मिएनमार प्रकरणाच्या निमित्ताने... आंतरराष्ट्रीय सैनिकी कारवाया आणि त्यातून दिले जाणारे संदेश

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
14 Jun 2015 - 12:06 am

भारतीय सैन्याने मिएनमारच्या हद्दीतल्या अतिरेकी ठाण्यांवरच्या हल्ल्यांच्या बद्दल अनेक तज्ज्ञ आणि तथाकथित तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया येत आहेत. हे अपेक्षित आहे. जेवढी निरपेक्ष विश्लेषणे येत आहेत, त्यापेक्षा जास्त (या घटनेच्या दोन्ही बाजूने असलेल्या तज्ञांच्या व्यक्तिगत हितसंबंधांमुळे प्रत्येकाच्या आवडी-उद्येशा-प्रमाणे) तिखटमीठ मिसळलेली विश्लेषणे येत आहेत. हे पण अपेक्षितच आहे. कारण, अश्या प्रकारच्या, अंतिम परिणाम मिळविण्यासाठी नाही तर मुख्यतः संदेश देण्यासाठी केलेल्या कारवाईनंतर, तिचे अपेक्षित परिणाम साधण्यासाठी, कारवाईच्या बाजूला असणार्‍या लोकांनी तसे करणे आवश्यक असते. तर शासनात असलेल्या पक्षाला त्या कारवाईचे श्रेय मिळू नये अशी त्यांच्या विरोधकांची खटपट असते... ही वस्तुस्थिती देशांतर्गत आणि देशाबाहेर दोन्हीकडे आहे. मात्र, असा विरोध करताना देशाचे भलेबुरे नजरेआड करणे हे जगात इतरत्र अभवानेच पहायला मिळते, पण दुर्दैवाने आपल्या देशात हे काही नवे नाही. :(

असो. ही त्रोटक पार्श्वभूमी समजावून घेऊन आपण मूळ विषयाकडे वळूया...

मिएनमार प्रकारच्या कारवायांच्या मागे, केवळ ज्यांच्यावर कारवाई केली केवळ त्यांनाच नव्हे तर तडक संबंध असलेल्या/नसलेल्यांना इतरांना त्वरित/दूरगामी परिणाम साधणारा संदेश देण्याचा उद्देश असतो.

अश्या घटनांतील पूर्ण सत्य जर लगेच बाहेर आले तर ते एक मोठे आंतरराष्ट्रीय आश्चर्य आणि आंतरराष्ट्रीय बावळटपणाचे उत्तम उदाहरण होईल.

किंबहुना आंतरराष्ट्रीय राजकारणात "पूर्ण अथवा कायमस्वरूपी सत्य" असे काही नसतेच. असते ते केवळ...
(अ) "तत्कालिक उपलब्ध ज्ञान/पुरावे",
(आ) त्यावरून केलेले "दुसर्‍याच्या भली-बुरी कारवाई करण्याच्या ताकदीचे आणि इच्छाशक्तीचे अंदाज" आणि
(इ) त्यावरून बनवलेले "आपल्या फायद्या-तोट्याचे बोध (परसेप्शन्स)".

मिएनमार कारवाईच्या सद्या उपलब्ध असलेल्या माहितीवरून त्यांसंबंधीच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांचे थोडक्यात सकारण विश्लेषण व निष्कर्ष असे आहेत...

.

भारताची आंतराष्ट्रीय छबी सुधारली का ?

भारतीय सरकारने
(अ) ही कारवाई केल्यामुळे,
(आ) ती केल्याचे जगासमोर मान्य केल्यामुळे,
(इ) ती करण्याचा राजकीय व नैतिक अधिकार असल्याचे ठामपणे सांगितल्याने,
(इ) परत गरज पडल्यास भारताच्या "कोणत्याही" सीमेवर अशी कारवाई करायला कचरणार नाही असे ठामपणे सांगितल्याने...

भारताची आंतरराष्ट्रीय छबी सुधारली आहे हे न दिसायला एकतर सत्य सांगितले तर काय होईल या विचाराने घाबरगुंडी होणारे सशाचे काळीज असायला हवे अथवा देशाच्या फायद्यापेक्षा वेगळा व्यक्तीगत स्वार्थ डोळ्यासमोर असायला हवा.

.

सैन्याचे मनोबल वाढले का ?

सैन्याचे मनोबल हे केवळ त्याच्या सामरिक ताकदीवर अवलंबून नसते. शत्रूसमोर हात पाठीमागे बांधून गप्प रहायला भाग पडणे हे जगातल्या सर्वात प्रबळ सैन्याचेही मानसिक खच्चीकरण करू शकते.

त्यामुळे, भूतपूर्व सैनिक अधिकारी (उघडपणे), सद्या सेवेत असलेले अधिकारी (खाजगीत) आणि अनेक सामरिक तज्ज्ञ समाधान का व्यक्त करत आहेत याचे आश्चर्य वाटायला नको.

.

शेजारी राष्ट्रांच्या आणि एकंदरीत जगाच्या प्रतिक्रिया काय म्हणतात ?

पाकिस्तानचा एक अपेक्षित आक्रस्ताळा अपवाद वगळता आणि कारवाईशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या मिएनमारची अपेक्षित (याबद्दल पुढे स्वतंत्रपणे येईलच) संयत प्रतिक्रिया सोडता इतर देशांनी काहीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. याचा अर्थ ही कारवाई योग्य आहे हे पाकिस्तान सोडून इतरांना मान्य आहे. तसे नसते तर एका देशाच्या सैन्याने दुसऱ्या देशाची सीमा ओलांडणे याचा अर्थ सैनिकी आक्रमण असा होऊन तो मुद्दा यूनोत "सुओ मोटो (कोणत्याही तक्रारीविना)" दाखल होऊ शकतो. याच कारणासाठी कुवेत, इराक, अफगाणिस्तान, इ युद्धांपूर्वी यूनोमध्ये ठरव करणे आवश्यक झाले होते.

चीनने त्या अतिरेक्यांना आपली मदत नव्हती असे (कारण नसताना ?) विधान केले आहे आणि मुख्य म्हणजे काहीही विरोधी बोलणे टाळले आहे. इतर काही नाही तरी या एका गोष्टीचे पाकिस्तानला वैषम्य जरूर वाटले असेल.

.

जगाला कोणता संदेश गेला ?

"भारताकडे आता सबळ सैन्यदलाबरोबरच, ते वापरण्याची इच्छाशक्ती व धमक आहे." हे प्रतिपादन करण्यात भारत यशस्वी झाला आहे.

जागतिक राजकारणात दुबळ्यांच्या वाटेला नेहमीच दुर्लक्ष आणि फारतर भीक मिळते... जाणीवपूर्वक मान मिळत नाही, मैत्री तर नाहीच नाही.

पुढच्या योग्य कृतींनी सरकार हा फायदा अजून मजबूत करू शकले तर त्याची आंतराष्ट्रीय राजकारणात भारताचे स्थान मजबूत व्हायला आणि पाकिस्तानच्या कारवायांना शह देण्यासाठी नक्कीच मोठी मदत होईल.

.

सैन्याच्या यशाचा सरकार फायदा घेत आहे का ?

ज्याच्या इशाऱ्यावर सैन्याने वागावे असा दंडक आहे, त्या लोकशाही सरकारचा हा नैतिक हक्क असतो. सैन्याला त्याचे योग्य ते श्रेय देऊन सरकारने आपल्या श्रेय आणि उत्तरदायित्वावर हक्क सांगितला तर ते केवळ नैतिकच नव्हे तर आवश्यक आहे... नाहीतर पाकिस्तानसारखेच, भारताच्या निर्वाचित नागरी सरकारचेही सैन्यावर नियंत्रण नाही असा त्याचा अर्थ होईल.

"खर्‍या" लोकशाही देशातले सैन्य कोणताही महत्वाचा निर्णय निर्वाचित नागरी सरकारच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाही... आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून जाणे ही तर फार टोकाची गोष्ट आहे. त्यामुळे सैन्य कितीही सबळ आणि तयारीचे असले तरी शेवटचा निर्णय आणि त्या निर्णयाच्या अंतिम यशापयशाची जबाबदारी आणि म्हणूनच श्रेय/अपकीर्ती निर्वाचित नागरी सरकारचेच असते... मात्र, प्रत्येक कारवाईचे श्रेय/अपकीर्ती उघडपणे स्वीकारणे/न स्वीकारणे हे त्या सरकारच्या स्वतः आणि देशाबद्दलच्या फायद्या-तोट्याच्या बोधावर (परसेप्शन्स) अवलंबून असते.

अतिरेक्यांना आणि बाह्यजगताला संदेश देण्यासाठी केलेल्या या कारवाईच्या संदर्भात ते श्रेय उघडपणे घेणे अत्यंत आवश्यक होते.

.

भारताने या प्रकरणाची अती जाहिरात केली आहे काय ?

वस्तुस्थिती अशी आहे...
१. सैन्याच्या संबंधित अधिकाऱ्याने औपचारिक निवेदन केले.
२. उपमंत्र्यांनी टीव्हीवर मुलाखतसदृश्य विधान केले.
३. संरक्षणमंत्र्यांनी पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक संभाषणात उल्लेख केला.
४. राष्ट्रिय सुरक्षा सलागारांनी निवेदन तर केले नाहीच, पण नुसते अनौपचारिक वक्तव्यही केले नाही.
५. पंतप्रधानांनी निवेदन तर केले नाहीच, पण नुसते अनौपचारिक वक्तव्यही केले नाही.

उघड्या डोळ्यांनी मुद्दा समजावून घ्यायचा असल्यास वरच्या वस्तूस्थितीत उत्तर स्पष्ट आहे.

याविरुद्ध, ओबामांनी ओसामा प्रकरणात टीव्हीवर प्रत्यक्ष येऊन सर्व "मकार" वापरून भाषण दिले होते हे आठवत असेलच. त्या प्रकारणी अमेरिकेच्या सरकारी आणि विरोधी पक्ष या दोघांनीही त्यांची पाठराखण आणि अभिनंदन केले होते. म्हणूनच अमेरिका अमेरिका आहे आणि भारत भारत आहे.

.

मुत्सद्देगिरी (Diplomacy) म्हणजे सगळेच गुप्त ठेवणे असे आहे काय ?

शत्रूपासून सगळेच गुप्त ठेवून शत्रूला संदेश कसा देणार ? शत्रूला गुप्त खलिता पाठवून ?!

कधी तडक तर कधी "लेकी बोले सुने लागे" असे सांगून, तर कधी आपल्या फायदेशीर असत्य पसरवून, शत्रूला सतत गोंधळात म्हणजेच पर्यायाने चिंतेत गुंतवून ठेवून, आपल्या विरुद्धच्या कारवायांसाठी वेळ आणि धैर्य मिळू नये याची तजवीज करणे हे मुत्सद्देगिरीचे एक अत्यंत महत्त्वाचे अंग आहे.

