कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ २-४७
भगवंत म्हणतात:
१. माणसाला कर्म करण्याचा अधिकार आहे
२. कर्मफळ माणसाच्या हातात नाही.
३. कर्मफळाची आशा न ठेवता अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे.
भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातल्या ह्या श्लोकाला वाचताना मनात गोंधळ हा निर्माण होतोच. बहुतांना असे वाटते हा श्लोक माणसाला कर्मापासून परावृत्त करून भाग्यवादी बनवितो. पण हे खरे नाही. आपल्याला नेहमीच असे वाटते, आपण जर कर्म केले तर त्याचे फळ मिळायलाच पाहिजे. हेच योग्य आणि न्यायपूर्ण. जर कर्माचे फळ मिळणार नसेल तर कर्म कशाला करायचे, असा प्रश्न मनात येणारच. मग भगवंतांनी गीतेत कर्म फळावर, कर्म करणार्याचा अधिकार नाही, हे का म्हंटले आहे? हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
आपण पाहतोच मुलाने उत्तम अभ्यास केला तर त्याला परीक्षेत उत्तम गुण मिळतात. उत्तम अभ्यास = उत्तम गुण सहज सोपी नियम आहे. पण नेहमीच असे होत नाही. कुणी विद्यार्थी आजारी पडतो आणि पेपर देऊ शकत नाही. कुणाला अपघात होतो, परीक्षा केंद्रावर पोहचू शकला नाही. कुणाला पेपर तपासताना क्वचित होणाऱ्या चुकी मुळे ९० च्या जागी ०९ मार्क मिळतात. तो चक्क नापास होतो. SSCचा टायपिंगचा पेपरात नेहमीचेच आहे, प्रत्येक केंद्रात २-३ परीक्षार्थी केवळ टाईपरायटर खराब झाल्या मुळे अयशस्वी होतात. त्यांना सरकारी नौकरी मिळत नाही. त्यांची तैयारी व्यर्थ जाते. शेतकरी ही उत्तम बियाण्यांची पेरणी करतो, शेतात जातीने लक्ष देतो, खत, पाणी व मशागत सर्व उत्तम प्रकारे करतो, पिक ही भरपूर येते, पण कित्येकदा गारपीट, अवेळी पावसामुळे त्याचे अतोनात नुकसान होते. त्याला ही पाहिजे तसे फळ मिळत नाही.
वरील उदाहरणांनी एक बाब स्पष्ट होते, सर्वांनी उत्तम कर्म केले पण तरी ही त्यांना फळ मिळाले नाही. कर्म करणे माणसाच्या हातात आहे, पण आपल्या कर्मावर प्रभाव टाकणाऱ्या इतर बाबींवर आपले नियंत्रण नसते. देश, काळ, राजनीतिक परिस्थिती एवं इतरांच्या कर्मांचा प्रभाव ही आपल्या कर्मांवर पडतो. समर्थांनी या आपल्या कर्मांवर प्रभाव टाकणार्या इतर बाबींचे वर्णन, "अध्यात्मिक ताप" (देह, इंद्रिय आणि प्राण यांच्या संयोगाने होणारे ताप - शारीरिक व मानसिक व्याधी इत्यादी ) आणि "आधिभौतिक ताप" ( सर्व पंचभूतांच्या संयोगाने जे त्रास होतात अर्थात सर्व प्रकारचे बाह्य कारणे - अपघात, सर्पदंश, चोरी, डकैती, आग, अतिवृष्टी, पूर, परचक्र, राजा एवं अन्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून छळ इत्यादी) [दशक ३, समास ६ आणि ७] असे केले आहे. या सर्व बाबींवर कर्म करणार्याचे नियंत्रण नसते, म्हणूनच भगवंतानी म्हंटले आहे, कर्मफळावर कर्म करणाऱ्याचा अधिकार नाही, केवळ कर्मावर त्याचा अधिकार आहे.
कर्मांचे फळ मिळाले नाही तर माणूस निराश होतो. आज ह्या मुळेच अनेक शेतकरी आत्महत्या करतात, पेपर मध्ये नापास झाल्याने विद्यार्थी ही आत्महत्या करतात. किंवा लोक कर्म करणे सोडून देतात. मृत्युलोकाला 'कर्मलोक' ही म्हणतात, इथे कुणाला ही कर्म चुकलेले नाही. कर्म हे करावेच लागणार, त्या शिवाय या लोकात कुणी जगू शकत नाही. म्हणूनच भगवंतानी गीतेत म्हंटले आहे, अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे. असे कर्म केल्याने आपल्या कर्माचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळाले नाही तरी ही आपल्याला त्याचा जास्त त्रास होणार नाही.
कर्माची अपेक्षा न ठेवता उत्तम रीतीने कर्म करणे, हे जर शेतकरी राजाला कळले, तर तो कुठल्या ही परिस्थितीत निराश होणार नाही. आत्महत्या न करता पुन्हा पुढच्या पिकाच्या तैयारीला लागेल. विद्यार्थी ही पुन्हा जोमाने अभ्यास करून, परीक्षेत उत्तम गुण मिळविण्याचा प्रयत्न करेल. हेच भगवंताना गीतेत सांगायचे असेल.
प्रतिक्रिया
8 Dec 2014 - 9:27 pm | आनन्दा
हेल्मेट आहे ना?
8 Dec 2014 - 9:55 pm | आनन्दा
श्लोकाच्या चौथ्या चरणात सांगितलेलेच आहे
फळाच्या आशेने कर्म करू नकोस, पण फळ मिळणार नाही म्हणून कर्म टाकूही नकोस.
8 Dec 2014 - 11:02 pm | अत्रुप्त आत्मा
गीतेच्या दृष्टीनी कर्म म्हणजे काय???
तुंम्ही जो ऐहिक अर्थ घेता ,तो गीतेला अभिप्रेत आहे की नाही?
