हा स्पंद फुलण्याचा

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जे न देखे रवी...
6 Nov 2008 - 3:41 pm

उन्मादूनी उसळतो आनंद अंतरीचा
सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा

हातात पावसाची
ओली फुले उमलती
पाण्यात नाचताना
जणू थेंब ताल होती
झाडांतूनी पसरतो
नवश्वास पालवीचा
सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा

आरश्यात पाहताना
प्रतिबिंब रोज हासे
माझे मलास सांगे,
हे दिवस श्रावणाचे
अंगातूनी फिरे मग,
स्वरनाद बासरीचा
सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा

लपुनी पुन्हा पुन्हा मी,
मलाच साद देई
थरकून पैंजणांना,
हलकेच नाद देई
लडीवाळ स्पर्श होतो,
गालांवरी फुलांचा
सारी नवी उ भारी हा स्पंद फुलण्याचा

प्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

मनीषा's picture

6 Nov 2008 - 4:02 pm | मनीषा

सुंदर कविता ..
लयबद्ध ... आणि अर्थपूर्ण !!

विसोबा खेचर's picture

6 Nov 2008 - 4:43 pm | विसोबा खेचर

सुरेख कविता..!

आपला,
(श्रावणप्रेमी) तात्या.

मीनल's picture

6 Nov 2008 - 6:10 pm | मीनल

आवडली .

थरकून पैंजणांना,
हलकेच नाद देई

मस्त आहे .

मीनल.

चन्द्रशेखर गोखले's picture

7 Nov 2008 - 7:08 am | चन्द्रशेखर गोखले

अप्रतिम कविता..!

राघव's picture

24 Oct 2024 - 10:44 pm | राघव

पहिल्यांदाच वाचली.. अप्रतीम आहे! :-)

कर्नलतपस्वी's picture

25 Oct 2024 - 11:40 am | कर्नलतपस्वी

भावपूर्ण अशी कवीता.