भ्रामक नैतिकतेच्या नावाने स्वतःच स्वतःची पाठ थोपटत, अवास्तववादी कल्पना बाळगून, गेले अनेक वर्षे भारताने केवळ पाकिस्तानपुढेच नाही तर सर्व जगापुढे "एक संभाव्यरीत्या (potentially) ताकदवान, पण ताकदीचा उपयोग करण्याची धमक नसलेले आणि खुळ्या नैतिक कल्पना पुढे करून आपल्या भित्रेपणाचे समर्थन करणारे राष्ट्र" अशी छबी निर्माण केली आहे. त्यामुळे भारताने अनेकदा "रणांगणावर कमावले आणि तहात गमावले" ही म्हण सार्थ केली आहे आणि तो अनेकदा अत्यंत लहान आकाराच्या आणि सामरिक दृष्टीने निर्बल देशांपुढे हतबल झालेला आहे. मालदीवमधला सत्तापालट आणि श्रीलंकेने अणुपाणबुड्या आपल्या बंदरात लावण्याची चीनला दिलेली परवानगी या नजिकच्या काळातल्या दोन गोष्टी याचीच उदाहरणे आहेत.

ती छबी सुधारणे हे आताच्या सरकारपुढे सर्वात मोठे आव्हान आहे. जशी एखादी बँक गिर्‍हाईकाची आर्थिक (आणि बर्‍याचदा सामाजिक व राजकीय) पत पाहून त्याच्याशी काय आणि कसा व्यवहार करायचा ते ठरवते, तसेच राष्ट्रे इतर राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय पत (चांगले संबंध ठेवल्यास मिळू शकणारे राजकीय व आर्थिक फायदे आणि/किंवा चांगले संबंध न ठेवल्यास होऊ शकणारे राजकीय व आर्थिक तोटे) ठरवून मगच संबंधाचे स्वरूप ठरवतात. राष्ट्रांच्या बदलत्या पतीनुसार ते संबंध बदलत जातात.

या तत्त्वाचे उत्तम उदाहरण म्हणजे तथाकथित ताकदवान भारताला श्रीलंकाच काय पण मालदीव सारख्या नकाश्यावरच्या काही ठिपक्यांना आपल्या बाजूला ठेवणे शक्य झाले नाही. चीनने भारताभोवती मोत्यांची माळ (ऑपरेशन स्ट्रिंग ऑफ पर्ल) आवळून मुसक्या बांधल्या तर मग ना भारत राहील ना त्याची तथाकथित नीतिमत्ता !

श्रीलंकेत नवीन सरकार सत्तेवर येताच (यात भारताचा सहभाग होता हे उघड गुपित आहे) त्याने चीनला अणुपाणबुड्या बंदराला लावण्याची परवानगी रद्द केली; अनेक देश सद्या पाकिस्तानच्या भारताविरुद्धच्या काश्मीरसंबंधी आणि इतर कारणांनी केलेल्या आरडाओरड्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अमेरिका, युके, ऑस्ट्रेलिया, इ देशांची भारताच्या अणुप्रकल्पांविषयी व संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्याचे कायम सदसत्वाबद्दल सकारात्मक भूमिका घेताना दिसत आहे. ह्या घटना भारताची आंतरराष्ट्रीय छबी सुधारत असल्याची लक्षणे आहेत. या छबीमध्ये मिएनमार प्रकरणाने लक्षणीय भर घातली आहे.

.

सार्वकालीक जागतीक सत्ये

१. माणसे असो किंवा राष्ट्रे... सामर्थ्याला नाही तर सामर्थ्याच्या आपल्यावर होऊ शकणार्‍या विपरित परिणामाला घाबरतात.

म्हणूनच...

२. आजवरचा मानववंशशास्त्राचा अनुभव हेच सांगतो की, ज्याच्याकडे त्याच्या नीतीचे रक्षण करण्यासाठी ताकद असते आणि त्या ताकदीचा उपयोग करण्याची धमक असते, त्याचीच नीतिमत्ता जिवंत राहते. पूर्णविराम."

आणि...

३. शत्रूच्या हृदयात धडकी भरता आली की अर्धे युद्ध जिंकल्यात जमा होते आणि एकही गोळी न झाडता किंवा कमीत कमी रक्तपाताने पुरेसा संदेश पोचवून शत्रूला आपल्या मनासारख्या अटींवर तह करायला भाग पाडणे हाच युद्धातला सर्वोत्तम विजय होय.

अधिक माहितीसाठी वाचा:
१. सुन त्सू चे आर्ट ऑफ वॉर (ज्याचा चीन अत्यंत कौशल्याने उपयोग करत आहे),
२. कौटिल्याचे अर्थशास्त्र (ज्यावर सुन त्सूचे बहुतांश पुस्तक आधारलेले आहे असे म्हणतात, पण ज्याच्याकडे भारताने आतापर्यंत तरी पूर्ण दुर्लक्ष केले आहे).

.

संदेश योग्य ठिकाणी पोचला का ?

मिएनमार सरकारने उडते (low key) निवेदन केले, औपचारिक निषेध केला नाही आणि आंरराष्ट्रिय स्तरावर तक्रार केली नाही. पाकिस्तान सोडून इतर कोणत्याही देशाची विरुद्ध प्रतिक्रिया नाही. या कारवाईवर पाकिस्तानची "आमच्या विरुद्ध असे काही केले तर आम्ही अण्वस्त्रे वापरू" असे म्हणण्यापर्यंत मजल गेली आहे. ही नेहमीचीच रेकॉर्ड वाजवलेली असण्याची जितकी शक्यता आहे तितकेच ते असाहाय्यतेचे लक्षण आहे. भारताच्या इतर कोणत्याही शेजारी देशाला या कारवाई वर अभिप्राय देण्याची गरज भासली नाही. याचा अर्थ बाण जिथे अपेक्षित होता तिथेच बरोबर लागला आहे !

.

शेजार्‍याबरोबरच्या (मिएनमारबरोबरच्या) मैत्रिपूर्ण संबंधांनाही धक्का बसला का ?

कसा काय बुवा!? मिएनमारने तरी असे काही म्हटलेले नाही!

मिएनमारने कोणत्या आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर हा प्रसंग नेण्याचे जाहीर केलेले नाही. इतकेच काय भारताकडे त्यांच्या राजदूताच्या हाती एखादा निषेधखलिताही पाठविलेला नाही.

मिएनमारने काय केले ? तर "आमच्या भूमीवर परदेशी सैन्य आले नव्हते" असे एक अत्यंत सोज्वळ उडते (low key) निवेदन केले आहे. आपला उद्देश साध्य होण्यात मदत करणाऱ्या (एका कराराअन्वये, अतिरेकी त्यांच्या देशात खोलवर पळून जाऊ नये याची सहकार्यपूर्ण खबरदारी मिएनमार सैन्याने घेतली होती असे म्हणतात) देशाला त्याचे अंतर्गत हितसंबंध राखण्यासाठी एवढी सूट नक्कीच आहे !

शिवाय, ही सगळी कारवाई मिएनमारबरोबर काही सलोखापूर्ण सामंजस्य (? करार) असल्याशिवाय शक्य आहे काय ?

.

परस्परविरोधी वचने, मृत अतिरेक्यांची संख्या, खरे-खोटे फोटो, इ. इ.

मूळ संदेश महत्त्वाचा, तो स्पष्टपणे पोचला पाहिजे. बाकी सर्व गोष्टी शत्रूच्या मनात जेवढा जास्त गोंधळ (आणि म्हणून चिंता) निर्माण करणाऱ्या असतिल तेवढे आपल्या जास्त फायद्याचे ! त्याकरिता देशातील अथवा बाहेरील विरोधकांच्या खर्‍या-खोट्या विधानांचा जितका उपयोग होईल तितके ते स्वागतार्हच आहे.

.

प्रथम आक्रमण न करण्याचे एकतर्फी आश्वासन

याला आंतरराष्ट्रीय राजकारणात भोळसटपणा (स्पष्ट शब्दात मूर्खपणा) समजले जाते. आंतरराष्ट्रीय राजकारणात, खर्‍या ताकदीचा सच्चेपणा सांगणे म्हणजे, "वेळ आल्यास... किंबहुना वेळ येण्याचे टाळण्यासाठी... माझ्यात ताकद आहे आणि ती ताकद वापरायची धमक (राजकीय इच्छाशक्ती) आहे" अशी दृढ समजूत शत्रुपक्षाला करून देणे होय. शत्रू ते आपोआप समजून घेईल असा विचार करायला शत्रू काय आपला जिवलग असतो काय? किंबहुना, अशी एकतर्फी बंधने आपण आपल्यावर घालून घेण्याने शत्रुंच्या कारवायांविरुद्ध आपली सामरिक प्रतिक्रिया कशी असेल हे उघड करून शत्रूसमोर आपणच आपले हात पाठीमागे बांधून उभे राहतो.

.

क्रॉस बॉर्डर गुप्त कारवाया या नेहमीच गुप्त ठेवायच्या असतात... खरेच ?

हीच एक क्रॉस बॉर्डर गुप्त कारवाई होती असा समज असेल तर, शुभेच्छा!

सतत मिठाची गुळणी घेऊन चूप राहणे नव्हे, तर योग्य जागी संदेश देण्यासाठी कोणती कारवाई उघड करायची आणि कोणती गुप्त ठेवायची हे समजणे म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारणाची उत्तम समज असणे होय!

मिएनमार प्रकरणातली महत्त्वाची वस्तुस्थिती अशी आहे की कारवाई एका देशाबरोबर होती आणि संदेश जेवढा उत्तरपूर्वेतल्या अतिरेक्यांना द्यायचा होता तेवढाच तो इतरांनाही (आणि विशेषतः पाकिस्तानला) द्यायचा होता. गुप्तता बाळगून हे साध्य करता आले असते काय ?

.

असो अशा एका त्रोटक लेखात या विषयाचे गुंतागुंतीचे सर्व पदर उलगडणे शक्य नाही. पण मिएनमार प्रकरणामुळे आणि विषेशतः त्यासंबंधात चाललेल्या गदारोळामुळे मनात आलेले काही विचार इथे खरडले आहेत, इतकेच.

धोरणराजकारणसमीक्षा

प्रतिक्रिया

मोदक's picture

14 Jun 2015 - 1:09 am | मोदक

उत्तम विवेचन.

सध्या ही पोच, सवडीने शंका विचारेन.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Jun 2015 - 1:30 am | निनाद मुक्काम प...

