नविन सदस्यांना बरेच वेळा भेडसावणारा प्रश्न म्हणजे फोटो (प्रकाशचित्रं ) कसा टाकावा.
संपादक मंडळ बरेच वेळा मदत करते, आणि वाविप्र मध्ये ही याचा उलगडा केलाय.
पण प्रत्येला का ते वाचुन जमतच असं नाही.
जे आपण पहातो ते ऐकण्या पेक्षा जास्त चांगल लक्षात रहात, हा माझा स्वानुभव असल्याने या धाग्यात टप्या टप्याने फोटो कसा टाकावा ते सांगत आहे.
गरजुंना याचा लाभ होईल अशी आशा करतो.
पायरी १.
प्रथम पिकासा/फ्लिकर वा तत्सम फोटो चढवण्याची सोय असलेल्या साईटवर आपल्याला हवा असलेला फोटो चढवावा.
येथे पिकासाचे उदाहरण देत आहे. Upload वर क्लिकावे.
पायरी २.
हवा तो अल्बम निवडुन Browse या बटणावर क्लिकावे.
तुमच्या संगणाकावरुन हवातो फोटो निवडावा.
Start Upload क्लिकावे.
पायरी ३.
फोटो चढवुन झाल्यावर. त्याच फोटोवर क्लिकावे.
पायरी ४.
फोटो मोठा दिसायला लागल्यावर, त्यावर माउसचे उजवे बटण क्लिकुन आणि Properties वर क्लिकावे.
पायरी ७.
५
URL चा पत्ता कॉपी करावा.
पायरी ६.
मिपावर येऊन प्रतिसादाच्या Insert/ edit Image या बटणावर क्लिकुन तेथे URL चा पत्ता पेस्टवावा.
हवी असलेली साईझ द्यावी.
पायरी ७.
पुर्वपरिक्षण करुन प्रकाशित करावे.
प्रतिक्रिया
4 Aug 2010 - 4:20 am | बेसनलाडू
नवीन सदस्यांपैकी (किंवा त्यांच्या 'बेटर हाफ' पैकी) कोणी IT WIFE असतील तर त्यांना स्वयंपाकघरातील मदत यावर मूलभूत धडेही द्या गणपाशेठ!
(सॉफ्टवेअरवाला)बेसनलाडू
4 Aug 2010 - 4:37 am | Nile
IT wife ला जसे तिला स्वयंपाक येत नाही तसेच IT husband ला चित्र डकवता येत नसेल तर लेख कोण लिहणार?
4 Aug 2010 - 6:20 am | Pain
सकाळी हीच कृती तुम्ही सांगायच्या आधी करून पाहिली. जो फोटो डकवायचा होता तो आधीपासूनच एका फोटो ठेवण्याच्या साइटवर आहे. तिथून मी त्याची लिंक (यु आर एल) कॉपी - पेस्ट केली आणि इतर डीटेल्स भरले आणि प्रकाशित करा वर क्लिक केले. एक फुली आली फक्त.
-----------------------------------------------------
संपादक मंडळ बरेच वेळा मदत करते, आणि वाविप्र मध्ये ही याचा उलगडा केलाय.
आता पुन्हा बघितले. वाविप्रमधे हे दिलेले नाही तसेच त्या धाग्यावर विचारलेल्या इतर बहुसंख्य प्रश्नांनाही तिथे कोणी उत्तर देत नाही.
मी जेव्हा सभासदत्व घेतले तेव्हापासून (हा अपवाद वगळता) माझ्या एकाही शंकेला आजतागायत कोणीही उत्तर दिलेले नाही. ही साइट अजिबात युजर फ्रेंडली नाही. बहुतांश गोष्टी esoteric आहेत आणि त्या तशाच ठेवल्या जातात.
नविन सदस्यांना खरडवही किंवा खरडफळ्याची सुविधा नसते (त्यातही एकवाक्यता नाही) पण मदतीच्या धाग्याकडेही कोणी ढुंकुन पाहात नाही. "व्य नि" ही काही रोजच्या व्यवहारात वापरली जाणारी संज्ञा नाही त्यामुळे तो काय प्रकार आहे, कसा करावा आणि कोणाला करावा याबद्दल मला काहीही माहिती नव्हती.
