जायचे आहेच तर जावेस आता
का असे वाटेत थांबावेस आता
मी तुला द्यावे असे उरले न काही
तू हवे तर दु:खही न्यावेस आता
ही किती तलखी जिवाची होत आहे
ग्रीष्म तू विझवून टाकावेस आता
संपवाया अंतरे माझ्यातुझ्यातिल
जवळ थोडे आणखी यावेस आता
अडथळ्यांना टाळणेही ठीक नाही
अडथळे मोडून काढावेस आता
मी प्रतिक्षेचा पुरावा काय देऊ
तू युगे चालून ठरवावेस आता
- डॉ.सुनील अहिरराव
प्रतिक्रिया
6 Apr 2015 - 9:01 pm | एक एकटा एकटाच
चांगलीय !!!!
6 Apr 2015 - 9:05 pm | सूड
+१
8 Apr 2015 - 2:28 pm | drsunilahirrao
@अमोल परब , सूड
खूप खूप धन्यवाद .
8 Apr 2015 - 2:31 pm | कविता१९७८
मस्त
8 Apr 2015 - 2:34 pm | मदनबाण
मी तुला द्यावे असे उरले न काही
तू हवे तर दु:खही न्यावेस आता
वाह्ह...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }
8 Apr 2015 - 5:06 pm | अत्रुप्त आत्मा
@ मी प्रतिक्षेचा पुरावा काय देऊ
तू युगे चालून ठरवावेस आता>> झकास हो ! सुनिलभाऊ
9 Apr 2015 - 8:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर.
अडथळ्यांना टाळणेही ठीक नाही
अडथळे मोडून काढावेस आता
मी प्रतिक्षेचा पुरावा काय देऊ
तू युगे चालून ठरवावेस आता
वरील ओळींना पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत.
-दिलीप बिरुटे
13 Apr 2015 - 10:01 pm | शब्दबम्बाळ
निव्वळ अप्रतिम!!!