पत्रकारीतेची ऐशीतैशी

अन्या दातार's picture
अन्या दातार in जनातलं, मनातलं
2 Jan 2015 - 4:39 pm

आजकाल विविध वर्तमानपत्रे, दूरदर्शन वाहिन्यांचा भारतात सुळसुळाट झालाय. कित्येक लोकांना रोजगारही मिळाला आहे. पण हे पत्रकार, संपादक, उपसंपादक काय म्हणून त्या पदांवर बसलेत असा सवाल पडतो. पूर्वी काही चुका या उपसंपादकाच्या डुलक्या (उसंडु) या नावाखाली चेष्टेचा भाग मानला जायचा. पण आता मात्र या डुलक्यांची वाढती वारंवारीता बघून क्लेश होतात. वानगीदाखल हे एक उदाहरण

१. दै. लोकमत (पुणे आवृत्ती) दि. २८ डिसेंबर २०१४ पान ३
http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=12&eddate=12%2f28%2f2014

शीर्षक - २२ तालुके नक्षलमुक्त
उपशीर्षक - कर्मचार्‍यांचा प्रोत्साहनपर भत्ता बुडणार

शीर्षक वाचून सुखावतो न सुखावतो तोच उपशीर्षक बघून झीट यायची बाकी होती. नक्षलवादी घटना न घडल्याचा आनंद मानायचा का 'प्रोत्साहनपर भत्ता' बुडल्याची खंत वाटून घ्यायची? का कर्मचार्‍यांना भत्ता मिळावा म्हणून नक्षलवादी बोलवायचे आहे का? डोक्यात तिडिक जाण्यालायक संपादन!

याशिवाय ऑस्ट्रेलियातील रेस्टॉरंटमधील ओलिस नाट्य, पेशावर शाळेवरचा हल्ला, आसाममधील दहशतवादी हल्ला, एअर एशिया विमान दुर्घटना याप्रसंगांमध्येही भारतीय माध्यमे व पाश्चात्य माध्यमे यांच्या रिपोर्टींगमधील तफावत कमालीची होती. कोणत्याही दुर्धर प्रसंगात पाश्चात्य माध्यमाचा अँकर फार ओरडताना, किंचाळताना, हातवारे करताना मी बघितला नाही.

एअर एशिया विमान दुर्घटनेच्या दिवशी सीएनएन वाहिनीवर एका एक्स्पर्टने विमानाचा संपर्क ज्या ठिकाणहून तुटला, तिथली वातावरणीय स्थिती, विमानातील उपकरणांवर त्याचा होणारा इफेक्ट यासंबंधी जवळपास अर्धा तास विवेचन केलेले मी बघितलेय.

प्लिज ग्रो अप इंडीयन मीडीया!!

धोरणप्रकटनमत

प्रतिक्रिया

हा आक्रस्तळेपणा बहुतेकवेळा हिंदी चॅनेल्स वाले जास्त करतात. आज तक , इंडिया टीव्ही काही वेळा एन डी टीव्ही देखील यातच मोडतो.
इंडिया टीव्ही तर संध्यानंदचा मोठ्ठा भाउ शोभावा अशी स्थिती आहे

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2015 - 5:05 pm | टवाळ कार्टा

इंडिया टीव्ही तर संध्यानंदचा मोठ्ठा भाउ शोभावा अशी स्थिती आहे

मोठ्ठा भाउ आहेच्च

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 Jan 2015 - 5:31 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

विजू, तुझा हिंदीवाल्यांबद्दलचा राग काही जात नाही.
तो गोस्वामींचा अर्नब काय की सरदेसाईंचा राजदीप काय.. एकाच माळेचे मणी.

वेल्लाभट's picture

2 Jan 2015 - 6:05 pm | वेल्लाभट

संध्यानंद इज संध्यानंद सर ! :)

संध्यानंदमधे वाचलेल्या काही लक्षवेधी बातम्या:
स्त्रियांना आजकाल आवडतात दाढी ठेवणारे पुरूष (मुख्य पृष्ठ अर्थात फ्रंट पेज हेडलाईन)
बीड मधे एका कुत्रीने दिला १२ पिलांना जन्म
मानवाचे क्लोन बनवणं नजीकच्या काळात शक्य
मांजर कुत्रीचं दूध पितानाचा फोटो
हॉट होण्यासाठीचे व्यायाम
इत्यादी !

काहीच्याकाही मनोरंजन!

