मिपा कृष्णधवल छायाचित्र स्पर्धा.
१९३० साली रंगीत फिल्म्स कोडॅकने व इतर कंपन्यांनी बाजारात आणल्या आणि छायाचित्रांच्या जगात खळबळ माजली. शेवटी शेवटी १९७० साली तर कृष्णधवल छायाचित्रे का काढावीत असाही प्रश्न विचारला जाऊ लागला. कृष्णधवल हा इतिहास आहे. निसर्गात काळ्या पांढऱ्यात काहीही नसते. मग रंगाची दुनिया मला चित्रित करता येत असेल तर मी कृष्णधवल चित्रणात का रमायचे असे प्रश्न विचारले जाऊ लागले. १९३० नंतर जेव्हा रंगीत फिल्म उपलब्ध झाली तेव्हा त्याची प्रत एवढी चांगली नसायची. दिसणारे रंग व छायाचित्रात येणाऱ्या रंगात बराच फरक पडत असे. शिवाय डार्करुममधे जे घोळ व्हायचे ते वेगळेच.... नंतर नंतर जेव्हा रंगीत फिल्मची प्रत अतोनात सुधारली तेव्हा मात्र सगळे छायाचित्रकार या माध्यमात छायाचित्रण करु लागले. शिवाय आठवणी साठवून ठेवण्यासाठी छायाचित्रण करतात त्यांना तर ही पर्वणीच होती. काहीच काळातच कृष्णधवल फिल्म मिळते का नाही अशी चौकशी लोक करु लागले. पण ॲन्सेल ॲडॅम्स सारख्या अनेक छायाचित्रकारांनी कृष्णधवल छायाचित्रांची ताकद व परिणामकारीकता ओळखली होती. त्यामुळे रंगीत दुनियाची छायाचित्रे कितीही रंगीत झाली तरीही या छायाचित्रकारांची छायाचित्रे पाहिल्यावर लोकांच्या तोंडातून प्रशंसोद्गार बाहेर पडत व अजूनही पडतात. ‘ब्लॅक अँड व्हाईटची मजा काही औरच’ हे त्यातील एक नेहमी कानावर पडणारे वाक्य. असो.
रंगीत छायाचित्रणाचा सामान्य जनतेत होणारा वापर इतका वाढला की कृष्णधवल चित्रे ही जुन्या जमान्याचीच असा विचार करण्याचा पायंडाच पडून गेला. मला वाटते फार पूर्वी एखादे छायाचित्र काढल्यावर ते हातात पडेपर्यंत इतका वेळ जायचा की ते छायाचित्र कालचे हो़ऊन जायचे. त्यामुळे की काय चित्रपटसृष्टीमधे भुतकाळ दाखविताना तो सेपिया किंवा कृष्णधवल छटेमधे दाखविण्याची पद्धत पडली असावी.
मग कृष्णधवल छायाचित्रे अजुनही जनमानसांवर गारुड करतात याचे काय कारण असावे बरं ? खर तर तुम्ही त्या छायाचित्रातील एक अत्यंत महत्वाचा घटक ‘रंग’ हा काढून टाकता. पण त्यामुळे एक लक्षात घ्या त्या छायाचित्रातील इतर अत्यंत महत्वाचे लपलेले घटक आपल्या दृष्टीस पडतात. यात तर कृष्णधवल छायाचित्रणाचे यश सामावलेले नाही ना? विचार केल्यावर मला तरी हे पटले. ज्या छायाचित्राचा विषय हा रंग नाही त्यात रंगाची गिचमीड रसभंग करु शकते हे मी माझ्या अनेक छायाचित्रांमधे स्वत: अनुभवले आहे. याचा उलट अर्थ असाही होतो की महत्वाचा व्यापून टाकणारा घटक "रंग' गेल्यामुळे छायाचित्रकाराला इतर घटकांकडे जास्त लक्ष पुरवावे लागेल..... (जे तुम्हाला तुमच्या छायाचित्रात करायचे आहे.)
