कृष्णधवल छायाचित्रे......मिपा स्पर्धा-१०

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
6 May 2015 - 1:11 pm

मिपा कृष्णधवल छायाचित्र स्पर्धा.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

१९३० साली रंगीत फिल्म्स कोडॅकने व इतर कंपन्यांनी बाजारात आणल्या आणि छायाचित्रांच्या जगात खळबळ माजली. शेवटी शेवटी १९७० साली तर कृष्णधवल छायाचित्रे का काढावीत असाही प्रश्न विचारला जाऊ लागला. कृष्णधवल हा इतिहास आहे. निसर्गात काळ्या पांढऱ्यात काहीही नसते. मग रंगाची दुनिया मला चित्रित करता येत असेल तर मी कृष्णधवल चित्रणात का रमायचे असे प्रश्न विचारले जाऊ लागले. १९३० नंतर जेव्हा रंगीत फिल्म उपलब्ध झाली तेव्हा त्याची प्रत एवढी चांगली नसायची. दिसणारे रंग व छायाचित्रात येणाऱ्या रंगात बराच फरक पडत असे. शिवाय डार्करुममधे जे घोळ व्हायचे ते वेगळेच.... नंतर नंतर जेव्हा रंगीत फिल्मची प्रत अतोनात सुधारली तेव्हा मात्र सगळे छायाचित्रकार या माध्यमात छायाचित्रण करु लागले. शिवाय आठवणी साठवून ठेवण्यासाठी छायाचित्रण करतात त्यांना तर ही पर्वणीच होती. काहीच काळातच कृष्णधवल फिल्म मिळते का नाही अशी चौकशी लोक करु लागले. पण ॲन्सेल ॲडॅम्स सारख्या अनेक छायाचित्रकारांनी कृष्णधवल छायाचित्रांची ताकद व परिणामकारीकता ओळखली होती. त्यामुळे रंगीत दुनियाची छायाचित्रे कितीही रंगीत झाली तरीही या छायाचित्रकारांची छायाचित्रे पाहिल्यावर लोकांच्या तोंडातून प्रशंसोद्गार बाहेर पडत व अजूनही पडतात. ‘ब्लॅक अँड व्हाईटची मजा काही औरच’ हे त्यातील एक नेहमी कानावर पडणारे वाक्य. असो.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

रंगीत छायाचित्रणाचा सामान्य जनतेत होणारा वापर इतका वाढला की कृष्णधवल चित्रे ही जुन्या जमान्याचीच असा विचार करण्याचा पायंडाच पडून गेला. मला वाटते फार पूर्वी एखादे छायाचित्र काढल्यावर ते हातात पडेपर्यंत इतका वेळ जायचा की ते छायाचित्र कालचे हो़ऊन जायचे. त्यामुळे की काय चित्रपटसृष्टीमधे भुतकाळ दाखविताना तो सेपिया किंवा कृष्णधवल छटेमधे दाखविण्याची पद्धत पडली असावी.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

मग कृष्णधवल छायाचित्रे अजुनही जनमानसांवर गारुड करतात याचे काय कारण असावे बरं ? खर तर तुम्ही त्या छायाचित्रातील एक अत्यंत महत्वाचा घटक ‘रंग’ हा काढून टाकता. पण त्यामुळे एक लक्षात घ्या त्या छायाचित्रातील इतर अत्यंत महत्वाचे लपलेले घटक आपल्या दृष्टीस पडतात. यात तर कृष्णधवल छायाचित्रणाचे यश सामावलेले नाही ना? विचार केल्यावर मला तरी हे पटले. ज्या छायाचित्राचा विषय हा रंग नाही त्यात रंगाची गिचमीड रसभंग करु शकते हे मी माझ्या अनेक छायाचित्रांमधे स्वत: अनुभवले आहे. याचा उलट अर्थ असाही होतो की महत्वाचा व्यापून टाकणारा घटक "रंग' गेल्यामुळे छायाचित्रकाराला इतर घटकांकडे जास्त लक्ष पुरवावे लागेल..... (जे तुम्हाला तुमच्या छायाचित्रात करायचे आहे.)