मदनबाण's picture

2 Jan 2015 - 4:50 pm | मदनबाण

पण हे पत्रकार, संपादक, उपसंपादक काय म्हणून त्या पदांवर बसलेत असा सवाल पडतो.
ग्रो अप इंडीयन मीडीया!!
एक पत्रकार फारच लवकर ग्रो अप झालेत... जरा खरळफळ्यावर चक्कर टाकुन पहा ! *LOL*

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
China builds lighter tanks for Tibet border
Pakistan should be ready for collateral damages if they fire: BSF
Russia looks to boost defence ties with India
Final tally: Taxpayers auto bailout loss $9.3B
Auto bailout cost the US goverment $9.26B
Analysts foresee bad year for U.S. government bonds
Google Fiber services may launch in India soon
Telcos to make tough calls as spectrum war heats up

रमेश भिडे's picture

2 Jan 2015 - 4:52 pm | रमेश भिडे

१० वर्षापूर्वी मी भारतात असताना एका प्रादेशिक वॄत्तपत्रात उपसंपादक पदासाठी इन्टरव्ह्यु ला गेलो होतो. अक्षरशः कोणतेही प्रश्न न विचारता ,माझी पार्श्वभूमी विचारात न घेता फक्त माझी सर्टिफिकेट्स बघून २५००/-रुपये प्रतिमहिना पगारात काम कराल का? असा प्रश्न विचारला गेला. कामाचे स्वरूप काय? असे विचारल्यावर , समोर ४/५ दूरदर्शन संचांवर निरनिराळे देशी /विदेशी न्यूज चॅनेल लावून ठेवलेले होते, त्यावरील बातम्या बघून आपण बातम्या "तयार" करायच्या...असे उत्तर मिळाले !

धन्य धन्य तो लोकशाहीचा चौथा( की कितवातरी ?) स्तंभ

बॅटमॅन's picture

2 Jan 2015 - 5:07 pm | बॅटमॅन

च्यायला. :(

प्रेक्षकाचे डोक्यांचा तुकडा/टवका पाडणारी (बिनडोक) बातमी असेच वारंवार दिसत आहे.

बाकी आय बीएन लोक्मतने जु.वागळे "पाळला" आहेच.

पैसा's picture

2 Jan 2015 - 6:58 pm | पैसा

मुंबई हल्ल्याच्या वेळी पोलीस आणि सुरक्षादलांच्या पोझिशन्स पाकिस्तानातल्या अतिरेक्यांना भारतीय टीव्ही चॅनेल्सवरून प्रसारित होणार्‍या बातम्या बघून कळत होत्या. हा गाढवपणा म्हणायचा की मुद्दाम केलेला प्रकार? पंतप्रधानांच्या संरक्षणाची व्यवस्था इ बद्दल अशाच बातम्या बघून हे काय चालू आहे असा प्रश्न बरेचदा पडतो खरा! आरडाओरडा आणि आक्रस्ताळेपणा याबद्दल बोलावे तितके कमीच!

बोका-ए-आझम's picture

3 Jan 2015 - 2:20 am | बोका-ए-आझम

कुठल्याही प्रकारे समर्थन करायचा हेतू नाही पण टीव्ही चॅनेल्समध्ये जी जीवघेणी स्पर्धा आहे तीच याला जबाबदार आहे. बातम्यांचे चॅनेल्स केवळ एकमेकांशी नव्हे तर इतर चॅनेल्सशीही स्पर्धेत आहेत - प्रेक्षकांसाठी. त्यामुळे बातम्या दाखवणारे आणि करमणुकीचे चॅनेल्स असा फरकच राहिलेला नाही. सोशल मीडिया, जिथे स्टोरी ' ब्रेक ' होते, त्याचीही फार मोठी स्पर्धा टीव्ही बातम्यांपुढे आहे. सोशल मीडियावर तुम्हाला ताबडतोब प्रतिक्रिया देता येते हा त्याचा मोठा फायदा आहे त्यामुळे तरुण पिढीचा कल त्याकडे जास्त आहे. परिणामी, ज्याचा जास्त आवाज त्याच्याकडे लोकांचं जास्त लक्ष असा सरळसरळ हिशोब चॅनेल्स लावत आहेत.

vikramaditya's picture

3 Jan 2015 - 4:00 pm | vikramaditya

करुन असे म्हणतो की ह्या मीडीयाला अगदी सविस्तर पणे आपण राबवत असलेल्या 'गोपनीय' योजनांची माहीती देणा-या आपल्या सुरक्षा यंत्रणा पण हास्यापद वाटतात.
उदा. सीसीटीव्ही कॅमेरे कुठे बसवले आहेत ; साध्या वेशातील पोलीस पाळत ठेवणार; आरोपीला पकडण्यासाठी काय योजना आखल्या आहेत वगैरे...

