काल पासून हे शब्द माझ्या मनाला अनंत यातना देत आहेत. अर्थ मी लावावा,तर अभिप्रेत अर्थ सुटून ..होणार्या अनर्थाचे भय. आणि तरिही लावला,तर मूलार्थाचे काय? याची चिंता! मला प्रतीत होणारा असा एक अर्थ आहेच..प्रतिबिंब म्हणून आलेला..! पण मूळ बिंबाचे काय मग??? ते कसे आहे??? तर कविने ते मानले आहे..मानवाच्या अज्ञेयवादाचे बीज असलेल्या परमेश्वरी स्वरूपात..! मानवाच्या अस्तित्वाचा (त्यानीच मानलेला..)काल्पनिक सहभागिदार:- परमेश्वर्,देव ,भगवंत,सखा ,सोबती,निर्मिक..सारे काहि!
(मग मी म्हटलं.की आपण आज आधी "हे" पाहू! आणि आपल्या तडफडिचं बीज कशात आहे? ते नंतर पाहू!)
===================================================================
त्या फुलांच्या गंधकोशी, सांग तू आहेस का?
हे भगवंता.., आंम्ही मानवांनी..अज्ञानातून ज्ञानाच्या कक्षेकडे जाताना, तुला मारलेली..ही पहिली हाक आहे.. गंधासारखी एक गोष्ट ही नेमकी हरेक फुलाप्रमाणे बदलत जाते,परंतू त्या तिथे ..त्याची असण्याची पद्धति तीच रहाते..म्हणजे आशय एक आणि शब्द फक्त वेगळा,अशी काहिशी काव्यात्म स्वरुपाची ही स्थिती..या फुलांच्या ठाई निर्माण कुणी केली??? तर ही त्या निसर्गाची एक जीवनक्रीया. म्हणुन हे परमेश्वरा..माझे भाबडे मन तुला तिथे शोधते आहे.
त्या प्रकाशि तारकांच्या,ओतिसि तु तेज का?
इश्वरा...मी हे सुवर्ण वा रौप्यकांतिमय गोलक हज्जारो वर्षापासून अवकाशात पहात आलो..त्यांची दीप्ती ,प्रकाश सर्व काहि मनाला वेड लावते! आणि ब्रम्हांडांच्या पसार्यात, हे गोलक अजुनंही तगून आहेत..इतकेच नाही..तर त्यांची कांति नित्य नूतन वाटावी असे ते लखलखतात..मग हे तेज तुझ्याच या अनंताच्या पसार्यातले त्यांना लाभलेले एक दान आहे,असे आंम्ही समजावे का? हे अज्ञाता सांग मला... या तेजाचा दाता तूच तर नाहिस?
त्या नभाच्या नीलरंगी होउनीया गीत का?
भगवंता.., हे न कळणारे अथांग..विस्तीर्ण..अफाट..अद्भूत..,असे आकाश ज्याच्याकडे केवळ दृष्टी वळली तरी मला त्यात सामावून जावेसे वाटते.. नव्हे..ते माझेच वाटते! .. ते नीलरंगी आहे..परंतू त्याची एकंही छटा ,इहलोकिच्या कोणत्याही कृत्रिमात पकडता येत नाही..जे केवळ शब्दांनी व्यक्तवता येते..असे ते जे आहे...आणि तसेच ते आकलनंही होते..ही किमया तूच त्याच्याशी एकरूप अथवा समरूप होऊन ..गीत होऊन.. आमच्या पर्यंत पोहोचवित तर नाहीस ना?
गात वायूच्या स्वराने, सांग तू आहेस का?
वायूचा देहास घडणारा स्पर्श..हे तर तुझे भौतिक रूप झाले. पण मला ते तुझेच बोल वाटतात...तू त्या वायूलाच माध्यम करून स्वररूप होऊन माझ्या कानांपर्यंत मनापर्यंत तर पोहोचायचा प्रयत्न करित नाहीस ना? जे काळायला माझे मन तुजविषयी प्रथमतः अनुकुल नसते...म्हणून तर..तू ही किमया,घडवित नाहीस ना?
मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का?
आंम्ही माणसे इहलोकी जिवंत आहोत्,हे सृष्टीचे दातृत्व आंम्ही मान्य करतो..परंतु आंम्ही नक्की जगतो कसे? कुणासाठी? आणि का म्हणून? आमची सहजीवनाची..समुहजीवनाची-ही नक्की कुठची प्रेरणा??? जिवंत असण्यातला आणि जगण्यातला हाच काय तो मूलभूत फरक!? जो आमच्या अंतरी ..प्राण नामाच्या तत्वानी.. कामना रूपात व्यक्त होत असतो!..तो तूच तर नाहिस ना?....आमच्या अंतरीचा प्राण! आंम्हाला जगविणारा आमचा जीव!
वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का?
ज्या विषयी आंम्हाला आकर्षणंही वाटतं,आणि ज्यापासून भयंही आहे..असे तूझे रूप..मग ते समुद्ररूपी येवो अगर तुझ्या कुठल्याही चमत्कृतीचा तो आविष्कार असो...तो घोर आहे.त्याविषयी बुद्धी..,शोध करून थकते.परंतू उत्तर न मिळवावे..तर जगण्याच्या मार्गात येणारे जे 'वादळ'.. ते हेच तर नाहि ना? तुझ्या रूपातले आणखिन एक..?असा प्रश्न आंम्हाला पाडते,आणि सारे काहि अगम्य होते..म्हणजे हे ही पुन्हा तूच!
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का?
कृपा...! , - भगवंता...,ज्यानी निश्चित पणे फलाची प्राप्ती होते..असे तुझे हे कृपा-स्वरूप्..तुझे परिमाणच का म्हणू नये आंम्ही? हे तुझे कृपा-रूप..त्या धरतीवर बरसणार्या मेघांप्रमाणे केवल फलप्राप्तीसाठीच तर तयार झालेले नाही ना? खरेच!!!.., इहलोकिच्या आमच्या या जीवनावर..,जगण्यासाठी आवश्यक अश्या सर्व फलांची प्राप्ती होण्याकरिता तू,आमच्याकडे..त्या कृपेचा मेघच होऊन येतो आहेस! (तुला नमन असो..)
आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का?
ती वीज असेल पंचमहाभूतांपैकि! ती तर तिची स्थिती-झाली..पण तू तिला घेऊन ज्या रूपात अवतरतोस ..त्या तुझ्या-गति नुसार, असे काहि चैतन्यमय..अद्भूत..विस्मयकारक .ज्याला पहाता क्षणी स्तब्ध व्हावे...काहि क्षण थबकावे..भ्यावेही!..असे ते तुझे, आसमंतातून लखलखत जमिनीवर येणारे-रूप आहे, हे आंम्ही आता ओळखले आहे...निश्चित!-ते तुझेच रूप आहे..(पण खरेच!..,आहे का???)
जीवनी संजीवनी तू ,माउलीचे दूध का?
आंम्हाला निसर्गाचे अपत्य म्हणून ..,मनुष्याच्या मुलाचा जो जन्म मिळतो..ती 'घटना' म्हणजे आमुची प्रथम माऊलि..आणि त्यातून आमच्यामधे ही...,निसर्गाशी लढत झुंजत जगण्याची जी प्रेरणा मिळते..ते आमचे खरे स्तन्य! ..दूध! म्हणून ती अवस्थारूपमाऊली जर जीवन असेल..तर हे प्रेरणारूप दूध... ही आमची संजिवनी आहे,,आणि संजिवनी सहजंप्राप्य नाही..म्हणुन ती तू आहेस!
कष्टणा-या बांधवांच्या रंगसी नेत्रात का?
जीवन जगण्यापासून आणि ते जगण्याकरिता ,आंम्ही सरेच कष्टतो.. पण आमच्यापैकि काहि असेही आहेत..कि ज्यांना या कष्टाचा परतावा म्हणूनंही पुन्हा उपेक्षा अथवा दु:ख्ख वाट्याला येते.म्हणून..., तसे जे खरेच कष्टं'तात..त्यांच्या डोळ्यात तर तू कारुणेनी वा झरणार्या दु:ख्खाच्या रूपानी प्रकट होत नाहिस ना? आणि तो तूच असला पाहिजेस..!!! कारण त्याशिवाय... आंम्हाला हे सर्व जाणवले तरी असते का रे!?
मूर्त तू मानव्य का रे,बालकांचे हास्य का?
तुला एका ठराविक कल्पनेत कोंडता यावं अगर वर्णिता यावं असं तुझं(मूर्त) स्वरूप आहे का रे?, का त्याही बाहेर तू केवळ मानवतेच्या रूपात आहेस? की हे सारे नाहिच मुळी...!, अन तू फक्त ..जन्मापासून फक्त काहि कालावधी जाइपर्यंत..जे आंम्ही तुझे एक निरागसतेचे समरूप म्हणून जगतो... ते केवळ बाल्य आणि त्याचे प्रकटीकरणरूपं असलेलं..- जे हास्य आहे.. ते बालकांचे निरागस हास्य तू आहेस का? .. असायलाच हवसं! आणि तुला याविरुद्ध तक्रार करता येणारंही नाही..कारण जर तू या रुपातून वजा झालास,तर आंम्ही तुज विषयी अधिक काय कल्पायचे??? सांग बरं!
