प्रत्येक नजर वाटे
धरतेच डूख आता
स्त्रीजन्म हीच आहे
हर स्त्रीची चूक आता ||धृ||
हक्क कितीक आले
आरक्षणेही आली
आणि वेगळेपणाची
मग लक्षणेही आली
गर्दीत पुरुषांच्या
कोंडतो श्वास येथे
एकटेपणात होतो
भलताच भास येथे
शोधता स्नेह नयनी
दिसतेच भूक आता
कळपात श्वापदांच्या
गत होई जी हरणाची
होते तशी अवस्था
अन भीती ही मरणाची
एकही भला चेहरा
ना वाटतो आधार
सर्वांसमक्ष येथे
घडतोही अत्याचार
सगळा समाज वाटे
झालाय मूक आता
प्रत्येक नजर वाटे
धरतेच डूख आता
स्त्रीजन्म हीच आहे
हर स्त्रीची चूक आता
- अपूर्व ओक
प्रतिक्रिया
29 Jan 2015 - 5:05 pm | भावना कल्लोळ
स्त्रीची घुसमट छान शब्दात मांडली आहे, खरेच सध्याच्या स्थिती मध्ये हि कविता चपलक बसते आहे.
29 Jan 2015 - 7:45 pm | प्यारे१
चपलक? चपखल हवं का?
29 Jan 2015 - 7:49 pm | शिद
माझी पण नेहमी गल्लत होते.
बोलताना नेमका उच्चार काय आहे? चपलख की चपखल?
30 Jan 2015 - 2:44 pm | बॅटमॅन
प्रमाणभाषेतला शब्द चपखल असाच बह्वंशी वाचला आहे. तदुपरि वेगवेगळ्या व्हर्जन्स असणारच.
30 Jan 2015 - 3:24 pm | शिद
ओके. धन्यवाद. :)
29 Jan 2015 - 5:33 pm | स्वप्नांची राणी
"स्त्रीची घुसमट छान शब्दात मांडली आहे" हे बरोबरच आहे ग भावना. पण तरिही मला ही थोडी आउटडेटेड कविता वाटतेय. आजची स्त्रि आता ईतकी लाचार नाहिये तर, बर्यापैकी स्वयंसिद्धा झालीय. 'अरे' ला 'का रे' करण्याची धमक पण येतेय. आपले हक्क, अधिकार समजतायेत तिला बरोबर. समाजही धिम्यागतीनी का होईना पण निश्चितच बदलतोय, खरं म्हणजे स्त्रि हा बदल घडवून आणतेय.
या कवितेत फारच लाचार, दुबळी, गरिब, हेल्पलेस आणि होपलेस स्त्रि रंगवलीय यार... आणि पुरुषांचे जग म्हणजे अगदी 'no woman's land' टाईप भितीदायक दाखवलय. दोन्हीही कडे टोकच गाठलय.
29 Jan 2015 - 6:38 pm | भावना कल्लोळ
लोकल मध्ये कधी चुकून किवा सहकुटुंबहि पुरुष डब्ब्यात चढल्यावर तिथे आपल्यावरच रेंगाळणाऱ्या नजरा, स्थानकावर लोकलची वाट पाहत उभे असताना , बस मध्ये गर्दीच्या ठिकाणी आणि बरीच उदाहरणे देईन मी.आज हि इथली स्त्री एकटीने पुरुष डब्ब्यात चढण्याचे धाडस करणार नाही. मुंबई महानगरात रोज संध्याकाळी अश्या घटना रोज आंखो देखी आहेत. अपवाद असतील पण १०%. पण रोजच्या दिनचर्यात अश्या किती तरी नजरांचा सामना इथल्या स्त्रियांना करावा लागतो. छेडले जाणे हे क्वचित असले तरी अश्या नजरां रोज किती तरी स्त्रियांना सहन कराव्या लागतात. काहीजणी दुर्लक्ष करतात, काहीना फरक पडत नाही, काहींना असे काही असते हे कळतच नसते मुळात आणि काही ज्यात मी मोडते संताप होतो, शक्य तिथे नजरेने प्रतिकार करते, जमेल तिथे दोन लगावून हि देते पण माझा प्रश्न मुळात हाच कि का? तुमच्यासारखीच एक माणुस म्हणुन नाही पाहू शकत का? स्त्री आहे म्हणुन का या नजरा सहन करायच्या. स्त्री स्वयंसिद्धा झाली आहे, निर्भर आहे पण म्हणुन का हि मानसिकता बदलणार आहे का? परत मी सगळेच असे आहेत असे म्हणत नाही आहे पण किती हि पुढारले असले तरी त्यांच्यातला हा "पुरुष" ज्या दिवशी बदलेल तो सुदिन.
