५ वर्षांपूर्वीची गोष्ट . नवीन नौकरी . Office चा एक इवेन्ट . पार्टी एका उच्चभ्रु हॉटेल मध्ये . मी आणि माझा मित्र -कम -सहकारी एकत्रच गेलो . पार्टी एकदम रंगात आली असतानाच हा एकदम दिसेनासाच झाला . मी त्याला फोन केला . तर त्याने तो उचललाच नाही . थोड्या वेळाने त्याचा मेसेज आला कि त्याला काही अर्जंट काम निघाल्यामुळे त्याला एकदम जावे लागले . उद्या ऑफिस मध्ये भेटूयात . असेल काही काम म्हणून मी हि फारस लक्ष दिल नाही . दुसर्यादिवशी हा गडी ऑफिस मध्ये एकदम खुशीत . मी त्याला विचारले , "काय रे मित्रा , कुठे गायबला होतास काल ?" तो म्हणाला ," कुणाला सांगणार नसशील तर सांगतो ." माझी उत्सुकता चाळवली . मित्र पुढे म्हणाला ," आपल्या HR मधली ती अबक मुलगी आहे ना तिच्यासोबत माझ्या flat वर गेलो होतो . माझा flatmate सध्या बाहेरगावी आहे आणि मी एकटाच आहे ." मला धक्का बसला .
मी ," आयला भारी रे ! कधीपासून चालू आहे ? लग्न वैगेरे कधी करताय मग ?"
तर तो ," वेडा झालायस का ? ते तितक्या पुरतच होत . काही serious नाही आहे ."
परभणी सारख्या ठिकाणाहून आलेल्या मला सगळ्यात पहिले सांस्कृतिक वैगेरे म्हणतात तसा धक्का बसला . आणि नंतर त्या धक्क्याची जागा हेव्याने घेतली . One Night Stand या गोष्टीशी आलेला हा माझा पहिला संबंध .
आताशी हा लिंगो बर्याच वेळा कानावर पडतो . आणि या प्रकारच्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे स्पष्टच आहे . मला स्वतहाला या नातेसंबंधांच्या कदाचित सगळ्यात छोट्या फॉर्म बद्दल कुतूहल आहे . म्हणजे योनिशुचीतेबद्दल कुठलेही वांझोटे प्रोटेस्ट माझ्या मनात नाहीत पण अशा एखाद्या नात्यात (?) आलेल्या लोकांबद्दल कुतूहल नक्कीच आहे . म्हणजे असे पाहा की शारीरिक आकर्षण हाच एखाद्या नात्याचा (मग तो किती पण short span चा असेल) पाया असू शकतो का ? का मुळात तमाम आपली महान भारतीय संस्कृती वादी म्हणतात तस या नात्यांना काही शेंडा बुडखा नसतो ? या अशा गोष्टींमुळे आपल्या महान संस्कृती ला धक्के बसतात का? आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे भारतीय समाजमनात sex किंवा इतर कुठल्याही अधिभौतिक गोष्टीचा मजा घेण्याबद्दल जो प्रचंड अपराधगंड आहे त्यामुळे one Night Stand सारख्या गोष्टींमुळे आपल्या तकलादू मुल्य व्यवस्थेला
धक्के बसतात का ?
माझ निरीक्षण अस आहे की अनेक ठिकाणासारखा इथे पण इंडिया आणि भारत असा divide झाला आहेच . एका बाजूला शहरांमध्ये हा phenomena वाढत असताना संस्कृती रक्षकाना अर्थातच हा भारतीय संस्कृती वरचा घाला वाटत आहे . समाजात यामुळे एक sexual anarchy येईल अशी भीती त्यांना वाटते. आपल्या मुली (नोट -मुलांची त्याना काळजी नाही ) बिघडतील असे पण त्याना वाटते .
बर हा stand कायम दोन अविवाहित लोकांमध्ये च होईल असे काही नाही . अशी काही अट नाही . म्हणजे एखादा विवाहित पुरुष किंवा स्त्री एखाद्या अविवाहित पुरुष किंवा स्त्री सोबत पण अनेकदा रात्र घालवू शकतात . सिनिकस असे पण म्हणू शकतात हा विवाह संस्थेच्या मुळावरच घाला आहे . Where is the sanctity of marriage ? या अवघड प्रश्नांची उत्तर फार गुंतागुंतीची आणि प्रत्येकापुरती वेगवेगळी आहेत . माझ्या अनुभवाच्या कक्षेत आलेल्या लोकांची जेवढी अशी प्रकरण मी पाहिली आहेत तेवढ्यावरून मी माझ्यापुरती काही उत्तर बनवली आहेत .
सर्वात महत्वाच म्हणजे या अशा नात्यात असलेल्या एकमेका कडून असणार्या शुन्य अपेक्षा . हि सर्वात सुंदर गोष्ट आहे . न कसले राग , न कसले लोभ , ना कसल्या आणि कुठल्या तरी insignificant तारखा लक्षात ठेवण्याचे ओझे . आपल्या दोघाना या क्षणी एकमेकांची गरज आहे . आपण ती पूर्ण करूया आणि लेट्स अपार्ट ऑन गुड नोट . साध आणि सरळ . काही लोकाना हे खूप कोरड वाटू शकत पण पहिलेच नमूद केल्याप्रमाणे to each his /her own .
आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . नात्याचं पावित्र्य , आपली संस्कृती , कुणाला कळल तर, आणि लोक काय म्हणतील हे प्रश्नांचे ब्रम्ह राक्षस मानगुटीवरून उतरवून . मला वाटत बहुतेक लोकांच उत्तर नाही असेच असेल .
भानू काळे यांच्या बदलता भारत या पुस्तकात अतिशय सुंदर para आहे तो quote करण्याचा मोह आवरत नाहीये . : आपला देश अंतर्विरोधानी एवढा भरलेला आहे की कुठल्याही एका चौकटीत या देशाचे संपूर्ण वास्तव सामावले जाणे अशक्य वाटते .
इथल्या विविधातेबद्दल असे गमतीने म्हणतात की या देशाबाबत केलेलं कुठलेही विधान खरे असू शकते आणि त्या विधानाचा व्यत्यास हि तेवढाच खरा असू शकतो .
आम्ही अणु उर्जा वापरतो , तसेच शेण गोळे हि वापरतो .
इथे धारावी आहे तसेच मलबार हिल पण आहे .
पाण्याचा एकही नळ नसलेल्या शाळा आहेत तसेच स्विमिंग पूल असलेल्याही आहेत .
हा देश गरीब आहे , हा देश संपन्नही आहे .
भानू काळे यांचे हे विधान अजून पुढे न्यायचे ठरवल्यास या देशात आणि समाजव्यवस्थेत one night stand ला पण जागा आहे आणि विवाह संस्थेला पण असे म्हण्यास हरकत नसावी . भारतीय व्यवस्थेने पहिले विरोध करून नंतर विधवा विवाह , संगणक आणि जागतिकीकरण पचावलेच की .
कदाचित काही वर्षांनी हे मोठ्या शहरांमध्ये असणारे लोण छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात पण जाईल . त्याचा वेग कमी जास्त असू शकतो .
लेखाच्या सुरुवातीला ज्या मित्राचा उल्लेख आहे त्याची परवा फेस बुक वर मैत्री विनंती आली . मी लगेच त्याची friend लिस्ट चाळून बघितली . त्यात "ती ' पण होती . दोघांची पण लग्न झाली होती . वेगवेगळ्या लोकांसोबत .
प्रतिक्रिया
16 Aug 2014 - 9:56 am | पैसा
बाकी गोष्टींबद्दल चर्चा जरूर व्हावी. पण भावनिक गुंतवणूक नसताना केवळ शारीरिक आकर्षण वाटून असे का घडत असावे हे मला खरेच कळत नाही. संस्कृती वगैरे फार लांब राहिलं, पण माझ्या घरातले बोके आणि भाट्या जसे वागतात तशी माणसे वागतात हे कसे काय शक्य होते याबद्दल मलाही कुतुहल आहे.
16 Aug 2014 - 10:44 am | संजय क्षीरसागर
हा लेखाचा सारांश आहे.
तर स्वतःला एक प्रश्न विचारुन पाहा, असे स्टँडींग अनुभव गाठीशी असलेली पत्नी (किंवा पती) पत्करायला किती जण राजी होतील? शक्यतो स्टँडींगवालेच राजी होतील. कारण संभाव्य धोके कुणालाही सहज दिसतील.
आणि समजा राजी झालेच, तर हा आऊटस्टँडींग सिलसिला विवाहोत्तर थांबण्याची शक्यताच नाही.
मग लग्न कशाला करायचं?
__________________________
तुमच्या मित्राचा सध्या काय स्टँड आहे विचारुन पाहा (आणि इथे लिहा) म्हणजे माझ्या म्हणण्याची प्रचिती येईल.
18 Aug 2014 - 4:18 pm | वेल्लाभट
बँग ऑन टार्गेट
18 Aug 2014 - 5:11 pm | आदूबाळ
पन इंटेंडेड? ;)
16 Aug 2014 - 10:55 am | सांजसंध्या
वीकेन्डला (चुकीच्या दिवशी) आल्याने धूम ३ चं रेकॉर्ड मोडण्याची संधी हुकली. वन नाईट स्टँड, संस्क्रुती, शहरी ग्रामीण भेद, विबासं... सगळा दारूगोळा आहे.
16 Aug 2014 - 11:05 am | कंजूस
ज्यांच्या शरिरात कल्लोळ आहे ,खिशातही कल्लोळ आहे त्यांना भावनिक आणि नैतिक कल्लोळाशी काही देणेघेणे नसते .
बाकी चालू द्या .
16 Aug 2014 - 11:14 am | संजय क्षीरसागर
पण स्मृतीची दुधारी तलवार एकदा का पारजायला लागली की कितीही पश्चात्ताप करा, काही उपाय चालत नाही.
16 Aug 2014 - 11:30 am | मृगनयनी
सहमत - टू पैसाताई आणि कंजूस ...
भावनिक ओढ किंवा प्रेम असल्याशिवाय एखाद्या व्यक्तीबरोबर शरीरसंबंध कसे काय ठेऊ शकतात?.. तसं कुणी करत असेल, तर पशू-पक्षी आणि माणूस यांत फरक काय? "प्रिन्सिपल्स & एथिक्स" नावाचा प्रकार खरोखर लुप्त होत चाललाये का?
