हे चित्र म्हणजे 'मी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. माझा अभिप्राय ह्या कवितेची कहाणी वाचून एका मैत्रिणीने ह्या 'मी' कले विषयी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या मी आर्टिफॅक्ट्स ची लाइन लाँच करणार आहे हे बर्याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच आर्टिफॅक्ट्स लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते. मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होतो, ती करता करता माझ्या स्वतःसाठी मी तांब्या संप्रदाय आणि बोटीवरील काही मित्रांची मदत घेत होतो .
मित्राला एक मी चित्र करून द्यायचे मान्य केले. मग आम्ही साधारण स्टाइल ठरवली. त्याला हव्या असलेल्या तारखेच्या आत 'मी' हे मी चित्र बनवले. त्याच वेळेला मी 'मी' हे नाव नक्की केले.
मी चित्रकलेच्या इतिहासातील हा पहिला मैलाचा दगड !
यातला रंग विकिपेडीया वरुन गोळा केलेला आहे.
आकारही विकिपेडीयावरुन गोळा केलेला आहे =))
- 'मी'
अतिअवांतर : मीनिमॅलिझम
प्रतिक्रिया
22 May 2015 - 9:02 pm | टवाळ कार्टा
ज्जे बात
22 May 2015 - 10:32 am | टवाळ कार्टा
हेच्च म्हंटो
22 May 2015 - 8:49 am | मुक्त विहारि
प्रगो ह्यांनी अतिशय संयमित भाषेत, "चित्रकला" ही पण एक भाषाच आहे, "मी"चे मन व्यक्त केले आहे.
खरे तर "प्रगो" ह्यांनी वर्तुळ, षटकोन, त्रिकोण किंवा इतर कुठलाही कोन न वापरता, फक्त चौकोन आणि त्यातूनही, चौरसच घेतला आणि इथेच त्यांनी ९०% यश संपादन केले.
प्रथम आपण चौरसाचा अभ्यास करू.
मुळात चौरस तयार होतो तो ४ बिंदूंपासून.
आणि हे ४ बिंदू विविध असू शकतात.
कौटुंबिक जीवनात ह्या चौरसाचा खूप सहभाग असतो.
आपण, आपला जोडीदार आणि त्या जोडीदाराचे माता-पिता, हा पण एक चौरसच.
आपण आणि आपले कॅरमचे किंवा ब्रिजचे जोडीदार हे पण चौरसाचेच भाग.
आपण, आपला जोडीदार, आपली २ मुले, ह्या पासून पण चौरस बनतो.(ज्यांना एकच मुल असते, अशा लोकांनी त्रिकोणाचा अभ्यास करावा आणि ज्यांचे लग्न झालेले नाही, त्यांनी दुसरा बिंदू शोधावा, असे आमचे गुरु म्हणतात.)
पण ह्या जगातला, सगळ्यात महत्वाचा चौरस म्हणजे....."आपण, आपले शिक्षण, आपला बॉस आणि आपला पगार हा पण चौरासाच एक भाग."
तुम्हाला योग्य वाटेल तो चौरस घ्या, सध्या तरी "मी" वेगळा चौरस घेतला आहे.
"मी, एकच आय.डी. असणारे मिपाकर, मिपाकरांच्या कलाक्रुती आणि डू.आय.डी." हे आमच्या चौरसाचे मुख्य बिंदू.
आता एकदा आपल्या चौरसाचे प्रमुख बिंदू ठरल्यानंतर, त्यात रंग भरणे, हे आलेच.
आणि उरलेल्या १०%चे काम रंगाने पुर्ण केले.
प्रगो, ह्यांनी नेमक लाल रंग निवडून , ते १०% साध्य केले आहे.
एखाद्या क्रांतीचे प्रतिक म्हणजे, लाल रंग.
तस्मात आम्ही पण ह्या डू.आय.डींच्या प्रतिसादाला किंवा लेखाला अनुल्लेखाने मारत असतो.
हीच आमची लोकशाही क्रांती.
आम्ही जसा आमचा चौरस ओळखला, तसाच तुम्हाला पण तुमचा चौरस ओळखता यावा, अशी आमच्या गुरुंची इच्छा आहे.
22 May 2015 - 8:54 am | श्रीरंग_जोशी
सुभानल्लाह, जनाब मुवि. क्या फर्माया है. मान गये.
22 May 2015 - 11:58 am | अविनाश पांढरकर
मस्त!!!!!!
22 May 2015 - 9:01 am | नाखु
मझाकार माखु.
