ढिश्श्....क्लेमर! :- ज्यांना लेखन वाचताना शिव्यांचा व तथाकथित अश्लिलाचा त्रास होतो,त्यांनी खरच येथून खाली वाचू नये..आणि तरिही वाचलेत व वाचून वाइट वग्रे वाटू लागले..तर ते मनातल्या मनातच-वाटून घ्यावे! ;) तसेच कथा/संवाद हे वास्तववादी आणि पात्र काल्पनिक आहेत. हे जम्ले त्र लक्षात ठिव्ने!
टाइमः- हमालांची ..मार्केटयार्ड मधली कामं संपल्यानंतरची एक दुपार..
राम्या:- ए गन्या........गां*&^% बडिशोप कशाला आन्ली बे परत?
गन्या:- मां...ग्??? सारकि सारकि जिरा कशाला? आजारी पडल्यागत वाटतं पिताना
राम्या:- आरं पन आय&^%$ हीनी दुपारचं आंग लै काटा मारत ना बे.......!
गन्या:- मंग त्येला काय जालं? दुपारचा तिकडं जा की काटा काढायला..
राम्या:- हा...........मला बायका प्वारं हायेत..तुज्यासारखा धा ठिकानी सोडल्याला हे ? व्हय का रे भाड%$?
गन्या:- ह्हा ह्हा ह्हा ह्हा ह्हा....... आयच्या गावात तुज्या...तुला ह्ये आवाडतं आनी त्ये का नाय रे आवडत?
राम्या:-मला नाय लागत तस्लं..आपली ती सवय न्है..आपली लावली थोडी कुटं ज्येवलं नंतर की निवांत झोपाव घरला..
गन्या:-ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआ .तू भेतो ..खरं सांग? भेतो का नाय?
राम्या:- हा......कशाचं भ्या? छत्री वापारली,तर पावसाचं भ्या कोन्ला? तुज्यासारखा गायबानछाप असतो तर भ्येलो असतो..आम्हाला आपलं आदी पासून म्हैते.."हात न धुता खाऊ नये अन्न्,आनी *****नी आदी झाकुन घ्याव ****!"
गन्या:- ह्ये ज्यायचं तेज्या...मुतार्यात ल्हिलेलं कै बी वाचतो व्हय? येड्या&*^चा का रे तू...?
राम्या:- आता तुजी गां&^% *&^न दाखवू का कसल्या ह्याचा मी हे ते...एयच तेच्या..
गन्या:- ह्हॅ ह्हॅ हा...ह्हा..ह्हा.. ह्हॅ ह्हॅ हा...ह्हा..ह्हा.. ह्हॅ ह्हॅ हा...ह्हा..ह्हा..बरं...बरं..जाऊ दे तू श्यान्या बोड्याचा....मग आज चल की ..छत्र्या हेत माज्याकडं...
राम्या:- त्ये ठेव तुलाच..माजी पाठ दुखायली..मी झोपायलो हितच आता..जेवन झाल्यावं. तू जा तुजी आय *&^% जाऊन तिकडं
गन्या:-ह्या ह्या ह्हुक्क! मी बी कटाळलो.. आता मि आंग टाकतो हितच आज.. मला ज्येवान नको.. मायाकड कालच्यातली जिरा..अजुन हे थोडी.. मी त्ये मारुन झोपनार. तू जा ज्यवायला. काय खानार आज? डाळरैस का वज्डीपाव?
राम्या:- चिकण!
गन्या:- कुणी दिल्हे पैशे?
राम्या:- माजा बाप आलता वरनं.. तू पे..आनी झोप आय%$# ...फुकट तेज्यायचं चौकश्या करत आ%$#^लं!
..........................................................................
झाड कामगार स्त्रीया
१:- काय गं बया ह्ये दोगं ?
२:- जाऊ दे...रोजच्च हे की ते! आवार लवकर ..त्ये (फुलाच्या) कचर्याचं बारदान आन
१:- हा गं...आडिच वाजायला आले.. कवा घरला जायचं न काय?
२:- जाऊ..जाऊ की. ह्ये तीन गाळे झाले की सपल!
१:- हा गं बाय.. सीजन्चं लय थांबाय लागतं हा पन..नाय त ह्या टैमला घरी असतो आपन..
२:- आनी न्हाई तवा लवकर जाऊन काय असतं?
१:- च्च्क्क!
