कमिटी (शतशब्द्कथा )

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
25 Sep 2014 - 7:23 pm

'कमिटी येनार' म्हटल्यावर सगळी संस्था कामाला लागली. बऱ्याच फाईली हालल्या.

कमिटीचा दिवस सणासारखा सजला होता.
मिटिंग हॉलमधे लंबगोल टेबल- त्यावर सफेद बेडशिटं टाकालीवती.
पाटील सर फाईली ठीक करत होते. काजू बदामाच्या बाउल्समधून थोडे तोंडात टाकून लेव्हल बरोबर करत होते.
इतक्यात ''कमिटी आली..'' असा गलका झाला.

सदस्यांनी जागा घेतली. फाईली चाचपल्या. पाकीट ओक्के असल्याचं सराईतपणे हेरलं.
चेरमनसायाबाकडं बघून कसनुसं हसले.

चष्म्याच्या वरून बघत महाजनसाहेब म्हटले "यावेळी संस्थेने प्रगती चांगली केलीय. पण... तेव्हढा टीचिंग स्टाफ आणा जरा ''

''तुमचं मार्गदर्शन असल्यावर काय सर? फुडल्या खेपेला अजून सुधारणा करु !''

कॉलेजचा इनटेक दोनशेने वाढण्यावर शिक्कामोर्तब झालं.
भौसाहेब खूष, कर्मचारीबी खूष.

दिवाळीचा बोनस लगेचच डीक्लेर झाला !

कथाआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Sep 2014 - 7:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं !

कमिटीच्या करामती म्हायत्येत !

काजू बदामाच्या बाउल्समधून थोडे तोंडात टाकून लेव्हल बरोबर करत होते. ह्ये आमिबी घरी पावणेलोकांची वाट पातांना न्हेमीच कर्तो :)

जेपी's picture

25 Sep 2014 - 7:33 pm | जेपी

मी पयला .
99 शब्द मोजले चुभु द्याघ्या.

आदूबाळ's picture

25 Sep 2014 - 7:39 pm | आदूबाळ

पाकीट संस्कृती!

विवेकपटाईत's picture

25 Sep 2014 - 7:52 pm | विवेकपटाईत

पाकीट ओक्के असल्याचं सराईतपणे हेरलं.
फुडल्या खेपेला अजून सुधारणा करु !
जास्त आवडले.

एस's picture

25 Sep 2014 - 8:25 pm | एस

गेंड्याच्या कातडीच्या व्यवस्थेला असे चिमटे कधीकधी सॉल्लिड लागतात. :-)

आतिवास's picture

25 Sep 2014 - 9:55 pm | आतिवास

कथा आवडली.
ब-याच 'कमिटी' आठवल्या!

सुहास झेले's picture

27 Sep 2014 - 6:32 pm | सुहास झेले

हो अगदी अगदी.... :)

किसन शिंदे's picture

25 Sep 2014 - 9:58 pm | किसन शिंदे

आवडली कथा.

कवितानागेश's picture

25 Sep 2014 - 10:18 pm | कवितानागेश

मस्त. :)

श्रीरंग_जोशी's picture

26 Sep 2014 - 2:09 am | श्रीरंग_जोशी

व्यंगचित्रकाराची नजर जाणवली :-) .

अविनाश पांढरकर's picture

26 Sep 2014 - 9:24 am | अविनाश पांढरकर

मस्त!!!!!

दिवाळीचा बोनस लगेचच डीक्लेर झाला !

या वाक्या इतके स्वप्नवत वाक्य जगाच्या पाठीवर कुठेच नसेल.

चिगो's picture

27 Sep 2014 - 4:54 am | चिगो

एकदम मस्त जमलीय..

अजया's picture

27 Sep 2014 - 10:41 am | अजया

मस्तच.आवडली कथा.

स्पंदना's picture

28 Sep 2014 - 5:44 pm | स्पंदना

पण... तेव्हढा टीचिंग स्टाफ आणा जरा

:))