नमस्कार मिपाकरांनो,
कसे आहात?
इथे नविन सभासदांना मराठीत टाइप करायला बर्याच अडचणी येतात.
सुरुवातीला मला पण थोडा त्रास झाला.
त्यामुळे, मराठीत कसे टाइप करावे? ह्यासाठी हा धागा काढत आहे.
सुरुवातीला आपण बाराखडी बघु या.
पहिली महत्वाची गोष्ट ----- तुमच्या कळफलकाचे "Caps lock" नॉर्मल ठेवा.थोडक्यात अक्षरे छोट्या लिपीत यायला पाहिजेत.
अ = a
आ = aa
इ = i
ई = I (Capital I)
उ = u
ऊ = U (Capital U)
ए = e
ऐ = ai
ओ = 0
औ = au
अं = aM
अ: = a:
आता आपण काही मुळाक्षरे बघू या....
क = k
ख = kh
ग = g
घ = gh
त = t
थ = th
द =d
ध = dh
न= n
ण = N (Capital N)
य = y
र = r
ल = l
व = w
स = s
श = sh
ष = Sh
ह = h
ळ = L
क्ष = x
ज्ञ = dny
ऋ = Ru
आता आपण काही साधे शब्द घेवू या.....
शरद = sharad
नमन = naman
कर = kar
आता थोडे काना वाले शब्द.....
बाबा = baabaa
मामा = maamaa
नाना = naanaa
आता आपल्याला साधारण टायपिंग जमायला लागले असेल.
-------------------------------
काही साधी वाक्ये...
१. कमळ घर बघ. ====> kamal ghar bagh.
२. गगन सदन बघ ====> gagan sadan bagh.
३. बाबा मला खाऊ हवा ===> baabaa malaa khaaU hawaa.
४. मामाला सिनेमा आवडतो. ===> maamaalaa sinemaa aawaDato.
मराठीत टाइप करताना
शक्यतो एखादा शब्द लिहील्यानंतर किमान दोन वेळा स्पेस बार दाबा.
शब्दांत थोडे अंतर असले तरी चालेल.
लेख किंवा प्रतिसाद प्रकाशित करण्यापुर्वी, एकदा तपासून बघा.दोन शब्दांतील अंतर योग्य करा.
सुरुवातीला ४-५ वाक्ये लिहीतांना पण त्रास होईल.पण प्रयत्न केला तर नक्कीच जमेल.
काही जोडाक्षरे....
शब्द ===> shabda
पुष्प ==> puShpa
कष्ट ==> kaShTa
आता तुम्ही थोडा प्रयत्न करा.
नाहीच जमले तर आम्ही सगळे खरे मिपाकर आपल्या मदतीला तयार आहोत.
शंका विचारायला संकोच करू नका.
प्रतिक्रिया
31 Dec 2014 - 11:32 pm | सतिश गावडे
>> मिसळपाव वर टायपिंग करण्याच्या काही टिप्स
मिसळपाववर टंकलेखन करण्याच्या काही विशेष सुचना ;)
दोन शब्द माझ्याकडूनः
समष्टी = samaShTee
व्यामिश्रता = vyamishrataa
31 Dec 2014 - 11:32 pm | श्रीरंग_जोशी
मिपावर उपलब्ध असलेले अधिकॄत टंकलेखन सहाय्य येथे आहे.
अवांतर - शुद्धलेखन मार्गदर्शन; मनोगत शुद्धिचिकित्सक.
31 Dec 2014 - 11:35 pm | सतिश गावडे
मनोगत अजून जिवंत आहे हे पाहून डोळे पाणावले.
त्याच्या शुद्धिचिकित्सकावरील "कृपया धीर धरा. शुद्धिचिकित्सकाशी संधान चालू आहे" हा संदेश वाचून पाणावलेले डोळे अधिक पाणावले.
31 Dec 2014 - 11:51 pm | कंजूस
नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा !
मराठी लिहिण्यासाठी इंग्रजी अक्षरांच्या पाठीत दणके घालावे लागतात हे वाचून ड्वाळे (डोळे) आणखीनच प्वाणावले (पाणावले).
मी बोलतो मराठी, लिहितो मराठी ,टंकतोही मराठीच.
1 Jan 2015 - 8:51 am | अजया
मी मोबाईल आणि टॅबवर AnySoftKeyboard वापरुन टंकते.वापरायला एकदम सोपे आहे.सर्व अक्षरे,जोडाक्षरे लिहिता येतात.अपवाद र्या/-या!!
1 Jan 2015 - 10:26 am | कंजूस
मला एकाने त्याच्या अॅनडरॉइडवरचे 'मराठी एडीटर' नावापे अॅप दाखवले. पूर्ण मराठी किबॉर्ड येतो जोडाक्षरे फारच सोपी आणि मराठी लिहिण्याचा आनंद मिळतो करून पाहा.
1 Jan 2015 - 10:38 am | सुनील
ज्यांना टंकन जमत नसेल त्यांनी एक टंचनिका टंकनिका ठेवावी!! ;)
1 Jan 2015 - 10:49 am | मुक्त विहारि
पण ती टंकनिका चुकुन घरवाली झाली तर...
????????
1 Jan 2015 - 12:54 pm | कंजूस
तर कधी बाजीराव कधी गुलाम
1 Jan 2015 - 1:22 pm | अत्रुप्त आत्मा
@तर कधी बाजीराव कधी गुलाम >>> 8P
1 Jan 2015 - 11:52 am | पैसा
धागा मस्त झाला आहे!
