शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी महिनाभर राहून मनसोक्त हुंदडायचे,मामेभाऊ व त्याच्या मित्रांबरोबर खेळायचे , टिंगलटवाळ्या करायच्या व सुट्टी संपली की ही आठवणींची शिदोरी घेवून आपल्या घरी परतायचे हा माझा दरवर्षीचा कार्यक्रम असे. अकरावीची वार्षिक परिक्षा संपल्यावर दरवर्षीप्रमाणे आजोळी गेलो. दुपारची वेळ असूनही घरात आजी आजोबांव्यतिरिक्त कोणीच नव्हते. मामेभाऊ-बहीण कोणीही घरात नव्ह्ते, प्रत्येकाने स्वतःला अभ्यासापासून ते पोहण्यापर्यंतच्या क्लासेसमध्ये गुंतवून घेतले होते. हातपाय धूवून फ्रेश होवून आजी-आजोंबांबरोबर थोडावेळ गप्पा मारल्या व बाहेर सटकलो. शेजारी मित्राच्या घरी गेलो तर तोही असाच कुठल्यातरी क्लासला गेला होता, बरोबरीचे कोणीही आजुबाजुला खेळताना दिसत नव्हते, फक्त चिल्लिपिल्ली मुले भर उन्हात खेळत होती. ते रखरखीत ऊन व आजुबाजूचे वातावरण मला अधिक उदास वाटू लागले,ह्याच उन्हात मित्रांबरोबर खेळताना असे कधीही जाणवले नव्हते. संध्याकाळी भावंडांबरोबर बाहेर मॉलमध्ये खरेदी,खादाडणे, इ.व्हायचे. एखाद दोन दिवस हे ठिक वाटले नंतर त्याचाही कंटाळा येवू लागला. अशी मजा मला माझ्या शहरातही मिळत होती. आजोळी मी ज्यासाठी आलो होतो त्या मजेला यंदा मी मुकलो होतो, पहिल्यांदा मी आजोळी कंटाळलो होतो. आजीआजोबांच्या आग्रहामुळे मी कसाबसा एक आठवडा आजोळी काढला.
दरवर्षीप्रमाणे मला निरोप देण्यासाठी बस स्टँडवर आज कोणीही उपस्थीत नव्हते. गर्दी भरपूर होती. मुंबईला जाणारी बस आली. जो तो बसमध्ये चढण्यासाठी दरवाज्यात गर्दी करत होता, मीही त्यात सामील झालो. एव्हाना अर्धी गाडी भरली होती. मी पायरीवर पाय ठेवणार तितक्यात एका उंचपूर्या मजबूत देहयष्टीच्या माणसाने माझ्यासकट सगळ्यांना मागे ढकलून गाडीत शिरकाव केला. मी पुन्हा गाडीत चढण्याचा नाद सोडला व मागे जाऊन हताशपणे गाडीकडे बघत उभा राहिलो. तितक्यात त्या गाडीतील मागून दोन नंबरच्या खिडकीतून कोणीतरी हात काढून मला बोलवत होते. ते दूसरे तिसरे कोणीही नसून ज्यांनी मला ढकलले होते तेच गृह्स्थ होते. त्यांनी माझ्यासाठी जागा पकडली होती. गाडीत पाय ठेवायला जागा नव्हती कसाबसा मी मागे पोहोचलो. ए पोराला रस्ता द्या असे त्या गृह्स्थाने आपल्या खणखणीत आवाजात लोकांना फटकारले. आजुबाजुच्या प्रवाशांच्या चेहर्यावर नाराजीचे भाव स्पष्ट दिसत होते इतक्या गर्दीतही आपल्याला विनासायास बसायला मिळते ह्यामुळे मनातल्या मनात सुखावलो होतो. थँक्यु आजोबा असे म्हणुन मी बसलो. पांढरी टोपी, पांढरा सदरा व पायजामा वय अंदाजे ६५ च्या पुढे असावे. कोण लागत होते हे आजोबा आपले? का आपल्यासाठी जागा पकडली असेल?
कंडक्टरने बेल वाजवली व गाडी सुरू झाली. गर्दीमुळे कंडक्टरला मागे यायला बराच वेळ लागणार होता. तरीही मी पाकिटातून तिकिटाचे नेमके पैसे काढून शर्टच्या खिशात ठेवणार तिततक्यात आजोबा म्हणाले तू तिकिट काढू नकोस तू माझ्याबरोबर आहे असे मी कंडक्टरला सांगीन. तू काळजी करू नकोस. स्वातंत्र्यसैनिकाबरोबर एक व्यक्ति मोफत प्रवास करू शकते हे माहित होते. परंतू आजोबांचे वय ८० च्या आसपासही वाटत नव्हते. मला तर लॉटरीच लागली असे वाटले.
बाळ तू काय करतोस ? आजोबांनी विचारले.
११ वी कॉमर्सची परिक्षा दिली.- मी.
कॉमर्स?? दहावीला कमी मार्क मिळाले का?- आजोबा.
नाही- मी.
मग सायन्सला का गेला नाही, करीअरच्या संधी इ. आजोबांचे लेक्चर सूरू झाले. त्यांच्या बोलण्यातून मला समजले की
आजोबा एका खेड्यात जि.प. च्या शाळेत मुख्याध्यापक होते. गावी बर्यापैकी जमीन आहे. निवृत्तीनंतर शेतीत लक्ष घालू लागले. दोन मुले म.रा.वि.म मध्ये इंजिनिअर आहेत. एक मुलगा बी.एस्सी. अॅग्री. शेती करतो व एका साखर कारखान्याच्या बॉडीवर कुठल्याश्या मोठ्या पदावर आहे. हे सर्व ते मोठ्या अभिमानाने सांगत होते. आजोबांचे भारदस्त व्यक्तिमत्व व स्पष्टवक्तेपणामुळे मी भारावून गेलो होतो त्यांच्याविषयी आदर वाटू लागला होता.
तुम्हाला कुठे जायचे आहे? सहज चौकशी म्हणून मी आजोबांना विचारले. आजोबा म्हणाले मुंबईला.
मुंबईला कोणाकडे ? मी विचारले.
आजोबांनी माझा डावा हात पकडला व त्यांच्या पोटाच्या उजव्या बाजूवर ठेवला. कडक झाकणासारखा हाताला स्पर्श झाला. मला काही समजले नाही हे आजोबांन कळाले. व त्याणीच सांगायला सुरवात केली.
मला पोटाचा कॅन्सर आहे. टाटामध्ये ऑपरेशन करुन खराब झालेले आतडे काढून टाकले. मलविसर्जनाचा नैसर्गीक मार्ग नसल्यामुळे पोटाला छेद घेउन एक छोटी नळी आतड्याला जोडुन शरिराच्या बाहेर जोडली आहे. एक सक्शन पंप जोडून मल बाहेर काढून व नळी साफ करुन त्याला झाकण लावावे लागते. अधून मधून टाटाला यावे लागते उपचारासाठी. हे ऐकल्यावर मला आजोबांविषयी आदराबरोबर सहानुभूती वाटू लागली. मग तुम्ही प्रवासात सोबतीला कोणाला का नाही घेतले? मी विचारले. मला काय गरज कोणाला सोबतीला घ्यायची. मी ठणठणीत आहे, मला कोणाच्या आधाराची गरज नाही, थोड्या घुश्यातच आजोबा गरजले. गाडीत चढताना अनुभव घेतला होताच मी त्यांच्या फिटनेसचा.
आजोबांनी बॅगेतून एक फाईल काढली. त्यात उपचारांची अनेक कागदपत्रे होती त्याच बरोबर अनेक राजकीय व्यक्तिंची शिफरसपत्रे होती. मुलाच्या ओळखीमुळे अल्पभुधारक असल्याचा दाखला होता. ज्यामुळे त्यांचे ऑपरेशनपासून औषधौपचार मोफत मिळाले होते. हे सर्व एक माजी शिक्षक मोठ्या अभिमानाने मला सांगत होते. कॅन्सरचा रुग्ण असल्यामुळे रुग्णाबरोबर एका व्यक्तीला मुळ गावापासून टाटा हॉस्पिटल पर्यंत एस.टी. प्रवास मोफत असल्याचे एक सवलतपत्र माझ्यापुढे धरले. माझ्यामुळे तुझे तिकिटाचे पैसे वाचतील त्यातील थोडे म्हणजे ४० रुपये तू मला दे. टॅक्सिवाला फुकटात थोडाच नेणार आहे मला? आजोबा म्हणाले.
आता मला माझ्या मोफत प्रवासाचे गुपित उलगडले.मी एकटा आहे हे आजोबांनी (धूर्त) हेरले होते. मी सहज नकार देवू शकणार नाही सोपी शिकार आहे असेही वाटू शकले असेल. मी ह्या आमीषाला बळी पडलो तर एक प्रकारे मी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले असे होइल. घरातून झालेल्या संस्काराचा अवमान केल्यासरखे होइल. कंडक्टर जवळ आला मी एक ठाण्याचे तिकिट काढले. ठाण्याचा का तू? म्हणुनच असा वेडेपणा केलास तू. आजोबांनी संतापाने मला टोमणा मारला. मी उठलो व बाजूच्या प्रवाशाला बसायला जागा दिली. त्या जागेवर बसण्याचा मला काहीही नैतिक अधिकार नव्हता.बाजूच्या प्रवाशांच्या नजरेतून ते मला जाणवत होते. थोड्याच वेळेपूर्वी ज्या वक्तीबद्दल मला आदर व सहनुभूती होती ती आता पुर्णपणे नष्ट पावली होती.
कदाचीत मोफत उपचारांमुळे आजोबांना आजाराचे गांभिर्य समजले नसेल नाहीतर एक शिक्षक असूनही ते जर कॅन्सरसारख्या आजारातही लोभीपणा सोडू शकत नसतील व उलट भ्रष्टाचाराला जन्म देत असतील तर भावी पिढीला ते नक्किच चुकीचा संदेश देत आहेत.
प्रतिक्रिया
18 Mar 2015 - 8:47 pm | पैसा
इतक्या साध्या गोष्टीतही भ्रष्टाचार आणि तोही एका माजी शिक्षकाने करावा? :(
18 Mar 2015 - 9:09 pm | तिमा
सर्व भ्रष्ट लोकांना कॅन्सर होत नाही, हेच दु:ख आहे.
