"तुला निवड करावीच लागेल, हे शेवटचं सांगतेय" तिने कर्कशपणे ओरडून सांगितलं आणि टीव्हीवर कुंग फू पांडा बघत असलेल्या प्रीशाला ओढत घेऊन गेली. तो सुन्न होऊन त्या दिशेकडे पाहत होता.
शेजारच्या बेडरूममधून दाबून धरलेला एक हुंदका पदर चुकवून बाहेर आला आणि बरंच काही सांगून गेला.
अशी निवड करता येते? दोन्हीपैकी एक? आणि ती निवड करायचा हक्क मला आहे? आणि एकाला निवडायचे मग दुसर्याचं काय करायचं? कसं शक्य आहे? आणि निवडलं तरी हे इथेच थांबेल? पूर्वी थांबलंय?
त्याचं डोकं गरगरू लागलं. क्षणाक्षणाला विस्फोट होत होते. प्रीशाचं टिपेला पोचलेलं रडणं त्यात भर घालत होते. तो फ्लॅटच्या गॅलरीमध्ये मोकळ्या हवेसाठी आला..
"इनर पीस.. इनर पीस" टीव्हीवर मास्टर शिफू शिष्याला आयुष्याचं मर्म शिकवत होता.
"एक्झॅटली! हेच तर हवं आहे."
२१ च्या मजल्यावरून दूरवर दिसणार्या लखलखत्या दृश्याकडे बघत त्याच्या मनात विचार आला. त्याने खाली डोकावून पाहिलं तर काळी मिट्ट शांतता होती
आणि
"इनर पीस ..इनर पीस" पुटपुटत त्याने स्वतःला त्या अंधार्या जगात झोकून दिले.
प्रतिक्रिया
23 Jun 2015 - 1:09 am | श्रीरंग_जोशी
हे तर कायमचे पीस... :-(.
लघुकथा भावली.
23 Jun 2015 - 1:43 am | रातराणी
:(
23 Jun 2015 - 6:30 am | सस्नेह
मिनी कथा उत्तम. पण हे नाही पीस !
जीवनाचा अंत = पीस ?
23 Jun 2015 - 6:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
Inner peace is supposed to be new beginning not the end. :(
23 Jun 2015 - 10:04 am | विशाल कुलकर्णी
Inner peace is supposed to be new beginning not the end.
कॅप्टनशी सहमत आहे. माफ करा पण कल्पना थोडी गंडल्यासारखी वाटली मला.
23 Jun 2015 - 12:02 pm | नाखु
कप्तानाशी सहम्त आहे
23 Jun 2015 - 7:33 am | अभय म्हात्रे
छान कथा आहे.
23 Jun 2015 - 7:50 am | द-बाहुबली
काहीही हां(श्री)...
23 Jun 2015 - 8:43 am | उगा काहितरीच
सलग दुसरी शोकांतिका ! :'(
23 Jun 2015 - 9:19 am | पाटील हो
...
23 Jun 2015 - 9:36 am | चिगो
अरेरे.. मोजक्या शब्दांत बरंच काही बोलून गेली ही कथा..
सहज सूचना: कथेतील "आणि एकाला निवडायचे मग दुसर्याचा काय करायचं" मधे 'दुसर्याचं'हवं. हेच 'निवडला', 'त्याचा डोकं', 'आयुष्याचा', 'हवा' आणि 'पाहीला'इथेपण बदलायला हवं, असं वाटतं. बघा पटलं तर..
23 Jun 2015 - 10:35 am | पैसा
मोजक्या शब्दात खूप काही लिहिलंय. जीवनातला एकूण विरोधाभास छान पकडला आहे.
23 Jun 2015 - 12:20 pm | पद्मावति
तो एकच घातकी क्षण असतो तिथेच स्वत:ला संभळायचं असतं. नाहीतर आहेच मग 'इनर पीस'......
23 Jun 2015 - 12:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
स्वतःला सो कॉल्ड पीस मिळाली. मागे राहिलेल्यांची पीस कायमची घालवुन.
23 Jun 2015 - 12:58 pm | बॅटमॅन
मागे राहिलेल्यांचेच कौतुक फार ब्वा लोकांना. गेलेल्यांचे कांय?
24 Jun 2015 - 7:16 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
बाकीच्यांवर पण बळजबरीने "इनर पीस" मिळवायची वेळ येत असेल.
24 Jun 2015 - 12:48 pm | वेल्लाभट
इतरांच्या पीस ची काळजी करणं हे स्वतःच्या इनर पीस च्या व्याख्येत बसत नाही शेट.
23 Jun 2015 - 12:57 pm | स्पा
चांगला प्रयत्न
23 Jun 2015 - 12:59 pm | बॅटमॅन
असेच म्हणतो.
23 Jun 2015 - 1:05 pm | मुक्त विहारि
मस्त...
23 Jun 2015 - 1:12 pm | खटपट्या
आवडली कथा. इनर पीस मिळवण्याचे बाकीचे काही तथाकथीत मार्ग पडताळून पहायला हवे होते. असो.
23 Jun 2015 - 1:34 pm | मोहनराव
मस्त रे कप्या...
23 Jun 2015 - 1:34 pm | आतिवास
कथा आवडली.
23 Jun 2015 - 1:47 pm | इरसाल
तो जर १ ल्या किंवा २ र्या मजल्यावर रहात असता तर ?
24 Jun 2015 - 7:18 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
हॉस्पिटलातल्या सुंदर सौथैंडियन नर्सेस पहायला मिळतील. ब्लिसरिंग पीस. =))
24 Jun 2015 - 11:29 am | सुबोध खरे
चिमणराव
"सुंदर सौथैंडियन" नर्सेस यातच आंतरिक विरोध आहे.
आमच्या एका डॉक्टर मित्राला याबद्दल विचारले असता तो हे म्हणाला
सुसम्मा नाव असलेली नर्स सुंदर असू शकेल का?
म्हणजे समजून घ्या.
24 Jun 2015 - 11:53 am | कपिलमुनी
चिमणचे "वाचन" जोरात चालू आहे असा दिसत आहे.
24 Jun 2015 - 9:34 am | इरसाल
परफेक्टली ब्लँक बाँडी ;) (टींबावर लक्ष असु द्या !)
24 Jun 2015 - 1:12 pm | कपिलमुनी
वाचक व प्रतिसादकांनां धन्यवाद !