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

यात कृष्णधवल चित्रे कशी काढावीत किंवा त्यामागे कुठला दृष्टीकोन असावा, कुठली छायाचित्रे कृष्णधवल करावीत हे लिहिण्याचा माझा मुळीच मानस नाही. आपल्याला ते माहीत आहेच... आपल्या उत्कृष्ट छायाचित्रांपैकी योग्य अशा एकाचे कृष्णधवलमधे रुपांतर करुन आपण येथे टाकावे...त्या अगोदर खालील माहिती वाचल्यास आपल्याला मदत होईल असा विश्र्वास वाटतो.

कृष्णधवल छायाचित्र काढण्यासाठी आपल्याला विषय पूर्णकृष्ण ते पूर्णधवल या दोन छटांमधे पडणार्‍या अनेक छ्टांमधे पाहता येणे अत्यंत आवश्यक आहे. यात अवघड काही नाही, सरावाने ते सहज जमते. जर तुम्ही पूर्वी कधी ब्लॅक अँड व्हाईट फिल्म डेव्हलप केली असेल तर तुम्हाला हे लगेचच समजेल. ... हे रंग कृष्णधवलच्या अनेक छटांमधे पहाण्याने ते छायाचित्रात कसे दिसतील हे आपल्याला समजते. आता हल्लीच्या डिजिटल डार्करुममधे ही छटा तुम्ही बदलू शकता पण कुठली किती बदलायची यासाठी हे मुलभूत ज्ञान आवश्यक आहे असे मला वाटते.

आता खालील आकृतीमधे प्रत्येक रंगाची छटा कृष्णधवलमधे कशी दिसते हे बघा.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आता जेव्हा तुम्ही दोन निराळे रंग बघता तेव्हा कदाचित कृष्णधवल चित्रामधे त्याची एकच छटा असू शकते किंवा त्यांमधे अगदी थोडा फरक असू शकतो. या छायाचित्रांतील गंमत त्यामुळे निघून जाते. उदा. खाली एका पुस्तकातील तीन छायाचित्रे दाखविली आहेत.

१ रंगीत....मोटारींचा रंग आपल्या डोळ्याला भावतोय कारण ते रंग गडद व वेगळे आहेत्..

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

२ कृष्णधवल... यात हे छायाचित्र किती मद्दड झाले आहे ते बघा. कारण रंगीत चित्रामधे जरी ते रंग वेगवेगळे दिसत असले तरी कृष्णधवलमधे त्याची छटा एकच आहे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

३ एकाचा टोन बदलल्यावर .....

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

मित्रहो....
या धाग्यावर आपली (प्रत्येकी एक) कृष्णधवल चित्रे टाका..... अवधी : २० दिवस.
जास्त टाकलीत तर कृपया जी स्पर्धेसाठी नाहीत त्यावर तसे स्पष्ट लिहा.
पहिले तीन क्रमांक काढण्यासाठी पुढे १० दिवस.

शेवटी, मी काढलेली छायाचित्रे ही सजावट म्हणून टाकलेली आहेत....त्याला दुसरा अर्थ नाही.... आपण अधिक चांगली टाकाल याची खात्री आहे....

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

शेवटी छायाचित्र एडिट करा, करु नका....ते पाहिल्यावर... भावले पाहिजे, आवडले पाहिजे हे महत्वाचे...

स्पर्धेसाठी शुभेच्छा !

जयंत कुलकर्णी
संपादकांना: यात हवा तो बदल करण्याचा आपला अधिकार मान्य करीत आहे.... :-)

स्थिरचित्रविरंगुळा

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

6 May 2015 - 1:36 pm | किसन शिंदे
पैसा's picture

6 May 2015 - 1:38 pm | पैसा

अप्रतिम, माहितीपूर्ण आणि छान उदाहरणे आलेला लेख! या धाग्यावर उत्तमोत्तम छायाचित्रे बघायला मिळतील याची खात्री आहे! सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!