काय अंदाज तुमचा?
8 Dec 2014 - 11:14 pm | सतिश गावडे
@अआ - पटाईतांनी लिहिलेलं हा त्यांनी लावलेला अर्थ असेल तर गीतेला (किंवा गीताकारांना) अभिप्रेत अर्थाबद्दल तुमचा काय अंदाज आहे?
8 Dec 2014 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा
प्रत्येक वर्णानी (धर्मशास्त्रानी)त्यांना त्यांना आखुन दिलेलं कर्म (निमूट्पणे) करावं, (या जन्मी) फळाची अपेक्षा करु नये. (ते पुढल्या जन्मी मिळणार आहे..यावर [अंध]विश्वास ठेवावा)
9 Dec 2014 - 11:42 am | प्रसाद गोडबोले
>>>
सच्च्य्या कर्मयोग्यासाठी कर्मफळ नावाची गोष्टच नसते हो बुवा ...
चित्तस्य शुध्दये कर्मः न तु वस्तुपलब्दये |
वस्तुसिध्दीर्विचारेण न किन्चितकर्मकोटिभि: || विवेकचुडामणी || श्रीमदाद्यशंकराचार्य ||
असो . आपल्या प्रवचनकारांची जास्त स्पेस खात नाही ;) ते येतीलच सविस्तर उत्तर द्यायला :D
-------------------
9 Dec 2014 - 8:19 pm | विवेकपटाईत
अतृप्त आत्मा जी.
नियत कर्म: आपल्या चरितार्थासाठी निवडलेले कर्म.
कर्माचे फळ प्रत्येकाला मिळतेच. पण कधी-कधी सर्वोत्तम कर्म केले तरी, आपल्या नियंत्रणात नसलेल्या परिस्थिती मुळे कित्येकदा आपल्याला कर्माची फळे मिळत नाही- उदा: तुम्ही नियमांचे पालन करून गाडी चालवत आहात. दारूच्या नशेत गाडी चालवून कुणी एक तुमच्या गाडीला ठोकतो. तुम्हाला आणि तुमच्या गाडीला इजा होते. (तुम्ही नियमानुसार गाडी चालवली तरी ही अपघात झाला - कारण दुसर्याच्या कर्मावर तुमचे नियंत्रण नव्हते). शेतकरी उत्तम शेती करतो, पिक चांगले येते - ऐन कापणीच्या वेळी गारपीट होते. शेतकऱ्याला कर्माचे फळ मिळत नाही.
अश्या वेळी माणूस निराश होतो. त्यांनी निराश न होता, विपरीत परिस्थितीत ही नियत कर्म करत राहावे, हेच सांगण्याचा भगवंताचा अभिप्राय असेल, असे मला वाटते.
बाकी अर्थाचा अनर्थ किंवा विपर्यास करण्याची स्वतंत्रता प्रत्येकाला आहेच.
9 Dec 2014 - 10:44 pm | अत्रुप्त आत्मा
@अश्या वेळी माणूस निराश होतो. त्यांनी निराश न होता, विपरीत परिस्थितीत ही नियत कर्म करत राहावे, हेच सांगण्याचा भगवंताचा अभिप्राय असेल, असे मला वाटते. >>> ठिक आहे. तुंम्हाला जे वाटवून घ्यायचे ते वाटवुन घ्या..मला काहिच प्रॉब्लेम नाही,असायचे काहि कारणंही नाही. :)
@बाकी अर्थाचा अनर्थ किंवा विपर्यास करण्याची स्वतंत्रता प्रत्येकाला आहेच.>>> तेच म्हणतोय मी! मी आपला आहे तो अर्थ सांगितला. :)
10 Dec 2014 - 12:25 pm | संजय क्षीरसागर
हे सांगायला भगवंत कशाला हवेत? ते प्रत्येक जण त्याच्या कुवतीनुसार करतोच.
मुळात श्लोक `फलाकांक्षारहित कर्म आणि फलविरहित कर्मानुसरणाविषयी आहे. कुणीही अशाप्रकारे कर्माला राजी होणार नाही.
जर फलाची शक्यताच नसेल तर सकाळी उठून कुणी कामाला निघेल का ? असा साधा विचार केल्यास मुद्दा कळावा. कर्माच्या फलावर नियंत्रण नाही फक्त कर्मावर अधिकार आहे, अशी विचारसरणी पटणारी नाही.
9 Dec 2014 - 9:19 am | आनन्दा
कर्माची व्याख्या अगदी साधी आहे - जे केले जाते ते कर्म. त्यामुळे ऐहिक कर्मे देखील या व्याख्येत येतात.
आणि तशी ती शिकवण पण सोपी आहे, तुझा जो धर्म आहे, त्याला अनुषंगून जे कर्म येते ते त्या कर्माने तुला अपेक्षित फळ मिळावे अशी अपेक्षा न करता, 'मी फक्त माझा धर्म निभावत आहे' अश्या भावनेने कर. फळ मिळाले तरी उत्तम, नाही मिळाले तरी उत्तम. कर्म करणे तुझ्या अधिकारात येते, फळ मिळणे नाही.
जाता जाता, काही वर्षांनी गौतम बुद्ध पण असेच म्हणाले होते.
9 Dec 2014 - 9:51 am | सतिश गावडे
या वाक्यात खुप काही दडलेलं आहे. हीच वाक्ये आधार वापरुन समाजातील एका गटाने दुसर्या गटाला हजारो वर्ष हाल अपेक्षांच्या गर्तेमध्ये खितपत ठेवले होते. त्यांचं माणूस म्हणून जगणं नाकारलं होतं. वर अतृप्त आत्मा यांनी जे म्हटलंय की गीतेला या श्लोकाचा वेगळा अर्थ अभिप्रेत आहे. तो अर्थ हा.
9 Dec 2014 - 10:19 am | मुक्त विहारि
कशाला भूतकाळात जगायचे?
