कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
8 Dec 2014 - 8:23 pm

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ २-४७

भगवंत म्हणतात:

१. माणसाला कर्म करण्याचा अधिकार आहे
२. कर्मफळ माणसाच्या हातात नाही.
३. कर्मफळाची आशा न ठेवता अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे.

भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातल्या ह्या श्लोकाला वाचताना मनात गोंधळ हा निर्माण होतोच. बहुतांना असे वाटते हा श्लोक माणसाला कर्मापासून परावृत्त करून भाग्यवादी बनवितो. पण हे खरे नाही. आपल्याला नेहमीच असे वाटते, आपण जर कर्म केले तर त्याचे फळ मिळायलाच पाहिजे. हेच योग्य आणि न्यायपूर्ण. जर कर्माचे फळ मिळणार नसेल तर कर्म कशाला करायचे, असा प्रश्न मनात येणारच. मग भगवंतांनी गीतेत कर्म फळावर, कर्म करणार्याचा अधिकार नाही, हे का म्हंटले आहे? हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण पाहतोच मुलाने उत्तम अभ्यास केला तर त्याला परीक्षेत उत्तम गुण मिळतात. उत्तम अभ्यास = उत्तम गुण सहज सोपी नियम आहे. पण नेहमीच असे होत नाही. कुणी विद्यार्थी आजारी पडतो आणि पेपर देऊ शकत नाही. कुणाला अपघात होतो, परीक्षा केंद्रावर पोहचू शकला नाही. कुणाला पेपर तपासताना क्वचित होणाऱ्या चुकी मुळे ९० च्या जागी ०९ मार्क मिळतात. तो चक्क नापास होतो. SSCचा टायपिंगचा पेपरात नेहमीचेच आहे, प्रत्येक केंद्रात २-३ परीक्षार्थी केवळ टाईपरायटर खराब झाल्या मुळे अयशस्वी होतात. त्यांना सरकारी नौकरी मिळत नाही. त्यांची तैयारी व्यर्थ जाते. शेतकरी ही उत्तम बियाण्यांची पेरणी करतो, शेतात जातीने लक्ष देतो, खत, पाणी व मशागत सर्व उत्तम प्रकारे करतो, पिक ही भरपूर येते, पण कित्येकदा गारपीट, अवेळी पावसामुळे त्याचे अतोनात नुकसान होते. त्याला ही पाहिजे तसे फळ मिळत नाही.

वरील उदाहरणांनी एक बाब स्पष्ट होते, सर्वांनी उत्तम कर्म केले पण तरी ही त्यांना फळ मिळाले नाही. कर्म करणे माणसाच्या हातात आहे, पण आपल्या कर्मावर प्रभाव टाकणाऱ्या इतर बाबींवर आपले नियंत्रण नसते. देश, काळ, राजनीतिक परिस्थिती एवं इतरांच्या कर्मांचा प्रभाव ही आपल्या कर्मांवर पडतो. समर्थांनी या आपल्या कर्मांवर प्रभाव टाकणार्या इतर बाबींचे वर्णन, "अध्यात्मिक ताप" (देह, इंद्रिय आणि प्राण यांच्या संयोगाने होणारे ताप - शारीरिक व मानसिक व्याधी इत्यादी ) आणि "आधिभौतिक ताप" ( सर्व पंचभूतांच्या संयोगाने जे त्रास होतात अर्थात सर्व प्रकारचे बाह्य कारणे - अपघात, सर्पदंश, चोरी, डकैती, आग, अतिवृष्टी, पूर, परचक्र, राजा एवं अन्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून छळ इत्यादी) [दशक ३, समास ६ आणि ७] असे केले आहे. या सर्व बाबींवर कर्म करणार्याचे नियंत्रण नसते, म्हणूनच भगवंतानी म्हंटले आहे, कर्मफळावर कर्म करणाऱ्याचा अधिकार नाही, केवळ कर्मावर त्याचा अधिकार आहे.

कर्मांचे फळ मिळाले नाही तर माणूस निराश होतो. आज ह्या मुळेच अनेक शेतकरी आत्महत्या करतात, पेपर मध्ये नापास झाल्याने विद्यार्थी ही आत्महत्या करतात. किंवा लोक कर्म करणे सोडून देतात. मृत्युलोकाला 'कर्मलोक' ही म्हणतात, इथे कुणाला ही कर्म चुकलेले नाही. कर्म हे करावेच लागणार, त्या शिवाय या लोकात कुणी जगू शकत नाही. म्हणूनच भगवंतानी गीतेत म्हंटले आहे, अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे. असे कर्म केल्याने आपल्या कर्माचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळाले नाही तरी ही आपल्याला त्याचा जास्त त्रास होणार नाही.