माझ्यामते कुठेही चर्चिला न गेलेला ह्या कारवाई च्या निमित्ताने एक पैलू मला असा वाटतो कि
भारत सध्या मेक इन इंडिया च्या अंतर्गत भारतात संरक्षण शेत्रात झपाट्याने विकसित करत आहे स्वीडन व इतर अनेक प्रगत देश भारतात येउन संरक्षण उत्पादनाचे करार करत आहेत भारतीय कंपन्या त्यांच्याशी करार करत आहेत.
आता काही महिन्यातच नमो इस्राइल ला पहिला भारतीय प्रधानमंत्री ह्या नात्याने जातील तेव्हा अनेक महत्त्वाचे करार होतील
ह्यामुळे महत्त्वाचे प्रगत देशासाठी भारत व भारतासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहेत.जागतिक राजकारणात भारताने अधिक लक्ष घालावे ह्या ओबामा ह्यांनी मनमोहन सरकारला दिलेला सल्ला नमो सरकार पाळत आहे म्हणूनच भारतीय सरकारची मानसिकता आता बदलली आहे. इस्राइल ने जशी आपल्या विरोधी देशाच्या विरुद्ध टोकाची आक्रमक भूमिका घेऊन अत्यंत कमी काळात जगातील प्रमुख शत्र निर्यातदार बनला तोच कित्ता भारत गिरवत आहे असे मला वाटते.
सध्या जनतेते एका वर्षात अच्छे दिन कुठे आहेत हे गेल्या ६० वर्षात नाकर्ते ठरलेले राज्यकर्ते भ्रम निर्माण करत होते अशी कारवाई व सडेतोड विधाने ह्यामुळे सामान्य जनतेत नमो सरकारने परत चांगली प्रतिमा निर्माण केली.
नेहरू युगातील भ्रामक नैतिकता व भंपक आदर्शवाद भारतीय जनमानसातून पुसून काढणे किंवा शांतता चर्चांचे गुऱ्हाळ लावणारा वाजपेयी अडवाणी एरा सुद्धा भाजपा पक्ष व देशाच्या मनातून पुसून नो टोक ओन्ली ऍक्शन असा मोदी फंडा नजीकच्या देशात भारत सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा प्रमुख भाग राहणार
आहे , डी डे मधील शेवटच्या प्रसंगातील अर्जुन चे संवांद ह्या निमित्ताने आठवले .

अर्धवटराव's picture

15 Jun 2015 - 7:29 pm | अर्धवटराव

नेहरू युगातील भ्रामक नैतिकता व भंपक आदर्शवाद भारतीय जनमानसातून पुसून काढणे किंवा शांतता चर्चांचे गुऱ्हाळ लावणारा वाजपेयी अडवाणी एरा सुद्धा भाजपा पक्ष व देशाच्या मनातून पुसून नो टोक ओन्ली ऍक्शन असा मोदी फंडा नजीकच्या देशात भारत सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा प्रमुख भाग राहणार

स्वातंत्रोत्तर सरकारे भोळासट वा भित्री नव्हती. आपल्या ताकतीच्या मर्यादा लक्षात ठेऊन, देशाची बांधणी विस्कटु न देता, प्रगतीपथावर अग्रेसर होताना अनावश्यक साहसवाद टाळुन जेव्हढं सामर्थ्य दाखवायचं तेव्हढं दाखवलच. त्या सर्वांच्या प्रयत्नांच्या पायावरच आजचं सरकार नो टॉक ओन्ली अ‍ॅक्शन लेव्हलचा विचार करु शकतय (वेळ/गरज पडली तर हे सरकार देखील ओन्ली टॉक मोडमधे जाईलच)

भारत सध्या मेक इन इंडिया च्या अंतर्गत भारतात संरक्षण शेत्रात झपाट्याने विकसित करत आहे

म्यानमार घटनेचा अत्यंत कौशल्याने उपयोग करण्याचा सरकारचा इरादा स्पष्ट आहे. भूसंपादन वादात बॅकफुटवर गेलेल्या सरकारने संरक्षण साहित्य निर्मीतीसाठी जमीन मागण्याला जनता विरोध करणार नाहि हा होरा ठेवुनच प्लॅनींग केलं असल्यास आश्चर्य वाटणार नाहि. (किंबहुना तसं करायलाच म्यानमार प्रकरण घडलं अशी कॉन्सपरसी थेअरी कुण्या सुपीक डोक्यातुन आलि तरी आश्चर्य वाटायला नको ;) )

सुधीर's picture

15 Jun 2015 - 10:16 pm | सुधीर

मीही थोडा असहमत. सध्या इतिहास तज्ञ य. दि. फडक्यांची पुस्तकं वाचतोय, बरीच माहिती मिळतेय. काही पुस्तक आजकाल बाजारात उपलब्ध नाहीत. शोधा-शोध चालू आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Jun 2015 - 4:05 am | निनाद मुक्काम प...

आपल्या ताकतीच्या मर्यादा लक्षात ठेऊन,
भारत ,नवीन जन्माला आलेले राष्ट्र फाळणीच्या जखमा , अनेक समस्या
व अशांत शेजार काश्मीर प्रश्नावरून झालेले युद्ध निजामाच्या भारत विरुद्ध कारवाया , देशाची घडी बसविण्यासाठी अनेक स्तरावर कार्य अपेक्षित पण नेहरू ह्यांना जागतिक स्तरावर आपल्या सारख्या देशांना घेऊन तिसरी आघाडी निर्माण करून बड्या देशांना शांततेचा मंत्र देणार दोन गल्लीचे भाई हातापायी वर आले असता नुकतीच मिसरूड फुटलेल्या युवकाने त्यांना भांडू नक्का असा उपदेश केला तर काय होईल तेच नेमके १९६२ झाले
शांततेची कबुतरे उडून गेली
ह्याला म्हणतात ...
आज त्या तिसर्या आघाडीचा पत्ता सुद्धा नाही.
त्यावेळी जपान दक्षिण कोरिया व ने मेक इन जपान व दक्षिण कोरिया चा नारा दिला त्यानंतर अनुक्रमे तैवान व चीन ने हेच केले
आम्ही मात्र .....
अवांतर
भारतात पंजाबात भिन्द्रवाले व श्रीलंकेत तमिळ इलम माय लेकरांनी कोणत्या उद्देशाने काढले त्याचे पुढे काय झाले हे पण आपण जाणतो

अर्धवटराव's picture

16 Jun 2015 - 5:00 am | अर्धवटराव

नेहरु स्वप्नाळू वृत्तीचे असल्याचा आरोप नेहमी केल्या जातो. त्यात थोडं तथ्य असेल सुद्धा. ड्रॅगनला ओळखण्यात त्यांची गफलत झाली असावी... किंबहुना भारताने अधिक शक्तीशाली होण्यापुर्वीच ड्रॅगनने डाव साधला असावा. असो. ते फार विषयांतर होईल.
पुर्वीची सरकारं (ते देवेगौडा वगैरे जमेस न धरता) आपल्याला वाटतात तेव्हढी नेभळट नव्हती असं मला वाटतं. लोकशाही राबवण्याची निकड , प्रचंड गरिबी आणि अचाट देशांतर्गत वैविध्य ध्यानात घेतल्यास भारतीय सरकारांनी आपला डोलारा बर्‍यापैकी सांभाळला, शक्य तेव्हढा सशक्त केला.

अवांतरः
आजा, माय, लेकरु, सून, पणातु... घोळ सर्वांनीच घातलेत... आणि ते देखील नेभळटपणामुळे नव्हे तर आपल्या शक्तीचा फाजील आत्मविश्वास केल्या मुळे :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Jun 2015 - 1:31 pm | निनाद मुक्काम प...

अधिक शक्तीशाली .....
१९४७ ते १९६२ च्या काळात अशांत शेजार असतांना आपल्या लष्कर मजबूत काय करण्यात आले
दुसर्या महायुद्धाच्या काळातील शस्त्रे जवानांना सोयी सुविधांचा अभाव आणि बरेच काही
अहि १९४८ मध्ये पाकिस्ताने आय एस आय हि देशाच्या सीमेबाहेर कार्यरत असणारी हेर संस्था केवळ भारताला उद्देशून निर्माण केली
अशी हेर संस्था रॉ निर्माण होण्यास आपल्याकडे १९६८ उजाडावे लागले
१९४८ साली रॉ निर्माण झाली असती तर चीनी कुटील डावपेच कदाचित आधी कळले असते.
दुसर्या महायुद्धानंतर केजीबी व सी आय ए चा जन्म व त्यांचे कार्य नेहरूंच्या डोळ्यासमोर होते,
असो

अर्धवटराव's picture

16 Jun 2015 - 8:58 pm | अर्धवटराव

सुरुवातीच्या काळात लश्कर मजबुतीकरणाकडे दुर्लक्ष्य का करण्यात आलं याचं एक पटणेबल (समर्थनेबल नाहि म्हणता येणार) कारण असं देतात कि नवजात लोकशाहीचा लश्कराने गिळु नये म्हणुन...
रॉ चा उदय उशीरा झाला हे खरय. पण ब्रिटीशांकरता दोन महायुद्ध लढलेली भारतीय सेना आणि राणीचं राज्य भरतखंडावर अबधीत ठेवायला डोळ्यात तेल घालुन काम करणारी नागरी प्रशासन + पोलीस दलं सीमेबाहेर आणि सीमांतर्गत गुप्तहेर यंत्रणा बाळगुन नसेल हे पटत नाहि. कुठलंही फॉर्मल हेरखातं हाताखाली नसताना जर सावरकरांना माओच्या देशाचा धोका जाणवत होता तर तसा तो सरकारला देखील जाणवत असणारच. त्या धोक्याची इंटेन्सीटी ओळखण्यात आणि त्यावर आगोदरपासुनच उपाय योजना करण्यात सरकार उणं पडलं मात्र.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Jun 2015 - 4:14 pm | निनाद मुक्काम प...