मधुरा देशपांडे's picture

6 May 2015 - 1:58 pm | मधुरा देशपांडे

अप्रतिम, माहितीपूर्ण आणि छान उदाहरणे आलेला लेख!

सुंदर विषय, सॉलिड छायाचित्रे बघायला मिळतील हे नक्की :)

प्रस्तावनेने स्पर्धेची उत्सुकता वाढवली आहे!

टवाळ कार्टा's picture

6 May 2015 - 2:00 pm | टवाळ कार्टा

रंगीत काढलेले छायाचित्र फोटोशॉपमध्ये कृष्णधवल करून स्पर्धेसाठी दिले तर चालेल का?

पैसा's picture

6 May 2015 - 2:16 pm | पैसा

हो

जयंत कुलकर्णी's picture

6 May 2015 - 2:17 pm | जयंत कुलकर्णी

काहीही करा...... फक्त फोटो स्वतः काढलेला असला म्हणजे झाले.....

उत्तम ! उत्तमोत्तम छायाचित्रे बघायला मिळणार.

प्रमोद देर्देकर's picture

6 May 2015 - 2:45 pm | प्रमोद देर्देकर

मोबल्यावरुन काढलेले सेपिया प्रकारातले चित्र चालेल काय?

उदा. खालील फोटो (हे स्पर्धेसाठी नाही).

हा रंगीत फोटु
1

आणि तोच फोटु सेपिय मोडमध्ये.
1

टवाळ कार्टा's picture

6 May 2015 - 3:41 pm | टवाळ कार्टा

दोन्ही फोटो वेगळे आहेत की =))
आज सकाळीच? ;)

प्रमोद देर्देकर's picture

6 May 2015 - 3:55 pm | प्रमोद देर्देकर

वेगळे नाहीत रे पार्किग लॉट मधल्या झाडांचे आहेत. दुसरा घेताना विरुध्द बाजुने काढला आहे एवढंच पण झाडे तिच आहेत. आणि (आज सकाळीच? ;) याचा अर्थ काय घ्यायचा? नही हम कुछ लेते नही है इसलिये बोल्ता है| क्या झमझे?

टवाळ कार्टा's picture

6 May 2015 - 4:11 pm | टवाळ कार्टा

खिक्क...
इतके का रे मनाला लावून घेतो
तू ये तुला फुकट देतो

=))

जयंत कुलकर्णी's picture

6 May 2015 - 5:15 pm | जयंत कुलकर्णी

सेपिया ह ब्लॅक अँड व्हाईअतचा एक टोन मानल्यामुळे जरुर चालेल.......

प्रभो's picture

6 May 2015 - 3:20 pm | प्रभो

माझी एंट्री (नो पोस्ट प्रोसेसिंग) -

समुद्र किनारा + तुम्ही + ती + सुर्यास्त

Florida

स्पा's picture

6 May 2015 - 3:45 pm | स्पा

सही रे प्रभ्या

जयंत कुलकर्णी's picture

6 May 2015 - 5:29 pm | जयंत कुलकर्णी

श्री. प्रभो.
पोस्ट प्रोसेसिंग केलेले नसल्यास, जास्त झुकते माप नाही. त्यामुळे तुम्हाला जर करायचे असल्यास जरुर करा...क्रॉप करा. ब्राईट करा, डार्क करा...... परत टाकला तरी चालेले फोटो....अर्थात टाकायचा असल्यास.....

धन्यवाद काका. फोटो आहे तसाच बरा आहे. :D मला कळतही नाही पोस्ट प्रोसेसिंग चे. :)

छान फोटो .. माझे पण असेच आहे. पोस्ट प्रोसेस काही कळत नाही.. म्हणु न्येथे स्पर्धेत फोटो दिले नव्हते.. यावेळेस देतो मात्र

जयंत कुलकर्णी's picture

8 Jun 2015 - 6:28 am | जयंत कुलकर्णी

श्री. प्रभो,
शक्यतो फोटोचे दोन भाग होउ देऊ नयेत. त्यात फोटोवर नजर रेंगाळत नाही. यात समुद्र व आकाशा जेथे मिळते त्या रेषेने फोटोचे दोन भाग केले आहेत. आपल्याला पटेल अशी आशा आहे.....

