✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कृष्णधवल छायाचित्रे......मिपा स्पर्धा-१०

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Wed, 05/06/2015 - 13:11  ·  लेख
लेख
मिपा कृष्णधवल छायाचित्र स्पर्धा. Simple, Free Image and File Hosting at MediaFire १९३० साली रंगीत फिल्म्स कोडॅकने व इतर कंपन्यांनी बाजारात आणल्या आणि छायाचित्रांच्या जगात खळबळ माजली. शेवटी शेवटी १९७० साली तर कृष्णधवल छायाचित्रे का काढावीत असाही प्रश्न विचारला जाऊ लागला. कृष्णधवल हा इतिहास आहे. निसर्गात काळ्या पांढऱ्यात काहीही नसते. मग रंगाची दुनिया मला चित्रित करता येत असेल तर मी कृष्णधवल चित्रणात का रमायचे असे प्रश्न विचारले जाऊ लागले. १९३० नंतर जेव्हा रंगीत फिल्म उपलब्ध झाली तेव्हा त्याची प्रत एवढी चांगली नसायची. दिसणारे रंग व छायाचित्रात येणाऱ्या रंगात बराच फरक पडत असे. शिवाय डार्करुममधे जे घोळ व्हायचे ते वेगळेच.... नंतर नंतर जेव्हा रंगीत फिल्मची प्रत अतोनात सुधारली तेव्हा मात्र सगळे छायाचित्रकार या माध्यमात छायाचित्रण करु लागले. शिवाय आठवणी साठवून ठेवण्यासाठी छायाचित्रण करतात त्यांना तर ही पर्वणीच होती. काहीच काळातच कृष्णधवल फिल्म मिळते का नाही अशी चौकशी लोक करु लागले. पण ॲन्सेल ॲडॅम्स सारख्या अनेक छायाचित्रकारांनी कृष्णधवल छायाचित्रांची ताकद व परिणामकारीकता ओळखली होती. त्यामुळे रंगीत दुनियाची छायाचित्रे कितीही रंगीत झाली तरीही या छायाचित्रकारांची छायाचित्रे पाहिल्यावर लोकांच्या तोंडातून प्रशंसोद्गार बाहेर पडत व अजूनही पडतात. ‘ब्लॅक अँड व्हाईटची मजा काही औरच’ हे त्यातील एक नेहमी कानावर पडणारे वाक्य. असो. Simple, Free Image and File Hosting at MediaFire रंगीत छायाचित्रणाचा सामान्य जनतेत होणारा वापर इतका वाढला की कृष्णधवल चित्रे ही जुन्या जमान्याचीच असा विचार करण्याचा पायंडाच पडून गेला. मला वाटते फार पूर्वी एखादे छायाचित्र काढल्यावर ते हातात पडेपर्यंत इतका वेळ जायचा की ते छायाचित्र कालचे हो़ऊन जायचे. त्यामुळे की काय चित्रपटसृष्टीमधे भुतकाळ दाखविताना तो सेपिया किंवा कृष्णधवल छटेमधे दाखविण्याची पद्धत पडली असावी. Simple, Free Image and File Hosting at MediaFire मग कृष्णधवल छायाचित्रे अजुनही जनमानसांवर गारुड करतात याचे काय कारण असावे बरं ? खर तर तुम्ही त्या छायाचित्रातील एक अत्यंत महत्वाचा घटक ‘रंग’ हा काढून टाकता. पण त्यामुळे एक लक्षात घ्या त्या छायाचित्रातील इतर अत्यंत महत्वाचे लपलेले घटक आपल्या दृष्टीस पडतात. यात तर कृष्णधवल छायाचित्रणाचे यश सामावलेले नाही ना? विचार केल्यावर मला तरी हे पटले. ज्या छायाचित्राचा विषय हा रंग नाही त्यात रंगाची गिचमीड रसभंग करु शकते हे मी माझ्या अनेक छायाचित्रांमधे स्वत: अनुभवले आहे. याचा उलट अर्थ असाही होतो की महत्वाचा व्यापून टाकणारा