संपादकांची नावे वेगळ्या फाँटमधे लिहावीत म्हणजे ओळखता येईल आणि मदतीसाठी संपर्क साधण्यास सोपे जाईल अशी एक सूचना केली होती (इतर अनेक फोरम्सवर ही पद्धत आहे) पण तिला फाट्यावर मारण्यात आले.
4 Aug 2010 - 6:25 am | प्रियाली
साईटबद्दल माहित नाही पण मीही फारशी फ्रेंडली नाही. ;) खडूस आहे.
पण तुमचा फोटो दिसतोय का बघा? म्हणजे तोच फोटो आहे का बघा मग तो कसा दाखवला ते सांगते.
4 Aug 2010 - 6:28 am | प्रियाली
हे काम उत्तम केलेत. मनःपूर्वक धन्यवाद.
नीलकांतला सांगून अशा लेखांचा मुखपृष्ठावर एक वेगळे वर्गीकरण करायला हवे.
4 Aug 2010 - 7:04 am | सहज
गणपाशेठ तुम्ही हे फार उत्तम काम केले आहे.
वाविप्रमधे हा धागा येउ दे!
4 Aug 2010 - 10:04 am | मी-सौरभ
आता नविन विभागात तुम्ही उघड्लेल्या आघाडीला शुभेच्छा.....
पण तेवढ पाकक्रुती टाकणे सोडू नका IT wife च्या पतींना तुमच्या मार्गदर्शनाची गरज नेहमीच राहणार आहे :)
5 Aug 2010 - 2:49 pm | भिरभिरा
गणपासेठ, छान उपयोगी धागा..
5 Aug 2010 - 3:00 pm | परिकथेतील राजकुमार
गणपाशेठ जियो.
16 Sep 2010 - 11:53 am | चिगो
मला खरंच जमलं नव्हतं हे.. म्हणून तर फोटो नाही टाकू शकलो..
22 Oct 2010 - 8:31 am | डावखुरा
http://www.misalpav.com/node/13573
या प्रंमाणे गेलो..
पण "फोटो मोठा दिसायला लागल्यावर, त्यावर माउसचे उजवे बटण क्लिकुन आणि Properties वर क्लिकावे." ही क्रिया करायला जातो तेव्हा Properties..हे येत नाही....
मला दिसणारे ऑष्पन्स..
१)view image
२)copy image
३)copy image location
४)save image as
५)send image
६)set as desktop background
७)block images from Ih6.ggpht.com
८)view image info
22 Oct 2010 - 8:35 am | गांधीवादी
८)view image info
हे क्लिकावे.
Location च्या पुढील सर्व copy करुन मिपाच्या Insert Image मध्ये paste करावे.
22 Oct 2010 - 8:35 am | डावखुरा
धन्यवाद ..
करुन पाहतो
22 Oct 2010 - 8:43 am | डावखुरा
गांधी भाउ तुमचे पाय कुठेय?
22 Oct 2010 - 9:06 am | गांधीवादी
17 May 2011 - 4:20 pm | प्रचेत
आपल्याला सरळ मि पा वर फोटो चिकटवता येनार नाहित का?
दुसर्या सईटची मदत घ्येन्याची गरज क पडवी हे कळत नाहि.
सरळ जर मि पा वरच फोटो टाकता आले तर बर होईल असे वाटते...
चला पहिली प्रातीक्रिया लिहुन झलि एकदाची ;-)
11 Dec 2015 - 3:57 pm | शिव कन्या
फोटो डकवण्यात अडचणी येतात. तेवढा वेळ नसतो. म्हणून कित्येक लेख तसेच आहेत.कारण फोटो शिवाय त्या लेखातील माहिती निरर्थक ठरते.
