"सेफ विंडो म्हण्जे काय ग मम्मा"
.........................................
़जेवणानंतरचा बिकानेरी सोहन हलवा रंग दाखवत होता. सी.एस.टी ला ठाणे लोकल ला खिडकी पकडुन हिशोब पुरा करायचा बेत केला. रविवार असल्यामुळे खिडकी सोडता गाडी रिकामी होती. एकुलती एक माझ्यासाठी वाट बघत होती. गाडी सुटायला ५ मिनिटे होती. डुलकी लागतच होती इतक्यात " मम्मा मला विंडो" चा हट्ट कानावर आला. डोळे उघडले. ६ वर्षाचे २.५ फुटाचे १०० वॅट डोळे "फुल्ल अॅटीट्युड" माझ्याकडे रोखुन बघत होते. मी मुकाट्याने समोरच्या बाकावर बसलो. मम्मा आणि मम्माच्या ठम्माने एका सुरात "थँक्यु". ़खिडकी सोडणे मला एका मॉरल डीलेमा मधे टाकणार होते.
लोकल आणि ठम्माच्या तोंडाची टकळी एकाच वेळी सुरु झाली. गमाडी ़ जम्मत चे न संपणारे ़कोठार. रीवर्स स्टेल्थ मोड शिवाय झोप शक्यच नव्हती.
"मम्मा तुला एक गमाडी सांगु"?
इतक्यात मम्माचा फोन वाजतो.
......
"करी रोड पोचतेय"
........................
"विच्चारु नकोस. तोफ्खाना सुरुच आहे"
...............................................
"गाडी कशाला उगाच, मी येइन लोकल ने ९ पर्यंत"
..................................................................
"ओके. ९ला पाठव."
पप्पा येणारच नाही. मला माहीत आहे.- ठम्मा
"पप्पा बोलला होता का"?
तीच तर गंंमत आहे.सांगु?
"सांग"
पण सेफ विंडो म्हण्जे काय?
???
आणि टू युनिट्स ऑफ १५ मिनिटस टू लुज इट म्हणजे काय?ं
मम्मा गोंधळली.
मी टेक ऑफ साठी सावरुन बसलो.
"कुठे ऐकतेस तु हे सगळे?ं
(ंमाझ्याकडे एक कौतुक मिश्रीत कटाक्ष)
पप्पा बोलत होता. तु गिफ्ट आणायला गेली होतीस ना तेंव्हा. मला सारखा झोपायला सांगत होता. मग मी पण गंमत केली. खोट्टी खोट्टी झोपले. फोन वर बोलत होता.
"अग असेल ऑफीस चे काही तरी"
पण म्हण्जे काय?
"मला नाही माहीत. तु पप्पालाच विचार"
मला नाही सांगणार, लहान आहेस म्हणणार. मी ऑफिस च्या नेहा आंटी ला विचारते. माझी फ्रेंड आहे.
"तीला काय माहीत"?
पप्पा तिच्या कडेच बोलत होता. लॅप टॉप आणायला सांगत होता. चार वाजता येणार आहे नेहा आंटी आपल्या घरी.
मम्मा ने माझ्याकडे पाहीले. निर्विकार रहाणे अशक्य होते. मी खिड्कीतुन बाहेर पहायला सुरु केले. दादर स्टेशन च्या घड्याळात ४ वाजले होते.
मम्मा चा चेहरा पांढराफटक पडला होता.
२ मिनिटांची अशक्य आणि असह्य शांतता.
मी खिडकी सोडली नसती तर कदाचित पुढले धर्म सं़कट आले नसते.
"काय ़करु काका. कॅच अँड कन्फ्रंट ऑर लेट इट गो"
ठम्मा पण बावरली होती.
१५ मिनिटात नाती बदलली होती.
मे बी इट इज नथींग. अँड इफ इट इज देन आर यू एम्पॉवर्ड टू डील विथ ऑल लाँग टर्म इफेक्टस? युवर कॉल.
मम्मा विचार करु लागली.
मी ठम्मा शी गप्पा मारायला लागलो.
गाडी कुर्ल्याला आली होती.