कर्माची अपेक्षा न ठेवता उत्तम रीतीने कर्म करणे, हे जर शेतकरी राजाला कळले, तर तो कुठल्या ही परिस्थितीत निराश होणार नाही. आत्महत्या न करता पुन्हा पुढच्या पिकाच्या तैयारीला लागेल. विद्यार्थी ही पुन्हा जोमाने अभ्यास करून, परीक्षेत उत्तम गुण मिळविण्याचा प्रयत्न करेल. हेच भगवंताना गीतेत सांगायचे असेल.

धर्मविचार

प्रतिक्रिया

जरा करा सत्स्तंगाचा क्वोटा पुर्ण

एक 'कॉटर' सत्संग तरी बाकी आहे असं दिसतंय, नै ;)

प्यारे१'s picture

9 Dec 2014 - 2:22 pm | प्यारे१

:)

विवेकभौ, कर्म, फळ सब घपला है
'मामेकं शरणं..' हेच खरं !
तस्मात, ....

विवेकपटाईत's picture

9 Dec 2014 - 8:26 pm | विवेकपटाईत

कुणाला शरण जाऊ ताई, आसारामजी आणि रामपाल महाराज तर सरकारी पाहुणे झाले आहे. आशुतोष महाराज समाधी अवस्थेत आहे. कुणी मिसळपाव वाला पुण्यात आश्रम उघडत असेल तर शरण जाण्याचा विचार करता येईल..

इतका वेळ कसा मिळतो कोणाला याचं अप्रूप वाटतं.

स्पा's picture

9 Dec 2014 - 5:06 pm | स्पा

दॅत्झ मा फ्रेंद

कवितानागेश's picture

9 Dec 2014 - 6:20 pm | कवितानागेश

ते कर्म करत नसावेत! :प

अर्धवटराव's picture

9 Dec 2014 - 10:59 pm | अर्धवटराव

कर्माचा उद्देश आणि फळाची अपेक्षा या भिन्न गोष्टी आहेत. फळाची अपेक्षा म्हणजे त्यात इन्व्हॉल्व होणं... व कर्म करताना प्रत्यक्ष कर्मात इन्व्हॉल्व्ह व्हावं, फळात नाहि हा साधा अर्थ आहे.

याचं उदाहरण शोधायला फार काहि इकडे तिकडे बघायला नको. आपल्या शालेय जीवनात प्रत्येकाने एक तरी चितळे मास्तर पाहिले असतील. त्यांचं कार्य पुष्कळसं याच पठडीतलं असतं.

कवितानागेश's picture

9 Dec 2014 - 11:26 pm | कवितानागेश

श्या!!
सगळी मजाच घालवतो हा मनुष्य.

अर्धवटराव's picture

9 Dec 2014 - 11:42 pm | अर्धवटराव

:P

hitesh's picture

10 Dec 2014 - 2:55 am | hitesh

लबाड लोकानी भोळ्या लोकांची तोंडे बन्द करायला वापरले आहे.

उदा.. जेंव्हा उच्चवर्णीयांची सत्ता होती तेंव्हा ते दलिताना बोलायचे ... तुमच्या गेल्या जन्मीच्या कर्मामुळे व प्रारब्धामुळे तुम्ही दरिद्री आहात.

आणि आता गंमत बघा हं !

आज याच दलिताना आरक्षण मिळाले तर ते उच्चवर्णियांच्या पूर्व पापाचे फळ व दलितांचे प्रारब्ध म्हणुन मिळाले हे मात्र हेच उच्चवर्णिय मान्य करु शकत नाहीत. आणि मग आरक्षणावर ढीगभर धागे काढत बसतात !

आयुर्हित's picture

10 Dec 2014 - 1:35 pm | आयुर्हित

आरक्षणावर ढीगभर धागे काढत बसतात म्हणजेच ते सत्कर्म करण्यात विश्वास ठेवतात!
बाबासाहेब आंबेडकरही सत्कर्म करण्यात विश्वास ठेवतात म्हणूनच सांगून गेले : शिका, संघटीत व्हा व (स्वत:शी)संघर्ष करा.

जेंव्हा उच्चवर्णीयांची सत्ता होती तेंव्हा ते दलिताना बोलायचे कारण तेव्हा कदाचित दलित शिकत नसतील!