धन्यवाद काका. नक्की लक्षात ठेवीन यापुढे :)

शब्दानुज's picture

6 May 2015 - 4:06 pm | शब्दानुज

आमच्या घराशेजारी या पिल्लाविरुद्ध श्वानांनी युद्ध पुकारले होते तेव्हा त्याचे बावरलेले भाव टिपले आहेत...

पैसा's picture

6 May 2015 - 4:17 pm | पैसा

फोटो पिकासा, गूगल, फेसबुक, फ्लिकर कुठेतरी टाका आणि मग इकडे आणा.

स न वि वि's picture

6 May 2015 - 4:40 pm | स न वि वि

फोटो कसा टाकाय्चा... जरा सविस्तर सान्गा हो..

पैसा's picture

6 May 2015 - 5:11 pm | पैसा

http://www.misalpav.com/node/13573 गणपाचा धागा आहे. डिटेल माहिती आहे तिथे.

शब्दानुज's picture

6 May 2015 - 5:12 pm | शब्दानुज

.

रवीराज's picture

6 May 2015 - 7:17 pm | रवीराज

मस्त आहे फोटो

गणेशा's picture

7 May 2015 - 11:42 am | गणेशा

मस्त फोटो ...

आलेले दोन्ही फोटो सुंदर आहेत .. यावेळेस चांगली फाईट होणार असेच वाटते

जयंत कुलकर्णी's picture

8 Jun 2015 - 6:31 am | जयंत कुलकर्णी

शब्दानुज,
फोटो चांगला आहे पण पिल्लाच्या डोक्यावरची ती वर्तूळे काढावयास हवी होती. ती फोटो ब्लॅक/व्हाईट करतानाच आली आहेत.. तसेच काही ठिकाणी जे ओव्हर एक्स्पोज झाले आहे ते आपण फोटोशॉपमधे दुरुस्त केले असतेत तर बरे झाले असते.

शब्दानुज's picture

6 May 2015 - 5:47 pm | शब्दानुज

काही गोष्टीत मिसळपाव फारच त्र्ास देते
आता फेसबुक सारखे इथेही फोटो का अपलोड होत नाहीत ? फोटो चढवा परत युआरएल द्या हे किचकट वाटत नाही का?
सवयीच म्हणाल तर इतरही वेब पेजेस मी वापरतो पण कोणतेही इतके क्लिष्ट नाही
सुरुवातीपासुनच्या संकेताक्षर मिळण्यापासुन असला ताप चालु आह

श्रीरंग_जोशी's picture

6 May 2015 - 7:54 pm | श्रीरंग_जोशी

माफ करा पण तुम्ही व्यक्त केलेल्या भावना जरा अतिरेकीच वाटतात.

मिपावर फोटो थेट अपलोड करू दिल्यास (आजकाल ६-७ एमबी किंवा त्यापेक्षाही अधिक मोठे फोटो असू शकतात) भरपूर सर्वरस्पेस लागेल (कधी कुणी कायदेशीर कारवाई होईल असे फोटो टाकल्यास नव्या समस्याही उद्भवतील).
मिपा हे वर्गणीविरहीत व जाहिरात विरहित संस्थळ आहे.

फ्लिकर, पिकासा अन अजून कितीतरी फुकट हि सुविधा उपलब्ध करून देतात. तेथे आपला फोटो पब्लिकली शेअर करून व इमेज फाइलचा युआरएल इथे वापरण्यात त्रास कसला.

तुम्ही १३ महिन्यांपासून मिपावर आहात तरी देखील अशी भावना व्यक्त केली म्हणून आवर्जून लिहावेसे वाटले.
बाकी वर मदत पान हा दुवा आहेच.

तसेच खाली 'मिपा बद्दल' व 'सदस्य मदत केंद्र' या विभागांत चार चार दुवे आहेत. त्या पेजेसला पूर्वी भेट दिली नसल्यास किमान एकदा नजर टाका.