इंग्रजांच्या काळातील आयबी पुढे भारत व पाकिस्तानच्या मध्ये विभागल्या गेले तेव्हा ह्या संस्थेतील अधिकारी एकमेकांना ओळखत होते व संस्थेची कार्यपद्धती ची परिचित होते.
ह्यामुळे आय एस आय ची निर्मिती व आपल्याकडून निष्क्रियता डोळ्यात भरते
बाकी गांधीजींचे सो कोल्ड सेक्युलर व अहिसंक मार्गावर भारतीय जनता चालत असतांना भारतीय लष्कर लोकशाहीवर डोईजड होईल अशी शक्यता नव्हती
कदाचित आझाद हिंद सेनेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला हे पाहून नेहरूंचे मत......
१९८९ साली मुक्त श्वास घेतलेली भारतीय अर्थव्यवस्थेने १९४७ घेतली असती तर आज आपण प्रगत देशात गणले गेलो असतो
गेल्या ३० वर्षात आपण जगातील मोठा मध्यमवर्ग निर्माण केला तर ७० ते ८० वर्षात काय झाले असते

१९८९ साली मुक्त श्वास घेतलेली भारतीय अर्थव्यवस्थेने १९४७ घेतली असती तर आज आपण प्रगत देशात गणले गेलो असतो
गेल्या ३० वर्षात आपण जगातील मोठा मध्यमवर्ग निर्माण केला तर ७० ते ८० वर्षात काय झाले असते

हे थोडे विवादास्पद आहे, म्हणजे रांगता पण न येणाऱ्या बाळाने १०० मी धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन जिंकावे अशी अपेक्षा वाटते. आता १९९१ मध्ये पण आणखीही काहीच उपाय न राहिल्याने उदारीकरण झाले ते एखाद्या वेळेस अजून लवकर होऊ शकले असते , पण काहिसे 'जिस गाव जाना नही उसका रास्ता क्यू पुछे' या पद्धतीने आपले हे विजनच नव्हते कि असे काही करावे , सो कॉल्ड समाजवादी व्यवस्थेतच आपल्या पुढाऱ्यांना राहायचे होते, no body was ready to think out of box to expedite the progress, may be because development, progress, to be best in the world was never their goal

लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा की दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इतक्या विध्वंसानंतरही जपान जर्मनी इतके लवकर का सावरले? पुढे कळले कि युद्ध हरले तरी त्यांच्या कडे कारखानदारी होती, सरकारकडे नाही पण सामान्य जनतेकडे पैसा होता, थोडक्यात प्रगतीसाठी लागणारे infrastructure होते आणि जनतेकडे आणि नेत्यांकडे जिद्द होती विजन होती (correct me if you don't agree) , भारत त्यात कुठे तरी कमी पडला बहुतेक

आज ५०-६० वर्षांनी नेहरू गांधींचे काय चुकले हे विश्लेषण करणे सोपे आहे पण त्याची limitations काय होती, जे निर्णय त्यांनी घेतले ते का व कोणत्या परिस्थितीत घेतले हे आपल्याला कुठे पूर्णपणे माहित आहे? (मी नेहरूंचा पंखा नाही आणि खांग्रेसचा तर नक्की नाही पण आंधळेपणाने कोणाचीही स्तुती किंवा कोणावरही टीका करायला मला आवडत नाही, यात फक्त आपण स्वताला फसवतो )

तरीही १९९१ पर्यंत वाट बघायची गरज नव्हती या विचाराशी सहमत

श्रीरंग_जोशी's picture

17 Jun 2015 - 9:00 pm | श्रीरंग_जोशी

तुम्ही लिहिलेल्या प्रतिसादाच्या आशयाशी सहमत.

(सध्या मिपासंन्यासी) मिपाकर क्लिंटन यांचे या मुद्द्यावरील विचार वाचनीय आहेत.

सहमत , त्यांनी जास्त चांगले समजावले आहे.

टीपीके's picture

17 Jun 2015 - 9:16 pm | टीपीके

नेहमी प्रश्न पडायचा की दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इतक्या विध्वंसानंतरही जपान जर्मनी इतके लवकर का सावरले? पुढे कळले कि युद्ध हरले तरी त्यांच्या कडे कारखानदारी होती, सरकारकडे नाही पण सामान्य जनतेकडे पैसा होता, थोडक्यात प्रगतीसाठी लागणारे infrastructure होते आणि जनतेकडे आणि नेत्यांकडे जिद्द होती विजन होती

निनाद तुम्ही जर्मनीत राहता ना? वरील ऑब्जर्व्हेशन बरोबर आहे का? माझा असा समज बहुतेक अकिओ मोरिता यांचे मेड इन जपान वाचताना झाला होता , चुकीचाही असेल कदाचीत …

सुधीर's picture

17 Jun 2015 - 10:25 pm | सुधीर

निनादसाहेब, माझं यावर अजून पुरेसं वाचन नाही. तरीही जे काही वाचलं त्यावरून प्रतिसाद लिहिण्याचा आगाऊपणा करतोय या बद्धल क्षमस्व.

राजकीय नेत्यांचे ब्रॉड स्केलवर मूल्यमापन करताना नेत्यांनी आपल्या समाजाला आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या कुठल्या दिशेने नेले हे सर्वात महत्त्वाचे. हा विचार करताना, समाजाची तत्कालिन रचना, त्यातले दोष, समाजाला मानवणारी विचारधारा आणि त्या नेत्याच्या विरोधी पक्षात असणार्‍या नेत्यांची विचारधाराही लक्षात घ्यावी लागते.

काळाच्या पुढे आल्यावर कुठल्या गोष्टी योग्य होत्या कुठल्या अयोग्य हे आपल्याला खूप चांगले समजते. नेहरू आणि त्यांच्या बाजूने असलेले मंत्रीगण कुठल्या दिशेने विचार करत होते आणि त्याचवेळी त्यांच्या विचारधारणेशी सहमत नसणार्‍या (साम्यवादी, फक्त समाजवादी आणि हिंदुत्ववादी) तत्कालिन नेत्यांची मते काय होती हाही विचार झाला पाहिजे. संसदेत त्यांनी काय विचार मांडले, त्यांची विचारसरणी कुठल्या दिशेने होती याचे पुरावे संसदेच्या ऑडीट बुक मध्ये आहेत. आपण आज खात्रीपूर्वक सांगू शकतो की, ती नक्कीच आजच्या घडीला कालसुसंगत नाही. (त्यामुळे त्या नेत्यांचे तत्कालिन महत्व कमी होत नाही हेही मला मान्य आहे. पण) त्या नेत्यांकडे सत्तेची सूत्र गेली असती तर भारत आज कुठे असता हा विचार केला की नेहरू आपल्याला लाभले हे आपल्या फायद्याचेच ठरले ह्या निष्कर्षावर येता येते. (किंबहूना त्यामुळेच गांधींचं जाणं एका अर्थी भारताच्या पथ्थ्यावर पडलं असं काही जणांना वाटतं) बाकी नेहरूंच्या राजकीय कारकिर्दीतही त्यांच्या हातून चुका घडल्यात पण त्यामुळे त्यांचे एकंदर योगदान (ब्रॉडरस्केलवरचे) कमी होत नाही. बाकी इंडीव्हिज्युअल इव्हेंट्स वरून, खाजगी आयुष्यातल्या घटनांवरून नेहरूंना कमरेखालच्या टिका करणारी मंडळीही भेटली आहेत. असो, प्रत्येकाचा विचार वेगवेगळा.

माझा इव्हॉल्यूशन थिअरीवर विश्वास आहे. सॉफ्टवेअर व्हर्जन सारखं. बग्ज फिक्स करून सॉफ्टवेअर सिस्टीम अधिकाअधिक सशक्त होत असते, अगदी तसंच. गेल्या साठ वर्षात हळूहळू का होईना भारतीय समाजातले सातशे वर्षातले समाज रचनेचे आणि राज्यकारणाच्या व्यवस्थेतले बग्ज (नाही म्हणायला) दुरुस्त झालेत. त्यामुळे राजकीय स्वार्थासाठी काही लोकांकडून गेल्या साठ वर्षात काहीच झालं नाही असं जनमतावर बिंबवलं जाते ते मला चुकीचे वाटते. पण हेही तितकेच खरे की गेल्या ६० वर्षात नवीन बग्जही निर्माण झाले आहेत. मग त्यात, भ्रष्टाचार, क्रॉनी कॅपिटलिझम, सुडो सेक्युलॅरिझम इ. आलेच. नव्या नेतृत्वाकडे ते नवीन बग्ज नाहीसे करायचे आव्हान आहे. त्यासाठी नवीन नेतृत्वाला किमान वेळ द्यावा लागेल या मताशी मी सहमत आहे.

सुधीर's picture

16 Jun 2015 - 8:20 am | सुधीर

नेहरू आणि इतरांवर चर्चा नंतर कधीतरी दुस-या धाग्यावर करू. :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Jun 2015 - 4:14 am | निनाद मुक्काम प...

सर
म्यानमार प्रकरण घडलं
भारताच्या विरुद्ध कोण कोण कारवाया करत आहे व त्यापैकी कोणाची विरुद्ध कोणती कारवाई करायची ह्याचे तडाखे अजित देवोल ह्यांनी फार पूर्वी मांडले आहेत , त्यांना संपूर्ण पाठिंबा नमो ह्यांनी दिला आहे , नमोंच्या प्रत्येक परदेशी दौर्यात देवोल हे नमोंच्या बाजूला सावली सारखे असतात जगभरातील हेर संस्थांची भारत आपली नाळ जुळवून घेत आहे , बांगलादेशात अजित देवोल हे नमो सोबत दिसले नाही ह्याची मिडिया ने दखल घेतली नाही
पण ह्यापुढील नमोच्या पुढील प्रत्येक परदेशी दौर्यांच्या वेळी
हाफिज सैद व दाउद भारतात आपल्या सूत्रांना सारखे विचारतील
मोडी के साथ देवोल भी प्लेन मी चढा हे ना
जर मोदी एकटे असतील तर ह्यांची चड्डी पिवळी होईल ,
एकाच विचार
कहा हे अजित और क्या कर रहा हे

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Jun 2015 - 4:24 am | निनाद मुक्काम प...

माझ्या ह्या प्रतिसादानंतर दुसर्या दिवशी घडलेल्या दोन ठळक घडामोडी

विनोद१८'s picture

14 Jun 2015 - 1:47 am | विनोद१८

अतिशय अभ्यासपूर्ण सविस्तर विश्लेषण, एका लष्करी कारावाईचे बरेच पदर उलगडलेत, बर्‍याच गोष्टींचा खुलासा झाला.

धन्यवाद.

श्रीरंग_जोशी's picture

14 Jun 2015 - 9:56 am | श्रीरंग_जोशी

उत्तम व अभ्यासपूर्ण विवेचन.

यावरून सुषमा स्वराज यांची वाजपेयींच्या मंत्रीमंडळात असताना पाकिस्तान दौर्‍यादरम्यान तिथल्या वृत्तवाहिनीवरची मुलाखत आठवली (बहुधा २००३ सालची).

मुलाखतकर्त्याने प्रश्न विचारला की भारत की सरकार हमेशा शांती की बाते करती है. तो फिर डिफेन्स बजेट इतना ज्यादा क्यूं हैं?

यावर सुषमाजींनी प्रथम कबीराचा एक दोहा ऐकवला. तो एकदम 'सरल' हिंदीत असल्याने त्याचे उर्दूत भाषांतर करून सांगितले. ते काहीसे असे होते की कमजोर राष्ट्राने शांतीची भाषा केली तर ती त्याची मजबुरी समजली जाते अन बलशाली राष्ट्राने केली तर सामर्थ्य व जबाबदारीचे प्रतिनिधित्व करते.