पूर्वीच्या काळीही स्त्री आणि पुरुष- वेश्या होते. पण त्यांचे काम फक्त तेवढेच्च मर्यादित होते. बाकी समाजातली इतर कामे ते सहसा करत नसत. पोटापाण्यासाठी मालकाच्या/ मालकिणीच्या शरीराची भूक भागवणे इतकेच त्यांचे काम असायचे. आजकाल तर कॉलगर्ल, जिगोलो पण दिवसा नॉर्मल जॉब करतात. आणि रात्री त्यांचा 'मूळ' व्यवसाय करतात. त्यामुळे नक्की 'कोण' कसं आहे.. हे ओळखणं अवघड होऊन बसलंय. सभ्य सभ्य समजल्या जाणार्या मुलीदेखील प्रमोशनसाठी किंवा "इन्सेन्टीव्ह"साठी वन नाईट साठी तयार असतात... मग पुढे त्याची सवय / गोडी लागते.
आपल्याच शहरात नोकरी असेल.. तर किमान घरच्यांच्या धाकाने तरी रात्री घरी यावे लागते.. पण बाहेरगावी असणार्या मुलामुलींना मात्र या सगळ्याची चटक लागते. पैसा एकदा हातात खेळायला लागल्यावर नीतिमत्ता पायदळी कधी तुडवली गेली.. हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. एड्स वगैरे होत नाही..तो पर्यंत हा 'खेळ' खूप आनन्दाने खेळावासा वाटतो. पण गुप्तरोगांच्या किंवा 'ब्लॅकमेलिंग' च्या दुष्टचक्रात अडकल्यावर मात्र यातून कधीच सुटका नसते...
संस्कार इतके तकलादू झालेत का?.. असा प्रश्न पडतो...
16 Aug 2014 - 1:30 pm | विनोद१८
१००% सहमत....
हे असले प्रकार अगदी सरसकटपणे समाजात अनुकरणीय होउ नयेन म्हणुनच आपल्या पुर्वजांनी 'धर्म आणि संस्काराच्या नावाखाली' नितीमत्ता शिकवीली होती त्याची चाड आज आपण बाळगतो का ?? आज आपण ती शिकवण 'पुराणमतवाद व थोतांड' या नावाखाली पायदळी तुडविल्यावर वा फाटयावर मारल्यावर यापे़क्षा वेगळे वेगळे चित्र ते काय दिसणार ???
16 Aug 2014 - 2:08 pm | नाव आडनाव
घरी रात्री वेळेत जायला लागतं, पण दिवसाचं काय? माझ्या ओळखीच्या काही लोकांना मी दिवसा ऑफिस चं काम सोडून "मजा" करण्यासाठी जाताना बघितलेलं आहे. सकाळी २-२ तास पूजा करणाऱ्या लोकांनी दिवसा काय काय केलय हेही मला माहित आहे.
लोकांची अजून काही मतं : माझे काही मित्र त्यांचं लग्न ठरताना म्हणायचे अमुक एक ठिकाणच्या / शहरातल्या मुली बघायच्या नाहीत, कारण त्यांच्याबद्दल हे असं ऐकलंय. मी त्यांना विचारायचो तुम्ही जिथे मुली बघायला जाणार तिथे हे होत नाही याची काय ख्रात्री. काही लोकांच्या मते हे पैश्यावाल्यांच काम आहे आणि हाय क्लास सोसायटी मध्ये हे सर्रास चालत. काही लोक याचा संबंध जातीशी लावतात (अर्थात आपली स्वताची जात सोडून दुसर्याची ) आणि आपली जात तेव्हढी पुण्यवान. मला वाटत नाही हे लोक कोणत्याही एका कटेगरीत येतात.
16 Aug 2014 - 8:30 pm | पुण्याचे वटवाघूळ
"भावनिक ओढ किंवा प्रेम असल्याशिवाय एखाद्या व्यक्तीबरोबर शरीरसंबंध कसे काय ठेऊ शकतात?.. तसं कुणी करत असेल, तर पशू-पक्षी आणि माणूस यांत फरक काय?"
छ्या मृगनयनी ताई. तुम्हाला व्यक्तिस्वातंत्र्याची काहीच चाड दिसत नाही.आणि हो एकपत्नीव्रत वगैरे गोष्टी पुरूषप्रधान संस्कृतीची देन आहेत आणि ९७% प्राण्यांमध्ये एकपत्नीव्रत नसते हे तुम्हाला माहित दिसत नाही. (हा उपहास आहे हे वेगळे सांगायची गरज पडू नये)
पूर्ण प्रतिसादाला +१.
मुळातल्या लेखात 'थोर भारतीय संस्कृती' इत्यादी उल्लेख आहेत ते टाळता आले असते तर बरे झाले असते. भारतीय संस्कृतीतील वाईट गोष्टींवर इतर सगळ्यांप्रमाणे मी पण टिका करतो.पण याचा अर्थ भारतीय संस्कृती पूर्ण टाकाऊ आहे असे नक्कीच नाही. मृगनयनींनी म्हटल्याप्रमाणे भारतीय संस्कृतीतील अशा काही चांगल्या संस्कारांमुळे (जे आतापर्यंत तरी चांगले टिकून आहेत/होते) अनागोंदी टाळली गेली आहे हे नक्की.
16 Aug 2014 - 8:34 pm | प्यारे१
काही जीवश्च कंठश्च (म्हणजे काय ते ठाऊक असेलच) मित्रांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहोत. ;)
19 Aug 2014 - 4:32 pm | प्रमोद देर्देकर
होय प्यारे +१
मी ही त्याच ५ (पांडवांच्या) प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहे.
मीपाचे पद्मभुषण.
17 Aug 2014 - 4:24 pm | मृगनयनी
धन्यवाद.. पु.व. :)
सध्या सगळ्याच गोष्टी "मनी-ओरिएन्टेड" झाल्यामुळे नात्यांतले पावित्र्य कमी होत चालले आहे. कलीयुग आहे...दुसरे काय!?!?
16 Aug 2014 - 11:55 am | सोत्रि
मुळात 'One Night Stand आणि आपण सगळे' हे शिर्षक चुकीचे आहे. आपण सगळे कसे काय गोवले जातो त्यात? तर ते एक असो!
>> म्हणजे असे पाहा की शारीरिक आकर्षण हाच एखाद्या नात्याचा (मग तो किती पण short span चा असेल) पाया असू शकतो का?
का असू शकत नाही. आपल्या तथाकथित 'सो ग्रेट' संस्कृतीत नाही का मुलगी पहायला जात? ती काय म्हणून जात? मुलगी देखणी असावी ही अट 'शारीरिक आकर्षण' नाही का? त्यामुळे short span नात्यात शारीरिक आकर्षण हाच खरा बेस असतो.
>> सगळ्यात महत्वाच म्हणजे भारतीय समाजमनात sex किंवा इतर कुठल्याही अधिभौतिक गोष्टीचा मजा घेण्याबद्दल जो प्रचंड अपराधगंड आहे
ह्यावर प्रचंड सहमती. ह्यावर व्यापक जनजागृती व्हायला हवी. विदा देता येणार नाही पण तरीही धाडस करतो, बहुसंख्य भारतयांना 'संभोग' म्हणजे 'Give and Take' आहे हेच माहिती नसते. पुरुषाला तो त्याचा अधिकार वाटतो आणि स्त्रीला ते कर्तव्य! त्यामुळे त्यातली मजा घेण्याबद्दलच एकंदरीत जिथे सगळा आनंद आहे, तिथे One Night Stand ही संकल्पना समजून घेतली जाणे हे निव्वळ अशक्य.
>> समाजात यामुळे एक sexual anarchy येईल अशी भीती त्यांना वाटते
आता सध्या sexual anarchy नाहीयेय असे म्हणायचेय का? :O
भावनिक गुंतवणूक (?)
समजा एका लग्न झालेल्या जोडप्याची भावनिक गुंतवणूक अत्युच्च आहे. पण 'शारिरीक भुक' परस्पर विरोधी आहे. म्हणजे एकाला त्यात रस नाही आणि एकाला अतिशय रस आहे. आता त्यांनीं काय करायचे? आपल्या संस्कृतीत लग्न ठरताना हा मुद्दा लक्षात न घेतला जाण्या इतपत गौण असतो. आता लग्न झाल्यामुळे 'पदरी पडले पवित्र झाले' ह्या न्यायाने सगळ्या इच्छा मारून आयुष्य जगायचे का?
तर तेही असो, कारण हे सगळे मनोव्यापार आहेत आणि फारच गहन आहेत. जनरलाइझ करण्याइतके सोप्पे नक्कीच नाहीत. पण पॉजिटीव्ह चर्चेसाठी खुप चांगलां विषय (सो कॉल्ड - भारतिय किंवा हिंदू संस्कृती आड आणली नाही तर).
- (कमिटेड) सोकाजी
16 Aug 2014 - 12:01 pm | स्पंदना
हा दृष्टीकोण आवडला.
19 Aug 2014 - 4:34 pm | प्रणित
" भावनिक गुंतवणूक (?)
समजा एका लग्न झालेल्या जोडप्याची भावनिक गुंतवणूक अत्युच्च आहे. पण 'शारिरीक भुक' परस्पर विरोधी आहे. म्हणजे एकाला त्यात रस नाही आणि एकाला अतिशय रस आहे. आता त्यांनीं काय करायचे? आपल्या संस्कृतीत लग्न ठरताना हा मुद्दा लक्षात न घेतला जाण्या इतपत गौण असतो. आता लग्न झाल्यामुळे 'पदरी पडले पवित्र झाले' ह्या न्यायाने सगळ्या इच्छा मारून आयुष्य जगायचे का?"
हा मुद्दा पटला !
20 Aug 2014 - 1:50 pm | चिगो
प्रतिसाद आवडला, सोत्रि..
ह्या विषयावर सुशिंची एक कादंबरी आहे, सोत्रि.. मला वाटतं, "महापर्व" नावाची..
20 Aug 2014 - 2:07 pm | कवितानागेश
एक निरिक्षण आहे, नवरा बायकोची फक्त शारिरीक भूकच नाही, तर इतरही बर्याच गोष्टी परस्परविरोधी असतात. अगदी पंखा/एसी चालतो की नाही, राजकीय पक्ष कुठला जिंकावा, आजची टेनिसची मॅच कोण जिंकेल, पिठलं घट्ट करु पळीवाढ, पराठा मागवू की नूडल्स, वगरै वगरै. ही लिस्ट कितीही लांबवता येइल.
पण खरोखरच 'भावनिक गुंतवणूक' असेल, तर दोघेही एकमेकांप्रमाणे बदलतात!
21 Aug 2014 - 9:28 pm | पुण्याचे वटवाघूळ
अहो लीमाताई इथे एकमेकांना समजावून घेणे, भावनिक गुंतवणुक वगैरे गोष्टींची पर्वा कोणाला?मी मला वाटते तेच करणार--त्याचा इतरांवर काहीका परिणाम होईना.मी आणि माझे व्यक्तिस्वातंत्र्य.मग इतरांचे आयुष्य उध्वस्त झाले तरी मला काय त्याचे? आणि या अशा गोष्टींचे समर्थन केले नाही तर बहुदा आपण पुराणमतवादी म्हणून समजले जाऊ अशी भिती असते या लिबरल लोकांना.
