एक्कावन्न( २)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
20 Aug 2012 - 12:46 pm

मागील दुवा : http://misalpav.com/node/22530
आता मात्र धर्माण्णाला गल्ल्यावरुन उठणे क्रमप्राप्त होते.
त्याने गिर्‍हाईकाला खांद्याला धरुन हलवायचा प्रयत्न केला.
जागे करावे म्हणून त्याने गिर्‍हाईकाच्या खांद्याला हात लावला. थोडासा हलवला.
धडकन आवाज आला. धर्माण्णाची बोबडी वळाली.
गिर्‍हाईकाचे डोके तुटून खांद्यावरुन खाली पडले होते

डिस्क्लेमर : या लिखाणातेल व्यक्ती प्रसंग कोण्या हयात अहयात इसमाच्या/इसमीच्या / आयडीच्या अनुभवाशी मिळत असल्यास तो योगायोग समजावा.

हवालदार दोड्डामणी तम्बाखु मळत बसला होता. बरेच दिवस झाले या पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही घडलेच नव्हते. ना मंत्र्यांची भेट ना मोर्चा ना भांडणे. पोलीस स्टेशन ला यायचे डबा खायचा आणि घरी जायचे हेच रुटीन झाले होते.गणेशोत्सव रमजान .मोहरम ताबूत जत्रा असल्या सगळ्या पासुन दूर होते हे पोलीस स्टेशन. नाही म्हणायला नवर बायकोची भांडणे , शेजार्‍यांची एकमेकांत भांडणे व्हायची पण ती बहुतेकदा आपापसातच मिटायची. मध्यस्ती तोडपाणी वरचा माल वगैरे काही मिळायचे नाही. दोन कोसावर एक हातभट्टीचा गुत्ता होता तिथून दिवसाआड पार्सल यायचे त्यात दोड्डामणी आणि कधीमधी येणार्‍या सबइन्स्पेक्टरचे भागायचे.
बहुतेकदा ही जळीत गावाची पोष्ट शिक्षा म्हणुनच मिळायची कधीकधी वैतागही यायचा पण दोड्डामणीने ही घराच्या जवळ असावी म्हणून इथली जागा खुशीने घेतली होती.
पोलीसस्टेशनचा फोन कधीतरी जागा व्हायचा. आज तो असाच जागा झाला. त्या आवाजाने दोड्डामणी दचकलाच. चिमटीने बार भरून हातातली उरलेली तंबाखु टाकत तो लगबगीने उठला.
हाओ..ओण हाय. आय पायजे.ओईस टेशन........
कोण कोण बोलतय.....
ओईस ओईस टेशन. हवाअदार डोडाअणी ओयतोय्.ओण आयजे........
ए नीट बोल ना असा का थोतरी सुजल्यागत बोलतो आहेस. ते तोंड रीकामे कर आणि बोल
हो हो हो हाहेब एख मिनीअ .एख मिनीअ......... तोंडातली तम्बाखु तिथुनच थुंकली
हालो हवालदार दोडामणी दिडकी निमगाव... कोण बोलत्य
तुझा बाप
माझा बा.? ........ तो तर कवाच खपला................... कोण ?कोण ?कोण बोलतय.
काबे लिंगप्पा आता आवाज सुद्धा विसरलासका? बैजु बोलतोय बैजु बैजप्पा
ऑ बैजप्पा.......... पटक्कन वळखलाच नाही आवाज . कुठनं बोलतोयेस.
कुठनं म्हंजे हितनच की. सोलापुराला आलोय. दुपारपत्तुर तिकडं येतोय दिडकी निमगावला.
ये रे ये.कित्ती दिवसानी आलास. सुट्टीवर आलायेस का कसं? आन किती दिवस अस्णार आहेस? घरी जायच्या अगुदर हिकडच यं. मस्त कारेक्रम करुयात
लहानपणचा दोस्त मिळाल्याचा दोड्डामणीला आनंद झाला होता. त्याने सायकलवर हणम्याला पिटाळला......जारं. त्या दोरायस्वामी कडून एक रम घिउन य्..........त्याला म्हणाव नम्बर वन आसल तर दे नायतर डेस्पी आण्..आन वैनीला म्हणावं अंडी तळून ठीव....... बैजप्पा यणार हाय.
व्हय....... म्हणत ते पोरगं सायकल तांगडत सुटलं.
बैजप्पा यणार निदान दोन दिवस का होईना रोजच्या ड्युटीतला कंटाळा संपणार म्हणून दोड्डामणी खुश झाला होता.
....................