या ऑपरेशनप्रमाणे भारतीय सेनेने २००१ साली पाकिस्तानबरोबरच्या नियंत्रणरेषेपलिकडे जाऊन केलेल्या ऑपरेशन सलामी स्लाइसबाबत शक्य असल्यास लिहावे ही विनंती.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jun 2015 - 10:15 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

खुप छान लेख!! मीही सवडीने शंका विचारेन!

पैसा's picture

14 Jun 2015 - 10:35 am | पैसा

मात्र आता प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करण्याच्या मिडियाच्या सवयीकडे पाहता त्यांच्याकडून संयमाची अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे ठरेल. या मूर्खांनी ताजमहाल हॉटेल जळत असताना त्याचाही इव्हेंट करून अतिरेक्यांना घरबसल्या माहिती पुरवली होती. नंतर नंतर ही मिडियाची चूक होती की एका मोठ्या कटाचा भाग होता असेच वाटायला लागले.

सुधीर's picture

14 Jun 2015 - 10:46 am | सुधीर

मी दुसर्‍या संस्थळावर एका ठिकाणी म्हटलं, जाहीर वाच्यता करावी-न करावी यावर अभ्यासपूर्ण माहिती हाती आली तर माझं मत बदलेलही.
थोडसं अवांतरः
मी मिपा वा माझ्या ट्विटर अकांटवरही सरकार विरोधी कधी गरळ ओकलेली नाही. उलट ट्विटरवर जिथे निर्णय चांगले वाटले तिथे समर्थनच केले आहे. मग ते जन-धन असो, विमा-योजना असो वा नीति आओगाची फिलॉसॉफी असो. पण जिथे सरकारच वागणं पटलं नाही तिथे नाही पटलं असचं म्हटलं. मग ते बीफ बॅन असो, एच आर डीचे काही निर्णय असोत. एखादा निर्णय आपल्याला का पटावा का पटू नये हे आपण कुठल्या दिशेने विचार करतो यावर अवलंबून राहतं. ढोबळ लेफ्ट - राईट विचारसरणी कदाचित मला मान्य नाही. सेक्युलर-लिबरल विचारसरणी योग्य वाटली तर मग लेफ्ट ठरवलं जाईल पण सोशलिस्ट पेक्षा कॅपिटलिस्ट योग्य वाटलं तर राईट. निदान मी तरी असा दोन्ही बाजूने स्विंग होतो. :)

राहीली गोष्ट समर्थक-विरोधकांच्या गदारोळाची. हे खेदाने नमुद करावेसे वाटते की, राजकारणावरच्या काथ्याकुटाची गाडी पक्ष/व्यक्ती समर्थन-विरोध यावरच घसरते. मुद्दे बाजूलाच राहतात. गाडी व्यक्तीगत टिप्पणी, व्यैयक्तीक दुरावा यावर घसरते. कारण त्यामुळेच कदाचित बहुसंख्य मिपाकर या चर्चेपासून दूर राहतात. मी सुद्धा मिपावर व्यासंगी, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींचे विचार वाचायला, ओळखी वाढवायला मिपावर येतो. राजकारणाच्या टिपण्णीमुळे दुरावा निर्माण होत असेल तर मतप्रदर्शन न करणेच योग्य आहे हे सारखं सारखं विसरतो. ;)

मनोज श्रीनिवास जोशी's picture

14 Jun 2015 - 11:27 am | मनोज श्रीनिवास जोशी

मिएनमार कारवाई हे बदलत्या तरुण भारतीय मनाचे आणि त्याला पूरक केंद्र सरकारचे आणि आपल्या सदा शूर सैन्याचे प्रतिक आहे. सुरवात चांगली झाली आहे. नेपाळ हा ड्रग्ज आणि बनावट चलनाचा मार्ग बंद होतो आहे. भूतान पायी लीन आहे , मिएनमार ह्या कारवाई मुळे मित्र होतो आहे , बांगलादेश कर्जदार आहे श्रीलंका आणि मालदीव चीन पेक्षा आपल्या मदतीला प्राधान्य देत आहेत हे सगळे १ वर्षात होते आहे.
परराष्ट्र आणि संरक्षण ह्यांचा इतका सुरेख मिलाफ गेल्या ६० वर्षात दिसलेला नाही.

मुक्त विहारि's picture

14 Jun 2015 - 12:34 pm | मुक्त विहारि

तरी पण काही जण हितोपदेश करतीलच.

आजच्या लोकसत्तेत पण ह्या घटनेवर छान लेख आला आहे.

http://www.loksatta.com/vishesh-news/operation-myanmar-1113346/?nopagi=1

त्या लेखातील शेवटचे वाक्य, "एक मात्र खरे, की भारतही आक्रमक होऊ शकतो हे यामुळे भारतीयांना समजले. पूर्वी अशा घटनांचा गाजावाजा होत नसे. त्यामुळे असंख्य राष्ट्रप्रेमी या सुखावह व थरारक भावनेपासून वंचित राहात असत."

श्रीगुरुजी's picture

14 Jun 2015 - 1:03 pm | श्रीगुरुजी

अतिशय मुद्देसूद आणि सविस्तर लेख आहे. लेख आवडला.

>>> त्या लेखातील शेवटचे वाक्य, "एक मात्र खरे, की भारतही आक्रमक होऊ शकतो हे यामुळे भारतीयांना समजले. पूर्वी अशा घटनांचा गाजावाजा होत नसे. त्यामुळे असंख्य राष्ट्रप्रेमी या सुखावह व थरारक भावनेपासून वंचित राहात असत."

भारत पाकिस्तानमध्ये घुसून अशी कारवाई कधी करेल याविषयी उत्सुकता आहे. पाकड्यांनी आपल्या अण्वस्त्रांच्या कितीही डरकाळ्या मारल्या तरी अशी कारवाई झाल्यास थेट अण्वस्त्र वापरण्याची शक्यता निराधार आहे.

संदीप डांगे's picture

14 Jun 2015 - 1:47 pm | संदीप डांगे

उत्तम लेख.

अशा कारवायांनी भारतीय सेना आणि राजकिय नेतृत्वाला गृहित धरणं थांबेल. सर्वशक्तिमान असून कुणी कितीही मानहानीकारक खोड्या केल्या तरी कसल्याशा काल्पनिक दबावाखाली कायम दबून उघड प्रतिकार न करण्याची पद्धत कायमस्वरूपी बदलली तर फार बरं.

लष्करालाही पोलिसांसारखं टीपून मारण्याची आणि पळून जाण्याची चूक दहशतवाद्यांना चांगलीच महागात पडली. खरंतर ह्या हल्ल्याची जबाबदारी घेणार्‍या संघटनेच्या प्रत्येक सदस्याला असेल तिथून शोधून उडवल्याशिवाय ही मोहिम थांबू नये अशीच एक भारतीय म्हणून माझी इच्छा आहे.

नुकताच पत्रकार 'श्री.भाउ तोरसेकर' यांचा त्यांच्या ब्लॉगवरचा याविषयीचा वाचनिय लेख वाचनात आला त्याची लिंक खाली देत आहे, 'झापडबंद मोदीसरकार विरोधकांनी' तर तो जरुर वाचावा, त्यांच्या बर्‍याच प्रश्णांची उत्तरे त्यांना मिळून येतील व त्यांची कोल्हेकुई बंद करावी असे वाटते.

http://jagatapahara.blogspot.in/2015/06/blog-post_13.html

hitesh's picture

14 Jun 2015 - 11:19 pm | hitesh

पहिलाच प्रतिसाद गामा पैलवानाचा !

आतिवास's picture

14 Jun 2015 - 3:39 pm | आतिवास

आंतरराष्ट्रीय संबंधांत गुंतागुंत असते. त्यामुळे
१. 'सोशल मीडिया'चा अतिरेकी वापर अशा प्रसंगी उचित नसतो याचं भान सरकार समर्थकांना येईल तो सुदिन.
२. करायची ती गोष्ट योग्य रीतीने केल्यावर उगाच 'शब्द' वापरायची गरज नसते याचं भान सरकारला येईल तोही सुदिन.

विनोद१८'s picture

14 Jun 2015 - 4:37 pm | विनोद१८

'सोशल मीडिया'चा अतिरेकी वापर अशा प्रसंगी उचित नसतो याचं भान सरकार समर्थकांना येईल तो सुदिन.

आज सोशल मिडियाचा प्रचार व वापर सर्वत्र सढळपणे होत असताना हा प्रसंग त्याला निषिद्ध कसा होउ शकतो, त्यामुळे त्यावर चर्चा तर होणारच, ती कशी थांबेल. बरे याचे भान फक्त 'सरकार समर्थकांनीच' ठेवायचे ?? व 'सरकार विरोधकांनी' काय फक्त प्रछन्नपणे त्याचा मनाजोगता वापर करुन सरकार विरोधात मनसोक्त टवाळक्या करायच्या ?? आधी आपणच शेपटीवर पाय द्यायचा मग लाथ बसल्यावर कांगावा करायचा हे असले चाळे आता कधीच व कुठेही चालायचे नाहीत.

करायची ती गोष्ट योग्य रीतीने केल्यावर उगाच 'शब्द' वापरायची गरज नसते याचं भान सरकारला येईल तोही सुदिन.

आंतरराष्ट्रीय संबंधांत जे तुम्हा आम्हाला समजते ते तिकडे सरकारात बसलेल्या धुरीणांना उमजत नसेल असे वाटते का आपल्याला ?? मला वाटते यावर मिपावर बरीच चर्चा झाली आहे व त्याची कारणमिमांसा आंतरजालावर इतरत्रही बर्‍याच प्रमाणात उपलब्ध आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय धोरणासंबंधीचा भाग म्हणुनच 'शब्द' वापरला गेला हे उघड आहे व त्याचा अपेक्षीत तो परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही जे आपल्याच देशहिताचे आहे.

आतिवास's picture

14 Jun 2015 - 5:36 pm | आतिवास

ओके सरजी.
आपल्या प्रतिसादाचा टोन पाहून मी माझा आधीचा प्रतिसाद देण्यात अक्षम्य चूक केल्याचे ध्यानात आले आहे.
तरी(ही) आपण उदार मनाने क्षमा करावी ही विनंती.

श्रीरंग_जोशी's picture

14 Jun 2015 - 5:42 pm | श्रीरंग_जोशी

मिपावर राजकीय चर्चांमध्ये सहभागी होणे टाळावेसे वाटते कारण या प्रकारचे प्रतिसाद.
विनोदराव - इथे तुम्हाला दुखावण्याचा हेतू नाहीये.