19 Mar 2015 - 11:16 am | नेत्रेश
कदाचित चांगले वागुन पण कँसर झाला म्हणुन आता ते भ्रष्टाचार करत असतील.
18 Mar 2015 - 9:30 pm | रेवती
कठीण आहे! तुम्हाला त्या वयात धक्का बसला असणार, वाईट वाटले असणार. प्रवास खरेच खूप काही शिकवून जातो हे दरवेळी सिद्ध होते.
18 Mar 2015 - 10:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
:(
18 Mar 2015 - 10:08 pm | जानु
काय टंकावे? ........
18 Mar 2015 - 11:37 pm | पॉइंट ब्लँक
समजा जर त्यांनी तुमच्या़कडे पैसे मागितले नसते तर तुम्ही स्वखर्चाने तिकिट काढले असते का? किंवा तुमची जाग सोडली असती का?
कदाचित नाही.
मॉरल हायग्राऊंड घेण्यात जी नशा आहे त्याला तोड नाही. आणि आपल्यापैकी बहुतांश ह्याला बळी पडतात.
19 Mar 2015 - 12:10 pm | प्रदीप
हेच म्हणायला आलो होतो.
स्वातंत्र्यसैनिकास स्वतःबरोबर एका व्यक्तिस विनाशुल्क नेण्याची मुभा असते, हे लेखकास माहिती आहे, तेव्हा त्यामागील कारणही माहिती असावे (ते हे की, ही व्यक्ति सदर वयोव्रुद्ध व्यक्तिचा सांभाळ करण्यासाठी तीजबरोबर जात आहे, तेव्हा तिचा प्रवास मोफत असावा).
जोंवर त्या वृद्धाने लेखकाकडे पैसे मागितले नाहीत, तोंवर त्याला ह्या सवलतीचा गैरवापर करण्यात हरकत नव्हती. उलट त्याला अगदी 'लॉटरीच लागल्याचा आनंद झाला होता'. नैतिकतेची आठवण वृद्धाने 'मांडवळ' केली तेव्हाच झाली.
मॉरल हायग्राऊंड घेण्यात जी नशा आहे त्याला तोड नाही.
माह्या मते 'सिलेक्टीव्ह नैतिकता' हा खास मध्यमवर्गीय रोग आहे.
19 Mar 2015 - 12:35 pm | असंका
नशेमे कौन नही है मुझे बताओ जरा | :-))
उंच उडणार्या पतंगाला जमिनीवर आणण्यातही थोडाफार नशा असेलच की. ;-)
19 Mar 2015 - 1:09 pm | मृत्युन्जय
नैतिक मुद्द्यांवर लेखकाचे म्हणणे बरोबरच आहे. मात्र त्या वृद्धालाही मी लगेच भ्रष्टाचारी संधीसाधू माणसांच्या रांगेत नाही उभे करणार. पोटाचा कॅन्सर. एवढे अवघड दुखणे. प्रवास मोफत असला तरी औषधोपचार, हॉस्पिटलचा खर्च, डॉक्टरची फी, त्या अनुषंगाने येणार्या इतर आजारांचा व्याधींचा खर्च हे बघता ते गृहस्थ पै न पै वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्यांच्याविषयी सहानूभूती आहे. एका तिकिटाचे पैसे वाचले म्हणुन जर आपल्याला लॉटरी लागल्यासारखे वाटत असेल तर इतक्या अवघड आजारात, इतक्क्या वेदना सहन करणार्या आणि पाण्यासारखा पैसा कर्च करावा लागणार्या माणसाचा थोडे पैसे वाचविण्याचा विचार मला अनैतिक वाटण्याऐवजी करुण वाटला.
त्या सद्ग्रुहस्थांवर योग्य ते उपचार होउन ते ठीक झाले असावीत अशी आशा आहे.
19 Mar 2015 - 1:43 pm | प्रकाश घाटपांडे
+१
19 Mar 2015 - 2:15 pm | मराठी_माणूस
सहमत. तसेच त्यांनी कायद्याचे उल्लंघन केलेले दिसत नाही.
बरोबर , ही त्यांची आर्थिक अगतिकता असु शकते
19 Mar 2015 - 7:15 pm | आदूबाळ
+१ अगदी खरं आहे.
19 Mar 2015 - 8:45 pm | आजानुकर्ण
खरंय. समोरच्या व्यक्तीची एकंदर परिस्थती माहीत नसताना जजमेंटल होऊन न्यायनिवाडा करणे पटत नाही. (शिवाय आजोबा तिकीट स्पॉन्सर करत होते तेव्हा लेखकाला आनंद झालाच होता की!)
20 Mar 2015 - 2:36 pm | बॅटमॅन
सहमत.
19 Mar 2015 - 10:33 pm | पिवळा डांबिस
सहमत आहे.
यात करूणा जास्त वाटली.
19 Mar 2015 - 1:26 pm | सुबोध खरे
सिलेक्टीव्ह नैतिकता' हा खास मध्यमवर्गीय रोग आहे.हे मान्य नाही. हे उच्च वर्गातही दिसते किंवा निम्न वर्गातही दिसते. हेच तिकीट ४०० रुपये असते तर असे मॉरल हायग्राऊंड घेतले असते का हाही एक प्रश्न आहे. शेवटी माणूस हा स्वार्थीच असतो. पण फार किंमत द्यायला लागत नसेल तर नैतिकतेचे अधिष्ठान घ्यायला पुढे येतो. त्यामुळेच काही धंदेवाईक लोक म्हणतात कि प्रत्येक माणूस विकाऊ आहे फक्त किमतीत फरक असतो ते बहुतांशी खरे आहे असे वाटते.
19 Mar 2015 - 3:06 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
धाग्याचे शीर्षक अगदी मार्मिक आहे रे मार्मिका.वर ईतर तज्ञांनी म्हंटल्याप्रमाणे आपण ,विशेष करून मराठी माणसे नको तेथे नैतिकता दाखवून स्वतःचेच नुकसान करून घेत असतो.करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्या,भाषेचे,धर्माचे,जातीचे राजकारण करणार्या पुढार्यांबद्दल आपण ब्र काढायला दचकतो व ४०-५० रुपयांच्या केसबद्दल तावातावाने चर्चा करतो.
19 Mar 2015 - 6:00 pm | hitesh
कायद्याच्या व नैतिकतेच्या चौकटीतच घडत होते.
19 Mar 2015 - 6:41 pm | मार्मिक गोडसे
कायद्याच्या व नैतिकतेच्या चौकटीतच घडत होते.
म्हणजे मी कायदा मोडला तर? काय शिक्षा होणार मला वकिल साहेब?
19 Mar 2015 - 6:23 pm | सुबोध खरे
नैतिकतेच्या चौकटीतच ??
19 Mar 2015 - 6:36 pm | मार्मिक गोडसे
@मृत्युन्जय व मराठी माणूस
प्रतिसाद देण्यापूर्वी लेख जरा नीट वाचा. वाचायचा फारच कंटाळा आला असेल तर लेखाच्या शेवटचे वाक्य वाचले तरी चालेल.
कदाचीत मोफत उपचारांमुळे आजोबांना आजाराचे गांभिर्य समजले नसेल नाहीतर एक शिक्षक असूनही ते जर कॅन्सरसारख्या आजारातही लोभीपणा सोडू शकत नसतील व उलट भ्रष्टाचाराला जन्म देत असतील तर भावी पिढीला ते नक्किच चुकीचा संदेश देत आहेत.
19 Mar 2015 - 7:00 pm | रुस्तम
लबाड कुठला …
19 Mar 2015 - 9:27 pm | मराठी_माणूस
ह्यात भ्रष्टाचार कोणता ?
20 Mar 2015 - 12:34 pm | मार्मिक गोडसे
मला तर लॉटरीच लागली असे वाटले.
सुट्टीतील मजेपासून गाडीत जागा मिळेपर्यंत कोणतीच गोष्ट मनासारखी होत नसताना अचानक इतर सारे प्रवासी सोडून एक अनोळखी व्यक्ती फक्त माझ्यासाठीच जागा पकडते काय व मोफतची ऑफर देते काय हे इतक्या वेगाने घडले की त्यावेळी क्षणभर मी गोंधळून गेलो होतो व खरोखरच मला लॉटरी लागल्यासारखे वाटले.
त्यावेळी पैसे कमवायचे माझे वय नव्हते किंवा मी पैसे कमावत नव्हतो. लॉटरी १० रुपयाची लागली काय किंवा करोडोची लागली काय जी काय लागली ती आपल्याला स्वीकारावी लागते. इथे आजोबांची ऑफर स्वीकारुनही माझे ५० एक रुपये वाचत होते. त्या वयात ५० एक रु. म्ह्णजे खूपच झाले. तरीही मी ती ऑफर नाकारली ह्यातच सगळे काही आले. समजा मी कंडक्टरच्या तपासणीनंतर आजोबांना पैसे न देण्याचा भामटेपणा केला असता तर ?
आजोबा एका खेड्यात जि.प. च्या शाळेत मुख्याध्यापक होते. गावी बर्यापैकी जमीन आहे. निवृत्तीनंतर शेतीत लक्ष घालू लागले. दोन मुले म.रा.वि.म मध्ये इंजिनिअर आहेत. एक मुलगा बी.एस्सी. अॅग्री. शेती करतो व एका साखर कारखान्याच्या बॉडीवर कुठल्याश्या मोठ्या पदावर आहे. हे सर्व ते मोठ्या अभिमानाने सांगत होते.
जि.प. च्या निवृत्त शि़क्षकाला पेंशन नक्किच मिळत असणार. म्हणजे त्यांची आर्थिक बाजु कमकूवत नव्हती.
मुले सांभाळत नाही असे एकदाही आजोबांच्या बोलण्यातून जाणवले नाही. सोबत कोणाला का घेतले नाही ह्या माझ्या प्रश्नाचा आजोबांना राग आल्याचे मला जाणवले. खरतर सोबतीला कोणी घेतले असते तर वरच्या कमाईला आजोबा मुकले असते.
