आज सकाळ पासूनच सतत विठ्ठलाची मुर्ती डोळ्यांपुढे येत होती. म्हटले आज आपल्या हातून माय काहीतरी लिहून घेणार.. नक्की!
तशा २-३ ओळी काल-परवा कडेच मला सुचल्या होत्या पण लिहून काढल्या नव्हत्या! आज मात्र दिवसभरात येवढे लिहून झाले माझ्याकडून.. भगवंताचीच कृपा.. नाही? :)
मला भावतो गजर तुझ्या नामाचा-प्रेमाचा..
तुझ्या सगुण रुपात मला निर्गुणाची ओढ!
काय वर्णावे तत्वांस साधे रूप वर्णवेना!
माझ्या डोळ्यांत मावतो प्रेम-अश्रुंचा सागर..
कुणा तुझ्यात दिसतो सार्या विश्वाचा नियंता..
कुणी तुझ्यात पाहतो काळा दगड केवळ!!
तुला खंत ना तयाची, हसु निर्मोही तसेच!
सार्या लेकरांस मिळे तुझ्या मायेची पाखर!
माय-बाप रघुवीर माझी विठ्ठल माऊली..
तिच्या चरणांशी माझे मन आनंदी, अचळ!
मुमुक्षु
प्रतिक्रिया
5 Nov 2008 - 5:54 pm | बिपिन कार्यकर्ते
तुझ्या रचनांमधे सहजता असते ती आवडते.
तुला खंत ना तयाची, हसु निर्मोही तसेच!
सार्या लेकरांस मिळे तुझ्या मायेची पाखर!
चोक्कस.
बिपिन कार्यकर्ते
5 Nov 2008 - 6:05 pm | अरुण मनोहर
भक्तीरस रसाळतेने ओथंबणारी कविता.
5 Nov 2008 - 6:34 pm | रामदास
या आधी लिहीलेल्या काही रचना पण अभंगासारख्या होत्या.हे गीत पण आवडले.
5 Nov 2008 - 6:44 pm | विसोबा खेचर
माय-बाप रघुवीर माझी विठ्ठल माऊली..
तिच्या चरणांशी माझे मन आनंदी, अचळ!
वा! मुमुक्षूरावांचे नेहमीप्रमाणेच रसाळ काव्य...
आपला,
(ह भ प मुमुक्षूंचा फ्यॅन) तात्या.
6 Nov 2008 - 11:44 am | फटू
काय वर्णावे तत्वांस साधे रूप वर्णवेना!
माझ्या डोळ्यांत मावतो प्रेम-अश्रुंचा सागर..
सतीश गावडे
मी शोधतो किनारा...
6 Nov 2008 - 3:52 pm | मनीषा
तुमचा भक्तीभाव ... तुमच्या शब्दामधे उतरला आहे .
6 Nov 2008 - 7:31 pm | दत्ता काळे
तुला खंत ना तयाची, हसु निर्मोही तसेच!
सार्या लेकरांस मिळे तुझ्या मायेची पाखर!
. . फार सुंदर