नाव आडनाव's picture

15 Jun 2015 - 10:50 am | नाव आडनाव

+१

पुण्याचे वटवाघूळ's picture

15 Jun 2015 - 1:06 pm | पुण्याचे वटवाघूळ

मिपावर राजकीय चर्चांमध्ये सहभागी होणे टाळावेसे वाटते कारण या प्रकारचे प्रतिसाद.

तुम्हाला राज्किय चर्चेत टालायचे असेल तर तो तुमचा प्रश्न. तरीही इथेच सगळ्या मोदी समर्थकांना एकजात 'मोदी भक्त; म्हणून हिनावले जाते, मोदी भक्तांचा अटेंशन स्पॅन दोन सेकंदाहून कमी असतो इत्यादी विधाने केली जातात त्यावेळी ते तुम्हाला खटकत नाही याला पूर्व्ग्रह म्हणायचा की दुसरे काही?

श्रीरंग_जोशी's picture

15 Jun 2015 - 11:31 pm | श्रीरंग_जोशी

मला काय खटकते?

प्रतिसादाच्या आशयाकडे दुर्लक्ष करून हवा तसा अर्थ काढणे.

विनोद१८'s picture

14 Jun 2015 - 10:41 pm | विनोद१८

अहो, मी कुणाला क्षमा वगैरे करण्याइतका मोठा नाही हो, तुमचा गैरसमज होतोय काहीतरी. मीसुद्धा तुमच्यासारखा एक साधासा मिपाप्रेमी आहे त्यामुळे इथल्या असल्या धाग्यांवर सादप्रतिसाद, वाद्विवाद, चर्चा इ.इ. होणारच. तुमचा तो प्रतिसाद तुमच्या राजकिय विचारसरणीला अनुसरुन असावा असे दिसते त्यावर मी दिलेला उपप्रतिसाद हा माझ्या सांप्रतच्या राजकीय विचारसरणीला धरुन आहे इतकेच. त्यामध्ये टोन वगैरे असे काही नसते.

हाडक्या's picture

15 Jun 2015 - 4:45 pm | हाडक्या

अहो, मी कुणाला क्षमा वगैरे करण्याइतका मोठा नाही हो, तुमचा गैरसमज होतोय काहीतरी

हा हा हा.. साहेब, तो उपरोध आहे हे लक्षात आले नसल्यास समजून घ्यावे.. :)

आधी आपणच शेपटीवर पाय द्यायचा मग लाथ बसल्यावर कांगावा करायचा हे असले चाळे आता कधीच व कुठेही चालायचे नाहीत.

ही लाथ वगैरेची भाषा आतिवास तै नी "टोन" म्हणून संबोधली आहे. ती त्यांना उद्देशून नसेल तरी ही इथे गैर-लागू आहे

सांप्रतच्या राजकीय विचारसरणीला धरुन आहे इतकेच. त्यामध्ये टोन वगैरे असे काही नसते.

हा टोन नसेल आणि या राजकीय विचारसरणीचा भाग म्हणून जर आतिवास सारख्या संयत आयडी बरोबरही "लाथ" वगैरेची भाषा किंवा हा उन्माददर्शक आविर्भाव असेल तर पुनर्विचार व्हावा.

बरे याचे भान फक्त 'सरकार समर्थकांनीच' ठेवायचे ?? व 'सरकार विरोधकांनी' काय फक्त प्रछन्नपणे त्याचा मनाजोगता वापर करुन सरकार विरोधात मनसोक्त टवाळक्या करायच्या ??

होय, समर्थक म्हणून आणि त्यापेक्षा पण सजग नागरीक म्हणून भान ठेवायचे.
इथे काही नाना इ. आयडी कुठेपण लोळतात म्हणून इतरांनी पण तेच करणे समर्थनीय नाही आणि इतर लोक (समर्थक अथवा विरोधक नसलेले) मुद्दा मांडत असतील तर "लाथ" वगैरेची भाषा वापरुन तोंड बंद करण्याची भाषा अथवा त्यांना "विरोधक" वगैरे संबोधून हेटाळण्याची पद्धत हे अतिशय चूक आणि ज्यांचे समर्थक आहात त्यांना नुकसानकारक असेच आहे असे नमूद करतो.

[कोणत्याही समर्थकांनीदेखील श्रीगुरुजी, क्लिंटन इत्यादिकडून समर्थन कसे करावे याचा आदर्श घ्यावा असे म्हणेन.]

देशात काही चांगलं घडतंय त्याला अशा गोष्टींनी गालबोट लागू नये हीच अपेक्षा, असो.

(डिस्क्लेमर (जो आजकाल द्यावा लागतो हेच दुर्दैव!) : इस्पिक एक्का यांच्याप्रमाणेच आमचीही कोणत्याही विचारसरणीशी बांधिलकी नाही तसेच विरोध नाही. जो चांगले काम करेल त्यास चांगले आणि जे चूक वाटेल त्यास चूक म्हणावे हे मानतो.. )

काळा पहाड's picture

14 Jun 2015 - 4:38 pm | काळा पहाड

बर्‍याच लोकांना एक गोष्ट कळत नाही. या कारवाईचा मुख्य हेतू काय होता? तो होता म्यानमारमधल्या अतिरेक्यांना संदेश देण्याचा. तस्ं नसतं तर सगळ्याच कॅम्प्स वर कारवाई केली गेली असती. काय घडलं हे जर सांगायचं नसेल तर संदेश देताना तो कशा प्रकारे देणं अभिप्रेत आहे? तेव्हा काम करावं पण अ‍ॅड्व्हर्टाईझ करू नये वगैरे गोष्टीला काही अर्थ नाही.

पॉइंट ब्लँक's picture

14 Jun 2015 - 5:17 pm | पॉइंट ब्लँक

सगळे मुद्दे छान मांडले आहेत.

अनुप ढेरे's picture

14 Jun 2015 - 5:26 pm | अनुप ढेरे

ही कारवाइ पब्लिक करण्यामागे इतरांना संदेश हे कारण होतच.

http://scroll.in/article/733855/why-the-modi-government-decided-to-delib...

छान लेख आहे.

विकास's picture

14 Jun 2015 - 5:37 pm | विकास

लेख विवेचन मस्तच पण पालथ्या घड्यावर पाणी ;)

बाकी या संदर्भातील पोटशूळातून होणारी ओरड ऐकून पोखरण२ ची आठवण होत आहे. आपले कसे चुकले आणि आपण कसे आता जगात बहीष्कृत म्हणून रहाणार वगैरे म्ह्॑णणारे विचारवंत आणि अभ्यासक पाहीले होते... असो.

मूकवाचक's picture

15 Jun 2015 - 12:39 pm | मूकवाचक

+१

लेख वाचुन बर्याच गोष्टींची उत्तरं मिळाली.लेख आवडलाच.

जेपी's picture

14 Jun 2015 - 6:08 pm | जेपी

+2015

hitesh's picture

14 Jun 2015 - 11:15 pm | hitesh

मुळात म्यानमार सरकारनेच या वृत्तला दुजोरा दिलेला नाही तर पाठ थोपटणे का सुरु आह ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jun 2015 - 12:17 am | डॉ सुहास म्हात्रे

डोळे उघडा, वाचन वाढवा ! =))

hitesh's picture

15 Jun 2015 - 6:35 am | hitesh

म्यानमारात अतिरेकी असताना म्यानमारचे सैन्य गप्प झोपले आणि भारतीय सैन्य लढायला गेले.

.
.

हे वाचून
.
.

दिल्लीवर अब्दालीचे आक्रमण होताना दिल्लीचा बादशा झोपुन होता आणि माना कापून घ्यायला पेशवे पुढे गेले होते.

.
.

याची आठवण होऊन गहिवरून आले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jun 2015 - 12:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

डोळे उघडा, वाचन वाढवा, लेख परत वाचा आणि मग स्वतःच्या प्रतिक्रिया वाचा =))

कदाsssचित समजूतीत फरक पडेल. ते कबूल केले नाही तरी चालेल... तशी अपेक्षाही नाही ! पण त्यामुळे स्वतःची सार्वजनिक फजिती करून घेण्याची वृत्ती कमी होईल, कदाचित... (पण, त्याचीही अपेक्षाही नाही, म्हणा !)

(माझा लेख कोणतीही बाजू न घेता लिहीला आहे हे न समजण्याइतका आंधळेपणा बरा नाही, असे सांगणार होतो. पण राहूद्या... उगाच उपड्या घड्यावर पाणी नको... म्हणून तो मोह आवरला आहे.)

...

आ.न.
हुकमाचा एक्का !

मुक्त विहारि's picture

15 Jun 2015 - 8:58 am | मुक्त विहारि

पण मुळात काही लोकांना डोळेच नसतील तर?

वप्रइएयांआ. हिकन.

हितेशचं बरोबर आहे ..राहुल गांधींना पंतप्रधान करा..

नाखु's picture

15 Jun 2015 - 10:03 am | नाखु

हितेश भाईंना त्यांचे (तहहयात) सल्ला गार !!

आता मूळ अवांतर : लेख मुद्देसूद आणि नेटका बांधलेला आहे बर्याच वाचकांना एखादे गाणे अनवट जागा-चीजांसह समजावून सांगावे असाच आहे.

वाचक नाखु

म्यानमार सरकारने घोषणा करायची वाट बघत आहोत आपण ???? ह. ह. पु. वा. !
जय हितेस भाई..जय कोन्ग्रेस..जय राहुल गांधी ..!

म्यानमार सरकारने घोषणा केलीच तर ती कशी असेल ह्याचा एक कल्पनाविलास
" म्यानमारच्या भूमीवर गेल्या बरेच दिवसांपासून दहशतवाद्यांचा वावर होता. कृपया ते कोण होते ,कुठून आले हे आम्हाला विचारू नका (अं..आम्ही नाही सांगणार जा !). काही दिवस वाट बघितल्यावर आम्हाला त्यांचा कंटाळा आला. आणि आम्ही त्यांना जायला सांगितले. पण ते चक्क नाही म्हणाले हो (अं..आम्ही कट्टी).
मग आम्ही भारत दादाला त्यांचे नाव सांगितले. आणि भारत दादाने येउन त्यांना खूप मारले. (ये मज्जा ..!)"

मृत्युन्जय's picture

15 Jun 2015 - 2:35 pm | मृत्युन्जय

अरारारारा, पार बाजार उठवला.

राहुल गांधी आणि त्याच बौद्धिक पातळीचे त्यांचे समर्थक यांना समजेल अश्या भाषेत लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न !