मृत्युन्जय's picture

10 Dec 2014 - 4:11 pm | मृत्युन्जय

हेच उच्चवर्णिय

हेच म्हणजे कोण. गेली २०० वर्षे जगलेला माणूस पाहण्यात नाही माझ्या.

स्वप्नज's picture

10 Dec 2014 - 7:40 am | स्वप्नज

कर्माच्या फळाची वाट कशाला पाह्यची. त्यापेक्षा 'कर्मा'चे फुल वहायचे एखाद्या देवीला,

काही 'कर्मे' अशी असतात कि त्या कर्मातच फार फार आनंद मिळतो, फळ मिळणारेय अशी कुणकुण लागली कि कर्ममुक्तीचे दुःख वाट्यास येते.

hitesh's picture

10 Dec 2014 - 10:46 am | hitesh

अगदी मान्य.

आणि हे मान्य करायला श्रीकृष्ण , गीता इ. उभी करायची गरज नसते

*संपादित*

मृत्युन्जय's picture

10 Dec 2014 - 12:21 pm | मृत्युन्जय

श्रीकृष्ण आणि गीता याबद्दल आपली काही आक्षेपार्ह मते असतील तर ती स्वतःपुरती ठेवावीत. त्यांना काही म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कोणीही दिलेला नाही. योग्य भाषा वापरावी ही नम्र विनंती. आम्ही इतर धर्मीयांचा अपमान करायला जात नाही इतरांनी आमच्या धर्माच्या आणि त्यातील श्रद्धास्थानांचा उपमर्द करु नये अशी सार्थ अपेक्षा आहे.

प्रसाद गोडबोले's picture

10 Dec 2014 - 12:48 pm | प्रसाद गोडबोले

करुदेत हो ...

बोलु दे त्यांना मोकळेपणाने ... आमच्या गृपमधे एक म्हण आहे ... तोंड उघडलं की जात कळती :D

हितेशराव तुम्ही बोला हो बिनधास्त

क्लिंटन's picture

10 Dec 2014 - 1:03 pm | क्लिंटन

मला वाटते की आपण स्वतःला सहिष्णू म्हणवत असू तर अशा स्वरूपाच्या हल्ल्यांना अधिक प्रगल्भपणे (अनुल्लेखाने मारून, दुर्लक्ष करून) हॅण्डल केले पाहिजे.अन्यथा आपल्यात आणि आपल्या शेजारी देशात फरक काय राहिल?

आणि मी वैयक्तिक पातळीवर आणखी एक गोष्ट अगदी प्रकर्षाने पाळतो. असे काही लोक असतात (एक उदाहरण द्यायचे झाले तर आआपवाले, डावे आणि/किंवा मिपावरील काही मंडळी) जे आपण योग्य विचार करत आहोत की नाही याच्यासाठी दिपस्तंभाप्रमाणे काम करत असतात.अशांनी आपल्यावर टिका केली तर आपण योग्य मार्गावर विचार करत आहोत याची खात्री पटते तेव्हा अशा दिपस्तंभांचे महत्व जपले गेलेच पाहिजे असे वाटते :)

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2014 - 3:44 pm | टवाळ कार्टा

शेजारी देशांतसुध्धा "अवतारी" मिपाकर असावेत अशी दाट शंका आहे :)

क्लिंटन's picture

10 Dec 2014 - 3:52 pm | क्लिंटन

:)

hitesh's picture

10 Dec 2014 - 3:14 pm | hitesh

आम्ही इतर धर्मीयांचा अपमान करायला जात नाही इतरांनी आमच्या धर्माच्या आणि त्यातील श्रद्धास्थानांचा उपमर्द करु नये अशी सार्थ अपेक्षा आहे..

.........

:)

कर्मफळाची अपेक्षा करु नकोस, या भगवंताच्या आदेशाच्या विपरित तुमचे वागणे आहे.

प्रसाद गोडबोले's picture

10 Dec 2014 - 3:55 pm | प्रसाद गोडबोले

तुमचा धर्म कोणता ?

मृत्युन्जय's picture

10 Dec 2014 - 4:10 pm | मृत्युन्जय

कस आहे हितेशराव आपण आपल्या घरी आपल्या आईवडिलांना जे बोलणार नाही ते इतरांच्या देवाबद्दल बोलु नये. याला संस्कार म्हणतात. ते सुद्धा आमच्या भगवंतांच्या कृपेने आमच्यावर झालेले आहेत.