घटक "रंग' गेल्यामुळे छायाचित्रकाराला इतर घटकांकडे जास्त लक्ष पुरवावे लागेल..... (जे तुम्हाला तुमच्या छायाचित्रात करायचे आहे.) Simple, Free Image and File Hosting at MediaFire यात कृष्णधवल चित्रे कशी काढावीत किंवा त्यामागे कुठला दृष्टीकोन असावा, कुठली छायाचित्रे कृष्णधवल करावीत हे लिहिण्याचा माझा मुळीच मानस नाही. आपल्याला ते माहीत आहेच... आपल्या उत्कृष्ट छायाचित्रांपैकी योग्य अशा एकाचे कृष्णधवलमधे रुपांतर करुन आपण येथे टाकावे...त्या अगोदर खालील माहिती वाचल्यास आपल्याला मदत होईल असा विश्र्वास वाटतो. कृष्णधवल छायाचित्र काढण्यासाठी आपल्याला विषय पूर्णकृष्ण ते पूर्णधवल या दोन छटांमधे पडणार्‍या अनेक छ्टांमधे पाहता येणे अत्यंत आवश्यक आहे. यात अवघड काही नाही, सरावाने ते सहज जमते. जर तुम्ही पूर्वी कधी ब्लॅक अँड व्हाईट फिल्म डेव्हलप केली असेल तर तुम्हाला हे लगेचच समजेल. ... हे रंग कृष्णधवलच्या अनेक छटांमधे पहाण्याने ते छायाचित्रात कसे दिसतील हे आपल्याला समजते. आता हल्लीच्या डिजिटल डार्करुममधे ही छटा तुम्ही बदलू शकता पण कुठली किती बदलायची यासाठी हे मुलभूत ज्ञान आवश्यक आहे असे मला वाटते. आता खालील आकृतीमधे प्रत्येक रंगाची छटा कृष्णधवलमधे कशी दिसते हे बघा. Simple, Free Image and File Hosting at MediaFire आता जेव्हा तुम्ही दोन निराळे रंग बघता तेव्हा कदाचित कृष्णधवल चित्रामधे त्याची एकच छटा असू शकते किंवा त्यांमधे अगदी थोडा फरक असू शकतो. या छायाचित्रांतील गंमत त्यामुळे निघून जाते. उदा. खाली एका पुस्तकातील तीन छायाचित्रे दाखविली आहेत. १ रंगीत....मोटारींचा रंग आपल्या डोळ्याला भावतोय कारण ते रंग गडद व वेगळे आहेत्.. Simple, Free Image and File Hosting at MediaFire २ कृष्णधवल... यात हे छायाचित्र किती मद्दड झाले आहे ते बघा. कारण रंगीत चित्रामधे जरी ते रंग वेगवेगळे दिसत असले तरी कृष्णधवलमधे त्याची छटा एकच आहे. Simple, Free Image and File Hosting at MediaFire ३ एकाचा टोन बदलल्यावर ..... Simple, Free Image and File Hosting at MediaFire मित्रहो.... या धाग्यावर आपली (प्रत्येकी एक) कृष्णधवल चित्रे टाका..... अवधी : २० दिवस. जास्त टाकलीत तर कृपया जी स्पर्धेसाठी नाहीत त्यावर तसे स्पष्ट लिहा. पहिले तीन क्रमांक काढण्यासाठी पुढे १० दिवस. शेवटी, मी काढलेली छायाचित्रे ही सजावट म्हणून टाकलेली आहेत....त्याला दुसरा अर्थ नाही.... आपण अधिक चांगली टाकाल याची खात्री आहे.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire शेवटी छायाचित्र एडिट करा, करु नका....ते पाहिल्यावर... भावले पाहिजे, आवडले पाहिजे हे महत्वाचे... स्पर्धेसाठी शुभेच्छा ! जयंत कुलकर्णी संपादकांना: यात हवा तो बदल करण्याचा आपला अधिकार मान्य करीत आहे.... :-)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
87378 वाचन

