नमस्कार,
जसे आपल्याकडे गौरी गणपतीची दुकानांमध्ये आणि घरोघरी धामधुम असते तशीच ईथे (म्हणजे अमेरिकेत) क्रिसमसची धामधुम असते. थॅकंसगिव्हिग डे झाला की क्रिसमच्या विविध सजावटीच्या वस्तू मॉल व दुकानांमध्ये दिसू लागतात. यामध्ये असतात क्रिसमस ट्रीज, कँडीज, रोषणाईच्या दिव्यांच्या माळा व लहान मुलांसाठी क्रिसमस व्हिलेज इत्यादी.
दुकानातील विविध वस्तूंची आकर्षक रचना करून वातावरणनिर्मिती केली जाते.
सेंट पॉल येथील ३ एम कंपनीच्या मुख्यालयाच्या इमारतीमधील दिव्यांची कल्पक रचना करून क्रिसमस ट्रीची भव्य आकृती दाखवली जाते जी अनेक मैल अंतरावरूनही पाहता येते.
हा फोटो जालावरून साभार.
जसा जसा क्रिसमस जवळ येउ लागतो तसे तसे घरांभोवतीची झाडे, कार्यालय, रस्ते, मॉल्स हे रोषणाईने ऊजळू लागतात. अनेक ठिकाणची सजावट पाहून थक्क व्हायला होते. खरे सांगायचे तर लोकांच्या कला कौशल्याचा आविष्कार पाहायला मिळतो.
सभोवताल शुभ्र बर्फ पडलेला असल्यास या रोषणाईचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.
आमच्या घराजवळच राहत असलेले एक कुटुंब दरवर्षी क्रिसमसच्या रोषणाईचा मोठा प्रकल्प हाती घेते. त्यांच्या अंगणातील मोकळ्या जागेचा व झाडांचा पुरेपूर वापर करून ते कल्पकतेने रोषणाई करतात. याखेरीज विशेष आकर्षणाची बाब म्हणजे संगीताच्या तालावर हे दिवे थिरकत असतात. या घराच्या जवळ गेल्यावर आपल्या गाडीचा एफएम रेडिओ एका विशिष्ट फ्रिकवेन्सीवर ट्यून करायचा आणि त्या तालावर नाचणारे हजारो दिवे पाहायचे. हा लाईट शो पहिल्यांदा २००३ साली सुरू झाला. २०१४ साली सुमारे पाच हजार पेक्षा जास्त दिवे कॉंप्युटर प्रोग्रामद्वारा नियंत्रीत करून विविध प्रकारचे ऍनिमेशन दाखवले जात होते. अधिक माहिती साठी हा दुवा पाहा - प्लिमथ लाईट्स.
क्रिसमसच्या आठवड्यात विविध मॉल्समध्ये सॅन्टाबरोबर फोटो काढून घ्यायला बाळगोपाळ व त्यांच्या पालकांची झुंबड उडते. अशाच प्रसंगी रांगेतील पुढच्या कुटूंबाची वाट पाहणारा एक सॅन्टा.
~ ख्रिस्तजन्माचे विविध देखावे ~
हाडे गोठवणाऱ्या थंडीत राबून अप्रतिम रोषणाई करणाऱ्या सर्वांना मनापासून धन्यवाद.
प्रतिक्रिया
19 Jan 2015 - 10:01 am | अदि
खूप सुन्दर!!!
19 Jan 2015 - 10:23 am | पियुशा
अप्रतिम !!!!
19 Jan 2015 - 12:44 pm | अत्रुप्त आत्मा
हायला...हायला!!! लै भारी,मंजे लैच भारी!
19 Jan 2015 - 12:47 pm | एस
मस्त!
सार्वजनिक जीवनातील रचनासौंदर्यवाद (शब्द सौजन्य - चित्रकार रवी परांजपे) पाश्चात्यांमध्ये जेवढा पहायला मिळतो तेवढा आपल्या भारतीय जनमानसात दिसत नाही. आपली घरे आतून सुंदर, स्वच्छ असतात. बाहेरून ओबडधोबड, रस्त्यावर कचरा टाकलेला. असो.
19 Jan 2015 - 12:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
लै भारी !
19 Jan 2015 - 1:18 pm | अभ्या..
लैच भारी फोटो. मस्त आलेत एकदम.
अभिनंदन.
19 Jan 2015 - 1:21 pm | बोका-ए-आझम
फोटो फारच छान!
19 Jan 2015 - 2:56 pm | प्रचेतस
सुरेख फोटो
20 Jan 2015 - 12:01 am | रेवती
सुंदर फोटू. एकदम रंगीबेरंगी!
20 Jan 2015 - 1:53 am | मुक्त विहारि
आवडले.
20 Jan 2015 - 2:58 am | सखी
छान रंगीबेरंगी फोटो आणि ख्रिसमस संपला की स्नो संपला तरी चालेल असे वाटत रहाते :)
20 Jan 2015 - 4:25 am | स्पंदना
मस्त!!
झगमगाट पाहून फार छान वाटत असेल ना इतक्या थंडीत?
आमच्या कडे ख्रिस्त्मस उन्हाळ्यात येतो. तरीही खूप जणांच्या आवारात रोषणाई आसते.
20 Jan 2015 - 9:33 am | जुइ
सर्व प्रतिसादकांचे आभार!!
21 Jan 2015 - 1:47 am | सौन्दर्य
सुंदर फोटो आणि तितकीच चांगली माहिती. ख्रिसमसचे अजून एक आकर्षण म्हणजे आपापसात वाटली जाणारी गिफ्ट्स. अनेक कुटुंबात एकमेकांना द्यावयाची गिफ्ट्स घरातल्या ख्रिसमस ट्री खाली ठेवतात, आणि ख्रिसमसच्या दिवशी एकमेकांना वाटली जातात. आबालवृद्ध सारख्याच उत्साहाने आणि उत्सुकतेने मिळालेली गिफ्ट्स उघडून बघण्यात दंग असतात. जे नातेवाईक, मित्र दूर राहतात त्यांना गिफ्ट्स पोस्टाने, कुरियरने पाठवल्या जातात. दुकानात डील्स लागतात आणि खरेदी करणार्यांची झुंबड उडते. एकूण सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरलेले असते.
21 Jan 2015 - 2:38 pm | मदनबाण
मस्तच ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Teri Deewani... { Kailash Kher }
21 Jan 2015 - 9:28 pm | पैसा
दिवाळीसारखं उत्सवी वातावरण दिसतंय एकूण! फोटो फार म्हणजे फार सुंदर आलेत! मस्तच!