22 Aug 2014 - 1:09 pm | धन्या
हे प्रातिनिधिक उदाहरण नसले तरी अशा व्यक्ती समाजात आहेत हे वास्तव आहे.
अशा व्यक्तींना भावना म्हणजे काय हेच माहिती नसते. भावनिक हुशारी आणि बुद्धीमत्ता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काही व्यक्तींमध्ये भावनिक हुशारीची वानवा असते. त्यांचे परिस्थितीचे जे काही आकलन असते ते त्यांची बुद्धीमत्ता आणि पाच ज्ञानेंद्रीये यावर अवलंबून असते. आपल्या बोलण्याचा, वागण्याचा इतरांवर काय परीणाम होतोय हे त्यांच्या गावीही नसते. त्यांच्या बुद्धीला जे पटते ती गोष्ट ते करतात.
ती व्यक्ती जाणून बुजून असं वागत नसते. ही त्या व्यक्तीच्या जाणिवांची मर्यादा असते. सर्वात वाईट हे की आपल्या जाणिवेला मर्यादा आहेत हे त्यांना माहिती नसते, कुणी समजावून सांगितलं तर ते मान्य करण्याची तयारी नसते. पुन्हा कारण तेच. ते बुद्धीने विचार करतात, भावनेने नाही.
22 Aug 2014 - 2:13 pm | कवितानागेश
स्वार्थी आणि हट्टी व्यक्तींचे कुणाशीही लग्न झालं तरी सगळी बोंबच असते. कारण ते स्वतःच समाधनी राहू शकत नाहीत. दुसर्यला काय देणार?
हेच लॉजिक थोड्सं लांबवले तर असही म्हणता येइल, की अशा असमाधानी व्यक्तीच 'वन नाईट स्टॅन्ड' ची संधी शोधणार आणि घेत रहाणार.
पण भावनिक गुंतवणुकीशिवाय जे लैन्गिक सुख मिळेल ते 'भरीव' असू शकणार नाही. किंवा असंही म्हणता येइल, की मनं जुळली असताना जे सुख मिळतं ते लैन्गिक सुख जितके जास्त 'intense' असतं, तितके intense कोरड्या संबंधातले असणार नाही.
पण काहीजणांचे फक्त चण्याची पुडी खाउन पोट भरत असेल तर भरु देत बापडे!
आपण काय करणार??
22 Aug 2014 - 2:30 pm | संजय क्षीरसागर
आता बोला सोत्रि!
22 Aug 2014 - 2:45 pm | पिंपातला उंदीर
@ लिमा उजेट बर्याचदा असे संबंध heat of the moment मध्ये घडून जातात . ते पूर्व नियोजित पण नसतात . आणि तुमच्या प्रतिक्रियेत थोड vague generalization जाणवलं . अनेक मुळात अशा प्रकारच्या संबंधात असणारे सर्वच लोक स्वार्थी , असमाधानी असतात का ? मला नाही वाटत तस . प्रत्येक case हि वेगळी case study असते माझ्या मते . कुठला एक असा pattern किंवा नियम लागू करणे कितपत योग्य राहील .
22 Aug 2014 - 3:42 pm | संजय क्षीरसागर
आणि `घडावंस वाटणं' हा मनं जुळली नसल्याचा पुरावा आहे.
तुमच्या लेखाचा सगळा अनुरोध मित्राच्या बहुगामी वृत्तीकडे आहे. आणि तुम्हाला त्याचं आकर्षण आहे, हे खुद्द तुम्हीच कबूल केलंय.
लेखाची एकूण विचारणा : `भावनिक गुंतवणूकरहित (बहुदा वरचेवर) उपलब्ध होणारे लैंगिक संबंध असावेत काय? अशी आहे. आणि त्याला उठावा येण्यासाठी भारतीय मनोवृत्ती, संस्कृती, अपराधगंड वगैरे जोडाजोडी केली आहे.
पण ती सर्वस्वी निरर्थक आहे. कारण मुळात वन नाईट स्टँडची इच्छाच वैवाहिक संबंधातली अतृप्ती दर्शवते.
22 Aug 2014 - 4:13 pm | प्यारे१
=))
22 Aug 2014 - 4:19 pm | कवितानागेश
खरं आहे. जेनरलायझेशन होतय. :)
पण जास्तीत जास्त शक्यता हीच आहे की असमाधानी असेल तरच कुठेतरी 'चान्स' दिसेल आणि तो घ्यावासा वाटेल. चान्स असूनही तो न कळणारे 'बावळट' लोक अस्तित्त्वात असतातच.
कधीकधी केवळ उत्सुकतेपोटीही अशी घटना घडू शकते.
पण त्यात खरोखच इतर कुणी योग्य किंवा अयोग्य ठरवणं कठीण आहे. शेवटी तो पुन्हा त्या त्या व्यक्तीच्या जोडीदाराबरोबर असलेल्या संबंधाचा प्रश्न आहे.
22 Aug 2014 - 4:16 pm | बाळ सप्रे
कोणाला कशात किती सुख मिळेल हे आपण सांगू शकत नाही. चिगोंनी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे डबल स्टँडर्ड्स न ठेवता एखाद्याला संभोगस्वातंत्र्य जास्त योग्य वाटत असेल तर त्यात काय गैर..
यामुद्द्यावर एखाद्याने शूरपणा मिरवणे जेवढे हास्यास्पद तसेच यावरून एखाद्याला असमाधानी / loser ठरवणेही तितकेसे पटत नाही..
"There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable." हे जास्त पटतं.
22 Aug 2014 - 5:51 pm | संजय क्षीरसागर
मानवी प्रणयाचं सुख तीन गोष्टींवर अवलंबून आहे : पारस्पारिक अनुबंध, अपराधशून्य चित्तदशा आणि समय शून्यता.
ज्या वन नाइट स्टँडची चर्चा चालू आहे त्यात या तीन्ही गोष्टी नाहीत. तस्मात, तो निव्वळ शारीरिक प्रकार आहे.
लेखकाचा मानसिक पेच असायं की वन नाइट स्टँडमधली व्यर्थता दिसतेयं आणि तरल प्रणयाची सार्थकाता कळूनही तो साधता येत नसावा. मग नेहमी प्रमाणे, ही जळजळ ज्यांना जमलंय त्यांच्यावर काढायचा प्रयत्न चाललायं!
एका प्रतिसादात मी म्हटलंय की :
जस्ट थिंक ओवर धीस.
21 Aug 2014 - 10:47 pm | लंबूटांग
पंखा/ एसी चालत नसेल तर दुसर्या खोलीत जाऊन झोपता येते, मॅच वगैरे क्षणिक मतभेत, खायची अगदीच इच्छा झाली तर बाहेर जाऊन खाता येते... थोडक्यात बाकीच्या गोष्टींत बाहेर जाऊन इच्छापूर्ती करता येते.
असो हा धागा लग्नापूर्वीच्या संबंधांबाबत आहे आणि तडजोड वगैरे भानगडी नसण्यामुळेच one night stand वेगळा आहे.
21 Aug 2014 - 11:52 pm | संजय क्षीरसागर
काहीही नीट न वाचता प्रतिसाद देण्याची सवय सोडून द्या. तुम्ही प्रतिसाद देखिल धड वाचलेले दिसत नाहीत. कधी तरी येऊन कुठेही पिंक टाकली की झालं!
विवाहपूर्व संबंधाचा उल्लेख फक्त मित्राच्या स्टोरी पुरता आहे.
लेखकाचा मूळ प्रश्न असा आहे:
22 Aug 2014 - 3:54 am | लंबूटांग
तेवढे वाक्य चूक.. वरील प्रतिसाद तरीही व्हॅलिड आहे. माऊने ज्या गोष्टींची उदाहरणे दिली त्या गोष्टींची इच्छापूर्ती सहज पूर्ण करता येते अथवा त्यांचा discomfort क्षणिक असतो. शारिरीक भूकेबाबत तसे होत नाही.
मी One night standचे कोणत्याही बाबतीत समर्थन करत नाहीये. पण सोत्रिंनी जो मुद्दा मांडलाय त्याचाशी मी सहमत आहे.
बाकी आपण सतत दुसर्यांना शहाणपण शिकवायची आणि प्रत्येक ठिकाणी आपल्यालाच सर्व येते असे दाखवायची सवय सोडून द्या. तुमच्याच इतर ठिकाणच्या (भ्रमराची रुणझुण वगैरे) लॉजिक प्रमाणे आपण अनुभवा आणि मग बोला. कसे ;).
यापुढील प्रतिसाद संक्षींना नाही.
आता प्रतिसाद टंकायला घेतलाच आहे तर बाकीच्या लोकांनी जे मुद्दे मांडले आहेत त्याबद्दलही.
- खरे साहेबांनी जो मुद्दा मांडला आहे. जर माझ्या मुलीने वन नाईट स्टँड ठेवला तर? मला आवडेल का तर खचितच नाही. पण सद्ध्या ज्या युगात (आणि ज्या देशात) राहतोय ते पाहता असे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हो पण असे काही घडो वा ना घडो पण protection वापरण्याबद्दल योग्य शिक्षण नक्कीच देईन. त्यातील धोके तिला/ त्याला नक्कीच सांगेन आणि परिणामही. त्याउप्पर तो/ ती सज्ञान झाल्यावर असे परस्पर संमतीने जर असे काही घडलेच तर तो सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल. त्याबद्दल मला काही अभिमान वाटणार नाही पण अगदी शरमेने तोंड लपवायची पाळी आणली असेही काही वाटणार नाही.
- तुम्ही लग्नाआधी one night stand अथवा तुमच्या boy friend(s) बरोबर शरीर संबंध ठेवले आणि उद्या दुसर्या कोणाशी लग्न केलेत तर तुम्ही cheating करून बाहेर ख्याली पणा कराल असे काहीही नाही. अथवा लग्नाआधी एकही शरीरसंबंध नाही आला म्हणून उद्या तुम्ही cheating करणारच नाही असेही नाही.
स्वतः पाहिलेले उदाहरण. फार पूर्वीचे नाही अगदी १५ एक वर्षांंपूर्वी एका अतिशय जवळच्या ओळखीच्या कुटुंबाचे. त्यातील पुरूष त्याच्या बायकोला स्वयंपाकघरात बसायला सांगायचा जर कोणी पर पुरूष आला तर. तिही बसायची. नंतर त्या बाईचे एका विवाहीत पुरूषाबरोबर बरोबर संबंध होते. हे सर्व लग्नाला जवळपास २० एक वर्षे झाल्यावर. त्या ओळखीच्या कुटुंबातील दोघांचेही लग्नाआधी इतर लोकांशी संबंध असण्याची शक्यता नगण्य. (छोट्या गावात असल्या गोष्टी लपून राहात नाहीत). तो दुसरा विवाहीत पुरूष लफडेबाज म्हणून प्रसिद्ध.
- जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही अशी पत्नी स्वीकाराल का? हो. लग्नानंतर जर का ती एकनिष्ठ राहणार असेल तर तिने पूर्वायुष्यात काय केले आहे त्यानी मला काही फरक पडत नाही. माझा भाऊ/ मुलगा/ नातेवाईक स्वीकारतील का तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी स्वीकारले तर माझे त्यांच्याविषयीचे मत बदलेल का तर नाही. तो त्यांचा प्रश्न आहे.
- हे सगळे असले तरी मला लग्नानंतर/ relationship मधे असताना बाहेर लफडी करणार्यांचा प्रचंड तिटकारा आहे. Open relationship/ marriage मधे असाल तर ती अजून वेगळीच गोष्ट आहे पण मग त्याला relationship/ marriage तरी कशाला म्ह्णायचे.
थोडक्यात काय जगात विविध प्रकारचे लोक असतात, प्रत्येकाची आपली मते आणि values असतात आणि जोपर्यंत आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला येत नाहीये तोपर्यंत त्यांना ती जपू द्यायची असतात.
Where to draw the line हे प्रत्येकाने ठरवायचे असते (to each his/ her own). आणि स्थळ आणि काळाप्रमाणे ते बदलतेही. आपली रेषा (जोडीदार असल्यास त्या/ति च्याबरोबर ठरवून) आपण ठरवायची आणि कसोशीने पाळायची.
22 Aug 2014 - 7:49 am | संजय क्षीरसागर
स्वतःचे विचार मांडायला स्वतःकडे स्वतंत्र विचारसरणी लागते.
सारवासारवीसाठी उगीच सविस्तर प्रतिसाद देऊन जे कन्क्लूजन काढलंय:
ते कुणीही सोम्यागोम्या काढेल. किंबहुना बर्याच सदस्यांनी अप्रत्यक्षपणे हेच म्हटलंय. आधी, झालेली चर्चा आणि मांडलेले मुद्दे वाचायची किमान तसदी घ्यायला लागते.
22 Aug 2014 - 8:08 am | लंबूटांग
जगात सर्वात पहिले सर्व विचार तुम्हालाच सुचलेत. सर्व तुमचीच कॉपी करतात.
सारवासारवीसाठी प्रतिसाद दिल्याचे conclusion तुम्ही काढले. मी मला वेळ मिळतो तेव्हाच प्रतिसाद टंकतो. मगाशी टंकायला सुरूवात केलीच होती म्हणून म्हटले तिथेच बाकीचे पण लिहावे.
बाकी पिंका टाकण्याबाबत म्हणाल तर वर लिहीले आहे तसेच. मला जेव्हा वेळ मिळतो आणि ज्या विषयांमधे काही लिहीण्याइतपत माहिती असते अथवा जाणून घ्यायची इच्छा असते तिथेच लिहीतो. अधून मधून विडंबने. उगाच आपल्याला सर्व गोष्टीतले सगळे कळते असल्या तुमच्यासारख्या काही भाबड्या समजुती नाहीयेत. आणि प्रत्येक गोष्टींत सत्य हीच स्थिती आणि आपण, मन, मेंदू वगैरे शाब्दिक खेळ करायचे आणि selective reading करून मीच कसा बरोबर आहे हे दाखवायची गरजही नाहीये.
असो. I don't owe you any explanation anyway. तुमच्याशी निरर्थक खेळ करायला मला वेळ नाही. पहिला प्रतिसादही माऊला दिला होता.
हा माझा संक्षींना शेवटचा प्रतिसाद.
22 Aug 2014 - 10:01 am | संजय क्षीरसागर
आधी लेख न वाचता प्रतिसाद दिला. ते लक्षात आल्यावर माफी मागितली. मग लेखावरचे प्रतिसाद न वाचता पुन्हा इतरांनी मांडलेला मुद्दाच उगाळला. ते दाखवून दिल्यावर `तुम्हाला प्रतिसाद दिला नाही' असा पलायनवादी केलायं. आता सगळंच चूक म्हटल्यावर माझ्यावर उसळून काही उपयोग नाही.
22 Aug 2014 - 2:25 pm | कवितानागेश
Where to draw the line हे प्रत्येकाने ठरवायचे असते (to each his/ her own). आणि स्थळ आणि काळाप्रमाणे ते बदलतेही. आपली रेषा (जोडीदार असल्यास त्या/ति च्याबरोबर ठरवून) आपण ठरवायची आणि कसोशीने पाळायची. >
पटतंय.
शेवटी तो त्यात्या नवरा-बायकोचा प्रश्न आहे.
मल हेच म्हणायचं होतं की एकदा भावनिक गुंतवणूक झाली, आणि 'एकत्र रहायचय आणि एकत्र म्हातारं व्हायचय' असं ठरवलं गेलें, की एकमेकांच्या सगळ्या गोष्टी आपोआपच सांभाळल्या जातात.
मग त्यात कदाचित काही ठिकाणी एखाद्यावेळेस घडलेला वन नाईट स्तॅन्डही सांभाळून घेतला जाउ शकत असेल. कुणास ठाउक?!
22 Aug 2014 - 2:46 pm | संजय क्षीरसागर
अर्थात. पण त्याची गरजच भासणार नाही. कारण ज्यांची मनं जुळलीयेत त्यांना एकमेकांच्या सहवासाचं सुखंच इतकं तृप्त करणारं असतं की प्रणय काँसिक्वेंशियल ठरतो. जर तिची इच्छा नसेल तर प्रणयात अर्थ उरत नाही.
खरं तर प्रणय हा एकमेकांप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या अभिव्यक्तीचा एक बहाणा असतो. इट इज जस्ट वन मोर डायमेंशन टू मिक्स इन इच अदर.
सोत्रिनी म्हटलंय तसं भावनिक गुंतवणूक उच्च पण शारीरिक गरजा वेगळ्या अशी तफावत असूच शकत नाही. एकमेकांना एकमेकांशिवाय आनंद साजरा करणं, शेअर करणं शक्यच होत नाही.
वन नाईट स्टँड ही निव्वळ फिजिकल कल्पना आहे. अशा हिट अँड रन प्रोसेसमधे दोघांना कुठलंही स्थायीसुख लाभत नाही . आणि पारस्पारिक अनुबंधातल्या प्रणयाची तर त्याला यत्किंचितही सर नाही.
तस्मात, मनं जुळलीयेत पण शरीरासाठी वेगळा पर्याय शोधतोयं म्हणणं हा दांभिकपणा आहे. ते खोटं आहे.
16 Aug 2014 - 12:54 pm | कंजूस
राजे महाराजे किती नाईटस्टैंड ठेवायचे ?६२वयाचा राजा १४वर्षाँच्या मुलीशी लग्न करतो .ती पट्टराणी होते म्हणून इतिहासात नोंद झाली बाकीच्या नाईटस्टैंडची गणती आणि नैतिक आधाराची चर्चा होत नाही कारण खजिना भरलेला आहे आणि अशा चर्चा करणाऱ्यांच्या तोंडाला हरभऱ्यांचे तोबरे बांधलेले असतात .परवडेल तो बारा काड्यांची छत्री घेतो नाहीतर राहा उभे आडोशाला मजा पाहत आणि चर्चा करत .
सॉरी अमोल .
16 Aug 2014 - 1:33 pm | सुबोध खरे
एका रात्रीचा सोबती यात भावनिक गुंतवणूक बर्याच वेळेस होते. माझ्या वंध्यत्व विभागातील कामात मी हे पहिले आहे कि कित्येक मुली अगोदर गर्भधारणा झाली होती का हे विचारल्यावर बाहेर/ नवऱ्या समोर "नाही" सांगतात आणी तपासणीसाठी आत गेल्यावर अपराधीपणे सांगतात कि लग्नाआधी एक गर्भपात केला होता. हे अपराधीपण सहजासहजी जात नाही. अर्थात यात स्त्री आणी पुरुष यांची विचार करण्याची पद्धत/ विचार सरणी वेगळी आहे. भरपूर मैत्रिणी असणारा मुलगा हा स्मार्ट समजला जातो तेच भरपूर मित्र असलेली मुलगी वाह्यात समजली जाते. त्याच विचारसरणीने एका रात्रीची सोबत पुरुषाला पौरुषत्व बहाल करते पण स्त्रीला वेश्या समजले जाते. समाजाचे दाम्भिकपण यातून दिसून येते. या विचार सरणी मुळे अपराधीपण स्त्रीला जास्त वेळ खात राहते.
अर्थात यात निसर्ग आड येतो हे सत्य आहे. सहज भेटले आणी सोबत केली तर पुरुष मोकळाच राहतो आणी स्त्री पुढची पाळी येईपर्यंत तणावाखाली राहते. यामुळे ती मिनिटांची मजा आणी तीन आठवड्याची सजा यातून बहुतांश स्त्रियांना जावे लागते. ( बरयाच वेळेस संधी अचानक येते. ठरवून करणारे फारच कमी. )
बरोबर कि चूक असे काहीच नसते. शेवटी ते स्वतःच्या विचारांच्या बैठकीवर अवलंबून आहे. एकाच परिस्थितीतील दोन पैसे खाणारी माणसे-- एक पैसे खाऊन भरपूर मजा मारताना दिसतो तर दुसर्याचे मन त्याला खात राहते.समर्थन ब्रम्ह्चर्याचेही करता येते आणि बहुपत्नीत्वाचेही.
प्रश्न आपली मुलगी एका रात्रीचे सोबती ठेवेल तर तुम्हाला मान्य होईल काय? जे आपल्याला योग्य आहे ते मुलांना सुद्धा योग्य असायला हवे. असतेच असे नाही. शेवटी आपण सर्वच थोडेफार दांभिक असतो.
16 Aug 2014 - 1:48 pm | सोत्रि
>> प्रश्न आपली मुलगी एका रात्रीचे सोबती ठेवेल तर तुम्हाला मान्य होईल काय?
ग्रेट, 99.99% उत्तर 'नाही' हेच असेल. आता ते तसे का याची कारणे काय काय असावीत?
वैयक्तिक की सामाजिक?
-(चर्चोत्सुक) सोकाजी
23 Aug 2014 - 10:31 pm | जातवेद
ह्म्म... दोन टोकाचे प्रश्न
16 Aug 2014 - 1:35 pm | कवितानागेश
पहिला किस्सा नक्की खरा आहे का? बरीच मुले/ मुली स्वतःच्या "शौर्याच्या" अशा कथा रचून सांगतत्.