💬 प्रतिसाद (146)

प्रतिक्रिया

अंधा काणूण..

यसवायजी
Wed, 05/13/2015 - 19:23 नवीन
अंधा काणूण.. Image removed.
  • Log in or register to post comments

silhouette च्या

जयंत कुलकर्णी
Mon, 06/08/2015 - 12:40 नवीन
silhouette च्या फोटोग्राफीसाठी एजेस शार्प व बेकग्राऊंड खूपच ब्राईट असावी लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

सेंट मेरी कॅथेड्रल, पर्थ (स्पर्धेसाठी)

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 05/14/2015 - 11:11 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

श्री विशाल,

जयंत कुलकर्णी
Mon, 06/08/2015 - 12:42 नवीन
श्री विशाल, मला खरे तर पुलाचा फोटोचे कंपोझिशन जास्त आवडले होते. वरील फोटोत फोटोशॉपमधे लेन्स करेक्शन जर केले असते तर फोटो अजून मस्त झाला असता. फिल्टर-लेन्स करेक्शन-कस्टम...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

कात्रज दरीपूल (स्पर्धेसाठी नाही)

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 05/14/2015 - 11:12 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सर्वच फोटो खास आहेत. मला

विशाल कुलकर्णी
Fri, 05/15/2015 - 12:45 नवीन
सर्वच फोटो खास आहेत. मला आसिफजींचा स्पर्धेसाठी असलेला फोटो विशेष आवडला.
  • Log in or register to post comments

माझा फोटो स्पर्धेसाठी.

सनईचौघडा
Fri, 05/15/2015 - 16:42 नवीन
माझा फोटो स्पर्धेसाठी. Image removed.
  • Log in or register to post comments

सनईचौघडा,

जयंत कुलकर्णी
Mon, 05/18/2015 - 06:55 नवीन
सनईचौघडा, आपला फोटो दिसत नाही.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा

जयंत, चांगली माहिती दिली आहे.

पॉइंट ब्लँक
Sun, 05/17/2015 - 10:50 नवीन
जयंत, चांगली माहिती दिली आहे. आणि योग्य विषय निवडल्यामुळे सहभाग नक्कीच वाढेल. माझी प्रवेशिका. Image removed.
  • Log in or register to post comments

श्री पॉईंट ब्लँक,

जयंत कुलकर्णी
Mon, 06/08/2015 - 12:45 नवीन
श्री पॉईंट ब्लँक, फोटो चांगला आहे पण मला वाटते की डावीकडील बाजूमधे थोडेसे डिटेल दिसायला पाहिजे होते. जरा करुन बघता का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

सर्वच फोटो क्लास.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 05/17/2015 - 11:02 नवीन
क्रमांक काढणे म्हणजे कोणावर तरी अन्याय. माझ्या वतीने सर्वांना विजेते घोषित करतो. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

माझीही प्रवेशिका

मोहन
Sun, 05/17/2015 - 20:25 नवीन
फिरतीची नोकरीचा एक फायदा असतो . असे अनेक क्षण अनुभवायला मिळतात. हा सुर्योदय परादीप - ओडीशा तला Image removed.
  • Log in or register to post comments

श्री. मोहन,

जयंत कुलकर्णी
Mon, 06/08/2015 - 12:49 नवीन
श्री. मोहन, रुल ऑफ ३ जर वापरला असता तर हा फोटू निश्चितच चांगला दिसला असता. म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहन

धन्यवाद जयंत.

मोहन
Tue, 06/09/2015 - 15:14 नवीन
धन्यवाद जयंत. अशा परिक्षणामुळे आमच्या सारख्यांना हुरुप येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

माझी प्रवेशिका

सानिकास्वप्निल
Sun, 05/17/2015 - 21:26 नवीन
माझी प्रवेशिका. Image removed.
  • Log in or register to post comments

सानिका,

जयंत कुलकर्णी
Mon, 06/08/2015 - 12:51 नवीन
सानिका, दिव्याच्या मधल्या काडीवर/पत्र्यावर ते धुरकट काय आले आहे ? त्यामुळे फोटोची मजा गेली. ते तुम्हाला फोटोशॉपमधे काळे करता येते का बघा. करुन तर बघा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