@कंजूस, आम्हाला मराठी टायपिंग येत नाही ना, मग फोनेटिक कीबोर्ड त्यातल्या त्यात छान. त्यातही इंग्रजी अक्षरांना धपाटे घालायला लैच मजा येते!
एक कॉमन प्रॉब्लेम म्हणजे गूगल क्रोम किंवा इंटरनेट एक्सप्लोरर वापरणार्यांनी गमभन सुविधा वापरत असताना अनवधानाने बॅकस्पेस की दाबली तर अक्षरे आपला हुकूम मानत नाहीशी होतात आणि स्वतःला पाहिजे तशी वागू लागतात. यावर उपाय म्हणजे
१) बॅकस्पेस की वापरू नका. काही दुरुस्त करायचे असेल तर सिलेक्ट करून डिलिट करा आणि टायपिंग सुरू करा.
२) बॅकस्पेस मारलीच तर स्पेसबार २ वेळा दाबा. याने एक स्पेस जास्त पडेल पण अक्षरे स्वतंत्र उमेदवारासारखी वागणार नाहीत.
३) तरी चुकून अक्षरे त्यांच्या मनाप्रमाणे वागायला लागलीच तर तेवढा भाग सिलेक्ट करून शिफ्ट + डिलिट वापरा आणि काम पुढे सुरू करा.
गमभन वापरायला अत्यंत सोपे आहे, आणि इथेच टाईप करणे आणि प्रकाशित करणे हे आणखी कुठेतरी कॉपी पेस्ट करण्यापेक्षा सोयीचेही आहे.
1 Jan 2015 - 12:31 pm | शशिकांत ओक
मित्रांनो,
मोबाईलवर मला वरील की बोर्ड फारच सोईचा वाटतो. त्यात पुढील शब्द आपल्यासमोर पटापट येऊन उभे राहतात. फोनेटिक वापरणाऱ्यांना तो उपयोगी नसावा.
1 Jan 2015 - 1:03 pm | मुक्त विहारि
आता तुम्हाला साधारण टायपिंग जमायला लागले असेल.
-------------------------------
काही साधी वाक्ये...
१. कमळ घर बघ. ====> kamal ghar bagh.
२. गगन सदन बघ ====> gagan sadan bagh.
३. बाबा मला खाऊ हवा ===> baabaa malaa khaaU hawaa.
४. मामाला सिनेमा आवडतो. ===> maamaalaa sinemaa aawaDato.
1 Jan 2015 - 1:06 pm | कंजूस
जमेल तसं ऑफलाईन लेख लिहायचा. अधिक फोटोच्या एचटीएमेल लिंकस सर्वच 'नोटस'मध्ये साठवतो आणि एका झटक्यात नवीन लेखनात कॉपी पेस्ट करतो. छोटे प्रतिसाद मात्र जागीच खरडतो.परंतू काही /बऱ्याच मोबाईलांत नोटसचा पर्यायच नसतो.
1 Jan 2015 - 1:10 pm | मुक्त विहारि
शक्यतो एखादा शब्द लिहील्यानंतर किमान दोन वेळा स्पेस बार दाबा.
शब्दांत थोडे अंतर असले तरी चालेल.
लेख किंवा प्रतिसाद प्रकाशित करण्यापुर्वी, एकदा तपासून बघा.दोन शब्दांतील अंतर योग्य करा.
सुरुवातीला ४-५ वाक्ये लिहीतांना पण त्रास होईल.पण प्रयत्न केला तर नक्कीच जमेल.
काही जोडाक्षरे....
शब्द ===> shabda
पुष्प ==> puShpa
कष्ट ==> kaShTa
3 Jan 2015 - 2:47 pm | यमगर्निकर
आपण खुप मोलची माहिति दिली त्याबद्दल धन्यवाद...
3 Jan 2015 - 2:53 pm | यमगर्निकर
पण अक्षरावर टिम्ब कसे द्यावे.
3 Jan 2015 - 2:57 pm | तुषार काळभोर
टिंब=TiMb
चंपक= cMpak किंवा chaMpaka
अँजेलिना=EMjelinaa
9 Jan 2015 - 11:09 pm | अमित खोजे
याचा खरा उपयोग झाला बघा. टिंब देताच येत नव्हते. तसेच आता लिखाणासाठी फायरफॉक्स वापरणे सुरु केल्यामुळे बॅकस्पेसची कट्कट गेली. आता कितीहीवेळा खोडुन पुन्हा लिहु शकतो.
3 Jan 2015 - 3:13 pm | मुक्त विहारि
साधे आणि सोपे..
मंदार ==> maMdaar ===> ma लिहून मग M (Capital) आणि मग daar
अंत ==>aMt ===> a लिहून मग M (Capital) आणि मग t
बंधू ==> baMdhu===> ba लिहून मग M (Capital) आणि मग dhu
विश्रांती ==> wishraaMtee wishraa लिहून मग M (Capital) आणि मग tee
========
आता तुम्हाला पण अक्षरांवर टिंब देता येईल.
10 Jan 2015 - 12:47 am | श्रीरंग_जोशी
छ्त्रपती शिवरायांची राजमुद्रा टंका...
11 Jan 2015 - 12:19 pm | तुषार काळभोर
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते
11 Jan 2015 - 12:29 pm | टवाळ कार्टा
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णू वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते
\m/
11 Jan 2015 - 1:32 pm | तुषार काळभोर
बहुतेक एकदाच आहे ;)
11 Jan 2015 - 1:49 pm | टवाळ कार्टा
अरे हो...ते काढून टाकायचे राहिले