या इथे अन त्या तिथे रे सांग तू आहेस का?
किती तुझी रूपे वर्णावी..? किती विशदावी? किती कोड्यात पडून पहावी? तू नाहिस अशी पूर्ण खात्री पटली..तरिही...तुझ्या शोधाची भूक शमूच नये... या आमच्या..जीवन जगविणार्या प्रेरणाबीजाकडे...म्हणजेच- न संपणार्या कुतुहला कडे पाहून, तरी सांग आता.... "या इथे अन त्या तिथे रे सांग तू आहेस का?"
////////////////////////////////////////\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\
गीतः-सूर्यकांत खांडेकर __/\__/\__/\__
आणि ज्यांच्या संगीतंगायकी शिवाय, हे गीत माझ्या(सारख्या)पर्यंत-पोहोचूच शकले नसते,
त्या पं.हृदयनाथ मंगेशकर. यांस _-/\-_
==============================================
हे या गीताचे फक्त बिंब झाले...प्रतिबिंब..आता पुन्हा....असेच केंव्हातरी!
जेंव्हा मला ते पूर्ण छळेल.....तेंव्हा! :)
प्रतिक्रिया
8 Feb 2015 - 5:48 pm | स्पंदना
ह्या आत्म्याला बर्याच गोष्टी छळू देत अशी मनापासून इच्छा!!
सुरेख हो आत्मुस!!
आणि हे मनापासून बरं का!!
8 Feb 2015 - 6:21 pm | अजया
सुरेख लिहिलंय हो गुरुजी.
8 Feb 2015 - 9:04 pm | अनिवासि
_/\_ अप्रतीम -- धन्यवाद
8 Feb 2015 - 9:31 pm | अत्रन्गि पाउस
बाळासाहेबांनी लावलेली/गायलेली कॉम्प्लेक्स चाल ह्यामुळे अर्थ नीट ऐकलाच नव्हता ...सुरेख ...
8 Feb 2015 - 10:55 pm | माम्लेदारचा पन्खा
सहजसुंदर चाल, साधे शब्द पण गूढ अर्थ यामुळे ऐकणारा अक्षरशः तल्लीन होतो...
9 Feb 2015 - 5:05 am | चौकटराजा
बुवा तुमच्यात एक आचार्य अत्रे दडलेला आहे." बुवा तेथे बाया" हे लिहिणारे व श्यामची आई चे दिगदर्शन करणारे असे ते भिन्नता दर्शी व्यक्तिमत्व ! म्हणून वयाने मोठा असूनही तुम्हाला सा. न.
आता चौरा मोड ऑन - बुवा, ज्या कवितांसाठी तुम्हाला पद्मश्री मिळणे आवश्यक आहे त्याना उतारा म्हणून हे वरचे काय ते लिहैले आहे का ......आँ .....?
9 Feb 2015 - 5:19 pm | हाडक्या
बुवांना "पद्मश्री" हवीच हवी.. ;)
9 Feb 2015 - 5:25 am | स्पंदना
कितीदा वाचावं? कितीदा ऐकावं?
मस्त !!
9 Feb 2015 - 8:03 am | स्वाती२
आवडले.
9 Feb 2015 - 8:27 am | प्रचेतस
मूळ गाणंच माहिती नसल्याने आमचा पास.
9 Feb 2015 - 9:04 am | अत्रुप्त आत्मा
@मूळ गाणंच माहिती नसल्याने आमचा पास.>>> मग ते एका. (म्हणुनच ते वरती व्हिडो क्लिपित लावलय!
.
.
.
.
.
.
.
.
ना! :-\ )
(दू...दू...दू... संगित अनासक्त हत्ती! :-\ मूर्तिशिल्पांमधे जो संवाद क्यामेय्रानी शोधता,तोच कवीने इथे (निसर्गाबरोबर..) कल्पनेनी बांधलेला आहे. एकदा बघा की! :-\ )
9 Feb 2015 - 9:24 am | प्रचेतस
=))
अहो मोबल्यावर आहे म्हणून व्हिडो बघता येत नैय्यॆ.
9 Feb 2015 - 11:57 am | सविता००१
वल्ल्या?????????
काय हे?
मूळ गाणंच माहिती नसल्याने आमचा पास.
असं असू शकतं???????
9 Feb 2015 - 12:32 pm | प्रचेतस
हो ना. :(
खरंच माहिती नै.
9 Feb 2015 - 12:34 pm | सविता००१
असा कसा तू?????????