असो.
शिवाय कुणाच्याही 'लैन्गिक आयुष्याबद्दल' बोलायचा अधिकार तिसर्या कुठल्या व्यक्तीला आहे असं मला वाटत नाही. (इथे बलात्कार हा भाग वगळावा, कारण तिथे लैन्गिकतेपेक्षा 'हिंसा' हा भाव प्रभावी असतो)
शिवाय लैन्गिक प्रगल्भता ही केवळ भावनिक प्रगल्भतेतूनच येणार आहे.
उपभोगतावादी व्रुत्ती जास्त असताना कुठल्याही नात्यात, कुठल्याही अनुभवात ' वापरुन घेणे' हाच भाव उरणार, मग ते नातं समाजासमोर जोडलेलं असो वा नसो. असे लोक कुठल्याही क्षणी 'उपभोग घेणे' इतक्या एकाच धुंदीत असतात.
16 Aug 2014 - 1:50 pm | सोत्रि
>>पहिला किस्सा नक्की खरा आहे का?
त्याने काय फरक पडतो?
>> उपभोगतावादी व्रुत्ती जास्त असताना कुठल्याही नात्यात, कुठल्याही अनुभवात ' वापरुन घेणे' हाच भाव उरणार
खुपच जनरलाइज नाही होत आहे हे?
-(उपभोगतावादी) सोकाजी
16 Aug 2014 - 2:03 pm | कवितानागेश
मी एकंदरीत वृत्तीबद्दल बोलतेय. भावनिक गुंतवणूक नसताना शारिरिक संबंध ठेवणं म्हणजे दोन्ही )किंवा एकच?!) व्यक्ती दुसर्या व्यक्तीकडे 'वस्तू' म्हणून बघत आहे. इथे फक्त लैन्गिकता येत नाही. आपला काहितरी 'फायदा' करुन घेण्यासाथी एखाद्या व्यक्तीशी गोड बोलणं, हादेखिल कमी इन्टेन्सिटीचा 'उपभोगतावादी दृष्टीकोन'च असतो. पण तो चालून जातो. लन्गिकतेच्या बाबतीत तो प्रखरपणे दिसतो. त्यामुळे, अर्थातच एका व्यक्तीकडे वस्तू म्हणून बघणारी व्यक्ती प्रत्येक व्यक्तीकडेच वस्तू म्हणून बघेल, असं मला वाटतं..... भावना बोथट असेपर्यंत. आयुष्यभर एखादी व्यक्ती तसच वागेल असं नाही.
म्हणून मी म्हणाले की भावनिक प्रगल्भतेतून लैन्गिक प्रगल्भता येइल.
माझ्या मते, 'सेक्स' ही आत्यंतिक प्रेमाची अभिव्यक्ती आहे... केवळ शारिरीक भूक नाही.
18 Aug 2014 - 8:59 pm | शैलेन्द्र
जरं दोघही एकमेकांकडे "वस्तु" म्हणुन बघत असतील तर?
सेक्स ही स्वता:ची जनुक जगात जास्तीत जास्त पसरवण्यासाठी आवश्यक असणारी एक मुळ प्रेरणा आहे.
16 Aug 2014 - 10:08 pm | अर्धवटराव
लेखनाचा मूळ उद्देश संस्कृतीला / संस्कृतीची काळजी वाटणार्यांना उगाच टपली मारणे एव्हढाच क्षुल्लक वाटतोय. संस्कृती , नितीमत्ता वगैरे गोष्टी माणसाने स्वतःच्या, समाजाच्या सुसुत्रीकरणासाठी निर्माण केल्या आहेत. जुनी सांस्कृतीक, नैतिक मुल्ये नष्ट होऊन नवी मुल्ये येतात. त्यात जे काहि बरं वाईट व्हायचं ते माणसाचं होतं संस्कृतीचं नाहि.
राहिला मुद्दा वन नाईट स्टॅण्डचा... तर ते नजीक भविष्यात समाजाने अधिकृतरित्या स्विकारले असेल. मध्यंतरी थोडीफार खळखळ होईल. पण वन नाईट स्टॅण्ड स्विकारुन आपण खुप काहि बहादुरी केली हा गैरसमज देखील त्यानंतर दूर होईल व समाज नव्या प्रश्नांवर ओरडायला , रडायला मोकळा होईल.
16 Aug 2014 - 11:11 pm | कानडाऊ योगेशु
सहमत.
संस्कृति नक्की पुढे सरकती आहे कि यु टर्न वळण घेती आहे.?
लैंगिकता संभोग वगैरे बाबतीत जर समाज इतका प्रगल्भ नसता तर खजुराहो घडलेच नसते.
>>राहिला मुद्दा वन नाईट स्टॅण्डचा... तर ते नजीक भविष्यात समाजाने अधिकृतरित्या स्विकारले असेल.
जे लिव इन रिलेशन बद्दल झाले आहे तेच इथेही होईल.
17 Aug 2014 - 2:13 pm | सुहास..
आणि स्विकारायचे राहिले आहे असे वाटते का योग्या तुला :)
( जर का नाईट लाईफ बाहेर निघाली ना सिटी मधली , तर संस्कार या शब्दाच्या ठिकर्या उडतील )
17 Aug 2014 - 4:26 pm | प्यारे१
>>> नाईट लाईफ
नाईट लाईफ रात्रीपुरती मर्यादित असते काय रे वाश्या? ;)
18 Aug 2014 - 8:17 pm | सुहास..
ईन जनरल !!
17 Aug 2014 - 1:37 am | निनाद मुक्काम प...
आपण जेव्हा समाज , संस्कृती , परंपरा अश्या गोष्टी करतो तेव्हा आपल्या त्यावेळच्या पुरुषप्रधान संस्कृतीला चिटकून राहण्याचा यत्न आजकालच्या महिलाच जास्त करतात. लैंगिकतेपासून ते कायदेशीर , व सामाजिक हक्क हे आपल्या समाजात पूर्वी पुरुषांना अनुकूल होते , हिंदू कोड बिल येण्या अगोदर दोन बायका करण्याचा हक्क हिंदू पुरुषाला होता मात्र आता समतेच्या काळात लैंगिकतेची हक्क महिलासुद्धा मिळतो आणि त्याला समाज अधोगतीला जाणे समजले जाते. हे अजब आहे ,
फार पूर्वी बालविवाह होत किंवा १४ ते १६ वर्षी लग्न होत असे , म१९७० नंतर लग्नाचे प्रमाण २० ते २५ व आता ३० पर्यंत गेले आहे.
आपल्या समाजात होणारी लैंगिकतेची घुसमट दूर कशी करावी ह्यावर उपाय नाही , लग्नाच्या बाजारात मुल व मुलींच्या वाढत्या अपेक्षा त्यामुळे सतत नाकारले गेलेले मुल व मुली ह्यांच्या पुढे कमावते असले तरी शरीर सुखासाठी आपल्या समाजाने सांगितलेल्या लग्न ह्या एकमेव उपाय असल्याने त्यांना दीर्घकाळ ताटकळत राहावे लागते.
सतत १२ तासापर्यंत कार्यालयात राहिल्याने आपल्या जोडीदारा पेक्ष्या जास्त काळ आपल्या सहकार्याच्या सोबत घालवल्यानंतर तेथे भावनिक व शारीरिक नाती निर्माण होणे हे युरोपात जे व्हायचे ते आता भारतात सुद्धा सुरु झाले आहे ,
समाजाची दिशा ठरवणे आपल्या हातात नाही ,
परदेशात एखाद्या तरुणीला लग्नाच्या बेडीत इतक्यात अडकायचे नसले म्हुणुन स्वतःची लैंगिकता ते वेठीस धरत नाहीत ह्यात मला अयोग्य असे काहीच वाटत नाही. आपल्याकडे मर्जी विरुद्ध संभोग म्हणजे बलात्कार अनेकदा होतात कितीतरी वेळा ते नवर्याकडून होतात , त्यात अनेकदा स्त्री समाजात ह्याविरुद्ध दाद मागू शकत नाही , हे अधिक वाईट आहे.
18 Aug 2014 - 9:01 pm | शैलेन्द्र
+१११
17 Aug 2014 - 10:33 am | माझीही शॅम्पेन
माझ्या माहितीत वन नाइट स्टॅंड हा भारतीय लोकांना झेपणरा प्रकार नाही , ह्याच स्पष्ट कारण कुठलीही गोष्ट सहजा-सहजी सोडून देण हे भारतीय लोकांना कधीच जमत नाही , एकदा मिळलेली संधी परत सहजा-सहजी मिळत नाही त्यामुळे काही-ना काही गुन्तव्णुक(?) राहतेच..
माझ हे भारतीय लोकांच्याबद्दलचे लॉजिक माझ्या अमेरिकन आणि . मैत्रिणिने अगदी "वेरिफाइड" केले आहे !!!
बाकी भारतात ज्या प्रकारे बलात्कार / ब्लॅक मेलिंग / जबरदस्ती वेश्या- व्यवसायात ढकलले जाणे सहज आहे या परिणमान्बद्दल विचार करून मुलींनी लांब राहणे अधिक शहाणपणाचे आहे
18 Aug 2014 - 4:05 pm | शिद
+१
18 Aug 2014 - 1:17 pm | सुबोध खरे
संस्कृती वर घाला सांस्कृतीक, नैतिक मुल्ये नष्ट होणे हे फार मोठे शब्द आहेत. झार खंडात एक आदिवासी जमात आहे तेथे तरुणतरुणी सहा महिने एकत्र राहतात. जर ती तरुणी गरोदर राहिली तर त्यांचे लग्न करतात नाही तर नवीन जोडी. यात कोणताही दांभिकपणा नाही आणि सामाजिक संमती आहे.
संधी मिळताच त्याचा फायदा घेणे-- हे म्हणजे कोणी पाहत नसताना सार्वजनिक मालमत्तेची चोरी करणे. आपली चोरी पकडली जाणार नाही हि खात्री असली तरी किती लोकं प्रत्यक्ष चोरी करतील. तेंव्हा केवळ संधी आली म्हणून त्याचा फायदा घेणे असे होईल असेही नाही. .
चार चोर्या वाढल्या म्हणजे समाजातील नितीमत्ता लयास गेली असे नाही. पण म्हणून चोरीचे समर्थन होते असे नाही.
राहिली गोष्ट विधिनिषेधाची त्यात आपण देवळात जाऊन सिगरेट ओढली किंवा मशिदीत जाऊन दारू प्यायली तरी काय फरक पडणार आहे.