11 Dec 2015 - 9:55 pm | श्रीरंग_जोशी
नेमक्या काय अडचणी येतात ते सांगावे.
मिपावर फोटो प्रकाशित करण्याच्या पद्धतीची एकदा सवय झाली की अजिबात अडचण वाटणार नाही याची खात्री बाळगा.
25 May 2011 - 3:46 pm | आर्या१२३
<<सकाळी हीच कृती तुम्ही सांगायच्या आधी करून पाहिली. जो फोटो डकवायचा होता तो आधीपासूनच एका फोटो ठेवण्याच्या साइटवर आहे. तिथून मी त्याची लिंक (यु आर एल) कॉपी - पेस्ट केली आणि इतर डीटेल्स भरले आणि प्रकाशित करा वर क्लिक केले. एक फुली आली फक्त.<<<
अगदी अगदी हेच होतय माझ्या बाबतीत! :(
28 May 2011 - 6:40 am | गोगोल
ह्या लेखाची लिंक बाजूच्या कोपर्यात परमनंटली ठेवायला पाहीजे.
6 Dec 2011 - 7:25 pm | snowy
23 Feb 2012 - 11:58 am | सस्नेह
पिकासा ओपन केल्यावर अपलोड असा ऑप्शनच येत नाही
24 Sep 2012 - 4:09 pm | Kavita Mahajan
पिकासावर फक्त एक फुली दिसते. फोटो थेट अपलोड करता आले पाहिजेत. अजून काही पर्याय नाही का?
24 Sep 2012 - 4:43 pm | गणपा
<<पिकासावर फक्त एक फुली दिसते.>>
तुमच्याच पिकासाअल्बम मधला फोटो आहे का? असल्यास जर नुसतिच फुल्ली दिसत असेल तर तो फोटो नीट अपलोड झाला नसणार.
जर दुसर्याचा अल्बम असेल तर कदाचीत त्याने तो अल्बम वा फोटो पब्लीक/शेयर केला नसेल.
24 Sep 2012 - 11:15 pm | मीनल
प्रतिसादात कसा द्यायचा फोटो????
इथे पर्याय दिसत नाही.
26 Sep 2012 - 8:45 am | बापू मामा
नविन मिपावर फोटो अपलोड करायला काय सोय आहे. लेखात मधे मधे चित्रे टाकायची असतील तर काय करावे? फक्त शेवटी चित्रे टाकता येतात. ति ही पुर्विप्रमाणे यु आर एल कॉपी पेस्ट करुन टाकता येत नाही.
26 Sep 2012 - 12:31 pm | गणपा
मिपावर अजुन काम चालु आहे. लवकरच पुर्वीची सोय पुन्हा मिळेल.
11 Dec 2015 - 8:33 am | चिंतामणी
लवकरच पुर्वीची सोय पुन्हा मिळेल.
हे अजून झाले नाही.
29 Dec 2015 - 3:37 pm | चिंतामणी
मिपावर अजुन काम चालु आहे. लवकरच पुर्वीची सोय पुन्हा मिळेल.
आता लौकर ही सोय द्या.
26 Sep 2012 - 12:59 pm | प्रभाकर पेठकर
सोप्प आहे. फ्लिकर वरील share हे बटन दाबल्यावर URL adress दिसतो तो 'इमेज एस आर सी' पासून "> पर्यंत कॉपी करून घ्या. आता तो तुमच्या लेखात हवा तिथे पेस्ट करा.
जसा मी इथे केला आहे. आणि पोस्ट प्रकशित करा.
म्हणजे असे छायाचित्र दिसेल.
एवढे करूनही छायाचित्र दिसत नसेल तर कांही तांत्रिक कारण (फक्त तुमच्या संगणका बाबत) असेल ते कोणी त्या क्षेत्रातील तज्ञच तुम्हाला सांगू/मदत करू शकतील.
26 Sep 2012 - 5:58 pm | पुष्कर जोशी
१. कोणतीही लिंक पिकासा / फ्लिकर किवा इतर ...ती प्रथम पब्लिक आहे का ते पहा ..
browser मध्ये login न करता किवा private window मध्ये उघडते का ते पहा ...