प्रसाद गोडबोले's picture

10 Dec 2014 - 4:13 pm | प्रसाद गोडबोले

थांबा थांबा मृत्युंजय राव .

कस आहे हितेशराव आपण आपल्या घरी आपल्या आईवडिलांना जे बोलणार नाही ते इतरांच्या देवाबद्दल बोलु नये. याला संस्कार म्हणतात. ते सुद्धा आमच्या भगवंतांच्या कृपेने आमच्यावर झालेले आहेत.

एका विशिष्ठ धर्मामध्ये , त्यांच्या देवाला आपण आपला देव मानलं तरी म्हणे त्यांच्या देवाचा उपमर्द होतं ... हितेशराव त्या धर्माचे आहेत का ते पाहुयात ...

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2014 - 4:25 pm | टवाळ कार्टा

३००+ करायचेच का? \m/

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2014 - 4:29 pm | टवाळ कार्टा

हितेसभाईंना योगीबुआंच्या धाग्यातला दुकानदार समजून हा प्रयोग करायचा विचार आहे काय? ;)

मुक्त विहारि's picture

11 Dec 2014 - 3:06 am | मुक्त विहारि

बरे झाले...

आता थोड्यावेळ थांबा, काउ आणेलच चहा.घाबरू नका, आमच्या शेजारणीला आम्ही आपल्या मायबोलीत काउ म्हणतो.तिचे खरे नांव कुठलेही असले तरी, आमच्यासाठी ती काउच.फार जुणाची आहे हो पोर.इकडून तिकडून काहीतरी ऐकते आणि चिमणीसारखी बोलत बसते.तिला स्वतःला कितपत समजते कुणास ठावूक? बसा तुम्ही तिच्याबरोबर गप्पा मारत.भलतीच मोठी गँग आहे आमच्या काऊची.बहूदा तुमचे आणि तिचे पटेलच.

बादवे,

तुमच्या घरासंदर्भात काय झाले?

नाही म्हटले, ३र्‍या मुंबईत घर घेताय, म्हणून विचारले.

hitesh's picture

11 Dec 2014 - 3:45 am | hitesh

हितेशला काउ व्हायला बंदी आहे की काय ?

हल्ली क्धी इकडचा आयडी डिलिट होतो कधी तिकडचा ! त्यामुळं दोन्हीकडे एका नावानं वावरणं मुष्किल झालंय !

:)

तुमच्या मनांत काही तरी वेगळेच...

असो,

बसा हितेसभाऊ... मस्त गरम-गरम चहा प्या...

बियर दिली असती, पण नकोच...कदाचित तुम्हाला सुरापान वर्ज्य असेल....

थांबा हं.... काउ आणेलच चहा....

बादवे,

परवाच नाना भेटले होते. ते तुम्हाला आणि इतर बर्‍याच मंडळींना, भेटायचे म्हणत होते.

hitesh's picture

11 Dec 2014 - 6:21 am | hitesh

नाना व माइना भेटा. ते मी नाही

मुक्त विहारि's picture

11 Dec 2014 - 6:48 am | मुक्त विहारि

आम्ही माईंचे नांव पण नाही घेतले....

फक्त "नानांचेच" घेतले.

आता तुम्ही काउच्या हातचा चहा पिउनच जा....

टवाळ कार्टा's picture

11 Dec 2014 - 9:43 am | टवाळ कार्टा

कदाचित तुम्हाला सुरापान वर्ज्य असेल

हे कोण म्हणते?...तिकडच्या देशांत बंदी असली तरी "सगळ्या" गोश्टी मिळतात ;)

मुक्त विहारि's picture

11 Dec 2014 - 9:50 am | मुक्त विहारि

अजून एक सांगायचे म्हणजे, हितेस भाऊंचा कर्मावर विश्र्वास नाही.

पण त्यांनी केलेल्या कर्मामुळेच, त्यांना आय.डी. डीलीट असे फळ मिळते ना?

असो,

बाकी काही म्हण पण आज काउच्या हातचा चहा फार मस्त होता.

टवाळ कार्टा's picture

11 Dec 2014 - 9:53 am | टवाळ कार्टा

त्याचा गीतेवर (कृष्णाने सांगितलेल्या) विश्वास नाहीये ओ...मग ते फळ मिळणारच आहे (आय.डी. डीलीटचे) म्हणून कर्म करायला अवतार घेतच असतात =))

मुक्त विहारि's picture

11 Dec 2014 - 9:59 am | मुक्त विहारि

ह्यांचा पुनःजन्मावर विश्र्वास नसला तरी मिपावर पुनःजन्म मात्र घेतात.आता हा हितेसभाऊंचा कितवा मिपाजन्म?