इतर कुठलीही तांत्रिक समस्या आल्यास खरडफळ्यावर लिहा. हजर सदस्यांपैकी कुणी ना कुणी उत्तर देतंच याची खात्री देतो.

ghgh

निकॉन डी ३१००
लेन्स : ३५ मिमी
f : ३.२
ISO : ४००

अनुप ढेरे's picture

7 May 2015 - 11:09 am | अनुप ढेरे

माफी असावी 'स्पा'जी, पण हा फोटो ब्ल्याक अँड व्हाईट केलेला नाय आवडला. उलट हा रंगीत असता तर सोनं आणि मेंदी यांचा रंग बेष्ट जमून आला असता असं वाटतय.

स्पा's picture

7 May 2015 - 11:12 am | स्पा

__/\__ मी हि तोच विचार करत होतो :)

असो हा स्पर्धे साठी पकडू नये अशी मी ज.कुंना विनंती करतो :)

गणेशा's picture

7 May 2015 - 11:45 am | गणेशा

स्पा मला तरी हा फोटो खुप आवडला ...

स्पर्धेसाठी वेगळा देणार आहेस का ?

चौकटराजा's picture

7 May 2015 - 2:41 pm | चौकटराजा

हा कुठे फडके रोडवर काढ ला का ?

फडके रोडवर, हातात अंगठ्या घेऊन फोटो काढेस्तवर त्या हातात राह्यल्या असत्या का?

वेल्लाभट's picture

7 May 2015 - 3:13 pm | वेल्लाभट

प्रतिसाद प्रचंड आवडेश

श्रीरंग_जोशी's picture

6 May 2015 - 8:46 pm | श्रीरंग_जोशी

रंगीत छायाचित्रणाच्या जन्मानंतर कृष्णधवल छायाचित्रणाच्या प्रवासाविषयी उत्तम विवेचन केले आहे. लेखामध्ये उदाहरण म्हणून दिलेली चित्रेही आवडली.

कॄष्णधवल छायाचित्रे म्हणताच माझ्या डोळ्यांसमोर स्व.गौतम राजाध्यक्ष यांनी काढलेली पोर्ट्रेट छायाचित्रे येतात.

हे अन हे राजाध्यक्षांनी काढलं असावं असा अंदाज आहे.

सर्वसाक्षी's picture

6 May 2015 - 9:38 pm | सर्वसाक्षी

bw

निकॉन डी ९०
टॅमरॉन १:१ ९० एमेम
आय एस ओ २००
एफ ९, १/१२५

रवीराज's picture

7 May 2015 - 2:30 pm | रवीराज

हा पण फोटो छान आहे

जयंत कुलकर्णी's picture

8 Jun 2015 - 6:34 am | जयंत कुलकर्णी

श्री. सर्वसाक्षी,
अभिनंदन ! पण चेहर्‍यावरच्या चष्म्याच्या सावल्या अजून गडद केल्या असत्या तर मला जास्त आवडल्या असत्या. फोटो योग्यप्रकारे क्रॉप केला आहे.

सर्वसाक्षी's picture

8 Jun 2015 - 11:10 am | सर्वसाक्षी

मी आपल्या मार्गदर्शनाची वाट पाहत होतो. मी तीन चित्रे ठरवली होती, माझ्या पत्नीने हेच चित्र देण्याचा आग्रह धरला.
पोस्ट प्रोसेसिंग शिकणे फार आवश्यक आहे.
पुन्हा एकदा आभार

साक्षी

वेल्लाभट's picture

7 May 2015 - 3:13 pm | वेल्लाभट

आतापर्यंत आलेले तीनही फोटो कव्वा !

कंस's picture

8 May 2015 - 3:49 am | कंस

हा स्पर्धेसाठी नाही
From 2015-04-19

हा स्पर्धेसाठी
From 2015-04-19

जयंत कुलकर्णी's picture

7 May 2015 - 5:13 pm | जयंत कुलकर्णी

कृपया एक कुठलातरी सांगावा.... :-)
व जो घ्यायचा नाही त्यावर तसे स्पष्ट लिहावे...

