अमावस्येची रात्र होती . रात्रीचे ८ वाजले होते . 'काल्या' बाबा राजीव सोबत आपलं सगळं समान घेवून आला .गुढघ्यापर्यंत काळी कफनी , खाली काळी लुंगी , कमरेला कमरपट्ट्या सारखं लाल कापड बांधलेलं . खांद्याला काळ्याच कापडाची झोळी. कपाळावर काळा टिळा. डोक्याला काळं फडकं गुंडाळलेल. ह्या सगळ्याला म्याचींग असा शरीराचा रंगहि काळाच . पण डोळे मात्र कमरपट्ट्याला म्याचींग असे लाल आणि बटबटीत .त्याच्या ह्याच अवतारामुळे ज्यांना तो माहित होता ते त्याला काल्या बाबा म्हणायचे . काल्या एक तांत्रिक होता . काळ्या शक्तींची उपासना करायचा तो . काही काळ्या शक्ती आणि सिद्धी वश होत्या त्याला . त्याने सावित्री बाईंना तांब्याचा कलश पाण्याने भरून आणायला सांगितला .राजीवला घराची दारं खिडक्या बंद करायला सांगितली . घरात राजीव आणि सावित्री बाई दोघंच होते . केतकीला तिच्या आजोळी पाठवलं होतं .
राजीव च्या हातातल्या पिशवीतलं समान एक एक करून बाहेर काढण्यात येत होतं . नारळ, फुलांचा हार , उदबत्त्या , काळे उडीद , गुलाल , हळदी कुंकू आणि काय काय . तो 'ती' ला पकडून नारळात बंद करणार होता ना . सगळी मांडामांड करण्यात तासभर तरी वेळ गेला . कुंकू पाण्यात भिजवून त्याने एक विशिष्ट प्रकारचा त्रिकोण काढला . त्याचे ६ भाग पडून त्यात विशिष्ट अक्षर काढलं . त्रिकोणाभोवती बुक्क्याचा काळा गोल काढला . मधोमध तो कलश आणि त्यावर नारळ ठेवण्यात आला . तयारी झाली .
पण तिला बोलवण्यासाठीच्या अभिचाराची सुरवात रात्री ११ वाजता होणार होती . मध्ये २ तास वेळ होता . तोपर्यंत सावित्री बाईंनि बनवलेल्या चमचमीत सामिष आहारावर ताव मारता येणार होता . गप्पा छाटता येणार होत्या . आपण तुमच्यावर उपकार करायला आलो आहोत ह्याची जाणीव करवून देवून राजीव आणि सावित्री बाईंना त्याने त्याची खास बडदास्त ठेवायला सांगितली होती .सामिष आहार चांगला हाणून झाल्यावर त्याची गप्पा हाणायला सुरवात झाली . आपण किती वर्षे कठोर साधना केलीये . आपण कसे सिद्ध आहोत . कित्ती लोकं आपल्याकडे मदत मागायला येतात . आपण कसे आत्म्यांना मुक्ती देतो अशी त्याची बडबड चालूच होति. राजीव आणि सावित्री बाई निमुटपणे त्याच्या हो ला हो आणि नाही ला नाही करत होत्या . गप्पा आणि खाणं दोन्ही हाणून झाल्यावर ११ वाजलेत ह्याची राजीव ने त्याला जाणीव करून दिली .
त्याने सुरवात केली . मांडी घालून तो त्या गोलापुढे बसला . राजीव आणि सावित्री बाईंना शेजारीच अभिमंत्रित केलेल्या वेगळ्या गोलात त्याने बसवलं. १० मिनटे डोळे मिटून कशाचं तरी ध्यान केलं . मग झोळीतून त्याने एक डबी काढली . डुकराच्या चरबीत कापूर मिसळून बनवलेलं आणि मंत्रून ठेवलेलं एक विशिष्ट प्रकारचं काजळ होतं त्यात . ते त्याने मधल्या बोटाने स्वतःच्या डोळ्यात घातलं आणि मग त्या लालभडक डोळ्यांची पापणी जराही न लवता तो काही मंत्र पुटपुटू लागला. १० मिनट मंत्रजप चालू होता . १० मीनटां नंतर मंत्रांचा आवाज वाढला . एक एक काळा उडीद अभिमंत्रून तो त्या त्रिकोणातल्या एका एका अक्षरावर ठेवू लागला . सावित्री बाई आणि राजीव हे सगळं डोळे वटारून पाहत होते .काहीही हालचाल न करता स्तब्धपणे ते काल्या च्या हालचाली निरखत होते . आता १२ वाजून गेले होते . राजीव चं हृदय भीतीनं भरून गेलं . थोड्याच वेळात खोलीत उष्णता जाणवू लागली . काल्याचं मंत्र म्हणणं आणि 'ति'ला आवाहन करण चालूच होतं .ह्या सगळ्या प्रकाराने ती खवळली होती . खोलीतली उष्णता आता बरीच वाढली होती . इतकी कि उठून दारं खिडक्या उघडाव्यात असं राजीव ला वाटू लागलं . पण त्याने तसं काही केलं नाही . अन इतक्यात
"काल्या sssss . बंद कर तुझी नाटकं . " एका स्त्री चा आवाज घुमला .