आपण काय करीत आहोत आणी त्याचा परिणाम काय होऊ शकेल हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे अन्यथा मनुष्य आणि पशु यात काय फरक आहे. प्राणी पण आपल्या आंतरिक प्रेरणांप्रमाणे(instinct) वागत असतात.
18 Aug 2014 - 2:06 pm | नाव आडनाव
लई वेळा सहमत.
18 Aug 2014 - 2:22 pm | प्रभाकर पेठकर
>>>>आपण देवळात जाऊन सिगरेट ओढली किंवा मशिदीत जाऊन दारू प्यायली तरी काय फरक पडणार आहे.
मीर्जा गालीबचा शेर आठवला....
जाहिद शराब पीने दे मस्जिद में बैठकर,
या वो जगह दिखा दे जहाँ खुदा न हो।
18 Aug 2014 - 4:02 pm | प्रसाद१९७१
ह्यात वावगे किंवा चुकीचे असे काहीच नाही पण Risky मात्र आहे. आधी One Night Stand म्हणुन agreement असले तरी नंतर एक जण जर गुंतला कींवा पझेसिव्ह्नेस आला तर मात्र मात्र मोठा प्रोब्लेम होइल.
18 Aug 2014 - 4:25 pm | गवि
करणारे वन नाईट स्टॅंड करतात..
करणारे डे स्टॅंडही करतात..
झोपणारे एकत्र झोपतात..
जागणारे एकत्र जागतात..
वेगवेगळ्या लोकांसोबत झोपतात.
एस्टी स्टॅंडवर रात्री झोपतात..
गर्लफ्रेंड सोडतात.. बायको सोडतात..
नवरा धरतात.. ब्वायफ्रेंड बदलतात..
आपण फक्त बोलून जीभ विटाळायची अन चर्चा कवटाळायची..
18 Aug 2014 - 4:33 pm | वेल्लाभट
लेख आवडला. (त्याच्याशी सहमत आहे असं नाही)
पैसा, कंजूस, मृगनयनी इत्यादींसह अनेक प्रतिसादांशी मी सहमत आहे.
एक आहे, ही गोष्ट परस्पर सहमतीने होत असल्याने, बलात्कारापेक्षा बरीच म्हणायची. अर्थात आपल्या कक्षा, आपली तत्व, आदर्श, संस्कार इत्यादी गोष्टी आपणच ठरवायच्या असतात. तो काळ कधीच सरला, की एखादी गोष्ट सरसकट योग्य अथवा अयोग्य ठरावी आणि ती सर्वांनी पाळावी. त्यामुळे हा ज्याचा त्याचा प्रश्न असू शकतो. कुणी तो योग्य अयोग्य ठरवू शकत नाही.
पण मागील प्रतिसादात उपस्थित झालेल्या काही प्रश्नांची जोड घेऊन मला एकच म्हणावसं वाटतं इथे. की वरचा धागा, त्यातील विचार, पटलेल्यांनी अथवा न पटलेल्यांनी, आणि एकंदरितच सर्वांनी, कुठल्याही बाबतीत डबल स्टँडर्ड्स ठेवू नयेत. दुहेरी तत्व, दुहेरी आदर्श जपू नयेत. म्हणजे ति-हाईताची ही गोष्ट ऐकताना चवीने ऐकायची आणि कुणी 'तुमच्या जवळच्याने असं केलं तर' असं विचारलं की अंगावर यायचं असं असू नये.
18 Aug 2014 - 4:51 pm | विलासराव
सहमत.१+
माझे संस्कार काय ते चांगले. जग्(लोक) तेवढे वाइट.
का तर माझ्याप्रमाणे विचार करत नाहीत किंवा करु शकत नाहीत. बस्स.
त्यामुळे मी बल लावतो माझेच कसे खरे हे पुढे रेटायला. पण मी मलाच तपासुन पहात नाही. कारन त्याची काही गरजच नाही. मी तर सर्वज्ञ असा सेल्फ स्टॅप मारला की झाले.
18 Aug 2014 - 4:37 pm | सूड
ह्म्म्म !!
18 Aug 2014 - 4:43 pm | स्पा
ति.स.
18 Aug 2014 - 4:44 pm | अजया
हम्म्म...अतीतीव्र सहमत
18 Aug 2014 - 5:12 pm | चौकटराजा
डॉ राजन भोसले यानी एक लेखात असे लिहिले होते की पुरूष व स्त्री यात ( सर्वसाधारण पणे ) एक महत्वाचा फरक आहे की पुरूषाला शरीरसंबंधासाठी भावनिक गुंतवणुकीची गरज नैसर्गिक रित्याच लागत नाही. ती गोष्ट स्त्रीची नाही. तेंव्हा कितीही युगे गेली तरी स्त्रीचा हा मानसिक पॅटर्न कायमच राहाणार व पुररूषाचाही. मग संस्कृतिच्या श्रुंखला सैल झाल्या तर काय होईल. समलिंगी संबध करण्याची इच्छा दाबून न ठेवता त्यास चालना मिळेल. ( जे आता होते आहे ) तसेच बाउंड्री लाईन वरच्या स्त्रिया देखील असे वन नाईट स्टॅन्ड साठी तयार होतील. काही स्त्रिया असा " स्टॅन्ड" लग्नानंतर घेणार नाहीत.काही लग्नानंतरही घेतील. शेवटी या मानसिक व सांस्कृतिक अशा मिश्रित स्पेक्ट्रम वर स्त्री कुठे उभी आहे यावर असले स्टॅन्ड अवलंबून रहातील. एवढेच काय परस्त्री मातेसमान ही काही नुसती कल्पना नाही. काही पुरूष ते तेंतोतेंत पाळतानाही आपण पहातोच की.
19 Aug 2014 - 4:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
भंपक छद्मविज्ञान पसरवायला शिक्षण आणि पदवीची आवश्यकता नाहीच. डॉ भोसलेंनी असं लिहीलेलं असल्याचा काही दुवा दिलात तर उत्तम. (नाहीतर ते बदनामीचा खटला दाखल करू शकतात हो!)
स्त्रियांनाही एका रात्रीपुरत्या शारीरिक संबंधांसाठी भावनिक गुंतवणुकीची आवश्यकता नसते. याचे बरेच पुरावे आहेत. त्यातला एक दणदणीत पुरावा म्हणजे स्पर्म्समध्ये दोन प्रकार असतात, एक मावळे आणि दुसरे फलन घडवू शकणारे. मावळ्यांचं कामच असं की इतर पुरुषांच्या फलन करणाऱ्या स्पर्म्सवर हल्ला करून त्यांना मारून टाकायचं. हे काम अर्थातच स्त्रीच्या योनीमार्गात करावं लागतं. उत्क्रांतीमधला हा टप्पा येण्याचं कारण पूर्वापार स्त्रिया, आधुनिक पुरुष-स्त्रियांच्या पूर्वज स्त्रिया एका पुरुषाबरोबरच संबंध ठेवणाऱ्यातल्या नव्हत्या; 'वन नाईट स्टँड' माणसांमध्ये - होय, स्त्रियासुद्धा माणूसच - अतिप्राचीन काळापासून चालत आलेले आहेत.
दीर्घकालीन संबंध ठेवण्याचा विचार करताना पुरुषही शिस्न वापरून नाही, मेंदू वापरूनच विचार करतात. याबद्दल evolutionary psychology मध्ये बऱ्याच संशोधकांनी संशोधन आणि उत्तम पुस्तकं लिहीलेली आहेत. David Buss यांनी या विषयावर अतिशय उत्तम संदर्भपुस्तक लिहीलेलं आहे.
---
नैतिकतेबद्दल इतर कोण काय, काय-काय म्हणतं यापेक्षा सेक्सॉलॉजी विषयाचा अनेक दशकं अभ्यास करणारे मास्टर्स आणि जॉन्सन काय म्हणतात ते मला मुद्दाम उद्धृत करावंसं वाटतं.
"There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable."
पुस्तकाचं नाव - Masters and Johnson on sex and human loving (पृष्ठ क्र.१०)
लेखक - William H. Masters, Virginia E. Johnson आणि Robert C. Kolodny
प्रकाशक - Little, Brown and Company
(तिरपा ठसा लेखकांचाच)
19 Aug 2014 - 9:32 am | पिंपातला उंदीर
@अदिति- जबरा प्रतिसाद
19 Aug 2014 - 9:59 am | पुण्याचे वटवाघूळ
मग? तशा अतिप्राचीन काळी चालणार्या अनेक गोष्टी होत्या ज्या आज चालू ठेवणे योग्य नाही--उदाहरणार्थ कपडे न घालणे, गुहेत राहणे, कंदमुळे खाऊन राहणे इत्यादी.अगदी मध्ययुगीन काळातही लहानसहान गुन्ह्याबद्दलही हाल हाल करून ठार मारले जात असेच.आज तसे करणे योग्य नाही हे नक्कीच.इतर अनेक गोष्टींविषयी असे बोलता येईल. मग प्राचीन काळी वन नाईट स्टॅन्ड चालू होता म्हणून तो आजही सुरू ठेवण्यात काही गैर नाही?
दुसरे म्हणजे वन नाईट स्टॅन्डमधून गर्भधारणा झाली तर त्याचा त्रास बाईलाच होणार आणि पुरूष पळून जाऊन शकतो आणि नामानिराळा राहू शकतो.ज्या गोष्टीचा शेवटी स्त्रियांनाच त्रास होणार त्याच गोष्टीत अन्यथा स्त्रीमुक्तीचा उदोउदो करणार्यांना काहीच गैर वाटत नसेल तर याची विसंगती कशी सोडवावी?
19 Aug 2014 - 11:37 am | सूड
>>"There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable."
हे वाचलं नाहीत, का वाद घालायचा म्हणून सोयीनं वाचायचं विसरलायत?
मला हेच कळत नाही; ज्याला झेपतं त्यानं करावं, नाही त्यानं फंदात पडू नये असं सोप्पं लॉजिक असताना काय म्हणून इथं गळे काढायला येतात लोक.
19 Aug 2014 - 5:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
यापलिकडे सोप्या शब्दांत सांगणं कठीण आहे.
मास्टर्स आणि जॉन्सन (आणि कोडोनेली) अनार्कीस्ट होते असाही "आरोप" करता येईल. पण सुरूवातीला हे वाक्य लिहील्यावर त्याच पुस्तकात पुढे गर्भधारणा टाळण्याच्या निरनिराळ्या उपायांची चर्चाही केलेली आहे.