यात कृष्णधवल चित्रे कशी काढावीत किंवा त्यामागे कुठला दृष्टीकोन असावा, कुठली छायाचित्रे कृष्णधवल करावीत हे लिहिण्याचा माझा मुळीच मानस नाही. आपल्याला ते माहीत आहेच... आपल्या उत्कृष्ट छायाचित्रांपैकी योग्य अशा एकाचे कृष्णधवलमधे रुपांतर करुन आपण येथे टाकावे...त्या अगोदर खालील माहिती वाचल्यास आपल्याला मदत होईल असा विश्र्वास वाटतो.
कृष्णधवल छायाचित्र काढण्यासाठी आपल्याला विषय पूर्णकृष्ण ते पूर्णधवल या दोन छटांमधे पडणार्या अनेक छ्टांमधे पाहता येणे अत्यंत आवश्यक आहे. यात अवघड काही नाही, सरावाने ते सहज जमते. जर तुम्ही पूर्वी कधी ब्लॅक अँड व्हाईट फिल्म डेव्हलप केली असेल तर तुम्हाला हे लगेचच समजेल. ... हे रंग कृष्णधवलच्या अनेक छटांमधे पहाण्याने ते छायाचित्रात कसे दिसतील हे आपल्याला समजते. आता हल्लीच्या डिजिटल डार्करुममधे ही छटा तुम्ही बदलू शकता पण कुठली किती बदलायची यासाठी हे मुलभूत ज्ञान आवश्यक आहे असे मला वाटते.
आता खालील आकृतीमधे प्रत्येक रंगाची छटा कृष्णधवलमधे कशी दिसते हे बघा.
आता जेव्हा तुम्ही दोन निराळे रंग बघता तेव्हा कदाचित कृष्णधवल चित्रामधे त्याची एकच छटा असू शकते किंवा त्यांमधे अगदी थोडा फरक असू शकतो. या छायाचित्रांतील गंमत त्यामुळे निघून जाते. उदा. खाली एका पुस्तकातील तीन छायाचित्रे दाखविली आहेत.
१ रंगीत....मोटारींचा रंग आपल्या डोळ्याला भावतोय कारण ते रंग गडद व वेगळे आहेत्..
२ कृष्णधवल... यात हे छायाचित्र किती मद्दड झाले आहे ते बघा. कारण रंगीत चित्रामधे जरी ते रंग वेगवेगळे दिसत असले तरी कृष्णधवलमधे त्याची छटा एकच आहे.
३ एकाचा टोन बदलल्यावर .....
मित्रहो....
या धाग्यावर आपली (प्रत्येकी एक) कृष्णधवल चित्रे टाका..... अवधी : २० दिवस.
जास्त टाकलीत तर कृपया जी स्पर्धेसाठी नाहीत त्यावर तसे स्पष्ट लिहा.
पहिले तीन क्रमांक काढण्यासाठी पुढे १० दिवस.
शेवटी, मी काढलेली छायाचित्रे ही सजावट म्हणून टाकलेली आहेत....त्याला दुसरा अर्थ नाही.... आपण अधिक चांगली टाकाल याची खात्री आहे....
शेवटी छायाचित्र एडिट करा, करु नका....ते पाहिल्यावर... भावले पाहिजे, आवडले पाहिजे हे महत्वाचे...
स्पर्धेसाठी शुभेच्छा !
जयंत कुलकर्णी
संपादकांना: यात हवा तो बदल करण्याचा आपला अधिकार मान्य करीत आहे.... :-)
प्रतिक्रिया
14 May 2015 - 11:55 am | झकास
agreed ! अगदी नक्की!!
8 Jun 2015 - 8:20 am | जयंत कुलकर्णी
श्री. असिफ,
रुळातून त्या डाविकडच्या गाड्या लक्ष दिस्टर्ब करत आहेत. त्या जर काढल्या असत्या तर फोटो चांगलाच होता....
9 May 2015 - 11:22 am | रवीराज
9 May 2015 - 12:21 pm | ज्ञानोबाचे पैजार
मस्त मस्त फोटो आलेले आहेत.
मला आवडलेला एक ...
पैजारबुवा,
18 May 2015 - 9:23 am | असंका
या फोटोत ओढ लावण्यासारखं काहीतरी आहे...
स्पर्धेसाठी आहे ना हा फोटो?
9 May 2015 - 3:28 pm | शब्दबम्बाळ
खूप छान विषय! आणि सगळ्यांचेच सुंदर फोटो