धडकन आवाज आला. धर्माण्णाची बोबडी वळाली.
गिर्‍हाईकाचे डोके तुटून खांद्यावरुन खाली पडले होते.
बर बर्र्र्.......बर्र......... धक्क्याने धर्माण्णाला घेरी आली तो दोन टेबलाच्या मधल्या जागेत तो पडला.
धर्मण्णाला काय झाले म्हणून धाब्यावरची सगळी पोरं गोळाझाली. जमीनीवर पडलेले ते मुंडके आणि खुर्वीवरचे ते मुंडके नसलेले धड बघुन सगळेच हादरले होते. कोणीतरी धर्म्माण्णाला उठवले.पाणी पाजले. आता धर्माण्णा थोडा शांत झाला होता. त्याने सगळ्या पोराना जवळ बोलावले. सगळ्यानी मिळून त्या धडाचे आणि मुंडक्याचे निरीक्षण करायला सुरवात केली. रक्त वगैरे काही गळत नव्हते ......धड मुंडके सगळे तसे पूर्ण सुकलेले होते.......
ए हात लावू नको.उगाच पोलीसी बिलामत यायची
हे कोन हाय?
हितं कसं आलं?
कुनी आनलं ?
आता काय करायचं?
सगळ्यांच्या मनात हेच प्रश्न होते.बोलत कोणच नव्हतं
दहा पंध्रा मिनिटे तशीच गेली...... थंडीतही सगळ्यांच्या चेहेर्‍यावर दरदरून घाम फुटला होता.
धाबा अचानक उजेडात न्हाऊन निघाला. फर्राटेदार वळण घेवून एक जीप धाब्याच्या दारात थांबली.
(क्रमशः )

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

20 Aug 2012 - 1:01 pm | बॅटमॅन

(कस्यापि)मातरः ग्रामे!!!!!

काय हो.. कथेमधे सबरुटीन मारुन पुन्हा जरा कुठे मूळ थरारक पॉईंटाला येताय तोसवर क्रमश:...
काय हे?
मस्त चाललीय लाईन. लवकर येऊ द्या जरासा मोठा भाग..

बहिरुपी's picture

26 Aug 2014 - 8:25 pm | बहिरुपी

गवि तुमचा वाडा अर्धाच राहीलाय, तो पुर्ण करा की?

इरसाल's picture

20 Aug 2012 - 1:36 pm | इरसाल

दुसरा भाग पण क्या बात है.

आता तिसरा कधी ?

स्पा's picture

20 Aug 2012 - 1:50 pm | स्पा

वाचीन्गो

अत्रुप्त आत्मा's picture

20 Aug 2012 - 5:50 pm | अत्रुप्त आत्मा

चीन्गो +१

सानिकास्वप्निल's picture

20 Aug 2012 - 4:17 pm | सानिकास्वप्निल

वाचत आहे

तिमा's picture

20 Aug 2012 - 4:51 pm | तिमा

हे वो काय! गाडीचा तिसरा गिअर पन पडायच्या आत, परत न्युट्रल! हा अन्याव हाय.

मोहनराव's picture

20 Aug 2012 - 5:02 pm | मोहनराव

झकास!

प्रभाकर पेठकर's picture

20 Aug 2012 - 6:20 pm | प्रभाकर पेठकर

कथा रोमहर्षक वगैरे आहे. पण आता एक्कावन्न (३), एक्कावन्न (४), एक्कावन्न (५), एक्कावन्न (६) एकदमच येत्या २ दिवसांत टाका.
कथा फारच अळी प्रमाणे पुढे सरकते आहे.

विजुभाऊ's picture

21 Aug 2012 - 4:04 pm | विजुभाऊ

पेठकर काका /गवि.
सूचना सर आंखोपर......

विजुभाऊ's picture

24 Aug 2014 - 9:00 am | विजुभाऊ

पुढचे कधी लिहिताय विजुभाऊ?
पेठकर काकाना प्रॉमिस करुन देखील लैच दिवस झाले.

इनिगोय's picture

24 Aug 2014 - 6:25 pm | इनिगोय

ड्युएल पर्सनॅलिटी?
एकाच नावाचे दोन आयडी?
एका मनाने दुसर्या मनाला विचारलेला प्रश्न?
खुदके साथ बातां?

... काय म्हणायचं हे?

प्यारे१'s picture

24 Aug 2014 - 11:26 pm | प्यारे१

:)

गलगले आठवले.
बाकी विजुभाऊ धागा वर काढायचा असला तर व्यनि करत जा.
आपल्याला समाजोपयोगी कामं करण्याची आवड आहे. नंतर काय एखादी संगीत पार्टी घेऊ झालं. ;)

diggi12's picture

15 May 2024 - 11:45 pm | diggi12

पुढे?