२:- उलट ह्ये शिजन्ला बरं... नुस्ताच कच्रा लागतो झाडायला.. येश्टेज नसतं
१:- हा गं बाय.. खरं! न्हाय तं ये र्हायल्येले फुलभारे फ्येकायला लै ब्येक्कार
२:- मं......??? हितं असच हे.. इकली तं फुलं,नाय तं कच्रा!! हॅ हॅ हॅ हॅ !
१:- ह्ये ह्ये ह्ये ह्ये..त्या अनास्पुरेच्या शिनिमातला डायलॅग मारती व्हय.. चल आवर चल! लै.........आवडतो गं तुला तो!
२:- ................................ (लाजून बुजून ग.......प!)
.......................................................................
बबनराव (गाळा नंबर *** ) :- ओ शामराव ..त्या गन्याच्या बोच्यावर लाथ घाला हो एक ..यायच त्येच्या! पाच वाजत आले तरी हितच पडलय.. घरी जाऊन पड की म्हनाव..
शामराव (गाळा नंबर **) :- जाऊ दे की र्हाऊ दे.. जरा अंदार पडला डास चावले की उठल...
ब:- काय?
शा.:- आओ..प्प्ल्ल्ल!!! छ्या! काय राव तुम्मी पन?
ब.:- त्ये कळ्ळ हो.. आओ मी काय विचारतो म्ह्न्जे ..ह्ये बेनं का चाऊन म्येलेलं डास? असं विचारतोय. नाय त तुम्हाला काय वाटलं? काय तुम्मी पन?
शा.:- मला कशाला काय वाटायचय... चला च्या मारू...संद्याकाळ व्हुइल येवढ्यात.
ब.:- मायला ..पाचाचा टैम व्हय्ला आला..तरी ह्ये हित्तच असतं कित्तीकदा. ह्येला घरदार न्है का ओ?
शा.:- नसल...न्हाय तं आदी असल आनी आता नसल!
ब:- यायला....लै हुश्शार तुमी!!!
शा:- मां............ग??? वाटलं काय तुम्माला..? चला आता कॉटर मारु
ब.:- हा.... सोडा वाट.. तुमाला कारनच पायजे..
शा.:- ओ ...ओ.. थांबा.. ओ.. मज्जा क्येली.. च्या तर मारुन जावा...ओ........................!
.......................................................................................................
टाइमः- सकाळचे साडेपाच सहा... चहाच्या आणि नाश्त्याच्या टपर्या बोलू लागतात ती वेळ..
आणि अश्याच एका टपरी जवळ...
ब.:- रामू........... आज पैजकराचा माल आपल्या गाळ्याला लाव सगळा
राम्या:- त्ये त्यांन्नी सांगू दे बाबा.. नंतर उगीच आमच्याव् येत त्ये!
ब.:- न्हाय र्ये! हिकड ये च्या घ्ये! ...
राम्या:- ...................
ब.:- प्ल्ल्ल! हिकडं ये ना...!!!
राम्या:- ... ........
ब.:- बर बर... ह्ये पैश्येपन घ्ये!
राम्या:- काय नको..नंतर कट-मारताल तुम्मी!
ब.:- हाय का! येक नंबरे संशयी..ब्वार.. ह्ये सगळे घ्ये अत्ताच..
राम्या:- (आनंदून..) द्या!
ब.:- ह्हा! येकच नंबर.. आता पैजकराच्ये झेंडूचे सगळे क्यांटर्/पोती आप्ल्याकड..क्काय?
राम्या:- हा.
चहावाला:- काय बबन सा हे ब?
बः- ए........गपे!
चः- ह्या ह्या ह्या! सकाळीच कोंबडी मारली का?
बः- कश्याची? ह्यी त चिम्नी!
चः- हा........शिकवा आमाला. तुम्मी कोंब्डीला चिम्नी म्हन्नार आनी बोकडाला मांजार!
बः- (मनमुराद हसत..) मग तू भाड्या पेश्शल कशाचा देतो..म्हैत नै का आम्माला?
चः- पन मग फक्त दोनच रुपे जादा घ्येतो!
बः- हा....शान्या... @#$%ला शिकव आता आमाला...
चः- ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या!!!! द्या इस रुपे आता दोन पेश्शल च्ये!
बः- ह्हाआ! पेश्शल..म्हैते.. घ्ये.. मर!
.................................................................