येथे फक्त आणि फक्त फोटोच दिसला पाहिजे ..
२. अशा सर्व लिंक html च्या img tag ने इथे डकवता येतात जसे ...
google image वर गणपती शोधले दगडू शेठ च्या गणपतीच्या चित्रावर r click केले copy url / link केले... opera - private / chrome - incognito / IE -
InPrivate मध्ये लिंक उघडते का ते बघितले ... (अशा लिंक च्या शेवटी शक्यतो .com , .net , ऐवजी .jpeg/ .gif /.png असते )
ती लिंक प्रतिसादात < img src = " L I N K " > अशी लिहिली ... आणि पूर्व परीक्षण केले .. :)
याच प्रमाणे थोडे फार html tag वापरून तुम्ही रंग आकार आणि इतर गोष्टी पण करू शकता जसे
< font color=#F59559 > SMPS चा फोटो डकवला आहे त्यात सगळे रंग आणि volt, current सापडले त्यानुसार पिवल्याला १२ v आणि २५ A असे सापडले ... तर CD ROM / HDD साठी असलेल्या केबल मधून वीज घेतली ... </font >
हे SMPS चा फोटो डकवला आहे त्यात सगळे रंग आणि volt, current सापडले त्यानुसार पिवल्याला १२ v आणि २५ A असे सापडले ... तर CD ROM / HDD साठी असलेल्या केबल मधून वीज घेतली ... असे दिसेल ..
5 Oct 2012 - 8:39 pm | प्रियाकूल
एदित कसे करावे?
28 Aug 2013 - 11:33 pm | बाप्पू
म्हणजे एकंदरीत हा प्रकार खालील उदाहरनाप्रमाणे आहे.....
जेवताना सरळ जेवायचे नाहि..... घास हातात घेऊन तो मानेमागुन फिर्उन मग खायचा...!!! :)
29 Aug 2013 - 12:58 am | अद्द्या
.
29 Aug 2013 - 1:01 am | अद्द्या
लई सोप्पंय हे
धन्यवाद
18 Sep 2013 - 7:59 pm | मयुर कुलकर्नि
4 Jul 2017 - 4:35 am | सारिका होगाडे
माझी इमेज पण अशीच दिसत आहे. काय करावे?
18 Sep 2013 - 8:05 pm | मयुर कुलकर्नि
18 Sep 2013 - 8:07 pm | मयुर कुलकर्नि
19 Sep 2013 - 11:25 am | प्रमोद देर्देकर
मला माझ्या टॅग लाइन मधे बदल करायचा आहे.
20 Sep 2013 - 4:33 am | खटपट्या
कळ्व्याचे कोणीतरी आहे...बरे वाटले..
20 Sep 2013 - 10:08 am | देशपांडे विनायक
SIR
आपण HOME VISIT कराल का ?
1 Oct 2013 - 1:21 am | एस
माझ्या लेखांतील छायाचित्रांच्याबरोबर त्यांची फ्लिकर लिंकपण एम्बेड झालीय. <img ते > पर्यंतच घेण्याऐवजी चुकून आख्खी <a..> पण आलीय. तेवढे काढून टाकता येईल का?
धन्यवाद!
8 Oct 2013 - 9:30 pm | मारवा
8 Oct 2013 - 9:38 pm | मारवा
8 Oct 2013 - 9:41 pm | मारवा
8 Oct 2013 - 9:50 pm | मारवा
8 Oct 2013 - 9:54 pm | मारवा
8 Oct 2013 - 9:54 pm | मारवा
8 Oct 2013 - 10:09 pm | मारवा
31 Dec 2013 - 10:05 pm | आनंदराव
8 Apr 2014 - 8:43 pm | प्रभाकर पेठकर
गणपा साहेब,
दोन छायाचित्र एकाच पातळीवर शेजारीशेजारी दिसतील अशी टाकता येतात का? असल्यास कसे करावे?
