मनगटावर मोगर्‍याचे हार आले

चिमिचांगा's picture
चिमिचांगा in जनातलं, मनातलं
2 Feb 2015 - 7:03 am

आजकाल मिसळपावावर वधूंच्या वाढत्या अपेक्षा आणि त्यामुळे उपवर तरूणांची होणारी कुचंबणा, हा विषय चांगलाच गाजतो आहे. एवढा की या विषयावरच्या एका धाग्याने प्रतिक्रियांचा इतिहास रचला. खालील काव्यसुमन हे देखिल याच विषयाला वाहिलेले आहे.

काही नतद्रष्ट वाचक या कवितेवर या धाग्याचा प्रभाव जाणवतो आहे, असे म्हणतील, त्यांना इग्नॉर मारावे, ही विनंती.

मनगटावर मोगर्‍याचे हार आले

आज सोळा स्थळांचे नकार आले
वेदनांचे मोकळे कोठार झाले

पोरगेला तरूण आता मी न उरलो
बर्थडे माझे तीसावर चार झाले

दोसतांची राहिली ना ग्यांग आता
पटापट साले 'दोनाचे चार' झाले

संपल्या कलिका नि उरले देठ आता
पाहता-पाहता मार्केट 'गार' झाले

वाचले ते, जाळूनि सार्‍या आकांक्षा
पदरी पडला माल घेऊन 'पार' झाले !

भावना शमण्यास आता 'ती'च गल्ली
मनगटावर मोगर्‍याचे हार आले...
*

गझलप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

2 Feb 2015 - 7:13 am | मुक्त विहारि

झक्कास

स्वामी संकेतानंद's picture

2 Feb 2015 - 8:11 am | स्वामी संकेतानंद

हाहाहा!! झकास !!

hitesh's picture

2 Feb 2015 - 8:37 am | hitesh

छान

जेपी's picture

2 Feb 2015 - 8:38 am | जेपी

=))

अत्रुप्त आत्मा's picture

2 Feb 2015 - 8:41 am | अत्रुप्त आत्मा

अफाssssssट! :-D .. :-D .. :-D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Feb 2015 - 8:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

अजया's picture

2 Feb 2015 - 9:22 am | अजया

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Feb 2015 - 11:53 am | डॉ सुहास म्हात्रे

जळजळीत !

सस्नेह's picture

2 Feb 2015 - 12:03 pm | सस्नेह

सत्याचा दाहक अविष्कार =))

अत्रुप्त आत्मा's picture

2 Feb 2015 - 1:44 pm | अत्रुप्त आत्मा

ज्वलन्त सत्याचा दाहक अविष्कार

=))))) अत्यंत चपखल विश्लेषण! =)) .. =)) .. =))

स्नेहातै झिंदाबाद! =))

अनुप ढेरे's picture

2 Feb 2015 - 12:07 pm | अनुप ढेरे

__/\__

भुमन्यु's picture

2 Feb 2015 - 12:10 pm | भुमन्यु

हा हा हा... एकदम मस्त डिस्क्लेमर विशेष आवडले.

नाखु's picture

2 Feb 2015 - 12:13 pm | नाखु

१०८४ प्रतिसादाचे सार (असेही)

वाचले ते, जाळूनि सार्‍या आकांक्षा
पदरी पडला माल घेऊन 'पार' झाले !

=)) =))

विशाल कुलकर्णी's picture

2 Feb 2015 - 12:17 pm | विशाल कुलकर्णी

*lol* *LOL* *lol* *LOL*

आदूबाळ's picture

2 Feb 2015 - 12:23 pm | आदूबाळ

:D

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Feb 2015 - 12:45 pm | ज्ञानोबाचे पैजार

अ फ ला तु न

हे वाचल्यावर आम्हाला निर्वाण प्राप्त झाले आहे.

पैजारबुवा,

अतिशय दर्जेदार आणि स्वतंत्र प्रतिभा म्हणूनही तितकेच उत्तम.

योगी९००'s picture

2 Feb 2015 - 1:15 pm | योगी९००

झक्कास...!! खरे तर झक्कास हे या कवितेला...त्यात वर्णन केलेल्या परिस्थितीला नाही.

वेल्लाभट's picture

2 Feb 2015 - 1:19 pm | वेल्लाभट

हा हा हा हा हा ! कमाल !
शेवटची ओळ मस्त जमली आहे ! बाकी नॉट बॅड !

vikramaditya's picture

2 Feb 2015 - 1:35 pm | vikramaditya

फक्त कवितेच्या शीर्षकातच पंच लाईन दिल्याने 'कॅट ईज ऑलरेडी आउट ऑफ बॅग ' असे वाटते.

बाकी - छानच जमले आहे.

सूड's picture

2 Feb 2015 - 3:19 pm | सूड

__/\__

कहर !!

कपिलमुनी's picture

2 Feb 2015 - 3:33 pm | कपिलमुनी

आवडला !

( सहसा या काव्यगल्लीत येत नाय पण आज मोगर्याचा सुगंधाने आलो ;) )

सुबोध खरे's picture

13 Oct 2015 - 10:08 am | सुबोध खरे

+१००

जातवेद's picture

2 Feb 2015 - 7:19 pm | जातवेद

*lol*

रेवती's picture

2 Feb 2015 - 7:53 pm | रेवती

हा हा हा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2015 - 8:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकास. :)

-दिलीप बिरुटे

बहुगुणी's picture

2 Feb 2015 - 9:46 pm | बहुगुणी

दाद दिल्याशिवाय राहवलं नाही :-)

(अगतिकता हास्य-काव्यात मांडतांना एका मोठ्या सामाजिक समस्येला हात घातलाय हेही नमूद करायला हवं....)