टाइमः- साडेसात ..ते आठ वाजत आलेत..फुलाचे पंधरा/वीस टेंम्पो/मिनि ट्रक आत लागलेत. गिर्हाइकांची वर्दळ सुरु झालीये...
"ये गोंडा सत्तर... सत्तर... ताजा माल! "
..."य्ये चाळ्ळीसला लड,लवकर वढ!"
......."कलकत्ता......येकशेइस...येकशेइस..लवकर जानार.. लवकर या!"
.........."ये साटला किलो...बिजली .........य्य! बिजली..........य्य! "
..................."ए छडी थोडी...लवकर उडनार..लवकर या... थोडा माल..लवकर याल तर चांग्ला घ्याल..."
..........................."ए शिजनल ए शिजनल..ब्लॅकल्येडी.. पण्णास्ला जोडी..."
..............................."ह्ये कळी लागली आडिच्श्शे..लवकर घ्याल्,म्होट्टे व्हाल ....ह्ये कळी लागली आडिच्श्शे..लवकर घ्याल्,म्होट्टे व्हाल
......................................" ह्हे प्येढा..प्येढा..प्येढा....(पिवळा गोंडा....) येकशेचाळीस...येकश्येचाळीस!"
क्रमशः .............
प्रतिक्रिया
17 Jul 2015 - 1:58 am | बॅटमॅन
वा वा वा वा, कसलं छाण छाण लिवलायस रं ***च्या =))
मीच पैल्या**चा ;)
17 Jul 2015 - 4:34 am | पाषाणभेद
लयच भारी म्हनायचं काढा की पुडी मंग
17 Jul 2015 - 5:32 am | कंजूस
भारी निरीक्षण आणि व्याकरण.अगदी अमृततुल्ल्यानुभव.
एकदा गणपतीच्या दिवसांत मी मंडइत एका टोपी घालून फळाची करंडी ठेवून विकणाय्रास-"दगडुशेट गणपती कुठल्या बाजुला आहे?"
"कशाला पाहिजे?"
"बघायचा आहे ,इथून जवळ आहे असं कळलं ."
"दगडुशेट कशाला बघता?आमचा मंडइचा बघा."
"तुमचा बघुच हो पण त्याचा रस्ता कोणता?"
इकडे तिकडे पाहात," माहित नाही."
"किती वर्षे फळे विकताय मंडइत?"
इकडे तिकडे पाहाणे चालूच.
17 Jul 2015 - 7:02 am | प्रचेतस
खी खी खी =))
मार केट यार्डच उठवलंत हो.
17 Jul 2015 - 7:03 am | सोंड्या
सोल्लीड निरीक्षण. आवडल आणी जुने दिवस आठवले
-(12th नंतर पार्टटाईम हमाली, वाराय केलेला) सोंड्या
17 Jul 2015 - 7:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म!!!¶
फुलं, फुलपुडी आणि अजुन एक चौराक्षरी फुलवादी शब्द विसरला गेलेला आहे असं णम्रपणे सांगु इच्छितो. (हिंट-भक्ती बर्वेंच प्रसिद्ध नाटक)
17 Jul 2015 - 8:42 am | स्पा
दु दु मालकेट याल्ड
17 Jul 2015 - 3:43 pm | बॅटमॅन
पां डुब्बा =))
(गाळलेल्या सर्व जागा मगदुराप्रमाणे भरोन घ्याव्यात ही णम्र इणंती.)
17 Jul 2015 - 3:51 pm | सूड
श्लेष जमलाय बरं!!
17 Jul 2015 - 4:08 pm | बॅटमॅन
खी खी खी ;) =))
17 Jul 2015 - 8:44 am | खेडूत
आपल्या त्या फूलमार्केट कट्ट्याचं काय झालं पुढं?
अकलुजावरनं आल्यावर ठरवणार होतात तो?
17 Jul 2015 - 9:00 am | नाखु
दिसांनी भाषा (कानावर) आली. आणी यार्डात कांदा बाजारातील बियाणे कंपनीत काढलेली तीन वर्षे आठवली.
त्या तीन वर्षांवर एक लेख लिहायचा आहेच इरसाल आणि अस्सल गाववाल्या मंडळींचा बघू कधी योग येतो ते!!