29 Jan 2015 - 7:02 pm | स्वप्नांची राणी
+१.. हेच म्हण्ते ग. पण पुरुषी मानसिकतेवर हि कविता काहिच भाष्य करत नाहीये. आणि किती सरसकटिकरण केलय. आणि वर परत 'स्त्रि जन्म हीच आहे चूक...' वगैरे आणखीन मानसीक खच्चीकरण. म्हणजे कवीचा हा उद्देश्य नाहिये ग, पण ध्वनित होतोय तसाच. या छापाच्या कवितांमुळे संतापानी पेटून उठणं वगैरे तर राहू द्यात बाजुलाच पण निरर्थक संशयाच वातावरणच निर्माण व्हायच.
29 Jan 2015 - 5:49 pm | स्पा
१९७० सालची कविता आहे का ? :)
29 Jan 2015 - 5:50 pm | स्वप्नांची राणी
+१११... मी १८५७ म्हणणार होते..
29 Jan 2015 - 5:51 pm | स्पा
=))
29 Jan 2015 - 5:52 pm | बॅटमॅन
ठ्ठो =))
बरं झालं तुम्हीच बोललात ते. नायतर सगळ्या सूडोअनाहितांचे वाग्बाण सुरू झाले असते.
29 Jan 2015 - 5:56 pm | सूड
सारखं सूडोअनाहिता नको बे म्हणूस, लोकांना तो सामासिक शब्द वाटतो. ;)
29 Jan 2015 - 6:00 pm | हाडक्या
हम्म सूड भौ... ;)
29 Jan 2015 - 6:02 pm | सूड
ह्म्म हाडक्याभौ!!
29 Jan 2015 - 6:09 pm | बॅटमॅन
अरे तो वाटला तरी सूडोसामासिक आहे. ;) =))
29 Jan 2015 - 6:02 pm | स्वप्नांची राणी
हे असले सतत भाकड बार काढून आता काही दारुगोळा शिल्लक आहे का हो अजून...
29 Jan 2015 - 6:08 pm | बॅटमॅन
भाकड म्हणता म्हणता गोळा जाऊन लागलेला दिसतोय की =))
29 Jan 2015 - 6:27 pm | स्वप्नांची राणी
नेम चुकतायेत हो... छे बाई...भल्याचा जमानाच नाहिये...
29 Jan 2015 - 6:43 pm | बॅटमॅन
कोण हा भल्या?
तदुपरि शेवटचे वाक्य वाचून "वयं युष्माकं के?" नामक चित्रपटातील "हे राम, युवतीनां एतद्युगम्" नामक गाण्याची आठवण झाली.
("वयं युष्माकं के" प्रेमी) बॅटमॅन.
29 Jan 2015 - 6:54 pm | स्वप्नांची राणी
'भल्या'च सोडा हो. पण हे असं 'हल्या'सारख एक-एकटं किती दिवस हवाबाण किंवा हवागोळे म्हणा सोडत राहणार... कल्जि वटते...
29 Jan 2015 - 6:59 pm | बॅटमॅन
कल्जि स्वतःपुरती ठेवा हो. अम्चि कल्जि कर्न्रे समर्त अहेत.
शेवटी हवाबाण वा हवागोळे सोडणं हे कॉमनच आहे. एकटं काय अन दुकटं काय. तस्मात कल्जि वतयचि असेल त्र हव्बन सोदन्यचि वतवि. एकत्य-दुकत्यचि नहि.