स्पर्धेसाठी फोटो
इतर काही फोटो पण चिटकवतो! :)

व्हेनिस
neuschwanstein castle

मेणवली

इतर

9 May 2015 - 4:48 pm | रवीराज
सुंदर फोटो. मेणवली आणि गुलाब मस्तच.
8 Jun 2015 - 12:37 pm | जयंत कुलकर्णी
श्री. शब्दबंबाळ,

खरे तर व्हेनिसचा पहिला फोटो खूपच चांगला होता. मे जे टोन्सबद्दल लिहिले आहे त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. जरी रं हिरवाच असला तेरीही दोन्हीचे टोन वेगळे असल्यामुळे याचा ब्लॅक & व्हाईट खूपच चांगला दिसला असता. फक्त थोडासा क्रॉप करावा लागला असता उदा....
अर्थात हे तुम्हाला आवडायला फिजे असे मुळीच नाही. पण एवढे क्रॉप करायचे असतील तर फोटो जास्त मेगापिक्सेलचे लागतील किंवा तसेच काढावे लागतील.
8 Jun 2015 - 9:48 pm | शब्दबम्बाळ
आपल्या परिक्षणाबद्दल धन्यवाद! :)
खर तर व्हेनिसचा फोटो माझा आवडता आहे. त्यातल्या रंगाच्या शेडशिवाय ते घराचे अर्धवट उघडे दार, खाली मध्यभागी दिसणाऱ्या पायर्या आणि जणू खाली मान घालून यापासून दूर निघालेली ती… असा काही माहौल वाटतो मला तो! :)
पण ५ मेगा पिक्सेल च्या केमेर्याने काढलेला असल्याने डिटेल फारशी दिसत नाहीत म्हणून स्पर्धेला देणे टाळले!
10 May 2015 - 9:17 pm | _मनश्री_
हा स्पर्धेसाठी नाही
13 May 2015 - 7:23 pm | यसवायजी
अंधा काणूण..
8 Jun 2015 - 12:40 pm | जयंत कुलकर्णी
silhouette च्या फोटोग्राफीसाठी एजेस शार्प व बेकग्राऊंड खूपच ब्राईट असावी लागते.
14 May 2015 - 11:11 am | विशाल कुलकर्णी
8 Jun 2015 - 12:42 pm | जयंत कुलकर्णी
श्री विशाल,
मला खरे तर पुलाचा फोटोचे कंपोझिशन जास्त आवडले होते. वरील फोटोत फोटोशॉपमधे लेन्स करेक्शन जर केले असते तर फोटो अजून मस्त झाला असता. फिल्टर-लेन्स करेक्शन-कस्टम...
14 May 2015 - 11:12 am | विशाल कुलकर्णी
15 May 2015 - 12:45 pm | विशाल कुलकर्णी
सर्वच फोटो खास आहेत. मला आसिफजींचा स्पर्धेसाठी असलेला फोटो विशेष आवडला.
15 May 2015 - 4:42 pm | सनईचौघडा
माझा फोटो स्पर्धेसाठी.