पुभाप्र
17 Jul 2015 - 10:05 am | पगला गजोधर
दु:ख दूर करणं हे लेखांची जबाबदारी नसते. मात्र समाजातल्या काही घटकांच्या जीवनातलं दु:ख दाखवण्याचं एक महत्त्वपूर्ण कार्य या लेखाने केलं. या लेखाला मिळालेला प्रतिसाद पाहता मिपाकरांना विनोदापेक्षाही वास्तव अधिक भावते, त्याचप्रमाणे केवळ मनोरंजन करण्यासाठीच मिपाकर लेख वाचतात, असं नाही हे दिसून आलं. सामाजिक परिस्थिती, मानवी भावभावना इत्यादीचा ह्रद्यस्पर्शी संवेदना आजकाल गुर्जींच्या लेखणीतून होऊ लागला आहे, प्रखर सत्य वाचण्यास मिळाले म्हणून, एक मिपाकर असल्याचा आनंद झाला. मिपा हा समाजमनाचा आरसा आहे. मिपावरील या लेखासारखे काही लेखं असे असतात की, जे समाजात काय घडतंय, हेही दाखवण्याचा प्रयत्न करतात. कालानुरूप आधुनिक होत जाणाऱ्या वास्तववादाच्या प्रखर जाणिवांचा आविष्कार त्यांचा हा लेखं करतोय. नव्हे तर तो वाचकांच्या अंतकरणात आत्मपरीक्षणाच्या प्रेरणा जागृत करतोय. ज्या लोकांची उपजीविका हमालीवर अवलंबून आहे, त्यांच्या सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक जीवनाकडे या लेखाच्या माध्यमातून एक भाष्य करण्यात आलं. सादरीकरण, आशय, विषय, विशेषतः भाषाशैली याबाबतीत अतिशय सघन मांडणी इथे पहायाला मिळते. ही कथा मार्केटयार्डातील श्रमजीविंवर असली तरी आपल्या समाजात अत्यंत महत्त्वाचं कार्य करणा-या एका संपूर्ण व्यवस्थेलाच समाज कसा दुर्लक्षित करतो, त्यांच्या जीवनाची, त्यांच्या उपजीविकेची, त्यांच्या परिस्थितीची कशी काळजी घेतली जात नाही हे या लेखाद्वारे अधोरेखित होताना दिसतं, त्यामुळे मार्केटयार्डातल्या महत्त्वाचं कार्य करणा-या या लोकांविषयी एक आपुलकी निर्माण करणारा हा लेख आहे.
परीक्षक: कॉम्रेड वास्कनओरड्लास्की
17 Jul 2015 - 10:13 am | नाखु
गप्पबसून बोल्लास्की
17 Jul 2015 - 11:13 am | अत्रुप्त आत्मा
पा.भे
@लयच भारी म्हनायचं काढा की पुडी मंग >> ही घ्या!
कंजूसकाका
@एकदा गणपतीच्या दिवसांत मी मंडइत>> वर्तवणुकिचा अनुभव सारखाच असू शकतो..कारण मंडई हे आमच्या गुलटेकडी मार्केटयार्डाचं छोटं भावंडच!
आगोबाहत्ती
@मार केट यार्डच उठवलंत हो.>>> ल्लुल्लुल्लुल्लु
चिमणराव
@चौराक्षरी फुलवादी शब्द विसरला गेलेला आहे >> दू दू :-/
पां दूदू बा!
@दु दु मालकेट याल्ड >> अरे व्वा! दुध खुळ्या मुला,वाचा फुटली की तुला! ;)
खेडूत
@आपल्या त्या फूलमार्केट कट्ट्याचं काय झालं पुढं?
अकलुजावरनं आल्यावर ठरवणार होतात तो?>> म्होरल्या २५च्या रैवारला येतासा का? हितच ठरवू. बोल्ला..कोन कोन येन्नार?
गजो धर भैय्या
@परीक्षक: कॉम्रेड वास्कनओरड्लास्की>>> जम्लंजम्लंजम..लास्की! ;)
17 Jul 2015 - 11:28 am | खेडूत
ओ रैवार २६ ला हाय!
२५ ला मार्केट बंद हाय …
17 Jul 2015 - 11:32 am | अत्रुप्त आत्मा
ओव्ह......स्वारी..स्वारी... मिश्टीक हो गया..
तो फिर छब्बीस तैय!
18 Jul 2015 - 1:57 am | निमिष ध.
आमच्या गावची पुडी हाय बुवा. संगमनेरला तयार होते ती.