8 Apr 2014 - 9:24 pm | श्रीरंग_जोशी
एचटीएमएलमधील table टॅग वापरून मिपावरील लेखनात असे करणे शक्य आहे.
माझ्या या व या लेखांत मी याचा वापर केलेला आहे.
यापेक्षा सोप्या पद्धतीने कुणी असे करत असेल तर जाणून घ्यायला आवडेल.
मी वापरतो त्या पद्धतीविषयी काही प्रश्न असल्यास इथे विचारू शकता.
8 Apr 2014 - 9:56 pm | चित्रगुप्त
शेजारीशेजारी फोटो असे टाकता येतीलः
१. आधी पहिला फोटो टाका, त्याची उंची समजा ४०० ठेवली आहे.
२. त्यापुढे . (पूर्णविराम)हे चिन्ह टाका.
३. लगेचच त्यापुढे दुसरा फोटो तेवेढीच उंची ठेऊन डकवा.
याप्रकारे दोन्ही फोटो कमिजास्त रुंदी असूनही एकसारख्या उंचीचे शेजारीशेजारी येतील.
(मात्र दोघांची मिळून एकत्रित रुंदी जास्त भरत असेल, (सुमारे ८०० पेक्षा जास्त) तर ते फोटो एकाखाली एक असे येतात).
.
वरील दोन फोटो डकवताना दोन्हीची उंची ४०० ठेवली आहे. दोन्हीच्या मधे . चिन्ह दिसते आहे. (ही चित्रे मोदिग्लियानी ची आहेत)
.
वरील दोन चित्रे आधीप्रमाणेच (३००) उंची ठेऊन डकवलेली असूनही एकूण रुंदी जास्त झाल्याने एकाखाली एक आली. (ही चित्रे कोरो ची आहेत)
9 Apr 2014 - 12:43 pm | गणपा
चोक्कस.
माझे टंकन श्रम वाचवल्या बद्दल आभारी आहे चित्रगुप्त साहेब.
21 Jun 2014 - 6:11 pm | नांदेडीअन
फ्लिकरवरचे फोटो अपलोड होत नाहीयेत.
उदा.
एरर
EntityMalformedException: Missing bundle property on entity of type taxonomy_term. in entity_extract_ids() (line 7734 of /home/misalone/public_html/includes/common.inc).
21 Jun 2014 - 6:12 pm | नांदेडीअन
:O
इथे झाला अपलोड.
नवीन टॉपिक सुरू करतांना होत नाहीये.
7 Apr 2015 - 8:45 pm | शब्दबम्बाळ
7 Apr 2015 - 8:31 pm | श्रीरंग_जोशी
तुम्ही दिलेल्या दुव्यावर जाऊन चित्रावर राइट क्लिक करून कॉपी इमेज युआरएल केल्यावर खालील दुवा मिळाला.
https://lh3.googleusercontent.com/A01vo9AjV6XTt_6VE3H4KSOiCZuNmerPMiwirm...
फोटो प्रकाशित करताना घ्यायची काळजी
7 Apr 2015 - 8:53 pm | शब्दबम्बाळ
जम्या! जम्या!!
धन्यवाद!! :)
1 May 2015 - 8:22 pm | बाबा पाटील
1 May 2015 - 8:33 pm | श्रीरंग_जोशी
इमेजचा युआरएल केवळ 20140620_095002-1 असा आहे.
http:// ने सुरू होऊन .jpg किंवा इमेज फॉरमॅटच्या इतर कुठल्याही एक्स्टेन्शनने संपायला हवा.
11 Jun 2015 - 2:30 pm | अक्षदा
मी मोबाईल वरून अॉनलाईन येते. अशा वेळी कसा अपलोड करावा फोटो. कारण ही जी क्रुती सांगीतली आहे पिकासा वापरण्याची ती कॉम्प्युटर वर करण्या सारखी आहे.
11 Jun 2015 - 6:15 pm | श्रीरंग_जोशी
मोबाईलवरून ही सर्व प्रक्रिया करणे अवघड आहे.