बरोबर , ही त्यांची आर्थिक अगतिकता असु शकते
ह्या न्यायाने एखाद्या शिपायापासून तर अधिकार्यापर्यंत एखाद्याने लाच मागितली तर ती त्याची आर्थिक अगतिकता समजून त्याला माफ कारवे का?
सीमेवरील जवानांनी आर्थिक अगतिकतीच्या नावाखाली शत्रुदेशाकडून पैसे घेवून अतीरेक्यांना आपल्या देशात घुसखोरी करून दिली, तस्करीकडे दुर्लक्ष केले तर त्याच्या कृतीचे आपण समर्थन करनार का? असे शि़क्षक आणी त्यांच्या कृतीचे समर्थक ह्या देशात असतील तर तो दिवसही फार दूर नाही.
20 Mar 2015 - 2:11 pm | hitesh
तरुण धडधाकट माणसाने २०० रु वाचवले तर ती त्याला लागलेली लॉटरी.
पण क्यान्सरच्या म्हातार्याने ४० रु कमावले तर तो लोभ !
वा वा !
..( मी क्यान्सरच्या हास्पिटलातच डॉक्टरकी करतो.)
20 Mar 2015 - 3:27 pm | प्रदीप
तरीही मी ती ऑफर नाकारली ह्यातच सगळे काही आले
कमाल आहे! सुरूवातीसच तुम्ही ती ऑफर नाकारली नाहीत. आजोबांनी पैसे मागितल्यावर तुम्ही ती नाकारलीत, हे तुम्ही अजूनही अमान्य करताहात!
वर माझ्या प्रतिसादास उत्तर देतांना सुबोध खर्यांनी म्हटले आहे "काही धंदेवाईक लोक म्हणतात कि प्रत्येक माणूस विकाऊ आहे फक्त किमतीत फरक असतो ते बहुतांशी खरे आहे असे वाटते". हे अगदी बरोबर आहे. पण उच्च व निम्नवर्गांतील माणसे नैतिकतेचा बाऊ करत नाहीत, मध्यमवर्गीय तसे करतात (They wear morality on their sleeve)-- आणी ते कुठपर्यंत? जेव्हा ती दुसर्यांना लागू करायची आहे, तिथपर्यंत. स्वतःच्या संदर्भात मग ही माणसे बहुधा (स्वतःच्या शिक्षणाचा [गैर]वापर करून) काही चलाख तर्क पुढे करून पळवाटा शोधत असतात. वरील प्रतिसाद हा हेच अधोरेखित करतो. "समजा मी कंडक्टरच्या तपासणीनंतर आजोबांना पैसे न देण्याचा भामटेपणा केला असता तर ?"
20 Mar 2015 - 4:28 pm | मार्मिक गोडसे
माझ्या प्रतिसादात मी लॉटरीविषयी स्पष्ट लिहिले आहे.
एखाद्याची आर्थीक परिस्थीती चांगली असतानाही जर ती व्यक्ती सवलतीचा अशाप्रकारे गैरवापर करत असेल तर त्या कृतीस आपण काय म्हणाल?
20 Mar 2015 - 4:32 pm | प्रदीप
त्यांनी कुठे नैतिकतेचा बाऊ केला आहे, असे तुमच्या लेखात आलेले नाही. माझी टिका तुमच्या नैतिक अधिष्ठानाबद्दल आहे.
21 Mar 2015 - 10:42 am | hitesh
त्यांची परिस्थिती सधन होती आणि तुमची नव्हती हे कशावरुन खरे मानायचे ?
क्यान्सरचा खर्चच इतका प्रचंड असतो की एक नाही दोन पिढ्यांची कमाईही संपु शकते हे माहीत आहे का ?
21 Mar 2015 - 11:14 am | सुबोध खरे
हितेश राव
गावी बर्यापैकी जमीन आहे. निवृत्तीनंतर शेतीत लक्ष घालू लागले. दोन मुले म.रा.वि.म मध्ये इंजिनिअर आहेत. एक मुलगा बी.एस्सी. अॅग्री. शेती करतो व एका साखर कारखान्याच्या बॉडीवर कुठल्याश्या मोठ्या पदावर आहे. हे सर्व ते मोठ्या अभिमानाने सांगत होते.
मुलाच्या ओळखीमुळे अल्पभुधारक असल्याचा दाखला होता. ज्यामुळे त्यांचे ऑपरेशनपासून औषधौपचार मोफत मिळाले होते.
क्यान्सरच्या म्हातार्याने ४० रु कमावले तर तो लोभ.
आपण हे वाचले नाहीत असे वाटते.
आपण कॅन्सर हास्पिटलातच डॉक्टरकी करतो. तर आपल्याला हे माहितही असावे कि हि कोलोस्टोमी बैग लावलेली आहे अशी ब्याग लावून माणसे वर्षनुवर्षे कोणताहि उपचार न घेता (पाच वर्षे नुसते फोल्लो अप वर असतात) व्यवस्थित राहतात. मग असे असताना ४० रुपयासाठी त्या माणसाने असे करावे यावरून गोडसे म्हणतात त्यात तथ्य असावे हे स्पष्टच आहे.
एकदा एखाद्याला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले कि कोणतेही बेफाट आरोप करायला मोकळीक मिळाली असे असू नये.
20 Mar 2015 - 1:42 pm | मराठी_माणूस
वरील सर्व बेकायदेशीर तसेच देशद्रोही कृत्य आहे. तुम्ही वर्णन केलेली घटना त्याच कक्षेत येते असे तुम्हाला वाट्ते का ?
आजोबांची पुर्ण पार्श्वभुमी माहीत नसल्यामुळे ती आर्थीक अगतिकता असु शकेल असे म्हटले आहे
20 Mar 2015 - 11:13 pm | असंका
बघा किती फाटे फुटले. आपलं म्हणणं योग्यच आहे की एक शिक्षक असं कसं वागु शकतो! पण लोकांनी उलट आपल्यालाच आरोपीच्या पिंजर्यात उभं केलंय.
नेकी कर और दर्यामे डाल असं उगाच नाही म्हणत..
25 Mar 2015 - 3:30 pm | मार्मिक गोडसे
लेख नीट वाचून प्रतिसाद देणार्या सर्वांचे धन्यवाद.
लेखात आजोबांच्या आर्थीक स्थीतीचे वर्णन असतानाही बर्याच जणांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले व माझ्यावर मोरल हायग्राउंड चे आरोप केले. जे काय घडले ते माझ्यात व आजोबांमध्ये घडले होते त्यामुळे मी आजोबांची ऑफर नाकारून तिकीट काढून बाजूच्या ज्या प्रवाश्याला माझ्या (सॉरी) जागेवर बसायला दिले त्याला जर नेमके कारण माहीत नसेल तर मोरल हायग्राउंडचा प्रश्न येतो कुठे?
आजोबांची प्रत्येक कृती ही प्री प्लॅन होती. त्यांना प्रत्येका गोष्ट मोफत हवी होती. ह्या उलट माझी स्थीती सुरवातीला गोंधळलेल्या स्वरूपाची होती. वेळीच सावरल्यामुळे मनात अपराधी भावना राहीली नही. निदान माझ्या कृतीमुळे आजोबा ह्यापुढे असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही.
फुकटचे काहीही न घेण्याचे घरातून झालेले संस्कार वाया गेले नाही यातच मला आनंद आहे.
25 Mar 2015 - 6:06 pm | रुस्तम
अस होय...
31 Mar 2015 - 10:32 am | प्रकाश घाटपांडे
मार्मिक आपण नैतिकतेच्या नशेत जगत असला तरी आजोबांनीही जगाव अशी आपली अपेक्षा दिसते. आजोबांच वर्तन नैतिक निकषांवर योग्य नसेल ही पण क्षम्य आहे.कॅन्सर मुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्यावर ही परिणाम झाला असणारच ना!
31 Mar 2015 - 10:37 am | सुबोध खरे
घाटपांडे साहेब
कॅंसर पोटाचा होता. डोक्याचा नव्हे. उत्तम आर्थिक स्थिती असूनही आणि इलाज फुकट मिळूनही असे करणारा माणूस अगतिक नव्हे तर लोभी आढळतो आहे. ( दिलेल्या लेखावरून)
31 Mar 2015 - 10:48 am | प्रकाश घाटपांडे
वर मृत्युंजय यांची प्रतिक्रिया आपण वाचली असणार.
मन व शरीर यांचा संबंध हा मी आपणास सांगण्याची गरजच नाही. नैतिकतेच्या नशेत काही लोक एखादी गोष्ट क्षम्य मानायला पण तयार नसतात.
31 Mar 2015 - 10:57 am | सुबोध खरे
आजोबा एका खेड्यात जि.प. च्या शाळेत मुख्याध्यापक होते. गावी बर्यापैकी जमीन आहे. निवृत्तीनंतर शेतीत लक्ष घालू लागले. दोन मुले म.रा.वि.म मध्ये इंजिनिअर आहेत. एक मुलगा बी.एस्सी. अॅग्री. शेती करतो व एका साखर कारखान्याच्या बॉडीवर कुठल्याश्या मोठ्या पदावर आहे.त्यात उपचारांची अनेक कागदपत्रे होती त्याच बरोबर अनेक राजकीय व्यक्तिंची शिफरसपत्रे होती. मुलाच्या ओळखीमुळे अल्पभुधारक असल्याचा दाखला होता. ज्यामुळे त्यांचे ऑपरेशनपासून औषधौपचार मोफत मिळाले होते.
हे आपण वाचले नसावे किंवा मृत्युंजय यांनीही वाचले नाही का? पाण्यासारखा पैसा कर्च करावा लागणार्या माणसाचा थोडे पैसे वाचविण्याचा विचार मला अनैतिक वाटण्याऐवजी करुण वाटला.> असा प्रतिसाद लिहिला आहे म्हणून विचारतो आहे?
31 Mar 2015 - 11:13 am | प्रकाश घाटपांडे
हे सगळ वाचलेले आहेच.मला आजोबांच्या विचारामागे कारुण्याची छटा दिसते, कुणाला ती अनैतिकतेची दिसते. दृष्टीचा फरक.
