ससा आणि कासव

अरुण वडुलेकर's picture
अरुण वडुलेकर in जनातलं, मनातलं
22 Oct 2008 - 3:34 pm

ससा आळसाने आणि आपल्या वेगाच्या घमेंडीने झाडाखाली झोपला आणि मागाहून आलेल्या कासवाने शर्यत जिंकली. ससा जागा झाला तसा कासवाने शर्यत जिंकलेली पाहून वास्तवाचा स्वीकार करण्याऐवजी संतापला. कासव जलचर आहे आणि आम्हा वनचरांच्या वनात येऊन आमच्यावर कुरघोडी करण्याचा त्यांना कांही एक अधिकार नाही असा घोष करू लागला. या वनावर आम्हां वनचरांचाच केवळ हक्क आहे. जलचरांनी येथून हद्दपार झाले पाहिजे असा डंका पिटू लागला. त्याच्या गर्जनांनी सगळे जंगल दणाणून गेले. वाघ,सिंह, लांडगे, कोल्हे सशाच्या गर्जनांचा आपापल्या परीने विचार करू लागले. पण नुसतेच विचार करीत राहिले. जलचरांना हद्दपार करावे हे ठीक असेलही पण कसे करावे हे कुणाच्या ध्यानांत येत नव्हते. शर्यत हारल्याचे शल्य बोचत होतेच. कासव हे कांही केवळ जलचर नव्हते. तसे ते उभयचर होते. पण आता ते जलचर आहे आणि परप्रांतीय आहे हा मुद्दा अधिक सोय़ीचा आणि प्रक्षोभक होता. सशाच्या संतापाला प्रक्षोभ हाच एक उतारा आहे असे त्याला वाटत होते.
सशाने एल्गार पुकारला. वाघ, सिंह, लांडगे, कोल्ह्या, या सगळ्यांना सशाची भूमिका जरी फारशी समजली नाही तरी, एल्गाराचे फलित कांही होवो, निदान या धामधुमीत आपली शक्ती किती पणाला लागते ते तपासून घेऊ या सूज्ञ विचाराने ते सशाच्या भूमिकेचा फायदा कसा उचलता येईल याचा विचार करू लागले. गर्दी जमा होते आहे हे पाहून सशाला आणखी चेव आला. मग सशाने संतापाच्या भरात जंगलाची तोडफोड करायला सुरुवात केली. माकडे झाडावरून ही गंमत पहात होते. त्यांच्यासाठी ही सारी केवळ गंमतच होती. वनचर काय नि जलचर काय, माकडांना कशाचेच सोयरसुतक नव्हते. त्यांना हवा होता एक दंगा. त्यांच्या माकडचाळ्यांना वाट मिळण्यासाठी. दंगा सुरूच झाला. माकडांनी दगडांची फेकाफेक सुरू केली. कुठे तरी दगडावर दगड आपटून एक ठिणगीही उडाली. मग माकडांनी ती आग शिताफीने पसरवायला सुरुवात केली. या धामधुमीत हरणे, कोकरे मोर, लांडोर आणि कांही ससेही होरपळू लागले. लांडगे, कोल्हे लगेच सरसावाले. त्यांना या होरपळणार्‍यांचे मांस आयतेच, विनासायास खायला मिळणार होते. हती, गेंडे यांनी कासवाची बाजू घेतली कारण ते उभयचर असले तरी स्वत:ला जलचर घोषित करणे त्यांना फायद्याचे आहे असे त्यांना वाटले. मग सुरू झाला तो केवळ दंगा.

आणि होरपळले गेले ते बिचारे गरीब, शक्तीहीन प्राणी.

शर्यत जिंकलेले कासव मात्र डोगराची उतरण शांतपणे धिम्या गतीने उतरत होते. जसे सारेच दंगे यथावकाश शमतात, तसा हा दंगाही यथावकाश शमेल, तोपर्यंत षठपूजेची वेळ येइलच ती शांतपणे पार पडेलच, या ठाम विश्वासाने.
कारण त्याच्या पाठीशी हत्ती आहे हे त्याला माहिती होते.

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

22 Oct 2008 - 3:36 pm | ब्रिटिश टिंग्या

जबरा!
आशय आवडला! भापो!

- टिंग्या

छोटा डॉन's picture

22 Oct 2008 - 3:40 pm | छोटा डॉन

प्रासंगिक फार्स मस्त जमला आहे.
बाकी आतल्या मजकुराशी व आशयाशी व त्याच्या अर्थाशी १०० % सहमत आहे असेही नाही पण "लेख" आवडला.
धन्यवाद ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

अन्जलि's picture

22 Oct 2008 - 3:41 pm | अन्जलि

अति सुन्दर. मनापासुन पटले खरच असे चालले आहे. ह्यासाठि आपण काय करु शकतो ह्याचा विचार व्हावा.