मग हे सगळे अगदी प्रॉमीनंटली प्रसारित केले जाते.

नगरीनिरंजन's picture

4 Jan 2015 - 11:06 pm | नगरीनिरंजन

प्रत्येक गोष्ट ही एक धंदा आहे. पूर्वीही होती पण तेव्हा पैशाला एवढी अवास्तव प्रतिष्ठा आणि त्यासाठी एवढी स्पर्धा नव्हती.
त्यात पत्रिकारितेच्या क्षेत्रात कोणत्या लेव्हलचे विद्यार्थी (?!) जातात ते पाहिले तर जे चाललंय त्यात काहीच आश्चर्य वाटत नाही. पत्रकारिता वगैरे शब्द आपल्यासाठी त्यांच्यासाठी ती निव्वळ नोकरी आहे, पैसे मिळवण्यासाठी करायची.

पिंपातला उंदीर's picture

7 Jan 2015 - 10:06 am | पिंपातला उंदीर

मी सहारा समय या वाहिनीत internship करत असतानाचा एक अनुभव : मला एका सीनियर महिलेच्या निरीक्षणाखाली बातम्या लिहिण्याची duty दिली होती . वृत्त वाहिन्यांच्या News Room मध्येअनेक दूरचित्रवाणी संच चालू असतात आणि त्यावर 'प्रतिस्पर्धी ' वाहिन्यांचे प्रक्षेपण चालू असते . शत्रूपक्षावर नजर ठेवण्यासाठी . तर दुसऱ्या एका वाहिनीवर विदेशात झालेल्या नैसर्गिक प्रकोपाची बातमी दाखवत होते . त्यात १२ लोक मारले गेले होते . त्या सीनियर बाई नी मला त्यावर बातमी लिहायला सांगितली . मी खाली मान घालून कॉपी लिहायला लागलो .
तर त्या बाई म्हणाल्या ,"मृतांचा आकडा किती टाकशील ?"
"त्या वाहिनीवर १२ दाखवत आहेत ." मी उत्तरलो .
"तू १३ लिही . आपली बातमी जास्त update आहे असे वाटायला पाहिजे लोकांना .
बाई रॉक्स , मी शोकस

पैसा's picture

7 Jan 2015 - 10:13 am | पैसा

अजून येऊ द्या असले किस्से!

सविता००१'s picture

7 Jan 2015 - 10:27 am | सविता००१

धन्य आहेत हे लोक

मृत्युन्जय's picture

7 Jan 2015 - 11:57 am | मृत्युन्जय

मला खुप दिवस ही शंका होती, अगदी मनापासून सांगतो. एकच बातमी जेव्हा वेगवेगळ्या चॅनलवर दाखवत असतात तेव्हा आकडे असे झपाट्याने बदलत असतात. निवडणुक निकालांचेही असेच,

पिंपातला उंदीर's picture

7 Jan 2015 - 10:22 am | पिंपातला उंदीर

या धाग्यावर समयोचित आहे कि नाही ते माहित नाही पण परवा मुंबई मध्ये रेल्वे मार्गावर जो गोंधळ झाला त्यात लोकसत्ता ने एका तरुणी वर अतिप्रसंग झाल्याची जी बातमी पहिल्या पानावर दिली होती ती खोटी आहे असा सूर जोर पकडत आहे . तस असेल तर बेजबाबदार पत्रकारितेची height म्हणाव लागेल

https://fbcdn-sphotos-d-a.akamaihd.net/hphotos-ak-xpa1/v/t1.0-9/10922554...

खटपट्या's picture

7 Jan 2015 - 11:29 am | खटपट्या

ही बातमी खोटी असेल तर "त्या" व्रुत्तपत्रावर यापुढे कीती विश्वास ठेवायचा. बातमीची लिंक परत एकदा देत आहे.

http://www.loksatta.com/mumbai-news/gang-rape-attempt-on-girl-trapped-in...

लोकसत्ताची बातमी खोटी असेल यावर माझा विश्वास नाही.
त्यापेक्षा पिंपातला उंदीर यांची लिंक जास्त नकली वाटते.

(हे माझे वैयक्तीक मत आहे)जेपी