22 May 2015 - 2:11 pm | प्रसाद गोडबोले
कहर आहे हा
=))
22 May 2015 - 2:27 pm | बॅटमॅन
अग्गागागागागागागा =)) =)) =))
इक्कीसवेळा ठ्ठो ऽऽ =)) =))
22 May 2015 - 3:20 pm | गवि
..अहो ते आहेत अजून.शासकीय इतमामाने सलामीबिलामी कशाला?
22 May 2015 - 9:10 am | मुक्त विहारि
जेपींच्या प्रतिक्षेत.....
22 May 2015 - 9:46 am | मंदार दिलीप जोशी
टुम्ही कम्युनिष्ट आहात का? लाल चित्र आहे म्हणून विचारलं ;)
22 May 2015 - 10:30 am | मुक्त विहारि
केवळ "लाल" रंग आहे, म्हणून कम्युनिस्ट????????
भारीच विनोदी बुवा तुम्ही....
कधी कधी त्रिकोणात पण "लाल रंग" असतो.
आणि वर्तुळात पण "लाल रंग" असतो.
"मिसळ-पाव.कॉम" वर तर "लाल रंगाचा" बराच वापर दिसतो.
असो,
प्रतिसाद हलकाच घेणे.
(चकाट्या पिटणारा) मुवि
22 May 2015 - 9:55 am | बाळ सप्रे
कुणी एक्स-मिपाकरानं जाता जाता "मी" चा खो दिलाय का तुम्हाला?? :-)
22 May 2015 - 10:31 am | मुक्त विहारि
एकाचेच अनेक अवतार किंवा अनेकांचेच अनेक अवतार असतात.
22 May 2015 - 10:59 am | इरसाल
हा स्कोअर सेटलिंग चा प्रकार आहे तर, तेव्हाच सगळे इतक्या हिरहिरीने भाग घेत आहेत.
22 May 2015 - 1:58 pm | प्रसाद गोडबोले
>>> अहो माझे तर वाईट कन्फ्युजन झाले आहे हो , नक्की कोण कोणाचा स्कोर सेटल करु तेच कळत नाहीये , म्हणुन तुर्तास शांत रहातो =))
22 May 2015 - 11:17 am | मृत्युन्जय
ही कला बघुन एक 'मी'पाकर म्हणुन आज शरम वाटली.
पुर्वीचे मिपा अजुनही बदलले नाही. चूक झाली आणि हा धागा उघडला.
22 May 2015 - 1:35 pm | मुक्त विहारि
सही फर्माया आपने......
मिपा म्हणजेच मस्ती
मिपा म्हणजेच ज्ञान
मिपा म्हणजेच मैत्री
आणि
मिपा म्हणजेच भरपूर डू.आय.डी.
ताई-माई-अक्का यांनी कितीही हिताच्या किंवा कितीही गहन विचार उद्दाम पणे आणि नाना प्रकारे, मांडले तरी योग्य वेळ येताच, ह्या गहन विचार्यांचा अवतार समाप्त होतोच.
अर्थात अशा अवतारंना आमच्या भाषेत, लोचट किंवा गांडूळ म्हणतात.
22 May 2015 - 11:24 am | पगला गजोधर
एशियन पेंट्सचे धमाकेदार रिजल्ट, डोमेस्टिक डेकोरेटिव बिजनसमधील वॉल्यूम ग्रोथ या फाइनेंशियल क्वॉर्टरमधे 12 पर्सेंट पेक्षा जास्त राहू शकते, कारण लाल रंगाच्या प्रॉडक्ट्सची मागणी वाढत आहे.
22 May 2015 - 3:15 pm | मोहनराव
चांगलय...
22 May 2015 - 3:58 pm | सूड
१२
22 May 2015 - 6:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
आपल्या रंगाच्या दुकानातल्या खूप दिवस न विकले गेलेल्या तांबड्या रंगांच्या डब्यांची छुपी जाहिरात करण्यासाठी मिपाचा असा वापर केल्याबद्दल प्रगो यांचा टीव्र णीशेढ ;) :)
22 May 2015 - 8:50 pm | मुक्त विहारि
म्हणून आमचा थोडा शब्द भार
22 May 2015 - 9:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
धाग्याची मन लाउन लाल केल्याबद्दल एक हिरव्या रंगाचा डबा, बारिक ब्रश आणि खोडरब्बर देउन पोपशास्त्रींचा सत्कार करण्यात येत आहे.
22 May 2015 - 10:22 pm | मुक्त विहारि
तमाम मिपाकरांकडून...हे राहिलेच की...
25 May 2015 - 6:01 am | चौकटराजा
चि त्रा त चौ रस नको रेड क्रोस हवा !
27 Apr 2017 - 9:57 pm | चित्रगुप्त
पुन्हा एकदा वाचायला मज्जा आली.
1 May 2017 - 1:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या ह्या ह्या.