अन्जलि's picture

22 Oct 2008 - 3:41 pm | अन्जलि

अति सुन्दर. मनापासुन पटले खरच असे चालले आहे. ह्यासाठि आपण काय करु शकतो ह्याचा विचार व्हावा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Oct 2008 - 3:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आशय आणि गोष्ट दोन्हीही!

१.५ शहाणा's picture

22 Oct 2008 - 3:49 pm | १.५ शहाणा

ससाचे राज कारण आहे पण त्या मुळए
जंगलातील कमळ कोमज्णार ,हात भाजणार ,घड्याळ बंड पड्णार्,शिकार्‍याला धन्नुष साली ठेवावो लागेल व हती जंगलातुन पळेल

१.५ शहाणा's picture

22 Oct 2008 - 3:49 pm | १.५ शहाणा

ससाचे राज कारण आहे पण त्या मुळए
जंगलातील कमळ कोमज्णार ,हात भाजणार ,घड्याळ बंड पड्णार्,शिकार्‍याला धन्नुष साली ठेवावो लागेल व हती जंगलातुन पळेल

अमोल केळकर's picture

22 Oct 2008 - 3:54 pm | अमोल केळकर

षठपूजेची वेळ येइलच
पुढील राडा - ६ नोव्हे.
स्थळ : शिवाजी पार्क, दादर
प्रमुख उपस्थिती : लालु प्रसाद यादव
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मराठी_माणूस's picture

22 Oct 2008 - 4:18 pm | मराठी_माणूस

कासव एकदम निरागस दाखवले आहे, वस्तुस्थिती तशी आहे का ?

महेश हतोळकर's picture

22 Oct 2008 - 4:25 pm | महेश हतोळकर

शर्यत जिंकलेले कासव मात्र डोगराची उतरण शांतपणे धिम्या गतीने उतरत होते. जसे सारेच दंगे यथावकाश शमतात, तसा हा दंगाही यथावकाश शमेल, तोपर्यंत षठपूजेची वेळ येइलच ती शांतपणे पार पडेलच, या ठाम विश्वासाने.
कारण त्याच्या पाठीशी हत्ती आहे हे त्याला माहिती होते.

या वाक्यावरून तरी दिसते, कासव निरागस नाही. त्याला जे काही चालले आहे त्याचा पक्का अंदाज आहे.

बाकी कथा उत्तमच जमली आहे.

अवलिया's picture

22 Oct 2008 - 4:29 pm | अवलिया

कासव निरागस नाही. त्याला जे काही चालले आहे त्याचा पक्का अंदाज आहे.

बरोबर आहे. कासव बनेल आहे.

अवलिया's picture

22 Oct 2008 - 4:29 pm | अवलिया

कासव निरागस नाही. त्याला जे काही चालले आहे त्याचा पक्का अंदाज आहे.

बरोबर आहे. कासव बनेल आहे.

लिखाळ's picture

22 Oct 2008 - 4:40 pm | लिखाळ

कासव उपाशी आहे. पोटावर आणि पाठीवर फटके खाउन बनेल आणि कोडगे झाले आहे. त्याला त्याच्या भागात खायला नाही म्हणून जिवावर उदार होऊन कष्टात राहून मुशाफिरी करत आहे. आणि हत्ती-गेंडे मस्तवाल आहेत. कासवाच्या प्रदेशात ते आरामात पोट भरत आहेत. त्यांची भूक मोठीच आहे. त्यामुळे ते इतर प्रदेशात मुशाफिरी करणार्‍या कासवाला पाठिंबा देत आहेत. कासवाने शर्यत जिंकली नाही. आणि असेल तरी उपास-बेकारी यावर त्याला उत्तर मिळाले नाही.
विचित्र त्रांगडं आहे.
--लिखाळ.

एकदम सुरेख ललित.. अत्यंत चपखल आणि मार्मिक.

अरुण वडुलेकर's picture

22 Oct 2008 - 7:33 pm | अरुण वडुलेकर

सर्व प्रतिसादाबद्दल मिपाकरांना धन्यवाद.

लिखाळ,
तुमची प्रतिक्रिया मूळ कथेला दिलेली मार्मिक फोडणी आहे.
त्यामुळे चव अधिक वाढेलच.

धन्यवाद.