22 Aug 2014 - 8:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रश्न गळे काढण्याचा नाही, स्वातंत्र्याचा पुरस्कार करतांना ज्या सामाजिक संस्थाना धक्का लागणार आहे, त्या योग्य अयोग्यतेचा आहे आणि येत्या काळात वर प्रतिसादात कोणी तरी म्हटल्या प्रमाणे समाज पुन्हा यु टर्न घेईल. राहिला प्रश्न वन नाईट.....चा याला एक वर्ग जे काही लपून छपून चालत आहे त्याला स्वातंत्र्याची गळचेपी नावाखाली अधिकृत मान्यता मिळवू पाहात आहे, माझं मत हे वन नाईट...चुक आहे कुटुंब संस्था उध्वस्त करण्याचा प्रकार आहे, स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार माजणार असेल तर मी तरी त्याचं समर्थन करणार नाही.
-दिलीप बिरुटे
22 Aug 2014 - 3:00 pm | सूड
>>राहिला प्रश्न वन नाईट.....चा याला एक वर्ग जे काही लपून छपून चालत आहे त्याला स्वातंत्र्याची गळचेपी नावाखाली अधिकृत मान्यता मिळवू पाहात आहे, माझं मत हे वन नाईट...चुक आहे कुटुंब संस्था उध्वस्त करण्याचा प्रकार आहे,
ओके, म्हणजे लग्न करुन मुलंबाळं असताना एखादी व्यक्ती (स्त्री/पुरुष कोणीही) बाहेरख्यालीपणा (ONS to be sugar coated) करत असेल तर आपलं काय म्हणणं आहे? दोघातल्या एकानं सावरुन धरलं म्हणून चारचौघात बरं दिसत असेल ते, पण असं कुटुंब असून नसून काय फरक पडतो? माझ्या प्रतिसादापुरतं लिहायचं झालं तर स्वातंत्र्याची गळचेपी वैगरे अशा अर्थानं मी लिहीलं नाहीये. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की ज्याला/जिला जे करायचं ते ती व्यक्ती करणारच, आपण इथं काथ्याकूट करुन शष्प फरक पडणार नाही. उद्या माझ्या घरात, मित्र-मैत्रिणीत अशी गोष्ट निदर्शनास आली तर मी मित्र/ नातेवाईक म्हणून 'फक्त एकदा' सल्ला देईन. पुढे आयुष्य त्या-त्या व्यक्तीचं आहे.
>>स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार माजणार असेल तर मी तरी त्याचं समर्थन करणार नाही.
ज्या व्यक्तीला हे करायचंच आहे त्याला समर्थन मिळो न मिळो, त्यातून काही फरक पडतो असं तुम्हाला वाटतं ? बर्याचदा घरातल्या घरात माझ्याच मताला महत्त्व मिळायला हवं असा अट्टाहास चाललेला असताना ज्यावर चर्चा चालू आहे त्या व्यक्ती आपल्या ओळखीपाळखीच्याही नाहीत, असं असताना आपल्या समर्थन देण्याचा न देण्याचा काय फरक पडतो?
माझं म्हणणं असं आहे की आपल्याला काय करायचंय हे आपण आपल्या बाबतीत ठरवू शकतं, दुसर्याने काय करावं हे आपण कसं ठरवायचं? आणि ठरवलं तरी ती व्यक्ती तोंडदाखलं एक आणि माघारी एक असं वागणार नाही कशावरुन? ह्यापेक्षा तोंडावर सांगून असं करणार्या व्यक्ती अधिक योग्य, आपण जे करतोय ते कबूल करण्याचे गट्स त्यांच्यात असतात असंच मी म्हणेन.
22 Aug 2014 - 7:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एखादी व्यक्ती (स्त्री/पुरुष कोणीही) बाहेरख्यालीपणा (ONS to be sugar coated) करत असेल तर आपलं काय म्हणणं आहे? दोघातल्या एकानं सावरुन धरलं म्हणून चारचौघात बरं दिसत असेल ते, पण असं कुटुंब असून नसून काय फरक पडतो?
फरक पडतो. चारित्र्यावबद्दल अविश्वास निर्माण झाला की पती पत्नीमधे बेबनाव वाढू लागतात. संसाराचा सूर बदसूर होऊ लागतो. आणि परस्परापासून वेगळे होण्याची भावना बळावू लागते त्याचा परिणाम घटस्फोटापर्यंत पोहचतो आणि कुटुंबावर परिणाम होतो. मुलं, शिक्षण, घर खर्च आणि इतर प्रश्न निर्माण होतात. तेव्हा कोणाचाही बाहेरख्यालीपणा कुटुंबासाठी घातकच असतो.
माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की ज्याला/जिला जे करायचं ते ती व्यक्ती करणारच, आपण इथं काथ्याकूट करुन शष्प फरक पडणार नाही.
आपणच म्हणता माझ्या ''मित्र-मैत्रिणीत अशी गोष्ट निदर्शनास आली तर मी मित्र/ नातेवाईक म्हणून 'फक्त एकदा' सल्ला देईन'' हा सल्ला तरी कशाला द्यायचा.ज्यांना कोणाला या विषयावर गळे काढणार्यांना काढू दिले पाहिजेत. कारण कोणाच्या प्रतिसाद अथवा चर्चेने जर कोणाला फरक पडत असेल आणि आपल्याला वाटत असेल की कोणाला शष्प फरक पडणार नसेल तर उगाच कशाला आपण कोणाकडून अपेक्षा करता की कोणी काय पावलं उचलली पाहिजेत. अपेक्षा करणंही , सोडून दिलं पाहिजे नाही का ? पण, तसं होतं नसतं आपणही या समुहाचे एक घटक असतो. पारंपरिक आणि नव्या विचारांचा प्रभाव आपल्यावर पडतच असतो.
आपल्या ओळखीपाळखीच्याही नाहीत, असं असताना आपल्या समर्थन देण्याचा न देण्याचा काय फरक पडतो?
आपल्या कोणी ओळखीचे असो की नसो उद्या जालावर वाचणारा वाचक जर अशा वन नाईट मधून जाणार असेल तर त्याला संबंधित गोष्टीत योग्य अयोग्य हे कळलचं पाहिजे, आपल्या समर्थन अथवा विरोधानाचे त्याला नक्की फरक पडतोच,पडतो.
माझं म्हणणं असं आहे की आपल्याला काय करायचंय हे आपण आपल्या बाबतीत ठरवू शकतं, दुसर्याने काय करावं हे आपण कसं ठरवायचं?
आपल्या आजुबाजुच्यांवर आपले आणि आपल्यांवर इतरांचा प्रभाव हा पडतच असतो. दुसरा काय करतो आणि दुसर्याने काय करु नये याबाबतीत एक प्रेशर या समाजाचं असतंच असतं तेव्हा दुसर्यानं काय केलं पाहिजे हे नक्कीच सांगता येतं.
सारांश असा की गळे काढणा-यांना गळे काढू दिले पाहिजे, गळे काढू म्हणुन उगंच हिनवू नये असे वाटते.
-दिलीप बिरुटे
22 Aug 2014 - 9:04 pm | सूड
>>फरक पडतो. चारित्र्यावबद्दल अविश्वास निर्माण झाला की पती पत्नीमधे बेबनाव वाढू लागतात. संसाराचा सूर बदसूर होऊ लागतो. आणि परस्परापासून वेगळे होण्याची भावना बळावू लागते त्याचा परिणाम घटस्फोटापर्यंत पोहचतो आणि कुटुंबावर परिणाम होतो. मुलं, शिक्षण, घर खर्च आणि इतर प्रश्न निर्माण होतात. तेव्हा कोणाचाही बाहेरख्यालीपणा कुटुंबासाठी घातकच असतो.
मी असून नसून काय फरक पडतो त्याचा अर्थ असं कुटुंब असून नसल्यासारखं आहे हेच म्हणायचंय.
बाकी जे काही लिहीलंयत त्याबद्दल आपल्या मताचा नक्कीच आदर आहे. आपण म्हणताय तसं नुसतं वाचून लोकांना उपरती होणार असेल तर नक्कीच आनंद आहे.
॥इति लेखनसीमा॥ __/\__
20 Aug 2014 - 1:48 pm | चिगो
अहो, कॉन्ट्रॅसेप्टीव्स असतात, कंडोम असतात, गोळ्या असतात.. ज्यांना "वन नाईट स्टॅन्ड" करायचाय ते घेतील की काळजी.. संभोग-स्वातंत्र्यावर माझे मत फक्त एवढेच आहे की त्याचा पुरस्कार करणार्यांनी डबल स्टँडर्ड्स ठेवू नयेत. "मी कॅसानोवा आणि बायकोनी मात्र पतिव्रता असावं" कींवा ह्याच्या उलट स्टॅन्डर्ड्स नसावेत. बाकी, नवरा किंवा बायकोपेक्षा वन नाईट स्टॅन्डवाला/ली "सरस" वाटला/ली आणि त्यातून मग गुंतागुंत वाढली तर काय ह्याचा एक तर विचार करुन ठेवावा किंवा त्या परिस्थितीला तोंड द्यायला खंबीर असावे..
21 Aug 2014 - 9:24 pm | पुण्याचे वटवाघूळ
अहो लग्नाचे ’आमिष’ दाखवून बलात्कार केल्याची एकही बातमी ऐकली नाहीत का आतापर्यंत?काही स्त्रिया अशा भाबड्या जालामध्ये अडकतात आणि पुरूष त्याचा फायदा घेतात.आणि मुळात तसा फायदा घ्यायची पुरूषांची इच्छा नसेल तरी प्रत्यक्ष गर्भधारणा झाल्यानंतर मात्र टोपी फिरविणारे पुरूष तुम्ही कधीच कुठेच (निदान बातम्यांमध्ये तरी) बघितले नाहीत? कुसुम मनोहर लेले हे नाटक प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर आहे हे तुम्हाला माहित आहे ना?तेव्हा या गोष्टीत जो काही त्रास होईल तो स्त्रियांनाच होईल आणि त्याचे कारण निसर्गाने गर्भाधारणा व्हायची सोय केवळ स्त्रियांमध्ये केली आहे. तेव्हा आपला कार्यभाग साधून नामानिराळे होणारे पुरूष जोपर्यंत आहेत तोपर्यंत या वन नाईट स्टॅन्डला समाजमान्यता नक्कीच मिळायला नको.आणि अशी तत्वे समाजात आहेत तोपर्यंत तो 'इतरांचा प्रश्न' म्हणून सोडून देणेही बरोबर नाही.कारण इतरांचा प्रश्न आपल्या जवळच्यांचा प्रश्न कधी होईल हे आपल्याला कळणारही नाही.
उगीच आपण किती लिबरल आहोत हे दाखवायला असा विचार करणारे लोक बघितले की खरोखरच आश्चर्य वाटते.
21 Aug 2014 - 10:28 pm | सूड
>>तोपर्यंत या वन नाईट स्टॅन्डला समाजमान्यता नक्कीच मिळायला नको.