मला आजोबांचे वर्तन योग्य नसले तरी क्षम्य वाटते कुणाला वाटत नाही. असो!
31 Mar 2015 - 2:47 pm | कपिलमुनी
9 Apr 2015 - 7:25 pm | नगरीनिरंजन
अशा क्षमाशील स्वभावाची जनता आहे म्हणूनच भ्रष्टाचार बोकाळला आहे. एखाद्या माणसाच्या चुकीच्या वागण्याला चुकीचे म्हणून त्यावर कडक शब्दात टीकाही करायची नाही का? असे करणे म्हणजे लगेच आजोबांना शिक्षा करणे नाहीय त्यामुळे त्यांना क्षमा करायची घाई नकोय. मुळात मला क्षम्य वाटते असे म्हणणे म्हणजे क्षमा करायचा अधिकार आपल्याकडे आहे अशी हायग्राउंड भूमिका घेणे नव्हे का?
भ्रष्टाचार्यांना किमान मोकळेपणी शिव्यातरी देऊ द्या की हो.
हेच जर सेक्सबद्दल काही असते तर एकजात सगळे तुटून पडले असते. इतर बाबतीतही तेवढीच कठोर नीतिमत्ता पाळली पाहिजे हे कधी वळणार आपल्याला?
31 Mar 2015 - 1:53 pm | मार्मिक गोडसे
@ प्रकाश घाटपांडे
मार्मिक आपण नैतिकतेच्या नशेत जगत असला तरी आजोबांनीही जगाव अशी आपली अपेक्षा दिसते.
एका शिक्षकाकडून (निवृत्त) अशी अपेक्षा करणे चूक आहे का? आणी हो,नैतीकततेची नशा नसते तर ते एक प्रकारचे ओझे असते त्यामुळे त्या व्यक्तीचे पाय नेहमीच जमिनीवर राहतात.
मला आजोबांच्या विचारामागे कारुण्याची छटा दिसते
एखाद्या व्यक्तीच्या राहणीमानावरून, बोलण्यातून व देहबोलीतून आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव, आर्थिक स्थीती, हेतू ई.गोष्टींचा अंदाज येतो. जसे ती व्यक्ती मला गरिब (स्वभावाने/आर्थिकतेने) किंवा लबाड वाटली (स्वभावाने/व्यवहाराने) असे म्हणतो व त्याप्रमाणे त्या व्यक्तीशी वागतो. उदा. एखाद्या भिकार्याला भीक देण्यापुर्वी आपण त्या व्यक्तीचे राहणीमान,वय व शारीरिक स्थीतीचा अंदाज घेतो व निर्णय घेतो. त्यापमाणे मला आजोबांच्या आर्थिक परिस्थीतीचा व हेतूचा अंदाज आला होता. परंतू ते योग्य शब्दात मांडायचे कौशल्य माझ्यात नसल्यामुळे काही वाचकांना आजोबांच्या आर्थिक परिस्थीतीचा, औषधौपचारांचा व स्वभावाचा अंदाज आला नाही.
उदा.१) आजोबा एका खेड्यात जि.प. च्या शाळेत मुख्याध्यापक होते. गावी बर्यापैकी जमीन आहे. निवृत्तीनंतर शेतीत लक्ष घालू लागले. दोन मुले म.रा.वि.म मध्ये इंजिनिअर आहेत. एक मुलगा बी.एस्सी. अॅग्री. शेती करतो व एका साखर कारखान्याच्या बॉडीवर कुठल्याश्या मोठ्या पदावर आहे. हे सर्व ते मोठ्या अभिमानाने सांगत होते.
फक्त आणी फक्त गरीबीचे वर्णन.
>२)टॅक्सिवाला फुकटात थोडाच नेणार आहे मला?
अजेंडा शतप्रतिशत मोफतचा.
>३)मला काय गरज कोणाला सोबतीला घ्यायची. मी ठणठणीत आहे, मला कोणाच्या आधाराची गरज नाही, थोड्या घुश्यातच आजोबा गरजले
४)ठाण्याचा का तू? म्हणुनच असा वेडेपणा केलास तू. आजोबांनी संतापाने मला टोमणा मारला.
ह्याला कारुण्य म्हणतात हे मला ठाऊकच नव्हते.
31 Mar 2015 - 2:17 pm | प्रकाश घाटपांडे
माझा मुख्य मुद्दा एवढाच होता की आजोबांचे वर्तन योग्य नसले तरी क्षम्य आहे. आजारामुळे त्यांना द्यावी लागलेली/लागणारी शारिरिक, आर्थिक, मानसिक पातळीवरील किंमत पहाता जगण्याच्या लढ्यासाठी स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात केलेले ते वर्तन असते.आपल्याला (त्यात मी ही आलोच) त्याच्या सहअनुभूतीची बाब कदाचित जाणवणार नाही.
बाकी देहबोलीतुन आपल्याला जे जाणवले त्याबद्दल माझे काहीच म्हणणे नाही.
31 Mar 2015 - 2:48 pm | कपिलमुनी
डॉक्टरांकडून , आयटी वाल्यांकडून , रि़क्षावाल्यांकडून , शिक्षकांकडून .. भलत्याच अपेक्षा बॉ!
31 Mar 2015 - 2:39 pm | मार्मिक गोडसे
आजारामुळे त्यांना द्यावी लागलेली/लागणारी शारिरिक, आर्थिक, मानसिक पातळीवरील किंमत पहाता
बाकी ओके.
31 Mar 2015 - 5:19 pm | प्रकाश घाटपांडे
आजारपणात इलाजासाठी येणार खर्च हा रुग्णाची आर्थिक परिस्थिती उत्तम असली तरी आर्थिक बाबच आहे.
1 Apr 2015 - 12:15 am | मार्मिक गोडसे
@प्रकाश घाटपांडे
आजारपणात इलाजासाठी येणार खर्च हा रुग्णाची आर्थिक परिस्थिती उत्तम असली तरी आर्थिक बाबच आहे
कॉपी पेस्ट फक्त तुमच्यासाठी
त्यात उपचारांची अनेक कागदपत्रे होती त्याच बरोबर अनेक राजकीय व्यक्तिंची शिफरसपत्रे होती. मुलाच्या ओळखीमुळे अल्पभुधारक असल्याचा दाखला होता. ज्यामुळे त्यांचे ऑपरेशनपासून औषधौपचार मोफत मिळाले होते
कॅन्सरचा रुग्ण असल्यामुळे रुग्णाबरोबर एका व्यक्तीला मुळ गावापासून टाटा हॉस्पिटल पर्यंत एस.टी. प्रवास मोफत असल्याचे एक सवलतपत्र माझ्यापुढे धरले
31 Mar 2015 - 3:12 pm | हाडक्या
मार्मिकजी, आपण त्या आजोबांचा कँसर बाजूस ठेवू व त्यांची कृती, नैतिकताही बाजूस ठेवू आणि असे गृहित धरु की ते स्वातंत्र्यसैनिक होते तुम्ही विचार केलात तसे ( गेल्या ५ वर्षातली घटना आहे असे समजू अन्यथा आता स्वा.सै. दुर्मिळ झालेत त्यांच्या वयामुळे).
आता,
१. अजूनही तुम्हाला तुमच्या कृतीबद्दल "वेळीच सावरल्यामुळे मनात अपराधी भावना राहीली नही" असे म्हणावेसे वाटते काय ?
२. स्वातंत्र्य -सैनिकाबरोबर एक जणास जी सवलत असते ती ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना आधार म्हणून असते (कोणी साठीच्या आतला स्वातंत्र्यसैनिक भेटल्यास सांगा मला तसे. ) त्यामुळे परत तुमच्या कृतीबद्दलच तुमचे मत जाणून घ्ययला आवडेल.
३.
इतर लोक जे तिथे उभे होते त्यांच्यामध्ये वयस्कर एखादा/दी तरी असेल मग कोणी तिर्हाईताने तुमची जागा पकडली म्हणून तुम्हाला तिथे बसण्याचा नैतिक अधिकार होता का ? त्यांच्यापैकी गरजू अशा कोणास जे तुमच्या आधी त्या जागेजवळ उभे होते त्यांनाही जागा देऊ केली असतीत तर ? त्याऐवजी तुम्हास जे सुखावलेपण वाटले त्यावर नक्कीच विचार व्हावा.
४. मला तर लॉटरीच लागली असे वाटले. हे तुमच्या मनातले सहज विचार आहेत त्यामुळे तुम्ही नाकारु नका अथवा स्पष्टीकरण देत बसू नका. हे चूक आहे आणि आजोबांच्या अथवा इतर कोणाच्या कृतीने ते बरोबर होत नाही.
फुकटचे काहीही न घेण्याचे घरातून झालेले संस्कार वाया गेले नाही यातच मला आनंद आहे. संस्कार आहेतच हो कारण तुम्ही शांतपणे इथे चर्चा करताय पण सुधारणेस जागा आहे हे तरी समजून घ्या.
इथे हा आनंद तुम्हीच ठरवलाय आणि तो हिरावून घेण्याची इच्छा नाही पण तुमचे वय कमी वाटतेय म्हणून तुम्हाला तुमच्याच कृतीबद्दल एक फेरविचार करावा असे सुचवतोय.
उगीच स्वतःची पाठ परत परत स्वतःच थोपटून घेताय, एकदा तुमच्या कृतीबद्दल विचार तरी करा ना. भले इथे नका मांडू पण स्वतःशी तरी प्रामाणिकपणे पडताळणी करा.
31 Mar 2015 - 4:47 pm | मार्मिक गोडसे
लोकल ट्रेन मध्ये चढताना आपण एक गर्दीचा भाग होउन आजुबाजुच्या प्रवाशांचे वय न बघता कशीबशी जागा पकडतो, थोडे स्थिरावल्यावर आजूबाजूला एखादी वयस्कर व्यक्ती असल्यास आपण तीला बसायला देतो. खरे तर आपण वयस्करांना गाडीत चढण्यास प्राधान्य दिले पाहीजे मग पुढचा मुर्खपणा टाळता येइल.
संस्कार आहेतच हो कारण तुम्ही शांतपणे इथे चर्चा करताय पण सुधारणेस जागा आहे हे तरी समजून घ्या.