श्रीरंग_जोशी's picture

3 Feb 2015 - 9:15 am | श्रीरंग_जोशी

बहुगुणी यांनी मांडलेल्या भावनेशी सहमत.

मितान's picture

3 Feb 2015 - 9:54 am | मितान

व्वा व्वा !!!

दिपक.कुवेत's picture

3 Feb 2015 - 3:02 pm | दिपक.कुवेत

(दोनाचे चार झालेला) दिपक...

किसन शिंदे's picture

3 Feb 2015 - 5:13 pm | किसन शिंदे

उत्तम भाष्य केलंय!! काव्य आवडलं. :)

मदनबाण's picture

11 Feb 2015 - 12:21 pm | मदनबाण

जबरा !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }

नि३सोलपुरकर's picture

11 Feb 2015 - 12:55 pm | नि३सोलपुरकर

कहर , लोक आहेत मिपावर.
काव्य आवडलं.

टवाळ कार्टा's picture

11 Feb 2015 - 2:01 pm | टवाळ कार्टा

क ह र =))

:))))

वाचता वाचता डोळ्यात पाणी आले.

चौकटराजा's picture

12 Feb 2015 - 5:52 am | चौकटराजा

तसं पहायचं झालं तर मराठी कवितेने अनेक वळणे घेत घेत आपला प्रवास चालू ठेवलेला आपल्याला दिसतो.विडंबन कविता, विटंबन कविता, विरोधी कविता, विद्रोही कविता, विखारी कविता, विचारी कविता, चिकासी कविता, विलासी कविता, विलापी कविता अशी अनेक रूपे तिने धारण केलेली आहेत. २०१५ साली विमनस्की कविता हे तिचे नवे रूप रसिकांसमोर आले.जी मूळ रशियन कविता ती चिमीचांगा या चिनी कविने मराठीत आणली. मराठीचा गजलेचा बाज घेउन ती उतरली. पुरूषाला देखील व्यथा असू शकते हे या कविने दाखवून दिले आहे. काही 'अडलेले' बरेच सुप्त कवि येथे सारस्वतात भर घालतील अशी आम्हास खात्री आहे.

खटपट्या's picture

12 Feb 2015 - 6:09 am | खटपट्या

जबराट !!

प्रसाद गोडबोले's picture

12 Oct 2015 - 7:38 pm | प्रसाद गोडबोले

खतरनाक !!

प्यारे१'s picture

12 Oct 2015 - 7:48 pm | प्यारे१

>>>> बर्थडे माझे तीसावर चार झाले

तीसावर सात आठ सुद्धा झालेले लोक आहेत दुर्दैवानं.

उच्च कविता आणि वर बहुगुणी सरांच्या प्रतिसादाशी सहमत.

भीमराव's picture

12 Oct 2015 - 8:14 pm | भीमराव

ऊपाशी मित्र मंडळाच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल जाहीर धन्यवाद

जव्हेरगंज's picture

12 Oct 2015 - 8:18 pm | जव्हेरगंज

हा हा हा...!

मांत्रिक's picture

12 Oct 2015 - 8:23 pm | मांत्रिक

चौकटराजा यांची माहीती फार उपयुक्त. बाकी काव्य अप्रतिम!!!

गजलेत बांधलाय गजरा!! ;)

काळजावर आज सोळा वार झाले
वेदनांचे मोकळे कोठार झाले

पोरगेला मी न आता मुळिच दिसतो
प्रकटदिन माझे तिसावर चार झाले

दोसतांची राहिली ना ग्यांग आता
ढेरपोटे बाप ते लाचार झाले!

संपल्या कलिका नि उरले काय आता?
'धोतरा', 'झेंडूच' येथे फार झाले!

वाचले ते, जाळूनि सार्‍या अकांक्षा
तेरड्याला 'माल' समजुन 'पार' झाले!

भावना शमण्यास आता आडगल्ली
मोगर्‍याचे मनगटावर हार झाले...

मांत्रिक's picture

12 Oct 2015 - 8:53 pm | मांत्रिक

मस्तच राजे!!!

पिलीयन रायडर's picture

13 Oct 2015 - 10:47 am | पिलीयन रायडर

क्या बात है!!

मुळ कविता आणि ही गझल.. दोन्ही लाजवाब!!

बाकी चतुरंग.. तुम्ही भलतेच मल्टिटेलेंटेड दिसता हो! बुद्धिबळ काय.. मल्लखांब काय.. गझल काय!

चित्रगुप्त's picture

12 Oct 2015 - 9:36 pm | चित्रगुप्त

अदाब अर्ज है मेरे दोस्त.
.

नूतन सावंत's picture

12 Oct 2015 - 9:58 pm | नूतन सावंत

कवितेच्या चार ओळी चार प्रकरणांचा ऐवज देऊन जातात हेच खरे.उत्तम साधलीय कविता.नि गझल सुद्धा.

हेमंत लाटकर's picture

13 Oct 2015 - 9:58 am | हेमंत लाटकर

जळजळीत सत्य

अंवातर: मुलीच्यां अपेक्षा वाढल्यामुळे मुलांचे लग्न अवघड झाले तसेच मुलींचे सुद्धा वय वाढत आहेत.