एक एकटा एकटाच's picture

15 Jun 2015 - 8:32 am | एक एकटा एकटाच

चांगला लेख आहे.

hitesh's picture

15 Jun 2015 - 10:17 am | hitesh

यापुर्वीही असे पराक्रम घडले आहेत.

http://epaper.loksatta.com/c/5562273

सुबोध खरे's picture

15 Jun 2015 - 12:35 pm | सुबोध खरे

हितेश भाऊ
केवळ द्वेष करायचा म्हणून द्वेष करणे सोडून द्या. आणी त्याच त्या दुव्याचे तुणतुणे वाजवणे सोडा.
अगोदरच्या सरकारकडून अशी कामे करण्याची परवानगी मिळवण्यासाठी किती मिनतवार्या कराव्या लागत असत हे वरिष्ठ लष्करी अधिकार्यांना माहित आहे. तेंव्हा अगदी नाईलाज म्हणून परवानगी मिळत असे आणी ती सुद्धा बरीच उशिरा.याचवेळेस सरकारने पुढाकार घेऊन( पाय न ओढता) संरक्षण सल्लागारा ना ( डोव्हाल साहेबाना) पुढे पाठवून काम केले. याच कारणासाठी बर्याचशा निवृत्त लष्करप्रमुखांनी मोदी सरकारचे जाहीर अभिनंदन केले आहे. जर आपल्याला त्यांच्या( निवृत्त लष्कर प्रमुख) पेक्षा जास्त ज्ञान माहिती किंवा शहाणपण असेल तर गोष्ट वेगळी.
जाता जाता-- हे लष्कर प्रमुख त्या सरकारच्याच काळात बढती मिळवून लष्कर प्रमुख झाले होते. नाहीतर परत तुम्ही म्हणाल त्यांना मोदी साहेबांनी वर चढवले म्हणून ते मोदी साहेबांचे तुणतुणे वाजवताहेत.
तुम्हा काळा चष्मा काढलात तरच सूर्यप्रकाश स्वच्च्छ दिसेल अन्यथा काळोखी ठरलेलीच आहे.

श्रीगुरुजी's picture

15 Jun 2015 - 2:24 pm | श्रीगुरुजी

डॉक्टरसाहेब,

तुम्ही असल्या कचरा प्रतिसादांना का सविस्तर उत्तर देऊन प्रतिवाद करीत आहात ते समजत नाही. वरील प्रतिसाद किंवा इतर काही ठराविक आयडींचे प्रतिसाद हे निव्वळ कचरा असतात. तुम्ही कितीही कंठशोष करून सांगितले तरी अशा पूर्वग्रहदूषित व्यक्ती ते पटवून घेणार नाहीत. अशांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून त्यांना अनुल्लेखाने मारावे ही विनंती.

अवांतर - 'जागो मोहन प्यारे' उपाख्य 'उद्दाम' उपाख्य 'पोटे' हे गजानन विनायक कागलकर या व्यक्तीचे मिपावरील आयडी पूर्वी धारातिर्थी पडले होते. आता म्यानमारमधील कारवाईमुळे 'हितेश' आयडी सुद्धा धारातिर्थी पडलेला दिसतोय. काही दिवसांनी तो नवीन अवतार धारण करून येईलच.

मृत्युन्जय's picture

15 Jun 2015 - 2:38 pm | मृत्युन्जय

हितेशरावांचा वध झाला म्हणायचा शेवटी. अभिनंदन. हितेशरावांचेच अभिनंदन. आत्महत्या करण्यासाठी ते खुप धडपडत होते बर्‍याच काळापासून पण त्यांना म्हणावी तशी साथ मिळत नवहती, आज अखेर त्यांच्या जालीय वधाचा सुदिन उजाडला म्हणाय्चा

संदीप डांगे's picture

15 Jun 2015 - 2:54 pm | संदीप डांगे

प्राणीसुद्धा आत्महत्या करतात?

इरसाल's picture

15 Jun 2015 - 3:10 pm | इरसाल

हायेत जित्ते दुसर्‍या धाग्यावं मी तेंचा पर्तिदास वाह्च्ला .

खरे साहेब तुम्ही गांधारीला आरसा बघ म्हणालात तर तिचा पहिला प्रश्न 'धृतराष्ट्राने कधी आरसा पाहिला का? ' असाच असणार… त्यामुळे तसे सांगणे म्हणजे आपलाच वेळ फुकट घालवणे … मंत्रात 'नमो' हा शब्द येतो म्हणून हितेशभाऊ हल्ली फक्त 'भगवते वासुदेवाय' एवढाच जप करतात अशी चर्चा ऐकली मी कुठेतरी. पुरावा देत नाही नाहीतर पुन्हा पूर्वीच्या सरकारमध्ये असेच झाल्याची एखादी लिंक धाडून देतील ते

मृत्युन्जय's picture

15 Jun 2015 - 11:09 am | मृत्युन्जय

खणखणीत लेख. + १०००००००००००००००००००००००००००००००००००००

मोहनराव's picture

15 Jun 2015 - 1:34 pm | मोहनराव

सुंदर अभ्यासपुर्ण विवेचन!

चिनार's picture

15 Jun 2015 - 12:33 pm | चिनार

यथायोग्य विवेचन !
काका धन्यवाद ..

आकाश कंदील's picture

15 Jun 2015 - 12:50 pm | आकाश कंदील

एक्का साहेबांची प्रवास वर्णने जेवढी उत्कृष्ट असतात, तेवढेच आजचे विश्लेषण अतिशय पद्धतशीर, साहेब, आपण तर तुमच्या विचार मांडण्याच्या पद्धतीचे FAN आहोत

पुण्याचे वटवाघूळ's picture

15 Jun 2015 - 1:39 pm | पुण्याचे वटवाघूळ

हा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद इस्पिकराव.

म्यानमारमधल्या हल्ल्याया निमित्ताने मोदीविरोधकांची जी बेताल बडबड चालू असते त्याला चोपायचे म्हटले तर मला इतके मुद्देसूद लिहिता येत नाही.आता हा एक लेख दाखवला की माझे काम झाले.

म्यान्मार सरकार असा हल्ला झालाच नाही असे म्हणणार यात काहीच विशेष नाही. कोनते सरकार-- हो परदेशी सैनिक आमच्या देशात आले होते आणि त्यांचे काम करून परत गेले आणि आम्ही काही केले नाही असे आपली प्रतिमा डागाळली न जाता मान्य करेल? तरीही म्यानमार सरकारने असे म्ह्टल्यावर अनेक लोक नेमके तेच उचलून मोदी कसे फेकू वगरे म्हणू लागतात तेव्हा त्यांच्या आकलनाची किव करावीशी वाटते. आमचे मिसळपाववरचे जातभाई पण त्यातलेच (वटवाघूळच पण इंग्लिशमधले). काय करणार? झोपलेल्याला उठविता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही.

शशांक कोणो's picture

15 Jun 2015 - 2:09 pm | शशांक कोणो

लेख अगदी मनापासून आवडला. विषयाशी संबंधित जवळपास सगळ्या गोष्टींचा परामर्श घेतला आहे..........

खूप दीवसांनी ईतका समतोल लेख वाचला. प्रतिवाद करायला मुद्देच ठेवले नाहीत एक्का साहेबांनी. तरी काही रडे लोक सरपटी चेंडू टाकून खेळाची मजा घालवत आहेत.

कपिलमुनी's picture

15 Jun 2015 - 2:45 pm | कपिलमुनी

या अतिरेक्यांनी १८ जवान मारले. त्या संघटनेला धडा शिकवला. यामुळे भारतीय जवानांचे मनोबल वाढले हे निश्चित !

मारले गेलेले १८ जण त्यांच्यापैकीच कुणाची तरी मुले असतात म्हणून सर्वसामान्य माणसाला पण यामुळे चांगले वाटले.

बाकी राजकीय ओकार्‍या, स्टॅटिस्टिक , फायदे तोटे याच्याशी काही देणे घेणे नाही.

पुण्याचे वटवाघूळ's picture

15 Jun 2015 - 3:00 pm | पुण्याचे वटवाघूळ

बाकी राजकीय ओकार्‍या, स्टॅटिस्टिक , फायदे तोटे याच्याशी काही देणे घेणे नाही.

खरोखरच? 'ते' पादले तरी 'भक्त' चांगला वास आला असे म्हणतील असे काहीसे तुम्ही मागच्या वर्षी म्हणाला होतात (त्या प्रतिसादाला पंख लागले बहुतेक). जिथेतिथे मोदी दिसणार्‍यांनी राजकीय ओकार्‍यांशी घेणेदेणे नाही असे म्हणणे आश्चर्यकारकच आहे.

कपिलमुनी's picture

15 Jun 2015 - 3:42 pm | कपिलमुनी

स्टँप मारायची घाइ कशाला करताय ?
इतरत्र एका ठिकाणी मी स्वतः भाजपाला मतदान केले आहे असेही लिहले आहे.
पण जिथे मला चुकले असे वाटते तिथे चूक म्हणायचे नाही का ?
आता भक्त प्रत्येक गोष्टीचा उदोउदो करतात .
उदा : जमीन अधिग्रहणामधल्या 'काही' तरतूदी असतील ,राष्ट्रवादीशी घरोबा असेल किंवा परदेशी जाउन भारताच्या पूर्वसरकारची निंदा असेल , या गोष्टी मला आणि बरेच भाजपासमर्थकांना पटल्या नाहियेत.

बाकी आजकाल मोदी म्हणजे संपूर्ण भाजपा , आणि मोदीविरोध म्हणजे देशविरोध असे मानायची फॅशन आली आहे.

राजकीय ओकार्‍या या भाजपा , काँग्रेस आणि आप सर्वजणच काढत आहेत. आपल्या देशाचे फार मोठे सुदैव की आपले लष्कर या सर्वांपासून अलिप्त आहे.
बाकी भक्तां बद्दल जे म्हणल होता ते मत अजून पक्के झाले आहे आणि भक्तांनी ते सिद्धच केले आहे.

मोदक's picture

15 Jun 2015 - 3:52 pm | मोदक

सोडा ओ मुनीवर..

बिकाऊ मिडीयाच्या तुलनेत कितीतरी सरस पद्धतीने योग्य शब्दात झालेली ही चर्चा बघा.. मला पण आत्ताच सापडली.

पुण्याचे वटवाघूळ's picture

15 Jun 2015 - 4:02 pm | पुण्याचे वटवाघूळ

बाकी भक्तां बद्दल जे म्हणल होता ते मत अजून पक्के झाले आहे आणि भक्तांनी ते सिद्धच केले आहे.

याला इंग्लिशमध्ये एक छान टर्म आहे-- सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी. म्हणजे मोदी समर्थक असा कोणी नसतोच. जो कोण असेल तो भक्तच असा पूर्वग्रह नक्की करायचा. आणि मग दोनचार मिसळपावकरांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करायचे समर्थन केले असेल तर इतर अनेकांनी त्याला विरोध केला होता याकडे दुर्लक्ष करून 'बघा भक्त कसे करतात' असे म्हणायला आणि ती सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी बघायला तुम्ही वेगळे.आता भक्त आणि परमभक्त अशाच कॅटेगिरी निर्माण केल्या आहेत तुम्ही लोकांनी.