अशक्य कहर आहेस
9 Feb 2015 - 12:37 pm | प्रचेतस
गाण्यांच्या बाबतीत औरंगजेब असे काही मित्र आम्हास म्हणतात. :)
9 Feb 2015 - 12:44 pm | सविता००१
मी पण आपणांस औरंगजेब असे संबोधेन ;)
10 Feb 2015 - 9:52 am | टवाळ कार्टा
काही गाणी सोडली तर मी गाण्याच्या बाबतीत औरंगजेब-२ असेन :(
9 Feb 2015 - 4:35 pm | कहर
*pardon* आता मात्र "कहर" झाला
9 Feb 2015 - 4:38 pm | सविता००१
अहो, ते वल्ल्याला म्हणालेले कहर तुम्ही नाही हो ;)
10 Feb 2015 - 2:30 am | डॉ सुहास म्हात्रे
आँ ????????????????????????
9 Feb 2015 - 8:28 am | मितान
सुरेख!!!
9 Feb 2015 - 8:35 am | स्वामी संकेतानंद
आवडले !
गुर्जी हे काम पण चागंलं करतात तर. दीक्षा घ्यायला पाहिजे.
9 Feb 2015 - 8:41 am | नाखु
असं अत्रंगी लिहिता आणि खरे बुवा कुठले या गुंत्यात आम्ही प्रेमाने गुंतत जातो !!
निरूपण रसाळ आणि समजायच्या भाषेत लिहिल्याबद्दल विशेष धन्यवाद.
सकाळचे ८.३० वाजलेत भक्ती संगीतात ऐकूयात "अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग"
9 Feb 2015 - 9:21 am | विटेकर
काहीही कळळे नाही ..
पास !
9 Feb 2015 - 9:29 am | विशाल कुलकर्णी
छानच ...
9 Feb 2015 - 10:51 am | अन्या दातार
अप्रतिम हो बुवा!!
मागे एकदा याचे शब्द वाचता वाचता स्वतःलाच हरवून गेलो होतो आणि २ दिवस सलग एकच एक गाणे ऐकत होतो.
थोडीशी भर - आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का?
आकाशात चमकणारी वीज जशी क्षणभरच असते, पण डोळे दिपवून जाते, तसेच भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव क्षणभरच होईल पण जीवन उजळून निघेल.
असे माझे २० शब्द लिहून संपवतो.
9 Feb 2015 - 11:10 am | अत्रुप्त आत्मा
येस्स स्सर! :HAPPY:
9 Feb 2015 - 11:59 am | सविता००१
गुर्जी,
अप्रतिम लिहिलंत
9 Feb 2015 - 12:47 pm | यशोधरा
सुरेख.
10 Feb 2015 - 12:13 am | रुपी
जेव्हा जेव्हा गाडी चालवताना CD वर हे गाणं लागतं तेव्हा कमीत कमी चार पाच वेळा ऐकल्याशिवाय पुढचं गाणं ऐकायची मनाची तयारी होत नाही. या गाण्याची चाल आणि पं.हृदयनाथांनी जसं गायलं आहे तसं गाण्याचा प्रयत्न करता करता दमछाक होते, त्यामुळे गाण्याचा अर्थ काय असेल याचा विचार करायला कधी जमलंच नाही. पण हे गाणं कुणाला उद्देशून लिहिलं असेल हा प्रश्न मात्र नेहमीच पडायचा. तुम्ही इतका सुरेख अर्थ दिल्याबद्दल धन्यवाद!
10 Feb 2015 - 3:23 am | स्रुजा
फार सुंदर लिहिलयेत ! हे अप्रतिम गाणं आधीच अत्यंत आवडतं त्यात तुमच्या लिखाणामुळे नव्याने आवडायला लागलंय. आज दिवसभर काम करताना पण या गाण्याने पिच्छा सोडला नाही.
11 Feb 2015 - 3:43 pm | अत्रुप्त आत्मा
aparna akshay
*YES*
================================
अजया,अनिवासि,अत्रन्गि पाउस,माम्लेदारचा पन्खा,स्वाती२,मितान,विशाल कुलकर्णी,सविता००१,यशोधरा,
मनःपूर्वक धन्यवाद.
=================================
चौकटराजा
@बुवा तुमच्यात एक आचार्य अत्रे दडलेला आहे.>>> हम्म्म्म..! हे बाकि बरेच बरोबर ताडलेत.कारण अगदी अलिकडेपर्यंत, मी (पु.ल. व अत्रे..) या दोघांचा भक्त होतो. आणि तेंव्हा जे एका कवितेत म्हणालो आहे,तेच आता परत थोडे बदलून म्हणतो..