अवश्य अवश्य.
( गेल्या ५ वर्षातली घटना आहे असे समजू अन्यथा आता स्वा.सै. दुर्मिळ झालेत त्यांच्या वयामुळे).
http://www.dnaindia.com/india/report-4695-freedom-fighters-are-fake-1009654
कसे पैदास होतात कुणास ठाऊक ? जाऊदे लहान तोंडी मोठा घास.
31 Mar 2015 - 5:09 pm | हाडक्या
मुद्द क्र. १, २, ३ मध्ये प्रश्न आहेत. उत्तरे जमल्यास लिहावे. मुद्द क्र. ४ मध्ये चूक कबूल करा असेही म्हटले आहे त्याकडेही लक्ष द्यावे.
उत्तर द्याच असे म्हटले नाही पण यातल्या एकाही प्रश्नाबद्दल न बोलता तुम्हास दुर्मिळ न होणार्या स्वा.सै. बद्दल प्रश्न निर्माण झालाय त्याला काय म्हणावे (ते अर्थातच अगदीच अवांतर, पण तरीही.).
31 Mar 2015 - 7:10 pm | असंका
अहो कुठे नेताय विषयाला? त्यांच्या मनात आलेल्या भावनेसाठी पण तुम्ही धारेवर धरायला निघालात का आता? म्हणजे एक माणुस ज्याला कॅन्सर झालाय, त्याने काहीही केलं तरी क्षम्य (!) पण लेखकाच्या मनात हे असं आलंच कसं म्हणून आता त्याला जाब विचारणं चालू आहे....!! जरा फॅक्टस मांडून बघा तरी किती कहर हास्यास्पद प्रकार चालू झालाय इथे ते.
दुसर्या पद्धतीने बघू या-
क्षः माझ्या मनात आहे की मी जगातली सगळ्यात मोठी कंपनी काढावी...पण मी काहीच करत नाही.
यः मला बसून रहायला आवडतं ...पण मी दिवसरात्र काम करून एक छोटी कंपनी चालवतो.
यातल्या 'क्ष' ला तुम्ही दोष देताल की 'य' ला?
अहो केलं काय ते बघा ना....कृती मग ती कितीही लहान असो, जास्त महत्त्वाची असते.
31 Mar 2015 - 7:16 pm | सुबोध खरे
+११११
31 Mar 2015 - 7:44 pm | हाडक्या
ऑ ? कुठे नेला विषय ? तो आहे तिथेच आहे.
आपण त्या आजोबांचा कँसर बाजूस ठेवू व त्यांची कृती, नैतिकताही बाजूस ठेवू आणि असे गृहित धरु आणि मग नैतिकता या समान धाग्याबद्दल प्रश्न विचारलेत. त्यात गैर ते काय ? त्यांना विचार तरी करु द्या ना त्यांची पण काय चूक झालीय त्याबद्दलच, की संयतपणे देखील त्याबद्दल बोलायचे नाहीच ?
तुम्हाला जाब वाटला तिथेच प्रॉब्लेम आहे. त्यांनी जसा विचार केला असा विचार करणे तुम्हाला गैर वाटत नाहिच्चे. तुम्हीपण त्या उपनिर्दिष्ट मुद्द्यांबद्दल फक्त विचार केलात तरी चालेल.
उदाहरण इथे कसं लागू होतं ते कळालं नाही. काही (बादरायण) संबंध (असलाच तर) विस्कटून सांगावा.
लेखकाबद्दल प्रश्न उपस्थित करु नयेत असे लेखक देखील म्हणत नाही मग तुम्हाला काय बोचलेय ते कळत नाही. आणि हे अवांतर मुळीच नाही.
साधारणतः वयस्कर लोकांना काही सांगून फारसा उपयोग होत नाही असा अनुभव आहे. इथे लेखक वयाने आमच्या आसपास किंवा लहानच आहे असे दिसतेय, तसे असेल तर त्याला त्याच्या विचार करण्यातली चूक वाटलेली (वाटलेली असे म्हटले आहे, असलेली नव्हे!) गोष्ट नमूद करून विचार करायला सांगितलंय तर तुम्ही "कहर" वगैरे म्हणायचा काय संबंध ?
31 Mar 2015 - 8:18 pm | असंका
इथे हशा. पुणेरी मराठीत पहिल्या तीन वाक्यात हशा घेतला नाही तर तो फाऊल समजतात...तुमचा हशा मिळवलात! अभिनंदन.
चुक झालीच नाही. मनात हजार विचार येतात अन जातात. त्यावरून माणसाला दोषी ठरवणे हे भोळसटपणाचे आहे. शेवटी त्यातल्या कुठल्या विचारावर तो कृती करतो हेच महत्त्वाचे.
परवानगीबद्दल धन्यवाद.
हे शेवटचे वाक्यच फक्त सेन्सिबल आहे. बाकी सगळी वाक्ये काहीतरी प्रतिसाद यावा म्हणून मुद्दामच अर्धवट प्रकारे आणि चुकीची बनवली आहेत. त्याला माझा पास.
'बादरायण' आणि 'असलाच तर' हे शब्द कंसात घातले आहेत. ते प्रश्नाचा भाग आहेत की नाहीत हे आधी विस्कटून किंवा न विस्कटता कसेही - पण समजेल अशा साध्या सोप्या भाषेत सांगावे.
आपल्याला काय कळत नाही हे वेळीच कळले म्हणजे अनेक फायदे असतात. त्या फायद्यांचा आता आपल्याला नक्कीच लाभ होइल.
साधारणतः हे नक्की कशाचे विशेषण आहे? वयस्कर चे? की अनुभवाचे? काय ते नक्की सांगावे. दोन्हीपैकी काहीही असेल तरी ही नक्कीच फार रोचक अशी माहिती असेल...
आपल्याला कंसात का लिहावेसे वाटते? मुळात ही गोष्ट तशी नसून अशी आहे हे तरी का सांगावेसे वाटले असेल?
दुसर्याच्या चुका काढण्यात ते कायसंसं मॉरल हाय ग्राउंड नसतं का?
त्यांना विचार करायला सांगताना आपला त्यांच्याशी होता तोच...! दुसरा कुठला?
31 Mar 2015 - 9:27 pm | हाडक्या
बाब्बौ.. चांगलंच झोंबलेलं दिसतंय की हो तुम्हाला.. :)))
मुद्दे सोडून बराच फापट-पसारा उगी मांडलाय राव तुम्ही. असो.
मूळ प्रतिसाद मार्मिक यांना होता, त्यांना पटले तर ते विचार करतील, नाही पटले तर सोडून देतील.
किमान विचार करा म्हणण्यालाही इतका तीव्र विरोध असेल तर मग असोच.
तुम्ही तुम्हाला पटेल ते करा काहीच पटले नाही तर काहीच करु नका (तुम्हाला पटेल ते करा अथवा करु नका म्हटले तरी झोंबायचे नै तर..).
कुठल्याही अभिनिवेशाशिवाय चर्चा तुम्हास शक्य नाहीसे या प्रतिसादावरून दिसतेय (तशी सरांची आठवण आलीच पण तुमच्या भावना दुखवू नयेत म्हणून तुलना करीत नाही इतकेच) अशीही तुमच्याशी चर्चा सुरु नव्हतीच, तेव्हा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा .. :)
1 Apr 2015 - 12:40 am | मार्मिक गोडसे
(कोणी साठीच्या आतला स्वातंत्र्यसैनिक भेटल्यास सांगा मला तसे. )
माझ्याकडे कसले आलेय स्वा.सै.चे वयानुसार रेकॉर्ड ? त्यामुळे मी ती लिंक दिली. वाटले सापडतील तेथे तुम्हाला अपेक्षीत वयाचे स्वा.सै. ह्यात गैर काय केले?
1 Apr 2015 - 4:10 pm | हाडक्या
याला जोक म्हणायचा का हो मार्मिक ? म्हंजे बघा हं, भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झालीत, ६५ पेक्षा जास्त झालीत की नै ?? आणि तुमचा प्रसंग नक्की कधीचा आहे ते माहीत नाही म्हणून या ५ वर्षातील आहे असे गृहित धरलेय ना?
मग (कोणी साठीच्या आतला स्वातंत्र्यसैनिक भेटल्यास सांगा मला तसे. ) यातला उपरोध लक्षात घ्या ना. हे असं काय करताय ? आणि हा काय महत्त्वाचा मुद्दा नाहीय असे सांगून पण त्याबद्दल कशाला इतकी चर्चा. असो. पटले ते घ्या बाकी सोडा..
1 Apr 2015 - 4:30 pm | मार्मिक गोडसे
. पटले ते घ्या बाकी सोडा..
हेच तुम्हालाही लागू होते.
1 Apr 2015 - 8:23 pm | संदीप डांगे
१. बर्याच खटपटी-लटपटी करून कायदेशीरपणे पण अनैतिकतेने कर वाचवणारे हे भ्रष्टाचारी असतात की नसतात.?
२. सार्वजनिक वाहतूक उपलब्ध असतांना खाजगी वाहनाचा वापर करणे सुविधाजनक आहे की पेट्रोलची उधळपट्टी?
३. बायकोच्या नावावर घर घेऊन कसला तरी आर्थिक फायदा होतो म्हणतात. त्याचं काय?
४. गॅस-सिलेंडरची सबसिडी घेणारे भ्रष्टाचारी की गरीब?
५. पावतीशिवाय वस्तू घेऊन पैसे वाचवणे कायदेशीर गुन्हा आहे की बचतीची वृत्ती?
६. खोटी बिले सादर करून एलटीए ढापणे हुशारी कि गुन्हेगारी?
८. ठार स्वार्थी समाजात शिक्षक, डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी, सरकारी नोकर ह्यांनीच प्रामाणिकतेचे पुतळे असावे अशी अवास्तव अपेक्षा कशासाठी?
९. नैतिकतेची अधिकृत कायदेशीर व्याख्या कुठे मिळेल?
१०. "अमुक असून त्याने 'असे' वागावे म्हणजे काय?" या वाक्यामागे असा अर्थ आहे का की अमुक नसणारांना कसेही वागण्याची मुभा किंवा सवलत आहे?