भूतकाळातून धडे घेवू या आणि आनंदात जगू या.
असो,
विषय लांबवायला नको.भेटलो की बोलूच.
9 Dec 2014 - 10:22 am | सतिश गावडे
भूतकाळातून धडा घेऊन आनंदाने जगू या हा विचार पटला. मात्र ज्या गोष्टीने भुतकाळात हजारो वर्ष समाजजीवनात उलथापालथ केली ती गोष्ट आता मुलामा लावून समोर येत असेल तर त्याबद्दल बोलूच नये असं म्हणून कसं चालेल?
9 Dec 2014 - 10:34 am | अर्धवटराव
हि एक आधुनीक काळातली अफुची गोळी आहे. चकाचक पॅकमधे अर्थहीन बेसलेस मिमांसा.
9 Dec 2014 - 1:19 pm | पैसा
श्लोकात काही गडबड नाही. गडबड आहे ती अर्थ लावणार्यांत, आणि त्याचा पाहिजे तसा वापर करणार्यात. त्यासाठी श्लोक किंवा गीता बाद ठरवणे योग्य नाही. काहीजणांनी गीतेचा अर्थ कर्मवादी लावला तर काही जणांनी "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" असा लावला. दुसर्या गटातले लोक प्रबळ झाल्याने भारताचे एकूण जास्त नुकसान झाले असाही मतप्रवाह आहे. एकच जिलबी खाऊन काहीजणांना सदेह स्वर्गप्राप्ती होते तर काहीजणांना ओकारी येते. पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना.
8 Dec 2014 - 11:56 pm | मारवा
आपण गीता नावाच्या पुस्तकाच्या श्रीकृष्ण नावाच्या लेखकाच म्हणण
मजेत जगाव कस नावाच्या पुस्तकाच्या शिवराज गोर्ले नावाच्या लेखकाच्या म्हणण्या
मध्ये बाकी फरक वजा करुन लेखकाच्या वलयाचा घेतल तर काहि चुक होत का ?
म्हणजे शिवराज गोर्ले नाही पटला तर आपण बाजुला टाकुन देतो तस
आपण श्रीकृष्ण नावाच्या लेखकाच्या विचारांसंदर्भात करायला नेमकी अडचण कुठे येते ?
का यावी का येउ नये ? येते म्हणजे काहि प्रॉब्लेम आहे का आपल्यात फंडामेंटल
असो
9 Dec 2014 - 10:20 am | कवितानागेश
म्हणजे काय?
तसेही प्रत्येकजण प्रत्येक पुस्तकातले स्वतः ला पटलेले/सोयीचे भाग उचलतो आणि न झेप णारे सोडून देतो.... न पटणारी गोष्ट कुणीतरी सांगितालिये म्हणून नाइलाजानी करणारा मनुष्य मी आजपर्यंत पाहिला नाही.
स्वगत: हेलमेट कुठे गेले माझे??
9 Dec 2014 - 10:33 am | टवाळ कार्टा
हेल-मेट म्हणजे? ;)
10 Dec 2014 - 5:43 pm | hitesh
गीतेचा लेखक श्रीकृष्ण की व्यास ?
10 Dec 2014 - 5:49 pm | आयुर्हित
गीतेचा लेखक गणपती आहे.
10 Dec 2014 - 5:50 pm | बॅटमॅन
त्यांना ष्टेनोग्राफर नकोय, ऑथर पाहिजेय.
10 Dec 2014 - 5:51 pm | स्पा
=))
10 Dec 2014 - 5:59 pm | प्यारे१
ष्टेनोग्राफर (टंकनिक) वरुन आठवलं मिपाचे गण... आपलं आमचे 'शिरा'वाले गवि कुठे आहेत? ;)
10 Dec 2014 - 5:51 pm | स्पा
=))
9 Dec 2014 - 10:17 am | मदनबाण
जैसे कर्म तैसे फल.
फलाची "आसक्ती" न-ठेवता कर्म करण्यावर भर द्यावा. फळाची आसक्ती ठेवणे म्हणजे ऐहीक संसाराशी आसक्ती ठेवणे आणि त्यामुळे मोक्षाचा विचार बाजुला पडणे.
जाता जाता :- ऐहीक सुख हे क्षणीक मनुष्या...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?
9 Dec 2014 - 10:18 am | सतिश गावडे
मोक्षाची आस ही सुद्धा एक आसक्तीच नाही का? :)
9 Dec 2014 - 10:20 am | मदनबाण
मोक्षाची आस ही सुद्धा एक आसक्तीच नाही का?
मोक्ष ऐहीक आहे का ? मोक्षाची आस हा मार्ग आहे,आसक्ती नव्हे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?
9 Dec 2014 - 10:23 am | सतिश गावडे
अच्छा. मोक्ष ऐहीक नसून पारलौकीक असल्यामुळे मोक्षाची आस ही आस न राहता तो मार्ग बनतो. :)
9 Dec 2014 - 10:24 am | मुक्त विहारि
अहो,
प्रत्येकाचा मोक्ष वेगळा.असे मला वाटते.
कुणाला संपत्ती दान केल्याने मोक्ष मिळत असेल तर कुणाला देशा साठी प्राण त्याग केल्याने.एखाद्या पतिव्रतेला पतीची सेवा करून मोक्ष मिळत असेल.
मोक्ष मिळण्यासाठीच आम्ही कट्टे करतो.कट्टे केले की, आम्हाला उत्तम माणसे मिळतात.ती आमचे अज्ञान दूर सारतात आणि आम्हाला समाधान मिळते.तोच आमचा मोक्ष.
बघा पटत आहे का?
पटत नसेल तर सोडून द्या...
9 Dec 2014 - 10:29 am | सतिश गावडे
मुवि, त्या कट्टयांना तुम्ही कोंबडी आणि बोकडांना मोक्षाचा मार्ग दाखवता का?