18 May 2015 - 6:55 am | जयंत कुलकर्णी
सनईचौघडा,
आपला फोटो दिसत नाही.....
17 May 2015 - 10:50 am | पॉइंट ब्लँक
जयंत, चांगली माहिती दिली आहे. आणि योग्य विषय निवडल्यामुळे सहभाग नक्कीच वाढेल.
माझी प्रवेशिका.
8 Jun 2015 - 12:45 pm | जयंत कुलकर्णी
श्री पॉईंट ब्लँक,
फोटो चांगला आहे पण मला वाटते की डावीकडील बाजूमधे थोडेसे डिटेल दिसायला पाहिजे होते. जरा करुन बघता का ?
17 May 2015 - 11:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्रमांक काढणे म्हणजे कोणावर तरी अन्याय.
माझ्या वतीने सर्वांना विजेते घोषित करतो. :)
-दिलीप बिरुटे
17 May 2015 - 8:25 pm | मोहन
फिरतीची नोकरीचा एक फायदा असतो . असे अनेक क्षण अनुभवायला मिळतात. हा सुर्योदय परादीप - ओडीशा तला

8 Jun 2015 - 12:49 pm | जयंत कुलकर्णी
श्री. मोहन,
रुल ऑफ ३ जर वापरला असता तर हा फोटू निश्चितच चांगला दिसला असता. म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असेलच.
9 Jun 2015 - 3:14 pm | मोहन
धन्यवाद जयंत.
अशा परिक्षणामुळे आमच्या सारख्यांना हुरुप येतो.
17 May 2015 - 9:26 pm | सानिकास्वप्निल
माझी प्रवेशिका.
8 Jun 2015 - 12:51 pm | जयंत कुलकर्णी
सानिका,
दिव्याच्या मधल्या काडीवर/पत्र्यावर ते धुरकट काय आले आहे ? त्यामुळे फोटोची मजा गेली. ते तुम्हाला फोटोशॉपमधे काळे करता येते का बघा. करुन तर बघा.....
18 May 2015 - 6:59 am | जयंत कुलकर्णी
माझाही एक..... अर्थात स्पर्धेसाठी नाही... :-)
18 May 2015 - 9:33 am | प्रचेतस
18 May 2015 - 11:34 am | स्पा
18 May 2015 - 11:48 am | चित्रगुप्त
@स्पा: उघड्या दरवाजाच्या फोटोतून अचानक कुठल्या कुठे पोचवलेत राव, व्वा.
18 May 2015 - 1:28 pm | संदीप डांगे
माझेही काही क्लिक्स.
आणि हा स्पर्धेसाठी.
19 May 2015 - 12:59 am | राघवेंद्र
संदीप भाउ मस्त फोटोज !!!
19 May 2015 - 1:03 am | डॉ सुहास म्हात्रे
स्पर्धेसाठीचा फोटो एक नंबर !!!
25 May 2015 - 10:23 am | विशाल कुलकर्णी
संदीपभाऊ, एकाहून एक सुंदर फोटो आलेत. जियो !
25 May 2015 - 12:57 pm | संदीप डांगे
सर्वांना धन्यवाद!
8 Jun 2015 - 4:21 pm | जयंत कुलकर्णी
मुंबई मॉर्निंगचा पहिला फोटो छान आहे... आणि मुख्य म्हणजे अक्षरांचा नियम तोडल्यावर तो अधिकच चांगला दिसत आहे. एखाद्या पुस्तकाचे मुखपृस्ट म्हणून सहज खपेल.... पण स्पर्धेला दिलेला फोटो निर्जीव वाटतो. पुढून काढला असता तर कदाचित चेहर्यावरील भावाने जिवंत झाला असता......असे माझे वाटते. तुम्हाला व इतरांना वेगळे वाटू शकते हे कृपया ध्यानात घ्या....
8 Jun 2015 - 5:01 pm | संदीप डांगे
योग्य अभ्यास आणि परिक्षणाबद्दल शतशः धन्यवाद!
कलेच्या बाबतीत प्रत्येकाचं मत भिन्न असू शकतं. तुमच्या परिक्षणातून एखाद्या कलाकृतीकडे पाहण्याची नवी दृष्टी, नवा पैलू मिळत आहे. ते जास्त महत्त्वाचे आहे. कलाकृतीच्या बाबतीत चांगलं वाईट, उत्तम-निकृष्ट असंही काही नसतं हे एक कलाकार म्हणून माहित आहेच.
18 May 2015 - 5:23 pm | मार्मिक गोडसे
मस्त फोटो.
गोट्याने आपली जागा पक्की केली आहे.
19 May 2015 - 9:27 am | खेडूत
छान चित्रं !
यावेळी भाग न घेता फक्त एन्जॉय करणार आहे. क्रम लावणं हे स्पर्धेत भाग घेण्याहुन अवघड आहे...
मतदानासाठी क्रमवारी ठरवत आहे..! :)
19 May 2015 - 10:19 am | सनईचौघडा
माझा फोटो स्पर्धेसाठी.
8 Jun 2015 - 4:24 pm | जयंत कुलकर्णी
श्री. सनईचौघडा,
स्पर्धेसाठी जरा जास्त कष्ट घेऊन फोटो काधावेत ही विनंती. रेकॉर्ड फोटोला शक्यतो बक्षिस मिळत नाही आणि पुढच्या वेळेला तुम्हाला ते मिळावे अशी इच्छा आहे......... :-)
20 May 2015 - 11:22 pm | anandphadke
8 Jun 2015 - 4:26 pm | जयंत कुलकर्णी
श्री. फडके,
फोटो चांगलाच आहे. फांद्यांवरचे डिटेल्स व पिसांचे डिटेल्सही चांगले आले आहेत. पण...... चोच नजरेला फोटोच्या बाहेर घेऊन जाते आहे. तुमच्याकडे याचाच एखादा दुसरा फोटो असेल तर बघा....
8 Jun 2015 - 4:27 pm | जयंत कुलकर्णी
आणि ती सुद्धा लगेचच कारण ती फोटोच्या एका कडेला आहे....
21 May 2015 - 10:23 pm | खंडेराव
माझी प्रवेशिका