माझाही एक..... अर्थात

जयंत कुलकर्णी
Mon, 05/18/2015 - 06:59 नवीन
माझाही एक..... अर्थात स्पर्धेसाठी नाही... :-) Image removed.
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका

प्रचेतस
Mon, 05/18/2015 - 09:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अजून काही

स्पा
Mon, 05/18/2015 - 11:34 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

उघडा दरवाजा

चित्रगुप्त
Mon, 05/18/2015 - 11:48 नवीन
@स्पा: उघड्या दरवाजाच्या फोटोतून अचानक कुठल्या कुठे पोचवलेत राव, व्वा.
  • Log in or register to post comments

माझेही काही क्लिक्स.

संदीप डांगे
Mon, 05/18/2015 - 13:28 नवीन
माझेही काही क्लिक्स. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. आणि हा स्पर्धेसाठी. Image removed.
  • Log in or register to post comments

मुंबई मस्तच

राघवेंद्र
Tue, 05/19/2015 - 00:59 नवीन
संदीप भाउ मस्त फोटोज !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

स्पर्धेसाठीचा फोटो एक नंबर !!

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 05/19/2015 - 01:03 नवीन
स्पर्धेसाठीचा फोटो एक नंबर !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

संदीपभाऊ, एकाहून एक सुंदर

विशाल कुलकर्णी
Mon, 05/25/2015 - 10:23 नवीन
संदीपभाऊ, एकाहून एक सुंदर फोटो आलेत. जियो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

धन्यवाद!

संदीप डांगे
Mon, 05/25/2015 - 12:57 नवीन
सर्वांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

मुंबई मॉर्निंगचा पहिला फोटो

जयंत कुलकर्णी
Mon, 06/08/2015 - 16:21 नवीन
मुंबई मॉर्निंगचा पहिला फोटो छान आहे... आणि मुख्य म्हणजे अक्षरांचा नियम तोडल्यावर तो अधिकच चांगला दिसत आहे. एखाद्या पुस्तकाचे मुखपृस्ट म्हणून सहज खपेल.... पण स्पर्धेला दिलेला फोटो निर्जीव वाटतो. पुढून काढला असता तर कदाचित चेहर्‍यावरील भावाने जिवंत झाला असता......असे माझे वाटते. तुम्हाला व इतरांना वेगळे वाटू शकते हे कृपया ध्यानात घ्या....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

योग्य अभ्यास आणि

संदीप डांगे
Mon, 06/08/2015 - 17:01 नवीन
योग्य अभ्यास आणि परिक्षणाबद्दल शतशः धन्यवाद! कलेच्या बाबतीत प्रत्येकाचं मत भिन्न असू शकतं. तुमच्या परिक्षणातून एखाद्या कलाकृतीकडे पाहण्याची नवी दृष्टी, नवा पैलू मिळत आहे. ते जास्त महत्त्वाचे आहे. कलाकृतीच्या बाबतीत चांगलं वाईट, उत्तम-निकृष्ट असंही काही नसतं हे एक कलाकार म्हणून माहित आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

मस्त फोटो

मार्मिक गोडसे
Mon, 05/18/2015 - 17:23 नवीन
मस्त फोटो. गोट्याने आपली जागा पक्की केली आहे.
  • Log in or register to post comments

छान चित्रं !

खेडूत
Tue, 05/19/2015 - 09:27 नवीन
छान चित्रं ! यावेळी भाग न घेता फक्त एन्जॉय करणार आहे. क्रम लावणं हे स्पर्धेत भाग घेण्याहुन अवघड आहे... मतदानासाठी क्रमवारी ठरवत आहे..! :)
  • Log in or register to post comments

नमस्कार

सनईचौघडा
Tue, 05/19/2015 - 10:19 नवीन
माझा फोटो स्पर्धेसाठी. Image removed.
  • Log in or register to post comments