17 Jul 2015 - 11:26 am | टवाळ कार्टा
भारीये :)
17 Jul 2015 - 1:43 pm | भीडस्त
वाशि नायथं गुलटेक्डि मारकीटात यखांद्या गाळ्यावं खुडशित बसून आयकत बसल्यावानिच वाटलं पघा ओ गुर्जि...
यकच लम्बर..
म्होरलं त्यावढं टपाटपा टाकशान तं लयी बरं व्हईन.
17 Jul 2015 - 1:48 pm | प्यारे१
तुज्या मा*ला तुज्या!
आमच्या शेजारला हुबारला व्हतास म्हनलं आसंल कोनतर. हतं ईऊन आमच्या गप्पा लोकासनी सांगीत बसलाय व्हय रं *ड्या!
आसु दे पन कसं का हुईना आमच्या गप्पा तुमच्या त्या काय त्ये काम्पुटर का नेट तेझ्यावर पोचल्या. बरं वाटलं. घे ही घे शेवन्ती!
17 Jul 2015 - 2:31 pm | अत्रुप्त आत्मा
@आसु दे पन कसं का हुईना आमच्या गप्पा तुमच्या त्या काय त्ये काम्पुटर का नेट तेझ्यावर पोचल्या. बरं वाटलं. घे ही घे शेवन्ती!>> एयच तेच्या..तू ए व्हय! आमच्या भटांच्या गोष्टी तिकडं गाळ्याव टाकनारा! :P
17 Jul 2015 - 3:43 pm | प्यारे१
आवो पन आमाला काय कळतंय तुमच्यातलं? तुमी पानी घाला म्हनलं पानी घालाचं, तांदूळ व्हा तर व्हा, गोमतार प्या तं नाक बंद करुन प्या.... आमचा भार तुमा बामनावर! आमी येड़ीवाकडी जशी जमलं तशी पूजा करतो, तुमी मार्ग दाकिवताय. म्हनूंन तं तुमाला सोस्तात फुलं देतो गा!
ऐ फुलं घ्या फुलं.....य
17 Jul 2015 - 7:10 pm | अत्रुप्त आत्मा
@ आवो पन आमाला काय कळतंय तुमच्यातलं?>> :-D आ..गप भाड्या ग़हप! ;-) इचकून इचकून इचारतो घेतो सगळं काहाडुन! इचकून इचकून इचारतो घेतो सगळं काहाडुन! आनी हितं सगळ्यांच्या समोर पूजेतलं द्येतो व्हय य्रे सोडून! ;-)
सस्तात लावतो रेट सांगून वजनात मारतो हाप
आमला बी कळत असल धंदेवाइक पाप! :P ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ :P
17 Jul 2015 - 7:30 pm | प्यारे१
हयो बामन हाय कवी, हयो बामन हाय कवी
आन त्याच्या हातात सदानकदा ताक घुसळायची रवी....
.....भागो!
17 Jul 2015 - 7:46 pm | अत्रुप्त आत्मा
17 Jul 2015 - 2:09 pm | आदूबाळ
मस्त लिहिलंय!
17 Jul 2015 - 2:46 pm | सूड
ह्म्म!!
17 Jul 2015 - 3:18 pm | प्रसाद गोडबोले
पराग दिवेकर ह्यांच्या निरीक्षणशक्तीला मनापासुन दाद देण्यात येत आहे :)
18 Jul 2015 - 1:56 am | निमिष ध.
बुवा काय लिवलंय ते !! झकास झालयं एकदम!! मार्केट यार्डात तुमच्या बरोबर याय्ला पाहिजे आता.
18 Jul 2015 - 8:23 am | वडाप
तुमची अँटिना लइच पावरबाज हाये.
फुढचा लेख "स्वारगेट वडाप नाका" ?
18 Jul 2015 - 10:25 am | अत्रुप्त आत्मा
ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लू :P
18 Jul 2015 - 9:13 am | एक एकटा एकटाच
हां हां हां.........
18 Jul 2015 - 2:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
लय भारी !
18 Jul 2015 - 2:19 pm | आतिवास
मार्केट यार्ड आवडले.
निरीक्षणशक्तीला दाद.
18 Jul 2015 - 2:24 pm | ज्ञानोबाचे पैजार
मस्तच,
आवडले निरीक्षण
मार्केट यार्डात नुसते भटकायला पण फार मजा येते.
पैजारबुवा
18 Jul 2015 - 2:33 pm | खटपट्या
खूप मस्त...