्ये लपवलेला ट्रान्समिटर ऑन करुन बोलली, "यँकी चार्ली हिअर. टारगेट ब्रिच्ड. क्लिअर टु अटॅक.."
अंगातली सगळी शक्ती ओरपून घेत तीनं गॅसची नळी ओढून तोडली. थकल्या डोळ्यांसमोर सगळा इतिहास तरळत असतांनाच तीने लायटरचा खटका दाबला. तिच्या विझत्या नजरेत त्या छुप्या बेसकँपमधला आगडोंब भडकत होता..
प्रतिक्रिया
21 Aug 2015 - 1:27 pm | चिगो
हा दुसरा सिक्वल..
पहीला (आणि पुर्णतः वेगळा) सिक्वल इथे..
21 Aug 2015 - 1:55 pm | लव उ
निव्वळ अप्रतिम
21 Aug 2015 - 1:59 pm | एस
भयंकर! बरीच सूचक!
21 Aug 2015 - 7:38 pm | जडभरत
हं दिला दणका
+१
21 Aug 2015 - 2:01 pm | खेडूत
भारीय! !
आवडला.
21 Aug 2015 - 2:44 pm | प्रदीप@१२३
आवडली...
21 Aug 2015 - 11:40 pm | प्यारे१
आवडली
21 Aug 2015 - 11:55 pm | अनिरुद्ध.वैद्य
आवडली!
22 Aug 2015 - 12:18 am | पद्मावति
पहिल्या सीक्वल पेक्षा हा सीक्वल मला जास्तं योग्य वाटतोय.
22 Aug 2015 - 9:31 am | एक एकटा एकटाच
मस्त
सिक्वेल चांगलाय
पण एखाद्याचा गळा चिरलेला असताना ती एव्हढ सगळ करेल?
बाक़ी हां उत्तरार्ध मस्त आहे
22 Aug 2015 - 10:00 am | उगा काहितरीच
कैच्याकै !
24 Aug 2015 - 11:55 am | चिगो
उगा काहीतरीच आहे, नाही? ;-)
22 Aug 2015 - 10:22 am | तीरूपुत्र
भारी.... आधीची पण भारी होती.
22 Aug 2015 - 6:51 pm | अभ्या..
भारी एकदम चिगो.
मस्त.
22 Aug 2015 - 7:03 pm | प्राची अश्विनी
मस्त! +१
22 Aug 2015 - 7:33 pm | पैसा
मस्त कलाटणी! दोन्ही उत्तरार्ध आवडलेत!
22 Aug 2015 - 8:25 pm | नाव आडनाव
+१
22 Aug 2015 - 11:51 pm | अत्रुप्त आत्मा
+१
23 Aug 2015 - 1:15 am | रेवती
+ २.
मस्तच जमलाय सिक्वल.
23 Aug 2015 - 9:58 am | विवेकपटाईत
+१ आवडली, बाकी फालतू प्रश्न विचारू नये, मुंबैया फिल्म मध्ये काही हि शक्य आहे.
24 Aug 2015 - 11:56 am | चिगो
येक्झॅक्टली..
('अजूबा'प्रेमी) चिगो.. ;-)
23 Aug 2015 - 3:40 pm | gogglya
+१
24 Aug 2015 - 10:19 am | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं !
24 Aug 2015 - 11:59 am | चिगो
धन्यवाद, डॉक्टरसाहेब.. मी तुमच्या शशकच्या सिक्वलची वाट बघतोय..
24 Aug 2015 - 3:08 pm | मृत्युन्जय
आवडली.
25 Aug 2015 - 8:54 am | प्रचेतस
जबराट उत्तरार्ध.
25 Aug 2015 - 10:36 am | नाखु
डबल दणका !!!
25 Aug 2015 - 12:59 pm | प्यारे१
ही आवडली.+१
25 Aug 2015 - 2:29 pm | अन्या दातार
+१
26 Aug 2015 - 4:38 pm | माधुरी विनायक
+१