मम्माचा निर्णय झाला.
"दादा, ५ मिनिटात घाटकोपर ला ये. घरची चावी माझ्याकडे राहीली आहे. मी ती देउन एका तासात परत येते. ह्या बाबतीत २ तास ़कुणाशीही बोलायचे नाही. बोललास तर खुप मोठा प्रॉब्लेम होइल. घरी मी मैत्रीणी कडे गेली आहे सांग. दिपक चा आला तर फंक्शन मधे बीझी आहे म्हण. वेळ संभाळ"
...................
घाटकोपर ला उतरताना मम्माने मागे वळून पाहीले," डोन्ट वरी, लाइक यू सेड इट इज माय कॉल अँड ओनस ऑन मी. थँक्स फॉर द सपोर्ट"
"
प्रतिक्रिया
4 Aug 2014 - 7:15 pm | स्पा
..........!!
4 Aug 2014 - 7:18 pm | रेवती
हम्म...
4 Aug 2014 - 7:32 pm | कवितानागेश
कठीण आहे.
4 Aug 2014 - 7:48 pm | गणपा
हे आले की असच कवटीत भुंगा सोडुन जातात. *shok*
4 Aug 2014 - 9:03 pm | सुहास..
बरं तो भुंगा कवटीत मरावा तरी ना .....मायच गुणगुण !!
4 Aug 2014 - 7:54 pm | धन्या
मम्माची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाही करवत नाही. :(
4 Aug 2014 - 7:55 pm | आनंद
*bomb* घरी गेल्या वर बॉम्ब फुटला असेल.
मला नेहमी एक प्रश्न पडतो कि तुम्हालाच कसे असे लोक भेटतात हो नेहमी?
4 Aug 2014 - 8:03 pm | धन्या
आपल्याही आजूबाजूला असे लोक असतात. मात्र ते जाणवण्यासाठी आपलं जगाकडे उघडया डोळ्यांनी पाहावे लागते. आपण स्वतःमध्येच इतके दंग असतो की आपल्या सभोवताली काय चाललंय याची पुसटशीसुद्धा जाणिव आपल्याला नसते.
4 Aug 2014 - 8:49 pm | रेवती
नाही हो, असे काही नाही. आपल्यालाही दिसतील. मला दिसले होते, मैत्रिणीची जरा विचारपूस केल्यावर बराच गाळ हाताला लागला आणि दिसतं तसं नसतं हे लक्षात आलं. मग नेहमीचेच! आपण त्रास करून घेतो, मग हे आपल्याच्याने झेपणार नै, वरणभात खाणे सोसतेय तर तेच करावे असे म्हणून आता कानाला जाड पडदे, डोळ्यांवर चष्मा लावून आनंदी झालेय. शिवाय आपले नीट आहे तर निदान त्याचा आनंद मानावा हेही आहेच!
4 Aug 2014 - 8:27 pm | सूड
हम्म!! स्पीचलेस.
4 Aug 2014 - 9:09 pm | मयुरा गुप्ते
"थँक्स फॉर द सपोर्ट" हे भारी वाक्यामागचा खरा इतिहास आपल्या डोक्याचा पार विस्कोट करुन जातो हे नक्की.
खरं तर शेवटी ज्याचे त्याचे प्रॉब्लेम ज्याला त्यालाच सोडवावे लागतात, पण हि ससेहोलपट संबंधितांची तर होतेच...अनोळ्खीही ओढला जातो.
निगरगट्टपणा पाहिजे तेव्हा नेमका कुठेतरी तडमडायला जातो, कितीही ठरवलं 'नॉट माय सर्कस, नॉट माय मन्कीज' तरी...
असो.
-मयुरा.
4 Aug 2014 - 9:16 pm | आतिवास
प्रतिसाद द्यायला शब्द सुचू नयेत असं लिहिलं आहे!
अस्वस्थ करणारं लेखन!
माणसाच्या जगण्याचे हे असे गुंते ...
4 Aug 2014 - 9:19 pm | विनायक प्रभू
दिपक १०० टक्के चूक आहे हे कशावरुन?