29 Jan 2015 - 7:00 pm | बॅटमॅन
*सोदने हे एकत्य व दुकत्यसथि कोमन अहे असे वचवे.
29 Jan 2015 - 7:07 pm | स्वप्नांची राणी
पटल... पण सतत असे एकाक्शरी प्रतिसाद कॉपी-पेस्ट करण्यापेक्शा काहितरी ठोस अभिप्रेत आहे तुमच्याकडून. ठ्ठो म्हणजे अति झालं न हसू आलं .. आय मीन, हसू पण येत नाही ईतकं फुसकं झालय.
अवांतर : चला, आमचा विकेंड सुरु!!!
30 Jan 2015 - 2:44 pm | बॅटमॅन
ठोस अभिप्रेत असेल तर ठ्ठो मध्ये त्यातला ठो आलेलाच आहे की. पुढे स आला काय नाय काय.
29 Jan 2015 - 5:55 pm | सूड
फारच जनरलायझेशन केलंय!! 'जळ्ळा मेला पुर्षाचा जल्म' टाईप प्रतिक्रिया टायपायला लागाव्या अशी उदाहरणे अजिबात आलेली दिसत नाहीत किंवा चान चान लिहायचं म्हणून लिहीलंय.
29 Jan 2015 - 6:00 pm | स्पा
एकदम भडक झालीये राव कविता, हरणांचे कळप काय, श्वापद काय
घाबल्लो एकदम
29 Jan 2015 - 6:09 pm | बॅटमॅन
च्यायला स्पांडू ही काय तुझी भयकथा वाटली काय बे =))
29 Jan 2015 - 6:05 pm | वेल्लाभट
असे प्रतिसाद अपेक्षित होतेच. 'स्वप्नांची राणी' कतारात राहता तुम्ही. तुमच्याइथे शिरच्छेदाच्या वगैरे शिक्षा असतात असं 'ऐकून' आहे. इथे तसं काही फारसं नसतं.
काही अंशी मान्य करतो तुमचं की अगदी इतकी अवस्था मुळीच नाही. जनरलायझेशन झालंय इत्यादी. मान्य.
एवढच सांगतो की गर्दीच्या ठिकाणी मुलींकडे/बायकांकडे आसपासची उपस्थित मंडळी कशी बघतात हे मी जेंव्हा बघतो तेंव्हा मी जे म्हटलंय तेच मला वाटतं.
बाकी चालूदे पानिपत.
29 Jan 2015 - 7:50 pm | पैसा
असे अनुभव येतात. बलात्कार, स्त्रीभ्रूणहत्या थांबल्याचं ऐकू येत नाही, बातम्या येतच असतात. तरी एकीकडे लग्नाला मुली मिळत नाहीत अशीही तक्रार ऐकू येते आहे. विरोधाभास सगळीकडे. सुवर्णमध्य कधी साधला जाईल?
29 Jan 2015 - 7:56 pm | स्वप्नांची राणी
कतारात असले तरि सुरुवातीची वर्ष हे सगळे अनुभव घेत भारतातच काढलेली आहेत. पण या नजरांचा, नको तिथे स्पर्शान्चा मी सामना करत असताना त्या गर्दीतून कधीही कोणतीही मदत मिळालेली नाहिये मला. बर...मदतीची अपेक्षाही नाही पण त्या गर्दीतून एकहि ओळ 'पुरुषा तुझ्या जन्माची बाळग लाज आता'अशी येऊ नये....? म्हणजे त्या गर्दीचा तुम्ही एक हिस्सा आहात आणि तरीही त्या स्त्रिनेच स्वत:चा जन्म हीच चूक इतकी अगतिकता सहावि??
बाकी, हल्ली असल्या विषयांवरुन पानीपत होत नाही मिपावर. आणि पर्सनली घेऊ नका प्लीज.