1 Apr 2015 - 8:38 pm | प्रकाश घाटपांडे
थोडक्यात एखादी गोष्ट कायदेशीर आहे म्ह्णुन नैतिक आहे व एखादी गोष्ट बेकायदेशीर आहे म्हणुन अनैतिक आहे असे म्हणता येत नाही. यात नैतिकता ही स्थल काल व्यक्ति समाज सापेक्ष आहे हे गृहीत आहेच.
1 Apr 2015 - 9:54 pm | संदीप डांगे
अगदी बरोबर. त्यामुळेच त्यावर चर्चेची शेती फुलवणारांना रान हिरवंगार दिसत असलं तरी पीक येत नाही याचा विसर पडतो.
6 Apr 2015 - 11:20 am | प्रकाश घाटपांडे
अगदी अगदी!
8 Apr 2015 - 2:38 pm | प्रसाद१९७१
घाटपांडे काका - नैतिकता ही बर्यापैकी स्थिर असते म्हणजे सापेक्षता कमी असते. पण कायदेशीरपणा हा मात्र नैतिकते पेक्षा फार जास्त सापेक्ष आहे.
7 Apr 2015 - 8:19 pm | मार्मिक गोडसे
एखादे उदाहरण दिले असते तर बरे झाले असते. असे करणार्यांमुळेच कायद्यातील त्रुटी समजतात व संबंधित कायद्यात सुधारणा करण्यास मदत होते. सी.ए. व वकील ह्यांच्या व्यवसायाचा हा भाग आहे.
ह्या प्रश्नाचा धाग्याच्या विषयाशी काही संबंध ? तरीही उत्तर देतो. इंधन म्हणा, फक्त पेट्रोल म्हणल्यास बाईकवाले नाराज होतील. मुंबईतील तुडुंब भरलेल्या लोकल व बेस्ट बसेस कशाचे द्दोतक आहेत?
आर्थिक तोटा होत नसेल कशाला काळजी करता?
ह्या ज्वलंत व गुंतागुंतीच्या प्रश्नावर एक मोठा लेख होइल. ह्या विषयावर धागा काढा तेथे प्रतिसादातून योग्य ते उत्तर दिले जाईल.
गुन्हाच आहे.
खोटी बिले कशी तयार करतात ? ह्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर केला जातो का?
लहानपणापासून आपल्यावर सर्वाधीक काळ आई,वडील व शिक्षक हेच संस्कार करत असतात. तेच आपले आदर्श असतात. 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' अशी शिकवण देणार्याचे पायच मातीचे निघाल्यास धक्का बसणे साहजिकच आहे.
लोकप्रतिनिधी व सरकारी नोकरांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळतो तो आपल्या कररूपी गोळा झालेल्या पैशातून. असे असताना त्यांच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा का करू नये ? तुम्हीतरी तुमच्या घरी किंवा दूकानात अप्रामाणिक नोकर ठेवाल का?
अहो चराचरात स्वार्थीपणा आहे त्यामुळेच जीवन सुरळीत चालू आहे. स्वार्थी व प्रामाणिकतेत गल्लत करत आहात तुम्ही.
आई वडील बहीण भाऊ ह्यांच्याशी आपले सबंध नैतिकतेवर आधारित असतात त्याठी कायदा करावा लागत नाही.परंतू जेथे समाज नैतिकतेची बंधने झुगारतो तेव्हा त्याला अशी कृती करण्यापासून रोखण्यासाठी कायदा करावा लागतो. उदा. चोरी करणे.
एखाद्या गुन्ह्याची तिव्रता ही गुन्हेगाराच्या नैतिक अधःपतनावर अवलंबून असते आणी हे ठरविण्याचा अधिकार कोर्टाला असतो. नैतिकतेचे मोजमाप प्रत्येक कोर्टात वेगवेगळे आढळते. त्यामुळे नैतिकतेची अधिकृत कायदेशीर व्याख्या कुठेही मिळनार नाही.
ज्या पेशाला/व्यक्तीला समाजात आदर असतो अशांकडूनच नैतिकतेची अपेक्षा केली जाते, चोर दरोडेखोरांकडून नाही.
8 Apr 2015 - 12:14 am | संदीप डांगे
स्वार्थी व प्रामाणिकतेत गल्लत करत आहात तुम्ही.
>> हाच तर मुद्दा आहे राव सगळ्या प्रश्नांचा. स्वार्थ आणि प्रामाणिकपणा सोयीनुसार वापरल्या जातो 'खर्या जगात'. कुणी अप्रामाणिक वागू नये म्हणून नोकरीवर घ्यायच्या आधीच नोकरांशी हजार अटी असलेले करार केले जातात. ह्याचे कारण हेच आहे. त्यामुळे तुमची जी मुदलात गल्लत झाली आहे त्याकडे जरा विश्लेषण करून पहा.
एखाद्या गुन्ह्याची तिव्रता ही गुन्हेगाराच्या नैतिक अधःपतनावर अवलंबून असते आणी हे ठरविण्याचा अधिकार कोर्टाला असतो. नैतिकतेचे मोजमाप प्रत्येक कोर्टात वेगवेगळे आढळते. त्यामुळे नैतिकतेची अधिकृत कायदेशीर व्याख्या कुठेही मिळनार नाही.
>> यावर एखाद्या वकिल मिपाकराचा प्रतिसाद आल्यास बरे होईल. माझ्यामते एखाद्या गुन्ह्याची तिव्रता नैतिक अधःपतनावर अवलंबून नसून परिस्थितीजन्य पुरावे आणि त्याआधारे गुन्हेगाराच्या तत्कालिन मनस्थितीचे केले गेलेले विश्लेषण यावर शिक्षेची तिव्रता ठरवण्याचा अधिकार न्यायालयास असतो. त्यामुळे नैतिकतेचे अधिकृतच काय कुठलेच मोजमाप कुठल्याच कोर्टात असू शकत नाही.
ज्या पेशाला/व्यक्तीला समाजात आदर असतो अशांकडूनच नैतिकतेची अपेक्षा केली जाते, चोर दरोडेखोरांकडून नाही.
>> चोर दरोडेखोरांकडूनही नैतिकची अपेक्षा केली जाते साहेब. "न्यायचे तर सोने, पैसा ने पण आमचा जीव घेऊ नको" ही विनवणी दरोडेखोराच्या नैतिकतेलाच आवाहन आहे ना? मुळात जे अपेक्षा करतात इतरांकडून त्यांना स्वतःकडून झालेल्या अनैतिकतेची जराशीही जाणीव नसते. कारण नैतिकता सापेक्ष असते.
माझ्या प्रश्नांमधूनच मी तुमच्या लेखावर प्रतिक्रिया देण्याचा क्षीण प्रयत्न केला. पण आता जरा सविस्तर मांडतो.
ज्यांच्याकडे पाहून आपण नैतिकेचे धडे घेतो तेच असे अनैतिक वागले तर काय? असा तुमचा मूळ प्रश्न आहे. यात तुमचे समाजाचे निरिक्षण खरे तर कमी पडले असे म्हणावे लागेल. आपण कधीही धडे घेत नाही तर ते आपल्याला देण्याचे प्रयत्न केले जातात. आई-वडील-शिक्षकांकडून रोमँटीक असा आदर्शवाद आपल्या मनावर बिंबवला जातो. आता जे आदर्शवादाची शिकवण देतात त्यांच्यात खरेच काही आदर्श असते तर सगळे जग आदर्श दिसले असते. जर प्रत्येकाला आपले आई-वडील-शिक्षक आदर्श आहेत असे वाटते तर ते इतरांनाही अनुभवास यायला हवे. काही लोकांना हा आदर्शवाद किती पोकळ आहे हे खर्या जगाशी संबंध आल्यावर लगेच समजते. काहींना नाही समजत. याच आदर्शवाद शिकवलेल्यांमधून काही शिक्षक होतात आणि प्रत्येक जण आई-वडील होतो. आता जे प्रामाणिक नाहीत त्यांना त्यांच्या आई-वडील-शिक्षकांकडून असे काही धडे मिळतात का? तर नाही. प्रत्येक आई-वडील-शिक्षक आपल्या पाल्यांना-विद्यार्थ्यांना प्रामाणिकतेचे आदर्शाचेच धडे देत असतात. भले ते प्रत्यक्ष आयुष्यात आदर्श-प्रामाणिक असो वा नसो. तशी प्रतिमा मात्र पाल्य-विद्यार्थ्यांसमोर उभी करतात.
आपण जे खरे धडे घेतो ते प्रत्यक्ष जगतांना. माझा स्वार्थ कुठे पुर्ण होतो हाच कळीचा मुद्दा असतो प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आदर्शाची वाट उपयोगाची नाही हेही अनुभवानी लक्षात येते. प्रत्यक्ष आयुष्यातले अनुभव व्यक्तिमत्व घडवतात. ज्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे आणि लोकलाज झुगारून द्यायच्या क्षमतेप्रमाणे लोक खरे-खोटे काम करत पुढे जात असतात. यात कुणीच अपवाद नाही. शिक्षकही नाही, डॉक्टरही नाही. या सगळ्या आपल्या लहानपणीच्या कवीकल्पना आहेत. जसा बागुलबुवा नसतो तसेच हे कुणीही पूर्ण आदर्श नसतात.
आज शिक्षकांना प्रवेश मिळवण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी दणदणीत डोनेशन द्यावे लागतं. विद्यापिठात सुवर्ण मिळवणार्या माझ्या मित्राला प्राध्यापकाच्या नोकरीसाठी ७-८ लाख मागितले होते. एवढी पात्रता असतांना असा धडा मिळत असेल तर कोण कशाला प्रामाणिकतेचे-आदर्शाचे वृथा सोंग करत फिरेल? तत्वज्ञान आणि आदर्शवाद म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असं ठाम मत होत जातं.
आता त्या निवृत्त मुख्याध्यापकाचंच घ्या. बढती व्हावी, वेतनवाढ व्हावी, भत्ते मिळावे म्हणून त्यांच्याच विद्यार्थ्यांसारख्या सरकारी बाबूंनी त्याच्याकडून पैसे उकळले असणार. त्या बाबूंचे शिक्षक आदर्श नव्हते का? जेव्हा सगळा समाज स्वत:च्या स्वार्थासाठी अप्रामाणिकपणा करत असेल तर त्या समाजाला काही पेशांकडून नैतिकतेची अपेक्षा ठेवायचा नैतिक अधिकार आहे का?