26 May 2015 - 10:24 am | महासंग्राम
26 May 2015 - 11:02 pm | मैत्र
उस्ताद अब्दुल रशीद खान साहब


गोटीपुआ कलाकार - समर्पण
गोटीपुआ कलाकार - एकाग्रता

उंची आणि सावल्या

नभ उतरू आलं

शिशिराची उदासी

स्पर्धेसाठी कुठला द्यावा यावर काही मदत हवी आहे..
उस्तादजी का शिशिर ..
26 May 2015 - 11:05 pm | मैत्र
इथे देताना स्केलची गोची झाली आहे त्यामुळे काही फोटो compress तर काही stretch झाले आहेत.
क्रॉप केलेल्या फोटो मध्ये हा प्रॉब्लेम जास्त आहे..
27 May 2015 - 2:38 pm | खंडेराव
,
27 May 2015 - 1:53 am | मोहनराव
प्रवेशिका
27 May 2015 - 9:18 am | लालगरूड
27 May 2015 - 10:30 am | विशाल कुलकर्णी
अजून काही फोटो (स्पर्धेसाठी नसलेले) :
फोटो १ आणि ३ : काही वर्षापूर्वी भाजे लेण्यांपाशी टिपलेले फोटो
फोटो २ : बेड्से लेणी, कामशेत
27 May 2015 - 11:59 am | खेडूत
स्पर्धेसाठी नसलेले अनेक फोटु पण मस्त आहेत!
7 Jun 2015 - 2:31 pm | मार्मिक गोडसे
पहिले तीन क्रमांक काढण्यासाठी मतदान कधी सुरू करणार ?
8 Jun 2015 - 8:20 am | वेल्लाभट
गोडसे अहो मार्मिक प्रश्न विचारलात !
निकालही लागला :) तुम्ही मतांच काय विचारता
8 Jun 2015 - 1:18 pm | गणेशा
काय मस्त फोटो आलेत सगळ्यांचे.. एकाहुम एक सरस ... अप्रतिम ....
निवड करताना खुप अवघड गेले असणारच ...
स्पा चा फोटो मला सर्वात जास्त आवडलेला फोटो...