जयंत कुलकर्णी's picture

8 Jun 2015 - 6:37 am | जयंत कुलकर्णी

श्री कंस,
मला वाटते फोटो जरा वेगळ्या अँगलने काढला असता तर विसयाला काही तरी न्याय मिळाला असता. तसेच हिस्टोग्रॅम पाहिला असता तर बरे झाले असते.

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2015 - 5:19 pm | अत्रुप्त आत्मा

इ ल्लो हम्री वेंट्री.. क्याम्रो जब नया नया लियो थो,तब मजा मा निकाल्यो थो ये फोटू!

https://lh3.googleusercontent.com/-zQTo6MUQw6w/VUtQVD0J-tI/AAAAAAAAHCc/-pGntEYIodY/w700-h525-no/DSCF0174.JPG

असंका's picture

7 May 2015 - 11:30 pm | असंका

फारच भारी....

जयंत कुलकर्णी's picture

8 Jun 2015 - 6:40 am | जयंत कुलकर्णी

अतृप्तमहाराज,
पक्षांचे फोटो काढताना झाडांच्या पानाची गर्दी ही एक नेहमीचा प्रॉब्लेम असतो. हा कसा दूर करावा ? एक तर तुम्ही फोटोशॉपमधे ती गर्दी जरा ब्लर करावी किंवा फोटो वेगळ्या सिझनमधे घ्यावेत (अर्थात नशिबात असेल तर) जेव्हा पतझड होत असते तो सिझन पक्षांच्या फोटोसाठी उत्तम समजावा.

जयंत कुलकर्णी's picture

8 Jun 2015 - 6:42 am | जयंत कुलकर्णी

श्री. स्पा,
तुमच्याकडून या चित्राची स्पर्धेसाठी अपेक्षा नव्हती. पण गणपतीची मुर्ती हा जर सब्जेक्ट धरला तर तो गर्दीत हरविला आहे हे आपल्यालाही पटेल असे वाटते.... स्पर्धेसाठी आपला दरवाजाचा फोटो घेतला आहे.

नीर's picture

7 May 2015 - 9:07 pm | नीर

.

जयंत कुलकर्णी's picture

8 Jun 2015 - 6:44 am | जयंत कुलकर्णी

श्री नीर,
वरच्या बाजूला फोटोतील सर्व डिटेल्स हरवले आहेत. तेथे थोडे exposure वाढवले असते तर चित्र वेगळे दिसले असते निश्चित....

जयंत कुलकर्णी's picture

8 Jun 2015 - 6:48 am | जयंत कुलकर्णी

श्री मिनियन,
एवढा चांगला फोटो पण वॉटरमार्कच्या जागेने विचार करता आला नाही. फोटोवर जे काही लिहायचे असते त्याने फोटोचा तोल जाता कामा नये. शिवाय आपला वॉटरमार्क हा काही चित्राचा विषय नाही (हे गृहीत धरले आहे) डाव्या कोपर्‍यात फोटो ओवेर एक्ष्पोसे झाला आहे. तो दुरुस्त करता आला असता.

विनोद१८'s picture

7 May 2015 - 9:07 pm | विनोद१८

Foto1

जयंत कुलकर्णी's picture

8 Jun 2015 - 6:49 am | जयंत कुलकर्णी

श्री विनोद,
वर एका फोटोमधे म्हटल्याप्रमाणे, फोटोचे दोन सारखे भाग शक्यतो होउन देऊ नयेत या मताचा मी आहे. या फोटोवर नजर रेंगाळत नाही.

विनोद१८'s picture

8 Jun 2015 - 1:29 pm | विनोद१८

पुढच्यावेळी ही काळजी घेतली जाइल, धन्यवाद सुचनेबद्दल.

काका एक प्रश्न आहे. क्षितीज नेहमी समुद्र आणि आकाशाला वेगळे करते. दोन भाग न करता त्याचा फोटो कसा घ्यावा. उदाहरणासाठी एक-दोन फोटो पहावयास मिळाले तर आनंद होईल

जयंत कुलकर्णी's picture

8 Jun 2015 - 5:57 pm | जयंत कुलकर्णी

दोन सारखे भाग करु नयेत....असे म्हटले आहे मी....एक आकाशाला जास्त प्राधान्य द्यावे किंवा पाण्याला....