29 Jan 2015 - 8:03 pm | वेल्लाभट
मी पर्सनली घेत नाहीच. पण तुम्ही 'लिटरली' घेतलंत ! 'स्त्रीजन्म हीच चूक' हा उद्वेगजन्य उपहास आहे; शेरा किंवा मत वगैरे नाही. त्यामुळे त्याचा शब्दार्थ नका ना घेऊ. मग कळेल काय म्हणायचं आहे ते.
29 Jan 2015 - 8:18 pm | स्वप्नांची राणी
मान्य आहे.☺
29 Jan 2015 - 8:03 pm | सुचेता
समजतोय ग तुला काय म्हणायचेय ते, आणि सुवर्णमध्य साधला जाईल तो सुदिन
29 Jan 2015 - 8:16 pm | स्वप्नांची राणी
कवी ची प्रतिभा आणि कोणाच्या मनात कधी काय विचार यावेत आणि ते कसे व्यक्त व्हावेत याबद्दलचा तुमचा पूर्ण अधिकार मला मान्य आहे इतकेच सांगून मी माझ्यातर्फे काही वाद सुरु होत असेल तर त्यावर पडदा टाकते. आणि हवाईझादा पहायला जाते.
ओपन फोरम वर व्यक्त व्हायचा माझाहि अधिकार आहेच मुळी!!!
30 Jan 2015 - 2:47 pm | बॅटमॅन
नै म्हणजे तुमचे सगळे अधिकार मान्य आहेत. पणः
<आगंतुक भोचक सल्ला मोड ऑन>
हवाईज़ादा हा पिच्चर बघू नका. वायझेड थीम आहे पिच्चरची.
<आगंतुक भोचक सल्ला मोड ऑफ>
30 Jan 2015 - 2:48 pm | बॅटमॅन
लाखो लोकांच्या मनात चुकीच्या कल्पना भरवून देणारा पिच्चर आहे. तो बघू नका प्लीज़. :(
30 Jan 2015 - 5:03 pm | स्वप्नांची राणी
+१११ पण ईन फॅक्ट... म्हणूनच बघायचाय. वैदिक विमानं उडवत कोणत्या थराला गेलेत हे पहाय्चय.
30 Jan 2015 - 5:16 pm | बॅटमॅन
हम्म....पहा आणि परीक्षण लिहा म्हणजे 'व्हाय शुड आय सफर अलोन' चे उत्तरही स्वतःच देऊ शकाल.
तदुपरि काही माहिती देत आहे. तुम्हांला वा अजून कुणाला अगोदर माहिती असेलही पण जनहितार्थ इ. जारी.
तळपद्यांनी जे कै उडवले ते बलूनछाप होते. राईट बंधूंचे क्रेडिट हे की त्यांनी 'हेवियर दॅन एअर' विमान उडवले. एरवी जडपणामुळे जे हवेत उडू शकणार नाही असे विमान त्यांनी इंजिनाच्या जोरावर हवेत उडवले. 'लाईटर दॅन एअर' असलेले बलूनसारखे प्रकार अगोदरपासूनच अस्तित्वात होते. आणि भारतातही बलून उडवणारे तळपदे हे पहिले नव्हेत. त्यांची बातमी १८९५ ची आहे, तर १८८०-८५ च्या आसपास गुजरातेत एकाने तसे बलून उडवल्याचेही वाचले आहे.
त्यामुळे कशालाच कसलाही आधार नाही.
30 Jan 2015 - 3:11 pm | एस
कवितेच्या भाव्यार्थाशी सहमत आहे. बर्याचदा अशा प्रवृत्तींचा विषाद वाटतो. मानवजातीचा एक हिस्सा म्हणून मला व्यक्तिशः कधीकधी शरम वाटते समाजाच्या या बिनचेहर्याच्या गर्दीच्या वागणुकीची.
31 Jan 2015 - 8:39 pm | यशोधरा
वेल्ला, अशा प्रवृत्ती आहेत हे नक्की आणि कमी अधिक प्रमाणात त्या प्रत्येकीला अनुभवायलाही येत असतात. कविता पोहोचली.