मी संगणकावरून अपलोड करून ठेवलेल्या फोटोचा दुवा स्वतःला इमेलमध्ये पाठवून तो दुवा फोटो देण्यासाठी मोबाइलवरून वापरला आहे. पण १००% प्रक्रिया मोबाइलवरून करण्याचा अनुभव नाही.
हे अशक्य नक्कीच नाही. मिपावर कुणी ना कुणी केले असावेच. अशांपैकी कुणी लिहिले तर उत्तम.
11 Jun 2015 - 6:26 pm | गणपा
तुम्हाला टाकायचा फोटो स्वतः काढलेला असेल तर सर्व प्रथम तो तुम्हाला आंतरजालावर कुठे तरी अपलोड करावाच लागेल.
यासाठीच ते पिकासाचे उदाहरण.
पण जर समजा तुम्हाला जालावरच असलेला एखादा फोटो संदर्भ म्हणुन द्यायचा असेल तर
१) त्या फोटोची URL प्रथम मिळवा. जर मोबाईलवर असाल तर त्या फोटोवर क्लिक करा, अनेक पर्याय येतील त्यातुन view image निवडा.
२) फोटोच्या वर त्याची URL येईल. ती काॅपी करा आणि मुळ लेखात दिलेल्या पायरी क्रमांक सहा पासुन पुढे फाॅलो करा.
11 Jun 2015 - 7:23 pm | प्रकाश घाटपांडे
आता माझे पिकासावेब हे https://plus.google.com ला जाते तसे फोटो https://photos.google.com/ मधे शेअर ऑप्शन आहे पण तो इथे इन्सर्ट करता येतो का? नवीन काही तरी भानगडि झालेल्या दिसतात. कृपया प्रकाश टाकावा
11 Jun 2015 - 8:47 pm | श्रीरंग_जोशी
तुम्ही म्हणता तशी शेअर पर्यायातून घेतलेली लिंक या चित्रासाठी वापरत आहे.
जुन्या पद्धतीप्रमाणे फोटोवर राइट क्लिक केल्यावर कॉपी इमेज युआरएल या पर्यायाद्वारे मिळणारी लिंक खालच्या फोटोवर वापरली आहे.
12 Jun 2015 - 9:28 am | प्रकाश घाटपांडे
शेअर पर्यायातून घेतलेली लिंकमुळे चित्र कुठे दिसत आहे?
12 Jun 2015 - 9:34 am | श्रीरंग_जोशी
त्याचीच चाचणी म्हणून वरच्या प्रतिसादात पहिल्या फोटोसाठी तो दुवा वापरला होता. तो चालत नाहीये.
ब्राउझरच्या अॅड्रेसबारमध्ये टाकल्यास त्या फोटोचे (फोटोसकट) गुगल फोटोजचे पेज ओपन होते.
11 Jun 2015 - 8:59 pm | श्रीरंग_जोशी
थोडक्यात काय तर फोटोचे फाइलनेम असलेला दुवा हवाच. बहुतेक वेळा तो .jpg ने किंवा .JPG संपतो.
12 Jun 2015 - 5:34 pm | अक्षदा
डायरेक्ट अपलोड फोटो असा पर्याय असायला पाहीजे होता. किती बर झाल असत
12 Jun 2015 - 5:48 pm | श्रीरंग_जोशी
ही सुविधा कदाचित अव्यवहार्य असू शकते. शेकडो मिपाकरांनी फोटोज मिपाच्या सर्वरवर अपलोड करणे सुरु केल्यास त्याला भरपूर स्टोरेज स्पेस लागेल. त्यासाठी अधिक खर्चही येईल. तसेच कुणी आक्षेपार्ह फोटोज वगैरे टाकल्यास उगाच कायदेशीर समस्या उद्भवू शकतात. (या मला वाटणार्या शक्यता आहेत, खात्रीशीर माहिती नाही).