वेल्लाभट's picture

7 May 2015 - 10:37 pm | वेल्लाभट

दिवाळीची तयारी
a
कॅनन ईओएस७०डी
एफ ५.६ १/५० आयएसओ ५००० ३५एमएम

जयंत कुलकर्णी's picture

8 Jun 2015 - 6:55 am | जयंत कुलकर्णी

श्री वेल्लाभट,

पणती आणि त्याचा ब्लर होत गेलेला मागील भाग असा इफेक्ट तुम्हाला अपेक्षित असावा. तसे असेल तर पुढचा भाग अजोन्न शार्प हवा होता असे मला वाटते. पण तो शार्प येणार नाही कारण तुम्ही बहुदा पणतीवर फोकस केलेले असणार जेथे कॉन्ट्रास्ट कमी आहे. त्यासाठी पणतीवर एक काळ्याकागदाचा तुकडा ठेवावा व त्याच्या कडेवर फोकस केली तर मला वाटते फोटो जास्त शार्प आला असता. अर्थात ही माझी आपली आयडिया आहे. मला ही प्रॉब्लेम देवळांचे फोटो काढताना येतो. भिंतीवर कॉन्ट्रास्ट नसल्यामुळे फोटो शार्प येत नाहीत त्यावेळी मी ३एम चा नोटस चा कागद तेथे चिटकवतो व त्याचची कड फोकससाठी वापरतो.

वेल्लाभट's picture

9 Jun 2015 - 11:38 am | वेल्लाभट

ही नवीन संकल्पना कळली. याबद्दल अभ्यास करेन. प्रतिक्रियेबद्दल आभार :)

कविता१९७८'s picture

8 May 2015 - 11:06 am | कविता१९७८

black and white

जयंत कुलकर्णी's picture

8 Jun 2015 - 8:04 am | जयंत कुलकर्णी

कविता१९७८,
फोटो जर व्यवस्थीत क्रॉप केला असता तर एक चांगला फोटो होता. विशेषतः कपातील कॉफीमधील प्रतिबींब.....

Keanu's picture

8 May 2015 - 12:18 pm | Keanu

img

झकास's picture

14 May 2015 - 11:56 am | झकास

आवडला. फार सुरेख!

Keanu's picture

17 May 2015 - 9:21 am | Keanu

धन्यवाद.

जयंत कुलकर्णी's picture

8 Jun 2015 - 8:08 am | जयंत कुलकर्णी

श्री. चिंटू,
आडव्या गेलेल्या लाकडामुळे एक बंदीस्त जागा तयार झाली आहे हे मान्य पण मग अँटिक दृष्टिकोन कळण्यासाठी त्या टेलिफोनचे अजून डिटेल्स यायला हवे होते. तसेच लॅपच्या खालच्या भागातील डिटेल्स हरविलेले आहेत. फोटो अजून शर्प यायला हवा होता असे मला वाटते.... कंपोझिशन चांगले आहे....

Keanu's picture

8 Jun 2015 - 10:55 am | Keanu

खरं तर ह्या समीक्षक परि़क्षणाचीच वाट बघत होतो...
चुका समजल्या, पुढच्यावेळीस लक्षात ठेवेन.

जयंत कुलकर्णी's picture

8 Jun 2015 - 8:11 am | जयंत कुलकर्णी

श्री सौरभ,
आकाशामुळे चित्राची रया गेली. जर आकाश एवढे ब्लँड असेल तर तो फोटो स्पर्धेला देऊ नये. तसेच जर नीट पाहिलेत तर सगळ्या कडांच्या बाजूला हॅलोज आले आहेत..ते टाळायला हवेत.