9 Dec 2014 - 10:33 am | टवाळ कार्टा
=))
9 Dec 2014 - 10:41 am | मुक्त विहारि
ते बिचारे आधीच गेलेले असतात.
सगा... एक काम करू या का?
आपण दोघे इथेच थांबू या का?
मी परत एकदा माझ्या पद्धतीने "मोक्षा"चा अभ्यास करतो.मग दोघेही कट्टा करू आणि चर्चा करू.
बघ चालत असेल तर...
9 Dec 2014 - 10:44 am | टवाळ कार्टा
आज सगा पेटलाय :)
9 Dec 2014 - 10:46 am | मुक्त विहारि
सगा, आपण दोघेच कट्टा करु या.
टकाला बसू दे बोंबलत.
9 Dec 2014 - 11:17 am | टवाळ कार्टा
चायला मग तुमच्या सल्ला देणार्या बाबांना कधी भेटणार मी
9 Dec 2014 - 11:23 am | सतिश गावडे
काळजी करू नको. मी त्या बाबांकडून दीक्षा घेईन आणि तुला देईन.
9 Dec 2014 - 11:33 am | टवाळ कार्टा
पण त्या दीक्षाला मला देण्याऐवजी तुच फिरायला घेउन गेलास तर?
9 Dec 2014 - 11:37 am | सतिश गावडे
वाट पाहण्याचे कर्म करत राहा. फ़ळांची अपेक्षा ठेवू नको.
9 Dec 2014 - 11:38 am | टवाळ कार्टा
वरचा प्रतिसाद अश्लिल आहे का? :P
9 Dec 2014 - 11:49 am | सतिश गावडे
श्लील अश्लील असं काही नसतं. तुम्ही कसं बघता त्यावर सारं अवलंबून असतं.
9 Dec 2014 - 11:56 am | टवाळ कार्टा
;)
9 Dec 2014 - 11:58 am | प्रसाद गोडबोले
डोळा मारणे हे एकेकाळी अश्लील समजले जायचे .
9 Dec 2014 - 12:00 pm | मदनबाण
पण मग पाखरांना डोळा मारलेले का आवडते ? :D
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?
9 Dec 2014 - 2:25 pm | तिमा
प्रत्येकाचा मोक्ष वेगळा.असे मला वाटते.
अहो, काही जणांना, सक्काळी साफ झाले तरी मोक्ष मिळाल्याचा आनंद होतो.
9 Dec 2014 - 10:25 am | Sandipdada
गीता नावाच्या पुस्तकामधील किती उपदेष आपन आचरनात आणु शकतो हा एक यक्ष प़श्नच आहे?
9 Dec 2014 - 10:46 am | मदनबाण
गीता नावाच्या पुस्तकामधील किती उपदेष आपन आचरनात आणु शकतो हा एक यक्ष प़श्नच आहे?
जितके जमेल तितके आचरण सुद्धा पुरेसे आहे, फक्त प्रयत्न "प्रामाणिक" हवा. ;)
चाणक्य सुद्धा त्याच्या भाषेत हेच सांगतो :- पराजित राष्ट्र तब तक पराजित नही होता,जब तक वह अपनी संस्कॄती और मुल्यों की रक्षा कर पाता है|
तुम्हारे पतन का कारण तुम स्वयं हो | हमारे पतक कारण हम स्वयं है| कोई भी मूल्य एवं संस्कॄती तब तक जिवीत नही रह सकती जब तक वो आचरण में न हो.
उतिष्ठ भारतः
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?
संदर्भ :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?
9 Dec 2014 - 10:27 am | मदनबाण
मोक्ष ऐहीक नसून पारलौकीक असल्यामुळे मोक्षाची आस ही आस न राहता तो मार्ग बनतो.
कुठलीही आस-न ठेवता जगणे हा देखील मोक्षच ! त्यामुळेच "फळाची अपेक्षा" ठेवु नये ! ;) मोक्ष ही स्थिती आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?
9 Dec 2014 - 10:31 am | सतिश गावडे
आता कसं बोललास. :)
आणि स्थितीला लय असतो. *lol*
9 Dec 2014 - 11:09 am | मदनबाण
स्थितीला लय असतो.
प्रत्येक नाशवंत गोष्ट उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन अवस्थांमधून जाते. मोक्ष हा आत्म्यासाठी असतो,
“नैनं छिंदंती शस्त्राणी, नैनं दहती पावक :। न चैनं क्लेदयंत्यापो, न शोषयती मारुत: ॥ त्यामुळे देह लयाला जातो आत्मा नव्हे आणि मोक्ष ही स्थिती आत्म्याची आहे.
9 Dec 2014 - 11:16 am | सतिश गावडे
इथे मी थांबतो. तुम्ही आत्म्याची संकल्पना मानता, मी मानत नाही.
9 Dec 2014 - 11:47 am | प्रसाद गोडबोले
बुवा उर्फ अत्रुप्त आत्मा आपल्याल्या प्रत्येक कट्याला याचि देही याचि डोळा भेटतात तरीही तु आत्मा मानत नाहीस ... दांभिक साला .... ल्मिसळपाववर नाव काढशील :D
9 Dec 2014 - 11:52 am | सतिश गावडे
तू अभद्र वाणी उच्चारली आहेस. या कर्माचे फळ तू अपेक्षा नाही केलीस तरीही तुला मिळेल.
9 Dec 2014 - 12:20 pm | प्रसाद गोडबोले
भद्र अभद्र असं काही नसतं ... प्रतिसाद डीलीट झाला तर समजायचं की ते अभद्र होतं एरव्ही सगळं भद्रच ;)
मॅटीनी शो ची कविता वाचलीयीस का तु ?
9 Dec 2014 - 12:28 pm | टवाळ कार्टा
कोणती कविता???