जर तुम्हाला फेसबुकवर फोटो अपलोड करणे सोपे वाटत असल्यास तसे करून फोटोंचे दुवे इथे वापरता येतील. स्वतःचे प्रोफाइल पब्लिक नसल्यास या कामासाठी वेगळे फेसबुक पेज सुरू करता येईल. माझे फेसबुक प्रोफाइल पब्लिक असल्याने मी तेथे अपलोड केलेले फोटोज मिपावर (दुवा वापरून) प्रकाशित करत असतो.
13 Jun 2015 - 7:49 am | कंजूस
मोबाइलवरून फोटो अपलोड करणे----
मी गेली पाच वर्षे सर्व काम मोबाइलमधूनच करतो आहे.पुर्वी
१)photobucket dot com वापरली आणि आता त्याहूनही सोप्पी
२)postimg dot org ही आहे.
रेजिस्टर करून (कितीही अकाउंट उघडा) अॅल्बम बनवा.एक मिनीट लागेल.इथे फोटो अपलोड झाला की त्याच्याखाली लिंक्स येतात त्यापैकी "Direct link" या चौकोनातली लिंक वापरणे.
13 Jun 2015 - 8:43 am | श्रीरंग_जोशी
मी या पद्धतीने फोटो अपलोड करून बघतो.
शक्य असल्यास या कृतीचे फोटोजसकट वर्णन टाका जेणेकरून नवमिपाकरांना मार्गदर्शन मिळेल.
13 Jun 2015 - 9:14 am | कंजूस
आपण काय लिहिणार आहोत आणि कोणते फोटो डकवायचे हे निश्चित असेल तेव्हा ते प्रथम फोनच्या "नोटस"मध्ये html code टाकून सेव करणे सोपे जाते सिवाय हे काम प्रवासात फावल्या वेळातही ओफलाइन करता येते. त्यासाठी खालील टेम्पेलटस करून ठेवायची आणि योग्य जागी फक्त लिंक्स पेस्ट करत जायचे. नंतर संपूर्ण लेख मिपाच्या लेखन चौकटीत पेस्ट करून "पुर्वपरीक्षण" करून फोटो हवे ढसे दिसल्यावरच "प्रकाशित करा" बटण दाबा.
टेम्प्लेट:
१)[img src="" width="500" /]
इथे [[[[ ]]]] हे कंस काढून <<<<<< इसे html चे कंस वापरा आणि " "च्या मध्ये फोटोंची लिंक पेस्ट करायची.
13 Jun 2015 - 9:17 am | कंजूस
[[[ हे कंस काढून html चे कंस वापरा.
13 Jun 2015 - 9:21 am | श्रीरंग_जोशी
मिपाच्या टेक्स्ट एडिटरवरील टूलबारमध्ये पहिलेच बटन फोटो प्रकाशित करण्याचे असताना html कोड वापरावे असे का सूचवले आहे?
मोबाइलचा स्क्रीन फार मोठा नसल्यास ते बटन वापरून हे काम करणे कदाचित क्लिष्ट होत असावे हा माझा अंदाज.
13 Jun 2015 - 2:22 pm | कंजूस
ओफलाईन काम करण्यासाठीचे लिहिले आहे.ज्यांना तुकड्या तुकड्यात लेखन आणि फोटोंच्या लिंक्स टाकून काम करायचे आहे त्यांना हे सोपे वाटेल.
यापुढची पायरी-तुमचा तीन एमबीचा फोटो posting siteवर असला तरी इकडे ५ -६शे केबीचा येतो आणि न्याय देऊ शकत नाही .अशावेळी [a href="" ]मोठा फोटो इथे पाह [/a]वापरून ती लिंक " " च्या मध्ये टाका.
19 Jun 2015 - 9:50 pm | के.पी.
6 Aug 2015 - 5:10 pm | अनुरोध
6 Aug 2015 - 6:07 pm | श्रीरंग_जोशी
तुम्ही फोटोचा दुवा वापरलेला नाही. त्याऐवजी बहुधा फ्लिकरवरून फोटो एम्बेडचे कोड वापरलेले दिसत आहे.