श्री. सनईचौघडा,

जयंत कुलकर्णी
Mon, 06/08/2015 - 16:24 नवीन
श्री. सनईचौघडा, स्पर्धेसाठी जरा जास्त कष्ट घेऊन फोटो काधावेत ही विनंती. रेकॉर्ड फोटोला शक्यतो बक्षिस मिळत नाही आणि पुढच्या वेळेला तुम्हाला ते मिळावे अशी इच्छा आहे......... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा

माझी प्रवेशिका

anandphadke
Wed, 05/20/2015 - 23:22 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

श्री. फडके,

जयंत कुलकर्णी
Mon, 06/08/2015 - 16:26 नवीन
श्री. फडके, फोटो चांगलाच आहे. फांद्यांवरचे डिटेल्स व पिसांचे डिटेल्सही चांगले आले आहेत. पण...... चोच नजरेला फोटोच्या बाहेर घेऊन जाते आहे. तुमच्याकडे याचाच एखादा दुसरा फोटो असेल तर बघा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: anandphadke

आणि ती सुद्धा लगेचच कारण ती

जयंत कुलकर्णी
Mon, 06/08/2015 - 16:27 नवीन
आणि ती सुद्धा लगेचच कारण ती फोटोच्या एका कडेला आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

सर्वच मस्त..

खंडेराव
गुरुवार, 05/21/2015 - 22:23 नवीन
माझी प्रवेशिका Image removed.
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका.

महासंग्राम
Tue, 05/26/2015 - 10:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

काही फोटो

मैत्र
Tue, 05/26/2015 - 23:02 नवीन
उस्ताद अब्दुल रशीद खान साहब Image removed. गोटीपुआ कलाकार - समर्पण Image removed. गोटीपुआ कलाकार - एकाग्रता Image removed. उंची आणि सावल्या Image removed. नभ उतरू आलं Image removed. शिशिराची उदासी Image removed. स्पर्धेसाठी कुठला द्यावा यावर काही मदत हवी आहे.. उस्तादजी का शिशिर ..
  • Log in or register to post comments

स्केल

मैत्र
Tue, 05/26/2015 - 23:05 नवीन
इथे देताना स्केलची गोची झाली आहे त्यामुळे काही फोटो compress तर काही stretch झाले आहेत. क्रॉप केलेल्या फोटो मध्ये हा प्रॉब्लेम जास्त आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

उस्तादजी

खंडेराव
Wed, 05/27/2015 - 14:38 नवीन
,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

वेनिस येथील मास्क

मोहनराव
Wed, 05/27/2015 - 01:53 नवीन
प्रवेशिका Image removed.
  • Log in or register to post comments

आम्ही पण स्पर्धेत :-D

लालगरूड
Wed, 05/27/2015 - 09:18 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अजून काही फोटो (स्पर्धेसाठी

विशाल कुलकर्णी
Wed, 05/27/2015 - 10:30 नवीन
अजून काही फोटो (स्पर्धेसाठी नसलेले) : फोटो १ आणि ३ : काही वर्षापूर्वी भाजे लेण्यांपाशी टिपलेले फोटो फोटो २ : बेड्से लेणी, कामशेत Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

वा!

खेडूत
Wed, 05/27/2015 - 11:59 नवीन
स्पर्धेसाठी नसलेले अनेक फोटु पण मस्त आहेत!
  • Log in or register to post comments

पहिले तीन क्रमांक

मार्मिक गोडसे
Sun, 06/07/2015 - 14:31 नवीन
पहिले तीन क्रमांक काढण्यासाठी मतदान कधी सुरू करणार ?
  • Log in or register to post comments

गोडसे अहो मार्मिक प्रश्न

वेल्लाभट
Mon, 06/08/2015 - 08:20 नवीन
गोडसे अहो मार्मिक प्रश्न विचारलात ! निकालही लागला :) तुम्ही मतांच काय विचारता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

काय मस्त फोटो आलेत सगळ्यांचे.

गणेशा
Mon, 06/08/2015 - 13:18 नवीन
काय मस्त फोटो आलेत सगळ्यांचे.. एकाहुम एक सरस ... अप्रतिम .... निवड करताना खुप अवघड गेले असणारच ... स्पा चा फोटो मला सर्वात जास्त आवडलेला फोटो...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा