भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८| भाग ९
गोखले नगर मधील सिम्बीऑसीस इन्स्टीट्यूट ऑफ कम्पुटर रिसर्च च्या कॅम्पसमधे फिगो आत शिरली, फिगोमधल्या व्यक्तीने टीचिंगस्टाफ कार पार्किंग मधील ऐका जागेवर नजर फिरवली, त्याजागी त्याला आपेक्षित सांट्रो दिसली, त्यावाक्तीने आगंतुक पार्किंग मधे फिगो लावून, गेटपासच्या फॉर्मालिटी पूर्ण करून संस्थेच्या वर्तुळाकार इमारतीकडे चालायला सुरवात केली, या वर्तुळाकार इमारतीच्या उजव्या बाजूस असलेल्या एका इमारतीमधे संस्थेचे मुख्य प्रवेशद्वार आहे. यामधून प्रवेश केल्यावर आत परत एक डावीकडे जाणारा एक पॅसेज लागतो या पॅसेजने गेल्यावर संस्थेच्या ऐका इमारतीत तो पोचतो जी वर्तुळाकार इमारतीच्या बरोबर मागे आहे. दर्शनी भागाची सजावट, कमालीची सौम्यता शांती दर्शवणारी असते. मुख्य प्रवेशद्वाराजवळ परत एक धातू शोधक फ्रेम बसवलेली आहे, शेजारी गार्ड उभा आहे. या फ्रेम मधून जाताना बीप बीप वगैरे आवाज आले तरी फारसे कोणी त्याकडे लक्ष देत नाही. तिथून थोडं पुढे गेल्यावर टीचिंग स्टाफरुम सेक्शन चालू होतो. यात अनेक कक्ष असतात, त्यांच्या दरवाजावर क्रमांक दाखवणारी पाटी. चकचकणारी धातूची. क्रमांक 301. आणि दरवाजाची ती तसली आकर्षक आधुनिक वळणाची मूठ. त्या बंद अलिशान वातानुकूलित खोलीच्या दरवाजावर नॉक करून ती व्यक्ती दरवाजा थोडासा उघडते, व म्हणते 'मे आय ?',
'येस हेमंत प्लीज कम'… प्रा. पांडुरंग सदाशिव साने म्हणतात व आपल्या जागेवरून शेकह्यांड साठी हात पुढे करतात.
तो हात हातात घेत हेमंत कोकरे…. 'कधी येतोस मग ?'
अंगात लांब बाह्यांचा शर्ट, जेमतेम मध्यम उंची, धारदार नाक त्यावरचा जाड भिंगाचा चौकोनी चष्मा, त्यातून लुकलुकणारे घारे तेजस्वी डोळे पण त्याच डोळ्यांनी रोखून पाहिल्यावर अनेकदा समोरच्याला घाम फोडायला पुरेसे ठरत. म्हतारपणामुळे चालताना आधारासाठी सदा सर्वकाळ हातातली काठी
लँपटॉपकडे तोंड करून ठेवलेली तिरकी खुर्ची. तिच्या पाठीवर आपली पाठ व डोकं न टेकता साने सर बसले. दोन क्षण डोळे शांतपणे मिटलेले. हात दुमडून घेऊन बोटं एकमेकांना जुळवलेली, ठेवून साने म्हणाले. 'परत एकदा सांगशील हेमंत ?'
हेमंत कोकरे बोलू लागले 'काल मोबाईलवर सांगितलं तसं, माझ्या आमच्या सिस्टीमबद्दल काही शंका आहे, म्हणून मला सेकंड ओपिनियन हव आहे, तुझ्यासारख्या विश्वासू व्यक्तीकडून, माझ्या बघण्यात अस आल आहे की आमच्या काही एन्क्रिप्शन अल्गोरिदम युसर मान्युअलसना आक्सेस करण्याचा प्रयत्न झाला आहे, तू माझ्या कामाच्या जागी आलास कि तुला मी लॉग देतो, तो तपासून तुझ मत मला सांग, तसं मी माझ्या निष्कर्षाजवळ आलेलो आहे, पण तुझसुद्धा ओपिनियन हव आहे '
"ठीक आहे उद्या सकाळीच येतो, मला पिकअप कर बाणेरमधे घरासमोर."
"आणखी काय, काय म्हणतोय शैक्षणिक पेशा तुझा, आपल्या पहिल्या करीयरची, जुन्या थरारक दिवसांची आठवण येते का ? "
"खूप येते, पण तुला तर माहिती आहे, आपण त्याबद्दल अक्षर उच्चारू शकत नाही, नॉस्टाल्जिक झाल्यावर हे पुस्तक उघडून डोळ्यापुढे धरतो"
अस म्हणून, प्रा. पांडुरंग सदाशिव सानेनी ऐक पुस्तक टेबलावर हलकेच भिरकावले…
टेबलावर पुस्तक गिरकी घेत हेमंत कोकारेंच्या पुढ्यात येवून थांबले …. त्याच्याकडे बघून… क्षणभरच कोकारेच्यासुद्धा चेहेर्यावर नॉस्टाल्जिक मंद स्मित तरळले…
पुस्तक होतं …. कावबॉईज ऑफ आर एंड ए डब्ल्यू : डाउन मेमरी लेन
------------------------------------------------------
दुसर्या दिवशी पांडुरंग साने, हेमंत कोकरे यांच्या सोबत पुणे विद्यापीठ परिसरातील 'सेंटर फॉर साउथ ऐशियन इकोनोमीक स्टडी ग्रुप' च्या इमारतीतून बाहेर पडले …. त्याच्या दुसर्या दिवशी पुण्यातील प्रसिद्ध दै. धडाकेबाज मधील पान ७ खालील उजव्या कोपर्यात ऐक बातमी अंग चोरून उभी होती .
पुणे दि. २७ : पुणे विद्यापीठात कार्यरत असलेल्या, सहायक अभियंता असलेल्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी, ऑफीशियल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत अटक केली असून काल स्थानिक न्यायालयात त्यास उपस्थित केले असता त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अमर उपाध्याय असून, काही संवेदनशील व गोपनीय कागदपत्रे गोळा केल्याचा त्याचावर आरोप ठेवण्यात आलेला आहे.
पुढील तपास चतुर्श्रुंगीठाण्याचे निरीक्षक पी.ए. उईके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
------------------------------------------------------
आय एस आय च्या आपल्या ऑफिसमधे मेजर इक़्बाल, स्याटेलाईट फोन कानाला लावून, डोळे बंद करून, काळजीपूर्वक पलीकडच्याच ऐकून घेत होता.
'ठीक, जो होनी वो देखी जायेगी' अस म्हणून त्याने कॉल कट केला. दोन मिनिट डोक दोन्ही हाताने गच्च पकडून विचार केला आणि इंटरकॉम वरून त्याने 'फयाजको अंदर भेजो' अस फर्मावलं. युनिफोर्ममधील फयाज आत आला त्याने स्यालुट मारला,
'पासपोर्ट ऑफिसमे अपना कोनसा बंदा है अभी'
'जनाब, सभी बंदे अपनेही है, अगर आप हुक्म करे तो वजीर-ए- दाखला खुद पेश हो जाये '
छद्मीपने हसून त्याने, नोटपॅडवर काही खरडले, व म्हणाला 'ये डिटेल के साथ नया पासपोर्ट बनवाओ, उसके बाद, अबु-फैसलको कहना की, ये पासपोर्टपे उसे सौदी जाना होगा, तुरंत …. और उसको नया प्रोफाईल समझा देना '….
------------------------------------------------------
५ वर्षापूर्वी
मिरज जंक्शनमधे शेकडो गाड्या विविध दिशेने, विविध वेळेला येतात, व विविध दिशेने, विविध वेळेला जातात, पण फ्रुटीच्या टेट्राप्याकचा ऐका तुकड्या वरून, तो उंडगीचा बसवप्पा, आणि त्यांने ज्या ट्रेनमधून पेटी लंपास केली, त्यावरून ती ट्रेन, तिची दिशा ठरवता आली म्हणूनच, पुण्याला केलेला मोबईल कॉलनंतर, त्याने ऑफिसमधला टीवी चालू केला त्यावर …. ब्रेकिंग न्यूज येत होती.
ब्रेकिंग न्यूज
काल झालेल्या मिरज जंक्शन बॉम्बस्फोटा नंतर सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्रीपदी असलेले श्री विजय देशमुख यांना पक्षश्रेष्ठी, नैतिक जबाबदारी घेऊन पायउतार होण्यास कधीही सांगतील, असे आमचा दिल्लीस्थित सूत्राने सांगितले आहे, श्री विजय देशमुख हे आजरा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्याजागी सध्याचे कृषीमंत्री व संगमनेरचे आमदार श्री बाळासाहेब थोरवे याचं नाव चर्चेत आघाडीवर आहे, निष्ठावंत गटातील श्री थोरवे हे आजच आपला इस्त्राईलचा कृषीदौरा आटोपून दिल्लीत परतले असताना त्यांना तडक १० ध्यानपथ इथे पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी इस्त्राईलचे भारतातील दूत बेंजामिन लेवी हेही उपस्थित होते, मिरज जंक्शन बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानाबरोबर झालेल्या चर्चेत त्यांनी भारतातील इस्त्राईलच्या नागरिकांच्या सुरक्षेविषयी आपली मते मांडली
कंटाळून त्याने टीवी बंद केला, गेले कित्येक तास झोप नाही, की जेवण नाही, अश्या अवस्थे नंतर डीऐसपी मगदूमला एकाचवेळी तीव्र झोपेची व भुकेची जाणीव होऊ लागली………
-----------------------
त्याच संध्याकाळी, १० ध्यानपथ
व्हरांड्यात दोन व्यक्ती चर्चा करत होत्या.
"मिनिस्टर, त्या हल्ल्यात जे २ इस्त्राईलचे नागरिक मारले गेले, त्याचं पोस्टमोर्टेम होऊ न देता, त्याचं पार्थिव आमच्या हवाली करावं, अशी माझ्या देशाची विनंती आहे."
"परंतु गुन्हा घडल्यावर पोस्टमोर्टेम होऊनच पर्थिवाचा ताबा दिला जातो, असा नियम आहे"
"मला कल्पना आहे, पण तेल-अवीव वरून माझ्यावर थोडा दबाव आहे, हे पहा याविनंतीमागे पूर्णतः भावनिक कारण आहे"
"योर एक्सेलंसी, उद्या मी तुमच्या जागी असलो व तुम्ही माझ्या, आणि जर माझ्या देशाकडून काही विनंती केली गेली, तर तुम्हीही तीचा मान ठेवाल, अशी आशा मी बाळगू शकतो का ?"
"जरूर, तेल-अवीव ह्याची दखल नक्की घेईल"
"ठीक आहे, मी वचन देत नाही, पाहतो काही करता येत का ! "
"Thank you "
यानंतर दोघेही वेगवेगळ्या दिशेला चालू लागले…… त्यातली ऐक व्यक्ती पोर्चपुढील गार्डनमधे एकांतात उभी राहिली व त्या व्यक्तीने नंतर मोबाईल नंबरवर कॉल लावला, "हलो डी आय जी ओझा, मी बाळासाहेब थोरवे बोलतोय, तुमच्याकड ऐक काम होत…. "
---------------------
रात्री मोबाईल वाजू लागल्याने, डोळे चोळतच स्क्रीनकडे पहिले, थोडं अलर्ट होऊन कॉल एक्सेप्ट केला,
'सर डीऐसपी मगदूम हियर'
'मगदूम, डी आय जी ओझा स्पिकिंग '
'सर'
'मगदूम ते २ परदेशी नागरिकांचं पोस्ट मोर्टेम होणार नाही, बॉडीज रेफरिजरेटर क्यारीयरमधून लगेच मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ५ कडे पाठवण्याची आरेंजमेंट कर '
प्रतिक्रिया
3 Mar 2015 - 1:29 pm | मास्टरमाईन्ड
छान आहे. मागचे सगळे भाग वाचलेत.
फक्त एक गोष्ट पटली नाही, असं पोस्ट्मॉर्टेम शिवाय कुणाची बॉडी जाऊ देतात?
3 Mar 2015 - 2:25 pm | पगला गजोधर
मिरज-जंक्शन बॉम्बब्लास्ट मधे गोव्याला जाणार्या दोन परदेशी (इस्रायली ज्यू ) नागरिकांचा मृत्यू होतो, त्यानंतर त्याचं पार्थिवाची अजून चिरफाड होऊ नये असे त्यांच्या कोठल्यातरी नातेवाईकांना (इस्रायल मधील प्रभावशाली कुटुंबियांना) भावनिक दृष्ट्या वाटते. ते त्यांच्या इस्रायेलमधील प्रभावाचा वापर करून, भरताकडे आपली मागणी मांडतात. ('I owe you one' style favour). नियमानुसार पोस्ट्मॉर्टेम शिवाय कधीही पार्थिव त्याब्यात देत नाहीत, परंतु भारतीय उच्चपदस्थ त्यांच्या डीस्क्रेशनरी पॉवरस वापरून, इस्रायेलवर फेवर करतात (भारताच्या राष्ट्रीय हिताला बाधा न आणता). हेतू हा, कदाचित उद्या भारताला इस्रायेलच्या अश्या डीस्क्रेशनरी मदतीची गरज पडली तर अश्या केलेल्या उपकारांची आठवण त्यांना करून देऊन, त्यांच्या कडून काही कार्यभाग साधता येईल.
3 Mar 2015 - 2:58 pm | विटेकर
लवकर लवकर येऊ द्या !