ओके ठिकाय, मान्यता मिळू नये म्हणून तुम्ही स्वतः काय पावलं उचलणार ते वाचायला आवडेल.
19 Aug 2014 - 11:51 am | चौकटराजा
स्त्रियांनाही एका रात्रीपुरत्या शारीरिक संबंधांसाठी भावनिक गुंतवणुकीची आवश्यकता नसते. याचे बरेच पुरावे
आहेत.
आमच्या प्रतिसादातील सर्वसाधारण पणे हा शब्द तुम्ही वाचलेला दिसत नाही. म्हणूनच आम्ही म्ह्टले आहे की एखादी स्त्री
नैतिकतेच्या पथावर नक्की कोठे उभी आहे हे महत्वाचे. पहिले वाक्य जर सोडले तर बाकी प्रतिसादातील सर्व वाक्य आमची आहेत. त्याब्द्द्ल बदनामीचा खटला भरायचा असेल तर आमच्यावर भरा ! बाकी सर्व मुल्ये व्यक्तिसापेक्ष, देश सापेक्ष, काल सापेक्ष असतात हे सांगायला जॉन्सन मास्टर कशाला हवेत ... ?
19 Aug 2014 - 12:21 pm | संजय क्षीरसागर
चौरा, त्याला `विदाबाधा' म्हणतात. एकदा ती झाली की विद्याशिवाय बुंधाच हालत नाही!
_____________________
आमचे एक विदाप्रेमी स्नेही आहेत, त्यांना खाजगीत `सदाविदा' म्हणतात, त्यांचा हा विनोद वाचा (आणि `वन नाइट स्टँडच्या' संदर्भात बघा!) म्हणजे तुम्हाला कल्पना येईल:
__________________________
माणूस मोठा झाला तरी बालपणीच्या सवयी सुटत नाहीत हेच खरं. सदाविदाचं लग्न ठरलं. भावी पत्नीविषयी सामान्य पतीला असते तशी त्याला पण उत्सुकता होती. शेवटी न रहावून, एका निवांत क्षणी, त्यानं तिला विचारलंच,
‘लग्न होण्यापूर्वी आपण एकमेकांशी ओपन व्ह्यायला हवं, खरं की नाही? आता मला सांग, तुझा कुणी बॉयफ्रेंड वगैरे आहे का?’
ती पण साधीच, सरळपणे म्हणाली, ‘छे, काही तरीच काय!’
‘ओके, ओके, पण मला एक सांग, याचा तुझ्याकडे काही विदा आहे का?’ न रहावून सदाविदा बोललाच!
ती बघतच राहिली! खरं तर `अल्विदा'च म्हणणार होती, पण तिच्या लक्षात आलं, याचं नांवच सदाविदा आहे!
विदा मिळाल्याशिवाय याची गाडी पुढेच सरकत नाही. काय करणार बिचारी? आता पत्करलंय म्हटल्यावर म्हणाली,
‘सध्या तरी माझ्याकडे विदा नाही, जमला की तुला देईन हं नक्की.’
हा बागडू, पुढे का होईना `विदा ' मिळणार यावरच खुष! आणि त्या आशेवर लग्न करून मोकळा.... तर अशी सगळी परिस्थिती.
19 Aug 2014 - 9:13 pm | विलासराव
चौरा, त्याला `विदाबाधा' म्हणतात. एकदा ती झाली की विद्याशिवाय बुंधाच हालत नाही!
१++
20 Aug 2014 - 1:40 pm | पुण्याचे वटवाघूळ
अरे मी चक्क संक्षींशी सहमत आहे :) अशा लोकांना व.पुंचे स्टॅटिस्टिक मराठे ऐकायला दिले पाहिजे.
22 Aug 2014 - 8:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सिमोन द बुव्हाच्या सेकंड सेक्स चा कुठेच उल्लेख केला नाही त्याबद्दल मी आपला निषेध व्यक्त करतो. ;)
मला इथे संदर्भासहीत प्रतिसाद लिहायचा आहे, ट्याम्प्लिज थोड्या वेळात हजर होतो.
-दिलीप बिरुटे
22 Aug 2014 - 8:51 pm | आनन्दिता
=)) =)) =)) + १ अगदी हेच्च ,!!
19 Aug 2014 - 9:33 am | सुबोध खरे
आदिती ताई,
दोन तर्हेचे शुक्राणू मानवी शरीरात असल्याचे वाचल्याचे आठवत नाही. याचा संदर्भ काही असेल तर माझे ज्ञान अद्ययावत करायला आवडेल. कारण कृत्रिम गर्भधारणा केंद्रात काम करीत असताना असे शुक्राणू वेगळे करता येतात असे वाचल्याचे आठवत नाही.
मानव हा उत्क्रांतीमध्ये खूप पुढे पोहोचलेला आहे.
या गोष्टी अपृष्ठ वंशीय( INVERTEBRATES) मध्ये असल्याचे आठवते. उदा. कोळी जेथे मादी दोन किंवा तीन नरांशी संग करते आणी त्यातील कोणत्या नराचे शुक्राणू "वापरायचे" ते ठरवते. कोळी नर सुद्धा दुसर्या नराचे शुक्राणू मादीच्या जननेद्रीयातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व शक्य असण्याचे कारण त्या प्राण्यात योनी शौचालय आणी मूत्राशय एकाच असते( CLOACA). (उदा पक्षी गणात मुत्र आणी विष्ठा एकच असते)
19 Aug 2014 - 12:35 pm | प्रसाद१९७१
डॉक्टर साहेब, बरे केलेत हा प्रतिसाद लिहीलात ते. नाहीतर माझ्यासारखी माणसे अश्या "रेटुन" सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवुन राहीली असती. आदिती ताईंच्या बाकीच्या पोष्टी पण नीट "लक्ष" देउन वाचल्या पाहीजेत.
19 Aug 2014 - 12:52 pm | संजय क्षीरसागर
च्यायला, आता हा `दणदणीत पुरावा' कशाला पायजेल? आणि योनिमनीच्या गोष्टी कशापायी? लेखकानं साधी गोष्ट विचारली आहे,
19 Aug 2014 - 5:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
संदर्भ - मी ज्या पुस्तकात हे वाचलं ते Evolutionary Psychology नावाचं पुस्तक डेव्हीड बस नामक संशोधकाने लिहीलेलं आहे. त्या पुस्तकात याचा संदर्भ असणाऱ्या रीसर्च पेपर्सची यादीही दिलेली आहे. पुस्तक माझ्याकडे आत्ता नाही म्हणून ती यादी देऊ शकत नाही.
पण गूगलवर kamikaze sperms किंवा Sperm competition म्हणून शोधलंत तरी चिकार मिळतील.
-----
ज्या गोष्टी चालू होत्या त्या माणसाने जाणूनबुजून सुरू केल्या का 'स्वार्थी जनुकां'मुळे मनुष्यांच्या नकळत सुरू झाल्या. (उद्या म्हणाल, "अतिप्राचीन काळापासून हातातून काचेचा पेला निसटला तर खाली पडून फुटतो, आज हे चालू ठेवणे योग्य नाही." विनोदाचा भाग वगळता) ही जन्मजात, जनुकांमधून आलेली (खरंतर मीम, meme मुळे आलेली) मानवी वृत्ती आहे. ती आपल्या नैतिकतेच्या चौकटीत बसते का नाही याचा काहीही संबंध नाही.
19 Aug 2014 - 6:20 pm | सुबोध खरे
अदिती ताई
कामिकाझे शुक्राणूचे गृहीतक बर्याच वर्षापूर्वी नाकारले गेलेले आहे कारण पुढे केलेल्या संशोधनात असे आढळले कि दोन किंवा अधिक पुरुषांचे शुक्राणू एकत्र केले तरी त्यातील "इतर" शुक्राणू दुसर्या पुरुषाच्या शुक्राणुना मारू शकत नाहीत. याच गृहितकावर तर शुक्राणू पेढी अस्तित्वात आहेत आणी चालू आहेत. मानस शास्त्रज्ञ आणी त्यांच्या बर्याचशा उपपत्ती किंवा कारण मीमांसा अजून गूढच आहेत.
असो या पलीकडे विषयांतर नको
19 Aug 2014 - 7:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
संदर्भ?
सध्या, किंवा गेल्या हजार-दोन हजार वर्षांत मावळे शुक्राणू कसे वागतात यातून उत्क्रांतीजन्य कारणांचा अभ्यास करता येईलच असं नाही. दोन प्रकारचे शुक्राणू हा उत्पन्न झाले असतील याची कारणमीमांसा शोधण्याचा हा प्रयत्न आहे; त्याचं इतर कोणतं चांगलं उत्तर, कारण मिळेपर्यंत हे उत्तर नाकारण्याचं काहीही कारण दिसत नाही. त्याशिवाय त्याला अन्य कारणांची जोड आहेच.
पाच-पन्नास वर्षांमध्ये माणूस काय करतो, शरीरात काय होतं याचा उत्क्रांतीजन्य कारणांशी थेट संबंध असेलच असं नाही.
इतपत भोंगळ* विधान विज्ञान शिकलेल्या, आणि रोजच्या आयुष्यात वापरणाऱ्या व्यक्तीकडून अपेक्षित नव्हतं.
*भोंगळ हे विधानाचं विशेषण आहे. कारण त्याला काहीही आगापीछा नाही. उत्क्रांतीजन्य मानसशास्त्र, खरंतर उत्क्रांती झाली हेच नाकारणारे अमेरिकन, कट्टर धार्मिक ख्रिश्चन असली भंपक विधानं करतात. पण ते त्यांच्या प्रकृतीशी मिळतंजुळतं असल्यामुळे अजिबात आश्चर्य वाटत नाही.
19 Aug 2014 - 7:22 pm | प्यारे१
नाही म्हणजे आम्ही थेट भोंगळ वगैरे आहोत ते मान्य आहे , पण 'वन नाईट' स्टॅण्ड घ्यायचा असल्यास माणसाच्या 'पाचपन्नास वर्षाच्या' लाईफशी कदाचित थोडाफार संबंध येईल पण हजार दोन हजार वर्षांत मावळे शुक्राणू आणि उत्क्रांतीचा अभ्यास वगैरे जरा अवघडच प्रकार आहे ना?
निसर्गत: काय होतं त्यापेक्षा असलेल्या मेंदूच्या साहाय्यानं केलेल्या विचारावर 'वन नाईट स्टॅण्ड/ कॅरीअर' काय ते अवलंबून जास्त असेल ना?
असलेली अथवा नसलेली किंवा कशीही नैतिकता मेंदूच्या साहाय्यानं बुद्धीच्या जोरावर आज, आत्ता काय करायचं ते ठरवायला मदत करेल ना?