सौरभ उप्स's picture

9 Jun 2015 - 12:13 pm | सौरभ उप्स

खूप महत्वाच्या सूचना

मदनबाण's picture

8 May 2015 - 7:30 pm | मदनबाण


{बाप्पाचा फोटो स्पर्धेसाठी घ्यावा.}

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Damon Paul - Knight Rider Theme (Official Video HD)

पॉइंट ब्लँक's picture

18 May 2015 - 8:59 am | पॉइंट ब्लँक

माझ्या मते देवीचा फोटो स्पर्धेसाठी द्यायाला हवा होता. कॉम्पोझिशन आणि सौम्य प्रकाश दोन्ही एकदम छान जुळून आले आहेत. गणपतीच्या फोटोत एकतर फार वस्तुंची गर्दी झाली आहे आणि फोटो थोडासा ओवर एक्सपोझड वाटतो आहे.

रुपी's picture

19 May 2015 - 12:44 am | रुपी

मलाही देवीचाच फोटो जास्त आवडला..

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 May 2015 - 1:01 am | डॉ सुहास म्हात्रे

+१

@पॉइंट ब्लँक, रुपी आणि एक्का काका...
आता काय कराव ? बाप्पाच नाव पुढे केल्यावर आता देवीला पुढे कसं कराव ? :)
असो... तुमच मत / दॄष्टीकोन पटला. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Goulding

जयंत कुलकर्णी's picture

8 Jun 2015 - 8:13 am | जयंत कुलकर्णी

श्री. मदनबाण,

कोणीतरी म्हटल्याप्रमाणे देवीचा फोटो द्यायला हवा होता. तो दिला आहे असे गृहीत धरले तरीही हा टोन या फोटोसाठी चुकीचा वापरला आहे असे वाटते. खरे तर हा टोन त्या लॅप व फोनच्या फोटोसाठी योग्य वाटला असता आणि या फोटोला ब्लॅक & व्हाईट. सेपिया वापरायचा असला तरी डार्क सेपिया वापरु नये या मताचा मी आहे....

चित्रगुप्त's picture

9 May 2015 - 2:04 am | चित्रगुप्त

लूव्र संग्रहालयातील एक शिल्प:

.

या देवी सर्वभूतेषु सौंदर्यरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

(वरील फोटो स्पर्धेसाठी आहे).
आणखी एक फोटो: फॉन्तेन्ब्लो राजप्रासाद, फ्रान्स.
.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2015 - 11:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, तुम्हाला अशीच शिल्प सापडतात का ?
नमो नमः :)

-दिलीप बिरुटे

चित्रगुप्त's picture

17 May 2015 - 1:46 pm | चित्रगुप्त

अशीच शिल्प सापडतात का ?

आम्हाला खूप काही काही सापडते हो, पण खरे सांगा, आवडले ना हे शिल्प ?

जयंत कुलकर्णी's picture

8 Jun 2015 - 8:16 am | जयंत कुलकर्णी

श्री. चित्रगुप्त,
कुठल्याही फोटोग्राफीच्या स्पर्धेत शक्यतो दुसर्‍या एखाद्या कलाकृतीच्या फोटोला शक्यतो बक्षिस मिळत नाही.....पण फोटो मस्तच......

अभिदेश's picture

9 May 2015 - 7:27 am | अभिदेश

,

शब्दबम्बाळ's picture

9 May 2015 - 3:29 pm | शब्दबम्बाळ

मस्त! :)

गणेशा's picture

15 May 2015 - 4:28 pm | गणेशा

तुंग किल्ला आहे ना तो .. दिसतोय तो

जयंत कुलकर्णी's picture

8 Jun 2015 - 8:18 am | जयंत कुलकर्णी

श्री. अभिदेश,
अभिनंदन ! मस्तच फोटो. या प्रकाशात तुम्हाला अजून काही करता आले असते असे वाटत नाही...चांगला प्रयत्न.

आसिफ's picture

9 May 2015 - 10:06 am | आसिफ

हा स्पर्धेसाठी
Railway Track

माझी भाची
Sarah

HairBand

Polar bear

~आसिफ

वेल्लाभट's picture

9 May 2015 - 12:09 pm | वेल्लाभट

अस्वलाने मागच्या स्पर्धेत जिंकवलं असतं तुम्हाला !