राजीव आणि सावित्री ला फक्त आवाज ऐकू आला . राजीव थरारला . काल्याने ते काजळ डोळ्यात घातलं असल्यामुळे त्याला मात्र ती दिसत होती .
"आवाज बंद . गुमान ह्याच्यात शिर " - काल्याने नारळाकडे हात दाखवत म्हटलं
"मला पकडण्याइतकी शक्ती तुझ्याकडे नाही. चल निघ इथून " - तिने रागाने गुरकावत म्हटलं
"तू मेलीयेस . तुला माझ्याबरोबर यावंच लागल .तुला शेवटचं सांगतोय . ह्याच्यात शिर नायतर दावतो तुला हिसका "
हे ऐकल्यावर ती अजूनच चिडली . काल्याने काही मंत्र म्हणत ते काळे उडीद तिच्यावर फेकले . त्याचा तिला त्रास झाला . तिनं किंकाळी फोडली . तिचं रुपांतर एका पांढर्या धुराच्या छोट्या ढगात झालं . तो ढग त्या कलशाकडे जावू लागला . पण त्यात शिरण्याआधी जोरात एक फुंकर मारून तिनं तिथला गुलाल काल्या च्या डोळ्यात उडवला . तो डोळे चोळत असतानाच कलशावारचा नारळ उचलून तिने दाणकन त्याच्या टाळक्यात हाणला . ह्या आघाताने काल्या तिथंच आडवा झाला . अन ती खदखदा हसू लागली . त्या हसण्याच्या आवाजाने राजीव गर्भगळीत झाला . हा सगळा प्रकार बघून सावित्री बाई हि घाबरल्या . तिनं बजावलं .
"राजीssss व…. पुन्हा असं होता कामा नये . तुमच्या तालावर नाचण्याची अपेक्षा करू नका . आता ते दिवस राहिले नाहीत . " तिच्या आवाजात जरब होती .
तिचं ते हसणं हळूहळू वातावरणात विरून गेलं . ती गेलीये हे दोघांनाही समजलं . काय करायला गेलो आणि काय झालं . दोघाही डोक्याला हात लावून सुन्नपणे बसली .
कोण होती ती ? का करत होती असं ? काय घडलं होतं नेमकं ?
क्रमश:
प्रतिक्रिया
1 Aug 2015 - 4:31 pm | मुक्त विहारि
पुभाप्र
3 Aug 2015 - 3:34 pm | जडभरत
हं मस्तंय!!! भयकथांशिवाय मजा नाही. येवंद्या!!!
3 Aug 2015 - 5:24 pm | तुडतुडी
फक्त २ प्रतिसाद ? कुणी वाचत पण नै . जावूदे
3 Aug 2015 - 7:23 pm | उगा काहितरीच
असे नाराज होऊ नका हो ! रच्याकने मिपा बंद पडायची वेळ आणि मी प्रतिसाद द्यायची वेळ एकच झाली होती बहुतेक !
4 Aug 2015 - 7:31 am | जडभरत
शनिवारी रात्रीपासून सोमवार दुपारपर्यंत मिपाला काहीतरी प्राॅब्लेम येत होता. मलापण हा पूर्ण वेळ लाॅगिन करता आलं नाही. मला तर वाटलं मला ब्लाॅक केलं की काय. त्यामुळे प्रतिक्रिया देता आल्या नसतील लोकांना.
3 Aug 2015 - 5:39 pm | dadadarekar
छान
3 Aug 2015 - 5:43 pm | चिमी
४६० वाचने झाली आहेत तुड्तुडी तै. पण प्रत्येकाला प्रतिक्रिया द्यायला जमेलच असे नाही.
तुम्ही लिहा. आम्ही वाचत आहोत. छान लिहित आहात तुम्ही.
3 Aug 2015 - 5:46 pm | अनिरुद्ध.वैद्य
सुरुवात उत्तम … वातावरण निर्मिती चांगली केलीत …
जरा मारामारी वाढवालेली चालली असती की बाबा आणि भुताची!
तुमच्या तालावर नाचण्याची अपेक्षा करू नका . आता ते दिवस राहिले नाहीत
>>
बाकि सूनबाईंच भूत काय सावित्रीबाईंच्या :)
3 Aug 2015 - 7:17 pm | gogglya
लवकर येउद्यात...