9 Dec 2014 - 12:31 pm | संजय क्षीरसागर
*smile*
9 Dec 2014 - 10:34 am | संजय क्षीरसागर
पाश्चिमात्य मानसिकतेत असा बखेडा नसल्यानं (म्हणजे, तुझा कर्मावर अधिकार आहे पण फलावर नाही. फलाभिमुख न होता कर्म कर आणि (तरीही) कर्मविन्मुख होऊ नकोस!...) पाश्चिमात्य लोक कोणतंही काम समरसून करतांना दिसतात आणि ते निश्चितपणे फलाप्रत जाईल अशी योजना करतात. कर्माप्रती त्यांचा दृष्टीकोन अत्यंत निर्वैयक्तिक दिसतो आणि कामाची प्रतवारी (जी आपल्याकडे उघड दिसते) ती त्यांच्याकडे दिसत नाही. त्यांचाकडे कर्म आणि ते करण्याच्या पद्धती स्टँडर्डाइज होऊन फलाप्रती निश्चितता निर्माण करण्यात आलीये आणि आपल्याकडे कर्मापेक्षा फलालाच महत्त्व आलंय. फलापेक्षेनं कार्यरत होऊन देखिल त्यांच्याकडे कॅब ड्रायवर स्वतःचं काम सन्मानानं करतांना दिसतो आणि आपल्याकडे फलावरनं, कर्माची आणि कर्त्याची सामाजिक स्थिती ठरते.
या श्लोकाच्या फंडातच गोंधळ आहे, जर बाह्यपरिस्थिती संपूर्णपणे कर्त्याच्या आवाक्याबाहेर असेल तर प्राप्त कर्म आणि ते फलाप्रत नेणारी सर्व साधनं सुद्धा त्याच्या आवाक्याबाहेरच आहेत. त्यामुळे प्राप्त कर्मावर कर्त्याचा अधिकार असणं असंभव आहे. अशात मग उर्वरित श्लोकाला संदर्भ राहात नाही.
9 Dec 2014 - 10:41 am | क्लिंटन
या श्लोकाच्या फंडात नव्हे तर तुम्हाला त्या श्लोकाचा जो अर्थ समजला आहे त्यात मात्र प्रचंड गोंधळ दिसतच आहे.
असो.
9 Dec 2014 - 11:11 am | संजय क्षीरसागर
सविस्तरपणे दर्शवला आहे. वाचनाचा आनंद (सर्वांनी आणि मनसोक्त) घ्यावा!
9 Dec 2014 - 10:38 am | क्लिंटन
लेख आवडला हे वेगळे सांगायलाच नको. याविषयी मे २००९ मध्ये विकास यांचा एकम सत नावाचा लेख आला होता त्यावेळी त्या चर्चेवर मी काही प्रतिसाद लिहिले होते.तेच इथे चिकटवतो.
१. डेल कार्नेगी हे अमेरिकेतील विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील आद्य ’सेल्फ हेल्प’ वाले. त्यांनी How to stop worrying and start living हे एक नितांत सुंदर पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकात त्यांनी अमेरिकेतील मॉलमध्ये सर्वत्र असलेल्या J.C.Penny या साखळीचे मालक जेम्स कॅश पेनी यांच्याविषयी लिहिले आहे.पेनी म्हणतात,"I wouldn't worry if I lost every dollar I have because I don't see what is to be gained by worrying. I do the best job I possibly can; and leave the results in the laps of the gods". भगवद्गीतेतील ’कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ यापेक्षा काही वेगळे नाही.पेनींनी भगवद्गीता हे नावही ऐकले असायची शक्यता कमीच आहे.पण त्यांनी नकळतपणे का होईना भगवद्गीतेतील ’कर्मण्येवाधिकारस्ते’ अंमलात आणली होती.आणि मला वाटते सर्व क्षेत्रातील यशस्वी आणि आघाडीच्या व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हीच शिकवण आचरात आणावी लागत असेल इतकी ही शिकवण सर्वव्यापक आहे.
आता हा विषय निघालाच आहे म्हणून त्यावर अजून थोडे लिहितो.मला स्वत:ला अमेरिका सोडून भारतात परत यावे लागले आणि त्या अर्थी मी अपयशी ठरलो असे मला वाटले.त्यावेळी मी महर्षि दयानंदांचे भगवद्गीतेवरील 'The teachings of Bhagavad Gita' हे पुस्तक अजून खोलात वाचले होते.त्यात ते म्हणतात की कर्मण्येवाधिकारस्ते चा अनेकदा चुकीचा अर्थ लावला जातो.फळाची अपेक्षा न करता कर्म करा असा याचा अर्थ नाही.तसे असेल तर स्वत: भगवान कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली तेव्हा ती शिकवण अर्जुनाला कळेल ही अपेक्षा न ठेवता सांगितली असाही अर्थ निघू शकेल.महर्षि दयानंदांच्या मते ते तसे नाही.दयानंदांनी त्याच्या लावलेल्या अर्थावर मी स्वत: विचार केला आणि मला त्यांच्या म्हणण्याचा अर्थ पुढीलप्रमाणे असावा असे वाटते. हे गणिताच्या परिभाषेत लिहितो.
समजा A=संचित (मागील जन्मांतील unfulfilled कर्म). म्हणजे मागील जन्मात आपण काही चांगले/वाईट केले असेल पण त्याचे चांगले/वाईट फळ आपल्याला मिळाले नसेल तर ते संचित यात मोडते.