असो,
इसी बातपें अजून काही नवीन प्रश्नः
हजारो मुले शाळेत शिकतात. इंजिनीअर, डॉक्टर व्हायला. थोडेसेच होतात. पण चोर कुठल्या शाळेत जातात? दारू प्यायला कुठे शिकवतात? पान्, गुटखा, सिगरेट तोंडी लावायला शिकवणारा कोणता शि़क्षक असतो?
शाळेत शिकवतात. रांगेचा फायदा सर्वांना. मग गर्दीच करायचे माहीत असलेले कुठल्या शाळेचे विद्यार्थी?
रांगेत उभे राहून लोकलचे टि़कीट काढणारे लोकलमधे शिरतांना गर्दी करतात तेव्हा पाच मिनिटापूर्वी आदर्शतेने वागणारे असंस्कृतासारखे का वागतात?
7 Apr 2015 - 8:37 pm | सुबोध खरे
६. खोटी बिले सादर करून एलटीए ढापणे हुशारी कि गुन्हेगारी?
एक उदाहरण -- एल टी ए( सुटीचा प्रवास भत्ता) चा हिशेब देण्यासाठी रेल्वे च्या तिकीटाची सत्यप्रत जोडणे आवश्यक असते. लोक तिकीट विकत घेतात त्याची सत्यप्रत काढतात आणि मग तिकीट रद्द करून त्याचे पैसे मिळवतात आणि खोटा एल टी ए चा क्लेम टाकतात. हि हुशारी नसून भुरटी चोरी आहे.
गॅस-सिलेंडरची सबसिडी घेणारे भ्रष्टाचारी कसे? सरकारने ती सर्वानाच दिलेली आहे. पिवळ्या का हिरव्या रेशन कार्ड वाल्यांना नव्हे.
पण खोटे स्वातंत्र्य सैनिकाचे प्रमाणपत्र मिळवणे हा नक्कीच भ्रष्टाचार आहे. आज स्वातंत्र्याला ६७ वर्षे झालेलि आहेत तेंव्हा जो माणूस ८५ वर्षांच्या खालील आहे ( ६७ + १८) तो खोटा स्वतंत्र्य सैनिकच आहे.
स्वातंत्र्य सैनिकाचे प्रमाणपत्र किंवा निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी असणारी सरकारी व्याख्या म्हणजे ज्याने किमान काही दिवस तुरुंगवास भोगला आहे तो . आणि ब्रिटीश सरकारच्या काळात सुद्धा १८ वर्षाच्या खाली तुरुंगात पाठवीत नसत. ( बाल सुधार गृहे हि ब्रिटीशांचीच देणगी आहे)
सुटीचा प्रवास भत्ता, मोटार विमा किंवा वैद्यकीय खर्चाचा परतावा यात फार मोठ्या प्रमाणात खोटी बिले सदर होतात असे निरीक्षण आहे
7 Apr 2015 - 10:39 pm | संदीप डांगे
स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगात असलेल्या आईच्या गर्भात होता म्हणून एकाला स्वातंत्र्यसैनिक असे प्रमाणपत्र मिळाले असे फार पुर्वी कधी वाचले होते. बर्याच गुंड-पुंड-चोरांना त्या काळात कारावास भोगल्याचे पुरावे सादर केल्यावर स्वातंत्र्यसैनिकाचे प्रमाणपत्र मिळत असे असेही ऐकले आहे जुन्या लोकांकडून.
सबसिडी घेणे न घेणे ऐच्छिक आहे. सरकार देतंय तरी श्रीमंतांनी सबसिडी घेऊ नये असे सरकारचे आवाहन आहे. त्यामुळे हा नैतिक-अनैतिक, भ्रष्ट-गरिब हा प्रश्न उभा राहिला आहे.
बाकी खोटे स्वातंत्र्य सैनिकाचे प्रमाणपत्र मिळवणे हा नक्कीच भ्रष्टाचार आहे यासाठी सर्वथा सहमत.
8 Apr 2015 - 1:09 pm | असंका
त्या सहप्रवाशाचं कृत्य क्षम्य असून लेखकाची मात्र काही तरी चुक होतीये असं वर अनेक लोक म्हणलेत. मला ते 'क्षम्य असणं' अगदीच कळत नाहिये...जरा कुणी मला समजावून सांगेल का? म्हणजे नक्की काय करायला हवं होतं लेखकाने? त्याचं लॉजिकल एक्स्टेंशन हे असं होइल का - ?
तिथेच बसून तिकिट न काढता त्यांना चाळीस रुपये द्यायचे
असंच म्हणायचं आहे का?
9 Apr 2015 - 4:29 pm | मार्मिक गोडसे
कुणी अप्रामाणिक वागू नये म्हणून नोकरीवर घ्यायच्या आधीच नोकरांशी हजार अटी असलेले करार केले जातात
मी(स्वतः) स्वार्थी आहे असे प्रामाणिकपणे कबूल केल्यास एखाद्या स्वार्थी नोकराकडून कोणतेही करार न करता त्याच्या कामाचा योग्य तो मोबदला देऊन त्याच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करू शकतो का?
विद्यापिठात सुवर्ण मिळवणार्या माझ्या मित्राला प्राध्यापकाच्या नोकरीसाठी ७-८ लाख मागितले होते. एवढी पात्रता असतांना असा धडा मिळत असेल तर कोण कशाला प्रामाणिकतेचे-आदर्शाचे वृथा सोंग करत फिरेल?
आता त्या निवृत्त मुख्याध्यापकाचंच घ्या. बढती व्हावी, वेतनवाढ व्हावी, भत्ते मिळावे म्हणून त्यांच्याच विद्यार्थ्यांसारख्या सरकारी बाबूंनी त्याच्याकडून पैसे उकळले असणार.
Anti Corruption Bureau ला तक्रार करता येत नसेल तर काय उपयोग त्या सुवर्णपदकाचा व उच्च शिक्षणाचा.
9 Apr 2015 - 4:49 pm | संदीप डांगे
तुम्हाला मुद्दाच समजून घ्यायचा नसेल तर राहीलं राव. उगा आकांडतांडव करून काय उपयोग?
9 Apr 2015 - 5:19 pm | रुस्तम
सहमत.
समजून घ्यायचा नसेल तर राहीलं राव.
9 Apr 2015 - 5:28 pm | चैतन्य ईन्या
Anti Corruption Bureau ला तक्रार>> भाऊ तुम्हाला ह्याचा काही अनुभव? तक्रार करून पुढे तुम्ही त्या ठिकाणी लागल्यावर तुम्हाला डावलले आणि बसवले मास्तर म्हणून तर? असो. आपला अनुभव सांगा.
9 Apr 2015 - 5:59 pm | बॅटमॅन
बळंच =))
10 Apr 2015 - 10:01 pm | मार्मिक गोडसे
तुम्हाला मुद्दाच समजून घ्यायचा नसेल तर राहीलं राव. उगा आकांडतांडव करून काय उपयोग?
८. ठार स्वार्थी समाजात शिक्षक, डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी, सरकारी नोकर ह्यांनीच प्रामाणिकतेचे पुतळे असावे अशी अवास्तव अपेक्षा कशासाठी?
मग आपण कोणाकडून प्रामाणिकतेची अपेक्षा करायची ? का करूच नये ? असा मी काढलेला अर्थ आहे. चुकत असल्यास समजाउन द्यावे.
तुमच्या प्राध्यापक मित्राला एवीतेवी (पैशाच्या मागणीमुळे) ती नोकरी मिळणारच नव्हती तर काय हरकत होती Anti Corruption Bureau ला तक्रार करायला. आपल्यावर अन्याय होत असेल, सरकारी कामे वेळेवर होत नसतील तर माहीतीच्या अधिकारासारखी कायदेशीर आयुधे असताना त्याचा वापर केला तर अनेक बेकायदेशीर घटना कमी होण्यास मदत होइल.
आता जे आदर्शवादाची शिकवण देतात त्यांच्यात खरेच काही आदर्श असते तर सगळे जग आदर्श दिसले असते. जर प्रत्येकाला आपले आई-वडील-शिक्षक आदर्श आहेत असे वाटते तर ते इतरांनाही अनुभवास यायला हवे
मूळ लेखात मी असे का वागलो ह्याचे श्रेय घरातून झालेल्या संस्कारांना दिले आहे. तुम्हाला मान्य असो व नसो परंतू जेव्हा अनावधानाने किंवा नेणीवेतून माझ्याकडून चुकीची कृती होत असेल तर त्यातून सावरण्यामध्ये घरातील संस्कार, आदर्श ह्यांचा वाटा मोठा असतो त्यात सद्सद्विवेकबुद्धी ही आलीच. माझे पालक हे प्रत्यक्ष आयुष्यात आदर्श-प्रामाणिकच आहेत ह्याची मला खात्री आहे.
तुमचे समाजाचे निरिक्षण खरे तर कमी पडले असे म्हणावे लागेल.
असे तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही माझ्या भल्याकरताच सांगत असाल. परंतु तुमच्या माहितीकरीत सांगतो, मी ग्रॅजुएट झाल्यावर माझ्याकडे जितके व्यावहारीक ज्ञान होते त्याच्या कैकपट अधिक व्यावहारीक ज्ञान रेल्वे स्टेशनवरील माझ्यापेक्षा वयाने लहान अशा बुटपॉलिवाल्या मुलाकडे होते, हे सर्व निरिक्षण असल्यामुळेच मला समजले असावे. असो, मला समाजातील अनैतीक व्यवहारांचे चिलखत घेउन खोटे आयुष्य जगण्यापेक्षा नैतिकतेने भोंगळे परंतू स्वाभिमानाने व ताठ मानेने जगण्यात अधिक समाधान वाटेल. नैतिकता पतिव्रतेसारखी असते व अनैतिकता छीनालीसारखी असते. उगाच नाही म्हणत 'सतीच्या दारी बत्ती अन छीनालीच्या दारी हत्ती'. दोघींपैकी कोण आयुष्यात अधीक समाधानी असते?