3 Aug 2015 - 7:56 pm | बोका-ए-आझम
तुडतुडी, प्रतिसादांच्या संख्येवर कथेची गुणवत्ता मोजू नका. बरेच वेळा लोकांना काय प्रतिक्रिया द्यावी ते कळत नाही. कधीकधी त्यांना द्यायची असलेली प्रतिक्रिया कोणीतरी दुस-याने दिलेली असते. लोक वाचताहेत ना? मग झालं तर.
3 Aug 2015 - 8:42 pm | रेवती
वाचतिये. चांगलं लिहिताय.
3 Aug 2015 - 8:46 pm | दिनु गवळी
एक सांगु का लेखन जास्त करत जा मोठे भाग टाका लवकरच माझी १ नवीन भयकथा येनार आहे मि पा वर गावातील शांतता
4 Aug 2015 - 1:54 pm | होबासराव
छान, तसेही तुम्हि खालील प्रतिसदात म्हणाला होताच कि "भयकथा - शिकारी साखळी" त आता पांढरा कुत्रा नावाने कथा येणारेय. णिसो सर कृपया कथा लवकर टाका :)
http://www.misalpav.com/comment/724389#comment-724389
3 Aug 2015 - 11:20 pm | पुणेकर भामटा
सुरवात तर उत्तम झाली आहे … वातावरण गूढ होत चाललय... पुढील लेखाच्या प्रतीक्षेत, शुभेछ्या !!!
पुणेकर
4 Aug 2015 - 12:10 am | ससू
थोड्याच वेळात खोलीत उष्णता जाणवू लागली . काल्याचं मंत्र म्हणणं आणि 'ति'ला आवाहन करण चालूच होतं .ह्या सगळ्या प्रकाराने ती खवळली होती . खोलीतली उष्णता आता बरीच वाढली होती . इतकी कि उठून दारं खिडक्या उघडाव्यात असं राजीव ला वाटू लागलं .
बऱ्याच भयकथा आणी चित्रपट वाचन्यात आलेल्या आहेत केवळ छंद म्हणून. शक्यतो भूत, आत्मा, पिच्छाच, हडळ असे काहीही आले कि वातावरण थंड होते. तुमचे भूत जरा वेगळ्या प्रकारातले असावे. गरम करणारे. :)
.
.
तसे नाव हि तिचे तुम्ही माया ठेवलेच आहे ............. विंग्रजी मधला गरम अर्थ घेतो तूर्तास मायाला स्मरून
बाकी येऊ द्या लवकर......
4 Aug 2015 - 12:14 am | ससू
कृपया असे वाचावे :- भयकथा वाचन्यात आणी चित्रपट पाहण्यात.
4 Aug 2015 - 7:36 am | जडभरत
आयला हाॅट भूतिण!!! बिपाशाचे काय भूत? लै इंटरेस्ट दाखवू नका ओ साहेब. डोक्यावर येऊन बसंल रात्रीची.
4 Aug 2015 - 12:32 am | एक एकटा एकटाच
चांगली स्टार्ट आहे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत आणि शुभेचछा
4 Aug 2015 - 1:55 am | जुइ
वाचत आहे, पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
4 Aug 2015 - 8:00 am | दिनु गवळी
वाचाल हो
4 Aug 2015 - 7:45 am | अजया
वाचतेय. पुभाप्र.
4 Aug 2015 - 8:36 am | नाखु
भुत्या नाखु
4 Aug 2015 - 12:24 pm | तुडतुडी
हा आत्ता कसं . :-) सर्व प्रतिसादांसाठी धन्यवाद . आज संध्याकाळ पर्यंत पुढचा भाग टाकीन .
४६० वाचने झाली आहेत तुड्तुडी तै. >>
पण तुम्हाला हे कसं कळलं ? किती जणांनी हा धागा वाचलंय हे कळतं का ?
@दिनु गवळी . हो प्रयत्न करीन . तुमची पण कथा येवू द्या लवकर
4 Aug 2015 - 12:28 pm | अमृत
तिथं खाली लिहून येतं ना. आता बघा ११२५ वाचने झालीत.
4 Aug 2015 - 3:04 pm | मास्टरमाईन्ड
हे मात्रं जबर
4 Aug 2015 - 3:10 pm | प्रियाजी
वाचत आहे. पुभाप्र.
4 Aug 2015 - 3:10 pm | प्रियाजी
वाचत आहे. पुभाप्र.
4 Aug 2015 - 5:53 pm | मितान
भारी सुरुवात ! आता पुढचा भाग वाचते..
5 Aug 2015 - 9:13 am | पाटील हो
पुढील भागाच्या प्रतिक्षेत