B=प्रारब्ध (या जन्मातील unfulfilled कर्म)
C=कोणत्याही गोष्टीसाठी केलेल आपले प्रयत्न
आणि R हे आपल्याला मिळणारे फळ असेल (Result) तर R=f(A,B,C). म्हणजेच आपल्याला मिळणारे फळ या तीनही घटकांवर अवलंबून असते.यापैकी पहिल्या घटकाची आपल्याला अजिबात कल्पना नसते.दुसरा घटक माहित असायची शक्यता असते पण त्याविषयी आपण काहीही करू शकत नाही कारण ती गोष्ट आधीच घडून गेलेली असते. आपल्या हातात केवळ तिसरा घटक असतो. तसेच f या फलनाचे (function) चे स्वरूपही आपल्याला माहित नसते. तेव्हा आपल्याला शक्य तितके चांगले प्रयत्न करावेत.आणि देवाला माहित असलेल्या गणिती सूत्रानुसार आपल्याला फळ मिळेल. हे दयानंदांच्या म्हणण्याचे माझे interpretation झाले. दयानंदांनी ’प्रसादबुध्दी’ ही एक संकल्पना त्याच पुस्तकात लिहिली आहे.ते म्हणतात की आपण देवळात गेलो आणि आपल्याला प्रसाद म्हणून खडीसाखर मिळाली की सफरचंद, आपण ते देवाचा प्रसाद म्हणून स्विकारतो.खडीसाखर मिळाली तर ’मला सफरचंद का दिले नाही’ असा उलटा प्रश्न आपण विचारत नाही. त्याचप्रमाणे आपल्या प्रयत्नांना येणारे फळ हा ’देवाचा प्रसाद’ म्हणून स्विकारावे असेही दयानंद म्हणतात.म्हणजेच दयानंदांच्या मते आपण चांगल्या फळाची अपेक्षा ठेवत आपले सर्वात चांगले प्रयत्न करावेत. पण त्याचे परिणाम देवावर सोडावेत आणि परिणाम जरी आपल्या अपेक्षेपेक्षा कमी आले तरी स्वत:ला अपयशी मानू नये. जे.सी.पेनी पण काही वेगळे म्हणत आहेत असे वाटत नाही.
२. दयानंद सुध्दा आपल्या कर्माचे फळ नक्की काय हा अधिकार केवळ देवाचा आहे असे म्हणतात. म्हणजेच आपण केलेल्या कर्माचा परिणाम काय होईल याचा निर्णय करायचा अधिकार आपल्याला कधीच नाही असाच होतो.कर्मण्येवाधिकारस्ते चा अर्थ फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करावे असा लावला जातो.दयानंद म्हणतात तो तसा नाही तर कर्मणि एव अधिकार: ते म्हणजे तुझा कर्म करण्यापुरताच अधिकार आहे आणि मा फलेषु कदाचन म्हणजे तुझ्या कर्माची फळे काय हे ठरवायचा नाही. यात ठरवायचा हा शब्द मुद्दामून अधोरेखित केला आहे.
म्हणजेच मी परीक्षेसाठी अभ्यास करतो ते मला चांगले मार्क मिळतील ही अपेक्षा ठेऊनच.पण माझ्या A,B,C या घटकांप्रमाणे देवाला माहित असलेल्या गणिती समीकरणाप्रमाणेच मला फळ मिळणार आहे.याचा अर्थ मी अभ्यास करताना चांगल्या मार्काची अपेक्षा न ठेऊन अभ्यास करावा असा होत नाही.तर मी चांगले मार्क मिळावेत म्हणून माझ्या परिने चांगला प्रयत्न करावा आणि परिणाम देवावर सोडावा.आणि जो काही परिणाम देव मला देईल तो खळखळ न करता स्विकारावा.म्हणजेच माझा अधिकार अभ्यास करण्यापुरताच आहे.त्याचा परिणाम काय होईल हे ठरवायचा नाही.पण याचा अर्थ मी अभ्यास करताना चांगल्या मार्काची अपेक्षा न ठेवता अभ्यास करावा हा होत नाही.
9 Dec 2014 - 11:09 am | संजय क्षीरसागर
म्हणजे मागच्या जन्मीचा बॅकलॉग या जन्मी भरुन काढायचा? आणि असं किती जन्म मागे जायचं? आणि हे रेकॉर्ड नेमकं कुठे असतं आणि कोण ठेवतं?
म्हणजे पुन्हा या जन्मातही कामं पेंडींग! त्याचं ओझं म्हणजे प्रारब्ध! (लै भारी! पेंडींग कामाचं जे टेंशन असतं त्याला प्रारब्ध म्हणायचं!)
निदान एका तरी गोष्टीला लॉजिक दिसतंय.
म्हणजे मागच्या जन्मातला बॅकलॉग, या जन्मात रखडलेली कामं आणि या सगळ्या गोंधळात केलेला प्रयत्न (C!) आणि त्याचा रिझल्टंट काय तर R! इतक्या गोंधळात काय होत असेल आणि काय रिझल्ट येत असेल? म्हणजे किमान कामावर फोकस तरी होता येईल का असा प्रश्न आहे!
आता इतक्या बाळबोध लॉजिकला देवबाप्पाची मदत लागणारच! लगे रहो!
माझा मुद्दा आता वेगळा स्पष्ट करण्याची गरज उरली नाही!
9 Dec 2014 - 10:55 am | विजुभाऊ
स्टीव्हन कोव्हे ने ७ हॅबिट्स मधे जसं म्हंटलय की प्रोअॅक्टिव्हीटी बद्दल संगताना तो म्हणतो.
की तुम्ही कार्य काहीही करा त्याचे फळ मिळतेच. एव्हरी अॅक्षन हॅज इट्स क्वान्सिक्वन्सेस. इनअॅक्षन इज अल्सो अॅन अॅक्षन.
क्रीया केल्यावर प्रतिक्षीप्त क्रीया येतेच. कोणताही निर्णय घ्या त्याचे परीणाम होतातच. निर्णय न घेणे हा सुद्धा एक प्रकारचा निर्णयच असतो. जसे पेन्सीलचे एक टोक उचलल्यावर दुसरे टोकदेखील उचलले जातेच.
तद्वत तुम्ही कार्य करता त्याचे फळ मिळतेच. कार्य न करणे हे सुद्धा एक कार्यच आहे त्याचेही त्यामुळे फल मिळणारच
आहे तर मग प्रोअॅक्टीव पणे आपण एखादी कृती केली तर त्याचे फळ आपण ठरवु शकतो.