दुवा (बहुतेक वेळी) https:// ने सुरु होईल अन .jpg किंवा .JPG ने संपेल
फ्लिकरवरचे HTML Embed ऑप्शन घेतल्यावर जे कोड मिळतं त्यात < img src = " नंतर सुरु होणारा दुवा घ्यावा अन तो मिपावर वापरावा. स्वतःला पूर्वपरिक्षणात फोटो दिसला नाही तर दुवा चुकलेला असू शकतो असे समजावे.
तसेच फ्लिकर मधून लॉग आउट करून मिपावर फोटो प्रकाशित करावा म्हणजे पूर्वपरिक्षणात न दिसल्यास तो पब्लिकली शेअर्ड नाहीये हे कळेल.
18 Dec 2015 - 9:42 pm | मितभाषी
19 Dec 2015 - 11:40 pm | अरिंजय
19 Dec 2015 - 11:41 pm | अरिंजय
फ्लिकर वरुन प्रयत्न केला परंतु जमले नाही
20 Dec 2015 - 12:07 am | श्रीरंग_जोशी
कुठल्याही फोटो शेअरींग साइटवरुन फोटोच्या फाइलचा दुवा द्यावा लागतो. तो तिथे दिसत असताना अॅड्रेसबारमधला युआरएल दुवा म्हणून वापरू नये.
तुम्हे वापरलेल्या दुव्यावरून फ्लिकर वर गेलो असता खालचा फोटो मिळाला (फोटोचा दुवा)
20 Dec 2015 - 7:01 am | कंजूस
माझा प्रश्न पिकासावेब बद्दल.मला दुवा मिळतो त्याच्या शेवटी feat=directlink हा शब्द येतो आणि फोटो उमटत नाही.इतरांच्या याच साइटच्या फोटोच्या दुव्यात feat=embedwebsite असं दिसतं आणि त्याचा image tag काम करतो.
प्रश्न दुसरा: लेखातल्या फोटोवर प्रेस केले की इतर संस्थळावरच्या पिकासावेबचे फोटो असले तर copy link हा पर्याय दिसतो.मिपावरच्या कोणत्याच लेखाच्या कोणत्याच फोटोंवर copy link पर्याय मिळत नाही फक्त save/open image हे सामान्य पर्याय येतात.मोबाइलच्या ब्राउजरची असमर्थता असावी का?
20 Dec 2015 - 7:39 am | अरिंजय
जमले हो. धन्यवाद श्रीरंग.
22 Dec 2015 - 11:20 pm | अरिंजय
फ्लिकरच्या वेबसाईटवरुनच फोटो चिकटवावा लागतो, अॅप वरुन चिकटवता येत नाही.
22 Dec 2015 - 11:54 pm | श्रीरंग_जोशी
हा प्रतिसाद फोनवरून देत आहे. फोनवरूनच माझे फ्लिकर अकाउंट ब्राउझरमधून उघडले अन फोटोचा दुवा मिळवला.
23 Dec 2015 - 7:16 am | कंजूस
#फ्लिकर :
#वेबसाईटवरुनच फोटो चिकटवावा लागतो, अॅप वरुन चिकटवता येत नाही.
या लेखात फोटो देण्याविषयी लिहिलेलं आहे आणि हे काम computer/laptop वरून करताना काही अडचण येत नाही.परंतू फक्त मोबाइलच वापरायचा झाला तर १) एकतर फुल वेबपेज उघडत नाही आणि दुवा मिळत नाही, अथवा २) फुल वेबपेज उघडले तरी इकडे भारतात नेट स्पीड फार कमी असल्याने वेळ फार जातो ,अथवा फोनची रॅम लगेच फुल होते , आणि ३) महत्त्वाचे डेटा फार खातो. पंधरा मिनीटांत पंधरावीस एमबी डेटा जातो. ४) आतापर्यंतची सर्व इतरही फोटोशेअरिंग साइट्सची अॅप्स फक्त फोटो घेतात पण त्यांची लिंक्स देत नाहीत.