तक्रार करून पुढे तुम्ही त्या ठिकाणी लागल्यावर तुम्हाला डावलले आणि बसवले मास्तर म्हणून तर?
प्राध्यापकाच्या नोकरीसाठी ७-८ लाख मागितल्याचे उदाहरण हे ऐकिव आहे. सुवर्णपदकाचा व प्रत्यक्ष मुलाखतीचा काहीही संबंध नाही. दुसरे उदाहरण लेखातिल आजोबांचे हायपोथेटिकल प्रकारचे आहे. अहो आपले अपयश झाकण्यासाठी व अशांचे समर्थन करण्यासाथी रचलेल्या ह्या क्लुप्त्या आहेत. अशी लोकं डोक्यात जातात अगदी. अनेक अशिक्षीत शेतकर्यांनी तलाठ्यांना लाच घेताना पकडून दिलेले आहे त्यांनाही आयुष्याभर तलाठ्याशी संबंध येत असतो, त्यांनाही भीती असतेच म्हणुन ते हतबल होत नाही. त्यामुळे अशा सुशिक्षित भेकड लोकापेक्षा अशिक्षीत शेतकर्यांचा मला अभिमान आहे.
11 Apr 2015 - 2:04 am | संदीप डांगे
बंधो, तुम्हास मुद्दा खरंच कळलेला नाहीयेहो. प्रत्येक विधानात तुमचे तुम्हीच व्यक्तिगत घुसणार तर कसं चालेल? तुम्ही परत एकदा माझा मूळ प्रतिसाद शांतपणे वाचा. तिथे कुठेही वैयक्तिक टिप्पणी केली आहे का ते सांगा.
तुमच्या आई-वडीलांच्या आदर्श-प्रामाणिकतेबद्दल कुणी शंका घेतली ज्यामुळे तुम्हाला खात्री द्यावी लागते? असो. ती खात्री देऊन तुम्ही हे तरी सिद्ध केले की इतरांचे आई-वडील प्रामाणिक-आदर्श असतीलच अशी खात्री नाही. माझाही मुद्दा तोच आहे हो. मला एक तरी माणूस दाखवा जो म्हणेल माझ्या आई-वडीलांकडून मी खोटेपणा-बेईमानी शिकलोय म्हणून. मग समाजात इतका सगळा भ्रष्टाचार बोकाळला आहे तो कुणाच्या आई-वडीलांच्या संस्कारांमुळे? तुम्ही तुमच्या घराचे आदर्श-संस्कार वैगेरे सांगताय. असे कुठले घर आहे की जे आदर्श-संस्कार करत नाही? दाऊद इब्राहिमनेही आपल्या मुलाला 'बेटा, हमेशा सच बोला करो' अशीच शिकवण दिली असेल. असो.
नोकरीसाठी लाच मागणारे-देणारे एकाच माळेचे मणी असतात. जिथे माझ्या मित्राला लाच मागितली ते खाजगी कॉलेज होते. 'तिथेही' एसीबी चालते हे माहित नव्हतं. माहितीच्या अधिकारात सगळ्या खाजगी संस्थांमधले भ्रष्टाचारांविरुद्ध माहिती मिळते हे ही नवीनच समजले. की फक्त सरकारी यंत्रणेशी संबधीत लोकांनी भ्रष्टाचार करू नये अशी आपली अपेक्षा आहे? बरं एसीबीचेच काही लोक भ्रष्टाचार करतांना पकडल्या गेलेत त्यांचं काय?
तुम्ही इतके वैयक्तिक घेतलेच आहे तर तुमचेही भ्रष्टाचार-विरोधी लढ्याचे अनुभव सांगा. कारण भ्रष्टाचाराशी अजिबात संबंध आलेला नसेल तर ती व्यक्ती या ग्रहावरची तरी नाही किंवा चार भिंतीबाहेर पडून कधी व्यवहार करायची गरज पडणार नाही इतकी संरक्षित असेल.
कृपया वाईट वाटून घेऊ नका पण मला तरी तुमचे सगळे विचार बाळबोध आणि शाळकरी वाटतात. तुम्ही लोकलच्या गर्दीतही शिस्तीने रांगेत चढत असाल. सत्य स्विकारणे हे तुम्हाला जमत नाही आहे असे दिसत आहे. यात तुम्हीही भ्रष्टाचारी, अप्रामाणिक व्हा असं कुणीच म्हणत नाही आहे. पण अभ्यास, चिंतन वाढवा. ग्रॅजुएट होईपर्यंतच काय कित्येकांना रिटायर होईपर्यंत चपला शिवणार्या पोराइतकं व्यवहार-चातुर्य येत नाही असं निरिक्षण आहे. मानवी व्यवहारांचं जग अगम्य आहे. त्याला आदर्शाच्या कॅलिडोस्कोपमधून पाहण्याचा प्रयत्न करणे चूक आहे. भ्रमनिरासच होईल.
परिस्थितीत बदल घडवून आणण्याच्या इच्छेचा, प्रयत्नांचा मला नेहमीच आदर आहे. पण त्यासाठी आधी परिस्थिती समजून घ्यावी लागते. समजून न घेता फक्त तोंडाची वाफ दवडत 'हे बरोबर नाही', 'असे कुठे असते का' ह्याला उंटावरून शेळ्या हाकलणे म्हणतात.
तुम्ही भ्रष्टाचाराचे पीडीत लोकांना ज्या प्रकारे सल्ले देताय त्यावरून तर तुम्ही अजून तंबूतच आहात असे वाटत आहे.
अधिक काही बोलण्याची गरज भासत नाही. इथेच थांबतो. धन्यवाद.
जाता जाता एक सल्ला: एकूणच भारतात इतका भ्रष्टाचार का आहे याचा जरा मध्ययुगीन काळापासून अभ्यास कराच. आम्हालाही सांगा काही कळलं तर. (सगळ्या जगात भ्रष्टाचार आहे. पण असं बोलत नसतात)
11 Apr 2015 - 5:17 pm | मार्मिक गोडसे
प्रत्येक विधानात तुमचे तुम्हीच व्यक्तिगत घुसणार तर कसं चालेल?
तुमचे समाजाचे निरिक्षण खरे तर कमी पडले असे म्हणावे लागेल.
ह्या तुमच्या विधानामुळे मला तसे स्पष्टीकरण करावे लागले. तुम्ही म्हणता तसे मी कोषात नक्किच नाही.
तुमच्या सर्व प्रतिसादात मी विचारलेल्या प्रश्नांना मला समजेल अशा भाषेत उत्तर दिले नाही किंवा गोल गोल फिरवत बगल दिली. उगाचच विषय दुसरिकडे फिरवत राहीले. मी लेखात माझ्या पालकांशिवाय इतरांच्या पालकांच्या आदर्शांवर भाष्य केलेले नाही. तरी तुम्ही बळेच कोणाचे पालक मुलांना चोरी करायला किंवा वाईट गोष्टी करायला शिकवतात असे मला विचारता. वजनात काटा मारायला वाण्याच्या मुलापासून ते रद्दीवाल्याच्या मुलापर्यंत सगळे त्यांच्या बापापासूनच शिकतात. भंगारवाल्यापासून ते कचरा वेचणार्या बायकांची मुले सोसायटितील वस्तू त्यांच्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली कसे चोरतात हे तुम्ही कदाचीत पाहिलेले नसेल. उदाहरणांची भलीमोठी यादी तयार होईल.
विद्यापिठात सुवर्ण मिळवणार्या माझ्या मित्राला प्राध्यापकाच्या नोकरीसाठी ७-८ लाख मागितले होते.
हा तुमचाच प्रतिसाद
जिथे माझ्या मित्राला लाच मागितली ते खाजगी कॉलेज होते. 'तिथेही' एसीबी चालते हे माहित नव्हतं.
पहिल्या प्रतिसादात खाजगी कॉलेज होते असा स्पष्ट उल्लेख केला असता तर असा प्रश्न पडला नसता.
माहितीच्या अधिकारात सगळ्या खाजगी संस्थांमधले भ्रष्टाचारांविरुद्ध माहिती मिळते हे ही नवीनच समजले.
असे मी कुठे म्हणले आहे ? आपल्यावर अन्याय होत असेल, सरकारी कामे वेळेवर होत नसतील तर माहीतीच्या अधिकारासारखी कायदेशीर आयुधे असताना त्याचा वापर केला तर अनेक बेकायदेशीर घटना कमी होण्यास मदत होइल असा माझा प्रतिसाद होता. निट वाचत जा.
बरं एसीबीचेच काही लोक भ्रष्टाचार करतांना पकडल्या गेलेत त्यांचं काय?
कसं बोललात ? जसा बागुलबुवा नसतो तसेच हे कुणीही पूर्ण आदर्श नसतात.
आता का तुम्ही त्यांच्याकडून प्रामाणिकतेची अपेक्षा करता?
तुम्ही लोकलच्या गर्दीतही शिस्तीने रांगेत चढत असाल.
असे मी कुठे म्हणले आहे ? तुमचा गैरसमज होतोय समजण्यात.
खरे तर आपण वयस्करांना गाडीत चढण्यास प्राधान्य दिले पाहीजे
असे मी वेगळ्या संदर्भात म्हणले होते.
तुम्ही इतके वैयक्तिक घेतलेच आहे तर तुमचेही भ्रष्टाचार-विरोधी लढ्याचे अनुभव सांगा.
नक्किच सांगीन. तुम्ही असे किती स्वतःचे अनुभव ह्या धाग्यावर सांगितले. जे काही सांगितले ते ऐकीवच होते. व माझे भ्रष्टाचार-विरोधी लढ्याचे अनुभव जाणुन घेण्यामागील तुमचा हेतू स्पष्ट करा.
जाता जाता माझ्या शेवटच्या प्रश्नाचे उतार द्या.
तुम्ही कधी कोणाकडूनही आयुष्यात प्रामाणिक सल्ल्याची मागणी केली आहे का? मागितला असल्यास त्याच्याकडून प्रामाणिक सल्ला मिळेल असे आपल्याला का वाटले ? त्यासाठी तुम्ही काय क्रायटेरिआ वापरता?