10 Dec 2014 - 1:26 pm | आयुर्हित
प्रोअॅक्टीव पणे आपण एखादी कृती केली तर त्याचे फळ आपण ठरवु शकतो
यावरून जर उद्या पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्याने आजच बी पेरून ठेवले तर आपण ठरवलेले फळ मिळेलच याची काय शाश्वती?
किंवा सोन्याचे भाव वाढणार आहेत म्हणून एखाद्याने भरपूर सोने घेवून ठेवले तर आपण ठरवलेले फळ मिळेलच याची काय शाश्वती?
9 Dec 2014 - 10:58 am | बाळ सप्रे
एका मर्यादेपर्यंत श्लोकाचा सारांश ठीक वाटतो, बाह्यपरिस्थितीवर संपूर्ण नियंत्रण कोणाचेच असु शकत नाही त्यामुळे अपेक्षित फळ न मिळाल्यास कर्मविन्मुख होउ नये.
परंतु फळाची अपेक्षाच न करणे (शब्दशः अर्थ) तितकासा योग्य वाटत नाही. कारण दुसर्या अंगाने विचार केल्यास ध्येय (GOAL) ठरवून त्याप्रमाणे काय आणि कसे कर्म करावे हे ठरवणे (plan n execution) या काम करण्याच्या पध्दतीलाच हा शब्दशः अर्थ छेद देतो.
बाह्यपरिस्थितीवर संपूर्ण नियंत्रण नसले तरी अनिश्चितता ओळखून त्यावरही काही प्रमाणात उपाययोजना (Risk management) करता येतात.
9 Dec 2014 - 11:32 am | क्लिंटन
तसा अर्थ अभिप्रेतही नाही. फळाची अपेक्षा न करता कर्म करणे म्हणजे शुध्द शब्दात सांगायचे तर पाट्या टाकण्यासारखे झाले.
9 Dec 2014 - 11:41 am | सतिश गावडे
क्लिंटनभाऊ, श्लोकाचा शाब्दिक अर्थ तोच आहे.
9 Dec 2014 - 11:48 am | बाळ सप्रे
हेच म्हणतो..
9 Dec 2014 - 11:51 am | संजय क्षीरसागर
म्हणजे मूळ श्लोकालाच सुरुंग लागला!
आधी म्हणायचं R = f (A*B*C) !
त्याचा अर्थ असा काढायचा :
फळाची अपेक्षा ठेवायची नाही म्हणजे फळ काय मिळावं हे (आपण) ठरवायचं नाही, ते कोण करणार ? तर देवबाप्पा ! मग अपेक्षा तर आलीच आणि पुन्हा देवावर हवाला टाकून मोकळे. हाच तर भारतीय मानसिकतेचा गोंधळ आहे आणि तो प्रत्येक प्रतिसादातून सुयोग्यपणे दाखवला जातोयं.
9 Dec 2014 - 11:53 am | प्रसाद गोडबोले
हा आमचा शेवटचा गंभीर प्रतिसाद
किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः । तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १६ ॥
भले भले दमले हा काथ्या कुटुन ... म्हणुनच तुम्हाला परत एकदा शेवटचे सांगतोय ...
सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज:। अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:।|
ह्या असल्या सगळ्या फालतु चर्चा सोडुन तुम्ही मला शरण या , मी तुम्हाला सर्व कर्मफलातुन मग ते पाप असो की पुण्य ,मी तुम्हाला ह्या सगळ्यातुन मुक्त करेन , लय टेन्शन घेवु नका .
___________________________________________________
अवांतर : सगा , तब्बल ९ प्रतिसाद ! आज तुला ब्यॅटींगला बेळ आहे असे दिसते :D
9 Dec 2014 - 12:10 pm | संजय क्षीरसागर
ही सिद्धी संपादकत्व प्राप्त झाल्यावरच मिळते!
9 Dec 2014 - 12:14 pm | मदनबाण
ही सिद्धी संपादकत्व प्राप्त झाल्यावरच मिळते!
हॅहॅहॅ... याचा अर्थ इथले संपादक "दयाळु" आहेत नाहीतर कित्येक "आयडीज" कधीच मोक्ष प्राप्त करुन बसले असते ! :D
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?
9 Dec 2014 - 12:17 pm | सतिश गावडे
अरे तो अर्जून सारे "योग" सांगून झाले तरी त्याचे लढण्याचे "विहीत कर्म" करायला तयार होईना . अशा वेळी कुणीही वैतागून "खडडयात जाऊ दे ते सारं. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. मग मी सांगतो ते कर." असं म्हणणारंच की.
9 Dec 2014 - 12:23 pm | प्रसाद गोडबोले
मी तुम्हाला इथं त्च सांगतोय ..." कशाला काथ्याकुटत बसलाय ? मला शरण ह्या , मी सांगतो ते करा , माझ्यावर विश्वास ठेवा ".
लवकरच रामपालबाबा सारखा एक आश्रम स्थापन करावा असा विचार आहे , धन्या फेज २ मधे जागा बघुन ठेव रे :D
9 Dec 2014 - 12:28 pm | टवाळ कार्टा
यावर मिपावरच कोणीतरी धागा काढलेला...फुल्टू प्लानींग झालेली :)
9 Dec 2014 - 12:03 pm | sagarparadkar
१) ही असली सर्व तत्वज्ञानं भारतासारख्या 'समशीतोष्ण' कटिबंधातील प्रदेशातच का उदयाला आली ?
२) अलास्का किंवा एखाद्या नॉर्डिक किंवा पराकोटीच्या हवामानाच्या प्रदेशात उदयाला आलेलं असं एखादं तत्वज्ञान कोणी निदर्शनास आणून देईल का ?
३) भारतीय उपखंडात भाषा आणि वाङ्ग्मय आणि उच्चारशास्त्र ह्यावर जेवढे किचकट विकसन झाले तेवढे विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या शाखेत का झाले नाही?
