गुटख्याचा भपकारा आला तशी पारू सावध झाली.
वासामागनं आन्ना ग्रामशेवक आला.
कसल्यातरी फॉर्मवर आंगटा घ्यायाचा म्हनला .
येका आटावड्यात तिसऱ्यांदा आलंय.
निराधार योजनेचं काम करतो म्हनतुया - बगू.
जाताना म्हनला, '' काय ? आटापलं सैपाकपानी-आंगुळ ? ''
नस्त्या चौकशा मुडद्याला !
***
जैवंता मेल्यावर दादा म्हनलावता वडगावला चल परत.
पन पोरास्नी घिउन कुटं तेनच्यात ऱ्हानार !
आपलीच झोळी फाटकी.
नगु मनलं. पेन्शल मिळंल .
पर गावातल्या मानसांची नजरच लई वंगाळ !
काय वाटलं अचानक - आन गेली कासाराच्या दुकानात.
फोनच्या मशिनीत त्येनंच नंबर फिरीवला.
दादाचा आवाज आल्याव रुपाया टाकला.
मंग आवाजच फुटंना !
नरडंच आवाळल्यागत झालं
''रडू नगं'' - कासार म्हनला - ''म्या बोलतो. ''
''काय सांगावा?''
''त्येला मनावं- सांच्याला यिऊन लगी आमाला घिऊन जा !''
प्रतिक्रिया
8 Apr 2015 - 8:19 pm | खटपट्या
खूप छान... :(
8 Apr 2015 - 8:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
कटु, पण सत्य :(
8 Apr 2015 - 8:26 pm | जेपी
समाजाची लक्तर
8 Apr 2015 - 8:27 pm | एक एकटा एकटाच
सहमत
9 Apr 2015 - 2:18 am | आदूबाळ
+१
छान लिहिलंय!
8 Apr 2015 - 8:29 pm | नगरीनिरंजन
फार आवडली!
8 Apr 2015 - 8:29 pm | आतिवास
अतिशय परिणामकारक कथा!
8 Apr 2015 - 8:31 pm | श्रीरंग_जोशी
अतिशय परिणामकारक कथा!
8 Apr 2015 - 8:36 pm | सौन्दर्य
जबरदस्त. अप्रतिम.
8 Apr 2015 - 9:08 pm | पॉइंट ब्लँक
आयला, १०० शब्दात इतक परिणामकारक? भारीच !
9 Apr 2015 - 1:56 pm | अत्रुप्त आत्मा
+++१११
8 Apr 2015 - 9:45 pm | एस
मस्तकात संतापाची तिडिक उठवणारी कथा!
8 Apr 2015 - 9:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
१०० शब्दात एवढा आशय मांडता येईल अशी कल्पना मी स्वप्नातही करु शकलो नसतो.
9 Apr 2015 - 10:29 am | नाखु
थेट आणी वास्तव
9 Apr 2015 - 7:18 pm | बॅटमॅन
+११११११११११११ :(
9 Apr 2015 - 8:29 am | प्रचेतस
आवडली कथा.
9 Apr 2015 - 8:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय बोलु...
-दिलीप बिरुटे
9 Apr 2015 - 9:22 am | मदनबाण
आपल्या आजुबाजुला असं घडताना पाहुन बर्याचदा खूप वाईट वाटतं... :(
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ho Jaun Tera Madamiyan... ;) { Tevar }
9 Apr 2015 - 11:54 am | अनिता ठाकूर
नित्याचंच! एक न संपणारा विषय. किति काळ?.. माहित नाही. उपाय?.. माहित नाही.
9 Apr 2015 - 11:56 am | चिनार
कटु सत्य!
9 Apr 2015 - 1:01 pm | स्पंदना
उभी राहू म्हनली स्वतःच्या पायावर तरी उभी राहू देत नाहीत.
9 Apr 2015 - 7:16 pm | खेडूत
सर्वांचे खूप आभार !
10 Apr 2015 - 2:51 pm | प्रियाजी
म्हणायला वीस संपून एकविसावे शतक उजाड्ले तरी बाईकडे बघ्ण्याची पुरूषाची नजर ती अन तषीच. त्यात बदल कोणत्या शतकात होणार?
10 Apr 2015 - 3:48 pm | सूड
काकू तुम्हाला माहित असावं म्हणून एक किस्सा सांगतो पुलंचा...
नवरा बायको रस्त्याने चाललेले असताना बायको सवयीप्रमाणे एखाद्या बाईत वावगं दिसलं की नवर्याला विचारते, "पदर पाह्यलात?"
आता नवर्याने "हो" म्हटलं की "या वयात बरीक शोभत नाही हो हे!!"
"नाही" म्हटलं की, "कुठे बघत असतात वेंधळ्यासारखं देव जाणे"...असं उत्तर असतं.
आता यावरुन बायका बोलताना दोन्ही बाजूंनी बोलतात असं मी म्हणणार नाही, कारण नको तिथे जनरलायझेशन न करण्याची अक्कल मला आहे.
12 Apr 2015 - 1:12 pm | टवाळ कार्टा
त्येंन्ला बेसिक इंस्टिंक्ट म्हैत नसावेत ...जौदे :)
12 Apr 2015 - 1:15 pm | टवाळ कार्टा
लाखो वर्षे जौन सुध्धा पुरुषांत बदल घडवून आणण्याची इच्चा बाळगण्याची म्हैलांची सवय कधी बदलणार असे लिहून या धाग्याचे पोटेंशियल ३००+ नेउ कै? ;)
12 Apr 2015 - 5:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
लिहिलं नैस काय?
12 Apr 2015 - 4:45 pm | पलाश
१०० शब्दांच्या आत खूप काही सांगितलं आहे. पारू, आन्ना ग्रामसेवक, कासार आणि सांगावा मिळाल्यासरशी बहिणीच्या मदतीला धावुन येणारा दादा हे सगळेजण डोळ्यांपुढे उभे केलेत. शतशब्दकथा आवडली.
12 Apr 2015 - 5:53 pm | प्रदीप साळुंखे
वासनाधुंद प्रवृत्ती ही कोणाची देणगी?
स्त्री आणि पूरूष ही कोणाची निर्मिती?
अगदी रामायण महाभारतापासून चालू आहे हे सगळं
याला पर्याय नाही
12 Apr 2015 - 9:21 pm | पैसा
अगदी थोडक्या शब्दात केवढा अर्थ भरलाय!