आणि वर उल्लेख केलेला प्रतिसाद तुम्ही मागच्या वर्षी दिला होतात त्याविषयी तुमचे काय म्हणणे आहे? म्हणजे तुम्ही मोदींविषयी अशी भाषा वापरायची आणि मोदी समर्थकांनी मात्र सभ्यपणेच वागायचे अशी अपेक्षा असेल तर ती चुकीची आहे. आजही मोदी समर्थकांचा ज्वर वाढलेला दिसतो याचे कारण तथाकथित सेक्युलर लोकांनी कुठलाही पुरावा नसताना १२ वर्षे मोदींविरूध्द कायकाय आकाशपाताळ एक केले होते त्यामागे आहे. ती गोष्ट चुकीची होती असे तुमच्यासारखे लोक मान्य करणारच नाहीत. वाजपेयी पंतप्रधान असतानाही त्यांना विरोध करणारे होते पण ते विरोधकही सभ्यपणे विरोध करत होते. पादणे सारख्या चारचौघांमध्ये वापरायच्या शिष्टाचाराशी विसंगत अशी भाषा वाजपेयींविषयी कुणी केली नव्हती. त्यामुळे वाजपेयी समर्थकही त्यांची पातळी सोडत नसत. पण मोदी हे नाव ऐकल्यावरच ज्यांना कावीळ होते अशांच्या असल्या खालच्या पातळीवरच्या टिकांमुळे मोदी समर्थकही अती करतात.

क्रियेला प्रतिक्रिया येणारच हे न्यूटन महाशय ३०० वर्षांपूर्वीच म्हणून गेले आहेत.ही क्रिया १२ वर्षे होतच होती आणि तुमच्यासारखे लोक त्यात भर पाडतात.त्यामुळे प्रतिक्रियाही अधिक प्रमाणात तिखट होणार हे तुम्हाला मान्य केलेच पाहिजे.

कपिलमुनी's picture

15 Jun 2015 - 4:21 pm | कपिलमुनी

मोदी समर्थक सभ्यपणेच वागतात हा सर्वात मोठा गैरसमज आहे.
मनमोहन सिंग , सोनिया यांच्या मॉर्फ इमेज पाहिल्या नाहीत का ?
आजसुद्धा मोदी समर्थक केजरीवल विषयी काय भाषेत बोलतात, कुठल्या इमेज टाकतात हे आपण सामाजिक संस्थळावर पाहिले नाही का ?
वाजपेयींच्या काळात असा विरोध नव्हता.
म्हणून न्यूटनचा लॉ सर्वाना लागू होतो . जर मोदी समर्थकांनी पातळी सोडली तर समोरून तसेच उत्तर येणार .
तुम्ही माझा प्रतिसाद केवळ सांगितला , पण तो का , कुठे दिला , कोणत्या प्रतिसादावर दिला हे सांगितले नाहीत.
फक्त सिलेक्टीव्ह रीडिग केले आहे.

मोदी समर्थक आणि भक्त मध्ये एवढाच फरक आहे , की समर्थकाला एखादी गोष्ट पटली नसेल तर तो नाही म्हणतो पण भक्त मात्र माझ्या नेत्याच्या सर्वच गोष्टी कशा योग्य आहेत हे ठासून सांगतो .
बाकी,यामध्ये गोध्रा प्रकरण घुसवून आणि माझे त्याबद्दल काय मत असेल हे ठरवून टाकलेत जे वाचून मौज वाटली.

पुण्याचे वटवाघूळ's picture

15 Jun 2015 - 4:29 pm | पुण्याचे वटवाघूळ

मोदी समर्थक सभ्यपणेच वागतात हा सर्वात मोठा गैरसमज आहे.

तोच तर मुद्दा आहे. वाजपेयींच्या काळात सभ्यपणे वागणारे समर्थक आता मोदींच्या काळात पिसाळल्यासारखे का करतात? कारण तुमच्यासारख्या लोकांनीच १२ वर्षात जे आकांडतांडव केले त्यामुळे. म्हणजे तुम्ही कसेही वागणार आणि इतरांनी मात्र सभ्यपणेच वागले पाहिजे ही अपेक्षा करणे चुकीचे आहे. मे २०१४ पासून तुमच्यासारख्या लोकांनी सभ्यपणे टिका केली असती तर कदाचित १२ वर्षांची धग पुढील वर्ष-दोन वर्षात विझायची शक्यता होती. पण तुम्हीच असभ्य टिका मोदींवर चालूच ठेवल्यामुळे हा पोलिटिकल डिस्कोर्स चांगला व्हायची शक्यता अजून धुसर झाली आहे.

तेव्हा तुम्ही इतरांकडे एक बोट दाखवता तेव्हा चार बोटे तुमच्याकडेच वळली आहेत (१२ वर्षांपासून) हे लक्षात घ्या.

पुण्याचे वटवाघूळ's picture

15 Jun 2015 - 4:31 pm | पुण्याचे वटवाघूळ

या प्रतिसादाला टायटल द्यायचे विसरल्यामुळे 'मोदी समर्थक सभ्यपणेच वागतात' असे टायटल आले आहे. ते या प्रतिसादात उधृत केलेले पहिले वाक्य आहे हे ध्यानात घ्यावे. मोदी समर्थक सभ्यपणेच वागतात असे मला नक्कीच म्हणायचे नाही.मुद्दा एवढाच की ही प्रतिकिर्या आहे.

कपिलमुनी's picture

15 Jun 2015 - 4:51 pm | कपिलमुनी

तुमच्यासारख्या लोकांनीच १२ वर्षात जे आकांडतांडव

माझे किती प्रतिसाद आहेत जिथे मी मागच्या १२ वर्षाबद्दल आकांडतांडव केला आहे?
जिथे मी मोदींना गोध्रा किंवा मुस्लिम दंगलीवरून टारगेट केले आहे ?

या धाग्यावर मी भूमी अधिग्रहण विधेयकावर चर्चा केली होती. आणि मुद्दे मांडले होते पण एकही भक्त तिथे आला नाही कारण त्यांना मुद्द्यांवर चर्चाच नको . इतर धाग्यांवर प्रचारकी धुरळा उडवणारे भूमी अधिग्रहणाच्या ३- ४ धाग्यांवर फिरकले सुद्धा नाहीत.

मे २०१४ पासून तुमच्यासारख्या लोकांनी सभ्यपणे टिका केली असती तर ??
माझ्यासारख्या लोकांनी म्हणजे ? पक्ष बाजूला राहू देत पण वरती भाजपाच्या लोकांनी सोनिया, तेव्हचे पंप्र जी टीका केली , सध्या केजरीवाल यावर ज्या हीन पातळीने टीका करत आहेत तेवढी पातळी तर नक्कीच गाठली नाहिये.
मे २०१४ पासून किंवा प्रचारापासून फेकूगिरी सुरू आहे , माझा वैयक्तिक विरोध हा भाजपा किंवा मोदींना कधीच नाहिये , फक्त या चमकोगिरी आणि फेकूगिरीला आहे.
एक नागरीक म्हणून जर काही धोरणे मला जनहितविरोधी वाटली तर त्याला विरोध असणारच .
बाकी ह्या धाग्याचे काश्मिर नको . इतरत्र किंवा खफ मध्ये चर्चा करू.

पुण्याचे वटवाघूळ's picture

15 Jun 2015 - 5:08 pm | पुण्याचे वटवाघूळ

माझे किती प्रतिसाद आहेत जिथे मी मागच्या १२ वर्षाबद्दल आकांडतांडव केला आहे?

तुमच्यासारखे लोक हो--- व्यक्तिशः तुम्ही नाही.व्यक्तिशः तुमचा संदर्भ फक्त पादण्यासंदर्भात.

या धाग्यावर मी भूमी अधिग्रहण विधेयकावर चर्चा केली होती. आणि मुद्दे मांडले होते पण एकही भक्त तिथे आला नाही कारण त्यांना मुद्द्यांवर चर्चाच नको . इतर धाग्यांवर प्रचारकी धुरळा उडवणारे भूमी अधिग्रहणाच्या ३- ४ धाग्यांवर फिरकले सुद्धा नाहीत.

याची सायकॉलॉजी मला माहित नाही.पण तुमची इमेज जर मोदीविरोधी अशी असेल तर तुम्ही चालू केलेली चर्चा ही मुद्द्यांवर आधारित असेल याची खात्री अनेक मिपाकरांना वाटली नसेल. जसे तुमच्यासारख्यांना श्रीगुरूजींनी चर्चा सुरू केली तर ती मोदींची स्तुती करायलाच असेल असे वाटत असेल त्याचप्रमाणे तुम्ही चर्चा सुरू केली तर ती नक्की सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार व्हावा म्हणून केली असेल असे वाटणार नाही तर ती टिका करायलाच केली आहे असे वाटणार. जर का इस्पिकैका किंवा विकास यांनी चर्चा सुरू केली असती तर मुद्दे तेच असले तरी मिस्ळपावकरांची रिअ‍ॅक्शन वेगळी असती.

राघवेंद्र's picture

15 Jun 2015 - 8:57 pm | राघवेंद्र

एक्का साहेब लेख आवडला.
सं. मं. राजकारणावरिल सर्व प्रतिसाद काढले तर खूप छान होईल.

मदनबाण's picture

16 Jun 2015 - 11:59 am | मदनबाण

झकास लेख...
P1
Forgiving a Terrorist should be left to the GOD, but fixing their appointment with GOD is entirely our responsibility.” :- Indian Army

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

बबिता बा's picture

16 Jun 2015 - 1:57 pm | बबिता बा

. छान लेख

सचु कुळकर्णी's picture

8 Oct 2016 - 3:15 am | सचु कुळकर्णी

कारण, अश्या प्रकारच्या, अंतिम परिणाम मिळविण्यासाठी नाही तर मुख्यतः संदेश देण्यासाठी केलेल्या कारवाईनंतर, तिचे अपेक्षित परिणाम साधण्यासाठी, कारवाईच्या बाजूला असणार्‍या लोकांनी तसे करणे आवश्यक असते. तर शासनात असलेल्या पक्षाला त्या कारवाईचे श्रेय मिळू नये अशी त्यांच्या विरोधकांची खटपट असते... ही वस्तुस्थिती देशांतर्गत आणि देशाबाहेर दोन्हीकडे आहे. मात्र, असा विरोध करताना देशाचे भलेबुरे नजरेआड करणे हे जगात इतरत्र अभवानेच पहायला मिळते, पण दुर्दैवाने आपल्या देशात हे काही नवे नाही. :(

Still the same !
लेख पुन्हा एकदा वाचला ;)