असो,

आज आमच्या काउकडे वांग्याची भाजी आहे.असे समजले, येणार का?

हितेसभाउ, तुम्ही पण या.

बॅटमॅन's picture

10 Dec 2014 - 1:20 pm | बॅटमॅन

धागा टाकत रहावा, प्रतिसादांची शेंचुरी होईल अशी अपेक्षा बाळगू नये.

धागा टाकत रहावा, प्रतिसादांची शेंचुरी होईल अशी अपेक्षा बाळगू नये.
स्वतःच प्रतिसाद टाकून स्येन्च्युरी कशी होईल याचा प्रॉअ‍ॅक्टीव्हपणे प्रयत्न करावा.

"कर्म करीत रहा. फळाची अपेक्षा करु नका." हि वाक्य फक्त पुस्तकांत चांगली वाटतात असं माझं ठाम मत आहे.

आपण कंपनीत काम करतो ते फुकट करतो की महीना अखेरी मिळण्यार्‍या पगाराच्या अपेक्षेने? प्रत्येक केलेल्या कामात सगळ्यांचा काहीनाकाही स्वार्थभाव हा असतोच.

आयुर्हित's picture

11 Dec 2014 - 3:09 pm | आयुर्हित

आशा/अपेक्षा ठेवा अथवा नका ठेऊ, प्रत्येक कर्माचे फळ हे १००% निश्चित (१००% GURANTEED) मिळणार, त्याबद्दल काळ जी करू नकोस, त्याने कर्म करण्यात व्यत्यय येईल व कर्म करणे राहून जाईल किंवा त्याची गुणवत्ता कमी होईल: भगवान श्रीकृष्ण

थोडक्यात काय तर कर्मफळाची "आशा" न ठेवता असे नसून कर्मफळाची "चिंता" न करता आहे त्याचा अर्थ!

अजून एक श्लोक:
अनन्याश्चिंत यंतो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। ॥ ३० ॥ भगवद्गीता

भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे : श्री स्वामी समर्थ

तू फक्त कामाला केंद्रस्थानी ठेवून (FOCUS ठेवून) काम करीत जा, (तुला त्याचे फळ मिळवून द्यायला) मी तुझ्या पाठीशी आहे, जेणेकरून तुझा चरितार्थ निश्चितपणे चालणार आहे.

आनन्दा's picture

12 Dec 2014 - 7:13 pm | आनन्दा

मी तुम्हाला कर्मण्येवाधिकारस्ते चा सोपा अर्थ सांगतो -

कर्मण्ये वादि का अस्ते - कामाच्या वेळेस वाद कशाला?

hitesh's picture

13 Dec 2014 - 3:12 am | hitesh

नाही निर्मळ जीवन . काय करील कर्मण्य !

मुक्त विहारि's picture

13 Dec 2014 - 3:24 am | मुक्त विहारि

नाही निर्मळ जीवन, हे तुम्हालाच सुचणार.

काउ परवा तुमची फारच स्तुती करत होती....

मग कधी येताय परत, काउच्या हातचा चहा प्यायला.....

hitesh's picture

13 Dec 2014 - 9:00 am | hitesh

आम्हालाच नै तर संत तुकोबानाही हे सुचले होते.

असंका's picture

13 Dec 2014 - 12:13 pm | असंका

विराट कोहलीचं चालू आहे कर्मण्येवाधिकारस्ते.... कसलीच आशा अपेक्षा नाही. आला बॉल खेळायचा...
भारत ३००/६ ८१.२ ओवरमध्ये. बोला काय करावं कोहलीने जिंकायच्या आशेने खेळावे, अपेक्षेने खेळावे, की ते आपल्या हातात नाही म्हणून फक्त आला बॉल जितक्या चांगल्या पद्धतीने खेळता येइल तेवढं खेळावे?

कोहलीच आउट! सुख दु:खे समे कृत्त्वा...

जेपी's picture

13 Dec 2014 - 5:01 pm | जेपी

करमत नसल्यामुळे राधिका रस्त्यावर फिरत असते.
तिला पाहत राहणे कदाचीत माझ्या कर्माचे फळ असेल.

मुक्त विहारि's picture

14 Dec 2014 - 11:04 am | मुक्त विहारि

१०० पैकी १००