ह्या सर्वांवर माझे स्वत:चे उत्तर एकाच आहे, कि पूर्वीपासून ह्या भागात जमीन बर्यापैकी सुपीक, आणि हवामान फारच क्षमाशील (काही थोडे भाग वगळता) राहिलेले आहे. त्यामुळे ह्या विद्वत्वर्ग व तत्वज्ञ लोकांना कधी दोन वेळची खायची भ्रांत पडलीच नाही, म्हणून ते भरल्यापोटी असले वाङ्ग्मय-विस्तार करत राहिले.
9 Dec 2014 - 12:49 pm | सतिश गावडे
तत्वज्ञान हे असं कापड आहे जे कधी सत्य झाकण्यासाठी तर कधी सत्याचे ज्ञान नाही हे वास्तव झाकण्यासाठी तर कधी स्वार्थ झाकण्यासाठी वापरलं जातं. कधी कधी सत्य कळूनही त्याचा स्विकार करण्यात अहंकार आडवा येतो अशा वेळीही तत्वज्ञान मदतीला येते.
क्वचित कधी तत्वज्ञानाचा वापर माणसाला खोटा का होईना आधार देण्यासाठीही केला जातो.
9 Dec 2014 - 12:13 pm | ज्ञानोबाचे पैजार
कर्म केले म्हणुन फलाची अपेक्षा करण्यापेक्षा "कर्म हेच फल" अशा भावनेने जर आपण कर्म करीत राहिलो तर वरील वादाचे मुद्दे उपस्थित होणारच नाही. हाच या श्लोकाचा खरा अर्थ आहे असे मला वाटते.
कर्मफलाची आसक्ती सोडून,"आपण मोठे भाग्यवान आहोत म्हणुन आपल्याला कर्म करायची संधी मिळते आहे, या मिळालेल्या संधीचे मी सोने करेन", या भावनेने कर्म केले तर डोक्यातले प्रश्र्णांचे जाळे साफ होईल आणि कर्माचा आवष्यक तो दर्जा सुद्धा राखला जाईल.
अर्थात हे लिहायला सोपे असले तरी आचरणात आणायला प्रचंड कठीण आहे. पण असा विचार करुन बघायला तरी काय हरकत आहे?
पैजारबुवा,
9 Dec 2014 - 12:22 pm | संजय क्षीरसागर
प्रवास हीच मौज आहे, कारण गंतव्य अनिश्चित आहे. तस्मात, फोकस ऑन द अॅक्शन अँड द एंजॉयमंट वील फॉलो, रिझल्ट कॅन बी एनीथींग!
अर्थात, श्लोकाचा तसा अर्थ नाही कारण श्लोकाचा फोकस कर्मफलावर आहे. फलाकांक्षारहित कर्म कर, फलाचा हेतू न धरता कर्म कर आणि (तरीही) कर्मविन्मुख होऊ नकोस असा उपदेश आहे, तो कुणालाही सहजी पटणारा नाही.
9 Dec 2014 - 12:57 pm | कवितानागेश
अजून पुरेसा पेटला नाही धागा.
कर्म कमी पडताय........
=))
9 Dec 2014 - 2:13 pm | प्रसाद गोडबोले
नेफळे अन माईसाहेब आले तर जोरदार वणवा पेटेल , त्यांना आवाज द्या की माऊली ताई ;)
9 Dec 2014 - 2:15 pm | बॅटमॅन
कोण?
माई नेफळे की नाना कुरसुंदीकर?
9 Dec 2014 - 8:27 pm | प्रसाद गोडबोले
तिथे शुध्द अद्वैत आहे .
एकं नान्या विप्रा: बहुधा वदन्ति :D
10 Dec 2014 - 12:54 pm | बॅटमॅन
हा हा हा, अगदी अगदी =))
9 Dec 2014 - 1:40 pm | यसवायजी
मज्जंय. चालू द्या. तो पर्यंत म्या count your chickens before they hatch वाचून येतो.
9 Dec 2014 - 1:57 pm | प्यारे१
काही ठरलं का?
9 Dec 2014 - 2:04 pm | प्रसाद गोडबोले
अहो तुमचीच वाट बघताहेत सगळे ;)
या आता डायस वर ... हा ग्या माईक ... अन होवुन जाऊद्या एक फक्कड प्रवचन :D
बोला पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ ...
हं , करा आता सुरु :D
9 Dec 2014 - 2:10 pm | प्यारे१
आमची आधीची प्रवचनं अभ्यासा. उत्तरं तयार मिळतील. ;)
9 Dec 2014 - 2:15 pm | बॅटमॅन
जिलब्या त्याच त्या असतात हो. कृष्णानेही नाही का सांगितलं की हा योग इतका भारी असला तरी टाईम टु टाईम रिव्हिजन करावी लागते म्हणून?
तेव्हा नवीन जिलबीस्मरण करून पाडा प्रवचन. ;)
9 Dec 2014 - 2:17 pm | प्यारे१
आगे जाओ आगे जाओ! ;)
बाकी सीरियसली रिव्हीजन आवश्यक ह्याबाबत सहमत.
9 Dec 2014 - 2:17 pm | प्रसाद गोडबोले
विवेक्पटाईत , प्लीज नोट . (ह.भ.प. की स.भ ? ) प्यारेबुवांची प्रवचन वाचा , उत्तरे मिळतील :)
अवांतरः
काय बुवा , यंदा कीही लिहिली नाहीत दत्त जयंतीला ... त्रिगुणात्मक त्रैमुर्ती एक विचार हा धागा आम्हाला शोधुन शोधुन वाचावा लागला परत ...
नाही म्हणलं तर इथे चांगला योग जमुन आलाय , जरा करा सत्स्तंगाचा क्वोटा पुर्ण ;)
9 Dec 2014 - 2:19 pm | प्यारे१
:)