''गेली साडेचार वर्षं तुम्ही आमच्या वाहिनीवर साप्ताहिक भविष्य सांगितलेत.
अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम होता- टीआरपी पण मस्तच !
पण म्हणतात ना , प्रत्येक गोष्टीला शेवट असतोच.
आता जरा चेंज पाहिजे असं ग्रोवरसाहेब. . आय मीन लोकं म्हणतायत.''
''पण एव्हढं वर्षं पूर्ण झालं असतं तर . . . ''
''कसं आहे काका, मला पण असंच वाटतं, पण माझ्या हातात नाही हो ते!
म्हणाल तर त्रिवेदीला सांगून आमच्याच समूहात हिंदी च्यानलवर प्रयत्न करूयात.''
''नको. . . हिंदीत नको. ''
''मग वास्तुशास्त्र, अंकशास्त्र असं काही कराल ?''
''छेछे , भलतंच काय?''
''ठीकाय तुमची इच्छा! परत कधी लागलं तर कळवतोच.''
मोठ्या कष्टाने गोपाळराव घरी निघाले.
आपल्याच कार्यक्रमाचं प्रारब्ध कसं नाही कळालं हा एकच विचार त्याना सतावत होता.
(शतशब्दकथा)
प्रतिक्रिया
3 Sep 2014 - 7:41 pm | आदूबाळ
=))
या logical fallacy चं नेहेमीच आश्चर्य वाटतं.
3 Sep 2014 - 9:17 pm | आतिवास
कथा आवडली.
3 Sep 2014 - 7:47 pm | टवाळ कार्टा
सगळ्या भविष्य/पत्रिका बघणार्यांच्या घरात पाठवा याची छापिल प्रत \m/
3 Sep 2014 - 7:49 pm | एस
एकशे एक शब्द आहेत एकूण. :-P बाकी कथा आवडली.
4 Sep 2014 - 6:39 pm | खेडूत
छेछे ! अहो हा एकच शब्द धरलाय!
:)
3 Sep 2014 - 7:55 pm | विजुभाऊ
गोपाळरावानी त्यांचे आडनाव थडानी/ सहानी /जुमानी / शुक्ला / पांडे असे केले असते तर त्यांचे प्रारब्ध चांगलेच सुधारले असते.
4 Sep 2014 - 5:47 am | अत्रुप्त आत्मा
+++१११ =))
3 Sep 2014 - 8:02 pm | जेपी
बर हाय.
3 Sep 2014 - 11:28 pm | खटपट्या
आवडली कथा !!
4 Sep 2014 - 9:27 am | योगी९००
आवडली कथा !!
4 Sep 2014 - 6:40 pm | खेडूत
सर्वांचे खूप आभार !!
8 Apr 2015 - 8:39 pm | सौन्दर्य
क्या बात है ! ग्रेट.