@" बुवा तेथे बाया" हे लिहिणारे व श्यामची आई चे दिगदर्शन करणारे असे ते भिन्नता दर्शी व्यक्तिमत्व ! म्हणून वयाने मोठा असूनही तुम्हाला सा. न. >> नको हो नको चौराकाका नको.. सप्रेम नमस्कारच राहू दे. मी त्यांच्या इतकी (कोणतीच.. ;) ) उंची-घेऊ शकत नाही. मी खरच त्यांच्या मनानी फार बुटका माणूस आहे अजुन. ,तनानि आणि काहिसा मनानिही! :)
@आता चौरा मोड ऑन - बुवा, ज्या कवितांसाठी तुम्हाला पद्मश्री मिळणे आवश्यक आहे त्याना उतारा म्हणून हे वरचे काय ते लिहैले आहे का ......आँ .....? >>> =)) छे! छे! हल्ली तिकडून एकं-दरीतच उतरलो आहे. =)) त्याचा हा प्रत्यय आहे,असे म्हणा हवे तर. :)
==========================================
हाडक्या
@बुवांना "पद्मश्री" हवीच हवी.. >>> कोण-ती? =))
===========================================
इस्पीकचा एक्का
आँ ???????????????????????? >>> (हा प्रति'साद माला असेल तर.. ;) ) -- हाँssssssss! :D
===============================================
स्वामी संकेतानंद
@आवडले ! >>> धन्यवाद.
@गुर्जी हे काम पण चागंलं करतात तर. >> करत-नाही! कधि कधि होते. :)
@ दीक्षा घ्यायला पाहिजे.>> __/\__ स्वामिज्जी... लाजवता काय आंम्हाला. :)
===============================================
नाद खुळा
@असं अत्रंगी लिहिता आणि खरे बुवा कुठले या गुंत्यात आम्ही प्रेमाने गुंतत जातो !! >> आहो आमचाहि मेला-गुंताच आहे हा सारा.. =)) मलाहि कधिकधि कळत नाही,नक्कि मी कुठला? या गावचा कि,त्या गावचा? :)
@निरूपण रसाळ आणि समजायच्या भाषेत लिहिल्याबद्दल विशेष धन्यवाद.>> थँक्यू........... *YES*
======================================================
विटेकर -
@काहीही कळळे नाही ..>> काहिच हरकत नाही..फक्त काय कळले नाही?,ते जाणुन घेण्यास उत्सुक आहे. :)
@पास ! >> ओक्के.. नो त्रास. :)
==============================================
रुपी
@जेव्हा जेव्हा गाडी चालवताना CD वर हे गाणं लागतं तेव्हा कमीत कमी चार पाच वेळा ऐकल्याशिवाय पुढचं गाणं ऐकायची मनाची तयारी होत नाही. >>> ह्हा ह्हा ह्हा ह्हा! सेम हिअर. :)
@हे गाणं कुणाला उद्देशून लिहिलं असेल हा प्रश्न मात्र नेहमीच पडायचा.
तुम्ही इतका सुरेख अर्थ दिल्याबद्दल धन्यवाद!>> *YES* धन्यवाद हो... धन्यवाद!
====================================================
स्रुजा
@फार सुंदर लिहिलयेत ! हे अप्रतिम गाणं आधीच अत्यंत आवडतं त्यात तुमच्या लिखाणामुळे नव्याने आवडायला लागलंय.>> :Happy:
समंसमांतरः- अश्या लेखनातून ,अशी किमया घडत असेल...तर असं लेखन सुचलं की करावंच लागेल.
==========================================================
सूड
@आवडतं गाणं !! >> माझंही!
====================================================
10 Feb 2015 - 2:31 pm | सूड
आवडतं गाणं !!
13 Feb 2015 - 11:48 am | अत्रुप्त आत्मा
सर्व वाचक,प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद. :)
13 Feb 2015 - 2:03 pm | प्रचेतस
अहो आभार तर आम्हीच तुमचे मानायला हवेत.
इतक्या सुरेख लेखांची मेजवानी तुम्ही आम्हा सर्वांना देत आहात.
13 Feb 2015 - 2:38 pm | गौरी लेले
वाह !
कित्ती छान लिहिले आहे , आज तुमच्या मुळे ह्या कवितेचा अजुन एक पैलु लक्षात आला .
अत्रुप्तजींच्या लेखनातील साधेपणा मनाचा ठाव घेणारा आहे :)
शुभेछा !
13 Feb 2015 - 3:27 pm | चाणक्य
वाह बुवा. मजा आली.