अशी परिस्थीती निर्माण व्हायला मम्मा किती जबाबदादार्?
4 Aug 2014 - 9:31 pm | धन्या
प्रत्येक वेळी मम्मा जबाबदार असेलच असं नाही. आणि कारणे काहीही असोत, दिपकभौंनी पकडलेला रस्ता हे त्यावरचं उत्तर नाही.
4 Aug 2014 - 9:36 pm | प्यारे१
मम्मा नं पण उद्योग करावेत की मग!
ती ऑफिसमधली आंटी असेल की कुणाची ममा. घाला राडे सगळे मिळून च्यामारी.
5 Aug 2014 - 12:10 am | प्रसाद गोडबोले
दिपकराव रॉक्स मम्मा शॉक्स !!
5 Aug 2014 - 10:23 am | सविता००१
कठीण आहे
4 Sep 2014 - 1:24 pm | हेमंत बेंडाळे
टू युनिट्स ऑफ १५ मिनिटस टू लुज इट म्हणजे काय?
आम्हाला बा याचा काही अर्थ कळला नाही
5 Sep 2014 - 1:17 pm | प्रसाद गोडबोले
म्हणजे अर्ध्यातासात बायको घरी येणार आहे आणि सेफ विन्डो अर्थात "सुंदर एकांताचा वेळ " हातातुन जाणार आहे तेव्हा ताबडतोब ये *man_in_love*
काय बुवा तुम्हाला सगळेच विस्कटुन सांगावे लागते ... शहाणे व्हा *biggrin*
5 Sep 2014 - 2:09 pm | प्यारे१
'टू युनिट्स ऑफ १५ मिनिट्स' आणि सरधोपट 'अर्धा तास' गणिती साम्य असलं तरी भावनिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक दृष्ट्या ;) ह्यात 'प्र चं ड' फरक आहे.
5 Sep 2014 - 2:17 pm | प्रसाद गोडबोले
प्यारे राव , भावनिक शारीरीक अन आर्थिक कळाले पण सामाजिक फरक कळाला नाही
बाकी
इथे सगळंच उलगडुन नाही सांगता येत राव ..मिपा आहे हे *wink*
5 Sep 2014 - 3:03 pm | प्यारे१
अर्धा तास एकत्र बसणं सामाजिक दृष्ट्या अडचणीचं ठरायचं नाही.
पण टु युनिट्स ऑफ १५ मिनिट्स 'कार्यक्रम' सामाजिक दृष्ट्या भारतात तरी अवघडच नाही का?
5 Sep 2014 - 3:50 pm | हेमंत बेंडाळे
अहो ठमी ने सकाळी ऐकला असेल असा समजा आता २ वाजलेत आणि संभाषण ४ वाजता भेटायचा आहे आणि फोन वर रात्री ९ ला येईन असा सांगणं झाला आहे. एकूण काय कि मी सेफ विंडो आणि बाकीचा वाक्य वेगळा वाचल पण आता कळला आहे :-)
5 Sep 2014 - 2:22 pm | आदूबाळ
चहामारी - असा आहे त्याचा अर्थ? मी काहीतरी भलताच समजलो होतो
5 Sep 2014 - 3:53 pm | हेमंत बेंडाळे
:-)
5 Sep 2014 - 2:13 pm | असंका
हे विचारल्याबद्द्ल धन्यवाद. मलाही काही कळलं नव्हतं. खरं म्हणजे मला हे कळलं की सगळ्या गोष्टीचा अर्थ लागेल, हेही कळलं नव्ह्तं!
4 Sep 2014 - 4:25 pm | नगरीनिरंजन
_/\_
दुनिया रंगरंगिली बाबा दुनिया रंगरंगिली!
बाकी आम्हाला असं काही दिसतच नाही या अनेकांच्या भावनेशी सहमत आहे. बहुधा त्यासाठी वेगळी काकदृष्टी..आपलं.. काकादृष्टी लागत असेल.
5 Sep 2014 - 5:02 pm | पैसा
काय काय लोक असतात तरी! मला पण बरीच खटली भेटतात अशी आणि काही संबंध नसताना कानावर आणि डोक्यात आलेली.