एक्कावन्न

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
18 Aug 2012 - 9:01 pm

ए घंट्या..आवर लौकर. ते टेबल कुणी साफ करायचं तुझा बाप येणार आहे कारे?
अन ए चिरकुट साल्या त्या कोपर्‍यातल्या टेबलावर अंडाफ्राय कोण देणार? मगासपासून कश्टमर बोंबलुन राहिलाय ना. आवर आवर चल लवकर. कश्टमरला मेनुकार्ड दे.
काय साहेब का झालं.काय करीत झुरळ आलं?
सॉरी सॉरी साहेब मिश्टेक चुकून चायनीज करी तुमाला आले बहुतेक. ए वाग्या सुक्कळीच्या हिकडे बग. साहेबाना एक फस्क्लास काजू करी दे. आन ही प्लेट घेवुन जा.
अन ए तो तिकडे टेबलावर तीन नंबरला तो कश्टमर टेबलावर झोपलाय का बघ उठव उठव त्याला.
टेबल जेवाय साठी आहे झोपायसाठी नाय. आत्ता बेल्लारीची गाडी येइल बीदर ,उस्मानाबाद,गदग येतील. उठव उठव त्याला. जागा कमी पडेल
ए भैताड उठव बे ऐकतोयेस
रात्रीचे दोन वाजले होते धर्माण्णा च्या धाब्यावर दिवस सुरु होता, रात्रीच्या गाड्या आल्या की त्याच्या धाब्यावर दिवाळी सुरू व्हायची. मसाला चहा, गरम दूध , हाड न सावर सूप , चिंगळी मसाला , चिकण मसाला गावरन कोंबडी हंडी , आलू मसाला बैगन मसाला बैदा मसाला डाल फराय . लसणी डाल , तडका डाल रोटी जीरा राईस काजू करी मटन हंडी चपाती , अंडा करी . बुर्जी पाव हे त्याच्या कडचे होट फेवरीत पदार्थ. रात्री कधिही या तयारच असायचे.
धर्माण्णाच्या धाब्यावर संध्याकाळी सात वाजता दिवस सुरु व्हायचा तो रात्री साडे तीन पर्यन्त.
त्यानंतर धाब्यावर सामसून व्हायची. एकदा का या गाड्या गेल्या की मग तशी शाम्तता असायची. तशाही या रूटवर प्रायवेट गाड्या फार नसायच्या. पण ज्या काही होत्या त्या सगळ्याना धर्माण्णा चा धाबाफार्च सोयीस्कर होता. अर्धा एक तास विश्रांती झाली की गाड्या चालू पडायच्या.
लगबग थांबायची. त्यानंतर्हाटेलातील पोरांची जेवणं व्हायची अन धर्माण्णा सहीत सगळे तिथेच एखादे बाकडे टेबल शोधून आडवे व्हायचे.
आज या गाड्या गेल्या प्रवासी गेले . कोपर्‍यावरच्या टेबलावरचा प्रवासी मात्र टेबलावर झोपला होता.
कधी कधी असे व्हायचे. एखादा प्रवासी गाडी विसरून जायचा. सकाळी उठून चालू पडायचा.
पण असा प्रवासी गाडी निघुन गेली का विचारायचा. आज मात्र तसे झाले नव्हते. हा माणूस मात्र कधी आला होता कोण जाणे. पण बराच वेळ झाला तरी बाकड्यावरच बसून होता. टेबलावर डोके ठेवून झोपला होता.
धर्माणाला काहितरी वेगळे वाटले
ए रज्जाक बग रे त्याला ऊठव. विचार काय झालय?
ओ साहेब उटा उटा रज्ज्याक ने कश्टमर हाक मारली. त्या माणसाची काहीच हालचाल झाली नाही.
आण्णा तुमीच देको...... मैने इतनी हाका मारी फिरबी उटता नै. तुमीच देको.
आता मात्र धर्माण्णाला गल्ल्यावरुन उठणे क्रमप्राप्त होते.
त्याने गिर्‍हाईकाला खांद्याला धरुन हलवायचा प्रयत्न केला.
थोडासा म्हणून त्यागिर्‍हाईकाच्या खंड्याला हात लावला. थोडासा हलवला.
धडकन आवाज आला. धर्माण्णाची बोबडी वळाली.
गिर्‍हाईकाचे डोके तुटून खांद्यावरुन खाली पडले होते
( क्रमशः)

वावरविरंगुळा

प्रतिक्रिया

तिमा's picture

18 Aug 2012 - 9:10 pm | तिमा

सुरवात तर झकास झालीये. पण खालील वाक्य वाचून आमची पण बोबडी वळली.

त्या गिर्‍हाईकाच्या खंड्याला हात लावला. थोडासा हलवला.

राजा राव's picture

19 Aug 2012 - 4:17 pm | राजा राव

खुप छान झालि आहे कथा.

प्रभाकर पेठकर's picture

18 Aug 2012 - 9:16 pm | प्रभाकर पेठकर

आँ...हाटेलातच कोणी कापले की काय? धडावेगळे झालेले शिर घेऊन कोणी हाटेलात येऊ शकणार नाही. आणि हाटेलात कापले म्हणावे तर एवढ्या वर्दळीच्या हाटेलात कुणालाच कळले नाही?

सॉल्लीड सस्पेन्स आहे.

दादा कोंडके's picture

18 Aug 2012 - 9:19 pm | दादा कोंडके

पुढचा भाग येउद्या.

बॅटमॅन's picture

18 Aug 2012 - 9:42 pm | बॅटमॅन

खल्लास!!!!

अत्रुप्त आत्मा's picture

18 Aug 2012 - 9:56 pm | अत्रुप्त आत्मा

एक्का-वन् न ;)

शिल्पा ब's picture

18 Aug 2012 - 11:13 pm | शिल्पा ब

पुढचा भाग लवकर अन मोठा येउ द्या विजुभौ.

पैसा's picture

18 Aug 2012 - 11:33 pm | पैसा

लिहा पटापट पुढे!

नाना चेंगट's picture

19 Aug 2012 - 1:55 pm | नाना चेंगट

आईशप्पथ ! उत्खनन सोडून चक्क लेख?? चोक्कस

मन१'s picture

19 Aug 2012 - 2:29 pm | मन१

काय तरी गौडबंगाल दिसतय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Aug 2012 - 6:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभौ, लिहा लवकर पुढचा भाग.

-दिलीप बिरुटे

इरसाल's picture

20 Aug 2012 - 10:06 am | इरसाल

पुढचा भाग कधी ?

थ्रिलर

झकास,, वाचतोय.. जरा मोठे भाग लिवा विजुभाव

प्रचेतस's picture

20 Aug 2012 - 10:50 am | प्रचेतस

पुढचा भाग?

मृत्युन्जय's picture

20 Aug 2012 - 11:33 am | मृत्युन्जय

झक्कास सुरुवात.

कश्टमरच्या खंड्याला हात घालणारा धर्माण्णा आवडला ;)

सोत्रि's picture

20 Aug 2012 - 11:40 am | सोत्रि

कश्टमरच्या खंड्याला हात घालणारा धर्माण्णा आवडला

हा हा हा, हेच बोल्तो :D

- (फक्त खंड्या पक्षी माहिती असलेला) सोकाजी

मी-सौरभ's picture

20 Aug 2012 - 12:12 pm | मी-सौरभ

:)
पु.भा.प्र.

राजेश घासकडवी's picture

21 Aug 2012 - 9:55 am | राजेश घासकडवी

सुरूवात छान झाली आहे. क्रमशः अत्यंत उत्कंठावर्धक जागी पडलेलं आहे.